बीएमएम२०१५:बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition)

मंडळी,
कुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तुत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.

Dan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.
जय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.

आपल्याला असेच बोधचिन्ह आणि घोषवाक्य आपल्या लॉस एंजिलीस मधील २०१५ मधील अधिवेशनासाठी तयार करायचे आहे.

यासाठी आम्ही बोधचिन्ह आणि घोषवाक्य (logo and slogan competition) अशा दोन स्पर्धा आयोजित करीत आहोत.

अधिवेशनासाठी मैत्र पिढ्यांचे ही थीम ठरवण्यात आली आहे. बोधचिन्ह आणि घोषवाक्य या दोन्ही स्पर्धा याच थीम वर आधारित असतील.

स्पर्धेमधे सहभागी होण्यासाठी आम्हाला खालील पत्त्यावर ईमेल करा:
spardha@bmm2015.org

स्पर्धेची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2014 आहे.

विजेत्याना योग्य पारितोषिक देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम आणि अधिक माहितीसाठी येथे पहा:
http://bit.ly/1dQki8P

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या अशा प्रकारच्या, चांगल्या विधायक कार्याच्या आवाहनामधे हिटलरच्या स्वस्तिकाचा उल्लेख नसावा असं वाटतं.

मिसळपाव, मनोगत, उपक्रम, ऐलपैल, मायबोली वगैरे बाकिच्या मराठी संस्थळांवरपण याची माहिती देणार आहात का? रादर, ..देणार आहात ना? !!

(मी मिसळपाव नावाचा या आणि ईतर संस्थळांवरचा साधा सभासद आहे. या व ईतर संस्थळांच्या अ‍ॅडमिन मंडळींशी काहिहि संबंध नाहि)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

स्वस्तिक हे हिटलरच्या पूर्वीही मोठं प्रतीक होतं अन हिंदू संस्कृतीपुरतं मर्यादितही नव्हतं. वगळावयाचाच झाला तर हिटलरचा उल्लेख वगळावा, स्वस्तिकाचा नको. त्या मूर्खापायी स्वस्तिक उगा बदनाम झालंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झालंय खरं तसं. हेच बघ - मीहि हिटलर+स्वस्तिक दोघाना वगळा म्हणालो! आणि खरंतर त्याने 'अपसव्य' केलेलं स्वस्तिक वापरलं होतंन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

रैट्ट यू आर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझीसुद्धा अशीच कल्पना होती, की नाझी पक्षाचे बोधचिन्ह आणि जुने भारतीय चिन्ह वेगवेगळ्या दिशांना गती दाखवते. परंतु हे बरोबर नाही.

दोन्ही दिशांची स्वस्तिके प्राचीन काळातही वापरली जायची, आणि दोन्ही प्रकारची स्वस्तिके नाझी पक्षाने सुद्धा वापरली. (विकिपीडियाचा "स्वस्तिक" पानावरील वेगवेगळी चित्रे बघावीत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बी एम एम काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बीएमेम काय आहे?
जर हे बृहन्महाराष्ट्र मंडळ असे काही असेल तर त्यांना आपली ओळख बीएमएम अशी इंग्रजी/रोमन अद्याक्षरात सांगावी लागावी यालाच दैवदुर्विलास म्हणतात काय? Wink

असो. चालु दे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बीएमएम हे ब्राह्मण मराठी मंडळ (चित्पावन मंडळाच्या धर्तीवर) किंवा भारतीय मराठी मंडळही (अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धर्तीवर) असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखातील दुव्यावर क्लिक केले असता बृहन्महाराष्ट्र मंडळ असे दिसले. त्यात मराठीचा समावेश नाही. मग हा दोन वेळा एम कशासाठी? (मात्र आता इंग्लिश आद्याक्षराच्या आरोपांतून मुक्त करता येईल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एम फॉर मंडळ.

बृहन् (बी) महाराष्ट्र (एम्) मंडळ (एम्). पण हे २०१५ चे प्रकरण आतापासूनच कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बृहन्महाराष्ट्र हा एकच शब्द समजला जातो ना?
वेगळे करायचे झाल्यास बृहद् महाराष्ट्र मंडळ असे म्हणावे लागेल असे वाटते (आणि बृहद् नक्की काय? महाराष्ट्र की महाराष्ट्र मंडळ असा प्रश्न उद्भवेल असेही वाटते). तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
बॅट सिग्नल फॉर बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

पुण्यातील 'बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज'चे लघुरूप 'बी.एम.सी.सी.' असे होते.

याउलट, 'बॉम्बे'चे (इंग्रजीतसुद्धा) अधिकृतरीत्या 'मुंबई' झाल्यानंतर 'बेस्ट'ला 'बेस्ट'च राखताना त्याचे 'बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट' झाले, ते खपून गेले. 'बेस्ट' 'बेस्ट' कशी, 'बी-मेस्ट' का नाही, असा प्रश्न कोणी विचारला नाही.

सारांश:

(१) भारीच बै शंका तुम्हाला.

(२) 'बृहन्महाराष्ट्रा'ला जोडायचे की तोडायचे, याबद्दल एकच असा काही संकेत नाही, एकमत नाही. (मराठीजनांस साजेसेच आहे म्हणा हे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीएमसीसी आणि बीएमसी या दोन्हीत बृहन् शब्द वापरूनही इंग्लिश आद्याक्षरे वेगळी येत आहेत. कदाचित इंग्लिश आद्याक्षरांसाठी काही नियम नसावा असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित मुंबईचे लोक (बेस्ट व बीएमसी) पुण्याच्या लोकांपेक्षा (बीएमसीसी) संधीप्रयोग उत्तमप्रकारे जाणतात असे म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरुन बीएमएमचे आयोजक मूळचे पुण्याचे असावेत असे दिसते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष्यात उपस्थित राहिलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या एकमेव अधिवेशनाचे वेळी आलेले काही वैयक्तिक अनुभव लक्षात घेता, या अटकळीशी सहमतीकडे कल होण्यास मला व्यक्तिशः तरी काही प्रत्यवाय दिसत नाही.

तूर्तास इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित मुंबईचे लोक (बेस्ट व बीएमसी) पुण्याच्या लोकांपेक्षा (बीएमसीसी) संधीप्रयोग उत्तमप्रकारे जाणतात असे म्हणता येईल.

निष्कर्ष सकृतदर्शनी योग्य वाटत आहे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बृहन्महाराष्ट्र हा एकच शब्द हवा हे बरोबर आहे. (उदा. बृहन्मुंबई महानगरपालिका - बीएमसीचे उदाहरण पाहा) बृहद् हे विशेषण कदाचित मंडळाच्या सदस्यांना लागू होत असावे (विशाल महिलांचा मेळावा हे उदाहरण पाहा)

मात्र बीएमएमचा दुसरा अर्थ विचार करुनही लागला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(उदा. बृहन्मुंबई महानगरपालिका - बीएमसीचे उदाहरण पाहा)

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अधिकृत इंग्रजी नाव तथा आद्याक्षरे ही अनुक्रमे 'म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई' तथा एमसीजीएम अशी आहेत, अशी शंका येते. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अहमदनगर'ला सामान्यतः 'नगर' म्हणून का संबोधले जाते? 'महाराष्ट्रातले हे एकमेव नगर' असा काही दावा आहे, की 'अहमद'चे नाव घ्यायला लाज वाटते?

(आडनावसुद्धा 'नगरकर' असे असते, 'अहमदनगरकर' असे नव्हे. निजामपूरकरांना जर आपले आडनाव 'निजामपूरकर' असे न सांगता नुसतेच 'पूरकर' असे सांगावेसे वाटत नाही, तर मग अहमदनगरकरांनाच नेमकी काय अडचण येते? फार कशाला, दक्षिण महाराष्ट्रात कोठेसे एक इस्लामपूरसुद्धा आहे. खुद्द त्या परिसरातल्या जनतेस त्यास नुसते 'पूर' असे न म्हणता 'इस्लामपूर' असे ठणठणीतपणे संबोधावयास काही प्रत्यवाय वाटल्याबद्दल ऐकलेले नाही. अशा परिस्थितीत नगरकरांचीच ही 'होलियर-द्यान-दाऊ' वृत्ती काही केल्या कळत नाही. असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहमदनगर ला नगर तर कुठल्याशा अशोक नगर ला अ.नगर अशी बसची पाटी पुण्यात स्वारी भांबुर्ड्यात पाहिली आहे.

अन इस्लामपूर मिरजेपासून ५३ किमी दूर, एनेच ४ वरती कोल्लापूरच्या उत्तरपूर्वेस ४५ किमीवर आहे साधारण. तेथील बसस्थानकाजवळ शिवसेनाप्रणीत "ईश्वरपूर" अशी पाटी पाहिली आहे. इस्लामपूरच कशाला, सातारा जिल्ह्यात रहिमतपूर अन अफजलपूर देखील आहे. काही जुन्या कीर्तनकारांची/संगीतकारांची आडनावे रहिमतपूरकर, इस्लामपूरकर, अफजलपूरकर, पाच्छापूरकर (हे पाच्छापूर ऊर्फ पातशहापूर असावे असे वाटते) इ. वाचलेली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवशेणेने इस्लामपूरकरांचे आडनव बदलून ईश्वरपूरकर करण्याचा आग्रह धरला नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, अजून तरी ऐकण्यात आलेला नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नगरकरांच्या अवांतर शंकांना "होलियर-द्यान-दाऊ" वृत्ती म्हणण्याचे कारणही काही केल्या कळत नाही.
दरम्यान स्टेट्समध्ये राहणार्‍यांनी असा प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे अशी आणखी एक अवांतर शंका मनात येऊन गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

द बॅट व्याक्रण सेज की बृहद् मधल्या द् चा महाराष्ट्र बरोबर संधी करताना न् होतो सबब बृहन्महाराष्ट्र हा शब्द योग्य आहे.

अन वेगळे केले तरी सवयीने लोक महाराष्ट्रच बृहद् समजतील सवयीने. असा वेगळा लिहिलेला शब्द आजवर पाहिलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बीएमएम या आयडीला बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा हेही भाषांतरित करुन कंसात इंग्लिशमध्ये सांगावेसे वाटले हाही प्रकार विनोदीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कर्तुत्व म्हंजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीएमएम हा प्रकार अखिल विश्व मराठी (साहित्य व इतर) संमेलनापेक्षा वेगळा आहे काय? असल्यास दोन्हींच्या अजेंड्यात नक्की काय फरक असतो ते कळाले तर बरे होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...हा काय प्रकार असतो?

(कधी ऐकण्यात आलेला नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0