होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार

होमिओपॅथी पदवी घेतलेल्या डॉक्टरांना प्रॅक्टिस करताना अॅलोपॅथीच्या औषधांचाही वापर करता येणार आहे. मात्र होमिओपॅथीचं शिक्षण घेतल्यानंतर एक वर्षाचं अॅलोपॅथीचं प्रशिक्षण घेणं बंधनकारक असून त्यानंतरच त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येणार आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Homeopathy-pra...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

"बातमी समजली का?" ह्या प्रकारच्य धाग्यात हे कंटेंट जायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा मस्तच शॉर्टकट झाला की. मागच्या दाराने झकास सोय. BHMS चा कोर्स किती वर्षांचा असतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अॅलोपथी, होमिओपथी आणि आयुर्वेदीक डॉक्टरकीचा सुरुवातीच्या २ ३ वर्षाँचा अभ्यासक्रम एकच असतो ऐकलय. हे खरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

बीएचएमएस हा एकूण साडेपाच वर्षांचा कोर्स असतो. आता आयुर्वेद वाले पण म्हणतील की आम्हालाही ही सुविधा हवी. शरीरशास्त्र हे अ‍ॅलोपॅथीला वेगळे होमिओपॅथीला वेगळे व आयुर्वेदला वेगळे तर नाही ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आणि फी किती असते, तुम्हाला काही कल्पना आहे का?

शरीरशास्त्र हे अ‍ॅलोपॅथीला वेगळे होमिओपॅथीला वेगळे व आयुर्वेदला वेगळे तर नाही ना?

आडकित्ता म्हणतात की होमिओपथीमधे शरीरशास्त्र नाहीच किंवा आहे ते चूक आहे. (हे मागे 'मीमराठी'वर वाचलं होतं. तो डेटाबेस आता शिल्लक नाही.) असं असेल तर मग साखरेच्या गोळ्या (हा गविंचा आवडता प्रांत आहे) वाटप केंद्र उघडण्यापेक्षा सरळ MBBS च्या सीटा वाढवायच्या आणि होमिओपथी बंदच करावी. आयुर्वेदात निदान हळद, मध, इत्यादी, सामान्य लोकांनाही सहज विश्वास ठेवता येतील अशी, परिणामकारक औषधं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चला आता एकदम भरपूर डाकू सिस्टम मध्ये येतील. तसेही भरपूर लोक आहेत ज्यांना अस्सल होमिओपॅथी साईड इफ्फेक्ट न होणारी अ‍ॅलोपॅथीची औषधे चालतात. ह्याशिवाय अजून एक फायदा म्हणजे कॉलेजेसचे दुकान चालूच राहिल ना नाहीतर त्यांच्यावर गडांतरच होते. वाईटातून चांगले असे शोधून उगी राहावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुर्वेदवाल्यांना ती परमिशन होतीच.

माझा एक बी ए एम एस मित्र आहे तो म्हणतो आम्हाला परवानगी आहे पण आम्हाला अ‍ॅलोपथीची फार्मॅकॉलॉजी शिकवलेली नसते म्हणून ते धोक्याचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अशी प्रॅक्टिस करणार्‍या अनेक डॉक्टरांना पाहून त्यात काही गैर वाटत नाही. दर्जात फार फरक पडत नाही, बरेच अलॉपॅथीवाले चुकिचे सल्ले देतात, त्यामुळे फार नुकसान होईलसे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याच न्यायाने कोणालाही परवानगी द्यायला हरकत नाही. १ वर्षाचे शिक्षण द्या, बाकी फरक काही नाहीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याच न्यायाने कोणालाही परवानगी द्यायला हरकत नाही. १ वर्षाचे शिक्षण द्या, बाकी फरक काही नाहीच.

तत्त्वतः मी म्हणतोय ते चूक आहे, फक्त प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आरएमपी' प्रकाराबद्दल ऐकले आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप पूर्वी आपल्या माजी राष्ट्रपती (की प्रमिला टोपले?) जेव्हा राज्याच्या आरोग्यमंत्री होत्या तेव्हा तीन वर्षांचा खास अभ्यासक्रम ठेवून ग्रामीण भागासाठी डॉक्टर निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. बहुधा ग्रामीण भागातल्यांना असले डॉक्टर हा शहरी लोकांचा ग्रामीण जनतेवर अन्याय आहे असा आक्षेप घेऊन तो प्रस्ताव फेटाळला गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐकवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टू राँग्स डोंट मेक अ राईट वगैरे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी प्रॅक्टिस करणार्‍या अनेक डॉक्टरांना पाहून गैर वाटत नाही असे नाही. मात्र ग्रामीण भागात प्राथमिक स्वरुपाच्या वैद्यकसेवेचे प्रमाण वाढवण्यासाठी अशा उपाययोजना करता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(अर्धवट आणि ऐकीव माहितीनुसार; तपशिलांबाबत चूभूद्याघ्या.)

रीतसर वैद्यकीय शिक्षणाच्या अभावी, एखाद्या प्रस्थापित डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे (कंपौंडर वगैरे म्हणूनसुद्धा) काम केल्यावर, त्या अनुभवाच्या आधारावर आणि काही सरकारी परीक्षा देऊन त्या आधारावर वैद्यकीय व्यावसायिक म्हणून रीतसर नोंद करण्याची आणि स्वतंत्र प्र्याक्टिस स्थापण्याची मुभा (निदान एके काळी तरी) भारतात उपलब्ध होती, असे काहीसे आठवते. (ही मुभा अजूनही उपलब्ध असल्यास कल्पना नाही.)

(माहीतगारांनी योग्य तो खुलासा करावा.)

(माझ्या कल्पनेप्रमाणे अशा आरएमपीच्या प्र्याक्टिसचा स्कोप बहुधा मर्यादित असणे अपेक्षित असावे. कदाचित अमेरिकेत 'नर्स प्र्याक्टिशनर' हा जो प्रकार असतो, तसे काहीसे? कल्पना नाही. परंतु शिक्षणाने रीतसर एमबीबीएस/एमडी डॉक्टर नसले, तरी प्राथमिक पातळीवरील निदान आणि उपचार करता येण्याइतपत (बोले तो, प्रायमरी केअर फिजीशियन अशा अर्थी) त्यांची मर्यादित परंतु किमान पात्रता असावी, असे बहुधा अपेक्षित असावे. चूभूद्याघ्या.)

(डिस्क्लेमर: प्रस्तुत प्रतिसाद हा या प्रथेच्या समर्थनार्थही नाही, आणि विरोधार्थही नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किमान होमिपदीवाल्यांना संबंधित विषयांचं काहीतरी ट्रेनिंग असतं की. बाकीच्यांना काय??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या एक वर्षाच्या कोर्स मध्ये त्यांना अ‍ॅव्होगॅड्रो नंबर विषयी पण शिकवावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा विषय माझ्यालेखी संपलेला आहे.
इतके होमियो डॉक्स आहेत ते काही तरी मार्ग काढून या प्रवाहात येणारच. उलट योग्य प्रशिक्षण देऊन त्याना यात आणलेलेच बरे! किमान चांगले उपचार होण्याचे शक्यता तरी तयार होईल. उगाच डिनायल मध्ये जाऊन काही हाती लागणार नाही.

असेही कोणताही औषधांच्या दुकानातला माणूस (फक्त काम करणारा म्हणतोय) बिनधास्त औषधे देतच असतो की. त्याच्याकडे तर काहीच पदवी नसते. निव्वळ अनुभवावर हे चाललेले असते.
त्यापेक्षा होमियो डॉक्स प्रशिक्षित तरी असतील. शरिरशास्त्राचा बेसिक अभ्यास तरी नक्कीच केलेले असणार.

ग्रामीण भागात किंवा गरीब वस्त्यांमध्ये हे होमियो डॉक्स लोक काम करतातच. तात्काल स्वरूपातली मदत हेच लोक देऊ शकतात. केस हाताबाहेर असेल तर योग्य त्या डॉक ला रिफर करतात हे ही पहिले आहे.

महाराष्ट्रात तरी परिस्थिती बरी आहे. युपी वगैरे भागात तर निव्वळ भाऊ डॉक्टर आहे म्हणून त्याच्याच सर्टीफिकेटवर त्याच्याच नावाने भलतीकडेच प्रॅक्टीस करणारे लोक मी प्रत्यक्ष पाहिले आहेत.

(हा प्रकार रेल्वेत खूप आहे. शिक्षण पदवी एकाची त्यावर नोकरी करत असतो ८ पास असलेला! असे पुर्ण नोकरी करून आता पेन्शन घेत असलेले लोकही पाहिले आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-निनाद

पूर्ण सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चला.. तुका म्हणे त्यातल्यात्यात..

मुळात होमिओपाथ डॉक्टरांना पेशंट्सना (त्यांच्या पथीशी अज्याबात न जुळणार्‍या) "अ‍ॅलोपथी"ची औषधे देण्याची "परवानगी" मिळण्यासाठी मागणी अन आंदोलन करावंसं वाटलं यात सर्व आलं. बदलेल आता हळूहळू अन बंद होतील साखरगोळ्या.. !!

एक वर्षं मॉडर्न मेडिसिनची तत्वं शिकून मग मेनस्ट्रीम औषधं देणार म्हटल्यावर अत्यंत बरं वाटलं.

होमिओपथीची औषधं देण्यापेक्षा हजारपट उत्तम. पेशंटना "औषध" मिळणार आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>इतके होमियो डॉक्स आहेत ते काही तरी मार्ग काढून या प्रवाहात येणारच. उलट योग्य प्रशिक्षण देऊन त्याना यात आणलेलेच बरे! किमान चांगले उपचार होण्याचे शक्यता तरी तयार होईल. उगाच डिनायल मध्ये जाऊन काही हाती लागणार नाही. सहमत आहे. वैद्यकीय सेवा खेडोपाडी व्यवस्थित पुरेशी पोहोचवायची असेल तर हा मार्ग योग्य आहे. अनेक बोगस डॉक्टर खेड्यात निमशहरी भागात व्यवस्थित प्रॅक्टीस करतात. कारण सगळ्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर पोहोचू शकत नाही. मग त्या ठिकाणच्या आरोग्य सेवेचे काय? पुर्वी आरएमपी लोकांनी अनुभवाच्या जोरावर अशा यशस्वी सेवा दिलेल्या आहेत हे मी पाहिले आहे. खर तर असे प्रशिक्षित बेअर फूट डॉक्टर्स तयार झाले तर दुर्गम भागातील आरोग्यसेवेचे प्रमाण खरोखरीच परिणामकारक ठरेल. हे लोक आवाक्या बाहेरील केसेस मोठ्या डॉक्टर कडे रेफर करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अगदी अगदी..

खेड्यापाड्यात आणि जंगलातल्या वस्त्यांमधे न्यूमोनिया (मुख्यतः बालकं), संसर्गजन्य रोग, जखमी होणे, सर्प आणि अन्य दंश अशा कारणांनी बर्‍याच मोठ्या संख्येने लोक इमर्जन्सी परिस्थितीत अडकतात.

मल्टिपल स्क्लेरोसिस, र्‍हुमेटॉईड आर्थ्रायटिस, हॉजकिन्स लिंफोमा हे रोग याही पॉप्युलेशनमधे होत असले तरी ते मोठ्या शहराकडे रेफर करण्याइतका वेळ देणारे म्हणजे काहीसे क्रॉनिक असतात.

"अ‍ॅक्यूट" रोगांबाबत मात्र उपाय सरळसाधा असूनही तो वेळेवर उपलब्ध न झाल्याने हकनाक बळी जातात. या पातळीवरच्या उपचारांसाठी होमिओपथीच नव्हे तर युनानी, नेचरोपथी किंवा अगदी साध्या सामान्य माणसांतलीही तल्लख माणसे हुडकून त्यांना हा एक वर्षाचा कोर्स देऊन गावोगावी प्राथमिक डॉक्टर आणि मॉडर्न मेडिसिनच्या साठ्याची सोय केली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एम ए पी एच डी मराठी लिटरेचर डिग्री घ्या, अन १२वी सायन्सला म्याथ्स शिकवून पहा. यासाठी लॉजिक सांगा की माझा यूपीत्ला भाऊ डॉक्टर आहे म्हणुन मी थेरॉटिकल जॉमेट्री शिकवतो.

तुम्हाला तुमच्या जिवाची किम्मत किती ते महत्वाचे. पायरी चढायच्या आधी डॉ.ची डिग्री पहायची की नाही ते तुमच्या हाती.

लोकांच्या किरकोळ आजारांत कामचलाऊ काम चालते आहे म्हणुन हे असे निर्णय घेतले, तर मार्क मिळवून मेडिकलला जाऊन १०-१० वर्षे झकमारी कोण कशाला करील हो? ३ वर्षांत डीएचएमेस बनतो माणूस. यांच्या पेक्षा जास्त फार्म्याकॉलॉजी मेडीकल स्टोर वाल्याला येत असते. त्यांच्याच हाती भारताची मेडिकल केअर देऊन मोकळे व्हावे. या बेअकली डिसीजनमागे महाराष्ट्रातल्या प्रत्येक होमोपथी डाक्टराने 'काही' हजार रुपये देऊन गोळा केलेला प्र च ण्ड निधी आहे, हे लक्षात घ्या.

असला बोगस डॉक्टर गरीबाची गरज भागवतो, अन गरज पडल्यास योग्य डॉक्टरकडे रेफर करतो हे तुम्ही पाहिले असे म्हणता, तिथे ज्या 'योग्य' डॉक्टरकडे तो पेशंट रिफर होतो, तो मी आहे.

या बोगस वैदूंनी घातलेला सावळा गोंधळ. पेशंटच्या जिवाची केलेली नासाडि, हलकट शब्दात बोलायचं तर यांनी हागून ठेवलेलं निस्तरणं आम्हाला करावं लागतं. का करतो? दोन कारणे. १. सुरुवातीच्या दिवसात मला जम बसवायचा असतो. २. गरिबाला नाईलाज म्हणून यांच्याकडे जावे लागते हे मला समजते.

वरतून हेच वैदू दिवटे "अ‍ॅलोपथीचे साईड इफेक्ट" ही बोंब मारतात.

त्यांना हे राजकारणी सामिल. सध्या ५८ नव्या मेडिकल कॉलेजेसना मान्यता देऊ घातलिये या लोकांनी. मग डॉक्टरांची कमतरता का होणारे? की जेणेकरून संजय दत्त ला एके४७ चं लायसन वाटण्याचा प्रकार इथे चालला आहे?

हा निर्णय न्यायालयात क्यान्सल होणार हे नक्की. आयएमए ऑलरेडी याचिका दाखल करण्याच्या प्रोसेसमधे आहे.

असो. या त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डॉ अभय बंग यांनी बेअर फूट डॉक्टर ही संकल्पना मांडली आहे. त्यांनी सुईणींना योग्य प्रशिक्षण देउन बालमृत्युच प्रमाण कमी करुन दाखवले आहे हे आपणास माहित असेलच. दुर्गम भागातील खेड्यातील गरीब माणसांचे प्रमाण या देशात खूप मोठे आहे त्यांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर पुरणार आहे का? या बद्दल आपण बोलला नाही. जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित ठेवताना आई खायला घालेना व बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती होते. अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांमधे देखील मोठी उच्चनीच श्रेणीची मोठी शॄंखला आहे. आपल्याला तर 'जिपडे' देखील खटकतात.
ही क्वॅक्स मंडळी वैद्यकीय सेवेत गरजे पेक्षा पुरवठा खुपच कमी असल्याने निर्माण झाली आहेत.ती कमी करायची असतील तर केवळ कायद्याचा धाक चालणार नाही. सक्षम वैद्यकीय सेवा समाजातल्या न्यूनतम घटकाला मिळाली पाहिजे.यासाठी काय करता येईल ते पाहिले पाहिजे. मला हे लिहिताना हे बाबा बुवा भगत जडीबुटीवाले वैद्य/वैदू यांच्या वर असलेले डॉ सुधीर कक्कर यांचे डॉ श्रीकांत जोशी यांनी अनुवादित केलेले औषधे, उतारे आणि आशिर्वाद हे पुस्तक आठवते.

या बेअकली डिसीजनमागे महाराष्ट्रातल्या प्रत्येक होमोपथी डाक्टराने 'काही' हजार रुपये देऊन गोळा केलेला प्र च ण्ड निधी आहे, हे लक्षात घ्या.

डिसिजन बेअकली आहे हे मान्य नाही पण बाकीचे विधान पटते. लाभार्थी लोक असा विचार करतात कि उज्वल भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक समजू. एखादा जीआर काढण्यासाठी असे पैसे गोळा केले जातात व ते योग्य मार्फतीने मंत्रालय/ संबंधीत डेस्क वगैरे ठिकाणी पोहोचवले जातात हे उघड गुपित आहे. हे सगळ आपखुशीन चालत.
अवांतर- १) आपल्या व इब्लिस या आयडीत मला खूप साम्य वाटत.
२) आपल्या सही मुळे गोट्या कपाळात जातात. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

'मास्टर्स इन आजीबाईचा बटवा' असा एक नवीन कोर्स तयार करावा व खेड्यापाड्यातल्या हुशार बायकांना घरच्याघरी उपचार करायचे लायसन्स द्यावे या मागणीसाठी मी सत्याग्रह करणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

प्रथमोपचार लायसन्स फ्री आहेत.पण आपल्या उपहासातील आयडीयेची कल्पना चांगली आहे.सध्यातरी ते जनरल नॉलेज सदरात मोडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बायकांच्या बुद्धीवर विश्वास ठेवणारे, फुले, कर्वे आणि नंतर तुम्हीच हो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणूनच तर मी ग्रेटथिंकर आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार, ... म्हणूनच तर मी ग्रेटथिंकर आहे...

कार्यकारणभाव समजला नाही. पण तरीही म्हणायला काय जातंय. म्हणून टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकंदरितच डॉक्टर होणे म्हणजे काय, या बद्दलची लेखमाला मी इथे सुरू करून अर्धवट सोडली.

यात मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होण्यापाठी काय कष्ट, किती शिक्षण, व काय करावे लागते, याबद्दल लिहावयाचे आहे. ऑटोरुब्रिफिकेशन (स्वतःची लाल करणे) म्हणा, पण हे जे काय ट्रेनिंग आहे, ते खरेच सोपे नाही. सुमारे ९ वर्ष प्रचण्ड पिट्ट्या पडतो. अतीशय काटेकोरपणे तुमचे सर्व सिनियर्स जे तुमचे खरे शिक्षक असतात, ते तुमच्यात वैद्यक घोटून मुरवत असतात. छोटीशीही चूक तुमच्या हातून होऊ नये म्हणून अनेक प्रोटोकॉल्स अन पनिशमेंट्स झेलाव्या लागतात, कारण शेवटी जिवाची जबाबदारी हातात असते. यावर लिहायचे खूप आहे पण हातात वेळ नाहिये.

तुम्ही सांगता, त्या दाई ट्रेनिंगमधे त्या दाईला ऑक्सिटोसिनची ड्रिप लावण्याची परवानगी नाहिये. किंवा तत्सम इतर अ‍ॅडव्हान्स्ड औषधोपचार करण्यास शिकविलेले नाही. त्या सुईणीला आपण सुईणच आहोत, हे ठाऊक आहे. इथे गम्मत वेगळी आहे. या लोकांना दुर्दैवाने 'डॉक्टर' अशी उपाधी आहे, अन जे शिकलेच नाही, ज्याची मुळातच कन्सेप्ट नाही, त्याच शस्त्राचा वापर करायचा अधिकार हे मागताहेत. (शस्त्र. शास्त्र नव्हे)

अमुक औषध डोकेदुखीचे, तमुक पोटदुखीचे, ढमुक अस्थम्याचे. दम्याचे प्रकार किती व कोणते? ब्रॉकियल अस्थमाचे औषध कार्डिअ‍ॅक अस्थम्याच्या पेशंटास दिले तर तो मरेल. सलाईन लावल्यावर कोणत्या प्रकारच्या काविळवाल्याचा जीव जाईल? काविळीचे प्रकार किती व कोणते? पॅथोजनेसिस नुसार उपचार बदलतो. लक्षणांनुसार नाही, हे इतर पॅथीज अन सामान्य जनतेस समजतच नाही.

कसं सांगू?? समजा,

मोटरगाडी ही पेट्रोल हवा व ब्याट्रीतील वीज या तीन ह्यूमर्स्/वा त्रिदोषांवर चालते. या दोषांचा समतोल बिघडला, की कार आजारी पडते. योग्य तितके पेट्रोल, योग्य प्रमाणात चाकातील हवा व नीट चार्ज केलेली ब्याटरी असे त्रिदोषांचे समतोल साधले, की ४०-५०% वेळा मोटरगाडी आजारातून 'बरी' होते.

याचा अर्थ ही कन्सेप्ट बरोबर आहे का?

प्राचीन अनुभवसिद्ध अँबॅसॅडर मेकॅनिक, डिझेल इंजिनचा तज्ञ असला, तरीही तो आजकालची काँप्युटराईज्ड इंजिने रिपेअर करू शकेल काय? बेसिक अ‍ॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, पॅथॉलॉजीचे ज्ञानच नसेल, तर पुढे रिपेअरिंग कशी व्हायची? इथे १ वर्ष पूर्ण अ‍ॅनाटॉमी, फिजिऑलॉजी व बायोकेमेस्ट्री शिकण्यात जाते, यात नॉर्मल बॉडी कशी काम करते ते असते.

पुढील दीड कॅलेंडर वर्ष, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी शिकण्यात जाते, ज्यात शरिराचे काय काय व कसे खराब होते ते शिकण्यात जाते.
याच वर्षात फार्म्याक, म्हणजे औषधनिर्माणशास्त्र असते. त्यात अ‍ॅबनॉर्मल बायोकेमेस्ट्री औषधांनी कशी रिपेअर होऊ शकते ते येते.

पुढले २ वर्ष, मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, व इतर सर्व सब स्पेशालिटीज शिकतात. इथे अ‍ॅबनॉर्मल आहे ते नॉर्मलकडे कसे नेता येईल, याचा अभ्यास असतो.

नंतरचे १ वर्ष हँड्स ऑन ट्रेनिंग, आधीच्या ४.५ वर्षांत आलेल्या ३डी संकल्पनेची बेसिक अंमलबजावणी.

इतके करूनही, एमबीबीएस झालेला डॉक्टर साधे इंजेक्शन टोचण्यास घाबरतो, टाके घालण्याआधी ४ वेळा विचार करतो. हातात पेन घेऊन औषध लिहिण्याआधी ५ मिनिटे विचार करतो. का?? कारण त्याला जबाबदारीची, हातातल्या शस्त्राच्या दुसर्‍या धारेची जबाबदारी, व समोरच्या जिवाची किंमत नीट ठाऊक असते.

हे आधा हकीम खतरे जान इतर प्याथीवाले लोक, ज्यांच्या शिक्षणात कुठेच सिरिंज वा स्कालपेल नाही, माझ्या ८वी नापास कंपाऊंडर इतक्याच बिनदिक्कितपणे सलाइन लावतात, अन काय काय करतात ते मला ठाऊक..

या बिचार्‍यांना सरकारने फक्त एक डिग्री दिलिये, अन एक पोकळ पॅथी, जिच्याने पेशंटला फक्त उल्लू बनवले जाऊ शकते, हे त्या मुलांना त्यांच्या सेकंड इयरमधेच समजलेले असते. शून्य टक्के होमिओपॅथीचे विद्यार्थी फक्त होमिओपथी कॉलेजात जातात. हे सगळे इकडेतिकडे कुण्या अ‍ॅलोपथी हॉस्पिटलात फुकट कंपाउंडरकी करतात. यांच्या अभ्यासाची पद्धतच, डोकेदुखिसाठी काँबीफ्लाम अशी असते. काँबीफ्लाम म्हणजे नक्की काय, त्याने काय काय होऊ शकते, याची अजिबात कल्पना यांना नसते. शरीर ४ ह्यूमर्स वर चालते, ब्लॅक बाईल, व्हाईट बाईल, फ्लेग्म व ब्लड! अशी यांची समजूत आहे Sad मला यांची अ‍ॅक्चुअली दया येते. राग नाही. अन विरोध यासाठी आहे, की जनरल पब्लिकला हे अजिबात समजत नाही कि हा माणूस माझ्या जिवाशी नक्की कसा खेळतोय.

अहो, डायग्नोसिसच करता येत नाही, तर उपचार कसला दगडाचा करणार?

अमुक डॉक्टरांकडून तुला काय झालंय ते लिहून आण, मग तुला साबुदाणे देऊन बरा करतो असे सांगणारे होमिओपॅथ्स, अन त्यांच्यावर नितान्त विश्वास ठेऊन, डाग्दर मला काय झालंय ते लिवुन द्या, मला अ‍ॅलोपथी गरम पडते, असं सांगणारे बिण्डोक जिव एकदा नव्हे अनेकदा पाहिलेत मी.

जाउ द्या. सव्वा पेग दक्षिणा देऊन कधीतरी डिट्टेलवार ऐकवीन. हे जरा विस्कळीत होतंय, अन मला आत्ता पळायला लागतंय. डाक्टरकीला सण वार लागू नसतात Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सलाम स्वीकारावा..

शब्दन शब्द फुल्ली लोडेड मार्मिक अन तळमळीचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम आणि अतिशय मार्मिक प्रतिसाद. मुळातच माझा कधीही होमिओपॅथी आणि आयुर्वेद ह्यावर विश्वास नव्हता. कारण माझ्या अंगावर मला जितके टाके पडले तेंव्हा घराच्या वैद्यांनी अर्निक आणि ते काय ते हायपरीयाम देवून वैताग आणला होता. जोडीला काय वाटेल ते कडवट काढे. पुढे वडील आजारी असताना केमोथेरपीचा त्रास कमी व्हावा म्हणून वडिलांच्या मित्रांनी होमिओपॅथीचा जाम मारा केला. ना माझ्यावर कधी होमिओपॅथीचा परिणाम झाला ना वडिलांना काही बरे वाटले. पण बिन्दाक्कात लोक सांगत राहतात फार फार उपयोग झाला वगैरे. च्यायला आमच्या भाळी बरे असले अनुभव कसे काय येत नाही देव जाणे. बहुदा विश्वास नसला की अनुभव येत नसावा म्हणजे पेब्लोसो इफ्फेक्ट आमच्या नशिबी नसावा बहुदा. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा वाचा .http://www.misalpav.com/node/23858

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

उत्तम प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नै बॉस! सलाम कसला?

फाटेफोड आहे, पण थोडे मुक्तचिंतन करतो. अती होईल, पण ग्राउंड रिअ‍ॅलिटी आहे.

हे असले कमअस्सल मेडिकल कोर्सेस आपल्या देशात का सुरू आहेत? यार युनानीत सू ए जमजम : त्या पवित्र विहिरीचे पाणी औषधी आहे असल्या गोष्टी एम्ब्बीबीएस ला एन्ट्रन्समधे ४-७ मार्कं कमी पडलेल्या मुलाने का शिकावे?? किंवा स्ट्रिच्नीन नामक नर्व्ह पॉयझन नक्क्ष व्हॉमिका असे औषध आहे असे तरी का शिकावे??? कम ऑन!! नॉट फेअर.

ही इतकी हुशार मुलं इतर ठिकाणी जास्त चांगलं काम करू शकतील नं? रडतील ४-५ दिवस नाही अ‍ॅडमिशन मिळाली म्हणून. पण मार्गाला तर लागतीलच?

मला अ‍ॅडमिशन मिळाली तेव्हा, पुणे नगर नाशिक जळगांव व धुळे (आजचा धुळे + नंदुरबार) इतक्या जिल्ह्यांमिळून एम्बीबीएसच्या फक्त २०० सीट्स होत्या. बीजे ला. प्लस ~२०० बीएएमेस, प्लस ~१०० होम्योपथी. बास. तिथे अ‍ॅडमिशन नाही मिळाली म्हणून आमच्या पिढीतले किती हुशार देशोधडीस लागले हो?..

आज कालेजे किती?

या शिक्षणसम्राटांच्या कालेजांत शिटं भरणार नाहीत म्हणून मागल्या दाराने अ‍ॅलोपथी करा, असा हा निर्णय आहे Worried

बेक्कार परिस्थिती आहे. सीसीआयेम. सेंट्रल कमीटी ऑफ इंडियन मेडिसिन कालेजाची पहाणी करायला येते. त्यांना पेटी भरून नोटा दिल्या जातात. अन या बिचार्‍या पोरांकडून देणग्या उचलल्या जातात.

पोरं तरी काय करतील? हुशार आहेत. दोन पांच मार्क मागे आहेत मेरिट लिस्ट मधे. खुन्नसमधे पब्लिकला xxया बनवतात. आईबापांनी घामाचे, उधार उसनवारीचे, कर्जाचे, पैसे दिलेले असतात शोन्याला डाक्टर बनविण्यासाठी..

..ही मुलं समाजावर सूड तर उगवणारच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मार्मिक देऊन समाधान न झाल्याने हा प्रतिसाद...
आणि ती अर्धवट सोडलेली लेखमाला पूर्ण करा अशी विनंती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे असं करण्यापेक्षा, प्रमाणित MBBS साठी फार जास्त खर्च करावा लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं लागेल आणि त्या खर्चाची तयारी नाही, असं काही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद खतरनाक आहे. थेट, स्पष्ट, रोखठोक. "कुणाला कशाला दुखावावं , म्हणून सौम्य्,मवाळ भूमिका घ्यावी " हा विचार पूर्ण बाजूला ठेवून सरळ प्रामाणिकपणं दिलेला प्रतिसाद.
पण डॉ , अडचण काय होते की काही जनरल/मॉडर्न मेडिसीनचे (अ‍ॅलोपथीचे) डॉक्टरच "क्रॉनिक दुखण्यात होमिपथीचा फार फायदा झाला बरं" असं सांगतात तेव्हा काय कराव?
मीमराठीवर ह्याचा लिखित पुरावा होता.(आता ती साइटच उडाली आहे.)
डॉ अशोक कुलकर्णी, मॉडर्न मेदिसीनचे डॉक्टर ह्यांनी आपल्याला आलेला होमिपथीचा अनुभव मांडला होता.
होतं काय, की असं काही पाहिलं की गोंधळायला होतं. एका बाजूला तुम्ही लिहिता ते समजतं, इतरत्रही उपक्रमावर कोनतीतरी जोरात चर्चा झाली होती ते आठवतं.
त्यात कुणीतरी डॉक्टर शिकायला आधी होमीपथीचा विद्यार्थी होता, त्यानं ते शिक्षण भंकस वाटल्यानं, ते सोडून जिद्दीनं पुन्हा अ‍ॅलोपथीला प्रवेश मिळवला, वगैरे स्टाइलच्या वर्णनाच्या लेखाचा दुवाही होता.
पण एका बाजूला तो लेख, तुमचे प्रतिसाद व दुसरीकडे अशोक कुलकर्णींसारखे अ‍ॅलोपथिक लोकं असं समोर आल्यावर वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानशून्य आम पब्लिकला गोंधळायला होतं ना!
.
.
किंवा खाली गवि म्हणतात तसं "आम्हाला होमिपथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्या" अशी मागणी मॉडार्न मेडिसीनचे डॉ करत नाहित; उलट प्रकार मात्र होतो आहे; ह्यातच काय ते आलं..
.
.
.
वैयक्तिक अनुभव :-
मला डॉक्टर म्हणवणआर्या डॉ बात्रा, केस परत आणण्याची हमी देनार्यानं लै लुटलय. त्याची औषधं घेताना केस जात राहिले; डोकं हल्कं होत राहिलं आणि खिसाही.
मॉडर्न मेडिसीनवाल्या ट्रायकोलॉजिस्टनं सरळ "गेलेले केस परत आणू शकत नाही,सॉरी. " हे सांगितलं.
"हेअर ट्रान्सप्लांट व डायरेक हेअर इम्प्लांट हे सर्जिकल स्टाइल खर्चिक पर्याय आहेत" असंही स्पष्ट सांगितलं. ते आवड्लं.
वस्तुस्थिती स्वीकारत मी चालता झालो.
.
.
.
आयुर्वेद, योगशास्त्र वेगळा धागा होइल; ते इथे नको. त्यात निदान काहीतरी तथ्य आहे, हे सार्‍यांनाच मान्य व्हावं.
ते जी औषधं , काढे देतात, इतर काही प्राशन करायला सांगतात त्यात काहीतरी औषधी आहे, ह्यावर दुमत होउ नये.
हां, त्याची स्केल किती, उपयोग किती, ह्यावर चर्चा होउ शकते. तर, ते सध्या सोडून देउ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हणजे कोणी डॉक्टर आहे म्हणून होमिओपथीला पाठिंबा दिल्याने माझा व्यक्तिशः बुद्धिभेद होत नाही, कारण होमिओपथीची तत्वं ही माझ्यालेखी वैद्यकीय पातळीवर पोचण्यापूर्वीच भौतिकशास्त्राच्या पातळीवरच नष्ट होतात. मुळात औषध असेल तर उपाय होणार ना? औषध उपयोगी आहे का नाही हा फार पुढचा भाग झाला.

पण एकूण पब्लिकचा असा बुद्धिभेद होऊ शकतो.

मनोबाशी सहमती या बाबतीत आहे की खरोखरच कोणतेही मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स होमिओपथीला उघड विरोध दर्शवत नाहीत. वास्तविक जे काही अप्रभावी आहे त्याबाबत आपल्या पेशंट्सना आणि पब्लिकला जागरुक करणं हीदेखील एक आरोग्यसंवर्धनविषयक जबाबदारीच आहे असं मला वाटतं. असं होत नाहीच, उलट अनेक मॉडर्न मेडिसिन डॉक्टर्स स्वतःला होमिओपथी पटत नसूनही "फायदा होत असेल तर जरुर होमिओपथी घ्यावी" वगैरे मध्यममार्गी आणि तटस्थ बोलतात. मीम, ऐसी यांवरील चर्चांचा संदर्भ आलेला आहेच, तसंच मिपावरही अशा चर्चांमधे मॉडर्न मेडिसिन डॉक्टर्सनी "कोणाच्या का पॅथीने होईना, उपाय झाला म्हणजे झाले." अशा पद्धतीने मांडणी केल्याचं दिसलं आहे.

या अशा मांडणीमुळे सामान्य लोकांसमोर काय ते सत्य येतच नाही.

श्री. आडकित्ता यांनी आणखी एका शंकेचं उत्तर लिहिण्याच्या ओघात दिलं आहे. नेहमी प्रश्न पडायचा की होमिओपथीचे तत्व शिकताना खुद्द बुद्धिवादी विद्यार्थ्यांना त्यात काही खटकत नाही का? ते खुद्द कसे कन्व्हिन्स होतात इतक्या मोठ्या संख्येने? पण आडकित्ता यांनी म्हटलं आहेच की त्यांनाही शिक्षणादरम्यान काय ते कळलेलं असतंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आडकित्ता, लेखमाला पूर्ण होण्यासाठी मी सहकार्य करु शकतो.
मला कंटेंट सांगा. मी रेकॉर्ड करतो. मी टंकनही करतो.
भाग १, भाग २, असं करत होता होइल तितकं लिहीत राहू.
तुम्हाला सवडिनं वाचायला जमेल तेव्हा तुम्ही ते यथोचित कागदावर उतरलय की नाही हे व्हेरिफाय करु शकता.
चालेल का? लोकं दुवा* देतील तुम्हाला.
(गृहितक :- लिहिण्यास वेळ लागत असला, तरी बोलण्यास तुलनेने कमी वेळ लागतो. पाच्-सात मिनिटांच्या गप्पात तीनेक पानांचं कंटेंट आरामात मावतं.)
.
.
दुवा म्हणजे link नव्हे. दुवा म्हणजे शुभेच्छा, आशीर्वाद वगैरेला समांतर अशी उर्दू-फारसी-अरबी संकल्पना म्हणतोय.
अवांतर :- "कोकणचो डॉक्टर" लै हिट झालं होतं. डॉ ला कोणत्या समस्या असतात, निदान त्यांना किती छळू नये हे ती मालिका वाचून समजलं.
तुम्ही पेशंटनं कोणत्या गैरसमजात राहू नये हे, किम्वा वैद्यकीय व्यवसायबद्दल इतर काहीही तुम्हाला रुचेल ते सांगितलत तर बरं होइल.
.
.
बोंब :- रेकॉर्डींग कसं करावं हे अजून माझ्या डोक्यात नाही. कुणी सर्वात उपयुक्त पद्धत, स्वतःचे अनुभव सांगितले तर बरं होइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बरीच फुकट सॉफ्टवेअर्स मिळतात रेकॉर्डिंगसाठी. हुडकून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होमिओपथी ही सार्थ औषधोपचार पद्धती आहे की नाही ह्या वादात न पडता, मुळात एका पथीच्या डॉक्टरांना अशी दुसर्‍या पथीची परवानगी देणे ह्या काहीतरी गोची आहे आणि ते पटण्यासारखे नाही. ते चूक आहे हे माझे वैयक्तिक मत!

- (होमिओपथीला वैतागलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होमिओपॅथी संदर्भाने काही चर्चा. केवळ माहिती करिता
http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॅथी एक थोतांड
http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो
http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती
http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॅथी वैयक्तिक अनुभव
http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या
http://misalpav.com/node/7514 डॊक्टर
http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्र घा, अहो काय या लिंका... वाचण्यात सगळी दुपार गेली... डोक्याची मंडई झाली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉ अशोक कुलकर्णी, मॉडर्न मेदिसीनचे डॉक्टर ह्यांनी आपल्याला आलेला होमिपथीचा अनुभव मांडला होता.

आम्चे पीएसेमचे गुर्जी डॉ. कुलकर्णी सरांशी तिथे वाद घालणारा मीच होतो Smile

'काही डॉक्टर लोकही इतर पॅथीजना का म्हत्व देतात?'

एक समांतर उदाहरण देतो.

अनेक 'संकटे' एकापाठीएक अंगावर येऊ लागली की बॉर्डरलाईण नास्तिक जसा आस्तिक होतो, मुलगाच हवा म्हणून कुण्या पीरबाबाला चादर वहातो किंवा मोतमेरीला मेणबत्त्या शिलगवून येतो,

तसेच, कुण्या भिवविणार्‍या आजारासाठी, उदा. 'चक्कर येणे', ज्याला बहुतेकदा फक्त टाईम कॅन करेक्ट. ह्या त्या न्यूरो, ईएन्टीवाल्याकडे जाऊन आल्यावर हळूहळू कॉक्लिआ अन सेमिसर्कुलर कॅनाल्स रिबूट होतात अन ब्यालन्स पुन्हा येतो. अशात तो पेशंट साबुदाण्याकडे पोहोचलेला असतो. बरे वाटू लागल्यावर क्रेडिट गोज टू...! यु नो हू.

दुर्दैवाने मी मीमवरचा तो धागा सेव्ह केला नाही. करायला हवा होता. फार फडतूस रिसर्च लिंका दिल्या होत्या गुरुजींनी. माझा फेवरिट धागा होता अन त्यापेक्षा जास्त भारी आमचे व्यनी होते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओळख लागतेय का?
५७/५८ मेडीकल कालेजे काढण्याचा केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे.
आहेत त्याच मेडिकल कॉलेजांतले इन्फ्रास्ट्रक्चर मारून टाकले गेले आहे. जौद्या. पुन्हा कधीतरी लिहीन..

(वरील चित्रावर राईट क्लिक करून सेव्ह अ‍ॅज करून आपल्या इमेज व्ह्यूअर मधे पाहिलेत तर पूर्ण बातमी दिसेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तसेच, कुण्या भिवविणार्‍या आजारासाठी, उदा. 'चक्कर येणे', ज्याला बहुतेकदा फक्त टाईम कॅन करेक्ट. ह्या त्या न्यूरो, ईएन्टीवाल्याकडे जाऊन आल्यावर हळूहळू कॉक्लिआ अन सेमिसर्कुलर कॅनाल्स रिबूट होतात अन ब्यालन्स पुन्हा येतो. अशात तो पेशंट साबुदाण्याकडे पोहोचलेला असतो. बरे वाटू लागल्यावर क्रेडिट गोज टू...! यु नो हू.

Through the wormhole with Morgan Freeman या कार्यक्रमात एक विषय आस्तिक-नास्तिकांच्या मेंदूचा होता. त्यात एका संशोधकाने याच प्रकारचं विधान देवाबद्दल केलं होतं. सतत संकटं, पूर, वादळं, भूकंप येत रहातात, त्याची कारणमीमांसा समजत नाही, त्यांनी होणारं नुकसान, जिवीतहानी यांच्यामुळे खचून देव या संकल्पनेची निर्मिती झाली.

या कार्यक्रमातले मुख्य मुद्दे इथे पहाता येतील. त्यातल्या तिसऱ्या क्लिपमधे हीच गोष्ट दाखवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पीएसेमचे म्हणजे?
बादवे, तुम्ही ती राहिलेली मालिका narrate कराल का? मी तुमचे टंकनश्रम वाचवायला तयार आहे.
वीकांतापैकी एक दिवस मी तुमच्या मालिकेच्या टंकनास देउ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद, सुहृद!
योग्य वेळ येताच, तुम्हाला नक्कीच त्रास देईन. तुम्ही प्रेमाने दिलेल्या या ऑफरचा नक्कीच फायदा घेईन.. पण, सध्या आर्टिक्युलेटेड थॉट्स ची माळ गुंफण्यातच वेळेचा प्रॉब्लेम येतोय. Sad

P S M = Preventive & Social Medicine.
याला सर्व मेडिकल स्टुडंट्स पीळ शेवटल्या मिंटापर्यंत असेही म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खेडोपाडी वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून अ‍ॅलोपथीची औषधे वापरण्याचा परवाना:
होमिओपॅथीच्या व्यावसायिकांचा/ त्यांच्या संघटनेचा काय प्रतिवाद आहे हे कोणाला माहित आहे का? 'आम्हाला अ‍ॅलोपॅथीची औषधांचा परवाना द्या' असे ते कुठल्या मुद्द्यावर म्हणत आहेत? आमची औषधे चालत नाहीत म्हणून आम्हाला दुसरी देण्याचा परवाना द्या असेच काहीसे ते म्हणणे होत नाही का?

कितीतरी होमिओपॅथ दुसर्‍या वैद्यकाची औषधे सर्रास देतात. त्यातून दुर्गम भागांत विनापरवाना औषधे देणे जास्तच सहजी शक्य आहे. त्यांना परवाना हवा आहे तो शहरात अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांप्रमाणे चालणारी प्रॅक्टीस पाहिजे म्हणून अशी शंका येते. दुर्गम ठिकाणी होमिओपॅथीच्या गोळया देऊन उपचार करायला आजही त्यांना कोणी अडवलेले नाही. जे आत्ता तिथे जाऊ इच्छित नाहीत ते एकदा असा परवाना मिळाल्यावर कशाला शहरी भाग सोडून जातील?

दुसरे म्हणजे, त्यांना हा परवाना मिळणार आहे तो अमर्याद की नर्स-प्रॅक्टिशनर प्रमाणे मर्यादित औषधांचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅलोपॅथीवाल्यांनी जास्त टिवटिव केली तर होमिओपॅथीवाले त्यांच्या भानगडी बाहेर काढणार आहेत असे मुद्रित मटात आले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

समाजात एक प्रवाह असा आहे कि त्यांचे मते कुठलीच पॅथी परिपुर्ण नाही. प्रत्येक पॅथीच्या काही मर्यादा व काही बलस्थाने आहेत. त्यामुळे कुठल्यावेळी कुठली पॅथी वापरावी या विषयी मतभिन्नता आहे. पण पुर्णोपचार वाले रोग्यानुसार व रोगानुसार वेगवेगळ्या पॅथींची उपाययोजना करतात. ( अस त्यांच म्हणण आहे)
माल्प्रॅक्टिसेस करणारे सर्व पॅथीत असतात याविषयी माझ्या मते दुमत नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जे आत्ता तिथे जाऊ इच्छित नाहीत ते एकदा असा परवाना मिळाल्यावर कशाला शहरी भाग सोडून जातील?

नाही जाणार. सध्या परवाना नाही म्हणुन थोडेच ते शहारात थांबले आहेत? उलट निमशहरी खेड्यातील लोक शहराकडे येतील.

दुसरे म्हणजे, त्यांना हा परवाना मिळणार आहे तो अमर्याद की नर्स-प्रॅक्टिशनर प्रमाणे मर्यादित औषधांचा?

हा कळीच मुद्दा आहे.! एमबीबीएस वाले सुद्धा सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची औषधे द्यायला कचरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ज्यात आपले शिक्षण नाही त्या पद्धतीचे उपचार करणे ह्याला अपवाद असे पुण्यातले निष्णात आयुर्वेदीय वैद्य माझ्या परीचयाचे आहेत. पती- पत्नी दोघेही आयुर्वेदात उच्चशिक्षित आहेत. दोघांनी स्वेच्छेने आयुर्वेदशाखा निवडलेली. वैद्यकीच्या शिक्षणकाळात बहुतेक वेळा पहिले- दुसरे क्रमांक ह्या दोघांचेच असत. दोघांचाही हातगुण अतिशय चांगला आहे. वैद्यबुवा, तत्त्वाचा भाग म्हणून अगदी साधी वेदनाशामकेही अ‍ॅलोपॅथीची देत नाहीत आणि स्वतःही घेत नाहीत. वैद्यबाई तर फार गोड स्वभावाच्या. त्यादेखील पूर्णपणे आयुर्वेदीय उपचारच करतात. पण एकदा माझ्या लहान मुलाच्या बाबतीत न्युमोनियाची शंका येताच 'त्याला तात्काळ आणी हमखास उपाय आयुर्वेदात नाही' असे स्पष्ट सांगून स्वतः उपचार न करता तातडीने योग्य अ‍ॅलोपॅथी उपचारांसाठी पाठवले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औरंगाबदेतील पाठक नामक वैद्यांबाबत असाच अनुभव आहे.
वेदनाशामक किंवा अजून कोण्त्याही मॉडर्न मेडिसीनच्या औषधी त्यांनी कधीही दिल्या नाहित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होमिओपॅथीची बलस्थानं सांगणारेही लोक असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असतात ना! ज्यांना होमिओपॅथीचा उपयोग झाला आहे त्यांच्या दृष्टीने तेच बलस्थान

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

भगवान इस्कू जरा फुरसत की घडीयां दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आजच्या छापील लोकसत्तामधे "अ‍ॅलोपॅथिक रुग्णालयात आयुष (आयुर्वेदिक, योग, युनानी, सिद्ध, होमिओपथी) डॉक्टर्स नेमू नयेत" असा निर्णय आएमएच्या महाराष्ट्र विभागाच्या बैठकीत घेतला गेला" अशी बातमी आहे. ऑनलाईन बातमीचा दुवा सापडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरानी बाते बतारेला क्या रे.
दो-चार हफ्ते पैलेच डिक्लेर किये ना वो लोगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होय काय?

पण लोकसत्तामधे आज ही बातमी आहे हे नवीन आहे. Wink

ही महाराष्ट्राबाबत या निर्णयाविषयी क्लॅरिटी आधी नव्हती आणि आता आली, म्हणून नवीन असावी मला वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या, 'अल्ला मेरे खर्चे बढा' या प्रार्थनेस उत्तर आलेले असल्याने तुमची प्रार्थना 'प्रतिक्षा मे है' Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-