प्रिय विद्या बालन हिस

प्रिय विद्या बालन हिस,

काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे. ‘देड इश्किया’ मध्ये जो काही ‘देड’ पणा केला गेला आहे त्यात तू नसल्याने एकदम हायसे वाटत आहे! “का? असे काय झाले?”, असा प्रश्न तुला पडणारच...

तर, काल मी देड इश्किया पाहिला, विशाल भारद्वाजच्या सिनेमांच्या भव्य कॅन्व्हासच्या प्रेमात मी पडलेलो असल्याने. आठव ओमकारा, त्यातला उत्तरेकडचा, मातकट, चंबळचाप्रभाव असलेला, राजकारणात मुरलेल्या प्रदेशाचा कॅन्व्हास. इश्किया मधला नक्षलप्रभावित प्रदेशाचा कॅन्व्हास. सात खून माफ आणि कमीने मधली प्रयोगशीलता. त्यामुळे तू चित्रपटात नव्हतीस तरीही विशालसाठी हा सिनेमा बघितला आणि तुला मिस केले...

इश्किया मध्ये एका साध्या सुती साडीतली तू साकारलेली कृष्णा एकदम पटली होती. आपला ‘उल्लू सिधा’ करण्यासाठी तू एकटीने, एकहाती एका नजाकतीने आणि चातुर्याने खालूजान आणि बब्बनला एकाच वेळी खेळवले होतेस. इथे ‘देड इश्किया’ मध्ये माधुरी आणि हुमा कुरेशी अशा दोघी असूनही त्या दोघींनी मिळूनही तो इंपॅक्ट साधता आलेला नाहीयेय. कथानकाची आणि कथेतल्या वातावरणाची गरज म्हणून माधुरी चित्रपटात भरजरी कपड्यांमध्ये वावरली आहे पण साध्या सुती साडीतली तुझी कृष्णाच उजवी वाटते. माधुरी फक्त तिच्या एंट्रीच्या सीनमध्ये प्रचंड सुंदर दिसून एकदम भावते पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो तसतशी ती शोभेची बाहुली होत, भयंकर मेकअप करून उतू जाणारे वय लपविण्याच्या प्रयत्नात निष्प्रभ होत जाते. कथेचे सेंट्रल कॅरॅक्टर असलेली आणि अनेकविध कंगोरे असलेली बेगम पारा रंगवताना अभिनयाची कमाल करण्याची मोठी संधी चक्क घालवताना माधुरीला बघितले आणि तुला मिस केले...

नसरूचाचांनी साकारलेला खालूजान जेवढा इश्कियामध्ये प्रभावी होता त्याच्या कैक पटीने देड इश्किया मधला नवाब बनलेला खालूजान प्रभावी आहे. पण बब्बन देड इश्कियामध्ये हरवल्यासारखा वाटतो. इश्किया मध्ये तुझी आणि बब्बनची अभिनयाची जी जुगलबंदी झाली होती तशी देड इश्कियामध्ये बब्बन आणि हुमा कुरेशी मध्ये घडतच नाही. हुमा कुरेशी अजूनही वासेपुरातच असल्यासारखी चित्रपटभर वावरली आहे, तिला ती मुहम्मदाबादमध्ये आहे ते कळलेच नाही असे वाटत राहते. माधुरीबरोबर नाचण्याचा मूर्खपणा आपण करणार आहोत हे कळल्यावर तरी नाचण्यात थोडा ग्रेस आणण्याचा प्रयत्न हुमाने करायला हवा होता; ‘स्टेज’चा अनुभव असलेली अभिनेत्री असा उदोउदो तिच्याबाबतीत झाला असल्याने तशी अपेक्षा करणे गैरलागू नाही पण हुमा त्यात कमी पडते. इश्किया मध्ये जेव्हा तू ‘च्युत्यम सल्फेट’ शब्द वापरतेस तेव्हा त्यामगचा जिव्हारी लागावी असा वार अगदी काळजापर्यंत पोहोचतो. तो भाव हुमाला डायरेक्ट च्युतिया हा शब्द वापरून एक सहस्त्रांशानेही जमलेला नाही हे पाहिले आणि तुला मिस केले...

मानवी नात्यांमधले कंगोरे, त्यातली गुंतागुंत आणि त्यातून पुढे येणारा आणि अंगावर येणारा कथेमधला ट्विस्ट ही विशालची खासियत. देड इश्किया मध्ये हा ट्विस्ट तितकासा अनपेक्षित राहत नाही. पण त्यातला अजून एक आतला ट्विस्ट मात्र खासच आहे, अगदी नावीन्यपूर्ण. पण तो काहीसा घाईघाईत मांडल्यासारखा वाटतो, सेंसॉरला घाबरून उरकल्यासारखा. देड इश्कियामध्ये नसरुद्दिन शहा सोडून कोणीही नात्यांमधले कंगोरे, त्यातली गुंतागुंत प्रभावीपणे मांडताना दिसत नाही. फक्त खुसखुशीत आणि चपखल बसणारे संवाद हीच काय ती जमेची बाजू. इश्कियामध्ये प्रत्येक पात्र त्याची कथेतली गरज ठसवून जाते. देड इश्किया मध्ये तसे होता नाही. जरी स्टारकास्ट तगडी असली तरीही सगळे आपापली कामे नेमून दिल्यासारखी पार पाडतात. चित्रपटातला व्हिलनही ओके-ओकेच, उप-व्हिलन (इटलवी नावाचे पात्र) शेवटी अजिबात पटत नाही. इश्कियामध्ये जसे तुझ्या अस्तित्वाने सगळ्यांचेच अभिनय खुलून आले होते तसे देड इश्कियामध्ये होत नाही असे जाणवले आणि तुला मिस केले...

पण तुला काही ठिकाणी विसरायला झाले ते विशालने उभा केलेला नवाबी कॅन्व्हास बघताना. पूर्ण लखनवी थाटाचा, नवाबी आणि उर्दू शेरो-शायरीचा एक कैफभरा माहौल विशालने अगदी भन्नाट उभा केला आहे. त्या अनुषंगाने सिनेमात येणारे संगीत ठीक-ठाक. मध्ये मध्ये जुन्या गाण्यांचे काही तुकडे काही सीन्समध्ये ऐकायला मिळतात ते मात्र एकदमच खास! मुशायर्‍यामधली शेरोशायरी ही मस्तच.

तर, हा विशालचा भव्य कॅन्व्हास असलेला पण कथेत शेवटी किंचित कमी झालेला, तगडी स्टारकास्ट असूनही काहीतरी कमी राहिलेला, माधुरीची जादू ओसरली का? असे वाटायला लावणारा आणि ह्या सगळ्यामुळे शेवटी इश्किया बरोबर तुलना करण्यावाचून न राहवला जाणारा देड इश्किया काल पाहिला आणि तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले...

तुझा,
-(चाहता आणि देड इश्कियावर उतारा म्हणून लगेच इश्किया बघून टाकलेला) सोकाजी

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile
ह्यापूर्वीही विद्या बालिकेबद्दल चांगले बोलला होतात.
आताही तिच्या निमित्तानं इतरांवर बोट ठेवलत.
असो. आवडलं खुसखुशीत लिखान>

मीही एक विद्या र्थी च Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इश्कीया बघितला नसल्यास हा देड बघु नये असे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इश्कीया बघुन घ्या. छान आहे. इतके दिवस का नाही बघितला असा पश्चाताप होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इश्कीया बघुन घ्या. छान आहे. इतके दिवस का नाही बघितला असा पश्चाताप होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सा विद्या या विमुक्तये " की कायसे .... Wink Biggrin Biggrin Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान केलीय समिक्षा.
पण पण पण सगळेजण या चित्रपटांना 'विशालचे' का म्हणतायत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Dedh Ishqiya Producer, Composer & Writer - विशाल भारद्वाज

- (चित्रपटातला भारद्वाज ट्च आवडलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ते माहितीय. पण इतर चित्रपटांना आपण निर्मात्याचा, कथालेखकाचा (स्क्रिनप्ले), संगीतकाराचा नाही म्हणत (शक्यतो). मग इथेच का म्हणायच? असे म्हणुन आपण या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना कमी लेखतोय का? हे म्हणजे विकी डोनर, मद्रास केफे च श्रेय जॉन ला देण्यासारख वाटतय. किँवा सत्या अनुराग कश्यपचा आणि विशाल भारद्वाजचा होता म्हणण्यासारख...
अमिरचा गजनी किँवा धुम३ असे म्हणले तर त्याने त्यात अभिनय केलाय हे माहित असते/सहज कळते. पण इथे विशालचा इश्किया म्हणल्यावर विशालने दिग्दर्शित केलेला इश्किया वाटतय. लेखात जे इतर चित्रपट आले आहेत ओँकारा, कमिने, साखुमा, ते विशालने दिग्दर्शिन केलेले चित्रपट आहेत. त्या यादीतच इश्कियाला टाकणे बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे एकदा भगतसिंगवरच्या सिनेमांची लाट आली होती, आठवतेय? त्यातला एक सिनेमा संतोषीचा म्हणून, नि एक सनी देओलचा म्हणून ओळखला जात होता. तसंच 'लगान'चंही. तो आशुतोष गोवारीकरचा म्हणून जितका ओळखला गेला, तितकाच आमीर खानचा म्हणूनही.

सिनेमा हे केव्हाही संपूर्णतः दिग्दर्शकाचं माध्यम हे तांत्रिकदृष्ट्या बरोबरच आहे. पण निर्माते आणि अभिनेते किती प्रभावशाली / लोकप्रिय / हट्टी आहेत, या मुद्द्याचाही त्यावर परिणाम होत असावा. हॉलिवुडमध्येही नाही का, काही सिनेमे हे निर्मितिसंस्थेची छाप घेऊन येतात, दिग्दर्शक त्या मानानं नामधारीच म्हणवला जातो. आपल्याकडेही रामूच्या कॅम्पातल्या दिग्दर्शकांचेही सिनेमे होते की. ते रामूचे नव्हते, पण त्यांवर रामूचा सुस्पष्ट छाप होता. अशा बाबतीत दिग्दर्शक हक्काचा मालक असला, तरी त्याच्याकडे लोकांकडून काणाडोळा होतोच. ते फारसं चूकही म्हणवत नाही. त्याला बरेचदा दिग्दर्शकांचाही आक्षेप नसतो. तसा आक्षेप असलाच तर दिग्दर्शक बाजूला होतात. 'तारे जमींपर' हा अमोल गुप्तेचाच सिनेमा असणार असं 'स्टॅन्ले का डब्बा' पाहून नाही वाटत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सेम टु सेम हेच म्हणतो! धन्यवाद!!

- (सहमत असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. मार्केटीँगच्या दृष्टीने हे मान्य आहे. विशालचा/माधुरीचा चित्रपट म्हणले तर पब्लिक तिकीटसाठी रांग लावेल/लावणार नाही. पण मग समिक्षा करताना किँवा चित्रपटाच्या केनव्हासबद्दल बोलताना पण तेच करायला हव का? खरंतर 'विशालचा चित्रपट' म्हणण्यापेक्षा अभिषेक चौबे च कुठेच नामोनिशाण नाही याच जास्त वाईट वाटल.
'तारे जमींपर' हा अमोल गुप्तेचाच सिनेमा असणार असं 'स्टॅन्ले का डब्बा'
पाहून नाही वाटत? >> मला तरी नाही वाटल. ताजप मधे मेलोड्रामा होता. कधी कधी फोनीपणादेखील. किँवा पुर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेउन हा चित्रपट बनलाय अस जाणवत होतं. कदाचीत मी तसा गॉगल घालुनच पाहीला असेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हिस' हे एखद्या सापाने चवताळून अंगावर फुत्कारावे तसे खटकले. 'इजला' हा जुना असला तरी रास्त (या जुन्या शब्दाइतकाच) शब्द सुचवावासा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

'इजला' वरून आठवले, 'यांजकडून' हा आर्केइक शब्द लग्नात मिळालेल्या भांड्यांवर कायम कोरलेला दिसायचा. क्षयझ यांजकडून अमुक अमुक तारखेस अबक यांना भेट इ.इ.इ.

अतिअवांतरः भांड्यांच्या दुकानात भांड्यांवर नाव लिहिताना तो जो "टर्रर्रर्रर्र" आवाज व्हायचा त्याचे आम्ही पंखे होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याला नाव काय लिहायचं ते सांगितल्यावर तो लिहिताना दिसायचं तर नाही. पण मशीन नुसतंच ऑन असताना येणारा गुंSSSS आवाज नी भांड्यावर टेकवल्यावर येणारा टर्रर्रर्रर्र आवाज, यावरनं "मि लिहितोय आता....स मधली आडवी रेघ जेमतेमच काढल्येन...पूर्णविराम दिलान, झालं" असा नकळत अंदाज बांधला जायचा!!

बॅटमॅना, सोक्या रडेल रे - त्याच्या विद्या बालान वरनं हे 'टर्रर्रर्रर्र ' ध्वनीचित्र जागं व्हावं? !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हा हा हा, अगदी अगदी!!!!

बाकी टर्रर्रर्रर्र हे ध्वनीचित्र अगदीच अस्थानी नाही-फक्त तो ध्वनी नक्की कुठल्या संदर्भात निर्माण होतोय एवढं पाहिलं की झालं Wink म्हणजे तो ध्वनी उत्कीर्ण करताना येतोय की काही दुसर्‍या क्रियेतून Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिअवांतरः भांड्यांच्या दुकानात भांड्यांवर नाव लिहिताना तो जो "टर्रर्रर्रर्र" आवाज व्हायचा त्याचे आम्ही पंखे होतो.

+१

एका विशिष्ट शहरी ही कोरलेली अक्षरे नाहीसे करून भांडे पुन्हा अनाघ्रातवत् करणारे दुकान अस्तित्वात असल्याची कुणकुण ऐकली आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं का काय? की कोटी आहे ही कुठली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भांड्यांच्या दुकानात भांड्यांवर नाव लिहिताना तो जो "टर्रर्रर्रर्र" आवाज व्हायचा त्याचे आम्ही पंखे होतो.

पंखे होतोच, पण त्याच बरोबर आम्ही हे सोत्ताच्या हातानी केल्याचा आनंदही अनुभवला आहे. (मी भांडी विकायचो का वगैरे आगाऊ प्रश्न विचारू नयेत!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आय हेवा यू.

बाकी भांडी विकणे वैग्रेवरून मिपावरील या अजरामर विडंबनाची आठवण होऊन डोळे पाणावले. या कवितेने असंख्य जिलब्यांना जन्म दिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रपटाबद्दल कुतूहल आहे त्यामुळे मिळेल तेव्हा कधीतरी हा बघेनच. 'इश्किया'मधे विद्या बालन आवडली होतीच. (आठवण निघाली आहेच तर पुन्हा एकदा बघायला हरकत नाही.)

काय रे सोकाजी, माधुरीची प्रशंसा करावी असा फक्त नाचच आहे का सिनेमात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माधुरीची प्रशंसा करावी असा फक्त नाचच आहे का सिनेमात?

दुर्दैवाने काहीच नाही Sad

- (भरातल्या माधुरीचा चाहता) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट न पाहताच माधुरी वगैरे बकवास असणार याबद्दल सहमती दर्शवतो. चित्रपट बघायला हवा असेही वाटले.

अवांतर: पण हे असे प्रिय म्हणून सुरूवात करून लोकप्रिय लोकांना लिहीलेले पत्र वाचण्याचा कंटाळा तर येतोच. वर आणखी मराठी वृत्तपत्रात क्रिडा-चित्रपट वगैरे रतिब घालणार्‍या गळेपडू स्तंभलेखकांच्या आठवणीने मळमळूनही येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट न पाहताच माधुरी वगैरे बकवास असणार याबद्दल सहमती दर्शवतो. चित्रपट बघायला हवा असेही वाटले.

असेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'माधुरीचा चित्रपट' वगैरे म्हणून जाहिराती पाहून बकवास असणार आणि बघायचे नाही असे ठरविले होते. पण चित्रपटाच्या काही समिक्षा वाचून, विशाल भारद्वाजचा सिनेमा आहे हे कळल्याने आणि नसिरुद्दीन शहा (आणि हुमा कुरेशी)साठी सिनेमा पहावा असे आता वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नसिरुद्दीन शहा आणि अर्शद वारसी पडद्यावर असताना मला माधुरी दिसणारही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नसिरुद्दीन शहा आणि अर्शद वारसी पडद्यावर असताना मला माधुरी दिसणारही नाही

+१
नसिरुद्दीन शहाने रंगवलेला नवाब पाहता पाहता त्यात आपण एवढे रंगून जातो की माधुरी दिसत नाही. नसरूचाचा is at his BEST!

- (नसरूचाचांचा पंखा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नसरूचाचांचा अजून एक पिक्चर नुकताच अवचित पाहिला - Today's Special. जरूर पहा. नेटफ्लिक्स वर आहे. शेवट गोग्गोड केलाय पण एकंदरीत छान आहे. एक अगदि कमी बोलणारा मुलगा आहे त्याच्यात. शेवटच्या एका सीन मधे त्याचा मुद्राभिनय अप्रतिम आहे! नसरूचाचा अर्थातच झक्क वावरतात चित्रपटात. एक जुन्या काळातला, दूरदर्शनवर सिरिअल्समधे दिसणारा असामी पण दिसेल बर्‍याच दिवसानी/वर्षानी. आणि हो खरं, "खट्टा-मिठा" मधला क्रिकेटर पोरगा अशोक कुमारचा आठवतो? तो यात रिटायर्ड असिस्टंट हेडक्लार्क, "आमच्या वेळेला..." च्या छापात दिसेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आवडलेल्या स्नॅक-सिनेमांमधे याचा समावेश निश्चितच करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आत्ताच बघून झाला, जस्ट ऑस्सम!

- (नसरुचाचाचा फॅन) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं कडेकडेने निसतून नाही जायचं.
आणखी मराठी वृत्तपत्रात क्रिडा-चित्रपट वगैरे रतिब घालणार्‍या गळेपडू स्तंभलेखकांच्या आठवणीने मळमळूनही येते.

उदाहरण द्या एखादं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अभिजीत देसाई. गेले ते आता. पण सॉरी, ते तसलेच वाटायचे मला. रतीब-गळेपडू-कढकाढू वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'राजा दिलीप' या नावाच्या सिनेपत्रकाराचे काही वर्षांपूर्वी लेख वाचले होते. ओढूनताणून अनौपचारिक शैलीचा हव्यास + रतीब-गळेपडूपणा ही लक्षणं पाहून खालील समीकरण सुचलं.

राजा दिलीप = गरीबांचे अभिजीत देसाई
= गरीबांचे (गरीबांचे शिरीष कणेकर)
= गरीबांचे (गरीबांचे (गरीबांचे वि.आ.बुवा))*

*कणेकरांना थट्टेतही गरीबांचे पु.ल. म्हणवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कणेकरांना थट्टेतही गरीबांचे पु.ल. म्हणवत नाही.

