व्यक्तीस्वातंत्र्य व त्याचा व्यवस्थेशी संबंध काय याबद्दल - व्हिडिओ बेस्ड प्रस्तावना

प्रा. हायेक यांनी लिहिलेले 'इंडिव्हिज्युअलिझम अँड इकॉनॉमिक ऑर्डर" ह्या पुस्तकाचे व्हिडिओ रुपांतर टायलर कॉवेन यांनी केलेले आहे.

यात - व्यक्तीवाद व त्याचा समाज्/राज्यव्यवस्थेशी संबंध, ज्ञानाचा/माहीतीचा व्यवस्थेशी संबंध, उस्फूर्त व्यवस्था म्हंजे काय?, स्पर्धाप्रक्रिया नेमकी कशी घडते, सोशियलिस्ट कॅल्क्युलेशन डिबेट चे धडे, मुक्त बाजारव्यवस्था कशी चालते हे उपविषय हाताळलेले आहेत. १२ प्रकरणे आहेत व प्रत्येक प्रकरण हे सुमार ५ - १० मिनिटांच्या व्हिडिओ मधे बसवण्यात आलेले आहे.

http://mruniversity.com/courses/great-economists-classical-economics-and...

---

हे लक्षणीय का आहे -

१) प्रा. हायेक ही मागच्या शतकातील दिग्गज अर्थशास्त्री होते. व अर्थशास्त्री असण्याबरोबर त्यांनी कायदा, ज्युरिस्प्रुडन्स यामधे ही शिक्षण घेतले होते. त्यांना १९७८ चे नोबेल मिळाले होते (गनर मिर्डाल यांच्याशी विभागून).

२) यात हायेक यांच्या काही थियरीज वरील टीका सुद्धा आहे.

३) यात व्यक्तीस्वातंत्र्य व बाजार यातील इंटरप्ले बद्दल चर्चा आहे.

४) इतर विचारवंतांनी काय विचार मांडले त्याबद्दल दुवे ही आहेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

आभार. घरी गेल्यावर बघण्यात येईल. मग लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हायेकबद्दल माहिती देणारे सगळे व्हिड्यो बघितले. उत्तम सीरिज आहे. अगदी थोडक्या शब्दांत लेखनाचा रोख आणि हायेकची विचारपद्धती सांगितली असल्यामुळे कळायला सोपं गेलं. ताबडतोब इतर व्हिड्योदेखील पहिल्यापासून पहायला सुरूवात केली. सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपात इकॉनॉमिक थिअरीविषयी काही ना काही विचार चालू होता. त्यामानाने भारतात काही चालू नव्हतं (किंवा असल्यास ते नष्ट झालं) हा दैवदुर्विलास.

हायेक यांचं लेखन संपूर्ण वाचलेलं नसल्यामुळे मला याविषयावर काहीच बोलता येत नाही. पण माझ्या कुत्र्याला मात्र ते निश्चित आवडलं. एकतर त्याचं नाव न्यूरॉन. त्यामुळे ज्ञान हे एका इंडिव्हिज्युअलमध्ये नसून आख्ख्या सिस्टिममध्ये वितरित झालेलं असतं याचा त्याला चांगलाच अनुभव आहे. तसंच तो पूडल, म्हणजे मूळचा जर्मन असल्यामुळे ऑस्ट्रियन स्कूलबद्दल त्याला तशी जात्याच ओढ आहे. त्याने 'इकॉनॉमिक्स म्हणजे खरं तर ज्ञानाची देवाणघेवाण' असं ऐकून जोरदार भुभुःकार करून पाठिंबा दिला. इतके दिवस त्याला खायला देताना मला वाटायचं की त्याची डिमांड आणि माझा सप्लाय असा सरळ इकॉनॉमिक व्यवहार आहे. पण ती ज्ञानाची देवाणघेवाण आहे असं तो पूर्वीपासून का म्हणायचा हे माझ्या आत्ता लक्षात आलं.

हे सगळं अर्थात मी खात्रीलायकरीत्या सांगू शकतो कारण ज्ञान हे व्यक्तिनिष्ठ असतं, आणि इंटरप्रिटेशनवर अवलंबून असतं असं हायेक साहेबच म्हणतात. Wink

आणि हो, त्याच्याकडून मला काहीच प्राइस सिग्नल मिळत नसल्यामुळे मी त्याच्या खाण्याचं प्लॅनिंग करायचं वगैरे प्रयत्न सोडून दिलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपात इकॉनॉमिक थिअरीविषयी काही ना काही विचार चालू होता. त्यामानाने भारतात काही चालू नव्हतं (किंवा असल्यास ते नष्ट झालं) हा दैवदुर्विलास.

सहमत आहे. व्याज किती घ्यावे-द्यावे वैग्रे विचार जुन्या ग्रंथांतून थोडे सांगितले असले तरी असे थिअरीबद्ध विचार तत्कालीन भारतात नव्हते. स्टेटक्राफ्टसंबंधी गंथ सापडतात पण त्यात इकॉनॉमिक्स म्हणता येईल असे काय सापडते हा संशोधनाचा विषय आहे. जमल्यास पाहतो जरा इकडेतिकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं