गुळाची पोळी

'ऐसी'करांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुळाची पोळी

साहित्यः
सारणाकरता:
गूळ २ वाटया. गूळ विकत घेताना छान पिवळा मऊसर बघून घ्यावा.
तीळ १/४ वाटी
खसखस १ टेबलस्पून
डाळीचं पीठ १/४ वाटी
आवडीनुसार जायफळ अथवा वेलचीची पूड

पोळीकरता:
कणीक १ व ३/४ वाट्या
मैदा १/४ वाटी
डाळीचं पीठ १ टेबलस्पून
चवीनुसार मीठ
मोहनापुरतं गार तेल

प्रथम तेलाचं मोहन घालून पोळ्यांकरता लागणारं साहित्य एकत्र करून पोळ्यांची कणीक घट्ट भिजवून घ्यावी. किमान तासभर तरी कणीक भिजली पाहीजे.

सारण करण्याची कृती: तीळ आणि खसखस वेगवेगळी भाजून घेऊन त्याची पूड करून घ्यावी. गूळ मऊ असेल तर किसून घ्यावा. बरेचदा भारताबाहेर असा गूळ मिळत नाही. तेव्हा जर गूळ कोरडा असेल मिक्सर अथवा फूड प्रोसेसरमधून बारीक करून घ्यावा. गरज वाटल्यास चमचा-दोन चमचे तेल, बारीक करताना घालावे. तेलावर डाळीचं पीठ सैलसर(पिठल्याची कन्सिस्टंसी) खमंग भाजून घ्यावं. गूळ कोरडा असेल तर पीठ भाजून झाल्यावर लगेच पातेले शेगडीवरून उतरवून त्यातच गूळ, तीळ व खसखस(आणि आवडीप्रमाणे जायफळ्/वेलची) घालून एकजीव करावे. या मिश्रणाचे पोळीत भरण्याकरता छोटे गोळे करावेत.

पोळ्या लाटण्याच्या या दोन पद्धती मी वापरते. जर गुळाचे सारण मऊ असेल, तर पोळीच्या दोन छोट्या लाट्या किंचित मोठ्या लाटून घेऊन करून त्यांच्यामधे सारणाच्या गोळ्याचे सँडवीच करून, कडा नीट बंद करून पोळी लाटून पूर्ण करते. जर गूळ कोरडा असेल तर मात्र पुरणपोळी अथवा कचोरी भरताना जसे कणकेची पारी करून मधे सारण भरतो, तसे भरून पारीचे तोंड बंद करून पोळी लाटून पूर्ण करते. पीठ छान घट्ट भिजले असेल, तर लाटताना पिठीची गरज भासत नाही. तरीही, गरज वाटल्यास तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी.

पोळ्या मंद आचेवर तव्यावर भाजाव्यात. तुपाशी खाव्यात.

या पोळ्या लाटताना पुरणपोळी लाटताना लागतो, तसा नाजुक हात लागत नाही, म्हणून या लाटायला अगदी सोप्या आहेत. अनेकदा लाटताना लक्षात येते, की गूळ कडेपर्यंत पसरला नाहीये, अशावेळी कातरण्याने अशा कडा तव्यावर टाकण्याआधीच काढून टाकाव्यात. म्हणजे नंतर पोळी कडक झाल्यावर या कडा वाईट लागत नाहीत. पोळी फुटली असेल, आणि गूळ बाहेर आला असेल, तरी तो पोळी उलटल्यावर दुसर्‍या बाजूला चिकटतो. त्यामुळे तवा फारसा खराब होत नाही. पुढची पोळी तव्यावर टाकायच्या आधी एकदा तवा फडक्याने पुसून घ्यावा.

आवडीप्रमाणे या पोळ्यांच्या सारणात शेंगदाण्याचं कूट, फुटाण्यांचं कूट, सुक्या खोबर्‍याचा किसही घालतात. गूळाचं सारण उरलं तर फ्रिजमधे ठेऊन हव्या तेव्हा पोळ्या करून खाता येतात. पोळ्यांची कणीक उरली, तर त्याचे खस्ता पराठे मस्त होतात. मात्र ते गरम गरमच खावे लागतात. गार झाल्यावर कडक लागतात.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

