इंग्रजी शब्दांचे/संज्ञांचे संस्कृतीसापेक्ष अर्थ

चर्चाविषय तसा ओळखीच्या विषयाचा.

काही गोष्टींकरता असलेला इंग्रजी शब्द अमुक देशात हा असतो तर तमुक देशात तो असतो. उदाहरणार्थ, उंच इमारतीच्या पाळण्यांना भारतात लिफ्ट म्हणतात तर अमेरिकेत एलिव्हेटर. किंवा रस्त्यावरच्या गाड्यांच्या इंधनाला भारतात पेट्रोल म्हणायचं तर अमेरिकेत गॅसोलीन ऊर्फ गॅस. मोटरगाडीच्या मागील कप्प्याला भारतात डिकी म्हणतात तर अमेरिकेत ट्रंक असा शब्द आहे.

या उलट, काही इंग्रजी शब्दांचा अर्थ अमुक देशांमधे असा तर तमुक देशांमधे तसा असतो. म्हणजे उदाहरणार्थ "पास आउट"चा भारतातला अर्थ म्हणजे शाळा/कॉलेजातून पदवी मिळवून बाहेर पडणे, तर अमेरिकेतला अर्थ भोवळ येऊन बेशुद्ध होऊन पडणे. या विभागात मग "रबर", "गिव्हिंग मी अ रिंग" "मेकींग आऊट" अशा संज्ञांच्या वेगळ्या अर्थांच्या गमतीजमती येतात.

वरीलपैकी बर्‍याच गोष्टी तुम्हाआम्हाला ठाऊक असलेल्यापैकी. हे सर्व अलिकडे पुन्हा आठवलं याचं कारण अलिकडे मला एक अशी गोष्ट समजली जी याआधी माहिती नव्हती. ही संज्ञा आहे "४२०".

"४२०" (किंवा चारसो बीस) या प्रकाराचा भारतातला अर्थ काय हे निराळं सांगायला नको, त्यात भारतीय दंड विधान येतं, राज कपूरचा तो सिनेमा येतो. त्यातला "अगर मैं चारसो बीस हूं, तो तुम्हारे जैसे लोग हैं..." असं म्हण्टल्यावर "८४०" असा नंबर असलेली (व्हिलनची !) धूळ उडवून जाणारी गाडी येते.

"४२०" चा अमेरिकन संदर्भातला अर्थ आहे, गांजा सेवन करण्याच्या संदर्भात. हे काय प्रकरण आहे ? गूगल केल्यानंतर कळलं की म्हणे १९७१ साली कॅलिफोर्नियातल्या सान राफाएल भागातल्या गांजेकसांच्या एका टोळक्याने आपल्या "कार्यक्रमाची" वेळ ४ वाजून २० मिनिटांची ठरवली. तेव्हापासून "डूईंग ४२०" हा त्यांचा परवलीचा शब्द ठरला. लवकरच हा प्रकार जवळपासच्या तरुण लोकांमधे पसरला. आणि मग हळुहळू अमेरिकाभर. अशी एकंदर आख्यायिका.
(वरील माहिती येथून : http://en.wikipedia.org/wiki/420_%28cannabis_culture%29 )

अलिकडे अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात गांजा ओढणं कायदेशीर बनवण्याचं विधेयक पारित झालं. याचा अर्थ त्या राज्यात (अन्न प्रशासनाच्या ष्ट्यांडर्ड मधे बसण्याइतपत) गांजा बनवण्या/विकण्याची अनुमती आहे. हे झाल्यावर आढळलेली एक गोष्ट अशी की ठिकठिकाणचे , निनिराळ्या रस्त्यांवरचे ४२० मैलांचं निदर्शन करणारे खांब गांजेकसांकडून चोरीला नेण्याच्या घटना अलिकडे घडल्या. (बातमी : http://gawker.com/colorado-stoners-keep-stealing-mile-marker-420-1499672... )

हे वाचल्यावर जाणवलं की अरे, अशा इतरही गमतीजमती असतील. ऐसी करांना असलं काही नवं माहिती असलं तर जरूर कळवा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

अखिल क्रिकेट जगतात गोलंदाज हा बोलर (bowler) असला तरी भारतात तरी तो बॉलर (baller) असतो!

साहजिकच आहे. ब्याटीने खेळणारा तो ब्याट्स्मन तर बॉलने खेळणारा बॉलर. शिंपल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रीपोन् हा ('पोस्टपोन'च्या विरुद्धार्थी म्हणून उजवलेला) शब्द भारतीय इंग्रजीतून ऑक्सफर्ड् शब्दकोशात स्थान मिळवता झाला आहे असे ऐकून आहे. खरे-खोटे कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्ही को-एड शाळेतले. वर्गात इंग्रजीच्या तासाला अंडरटेकिंग हा शब्द पहिल्यांदा आला तेव्हा निम्मा वर्ग छप्पर उडेल असा हसला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माजी बॉसचा overtake, takeover आणि undertake ह्या शब्दाम्त लै घोळ व्हायचा.
फ्रॉइदियन स्लिप ऑफ टंग प्रमाणं ह्यातील काही शब्द उच्चारताना त्याच्या हातांची नजरेत येइल अशी हालचाल होइ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१. फार पूर्वीचा प्रसंग आहे. सोलापूर स्टँडवरील एका बेंचपाशी मी उभा होतो. शेजारील एक व्यक्ती जरा चेपा की... जरा चेपा की.. असे म्हणू लागली. मला काही कळेना. पुन्हा एकदा जरा चेपा की.. शेवटी मला कळले की ती व्यक्ती मला थोडेसे पुढे सरकण्यास सागंत आहे. 'चेपा' या शब्दाचा हाही 'अर्थ' मला नवीन होता.
२. कंत्राटी पद्धतीने काम करत असलेली एक मजूर महिला आमच्या सी एस डी कँटीनमध्ये आली. इतर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काउंटरवरील माणसाला उद्देशून "पाच रुपयाची भुकटी द्या..." म्हणून मोठ्या आवाजात 'ऑर्डर' सोडली. इतर सर्व पांढरपेशे तिचा आवाज ऐकूनच सर्द झाले. काउंटरवरच्या माणसाला तिला नेमके काय हवे हेच कळेना. तरीसुद्धा ती बाई स्वतःचा हेका सोडायला तयार नव्हती. शेवटी कसेबसे हातवारे करत व सामानाकडे बोट दाखवत तिला चहाची पावडर हवी होती हे लक्षात आले. चहाच्या पावडरीला 'भुकटी' म्हणतात हा शब्द मला नवीन होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जेवली आणि बाहेर गेली तेव्हा काय गंमत झाली असे वाक्य ऐकल्यावर "ली"वरून आमचे जोरदार सांस्कृतिक भांडण होइ असे आठवते.
सदर व्यक्ती मूळची वाशिमची. वाशिम हे विदर्भात येते. ह्याचे काही नागपुरी कनेक्शन असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाने