कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
बेलिंडा रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
करड्याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रॅगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके, नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार
साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळविती पार
मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती
कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी
.
बेलिंडा कस्टर्डला गुदगुल्या करून छळे
इंक-ब्लिंक-मस्टर्ड त्याची खोडी काढून पळे
मग सगळे हसत खो-खो, बसून लाल गाडीत
कस्टर्ड रडवा होई, नसे समजूत कोणी काढीत
.
बेलिंडाचे हसून हसून पोट लागे दुखू
ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू
इंक अन मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत
बिच्चार्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत
.
असेच दिवस चालले होते आले एकदा संकट
अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट
इंक म्हटली म्याऊँ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला
बेलिंडा हादरली समुद्री चाचा घरात शिरला.

डाव्या हातात पिस्तूल, उजव्या हातात पिस्तूल
दातात धरुन सुरा तो आला रागात चालून
दाढ़ी त्याची काळी अन एक लाकडाचा पाय
विद्रूप किती ध्यान! त्याच्या मनात दडले काय?
.
बेलिंडाने केला मनात धावा देवाचा
मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता
इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ़्याखालून
ब्लिंक उंदीर केव्हाचा बसला बीलात शिरून
.
कस्टर्ड मात्र उठला, झेप त्याने घेतली,
खवलेदार मजबूत शेपूट रागाने आपटली
खाँणकण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा
चाचाला एका झेंपेत त्याने झोपवला
.
चाचाला वाटले नव्हते होईल असे काही,
तोंडाला बाटली लावून औषध तो पीई.
गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार
पण ताबडतोब झाला तो कस्टर्ड चा आहार
.
बेलिंडा ने मारली मीठी आले तिला भरुन
मस्टर्डनेही आनंद व्यक्त केला शेपूट हलवून
इंक ब्लिंक बाहेर आले, ते होते थरथरत
कसेबसे कस्टर्डला म्हटले thank You कापत
.
अजूनही गेलात तुम्ही त्या खेड्यात
दिसेल लाल लाल गाड़ी उभी मोठ्या झोकात
आजही बेलिंडा त्याला गुदगुल्या करुन छळते
अजून इंक-ब्लिंक-मस्टर्ड खोड़ी काढून पळते
.
अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो
अजूनही ब्लिंक हसत हसत लोळण घेतो
अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगन ची
बिचार्याच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आधारित रूपांतरसुद्धा आवडले असते :

इटुकल्या गावातल्या पिटुकल्या घरात
बेलाताई राहायची ऐटीत अन् सुखात
तिच्याकडे होता एकेक उंदीर, मांजर, कुत्रा
लालचुटूक गाडी नी ड्रॅगन मोठा भित्रा

काळ्याशार मनीचे नाव ठेवले "शाई"
राखुंडी उंदराला "राख्या" म्हटले जाई
धिटुकला कुत्रा, "तिखटू" त्याला म्हणत
ड्रॅगनचे नाव "भित्रा श्रीखंड्या" सांगत
...

आहे तसेही छानच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना खरच चांगली आहे. पण नाव आठवली नाहीत :(. शिवाय हे भाषांतर नाही आहे. रुपांतरच आहे. कारण थोड़ा बदल आहे.
मूळ कविता - http://www.eecs.harvard.edu/~keith/poems/Custard.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण कवितेचे रूपांतर करावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान झालय रुपांतर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks Asmi.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सॉरी पण इतके नै जमलेय.
मोठ्याची कविता असती तर वेगळे मत दिले असते पण जर लहानमुलांसाठी आहे तर ठेक्यात-लयीत तडजोडीला अजिबात स्थान नाही. लहानग्यांची कविता ठेक्यात म्हणता आलीच पाहिजे असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

No need to say sorry. Thanks for the candid opinion.

A poem is never finished ... only abandoned!!!
I will keep improving this poem Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छानच आहे, म्हणून न राहवून कॉपीरायटेड असूनही फक्त एकाच कडव्याच्या रुपांतराचा प्रयत्न करतो:

चिंगी रहायची एका छोट्या सफेद घरी
सोबतीला काळी माऊ, उंदीर छोटा दारी
एक कुत्र्याचं पिल्लु, नि लाल लाल गाडी
अन् एक पाळलेल्या गोंडस ड्रॅगनची स्वारी!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Lovely!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश अन धनंजय दोघांनी रुपांतर करावे. वाचायला खूप आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी भारतील मिथकांत काल्पनिक संमिश्र प्राणी असत - दोन डोक्यांचा गंडभेरुंड पक्षी, सुळे, सिंहमुख, सर्पशरिर असलेल्या व्याल (यालि). अशा कुठल्या प्राण्यांबाबत मी माझ्या लहानपणी मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टींत ऐकलेले नाही. हे प्राणी लोककथांमधून लुप्त झालेआहेत का? दुसर्‍या कोणी घरगुती मिथकांत असे काही ऐकले आहे काय?

चांगल्या रूपांतरात एखादा एतद्देशीय ओळखीचा प्राणी हवा. बर्‍याच मुलांना ड्रॅगन ठाऊक असेलही, परंतु चिनी किंवा युरोपियन मिथककथांमध्ये तिथल्या-तिथल्या मुलांना जितका ओळखीचा असेल, तितका भारतात नसेलसे वाटते. पण लोककथांमधून नाहिसा झालेला व्यालही चलणार नाही. ... कदाचित पहिल्या कडव्यात "विचित्र व्याल" अशी ओळख करून द्यावी, आणि दुसर्‍या कडव्यात व्यालचे वर्णन करून द्यावे. म्हणजे "व्याल" माहीत नसला तरी लगेच डोळ्यासमोर चित्र उभे राहील.

रूपांतरात "चांचा"ऐवजी "डाकू" येऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख!! धनंजय, केवढा आवाका आहे आपल्या विचारात. आय ऑल्वेज फाईंड इट अमेझींग!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इटुकल्या गावातल्या पिटुकल्या घरात
बेलाताई राहायची ऐटीत अन् सुखात
एक-एक तिच्यापाशी उंदीर-मांजर-कुत्रा
आणि अबबब! व्याल मोठा भित्रा

व्यालाची अयाळ हळदोळी दाट
भले मोठे सुळे आणि खवल्यांची कात
धारदार नखे आणि सोंडेचे नाक
शेपटी म्हणून होता वळवळता नाग

असेनाका अक्राळ, विक्राळ दिसायला
वेळ लागेना त्याची भागूबाई व्हायला
थरथर पिवळा-केशरी लोळागोळा होई
म्हणूनच "श्रीखंड्या" त्याला म्हटले जाई

बाकी तिघा प्राण्यांची शूरवीर संगत
धिटुकल्या कुत्र्याचे, "तिखटू" नाव सांगत
काळ्याशार मनीचे नाव होते "शाई"
राखुंडी उंदराला "राख्या" म्हटले जाई

बेला कधी श्रीखंड्याला गुदगुल्यांनी छळे
तिखटू-शाई-राख्या कधी खोडी काढून पळे
श्रीखंड्या अशा वेळी जाई हिरमुसून
एकटाच कोपर्‍यात रडे मुसमुसून

एके दिवशी मात्र मोठी आफत आली
घराच्या दारावरती धाडाधाड झाली
कडी तोडून आत आला आडदांड डाकू
एका हातात बंदूक नि एका हातात चाकू!

डाकूच्या डोक्याला बांधले होते फडके
अर्धे दात किडके नि अर्धे दात सडके
मिशांचा झुबका लिंबाहून मोठ्ठा
कमरेला भरगच्च काडतूसांचा पट्टा

ताटाखालची मांजरी झाली तेव्हा शाई
राख्याला बिळामध्ये लपायची घाई
तिखट्याही विसरला गनिमी कावा
बेलाताई करी आता देवाचा धावा

श्रीखंड्या मात्र फोडे डरकाळी
ठोठो डाकू झाडे गोळीवर गोळी
दाट अयाळेत प्रत्येक गोळी अडके
श्रीखंड्या अलगद गोळ्यांना झटके

डाकूने जोरात केले चाकूचे वार
खवल्यांनी वारांची बोथटली धार
बिथरून डाकूने दिली मगरमिठी
श्रीखंड्याची नखे घुसली ओटीपोटी

श्रीखंड्याने घेतला त्याचा समाचार
सुळे त्याचे गेले पूर्ण आरपार
एका मुसंडीत डाकूला झोकून
फटदिशी दिले गावाबाहेर फेकून

गहिवरून बेलाताई त्याच्यपाशी आली
पटापटा पापे घेत त्याला म्हणाली
"श्रीखंड्या माझा आहे खरा शूर
दाखवतो इंगा जेव्हा असेल जरूर!"

अजूनही श्रीखंड्या खुट्टसरशी दचके
शाई-राख्या-तिखटूच्या खोड्यांना बिचके
बेलाताई गुदगुल्या अजून त्याला करते
पण त्याला "भित्रा" नाही कोणी म्हणते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा खूपच सुंदर!!!! मस्तच देशीकरण केले आहे. ग्रेट!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच आवडले. धन्यवाद.

थरथर पिवळा-केशरी लोळागोळा होई
म्हणूनच "श्रीखंड्या" त्याला म्हटले जाई

श्रीखंडाच्या कडक गोळीसारखा श्रीखंड्या थरथरता मऊ गोळा होताना डोळ्यापुढे आला.
आपल्याला अशाच छान स्वतंत्र रचनाही कराव्याशा वाटोत ही शुभेच्छा.
अवांतरः
मुलांसाठी म्हणून माक्झ्या लहानपणी ज्या कविता वाचायला मिळत त्यातल्या बर्‍याच मला त्या वयात भावत नसत. ते चांगले, पण 'आपल्यातले' वाटत नसे. आशाबाईंनी काढलेल्या लहान मुलाच्या गोड, पण लहान नसलेल्या आवाजाप्रमाणे. आता जास्त चांगली परीस्थिती असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! निव्वळ ग्रेट!
सोबत एक डफली घेऊन घरी मुलीला म्हणून दाखवली.. ती खूष! मी पण खूष! Smile

माझ्याकडून कुर्निसात सादर!

याहून वेगळे - अधिक चांगले - लिहिणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे! धनंजय अ‍ॅट हीज ब्येष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कवितेचे हे रुपांतर खासच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

लै भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.