हे फार तापदायक आहे हो प्रकरण. तुम्ही बनवा आणि थोडं आमच्याकडे पोस्ट करा की. टिकतील तेवढ्या गूळपोळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, आता शेवटच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत. तू आणि निळोबा लावा बघू बोली! मग ठरवते कोणाला पोस्ट करायच्या ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लठ्ठ होण्याची चिंता असलेल्याला, त्या करता व्यायाम वगैरे करत असलेल्याला नका पाठवू! सोपंय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लठ्ठ झाल्यामुळे जेवण सोडणाऱ्यांकडे तशीही ती पोळी सडणार, मलाच पाठव गं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Yummy!!!
काल टाइप करता येत नव्हते म्हणून यमी एवढेच. फार मस्त दिसतेय पोळी. पाककृती आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त दिसतीय पोळी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे बनवणं आलं! एक प्रश्न, तुम्ही गुळाच्या पोळीबरोबर इतर काय पदार्थ बनविता? नुस्ती पोळी तुपाबरोबर छान लागते पण तेवढयात जेवण होत नाही आणि त्यावरोबर चांगले लागतील असे इतर पदार्थ काय बनवायचे ते सुचत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला गोड फारसे आवडत नाही, तेव्हा मी या पोळ्यांची तयारी सकाळी करुन सहसा दुपारच्या खाण्याच्या वेळीच पोळ्या बनवते. मग निम्म्या तर गरमगरमच संपतात. पण जर जेवणातच बनवायच्या असतील, तर ही दोन क्लासिक काँबिनेशन्स सुचतात.
१. भाकरी, भोगीची अथवा उंधीयोची भाजी, पिठलं अथवा शेंगांची आमटी(भाजीत गोडा मसाला असेल, तर परत गोड्या मसाल्याची आमटी नको वाटते.)
२. मसालेभात आणि मठ्ठा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा पाहून गुळपोळी खायची तीव्र इच्छा झाल्याने आज केली होती, शिवाय जोडीला मसालेभात आणि मठ्ठाही केला होता. मजा आली (आणि उद्याच्या डब्याचीही सोय झाली). धागा सुरु करून प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एव्हढा शीक शीक शिकलो. हा शीक शीक शिकलेला विषय सोडून दुसर्‍या एका विषयात पण बर्‍यापैकी गती मिळवल्येय. सगळं बरं चाललंय. पण च्यामारी या "....धागा पाहून गुळपोळी खायची तीव्र इच्छा झाल्याने आज केली होती, शिवाय जोडीला मसालेभात आणि मठ्ठाही केला होता....." प्रतिसादाने या सगळ्याला काSSSSSही अर्थ नाही असं अतीव नैराश्य आलंय. पु.लं.च्या बबडू मधे त्यांच्या आईने बबडूला "नेमाने एक पाच-दहा रूपये पोस्टात ठेवावेत" म्हंटल्यावर त्याना जशी "माझी, भिंतीवरच्या यच्चयावत पूर्वजांची.....वगैरे वगैरे...अत्यंत अत्यंत दया आली होती" ना, अगदी तश्श्श्शीच !! स्वतःच्या हाताने खाणेबल करता यायला कुठली पुण्याई लागते देव जाणे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

स्वतःच्या हाताने खाणेबल करता यायला कुठली पुण्याई लागते...

... हे अदिती जाणते. जिभेचे नखरे सोडून द्या. मी पण तेच केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुळाच्या पोळीच्या सारणात खसखस असते हे प्रथमच वाचतो आहे. पण एकूण चवीची कल्पना करून पाहिली तर छान लागली :).
मात्र गुळाच्या पोळीला चिक्कीचा गूळच लागतो असे मातानुभव+निरीक्षणातून आलेले ज्ञान आहे.
(हसरी चकली, खुळखुळी करंजी आणि मऊ गुळाची पोळी एकाच तर्‍हेच्या) त्यामुळे अंमळ आश्चर्य वाटले.

आता गुळपोळीची आठवण करून देऊन आमच्या रोजच्या जेवणावर संक्रांत आणल्याबद्दल निषेध ! Smile
---
@रुची : गुळाच्या पोळ्या + तूप यासोबत खरे तर काहीच नको. पण अगदी हवेच असेल, तर पुदिन्याची चटणी, नेहमीची उकडलेल्या बटाट्याची भाजी, वरणभात, चोचवलेल्या काकडीची दह्यातली (फोडणीविना) कोशिंबीर असा साधाच मेनू बरा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कायपण चवीचे चोचले सुचताहेत लोकांना!

मला गुळाची पोळी नुसतीच आवडते. तूप बाय डिफॉल्ट आलंच. ती चावताना दाताखाली कुरकुरीत अधिक चिवट असं एक डेडली टेक्स्चर मिळतं. ते केवळ अप्रतिम. पुरणाच्या पोळीत ती मजा नाही.

पण तोंडीलावणी करायचीच झाली, तर खमंग तिळकूट, आदल्या दिवशीची (की दुसर्‍या दिवशीची? माझा नेहमीचा घोळ आहे.) मुरलेली लेकुरवाळी भाजी आणि दहीभात.

एका हातात गुळपोळी घेऊन हे लिहीत असल्यामुळे आमच्याकडून काही निषेधबिषेध नाही. फोटूकरता हाबार्स आणि ह्यॅप्पी संक्रांत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नुस्तीच तुपाबरोबर. बास खलास विषय संपला.

आम्ही एका हातात गुळाची पोळी अन दुसर्‍या हातात पतंगांचा मांजा, असा लुफ्त उडवायचो! चटण्या अन कोशिंबरी कसल्या खाता त्याबरोबर!! अरसिक कुठले.

बाकी सर्वांनी आज सण साजरा करावा, पोळ्या कराव्यात. गुळाच्या पोळ्या अनेक दिवस टिकतात, पार्सलनेही पाठवता येतात (मी घेतलेली आहेत!). आणि आम्हाला पाठवाव्यात. गोड बोला हं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आम्ही एका हातात गुळाची पोळी अन दुसर्‍या हातात पतंगांचा मांजा, असा लुफ्त उडवायचो!

घोड्यावर बसून भाकरी अन कणसे खाणार्‍या विसूभाऊ भटांची आठवण झाली अन डोळे पाणावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... एका हाताने पोळी खाता खाता दुसर्‍या हाताने भांड्यांवर टर्रर्रर्रर्र करत नाव नाही कोरायचा !!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

भांड्याचा उल्लेख पाहून भांडगोपनकाव्य आठव्ले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण अगदी हवेच असेल, तर पुदिन्याची चटणी, नेहमीची उकडलेल्या बटाट्याची भाजी, वरणभात, चोचवलेल्या काकडीची दह्यातली (फोडणीविना) कोशिंबीर असा साधाच मेनू बरा वाटतो.

एवढं सगळं करून वर साधा? आम्ही तर गुळपोळी आणि तूप ह्यांवरच तृप्त होतो.
@मेघना: लेकुरवाळी भाजी?? म्हणजे काय नक्की? :o त्या उद्मेखण्यासारखाच हा लेकुरवाळा शब्द आवडता दिसतो आहे. त्या जपमाळकथेतही लेकुरवाळी आदिमाया का असलंच काही वापरलं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला, तुम्ही लोक काय माझ्या लिखाणातल्या शब्दांची वारंवारिता (वा वा!) मोजत बसलेले असता का काय? Wink

शेवग्याच्या शेंगा, वांगी, बटाटे, ओल्या वालाचे दाणे, गाजर (वाटल्यास मटार, आवडत असल्यास घेवडी, लाडात आल्यास बोरं नि पेरू नि उसाचे करवे) असं घालून एक भाजी भोगीच्या दिवशी करतात. बाजरीच्या (किंवा खरं तर कसल्याही) तीळ लावून केलेल्या भाकरीसोबत ती काहीच्या काही मस्त लागते. तिला लेकुरवाळी भाजी असं नाव आहे.

(अवांतरः उंधियोसारखी लागत नाही, घटक जवळचे असले तरी. थंडीत मिळणार्‍या भाज्यांची अशी समांतर खासियत बहुधा महाराष्ट्र नि गुजरातेखेरीज इतरत्रही केली जात असावी. गावाकडे 'पोपटी लावणे' असा एक जवळचा प्रकार ऐकला आहे. यातलेच मिळतील ते घटक, गावठी कोंबडीची अंडी नि कोवळे कांदे, वरून हिरव्या मिरच्या नि खडेमीठ एका मडक्यात ठासून भरतात नि ते मडकं शेकोटीवर / निखार्‍यावर / चुलीवर उलटं ठेवून भाजतात. तोही प्रकार भारी लागतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आम्ही याला भोगीची भाजी म्हणतो. काल झाली ती करून.. ती आणि सोबत तीळ पेरलेली भाकरी!
आता आज गुळाची पोळी आणि काल रात्री आम्ही सगळ्यांनी बसून वळलेले लाडू आहेतच (साध्याच तिळाचे खमंग! पॉलिशचे तीळ --> शुभ्र पण चिवट नै आवडत)

उद्या किंक्रातीचा बेत प्रत्येकाकडे वेगळा ऐकला आहे. आमच्याकडे शिळी भाकरी (भोगीची मुद्दाम उरवलेली) तिळाच्या कुटाच्या चटणीबरोबर खातो. शिवाय उस वगैरेही दिसला तर आणला जातो

-(तृप्त) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शक्य असल्यास साधे तीळच वापरते. पॉलिशचे तीळ नुसते दिखाऊ वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिअवांतरः तिळगुळाच्या वड्या खुटखुटीत कुठल्या भागात करतात? लै डोक्यात जातात राव. मिरजेत तरी बहुतेक घरांत खुसखुशीत वड्या करतात, त्यांचं जेवण करता येईल इतक्या खात असू तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते नाही माहिती. पण वड्यांकरता साधा गूळ वापरला, चिक्कीचा वापरला की साखर वापरली त्यावर खुसखुशीतपणा/खुट्खुटीतपणा अवलंबून असतो. चिक्कीचा गूळ वापरला तर वड्या जाड न करता पातळ लाटल्या(चक्क ओट्यावर गरम पाक पसरून वर फॉईल पसरून लाटण्याने लाटाव्या.) तर मस्त लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

अवांतरः
मुलीसाठी अगदी काही मिनिटांत एक गंमत करून देतो ती अशी:
अर्धाभांड पाण्यात २-३ चमचे (बुडेल एवढीच) एवढी साखर घालावी व एका पॅनमध्ये ठेवावी, आच अगदी मोठी ठेवावी. मिनिटा-दोन मिनिटांत साखरेचा पाक होऊ लागतो तेव्हा त्यात किंचीत मध, केशर/वेलचीपूड, साधा कोल्हापूरी-केमिकल नसलेला (काळपट)-गूळ घालावा. हे सगळे एकजीव झाले व मिश्रण पांढरे होऊन फेस येऊ लागल की त्यात शेंगदाणे, काजु, पिस्ते, बदाम जे काही उपलब्ध असेल त्याचे मध्यम आकाराचे तुकडे (गरज असल्यास) करून घालावएत.
यानंतर मिश्रण सतत हलवत रहावे. काही वेळाने साखर व पाक एकेका तुकड्याला चिकटतो व प्रत्येक शेंगदाणा मोकळा होतो. काही क्षणात साखर कॅरमलाईज होऊ लागते. (हे अचानक इतक्या वेगाने होते की सतत हलवणे गरजेचे आहे.) साखर मस्त कॅरमलाईज झाली की ते शेंगदाणे बाहेर काढून एका टिश्युपेपरवर टाकावेत. पहिल्यावेळी साखर जळण्याचीही शक्यता आहे. नेमका कॅरमलायझेशनचा उच्च बिंदु सरावाने साधाता येईल

तर ते शेंगदाणे म्हणा किंवा इतर ड्रायफ्रूट्स म्हणा खायला अतिशय मस्त लागतात. ही कृती करायला ५ मिनिटांच्या वर वेळ लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

करून बघेन नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, माहितीकरिता धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं आहे होय! मला वाटलं की ते भाजीचे विशेषण आहे! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय आठवणी जाग्या केल्यात! दुर्दैवाने इथे भाकरीचं ताजं पीठ मिळत नाही. पण मला भाकरी खायला आणि करायला खूप आवडते. भोगीची भाजी खाऊन खूप दिवस झाले. तुम्हीच टाका बरं त्याची पाककृती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile पाकृ आज-उद्या टाकतो पण फोटो काढण्यापुरतीही भाजी उरलेली नाहिये त्यामुळे तो टाकता येणार नाही:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे, तो शब्द कुरवाळण्याचा सोस असला की ले-कुरवाळी असं होतं ते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शी: बॅट्या, कोटीच्या मोहापायी किती घसरायचं ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोटिच्या कोटि मोहाने घसरे दक्षिणेकडे |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चिक्कीचा गूळ लाडवांकरता. पोळ्यांना नेहेमीचाच गूळ वापरायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२० ऑगस्ट २०१३ नंतर एक्दम १४ जानेवारी २०१४ ला नविन काहीतरी पाककृती आलीये ( कॉक्टेल लाउंज यात धरले नाही)

एकूण पाककृती विभाग ऐसी वर तसा दुर्लक्षित आहे म्हणायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

चविष्ट धागा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाकृ, फोटो आणि प्रतिसाद वाचूनच जीभ खवळली. बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, घडाभाजी (= लेकुरवाळी भाजी), गुळाची पोळी असला अस्सल संक्रांतीचा बेत आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळाची पोळी म्हणजे माझा जीव की प्राण! गेले आठवडाभर हादडणे चालू आहे.

- (खादाड) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुम्ही गुळाच्या पोळीबरोबर इतर काय पदार्थ बनविता? नुस्ती पोळी तुपाबरोबर छान लागते पण तेवढयात जेवण होत नाही

प्रश्न कळला नाही. पोट भरेपर्यंत गुळाच्या पोळ्या खात राहता येते की. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाजारात गुळाची पोळी २० ते २४ रुपयांना मिळते. एवढं करुन ती अशी घरच्यासारखी लागत नाहीच!
आमच्या आईने आणि नंतर बायकोने, आमची ही जीभ फारच लाडावून ठेवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्ता द्या. तुम्हाला भेटावं म्हणतोय.
Smile
गुळपोळीप्रेमी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars