वाळूचा लाडू

वाळूचा लाडू (आवाज २०१३ दिवाळी अंकात मूळ टोपण्णावाने पूर्वप्रकाशित . )

नवे प्लॉट खरेदी करणे असो किंवा फ्लॅट विकत घेण्यापासून त्याची उत्तम सजावट करून घेणे असो , सगळी पुरुषसुलभ कामे करण्यात पक्की पुणेकर असलेल्या निशाला फार मौज वाटे . रोमांचक शीळ घालणारी डोअरबेल नव्या फ्लॅटमध्ये बसवून झाली . सर्व गोष्टी मनासारख्या व्यवस्थित करून झाल्या तशी निशाने आनंदाने लेक निकितासोबत धुमशान भांगडा डान्स केला.त्यांचा एकमेव प्रेक्षक नवरोबा अजितला इतक्या अनावश्यक हालचाली करण्यात काडीचाही रस नव्हता .
नव्या घराची सजावट , फर्निचर आणि रंगकाम करून घेण्यात तिची दोन वर्षे कशी पसार झाली कळलेच नाही .तिने पाच वर्षांपूर्वी सेव्हिंग आणि शेअर्सच्या पैशातून पुण्यात दोन प्लॉट घेतले होते . असली किचकट कामे करण्यात , विविध कागदपत्रे व्यवस्थित फ़ाइल करण्यात तिला फार आनंद मिळे .
सगळी चिवट कामे संपली तशी निशाला वाटले आयला,आता हा रिकामा पांडू वेळ घालवायचा कसा ?
मध्यंतरी काही काळ विस्मृतीत गेलेलं जमीन खरेदीचं तिचं वेड पुन्हा उफाळून वर आलं . ती इंटरनेटवर गुगलायला बसली . मुंबईला सध्या रिअल इस्टेटचे मार्केट डाउन आहे , इथे बघतेस का? असे आर्किटेक्ट मित्राने नेटवरून कळवताच ती तात्काळ तिच्या नवविवाहित पुतणी अंकिताकडे मुंबईला अवतीर्ण झाली . चाळीशीतली फटाकडी नवीन विहिण पाहुणी आलेली बघताच अंकिताचे सासरे अनिलरावांचा कलिजा खल्लास झाला .त्यांच्या उदासीन, विरक्त बायकोच्या तुलनेत चौफेर ज्ञानी विहीण भेटताच त्यांना जणूकाही व्हर्बल डायरियाच झाला . ते तिच्याशी अखंड बोलू लागले . तिचा रिअल इस्टेटमधला रस पाहून ते प्रभावित झाले .
मुंबई , पुण्यात कशाला घरे बघताय आमच्या कोकणात यावा की ,तिथे माझा भाऊ तुम्हाला एकदम स्वस्तात मोठ्ठा प्लॉट देईल .गर्दीतून सुटका करून घ्या .शांत , निवांत असा अगदी प्रशस्त बंगला बांधा अन राहा म्हणे सुशेगात. निशाच्या तोंडाला पाणी सुटले .
अनिलराव येताजाता," दर्या किनारे इक बंगलो गो पोरी जै जो जै " असे गुणगुणत ,निशाला " फेसिंग सी " बंगल्याची रोमँटिक स्वप्ने दाखवू लागले . सेलेब्रिटी मासिकात पाहिलेल्या ऋतिक रोशनच्या बंगल्यासारखा हुबेहूब बंगला
तिने मनोमन , तात्काळ बांधूनही टाकला .बंगल्या समोरच्या बगिच्यात झोपाळ्यावर निवांत बसून हातात वाईनचा चषक घेऊन ,ती अथांग निळा समुद्र आणि चमचमती सोनेरी वाळू पहाण्यात रंगुन गेली होती .

निशाने लगेच अनिलरावांच्या भावाचा सुनीलचा करंजवाडीचा फोन नंबर , पत्ता वगैरे घेतला .या दोन भावांच्या प्लॉटशेजारी उपलब्ध असलेली पाच गुंठे जमीन घेऊन तिथे स्विमिंगपूलसकट आलीशान घर बांधायचे खूळ तिच्या डोक्यात शिरले . नायजेरियात नोकरी करणारा तिचा नवरा अजित म्हणजे ठेविले अनंते तैसेची रहावे असा साधू पुरुष होता .
" अग फक्त पाच लाखात एवढी मोठ्ठी जमीन कशी काय मिळते आहे ? त्सुनामीत समुद्राखाली गेलेली जमीन असेल नक्कीच ! कुणीही जमीन
दाखवतो म्हटले कि चालली खुळ्यागत ." चिंतातूर अजित स्काइपवर म्हणू लागला . निशा त्याच्या विराट अज्ञानाने अचंबित झाली .
" अरे डोक्यावर पडलास की काय ?त्सुनामी अरबी समुद्रात आली होती काय, आं ?" अजितला आपले क्षेत्र सोडून सामान्यज्ञान शून्य असल्याने तो नेहेमीप्रमाणेच सुखसागरात गटांगळ्या खाऊ लागला . कर्तबगार बायको असल्याने त्याला प्रपंचाची कधीच चिंता वाटली नाही . नायजेरियात नोकरी करून पुरेसा पैसा मिळवावा आणि वर्षातून दोनदा पुण्याला निशा आणि लेक निकिताला भेटायला यावे असे सरळसोट आयुष्य त्याने रेखून घेतले होते .
निकिता हि त्यांची एकुलती एक कन्या पांचगणीला बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होती . निशा आपल्या आवडत्या कलाक्षेत्रात फ्रीलान्स रिपोर्टिंग आणि माहितीपट तयार करणे यासाठी कधीकधी फिरतीवर असायची त्यामुळे निकिता बोर्डिंग स्कूल मध्ये शिकून एकदम स्वतंत्र आणि सक्षम झाली होती . तिच्या वार्षिक सुट्ट्यांमध्ये तिघे एकत्र असायचे . एरवी ते त्रिस्थळी स्वातंत्र्य उपभोगायचे . अजित घरी आला की इकडची काडी तिकडे करत नसे . खाणे ,पिणे आणि लोळणे यातून फुरसत मिळाली तर मोबाईल किंवा लॅपटॉपवर सॉलीटेअर उर्फ पत्ते खेळणे यातच वेळ कसा जायचा ते त्याला कळत नसे . निशा आणि
निकिताला रोज स्तुतीसुमने वाहिली कि घरी येण्याचे सार्थक झाले असे त्याला वाटे . आयुष्यात याशिवाय आणखी काही करावे लागते याची त्याला कल्पनाच नव्हती .
आळसाने सतत लोळत पडलेल्या बापाला पाहून निकिता म्हणायची , ममा याचा घरी काय उपयोग आहे ग ? याला लोळताना पाहून माझा जळफळाट होतोय , तू याला क्वीकर डॉट कॉम वर विकून का नाही टाकत ?"
निशा मनापासून हसून म्हणे ," अग हा पाणघोडा विकत घेणार कोण ? आणि कशाला ? "क्वीकर डॉट कामवर कोणतीही टाकाऊ वस्तू विकत घेता येते खरे असले तरी आपल्या बापाला कुणी विकत घेणार नाही हे निकिताला पटायचे .
निशाचा आपल्या आळशी नवऱ्यावर फार जीव होता . तो सुट्टीत आला की ती भरपूर लाड करून त्याचा अगदी गुळाचा गणपती करून ठेवायची . तिला सुपरवुमन बनून संसाराची सूत्रे एका हाती सांभाळायची सवय झाली होती . आत्मविश्वासाने परिपूर्ण , हसतमुख आणि केंव्हाही मदतीस तत्पर निशाचा लोकसंग्रह आणि लोकप्रियता अफ़ाट होती .

मुंबईहून परतल्यावर तिने आपल्या दोन जिवलग मैत्रिणींना भेटून करंजवाडीला प्लॉट बघणे आणि त्या परिसरातल्या पर्यटनस्थळांची वर्षा सहल करणे असा चार दिवसांचा कार्यक्रम आखला .सुनीलला कोकणात फोन करून बेत पक्का करण्यात आला . करंजवाडीला बस स्थानकावर सुनील त्यांना घ्यायला येणार होता आणि चहापाणी वगैरे झाल्यावर प्लॉट दाखवणार होता .
त्यांची बस करंजवाडीला आल्यावर भरत नावाचा विशीतला चंट तरुण त्यांना घ्यायला आला होता . या तिघींची व्यवस्था एका सुरेख ,कौलारू गेस्ट हाउस
मध्ये केली होती . तासाभराने भरत पुन्हा एकटाच अवतीर्ण झाला . सुनिलकाका अर्जंट कामाने गावाला गेलेत , उद्या ते आल्यावर प्लॉट बघुया , आज जवळची बीचेस आणि मंदिरे बघूया म्हणताच ते सगळे गाडीतून निघाले . हिरवागार निसर्ग आणि झिरमिर पावसात त्यांची सहल मजेत झाली . निशाची इंजिनिअर मैत्रीण ड्रायव्हिंगच्या नियमाबद्दल फार काटेकोर होती . तिने ड्रायव्हरच्या कौशल्याची भरपूर स्तुती केली आणि सीट बेल्ट लावून चालवणे कसे सुरक्षित आहे याची प्रेमाने तपशिलात माहिती दिली . ड्रायव्हर तिचे ऐकून उद्यापासून लगेच सीट बेल्ट लावेल याची सगळ्यांना खात्री वाटली . पण पालथ्या घड्यावर पाणी पडले होते . प्रभावित झाल्याचा अभिनय मात्र त्याने उत्तम वठवला.
भरतला या फटाकड्या मावश्या आणि त्यांचे बिनधास्त मोकळे वागणे फारच आवडले . दुसऱ्या दिवशीही भरत एकटाच हजर झालेला पाहून निशा चकित झाली . सुनीलकाका अजून आले नसल्याची माहिती त्याने दिली . निशाचा व्याही फरार झाल्याचे पाहून मैत्रिणींना आयते कोलीत मिळाले . त्या दिवशी सुनीलची चौकशी करणाऱ्या गावकऱ्याना , ते सुगंधाबाईकडे कामाला गेलेत ,असे भरत मालवणी भाषेत सांगत होता तेंव्हा तिघींनाही खुदुखुदू हसू आले . व्याही चांगलाच रंगेल गडी आहे असे दिसत होते . त्याला सुगंधाबाईकडे काम होते , घरी काम होते मग तो निशाच्या कामास केंव्हा येणार ? नाही का , असे मैत्रिणी म्हणू लागल्या . निशाला सुनीलचा राग येऊ लागला . आम्हाला प्लॉट दाखव अन मग खुशाल घरी दारी कामे कर असे म्हणत ती चरफडू लागली . तिकडे अनिलदादा शहरात राहून असले फटाके आपल्या मागे कशाला लावून देतो म्हणून सुनील मनातून चरफडत होता .
भरत उत्साहाने त्यांना घाटातले अवखळ धबधबे दाखवायला घेऊन गेला . पावसात भिजून , पाण्यात धिंगाणे घालून आणि अरबट चरबट हादडून तिघी थकून परतल्या . एक नाजूक नार मैत्रीण सतत भिजून आजारी पडली . औषधांचा मारा सुरु करावा लागला . पावसाला उसंत नव्हती त्यामुळे आणखी दोन दिवस भिजत सहल करणे शक्य दिसेना . लवकर गाशा गुंडाळून उद्या काहीही झाले तरी प्लॉट आणि गाव बघायचे आणि रात्रीच्या बसने घरी जायचे असे तिघींनी ठरवले .
सकाळी लवकरच त्यांनी थेट सुनीलचे घर गाठले . सुनीलची बायको गडबडून म्हणे तो आज सकाळी पाच वाजताच कामाला गेलाय .
निशाने कठोरपणे म्हटले , सुनीलची अंतहीन वाट बघायला आम्हाला वेळ नाही . आज प्लॉट बघून आम्ही वापस जातोय . एजंटला सोबत पाठवा आम्ही निघतो लगेच . ' अखेर भरत आणि एजंट सोबत त्या तिघी प्लॉट बघायाला निघाल्या . शहरातले आखीव प्लॉट खरेदी करण्याचा अनुभव असल्याने निशाच्या मनात सी फेसिंग प्लॉटचे मनोहर चित्र तयार होतेच . समुद्र किनार्याला लागून व्यवस्थित भूखंड विक्रीसाठी तयार असतील आणि तिथले वीज , पिण्याचे पाणी इत्यादी कनेक्शन असतील आणि लगेच बांधकाम सुरु करता येईल अशी कल्पना अनिलरावांच्या वर्णनावरून तिने केली होती . प्लॉट पसंत पडण्याचीच देरी होती .या कामाचा तिला छान अनुभव असल्याने ती निश्चिंत होती .
पाच किलोमीटर अंतर ऑटोने खडखडत गेल्यावर एका भयानक उंच सखल ठिकाणी ते थांबले . पावसाने अतोनात चिखल झालेला होता . तिथे एका मोठ्ठ्या खड्ड्यात गलेलठ्ठ काळ्या डुकरांची अख्खी वसाहत फोफावली होती . एका बाजूला उकिरडा होता त्यात फेकलेले कुजके हापूस आंबे आणि नासके काजू यांचा भयानक दुर्गंध येत होता . उशिरा उठलेली डुक्करबाळे त्या हापूस अन काजूचा नाश्ता करत होती . काही डुकरांना त्वचारोग झाला होता ते जवळच्या खडकावर खसाखसा अंग घासत होते . दुसऱ्या बाजूला खारफुटीचे जंगल होते . समुद्राची घनगंभीर गाज डुकरांच्या ओईन्क ओईन्क आवाजात क्षीण ऐकू येत होती . हाच तिचा स्वप्नील पाच गुंठा प्लॉट होता . तिथून समुद्र आणखी तीन किलोमीटर दूर होता . त्यांनी तिघींनी जमीन नक्की किती मोठी आहे याचा अंदाज घ्यायचा केविलवाणा प्रयत्न केला . त्यात चिखलात फसून एकीची चप्पल तुटली .
निशाच्या पायाशी एक डुक्करबाळ लडिवाळपणे अंग घासू लागले . तिने घाबरून भीषण किंकाळी मारली .त्यामुळे आठ , दहा चिमुकल्या पिल्लांना दुध पाजणाऱ्या दोन ढालगज डुकरिणी चवताळून यांच्या अंगावर धावून आल्या . तिघी मैत्रिणी झटकन ऑटोमध्ये बसल्या आणि जीव मुठीत धरून निशाच्या काल्पनिक बंगल्याच्या सी फेसिंगला सामोरे गेल्या . मळकट पाणी असलेला कळाहीन समुद्र आणि एक रहस्यमय बंदर पाहून त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला . तिथून हत्यारांचे स्मगलिंग होत होते कि अंमलीपदार्थाची चोरटी आयात, अशी कुशंका निशाचा मेंदू कुरतडू लागली .
अखेर त्या गेस्ट हाउसला परतल्या . लहान गावात एखाद्या स्त्रीने स्वतंत्रपणे जमीन खरेदीला येणे अजूनही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला पचणे कठीण आहे . अजित सोबत आला असता तर सुनीलने अशी टाळाटाळ केली नसती असे निशाला मनोमन वाटले .

त्यादिवशी संध्याकाळी बसमध्ये बसल्यावर सुनील धावत धापा टाकत यांना भेटायला राजेळी केळी घेऊन आला . तिघींना अति झाले आणि फस्सकन हसू आले .
काय हो , तुम्हाला खरच " काम " होते की डुकरांची चाळ दाखवायची भीती वाटली ? असे निशाने विचारताच सुनील खजील झाल्यागत हसू लागला . त्याचा
अभिनय पाहून , " तुम्ही सुगंधाला घेऊन ऑस्कर समारंभाला जा तुम्हाला एक बाहुली नक्की मिळेल " असे निशा म्हणाली . सुगंधाच्या उल्लेखाने सुनीलला
गोड झिणझिण्या आल्या . ऑस्करची बाहुली प्रकरण त्याला समजले नाही . जमीन अजून डेव्हलप झाली नव्हती तरी अनिलदादाने या फटाका विहीणीला उगाच कशाला घाईने गावाला पाठवले तेही त्याला कळत नव्हते . शहरातल्या फ़टाकड्या बायकांची ब्याद विनासायास टळली यातच तो खुश होता .

दर्याकिनारीची जमीन पाहून आल्यानंतर कितीतरी दिवस डुकराचे लडिवाळ पिल्लू आणि खरजेल डुकरिणी स्वप्नात निशाच्या अंगाला बिलगायचे आणि ती
दचकून उठायची . आता कुणी प्लॉटचे नाव घेतले तरी निशाच्या अंगावर काटाच येतो . तिचे दर्याकिनारी बंगला बांधायचं स्वप्न वाळूचा लाडू केल्यागत फुटले .

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लै भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं जमलय जमीनीचे वर्णन ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
मस्त! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त खुस्खुशीत!

Smile

- (५ गुंठे जागेचे स्वप्न असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमलयं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले काही दिवस प्रवास, पुणे फिल्म फेस्टिवल आणि कट्टा यात अडकल्यामुळे हा लेख सावकाशच वाचायचा ठरवला होता. या कल्पनेचं चीज झाल्यामुळे ते मी स्टॉलवरच्या चीज कच्छी दाबेलीमध्ये दाबून भरून डबल चीज कच्छी डबल दाबेली करून खाणार आहे. मग त्यावर मस्त सोलकढी पिऊन, उसंत सखूंचं मोठ्ठं पिक्चर टांगून समोर 'थलैवा' असं ओरडत लुंगी डान्स करणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येन्ना राजेस्कला …. साहीथ्य सम्बेलण उधगाटण मीच करणार माइंड इट ! Dirol ( स्वगत : झुल्पी विग आणि गॉगल लावून शिग्रेटी उडवताना फोटू काढून घ्यावा काय तात्काळ ? जाउदे अदिती आहेच फ्लेक्षयेक्षपर्ट ;;) होउदे खर्च , ऐसी आहे घर्च !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झुल्पी विग आणि गॉगल लावून शिग्रेटी उडवताना फोटू काढून घ्यावा काय तात्काळ ?

त्यापेक्षा चिकना चंदेरी काड्यांचा चष्मा आणि वर मनालीमध्ये मिळणारी रंगबिरंगी गोलटोपी आणि खाली एक व्रात्य हास्य असा फोटू का नाही काढवून घेत? साहिथ्य सम्बेलनच उद्घाटनच काय, तुम्हाला गुरखा फलटण पण आपल्या कुकऱ्या उचलून एक सलाम ठोकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी काही दिवसांत चांगलेच भार्ताळले नै? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!