Skip to main content

मैत्रीण : जगण्यातली, मनातली आणि कवितेतली

पुरूषाची मैत्रीण म्हटलं की आपल्याकडे थोडं सावरून बसायची पद्धत आहे. शंभर एक वर्षांपूर्वी 'मैत्रीण' हार्ट अ‍ॅटॅक देत असेल. आता फक्त सावरून बसण्यापर्यंत आलो आहोत हे एक चांगलंच. शिवाय आज विशीतली बरीच (सगळी नव्हे) मुलं-मुली मैत्री, आकर्षण, लैंगिकता याबाबतीत पुष्कळच 'सुलझे हुए' आहेत, अधिक थेटपणे या गोष्टींना सामोरं जात आहेत असंही मला वाटतं. किमान आजच्या अभिव्यक्तीतून, चित्रपट-नाटक, फेसबुक अशा माध्यमातून जे चित्र समोर येतंय ते तरी असं आहे. आणि ते आश्वासकही आहे. आज छत्तीस पूर्ण केलेला मी 'आमच्या वेळच्या' गोष्टी आठवतो तेव्हा मला आंतरिक पातळीवर फारसा फरक दिसत नाही, पण अभिव्यक्ती, आकलन - विशेषतः आजच्या मैत्रिणींचं मुलं आणि त्यांचं 'टेस्टॉस्टेरॉन प्रेरित' वागणं याचं आकलन - याबाबतीत मात्र फरक दिसतो. मैत्रिणीचा विचार करताना जगण्यातली, मनातली आणि कवितेतली अशा तीनही आघाड्या मिळून ती पूर्ण होते का असा मी विचार करतोय. अशी जर ती पूर्ण होत असेल तर प्रत्येक आघाडीवर ती थोडी थोडी अपूर्णच आहे असं म्हणावं लागेल. पण ते तसं नाही बहुधा. जगण्यातली अपूर्ण आहे, मनातली पूर्ण आहे आणि कवितेला पूर्णत्वाची भाषाच चालत नाही, त्यामुळे तिथे हा प्रश्नच नाही!

'व्हेन हॅरी मेट सॅली' या चित्रपटातलं 'स्त्री आणि पुरूष मित्र होऊ शकत नाहीत' हे एक गाजलेलं वाक्य/विचार. ('मैने प्यार किया'मध्ये पुढे ते आपण रीतसर वापरलं.) एखादं सार्वकालिक सत्य किंवा सत्यांश असावा असं वाटायला लावणारा हा विचार पुढे पुष्कळच चर्चिला गेला. हे सार्वकालिक सत्य आहे का याबाबतीत मी ठाम नसलो (एकूणात मी फारच कमी बाबतीत ठाम असतो) तरी हॅरीचं पुढचं म्हणणं मला पटतं. सॅली त्याला 'का' असं विचारते तेव्हा तो म्हणतो की 'द सेक्स पार्ट ऑल्वेज गेट्स इन द वे'. मला ते पटतं कारण 'सेक्स पार्ट'चा अर्थ कायम लैंगिक भूक असा असत नाही. तीही असू शकते पण स्त्री आणि पुरूषामधलं 'सेक्शुअल टेंशन' अतिसूक्ष्म, अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपात का होईना जागं असतं. दोन मित्रात किंवा दोन मैत्रीणीत (ते समलिंगी नसतील तर) ते असत नाही. 'दृष्टी' चित्रपटात हा विचार 'स्त्री और पुरूष के बीच हमेशा एक उत्तेजना रहती है' अशा, आशयाच्या अधिक जवळ जाणाऱ्या समर्पक शब्दांत येतो. या उत्तेजनेला एक आदिम परिमाण, योग्य-अयोग्यच्या पलीकडे असा एक विस्तृत अर्थ आहे. स्त्री-पुरूष मैत्रीमधलं ते एक परिमाण आहेच असं मला वाटतं. अर्थात हे सगळं मान्य करूनही दोघांमधल्या निखळ मैत्रीची, ती मैत्री वर्षानुवर्षे टिकल्याची उदाहरणे सापडतील. ऑन-ऑफ होणारा 'लिंगभाव' गृहीत धरून मैत्रभाव चांगला आकार घेऊ शकतोच.

माझ्या बाबतीत हे झालं आहे का? तर हो. पण मी तरी म्हणेन की उत्तेजना पूर्णपणे गैरहजर होती, असते असं अगदी ठामपणे सांगता येणार नाही. उत्तेजनेमागे कदाचित 'नेचर'पेक्षा 'नर्चर'चा वाटा मोठा असेल, पण 'मैत्रीण' आणि 'मित्र' यात एखाद्या तंतूइतका फरक पडतोच. मैत्रिणीबरोबर मी अजून सिनेमाला गेलेलो नाही. म्हणजे फक्त ती आणि मी असे दोघं. किंवा संध्याकाळी अचानक मित्राकडे जाऊन दोघांनी भेळ खायला बाहेर पडणं हे मैत्रीणीच्या बाबतीत घडलेलं नाही. खरं तर 'हे होणं शक्य नाही' असं एक गृहीतक वातावरणीय संस्कारांमधून तयार झाल्याने ती मर्यादा आपल्या आपणच घालून घेतली गेली होती. (आता हा लेख एखाद्या मैत्रिणीला दाखवून तिला सिनेमाला येतेस का असं विचारून बघतो!)

'मुलगी' हा व्यक्तीविशेष काहीसा नीट समजायला लागला तो काळ साधारण माध्यमिक शाळेतला. त्यादरम्यान सगळेचजण भावनिक-लैंगिक विकासाच्या फ्रॉइडियन मार्गावरून चालत असतात. आमची मराठी माध्यमाची मुला-मुलींची एकत्र शाळा असली तरी मुलं-मुली एकत्र येणं हे दृश्य दुर्मीळच होतं. अर्थात एक-दोन निवडक मुलींशी मैत्री होती. अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, वाचन याबाबतीतच जास्त संवाद असायचा. एखाद्या मुलीविषयी वाटणारी विशेष आस्था - शाळास्तरीय प्रेम - मित्रांकडे व्यक्त व्हायचं तसं ते एका मैत्रिणीकडेही व्हायचं. पण एकूण सगळा मामला तसा 'सीरियस' नसल्याने (देवदास शाळेच्या वयात होत नाहीत, ती वेळ अजून यायची असते) त्यावेळेला आवडलेल्या मुलीच्या आठवणीतच रमून अभ्यासाला लागणे हा बहुतेकांचा ठरलेला मार्ग होता. पण एकूणात 'मुलगी'भोवती असलेलं वलय, 'मुलीवर इम्प्रेशन मारलं पाहिजे' हा स्वयंभू विचार, सौंदर्यामुळे पडणारी विकेट आणि हळूहळू प्रविष्ट होऊ लागलेलं शरीराचं आकर्षण या एकत्रित भेळेचा आस्वाद घेताना शाळा संपली. दहावीच्या परीक्षेच्या आधी एका विशेष उल्लेखनीय मुलीने हस्तांदोलन करून 'बेस्ट विशेस' दिल्या तेव्हा परीक्षेआधीची धडधड द्विगुणीत झाल्याचं स्मरतं. मला नेहमी वाटतं की मुलाची ओळख आधी 'मित्र' म्हणून होते आणि मुलीची ओळख आधी 'मुलगी' म्हणून होते यातच बहुधा 'मित्र' आणि 'मैत्रीण' वेगळे होण्याची बीजं आहेत.

तर मुलगा हा मित्र होताच कारण आजूबाजूला असणारी मुलं दुसरं काही होऊच शकत नव्हती. मुलगी मैत्रीण झाली पण 'मुलगीपण' पूर्णपणे गेलं नाही. तिच्याही मनातून आणि आमच्याही. मैत्रीची सुरूवात - गप्पा, सिनेमा, नाटक, गाणी, चर्चा, पुस्तकं अशी 'जेंडर न्यूट्रल' असली तरी. मित्राकडे रात्री गच्चीवर झोपायला जायचा कार्यक्रम ठरला की मैत्रीण अर्थातच कटाप. मैत्रीण असेल तर एका दिवसाची ट्रिप किंवा ट्रेक. नाहीतर दोन-तीन दिवसाचा ट्रेक. आणि ठरला तरी किमान दोन ते तीन मुली असतील तर. घरून मुलींना परवानगी मिळण्यात अडचण येते त्यात सावधगिरीचा हेतू असतो हे मान्य, पण आज असंही वाटतं की ही बंधनं काही अंशी सैल केली असती तर? कदाचित ते आव्हानही ठरलं असतं आम्हाला. कारण मग अशी बंधने काढूनही मित्रत्वाचं नातं टिकू शकतं हे वरच्या पिढीला दाखवून द्यावं लागलं असतं. मैत्रीणीच्या बाबतीत एक सीमारेषा ओलांडली की परिणाम फारसे चांगले होत नाहीत या भीतीमुळे मैत्रीण शब्दाला एक अलार्म बेल जोडली गेली आणि ती आमच्याही डोक्यात वाजेल याची काळजी घेतली गेली. आपल्याकडच्या आया, मावश्या, आत्यांना जी काळजी वाटते तीच हॅरी बोलून दाखवतो - सेक्स पार्ट ऑल्वेज गेट्स इन द वे!

जे मित्राकडून मिळतं किंवा मिळालं ते मैत्रिणीकडून मिळतं का? मिळालं का? मैत्रीण अधिक 'डाऊन टू अर्थ' असल्याने की काय कुणास ठाऊक पण मित्राला किंवा मला भिडलेली 'कोसला' मैत्रिणीला तितक्या तीव्रतेने भिडली नव्हती. किंवा कोसलाचा विषय निघाला आहे असं मैत्रिणीच्या बाबतीत तेव्हा फार झालं नाही. बरं, 'कोसला' बाजूला ठेवू - कारण ती मुलांच्या भावविश्वाला जास्त जवळची आहे. 'सावित्री' घेऊ. तिचाही विषय कधी निघाला नाही. अर्थात एक खरं की साहित्यात प्रत्येकाला आपल्याइतकाच रस असला पाहिजे अशी काही माझी अट नव्हती. आणि नाहीही. पण वाचन करणारे वाचलेल्यावर काहीच बोलत नाहीत तेव्हा मला जर विचित्र वाटतं. म्हणजे पुस्तक वाचून बाजूला ठेवून द्यायचं? थोडीसुद्धा चर्चा नाही? एक मात्र आवर्जून सांगतो -माझ्याकडची 'कोसला' दोन मैत्रिणींनीच मला दिलेली वाढदिवसाची भेट आहे. (त्याअर्थी मैत्रीण चांगलीच शहाणी! ‘मुली. मुली चांगल्याच असतात.’ हा कोसलातलाच आत्मप्रत्यय देणारी!) साहित्याचा हा एक धागा मैत्रिणीच्या बाबतीत अनेक दिवस सुटल्यासारखा वाटायचा. पुढे फेसबुक मैत्रीच्या टप्प्यावर मात्र अशा मैत्रिणी भेटल्या आणि आनंद झाला. 'डाऊन टू अर्थ'पणाची आणखी एक झलक म्हणजे नाटक-सिनेमा पाहून झालं की मित्रांना त्यावर कधी एकदा बोलतोय असं व्हायचं. मैत्रीण त्यात असायची, पण किती 'आतून' याची जरा शंका आहे. मैत्रीण किंचित अलिप्त, समयसूचक वागणारी, 'जायची वेळ झाली' असं पटकन म्हणणारी, गप्पात रेंगाळण्याची सीमारेषा आमच्याहून अलीकडे असणारी अशी होती याचं कारण तिचं 'नेचर' की 'नर्चर'? (हेही तिच्याशी बोलतोच आता!)

'नेचर' आणि 'नर्चर'चा गुंता सोडवणं हे महाकठीण काम! स्त्रीवादी दृष्टीकोन सांगतो की प्रत्येक गोष्ट लिंगभावावर आधारलेली असते आणि 'पुरूष' आणि 'स्त्री' हे 'घडतात'. त्यांचं नैसर्गिकीकरण स्त्रीवाद नाकारतो. म्हणजे मैत्रभावातही लिंगभाव निहीत असला पाहिजे. म्हणूनच मी मित्राकडे बघतो तसं मैत्रिणीकडे बघत नाही का? तिच्याशी बोलताना, तिच्याकडे बघताना 'ही मुलगी आहे, हिचं काहीतरी वेगळं आहे' असं वाटतं का? आणि वेगळं म्हणजे आमच्या दोघांमध्ये असलेला दोन अवयवांचा फरक की अजून काही वेगळं? मला वाटतं की मैत्रीण आणि मित्र यात गुणात्मक फरक नाही असाही अनुभव येत असला आणि स्त्री-पुरूष फरक हा स्त्रीवादी दृष्टीने 'नैसर्गिक फरकाचा' मुद्दा नसून हा फरक 'घडवण्यात' येतो असं जरी असलं तरी 'उपजत', 'निसर्गतः' असंही काही असतं जे भिन्नत्वाची जाणीव प्रबळ करतं. हा वेगळेपणा भौतिक आहे, 'फॉर्म'शी संबंधित आहे असं मला नेहमी वाटतं. मित्र आणि मैत्रीण यात गुणात्मक फरक नसेल, पण दृश्य फरक तर असेल? मैत्रीण माझ्या 'विरुद्ध' दिसण्यातली, माझ्या 'विरुद्ध' पोताच्या आवाजात बोलणारी असल्याने मैत्रीणीचा सहवास, तिचं मतप्रदर्शन, तिची अभिव्यक्ती याची कधीकधी वेगळी नोंद घेतली जाते खरी. त्याची सुरूवात बहुधा मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्राची 'मित्र' म्हणून नोंद घेण्याने आणि मैत्रिणीची 'मुलगी' म्हणून नोंद घेण्याने होते. आणि हे पूर्णतः संस्कारित नाही, यात नैसर्गिकता आहे असं मला वाटतं.

एका टप्प्यानंतर मैत्रीतील नेहमीची लक्षणे वागवत चालणारं जगणं वेगळं वळण घेतं आणि तुम्ही काही मूलभूत शोधू लागता. म्हणजे बुद्ध व्हायच्या मार्गाला लागता असं नव्हे, पण आपापल्या औकातीतला बुद्ध व्हावं असं वाटू लागतं. 'रूटीन' कुणाला चुकत नसतंच, पण रूटीनमधलं काही बदलता येईल का असा विचार सुरू होतो. हा प्रवास बऱ्याच लोकांचा होतो. माझाही झाला. इथे गंमत अशी होते की बाकी मित्र-मैत्रिणी अशा मूलभूतकडे वळले नसतील किंवा त्यांचं 'मूलभूत' आणि आपलं 'मूलभूत' यात फरक असेल तर ते काहीसे परके वाटू लागतात. आपला प्रवास आता जरा वेगळा होतो आहे आणि आपल्याला ऐकू येतात त्या 'ड्रम-बीट्स' आजूबाजूच्या प्रत्येकाला ऐकू येतातच असं नाही आणि त्यात आपले मित्र-मैत्रिणीही असतील ही जाणीव व्हायची एक वेळ येते. ती आली तेव्हा त्याने मैत्रभावाला अजिबातधक्का बसला नाही, पण आता गप्पांमध्ये आपण तितकेसे रमत नाही, आपले विषय वेगळे झाले आहेत हे जाणवू लागलं. मैत्रिणी संसारात, नोकरीत रमल्या आणि मी लग्नानंतर तीन वर्षांनी नोकरी सोडून संपादकीय कामात पडलो. (तीही नोकरीच, पण तिथे आर्थिक उद्दिष्टांपेक्षा वैचारिक उद्दिष्ट अधिक महत्त्वाचं होतं). विशीतली आणि लग्नापूर्वीची पुस्तकं बदलू लागली आणि मार्क्स-आंबेडकर-डार्विन वगैरे लोकांशी ‘मूलभूत हितगुज’ होऊ लागलं. मैत्रीणीच्या रूटीनमध्ये फारसा फरक पडला नव्हता. मित्रही अधिकाधिक पगार मिळवू लागले आणि अस्मादिक मात्र तात्विक प्रश्नांशी झटापट करू लागले. या सगळ्यात मैत्री अभंग राहिलीच, पण वर म्हटलं तसं गप्पांमध्ये काहीसं 'डिसकनेक्शन' येऊ लागलं.

मनातली मैत्रीण बहुधा इथे आकार घेऊ लागली. कारण आता स्वतःबद्दलचं काहीतरी कळलेलं होतं. (बायको म्हणून जी घरी आली तिच्या रूपाने मनातल्या मैत्रीणीला जवळची एक मैत्रीण भेटली. आणि ती एक मोठीच गोष्ट घडली! 'बायकोतली मैत्रीण' हा मात्र वेगळ्या लेखाचा विषय!)

मनातली मैत्रीण कशी आहे? शोधक वृत्तीची आहे. काही मूलभूत शोधणारी, बोलणारी, करणारी आहे. परखड आहे. 'आपण कुठे आहोत' याचा खल करणारी आहे. कपड्या-दागिन्यांपेक्षाही कवितेत, विचारात, पुस्तकात, उत्तरांच्या शोधात रमणारी आहे. प्रयोग करणारी आहे. बेधडक आहे. बंडखोर आहे. आपल्या एवढ्याशाच जगण्यात काही वेळा अशा येतात जिथे आपण ताठ उभं राहणं गरजेचं असतं. अशा वेळांचा मान राखणारी आहे. भडाभडा बोलणारी आहे. सुरक्षित जगण्याच्या, कुटुंबाच्या बाहेरचं बघणारी आहे. प्रश्न विचारणारी आहे. परिस्थितीवर ठसा उमटवणारी आहे.

मनातली मैत्रीण नीटशी भेटली नाही याचं एक कारण माझाही शोध कमी पडला, मी माझी जागा सोडून तशी मैत्रीण शोधायला गेलो नाही हेही आहेच. पण पुन्हा मगाचचा मुद्दा आहेच. मैत्रिणीशी मित्राशी वागतो तसं वागताना येणारं अवघडलेपण आणि त्यामुळे खंडित होणारा मैत्रीण शोध!

मैत्रिणीचं प्रतिबिंब कवितेत कसं पडलं? पहिल्या-वहिल्या कविता हृदयाचा बांध फोडून वगैरे लिहिलेल्या. त्यात 'तिच्या' आठवणींचे उमाळेच अधिक. पण चांगली गोष्ट ही की कविता त्यातच अडकली नाही आणि तिने व्यापक पट मांडायची मुभा दिली. त्याने थरारून जायला झालं. खरं तर उत्तम भंकस करावी, काहीएक दर्जेदार विनोदी लिहावं ही माझी पहिली आकांक्षा. पण कवितेनं जे रिंगणात खेचलं आणि घुमवलं ते अशक्य होतं. हृदयाचे उमाळे थोडे थंडावल्यावर मग कवितेतली ‘ती’ शांतपणे, समतोल प्रतिस्पर्धी म्हणून आली. पण ती मैत्रीण होती का? होती. बाई म्हणून होती. वेश्या म्हणून होती. पण बहुतेकदा 'ती' होती. कवितेतून वेश्या आली, तिच्या जगण्याचे ओरखडे आले, तिच्या काव्यात्म अस्तित्वाने 'इंपोटंट इंटलेक्च्युअल'ही सिद्ध झाला. पण मनातल्या 'मैत्रीणी'बाबतचं ('ती' किंवा प्रेयसीबाबतचं नव्हे) काही अजून तरी आलं नाही खरं. वेश्या म्हणजे तरी कोण? मनाच्ता तळातला संघर्ष, व्यक्तिगत अनुभव, शरीराच्या गरजेची स्थितीबद्ध सांस्कृतिक गोची आणि या सगळ्याकडे बघत विकट हास्य करणारी, बेदरकार काळजाची आणि तरी हतबल वेश्या. मला ती कायम मैत्रीण वाटतेच. सगळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय सोस गळायला लावणारी एक जुनी मैत्रीण. फक्त ती स्वतः कमी बोलते, तिच्याबद्दल आम्हीच जास्त बोलतो. तिने एक मोठंच ऐतिहासिक प्रश्नचिन्ह उभं केलं आहे आणि ते सोडवण्याच्या कृतीकार्यक्रमाचा हिस्सा असल्यासारखं आम्ही बोलत असतो. ही मैत्रीण कवितेतून बरेचदा येत राहिली.

कविता म्हणजे एक खतरनाक गोंधळच. आणि कवितेतून ‘तिचं’ येणंही तसंच. तिचं येणं प्रातिनिधिकही असतं. म्हणजे ही नक्की कोण? मनातली, प्रत्यक्षातली की आणखी कुणी? असा प्रश्न पडतो. जेव्हा ती बाई असते तेव्हा स्पष्ट असते. वेश्या असते तेव्हाही स्पष्ट असते. 'ती' मात्र तितकीशी स्पष्ट नसते. बहुधा माझं मध्यमवर्गीय जगणं याला कारणीभूत असावं! पण एकूणात कवितेतून स्त्रीरूप सुटणं अवघडच. जगताना दिसलेलं, अनुभवलेलं, दुखलेलं असं बरंच काही आणि मग प्रतिमांकित कविता. त्यातून 'ती' कशी सुटेल? कवयित्रीच्या बाबतीत 'तो' सुटणं अवघड आणि कवीच्या बाबतीत 'ती'!

मैत्रिणीची जागा एकूणात ही अशी. गोंधळाच्या, विषादाच्या, अपेक्षांच्या, उद्वेगाच्या वेळा सांभाळणारी. मैत्रभाव कधी न्यूट्रल, कधी 'जेंडर्ड' ठेवणारी.

मैत्रिणीकडून माझ्या अपेक्षा मात्र खूपच आहेत. वेगळ्या जगाचं स्वप्न बघण्याचा मार्क्सवादी स्वप्नाळूपणा मनात पुरेपूर उतरल्यावर किंवा गांधी-विनोबांच्या वैचारिक आकर्षणातून एखादं दार प्रकाशित झाल्यासारखं वाटू लागल्यावरही मैत्रीण - बाई म्हणून, समवयस्क मैत्रीण म्हणून, बायको म्हणून, वेश्या म्हणून प्रश्नांकित मुद्रेने उभी राहतेच. तिच्या मुद्रेवरील प्रश्न पुसणं मनात किंवा कवितेत काही अंशी शक्य होतं. पण माझ्याकडून ते प्रत्यक्षात पुसले जात नाहीत. अशा वेळी मला वाटतं मैत्रिणीनेच उठावं आणि प्रसंगी हाती शस्त्र घेऊन हे प्रश्न पुसावेत.

ती उठली तर बहुधा मी अधिक आश्वस्त होईन. आणि मग कदाचित आज रात्री गप्पा मारायला घरी ये आणि उद्या सकाळी कॉफी घेऊनच जा असं म्हणण्याचं माझं धाडसही होईल. शिवाय पहिलं आमंत्रण स्वीकारताना, माझ्या घरी येतानाही तिने प्रश्न पुसायचं शस्त्र आणलं तरी मला वाईट वाटणार नाही!

पुरूष स्पंदनं (दिवाळी २०१३)

Node read time
9 minutes
9 minutes

मन Mon, 30/12/2013 - 11:49

प्रांजळपणे विचार मांडणं आवडलं.
मला अधिक व्यवस्थित विचार मांडता आले असते, तर बरेचसे असेच लिहिले असते.
माझ्या बाबतीत हे झालं आहे का? तर हो. पण मी तरी म्हणेन की उत्तेजना पूर्णपणे गैरहजर होती, असते असं अगदी ठामपणे सांगता येणार नाही. उत्तेजनेमागे कदाचित 'नेचर'पेक्षा 'नर्चर'चा वाटा मोठा असेल, पण 'मैत्रीण' आणि 'मित्र' यात एखाद्या तंतूइतका फरक पडतोच. मैत्रिणीबरोबर मी अजून सिनेमाला गेलेलो नाही. म्हणजे फक्त ती आणि मी असे दोघं. किंवा संध्याकाळी अचानक मित्राकडे जाऊन दोघांनी भेळ खायला बाहेर पडणं हे मैत्रीणीच्या बाबतीत घडलेलं नाही. खरं तर 'हे होणं शक्य नाही' असं एक गृहीतक वातावरणीय संस्कारांमधून तयार झाल्याने ती मर्यादा आपल्या आपणच घालून घेतली गेली होती. (आता हा लेख एखाद्या मैत्रिणीला दाखवून तिला सिनेमाला येतेस का असं विचारून बघतो!)

हे अगदि सरळ साधं पण मार्मिक.
आम्ही वाचतोय, तुम्ही लिहीत रहा.

मन Mon, 30/12/2013 - 14:33

हेच लेखन पुन्हा वाचलं.
हे असं मनातलं कुणी लिहीत असलं तर मी कित्येकदा अचानक कोनत्याही रँडम/यदृच्छिक परिच्छेदापासून वाचण्यास सुरुवात करतो.
प्रत्येकाची लिंक लावण्यात, स्वतंत्रपणे वाचण्यात मजा येते.
कथा,कादंबरी ह्यात असे करण्यास फारसा वाव नसतो. पात्रांची लिंक लागत नाही फार मोठा गॅप घेतला तर.
पण आपापल्या औकातीतला बुद्ध व्हावं असं वाटू लागतं हे भारीच.
पण शेवटचे पाच्-सात परिच्छेद पुरेसे समजले नाहित :(

ऋषिकेश Mon, 30/12/2013 - 14:25

छान लिहिलंय. लहानपणीचं वर्णन तर छानच उतरलंय.. ८०-९०च्या दशकांपर्यंत शाळेत घडणं हे साचेबद्ध - किमान एका चौकटीच्या आत असल्याने- प्रत्येक जण थोड्याबहुत फरकाने हेच अनुभव सांगेल. नंतर मात्र कॉलेज व त्यापुढिल जीवनात प्रत्येक व्यक्तीला आलेले अनुभव/लाभलेली मैत्री त्यात बरेच बदल घडवते. माझ्या सुदैवाने मित्रांइतक्याच तोडीस तोड चांगल्या मैत्रीणीही आम्हाला मिळाल्या त्यामुळे लेखाच्या उत्तरार्धाशी (जरी तोही छान उतरला असला तरी) तितका समरस होऊ शकलो नाही.

एका मुलासाठी मित्र आणि मैत्रीणीच्यामध्ये कायमचा फरक असला तर असो बापडा, पण माझ्याबाबतीत तो फारतर विशीपर्यंत टिकला असेल.
कॉलेज जगत संपेपर्यंत असे फरक संप(व)त काही मुली अतिशय चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत - त्यांच्या लग्नानंतरही तितक्याच चांगल्या मैत्रिणी आहेत (काही त्यांच्या रिस्पेक्टिव्ह नवर्‍यांसकट काही त्यांच्याशिवाय - पण मैत्री टिकून आहे).. नाते तेव्हढे मोठे झाले आहे म्हणा किंवा काहीही. मग ते मैत्रिणींबरोबर एकट्याने चित्रपट बघणे असो नाहीतर वेळी अवेळी त्यांच्याकडे थडकणे किंवा त्यांच्या घरी रात्री जमून कल्ला करणे असो. माझे किंवा त्यांचे लग्न झाल्यानंतर मिळणारा वेळ, वास्तव्याची ठिकाणे बदलल्याने जो फरक पडला असेल त्यानेही मित्र आणि मैत्रीणींना भेटायच्या वेळा/संधी तितक्याच कमी झाल्या आहेत.

मुलींसमोर न बोलण्याच्ये विषय वगैरे अजूनही आपोआप पाळले जाते. मात्र तीच मुलगी चांगली मैत्रीण झाली की या विषयवगैरेच्या सीमा, बोलताना प्रस्तावना/पाल्हाळाची गरज वगैरे संपू लागते व हळुहळू नाहिसेच होते असा स्वानुभव आहे.

बाकी बायकोतील मैत्रीण हा वेगळा विषय आहे हे मान्य!! आणि तो विषय या लेखात आणून भेळ करण्याचा मोह टाळल्याबद्दल आभार नी अभिनंदन! :)

समांतरः नव्या सहस्रकात, समाजवादाला मागे सारून अर्थव्यवस्थेबरोबरचय अधिक मुक्त वातावरणांत शाळेत गेलेल्या पुढिल गटाचे या विषयातील अनुभव, मते त्यातील स्पष्टता थक्क करणारी आहे. आधीच्या पिढीतील डोक्यात जाणारी कुजकूज म्हणा किंवा मुलींबद्दल काहितरी हळूच 'तसलं' बोलून किंवा त्याविषयावर दबक्या आवाजात आंबट चर्चा करत ह्यँ ह्यँ ह्यँ करत पुरुषार्थ गाजवल्यासारखा आव आणणारी नतद्रष्ट जमात नाहिशी होऊ पाहत आहे - आकाश निरभ्र होत आहे हे ही नसे थोडके.

ऋषिकेश Mon, 30/12/2013 - 14:33

In reply to by ऋषिकेश

हल्लीच्या काळातील (गेल्या दोनेक वर्षातील -अ‍ॅट द मोस्ट) पौंगडावस्थेतील / नवतरूण (मॅक्स २०-२१) मंडळी मराठीतून ब्लॉग्स लिहितात का? या विषयांवर त्यांचे विचार एखाद्या कथेत/कादंबरीत/चित्रपटात आलेत का?
वाचायला आवडील.
---------
या वयातील भारतीय समकालीन इंग्रजीत लेखन असेल असे वाटते. कोणाला माहिती आहे का? रेकमेंडेशन्स?

मिहिर Mon, 30/12/2013 - 16:18

In reply to by ऋषिकेश

हल्लीच्या काळातील (गेल्या दोनेक वर्षातील -अ‍ॅट द मोस्ट) पौंगडावस्थेतील / नवतरूण (मॅक्स २०-२१) मंडळी मराठीतून ब्लॉग्स लिहितात का?

काय राव, ज्ञानेश्वरांना विसरलात होय? ;)

मन Mon, 30/12/2013 - 16:34

In reply to by बॅटमॅन

बुधभूषणम्?
.
.
शिवाय डेविड्/दाउद ह्यानं बायबलमधील काही psalms रचल्याचं मानलं जातं. त्यानंही कारकिर्दीची सुरुवात करताच नवतारुण्यातच ह्या रचना केल्यात म्हणे.

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 14:04

In reply to by मिहिर

ओहो, विना यक दोन लेख सरळ पाच लगत लेख पाडणारे ज्ञानेश्वर होय =))

आत्ता कळ्ळं. शिवाय यशाचे धनी वाळंबकर हेही एक पात्र आहेच.

पण या वयोगटातील काही लोक नुस्त्या प्रतिक्रिया लिहितात आणि लेख लिहिण्याच्या आवाहनांना फाट्यावर मारतात हेही पाहिलेय बरे ;)

अजो१२३ Mon, 30/12/2013 - 23:04

In reply to by ऋषिकेश

आकाश निरभ्र होत आहे हे ही नसे थोडके.

स्त्री व पुरुष एकत्र येत नसत, मिसळत नसत आणि मैत्र भाव ठेवत नसत हे आधुनिक शिक्षणपद्ध्ती आल्यानंतर चालू झाले. त्यानंतर लग्नाचे वय हळूहळू १०-१२ चे २८-३० झाले. त्यामुळे परलिंगविषयक भ्रम निर्माण झाले. आता ते सुटत आहेत म्हणून आकाश निरभ्र वाटत आहे.

मन Tue, 31/12/2013 - 10:55

In reply to by अजो१२३

"आधुनिक शिक्षण पद्धती येण्यापूर्वी स्त्री व पुरुष एकत्र येत असत, मिसळत असत" असे आपण म्हणू इच्छिता का?
म्हणू इच्छित असाल, तर इतर धाग्यांवर तुमच्याशी जोरदार फाइट देणार्‍या ग्यांगचे ह्याबद्दल काय म्हणणे आहे, ते जाणून घ्यायला आवडेल.
(ते ह्यावेळी गप्प बसून माघार घेतील हा अंदाज आहे.)

अजो१२३ Tue, 31/12/2013 - 13:22

In reply to by मन

माझे मत आहे खरे तसे. शहरी, मध्यमवर्गीय, सुशिक्षित लोक लै आखडू असतात. ते बायकांशी जाऊच द्या, शेजार्‍यांशीही बोलत नाहीत. आणि कहर म्हणजे डिप्रेशन येईपर्यंत स्वतःशीही काही बोलत नाहीत. नुसती मशीनीप्रमाणे कामे करत असतात. त्यांच्यातले काही मात्र असा विचार करायचेच काम उपजिविका म्हणून करतात. गंमत म्हणजे त्यांना अर्थातच त्यांना सगळं काही आलबेल दिसत नाही आणि ते 'समाज' कसा लिंगभेदावर फुटला आहे याचे वर्णन करतात.

मी एक उदाहरण देतो. कोणत्या मोठ्या (जास्त लोक असलेल्या) ऑफिसमधे, जिथे लिंगभेद नसावा ही जाणीव 'नागरीक म्हणून' तीव्र असते तिथे कॉमन टॉयलेट असते का? याच लोकांच्या स्त्रीया नवर्‍याला सॅनिटरी पॅड आणायला सांगत नाहीत. नवरेही काउंटरवर लाजतात कधी गरज पडली तर. हे लोक पॉश बसने कुठे चालले तर फ्रेश होण्यासाठी जिथे 'दोन्ही' आणि 'वेगळी' टॉयलेट्स असलेला धाबाच शोधतात. कधी लांब पल्ल्याची दोन गावामधून जाणारी बस पाहिली लघवीसाठी थांबवलेली पाहिली आहे का? पुरुष एकिकडे जातात आणि स्त्रीया दुसरीकडे. असा निसर्गधर्म पाळणे त्या तथाकथित सुशिक्षित/सभ्य लिंगभेदशोधकांना जमणारच नाही. मी तर चक्क निसर्गधर्माबद्दलच बोलतोय. इतर गोष्टीत सभ्य बायकांना गावकरी बायका शंभरवेळा लोळवतील, तुम्ही फक्त मला ग्रामीण मित्र मैत्रिणींनी काय करणे अपेक्षित आहे ते सांगा. पण गावाकडच्या लोकांत काहीतरी कमी आहे आणि ग्रामीण स्त्रीया वैचारिक दृष्ट्या कशा मागास आहेत हे दाखवायची इतकी खुमखुमी असते कि असे लिंगाधारीत भेद असह्य रुपात असतात हे प्रतिपादिल्या शिवाय सभ्य शहरी समाजाभ्यासकांना पुढे जाताच येत नाही.

लेख अशा अनावश्यक विचारांचा किती मोठी शिकार आहे हे वाक्यावाक्यातून जाणवते. अगोदर पृथ्वीला दोन धृवांत विभागा. मग जिथे ज्या गोष्टींचा संबंध नाही त्या आणा. कवितेतील उत्तुंग स्त्री तुम्हाला भेटलीच नाही म्हणून दु:ख करा. कशी भेटेल? आजूबाजूच्या स्त्रीयांचे जे गुण असतात ते कोणत्याही कवितेतल्या पात्राच्या गुणांपेक्षा उत्कटतेने अनुभवायला हवेत ना? सभ्यता आड येते. एकतर भावना उचंबळू द्यायच्या नाहीत, उचंबळल्या तर दाखवच्या नाहीत, दाखवल्या तर दाबून चोरून दाखवायच्या, आपली नंतरची प्रतिमा कशी असू शकेल याचाच जास्त विचार करत दाखवायच्या. सँपलच जर असे घेतले तर निष्कर्ष काय येतील? तरीही लेखक नशीबवान आहे, त्याला मित्र आहे. पुढच्या पिढित त्याचाही वांधा असेल याची खात्री आहे.

मन Tue, 31/12/2013 - 13:28

In reply to by अजो१२३

कॉमन टॉयलेट ???
आवरा.
काही सार्वजनिक मुतारींमध्ये विविध वाह्यात गलिच्छ साहित्य लिहिलेले असते हिणकस चित्रे काढत.
त्या साहित्यातील एक दिव्य ओळ आठवली:-
.
.
मुला मुलींत नको भेद
करा दोघांचीही मुतारी येक
.
.
आवरा.

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 13:42

In reply to by मन

आमच्या हापिसात एक विलायती काउण्टरपार्ट आला होता. सकाळी सकाळी मुंबईकर रिक्षाचा सुखद आणि यशस्वी अनुभव घेऊन हापिसात पोचल्यामुळे भलताच खुशीत होता. जनरल 'कशीय मुंबई?', 'आवडली..' वगैरे माफक हसून झाल्यावर लोक कामाला लागले. थोड्या वेळानं मी रेस्टरूमला भेट द्यायला गेले. मी बाहेर येतेय, तो हा गडी आरशात बघत अतिशय प्रेमानं आपलेच केस न्याहाळत होता. मी अशक्य दचकले. माझी अपेक्षा होती की माझं दचकलेलं तोंड आरशात बघून तोही तेवढाच दचकेल. पण हा निवांत. त्यानं एक भारीपैकी स्माइल दिलं फक्त.
माझा चेहरा अजूनच स्कॅण्डलाइज्ड झाला असणार, कारण त्याला कळलं, काहीतरी गंडलंय. मग मी त्याला सांगितलं की हे फक्त बायकांचं टॉयलेट आहे. तेव्हा त्याचा चेहरा खरा बघण्यासारखा झाला! रीतसर माफी, 'इट्स ओके..', पळ काढणे वगैरे वगैरे. मग पठ्ठ्या मायदेशी परतेस्तोवर माझ्या आजूबाजूलाही फिरकला नाहीच, वर इकडेतिकडे कुठे दिसलाच तर लाजून नजरेला नजर देत नसे.

मन Tue, 31/12/2013 - 13:57

In reply to by मेघना भुस्कुटे

पण ...पण...
चुकीच्या जागी आलो हे कळायला इतका उशीर का लागावा?
पुरुषांच्या रेस्टरूम मध्ये उभे राहून लघवी करण्यासाठी भांडे असते.
ते स्त्रियांच्या रेस्टरूम मध्ये नसेल ना.
त्या भांड्याचा अभाव ह्या सद्गृहस्थास जाणवला नसावा???
निदान त्यातून तरी "आपण कुठेतरी वेगळ्याच जगात आलोय" इतकं तरी नक्की समजेल ना.

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 14:00

In reply to by मन

आत शिरल्यावर एक लहानसा व्हरांडा, मग बेसिन्स आणि आरसे आणि तिथे लहान क्युबिकल्सची दारं अशी इथली बायकांची टॉयलेट्स असतात. जर त्याच्या देशात युनिसेक्स टॉयलेट्स वापरण्याची सवय त्याला असेल, तर ती बाहेरून तरी साधारण अशीच दिसत असणार ना?

मन Tue, 31/12/2013 - 14:08

In reply to by अजो१२३

भारतात ; विशेषतः धाब्यावर तसे का नसावे हे सांगणार होतो. पण तपशील वस्तुनिष्ठ असले तरी बीभत्सतेकडे झुकतील. नीधपताईंचा मिपावरील वोल्वोसंबंधात धागा पहावा.
इतरत्र स्त्रियांचे टॉयलेट बद्दलचे अनुभव वाचावेत.
भौतिक मर्यादा लक्षात घ्याव्यात. भारतीय वागणूक लक्षात घ्यावी.
(घरगुती वातावरणातील वागणूक ठिकठाक हो,सार्वजनिक म्हणतोय मी.)
सभ्य शब्दांत ह्याहून अधिक सांगता यायचे नाही.
मी थांबतोय.

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 14:13

In reply to by मन

नीधपचाच (बहुतेक) 'मायबोली'च्या दिवाळी अंकातला (वर्ष विचारू नये, आठवत नाही. यंदाचा किंवा गेल्या वर्षीचा नक्की नाहीय, त्याआधीचा कधीचातरी आहे) लेख वाचनीय आहे. स्त्रियांसाठीची सार्वजनिक स्वच्छतागृहं हाच विषय आहे. या विषयावर इतका थेट आणि परिणामकारक लेख दुसरा वाचल्याचं आठवत नाही.

अजो१२३ Tue, 31/12/2013 - 20:58

In reply to by प्रकाश घाटपांडे

नागरी व्यवस्थांत आपले जीवनमान कसे सुधारले याचा डंका पिटणारांना जाग्यावर आणणारा लेख.

मेघना भुस्कुटे Mon, 30/12/2013 - 15:01

लेख आवडला.
आपल्या सख्ख्या मित्रांच्या बायका आणि मैत्रिणींचे नवरे स्वीकारणं जड जातं, मग मैत्री कितीही निर्मळ का असेना, हा युनिवर्सल अनुभव. त्यामागे तुम्ही म्हटलेल्या सूक्ष्म लिंगभावभेदाचंच कारण असावं. मला अतिशय जवळच्या मैत्रिणीही आहेत आणि मित्रही. पण मित्रांसोबत वावरणं अधिक सोपं, सहज असतं असं जाणवतं. आमच्यातल्या भौतिक भेदांमुळे काही बाबतीतली स्पर्धा संपूर्णपणे गायब असते. परिणामी एरवी मैत्रिणींच्या बाबतीत अज्याबात चालवून घेतल्या नसत्या अशा अनेक गोष्टी मित्रांच्या बाबतीत मात्र हसत चालवून घेतल्या जातात (हेच त्यांच्याकडूनही होत असावं. आयला! विचारलं पाहिजे!) आणि साहजिकच वावर अधिक सहज, मोकळा होतो. ('बाप्यांचं हे असंच!' हे गौरीच्या 'गोफ'मधलं वाक्य आठवलं.)
या लेखाच्या निमित्ताने माझ्या एका जुन्या कथावजा स्फुटाची जाहिरात करतेय. ते या लेखाला समांतर आहे.

मन Mon, 30/12/2013 - 15:07

In reply to by मेघना भुस्कुटे

गंमत आहे.
मूळ लेख व सदर प्रतिसद ह्याचे सामायिक निरीक्षण :-
मुली ह्या मुलांसोबत कम्फर्टेबल असतात. मुलं हे मुलांसोबतच कम्फर्टेबल असतात.
.
मुली-मुली चांगल्या मैत्रिणी नसतात का?
लागलिच क्याट फाइट सुरु होते का?
.
काहीही समजत नाहिये. मला मैत्रिणी नाहित; त्यामुळे अंदाजही बांधणे कठीण आहे.

ऋषिकेश Mon, 30/12/2013 - 15:10

In reply to by मन

असा नियम नसावा. मला मैत्रीणी आहेत आणि त्यातील बहुतांश (अजून तरी ;) ) चांगल्या मैत्रीणी आहेत.

बाकी मेघनाच्या मित्रांना एक चांगली मैत्रीण नै का मिळाली? मग मुली चांगल्या मैत्रीणी नसतात कसे?

मेघना भुस्कुटे Mon, 30/12/2013 - 15:14

In reply to by मन

छे छे! क्याट फाईट नाही रे लगेच. म्हटलं ना, मला अतिशय जवळच्या मैत्रिणीही आहेतच. पण निदान काही बाबतीत तरी 'अगदी आपल्यासारखा' विचार करणार्‍या माणसापेक्षा 'आपल्याहून निराळा' विचार करणार्‍या माणसाची अधिक मदत होते; आपल्या दृष्टिकोनाला आपोआपच वेगळं स्थान आणि महत्त्व मिळतं; आणि हेच आपण देऊही करत असतो.
अर्थात हे थम्ब रूल्स झाले. त्याला अनेक अपवाद असणारच. याहून अधिक सर्वसाधारणीकरण आणि काटेकोर नियम केले की ते चुकायची खातरीच. पण सहसा असं दिसतं, खरं.

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 15:55

In reply to by मेघना भुस्कुटे

आमच्यातल्या भौतिक भेदांमुळे काही बाबतीतली स्पर्धा संपूर्णपणे गायब असते.

आमच्या मित्रवर्तुळात स्पर्धा असली तरी तिचा त्रास होत नै, किंबहुना तो विषय कधी निघत नाही. तस्मात मित्र असो वा मैत्रीण, मोकळेपणा सारखाच. तरी मित्रांसोबत मोकळेपणा अंमळ जास्त. मैत्रिणींच्या पूर्वग्रहांचे ब्यागेज तुलनेने अंमळ जास्त असते असे निरीक्षण आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 09:21

In reply to by बॅटमॅन

मैत्रिणींच्या पूर्वग्रहांचे ब्यागेज तुलनेने अंमळ जास्त असते असे निरीक्षण आहे.

मान्य आहे. किंबहुना दहा मिनिटांपूर्वी भेटलेल्या मुलाची ओळख चटकन 'हा माझा मित्र' अशी करून द्यायला पोरं सहजी राजी असतात. 'हा माझ्या मित्राचा मित्र', 'हा माझा सहकारी', 'हा माझा परिचित', 'हा आमच्या शेजारी राहतो'... असली वेळखाऊ आणि भावखाऊ वर्गीकरणं करताना पोरं दिसत नाहीत. मुलींना मात्र (मलाही) चटकन कुणालाही मित्र/मैत्रीण असं लेबल लावायला त्रास होतो. आता यात पूर्वग्रह येतात, स्वतःची किंमत जास्त मानण्याचा भावखाऊपणा दिसतो... की अजून काही, ते ठरवता येत नाही.

(व्याप्तिनिर्देशः मुलगे आणि मुली असल्या विभाजनान्ती केलेली निरीक्षणं सर्वसाधारणीकृत असल्यानं अमुक एका मर्यादेपर्यंतच सत्य मानावीत.)

नगरीनिरंजन Mon, 30/12/2013 - 15:31

लेख शेवटी शेवटी कळला नाही. एकही मैत्रिण नसल्याचा तो परिणाम असावा बहुतेक.
पण सिरियसली, मैत्रिण कशाला हवी?

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 16:07

In reply to by नगरीनिरंजन

अंमळ मलाही असेच वाटले खरे. मैत्रीण पाहिजे वगैरेपर्यंत ठीके पण पुढचे विवेचन काही झेपले नाही. सुरुवातीस आदर्श स्त्रीची काहीएक कल्पना मनात रेफरन्सला ठेवून प्रत्यक्षात तसे न मिळाल्यामुळे झुरणे अन शेवटी जरी त्या नात्याचा परीघ विस्तारण्याचा प्रयत्न केला असला तरी बाकीचा लेख "अंतिमतः प्लेटॉनिक तरीही मोकळ्या नात्यातील शेअरिंगची अन मोकळेपणाची कमाल मर्यादा काय अन तिथवर कसे पोहोचावे" स्टाईल वाटला. असो.

चिंतातुर जंतू Mon, 30/12/2013 - 16:40

प्रकटन गंमतीशीर आणि रोचक आहे. शेवटचा भाग कळला नाही असं काही जण म्हणताहेत त्याबद्दल मला एक प्रश्न पडला - तो भाग कळत नाही म्हणजे असं काही का, की जो आत्मकथनात्मक किंवा अनुभवात्मक भाग आहे तो सरळसरळ वर्णन असल्यामुळे कळला, पण 'मनातली' मैत्रीण आणि 'कवितेतली' मैत्रीण हे लिखाण काहीसं संकल्पनात्मक आहे म्हणून ते कळलं नाही (किंवा स्वानुभवांशी ताडून पाहता आलं नाही)?

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 17:10

In reply to by चिंतातुर जंतू

पण 'मनातली' मैत्रीण आणि 'कवितेतली' मैत्रीण हे लिखाण काहीसं संकल्पनात्मक आहे म्हणून ते कळलं नाही (किंवा स्वानुभवांशी ताडून पाहता आलं नाही)?

माझ्या वैयक्तिक मते पाहिले तर मैत्रीण नामक प्रकाराकडून लेखकाच्या अपेक्षा जास्त आहेत- हे लेखातच कबूल केलेलं आहे. असे होण्याचे कारण म्हणजे मैत्रिणीची आदर्श संकल्पना मनात फिट्ट बसली आहे. त्याचे कारण म्हणजे "मैत्रीण म्हणजे कैतरी विशेष" असं मत. असं काही माझं मत नाही, सबब लेखातला शेवटचा भाग "इन द ऑ ऑफ दॅट आयडिअल फिमेल" राहून लिहिल्यागत वाटल्याने अपील नाही झाला.

चिंतातुर जंतू Mon, 30/12/2013 - 17:20

In reply to by बॅटमॅन

>> माझ्या वैयक्तिक मते पाहिले तर मैत्रीण नामक प्रकाराकडून लेखकाच्या अपेक्षा जास्त आहेत- हे लेखातच कबूल केलेलं आहे. असे होण्याचे कारण म्हणजे मैत्रिणीची आदर्श संकल्पना मनात फिट्ट बसली आहे. त्याचे कारण म्हणजे "मैत्रीण म्हणजे कैतरी विशेष" असं मत.

पण मैत्रीणच नाही, तर मित्राबद्दलही मी असंच म्हणेन की जे आपल्यासाठी खास काही असतात त्यांनाच मी आपले 'मित्र/मैत्रीण' म्हणेन. बाकी ओळखीतले, शाळा/कॉलेजसोबती, सहकारी वगैरे असतातच, त्यांच्यातल्या अनेकांशी सौहार्दपूर्ण संबंधही असतात, म्हणजे अगदी थोड्याफार गप्पा वगैरे होण्याइतपतही, पण म्हणून त्यांना सगळ्यांना झाडून मी 'मित्र/मैत्रीण' म्हणायला जात नाही. ह्याला मी आदर्श संकल्पना म्हणणार नाही, तर अगदी जवळचं, विशेष घट्ट नातं वगैरे म्हणेन. ते ओळखीतल्या बहुतांश स्त्रियांशी असू शकणार नाही, पण अल्पसंख्यांशीच असेल, नाही का?

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 17:24

In reply to by चिंतातुर जंतू

बाकी विवेचनाशी सहमत आहे, पण लेखकाला स्त्रीलिंगी मैत्रीण म्हणजे कैतरी स्पेशल हे जास्त प्रिय अ‍ॅझम्प्शन आहे. जे आपल्यासाठी खास ते मित्रमैत्रिणी ही साधी पटणारी व्याख्या असती तर ठीक होतं पण त्यात परत असा भेद जाणवला अन ते कै झेपलं नाही.

प्रकाश घाटपांडे Tue, 31/12/2013 - 18:52

In reply to by बॅटमॅन

स्त्रीलिंगी भुभु (भुभी) या माझ्या बाय डिफॉल्ट मैत्रीणी असतात. त्यामुळे काही भुभु लोक आपला लग्गा लागावा म्हणुन माझ्याशी लाडिगोडी करतात. कधी कधी एखाद्या होतकरु भुभुचे मी शिफारस करतो देखील. एकदा एका भुभुने मला गुदगुल्या करुन जाम खुश केल होत.

ऋषिकेश Mon, 30/12/2013 - 17:26

In reply to by चिंतातुर जंतू

+१
मित्र/मैत्रीण कशी आहे वगैरे जाणीवांतून मैत्री 'केली' असं माझ्याबाबतीत झालेलं नाही मैत्री होत गेली, ती गाढ होत गेली. ज्या व्यक्तीशी मैत्री आहे ती व्यक्ती स्त्री आहे की पुरूष यामुळे वय वाढत गेले तसा फरक पडेनासा झाला.
तेव्हा माझ्या कल्पनेतली मैत्रीण / मित्र वगैरे कंसेप्टच अस्तित्त्वात नसल्याने (जे मित्र मैत्रीणी आहेत ते आहेत, आदर्श/कवितेतील वगैरे कै नै) शेवटच्या परिच्छेदांशी रिलेट करू शकलो नाही असेच म्हटले आहे.

चिंतातुर जंतू Mon, 30/12/2013 - 17:43

In reply to by चिंतातुर जंतू

>> पण लेखकाला स्त्रीलिंगी मैत्रीण म्हणजे कैतरी स्पेशल हे जास्त प्रिय अ‍ॅझम्प्शन आहे.

अं... पण मैत्री जेंडर-न्यूट्रल नसते असंच बहुतेकदा प्रत्यक्षात दिसत राहतं. म्हणजे त्यात शारीर भाग असतोच असं मला म्हणायचं नाही, पण मित्राबरोबर करायच्या/बोलायच्या गोष्टी आणि मैत्रिणीबरोबर करायच्या/बोलायच्या गोष्टी पुष्कळ लोकांसाठी वेगळ्या असतात. आणि भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वेगळं काही तरी वाटणंदेखील बहुसंख्य लोकांच्या बाबतीत साहजिक आहे. नाही का? माझ्या आसपासच्या पुष्कळ उदारमतवादी किंवा सर्वार्थानं आधुनिक पुरुषांतसुद्धा मला हे आढळतं. म्हणजे असं की उदाहरणार्थ, मित्रांचे मित्र आपले मित्र जितक्या सहज होतात तितक्या सहज मित्रांच्या मैत्रिणी आपल्या मैत्रिणी होत नाहीत असं काही तरी पुरुषांपुरुषांत घडताना मला अनेकदा दिसतं. प्रत्येकाच्या आपापल्या मैत्रिणी असतात आणि आपल्या इतर पुरुष मित्रांपासून ते त्यांना अगदी दूर ठेवत नाहीत, पण जास्त जवळही आणायचा प्रयत्न करत नाहीत किंवा टाळतात वगैरे. किंवा मित्रांसमोर जसे वागतात तसे मैत्रिणींसमोर वागत नाहीत वगैरे. म्हणजे अगदी आताच्या तरुण पिढीत अधिक मोकळेपणा असूनसुद्धा हे होताना अनेकदा दिसतं.

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 18:00

In reply to by चिंतातुर जंतू

हे आहेच, बरेच लोक असं करतात, पण वैयक्तिक मत अथवा आचरण अंमळ वेगळे असल्याने "त्यात काय विशेष" असा किंतु निर्माण झाला खरा. म्हणजे एकदा का काही कारणाने कुणा मुलीबरोबर फ्लर्ट करायचं नाही( समहौ तिच्याबद्दल असं कधी वाटलं नाही इ.इ.) किंवा करूनही फायदा नाही कारण तिचा ब्वायफ्रेंड/नवरा आलरेडी आहे इ.इ. असं लक्षात आलं की मुलगी म्हणून तिचे स्पेशलपण माझ्यालेखी संपते आणि जण्रल फ्रेंड-पूल मध्ये तिचे जेंडरलेस अ‍ॅडिशन होते. असो. शेवटी मत ज्याचेत्याचे हेच खरं.

अतिअवांतरः बायकांपुढे स्त्रीदाक्षिण्याची परमावधी करणार्‍या पुरुषांची फार जास्ती कीव येते.

ढिस्क्लेमरः कुणावरही वैयक्तिक, शालजोडीतून अथवा शालीबाहेरून टीका करण्याचा किंवा तसे सुचवण्याचा हेतू नाही. तसं काही बोलायचं असतं तर डैरेक्टच बोललो असतो.

नगरीनिरंजन Mon, 30/12/2013 - 20:48

In reply to by चिंतातुर जंतू

पण मैत्रीणच नाही, तर मित्राबद्दलही मी असंच म्हणेन की जे आपल्यासाठी खास काही असतात त्यांनाच मी आपले 'मित्र/मैत्रीण' म्हणेन. बाकी ओळखीतले,

एक्झॅक्टली. तरीही मैत्रीण आणि मित्रात फरक राहतोच. मित्राशी अक्षरशः हमरीतुमरीवर येऊन चर्चा करता येते. त्याच्याशी मनातल्या आतल्या कप्प्यातले विचार, फॅन्टसीज, ताणतणाव, कपडे, वेळ पडल्यास बिछानाही शेअर करताना दुसर्‍यांदा विचार करावा लागत नाही.
इतकं असेक्शुअल मैत्रिणीशी वागता येणं शक्य आहे?
तसं व्हावं अशी काहीशी अपेक्षा लेखात दिसली.
शिवाय मनातल्या मैत्रिणीच्या कल्पनेपर्यंत ठीक पण कवितेतल्या मैत्रिणीची प्रश्नांकित मुद्रा आणि ते प्रश्न पुसण्याचं (म्हणजे wipe या अर्थानेच ना?) शस्त्र कोणतं ते मला कळलं नाही.

............सा… Mon, 30/12/2013 - 18:45

वेश्या म्हणजे तरी कोण? मनाच्ता तळातला संघर्ष, व्यक्तिगत अनुभव, शरीराच्या गरजेची स्थितीबद्ध सांस्कृतिक गोची आणि या सगळ्याकडे बघत विकट हास्य करणारी, बेदरकार काळजाची आणि तरी हतबल वेश्या.

खालील कविता मैत्रिण म्हणा किंवा वेश्या म्हणा, दोघींना सामावून घेणारी मला तरी वाटते.

The woman with her face pressed
against my chest and both legs,
locked around my knees breathing deeply,
has floated into some quiet stream,
swaying past it's wooded banks without me
Somehow I've told her everything, whispered it
through my cracked voice
into the stillness around her
as we sat in the gloom,
waiting for the moview to begin
and later by the bridge
watching dim surf igniting offshore
In this bed, I have exploaded each grief into her body
one by one untill they came loose:
The drinking, the failed marriages and jobs,
the weight of my children pressing me down
There must be some kindness I could bring
to her dream now, listening o her breath
unwind in the small room
and wishing I had never hurt anyone
What still country I have come to
where the long grass bends under the animals
when they lie down emptied of suffering.
What slow river flows between her foreheads
the petals of her ears adrift in the auburn hair
gathering darkness?

- Joseph Miller

.

कुमारकौस्तुभ Mon, 30/12/2013 - 21:39

नेचर' आणि 'नर्चर'चा गुंता सोडवणं हे महाकठीण काम! स्त्रीवादी दृष्टीकोन सांगतो की प्रत्येक गोष्ट लिंगभावावर आधारलेली असते आणि 'पुरूष' आणि 'स्त्री' हे 'घडतात'. त्यांचं नैसर्गिकीकरण स्त्रीवाद नाकारतो.

हा गुंता सोडवण आहे खर कठीण काम परंतु असे प्रयत्न झालेले आहेत जॉन मनी या सायकॉलॉजीस्ट ने नर्चर ही बाजु घेउन एक प्रयोग केला. डेव्हीड रीमर या मुलाला एक मुलगी म्हणुन वाढविण्याचा प्रयोग केला गेला. डेव्हीड २२ महीन्यांचा असतांना त्याचे टेस्टीकल्स काढुन टाकण्यात आले आणि त्याला एक मुलगी म्हणुन ब्रेंडा नावाने वाढविण्याचा प्रयोग सुरु केला. या प्रयोगासाठी डेव्हीड च्या पालकांना जॉन मनी ने तयार केले. आणि त्याने पुर्ण प्रयोगाची सुपरव्हीजन केली. या प्रयोगाने मनी ला फार प्रसिद्धी मिळवुन दिली. एक वेळ अशी आली की जेंडर चेंज हा नर्चर ने करता येतो यावर शिक्कामोर्तब झाले. फेमिनीस्ट आर्ग्युमेंट की स्त्री ही जन्मत नाही घडविली जाते ला पुष्टी मिळाल्याने हा प्रयोग फेमीनीस्ट चळवळीने ही उचलुन धरला. मनी प्रयोगावर रीपोर्टींग करत होता त्यात तो प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे डेव्हीड आता पुर्णपणे मुलगी झाला आहे असा दावा करत असे. प्रत्यक्षात परीस्थीती वेगळी होती. प्रयत्न फसलेला होता डेव्हीड स्वतःला मुलगी या ओळखीशी आयडेंटीफाय करु शकत नव्हता पण डॉ, मनी ने हे सर्व निष्कर्ष लपवुन ठेवले. पुढे डेव्हीड ने आपली कहाणी मिल्टन डायमंड ला सांगितली त्याने मग डेव्हीड ची रीअल स्टोरी जगासमोर आणली.... पुढे डेव्हीड ने आत्महत्या केली........ अनेक पैलु आहेत अनेक कंगोरे आहेत ही स्टोरी येथे डीटेल मध्ये वाचा

http://www.rense.com/general52/weww.htm
http://en.wikipedia.org/wiki/David_Reimer

तर या केस पुरत तरी दान नेचर च्या बाजुने पडल्याच दिसतय, मात्र नेचर नर्चर चा हा गुंता सोडवण सदर धागा लेखकाने म्हटल्या प्रमाणे महाकठीण काम आहे येथे बाजु घेत नाहीये पण जी माहीती होती ती शेअर केली. दुसरया बाजुचे प्रयोग मला माहीत नाहीत. मात्र या प्रयोगाने स्वमतविरोधातील वास्तव स्वीकारणे कीती कठीण असते हे परत एकदा सिद्ध होते.

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 21:43

In reply to by कुमारकौस्तुभ

रोचक प्रयोग!!!

स्त्री काय किंवा पुरुष काय, त्यांच्या लिंगाधारित ओळखीचा बराच भाग सामाजिक कंडिशनिंगमुळे घडत जातो हे खरे असले तरी त्यात निसर्गाचा काहीच हात नसतो वगैरे वगैरे फेमिनाझी बिनडोक मुक्ताफळे बिनबुडाची आहेत.

लिंगभावाच्या नैसर्गिकीकरणात चूक नाही, त्या नैसर्गिकीकरणातून जन्मणार्‍या सरसकटीकरणात दोष आहे. दोषाचं निदान हुकलं की हास्यास्पद विधाने होणारच.

बॅटमॅन Mon, 30/12/2013 - 21:46

In reply to by ............सा…

हाच प्रयोग एखाद्या मुलीवरती केला असता तर आकाशपाताळ एक केले असते लोकांनी. समतेचा विषम अर्थ लावणे हेच जिथे फ्याशनेबल झालेय तिथे समतेचा कोण केवा?

नगरीनिरंजन Mon, 30/12/2013 - 23:11

In reply to by ............सा…

हा जर-तरचा प्रश्न राहिलेला नाही.
अमेरिकेत काही वर्षांपूर्वी शाळेत मुलींवर अन्याय होतो म्हणून ओरड करून प्राथमिक शाळेपासूनच "वॉर ऑन बॉईज" चालू झाल्याचे मध्यंतरी वाचले.
http://www.nytimes.com/books/first/s/sommers-war.html
आता अमेरिकेत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांपैकी ७५% स्त्रिया आहेत असे ऐकून आहे आणि त्यामुळे मुलांच्या कॉग्निटीव्ह आणि गणिती कौशल्यावर परिणाम होतो असाही निष्कर्ष काढणारे संशोधन झाले आहे म्हणे.

The belief that boys are being wrongly "masculinized" is inspiring a movement to "construct boyhood" in ways that will render boys less competitive, more emotionally expressive, more nurturing — more, in short, like girls. Gloria Steinem summarizes the views of many in the boys-should-be-changed camp when she says, "We need to raise boys like we raise girls."

मन Tue, 31/12/2013 - 11:27

In reply to by नगरीनिरंजन

नक्की काय झोल आहे माहित नाही; पण "शिक्षकाने स्टुडंटवर लैंगिक अत्याचार/शोषण केला/केले" अशा छापाचा मथळा दिसला की बाय डिफॉल्ट डोळ्यासमोर स्त्री शिक्षिका येते की पुरुष शिक्षक?
हे विचारल्यावर बहुतांश लोकांचा प्रतिसाद मला आला तो "पुरुष शिक्षक". कारण हे असावे की बाय डिफॉल्ट बातम्या तशाच जास्त दिसतात.
किंवा अगदि अल्पवयीन व्यक्तीचे त्याच्या शिक्षकाशी राजीखुशीने/consentने संबंध ; ह्यातही मोठा शिक्षक पुरुष हेच डोळ्यासमोर येते. कारण ते तसेच बातम्यात दिसते.
.
.
स्त्री शिक्षिकेनं कधीच मुलांचं लैंगिक शोषण केलेलं ऐकण्यात नाही. किंवा अल्पवयीन/minor मुलासोबत शिक्षिकेनं त्या मुलाच्या मर्जीनं संबंध ठेवले हे ही जवळ जवळ नाहिच.
(उदाहरणं आहेत, पण अतिदुर्मिळ म्हणता यावीत अशी आहेत.इंग्लंडमध्ये एका तीस्-पस्तीस वर्षाच्या गुज्जु शिक्षिकेनं ब्रिटिश चौदा-पंधरा वर्षाच्या मुलासोबत संबंध ठेवले, तिला शिक्षा झाली.)
पण अशा उदाहरणांच्या उलट उदाहरणे दररोज जगातलय कुठल्या न कुठल्या कोपरयतून कधी आपल्याच देशातून ऐकू येतात.
उदा:-
आजचीच टाइम्स ऑफ इंदिया मधील बातमी पहा.
http://timesofindia.indiatimes.com/world/mad-mad-world/Italy-court-over…
Italy court overturns paedophile conviction because girl, 11, 'in love'

ROME: Italy's highest court has overturned the conviction of a 60-year-old man for having sex with an 11-year-old girl, because the verdict failed to take into account their "amorous relationship".
Pietro Lamberti, a social services worker in Catanzaro in southern Italy, was convicted in February 2011 and sentenced to five years in prison for sexual acts with a minor.

The verdict was later upheld by an appeals court.

But Italy's supreme court ruled that the verdict did not sufficiently consider "the 'consensus', the existence of an amorous relationship, the absence of physical force, the girl's feelings of love".

The court's October 15 decision to order a retrial was made public this month by Il Quotidiano della Calabria and slowly spread to social media networks, where it sparked heated reactions against the Italian justice system.

According to Il Quotidiano, the girl came from a poor family who had known and trusted the social worker.

Lamberti was caught naked in bed with the girl after an investigation by police based largely on wire-tap evidence, it said.

.
.
.
ह्या बातमीत सोशल वर्कर ऐवजी टिचर हा शब्द कैक दा दिसतो, फक्त नावे आणि स्थळ बदलेले असतात.
अर्थात हे अल्पवयीन असलं तरी प्रकरण म्युच्युअल कन्सेंट वालं आहे.
कैकदा ह्यात म्युच्युअल कन्सेंट नसली, संबंध ठेवण्यास समोरच्याला बाध्य करण्यात आलं, काहीतरी देण्याची लालूच दाखवण्यात आली, किंवा न केल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली तर ती स्त्री शिक्षिकेकडून दिली गेली असे ऐकण्यात नाही.काय झोल आहे माहित नाही, पण हे असे दिसते.
.
.
अवांतर होइल पण अजून एक गोष्ट. "हम तो अभी जवान है" असे गुणगुणत काही जिंदादिल म्हणवून घेणारे ज्येष्ठ नागरिक जॉगिंगला गेल्यावर तरण्यापोरी न्याहाळण्याचे किस्से गप्पांतून, लिखाणातून ऐकण्यात येतात.
ह्याउलट वय झालेल्या स्त्रिया तरण्याताठ्या पोरांना न्याहाळताहेत हे कधीच ऐकण्यात आले नाही. त्या बिचार्‍या सन्मार्गी असाव्यात.

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 11:31

In reply to by मन

+१ हाच मुद्दा मी नेहमी "लैंगिक उपासमारीमुळे बलात्काराचे प्रमाण अधिक आहे" असे म्हणत बलात्काराचे छुपे समर्थनकरणार्‍या 'पुरूषवाद्यां'पुढे मांडतो. भारतातील स्त्रीयांच्या लैंगिक उपासमारीचे प्रमाणही तितकेच/त्याहून अधिकच असावे पण तरीही त्या लैंगिक अनैतिक वर्तन करताना तुलनेने बर्‍याच कमी दिसतात.

नगरीनिरंजन Tue, 31/12/2013 - 12:37

In reply to by ऋषिकेश

तुलनेने बर्‍याच कमी दिसतात

"दिसतात" हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. अनैतिक वर्तन करताना पकडले गेल्यास बलात्कार झाल्याची बोंब मारण्याची सोय त्यांना असते हे एक कारण त्यामागे असू शकते का?

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 13:55

In reply to by नगरीनिरंजन

जर लैंगिक दुर्वर्तन करूनही त्या उलट बोंबा ठोकू शकत असतील, तर अश्या वर्तणूकीचे प्रमाण बायकांमध्ये अधिक दिसायला नको का?
मला तरी, "आज मला रस्त्यावरून जाताना बघुन एका बाईने/मुलीने डोळा मारला / शिट्या मारल्या" किंवा "बसमध्ये शेजारील बाईने नको तिथे स्पर्श करायचा प्रयत्न केला" किंवा "बँकेतली काऊंटरपलिकडली बाई चेक व पैसे देता घेताना तुपकट व सुचक हसत माझ्या हाताला वखवखलेला स्पर्श करत होती. मेलीची लाळच टपकायची बाकी होती" अश्या प्रकारची वाक्ये कोणत्याही मुला/पुरूषाकडून ऐकू आलेली नाहित वा तसा स्वानुभवही आलेला नाही.

आता मुले जात्याच लाजाळू असतात, ते स्वतःच असे कसे सांगणार वगैरे मत असेल तर मग असोच! :)

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 13:57

In reply to by ऋषिकेश

स्वानुभव मलाही नाही, पण माझ्या किमान दोन मित्रांनी त्यांचे तसे स्वानुभव सांगितलेत. हे दोघे चांगल्या ओळखीचे असून मज पामरासमोर उगा शायनिंग मारतील अशी शक्यता नाही.

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 14:05

In reply to by बॅटमॅन

ओह. इंटरेस्टिंग आहे.
अर्थात दोन मित्रांचे अनुभव आणि बहुतांश प्रत्येक मुलीलाच काय, अगदी मध्यमवयीन - प्रसंगी वयस्क- बायकांना येणारे अनुभव यांची संख्या/व्याप्ती अधिक आहे यात दुमत नसावे. किंबहुना अश्या गैरवर्तनाचे प्रमाण स्त्रीयांत पुरूषांपेक्षा कमी असते हे विधान चुकीचे / अतिशयोक्त वाटते काय?

बाकी या गोष्टित मुलांना 'शायनिंग' मारावेसे वाटु शकते ही शक्यता बरीच बोलकी आहे ;)

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 14:20

In reply to by ऋषिकेश

पुरुषांची सेन्सिटिव्हिटी तुलनेने कमी शिवाय महिलांचे "टप्पे टाकणे" अंमळ छुपे असते ते लक्षात येत नाही. त्यामुळे डायरेक्ट धसमुसळेपणाचे प्रसंग कमी हे पटणेबल आहे.

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 14:29

In reply to by बॅटमॅन

+१:
कित्येक मुलांनाही ती लकब अवगत असते. समोरच्या व्यक्तीस अन्कंफर्टेबल वाटणार नाही - समजणार नाही किंबहुना मजाच येईल - आनंदच वाटेल अश्या पद्धतीने टप्पे टाकणेच काय अगदी रितसर बोलून फ्लर्ट करणारे, (व राजीखुशीने डेट व प्रसंगी पुढेही मजल नेऊ शकणारे) चलाख व नशीबवान जीवही परिचयात आहेतच. तिथे मात्र पुरूष व स्त्रिया तोडीस तोड आहेत असे माझ्या परिचयातील सँपल सेट वरून सांगता येईल ;)

-१:
समोरच्याला नकळत केलेली कृती किंवा त्या व्यक्तीला त्रास न होणारी कृती आणि तुम्ही ज्याला धसमुसळेपणा म्हणताय ते थेट शारीर गैरवर्तन यात बराच फरक आहे. 'धळमुसळेपणा'मधून जी बेफिकीरी व्यक्त होते ती मला नापसंत आहे. काही पुरूषांचे (आता तुम्ही म्हणताय त्या स्त्रियांचेही) गैरवर्तन असे टोन डाऊन करणे चुकीचे वाटले.

मन Tue, 31/12/2013 - 14:34

In reply to by ऋषिकेश

टप्पे टाकणे ह्या प्रकाराबद्दल ; आडून आडून अलगद लगट करण्याल सुरुवात करण्याबद्दल एक चं प्र देशपांडे ह्यांची छोटिशी एकांकिका आहे "सेक्स" नावाची.
ती पहावी, प्रयोग नसल्यास निदान वाचावी, तेही नच जमल्यास त्यातला फक्त पहिला निम्मा भाग वाचावा असे सुचवतो.
भन्नाट प्रकार आहे.

विसुनाना Tue, 31/12/2013 - 17:19

In reply to by बॅटमॅन

हाच एकांक पुढे 'बुद्धीबळ आणि झब्बू' नावाचे नाटक होतो.http://www.champralekhan.com/pdf/natak/Bhudhi1.pdf
त्याचेच पुढे 'तुमचे आमचे सेम असते' असेही नाटक होते. http://www.champralekhan.com/pdf/natak/Tasa.pdf

सगळेच प्रकार भन्नाट!

मन Tue, 31/12/2013 - 17:25

In reply to by विसुनाना

ह्या इतर गोष्टींची माहिती नव्हती.
.
विसुनानांनी दिलेला दुवा व एकांकिका वाचणार्‍यांसाठी:-
निदान तिसर्या पात्राच्या कथेतील प्रवेशापर्यंत तरी वाचा. त्याशिवाय एकांकिकेबद्दल चांगले किंवा वाईट, कोणतेही मत घाईने बनवू नका.
एकांकिका आवडली नाही तरी धीर धरून तिथवर तरी वाचा. मत बदलण्याची शक्यता आहे.

'न'वी बाजू Tue, 31/12/2013 - 11:42

In reply to by मन

स्त्री शिक्षिकेनं कधीच मुलांचं लैंगिक शोषण केलेलं ऐकण्यात नाही.

अभ्यास/कक्षा वाढवा + गूगल इज़ युअर फ्रेंड एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.

इत्यलम्|

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 12:28

In reply to by मन

स्त्री शिक्षिकेनं कधीच मुलांचं लैंगिक शोषण केलेलं ऐकण्यात नाही. किंवा अल्पवयीन/minor मुलासोबत शिक्षिकेनं त्या मुलाच्या मर्जीनं संबंध ठेवले हे ही जवळ जवळ नाहिच.
(उदाहरणं आहेत, पण अतिदुर्मिळ म्हणता यावीत अशी आहेत.इंग्लंडमध्ये एका तीस्-पस्तीस वर्षाच्या गुज्जु शिक्षिकेनं ब्रिटिश चौदा-पंधरा वर्षाच्या मुलासोबत संबंध ठेवले, तिला शिक्षा झाली.)

खरंच अभ्यास वाढवा साहेब. गूगल इज युवर फ्रेंड.

मन Tue, 31/12/2013 - 13:03

In reply to by बॅटमॅन

नबा, बॅट्या सुचवणीबद्दल आभार.
गुगलून पाहिन.
सध्याचे माझे तर्क हे पेप्रात नियमित येणार्‍या बातम्यांबद्दल होते.
माझे कैक वर्ष दिवसाला सात्-आठ पेपर वाचणे सुरु होते.
माझी पुढील शंका :-
जर अशा घटना घडत असतील, तर मराठी पेप्रातून त्या दुर्लक्षित कशा काय राहतात?
की माझे मराठी पेपरवाचन कमी पडले हे मी मान्य करावे?
(अशा बातम्या बर्‍याच अस्तील आणि मी वाचल्या नसतील तर नम्रपणे तेही मी मान्य करीन, खात्री असावी.)
.
.
बातम्या कमी आहेत असे मानले तर ननिंच्या तर्कात तथ्य दिसते असे म्हणता येइल का.

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 13:05

In reply to by मन

बातम्या कमी आहेत असे मानले तर ननिंच्या तर्कात तथ्य दिसते असे म्हणता येइल का.

जर खरोखरीच बातम्या कमी असतील तर एकतर बायका अधिक वेल मॅनर्ड अस्तात किंवा ननिंच्या तर्काप्रमाणे वागतात हे दोन पर्याय आहेत. नक्की काय आहे काय माहिती.

मन Tue, 31/12/2013 - 13:21

In reply to by बॅटमॅन

ननि म्हणतात त्याबद्दल अजून एक शंका ही की बारा- तेरा वर्षाचे पोरगे तिशीतल्या किंवा पंचविशीतल्या शिक्षिकेवर जबरदस्ती करु शकण्याची शक्यता फार फार कमी, दुर्मिळ वाटते.
त्यामुळे जुव्हेनाइल केसमध्ये तरी स्त्रीला तो एस्केप नसावा.
(जुव्हेनाइल म्हणजे खर्र्रेखुर्रे जुव्हेनाइल. दिल्लीस्टाइल अठरा वर्षे पूर्ण होण्यास काही महिनेच शिल्लक असणारे गुणी बाळ नव्हे.)
.
.
सध्या शंका व चर्चेचा मुद्दा हा फक्त स्त्री शिक्षक व तिचे विद्यार्थी-विद्यार्थिनी इतकाच मर्यादित हवा आहे.(वर दुव्यात दिलेल्या बातमीसंदर्भातच बोलायचे आहे.)
एकूणात सगळ्याच स्त्रिया इतर पुरुषांचा पुरुसहंच्या इच्छेविना त्यांना जवळ येणयस भाग पाडू शकतात का, वगैरे ऐतराज स्टाइल मुद्दे इथे नकोत.
ती अमरामारी अगणित काळ चल्लू शकते व मोठा, व्यापक विशय आहे.
मी त्यातल्या ननि ह्यांनी मुळात उल्लेख केलेल्या छोट्याशा मुद्द्याबद्दल बोलत आहे.
आता अमेरिकेत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांपैकी ७५% स्त्रिया आहेत असे ऐकून आहे आणि त्यामुळे मुलांच्या कॉग्निटीव्ह आणि गणिती कौशल्यावर परिणाम होतो असाही निष्कर्ष काढणारे संशोधन झाले आहे म्हणे.

हे त्यांचे विधान व त्यामागील कार्यकारणभावाबद्दल मी बोलत आहे.

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 13:52

In reply to by मन

आता अमेरिकेत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांपैकी ७५% स्त्रिया आहेत असे ऐकून आहे आणि त्यामुळे मुलांच्या कॉग्निटीव्ह आणि गणिती कौशल्यावर परिणाम होतो असाही निष्कर्ष काढणारे संशोधन झाले आहे म्हणे.

त्या लिंकमधील एक जे उद्धृत ननिंनी दिलंय ते इतकं हास्यास्पद आहे की सांगता पुरवत नाही. असो.

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 09:04

In reply to by बॅटमॅन

हाच प्रयोग एखाद्या मुलीवरती केला असता तर आकाशपाताळ एक केले असते लोकांनी

"हा प्रयोग मुलीवर कसा करता येईल? करता येतो का?" वगैरे 'विनोदी' श्रेणी मिळवून देणारा प्रतिसाद देणारच होतो. :)

या प्रश्नाचं उत्तर शोधायसाठी गुगलल्यावर ही माहिती हाती लागली. अशी प्रोसेस असते ही नवी माहिती कळली.

असं काही वाचलं की माझ्यापुरता "देव" अगदी हळुहळू का होईना क्षीण होऊ लागतो हेच खरं!

'न'वी बाजू Tue, 31/12/2013 - 09:39

In reply to by ऋषिकेश

"हा प्रयोग मुलीवर कसा करता येईल? करता येतो का?" वगैरे 'विनोदी' श्रेणी मिळवून देणारा प्रतिसाद देणारच होतो. :)

(मराठीत:) आर यू शुअर?

आमच्याकडून 'भडकाऊ' किंवा 'माहितीपूर्ण' या दोहोंपैकी(च) कोणतीतरी एक मिळण्याची शाश्वती होती.

असो.

मन Tue, 31/12/2013 - 11:00

In reply to by बॅटमॅन

इथं बळजबरीनं मुलीचा मुलगा बनवणे व मुलाची मुलगी बनविणे दोन्हीही विचित्र आहे; हे सार्‍यांनाच मान्य व्हावं.
ह्यात मुलगा मुल्गी भेद कोण करतं असं तुला वाटतं?

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 11:07

In reply to by मन

माझापण बॅट्याला हाच प्रश्न आहे.
आणि इथे अजून अवांतर होईल, पणः
अतिरेकी स्त्रीवाद्यांना प्रतिक्रिया म्हणून तू 'अतिरेकी स्त्रीवादी-द्वेष्टा' होतोस असं तुला वाटत नाही का?

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 12:24

In reply to by मेघना भुस्कुटे

मुल्गा मुल्गी भेद करणारे लै आहेत. बरेचजण कव्हर्टलि करतात तो व्हेसूव्हिअस ज्वालामुखीगत अधूनमधून बाहेर पडतो.

अँड अ‍ॅज फॉर "अतिरेकी स्त्रीवादी-द्वेष्टा": हा समास दोन पद्धतींनी सोडवता येतो: स्त्रीवादाचा अतिरेकी द्वेष्टा आणि अतिरेकी स्त्रीवादाचा द्वेष्टा. पैकी दुसरा पर्याय त्यातल्या त्यात बरा आहे. पण द्वेष करावा इतकी लायकी अतिरेकी स्त्रीवाद्यांची नसल्यामुळे ते एक सोडाच. फार तर फार त्यांचा विरोधक असे म्हणूयात.

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 12:37

In reply to by बॅटमॅन

वाट्ट्लंच होतं मला, तू हे समास प्रकरण मधे आणून फाटे फोडणार असं. 'अतिरेकी स्त्रीवादाचा अतिरेकी द्वेष्टा' असं मला म्हणायचं होतं. बाकी 'द्वेष करावा इतकी लायकी अतिरेकी स्त्रीवाद्यांची नसल्यामुळे..' वगैरे तुझं मत असल्यास, तुझ्या माहितीकरता सांगते - तुझ्या प्रतिक्रियांतून तसं दृगोच्चर होत नाही (हा!).

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 12:41

In reply to by मेघना भुस्कुटे

अतिरेकी स्त्रीवादाचे दोष अंमळ अनसेरेमोनियसलि दाखवणार्‍याला द्वेष्टा म्हणणे हे उगाच आरोपण आहे बरे. त्यात परत अतिरेकी द्वेष्टा म्हणजे उगीचच वाढीव लेबल =))

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 11:14

In reply to by मन

हे प्रथमदर्शनी विचित्र वाटते हे खरे. पण मी दिलेल्या दुव्यावर त्याची मानसशास्त्रीय प्रीकंडिशन्स वाचाव्यात.
काही ट्रान्सजेंडर व्यक्तींना आपण विरुद्धलिंगाचे असल्याचे 'वाटत' असते. त्यांच्या सवयी, लकबी, विचार करण्याची पद्धत, काही भावनांना मेंदूकडून मिळणारे सिग्नल्स सगळेच विरूद्ध लिंगाप्रमाणे असते. त्यांची हार्मोनिक जडणघडण विरूद्ध लिंगाच्या व्यक्तींसारखी असते. (काही ट्रान्सजेंडर पुरूषांना पाळीप्रमाणे - पाळीइतका नव्हे - माफक स्रावही होतो असे कुठेतरी वाचले आहे पण आता कुठे ते आठवत नाहिये). काही अवयवांतील भेद सोडल्यास त्या व्यक्तीची अभिव्यती ही पूर्णपणे विरूद्धलिंगी असते. अश्यावेळी त्या व्यक्तींनी जीवनभर खुरडत जगण्यापेक्षा, विज्ञान जर काही अवयवांचे रोपण व/वा कमी करून त्यांना पूर्णत्त्वाचे फिलिंग देणार असेल तर अश्या शल्यचिकित्सा उपकारक आहेत असेच वाटते.

मन Tue, 31/12/2013 - 11:35

In reply to by ऋषिकेश

तुमचा विषय वेगळा आहे. मी वरील कुमारकौस्तुभच्या केसपुरतेच बोलतो आहे.
तुमच्या केसमध्ये ट्रान्स जेंडर व्यक्तीने स्वतःहून लिंग बदलाची , खरे तर लिंग दुरुस्तीकरणाची तयारी/इच्छा दाखवलेली आहे.
कुमारकौस्तुभनं* दिलेल्या केसमध्ये बावीस महिन्यांच्या बाळाचा गेम झालाय.
बावीस महिने??? बावीस महिन्यांची व्यक्ती/पुरुष की बाळ??
त्याला काही कळायच्या आत त्याच्यवर प्रयोग झालाय.
त्याची खरच आवश्यकता होती का?
"आता कहीच पर्याय नाही" किंवा "ती व्यक्तीचीच इच्छा" म्हणून ते तसं घडलं का?
.
.
अवांतरः-
अर्थात थत्ते ह्यांनी मागे एका धाग्यात "असे प्रयोग मानवजातीला उपयुक्त असतील तर अवश्य करावेत" असे म्हटले होते.
( "असे प्रयोग" म्हणजे कोणते? तर माकडाला उलटे टांगून अंधारात ठेवणे, विविध क्रूर प्रकार करणे वगैरे.
त्याला विरोध करणार्‍याला शक्य असल्यास थत्ते उलटे टांगून अंधारात ठेवतील असे त्यांच्या प्रतिसादावरून दिसते. )

मन Tue, 31/12/2013 - 10:54

In reply to by कुमारकौस्तुभ

ह्या प्रकाराचे तपशील कुठल्याशा दिवाळी अंकात वा जालावरच कुठेतरी वाचले होते. मराठीतून वाचले होते.
कुणा मानसशास्त्रज्ञानं का डॉक्टरनं "मुलाची मुलगी बनविता येते" असं म्हणावं काय, त्यावर विश्वास ठेवून एका दांपत्यानं आपल्या मुलाला मुलगी बनविण्याचा प्रयोग करावा काय, सारेच चमत्कारिक वाटले होते.

रुपाली जगदाळे Tue, 31/12/2013 - 02:21

छान लेख. काही लांबलचक वाक्ये परत वाचावी लागली तेवढेच.
मैत्रीण आणि वेश्या यांची सांगड मजेदार वाटली. त्यातलंच एक वाक्य थोडंसं बदलून –

"मनाच्ता तळातला संघर्ष, व्यक्तिगत अनुभव, शरीराच्या गरजेची स्थितीबद्ध सांस्कृतिक गोची आणि या सगळ्याकडे बघत विकट हास्य करणारी, बेदरकार काळजाची आणि तरी हतबल भिकारीण वेश्या."

इथे भिकारीण म्हणून कोणतीही गरीब, उपेक्षित, खालच्या स्तरातील स्त्री अभिप्रेत आहे. शरीरविक्रय सोडून तिच्यात आणि वेश्येत तसा काहीच फरक नाही. अशी स्त्री लेखकाला मैत्रीण वाटू शकते का? असं आपलं उगाचच मनात आलं! :D

मी Tue, 31/12/2013 - 14:48

वैचारिक विविधतेमुळे प्रगल्भ होण्याला हातभार लागतो. मैत्रिणीचं स्त्री असणं आणि एक वेगळं व्यक्तिमत्त्व असणं विचारांच्या विविधतेसाठी गरजेचं आहे. मैत्रिणीच्या नात्याची गरज तपासताना केलेलं चिंतन आवडलं.

मनातली मैत्रीण कशी आहे? शोधक वृत्तीची आहे. काही मूलभूत शोधणारी, बोलणारी, करणारी आहे. परखड आहे. 'आपण कुठे आहोत' याचा खल करणारी आहे. कपड्या-दागिन्यांपेक्षाही कवितेत, विचारात, पुस्तकात, उत्तरांच्या शोधात रमणारी आहे. प्रयोग करणारी आहे. बेधडक आहे. बंडखोर आहे. आपल्या एवढ्याशाच जगण्यात काही वेळा अशा येतात जिथे आपण ताठ उभं राहणं गरजेचं असतं. अशा वेळांचा मान राखणारी आहे. भडाभडा बोलणारी आहे. सुरक्षित जगण्याच्या, कुटुंबाच्या बाहेरचं बघणारी आहे. प्रश्न विचारणारी आहे. परिस्थितीवर ठसा उमटवणारी आहे.

हे थोडं पौंगडावस्थेतील दिवास्वप्न (फॅन्टसाइझिंग) वाटलं, ह्या अपेक्षांची खरचं गरज आहे असं मला वाटत नाही.

चिंतातुर जंतू Tue, 31/12/2013 - 15:07

In reply to by मी

>> हे थोडं पौंगडावस्थेतील दिवास्वप्न (फॅन्टसाइझिंग) वाटलं, ह्या अपेक्षांची खरचं गरज आहे असं मला वाटत नाही.

पटलं नाही. 'कवितेत, विचारात, पुस्तकात, उत्तरांच्या शोधात रमणारी' किंवा 'सुरक्षित जगण्याच्या, कुटुंबाच्या बाहेरचं बघणारी, प्रश्न विचारणारी, परिस्थितीवर ठसा उमटवणारी' स्त्री कोणत्याही वयाची असली तरी, आणि माझ्या कोणत्याही वयात मला आवडेल असं वाटतं.

मी Tue, 31/12/2013 - 15:39

In reply to by चिंतातुर जंतू

ती तशी आवडेलच मलाही, पण ती अमुक असावी हि अपेक्षांची 'चौकट' कदाचित माझ्या इतर मैत्रिणींना न्याय देणार नाही. दोघांना समृद्ध करणार्‍या नात्याची व्याख्या थोडी अधिक व्यापक असेल असं वाटतं.

चिंतातुर जंतू Tue, 31/12/2013 - 15:45

In reply to by मी

>> ती तशी आवडेलच मलाही, पण ती अमुक असावी हि अपेक्षांची 'चौकट' कदाचित माझ्या इतर मैत्रिणींना न्याय देणार नाही.

माझ्यासाठी ती अपेक्षांची चौकट नाही - अशा स्त्रीशी माझं जास्त चांगलं मैत्र जुळतं असा अनुभव आहे.