कॉकटेल लाउंज : बुलफ्रॉग (Bullfrog)

२०१३ च्या सरत्या संध्याकाळी २०१४ ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे बुलफ्रॉग (Bullfrog)

पार्श्वभूमी:

३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी एक पोटंट आणि तितकेच दिलखेचक व आकर्षक असलेले हे बुलफ्रॉग नावावरून 'बैलाचा आव आणलेली बेडकी' असे वाटणे सहाजिक आहे; पण दिसते तसे नसते ह्या उक्तीला सार्थ करणारे हे कॉकटेल आहे, साहित्यावरून ते किती जहाल असावे ह्याची कल्पना येईल.

ह्या वर्षाची आजची शेवटची रात्र एकदम मादक होऊन येणारे इंग्रजी नववर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना.

प्रकार रेड-बुल बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
वोडका १ औस (३० मिली)
जीन १ औस (३० मिली)
टकीला १ औस (३० मिली)
ब्लु कुरास्सो १ औस (३० मिली)
रेड बुल टॉप-अप करण्यासाठी
मोसंबी रस (ऑप्शनल) १० मिली
बर्फ
ग्लास टम्बलर किंवा मॉकटेल ग्लास

कृती:

ग्लासमध्ये 2/3 बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, वोडका, जीन आणि टकीला ओतून घ्या.

आता बारस्पूनने सर्व घटक एकजीव होतील असे स्टर्र करुन घ्या. आता त्यात ब्लु कुरास्सो हळूवारपणे ओतून घ्या.

आता रेड-बुल ओतून ग्लास टॉप-अप करून घ्या.

आता सजावटीसाठी ग्लासवर लिंबाचा काप लावून घ्या.

नववर्षाच्या स्वागतासाठी जहाल आणि मादक 'बुलफ्रॉग' तयार आहे Smile

सर्वाँना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कसले भारी रंग आहेत सगळे _/\_
आणि रम, वोडका, जीन, टकीला सबकुछ एकसाथ :O
आमच्याकडुनपण सर्व ऐसीकरांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंग छान आहेत. ही पाककृती व्हाइट रम, वोडका , जीन, टकीला व ब्लु कुरास्सो न घालता करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नववर्षाचा पहिला प्रतिसाद. तो ही मादक (कि मद्यक?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नववर्षाच्या शुभेच्छा!

नव्या मॉकटेलची पाकृ न दिल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्याही शुभेच्छा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे कॉकटेल वाचून आपल्या प्रिय मित्र अजितची (मोना डार्लिंग फेम) आठवण आली.

'राबट, इसे बुलफ्राग पिलाओ. रेड बुल इसे सोने नही देगा और अाल्कोहोल इसे जगने नही देगा.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0