चोक्कस!

-(पुलकित) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संझगिरी विसरलात की राव !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघना, नंदन यांनी तर चांगलीच ठळक उदाहरणे दिली आहेत. पण नाशिकसारख्या दुय्यम शहारातल्या स्थानिक देशदूत-गांवकरी वर्तमानपत्रांतूनही हा एकमार्गी पत्रप्रपंच सुरू असे. आताही 'प्रिय माधुरी/सचिन' वगैरे गुगलशोध केल्यास ढीगभर असे लेख सापडतील असा अंदाज आहे. यात शैलीतला बाळबोधपणा एकवेळ माफ केला तरी कमालीचा संकुचितपणा मात्र त्रासदायक वाटतो. या पत्रलेखकांना प्रसिद्ध तार्‍यांशी जवळीक साधण्यासाठी काहीतरी धागा (मराठी, मध्यमवर्गीय वगैरे वगैरे) लागतो. यामुळे संस्कारक्षम वयातच दृष्टिकोनात आखुडपण येऊ लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यामुळे संस्कारक्षम वयातच दृष्टिकोनात आखुडपण येऊ लागते

ऑ, म्हणजे कसे?

- (ज्या वयात 'आखुड' असावे त्याच वयात 'आखुड' असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमकी जैव-रासायनिक प्रक्रिया मला माहीत नाही. स्वानुभवावरून असे वाटते की अशा (म्हणजे तुमच्या नाही, पत्रांतून लोचट आपलेपणा दाखवणार्‍या) लेखनातून काही पूर्वग्रह नकळत निर्माण होत जातात. बरेचदा रंजक असल्याने असे लेखन (शारिरीक आखुड वयात) नियमीत वाचले जाते. आपल्यातला आणि आपल्यात नसलेला अशी विभागणी खेळ-कलाकृती यांचा आस्वाद घेतांना सुरू होते. अनेक लोक वयपरत्वे या(बौद्धिक आखुडपणा)तून बाहेर पडतात. बाहेर पडतांना जर पूर्वग्रह नसते तर काही गोष्टींचा आनंद चांगला घेता आला असता असे वैषम्य जाणवत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!!!!!!!!

नक्कीच खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रिय {Insert a washed-out celebrity here } हिस/ह्यास,

काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला {Insert a non sequitur here}
{a paragraph of non sequiturs }

{Insert a disparaging comment about the celebrity's competition here.}
{Establish the competition's authenticity}
{Insert something orthogonal to the celebrity's work-area}
आणि तुला खूप मिस केले.

{Insert nostalgic overwhelming emotions about the celebrity} {More sweet nothings for the celebrity}
{More disparagement for the competition}
आणि तुला खूप मिस केले.

{A comment about another non-competing celebrity to balance out the negativity }
{More sighs and whispers and moans and groans as to how the universe is not the same without it revolving around the celebrity}
{More dissing of the replacements}
{More sweet nothings for the celebrity}
आणि तुला खूप मिस केले.

{More yawn-worthy unsubstantiated claims about something the celebrity is not a part of}
{Stretching the limits of sweetness further}
आणि तुला खूप मिस केले.

तुझा/तुझी
-(Diabetically pathologically sweet ) हळक्षज्ञ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"बघ तुला माझी आठवण येते का?" याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टेंप्लेटा बनवण्यात आघाडीवर असणार तुम्ही.भारीच कि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ढिंगच्याक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile

- (टेंप्लेटिंग) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

की टेम्प्टिंग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रिय विद्या बालन 'म्हैस' असे वाचण्यात आले, चित्रपटात वेगळी म्हैस(अनेक म्हशी) आहे हे कळले. तिचा इश्कियामधला 'प्रयत्न' आवडला होता. ते च्युतिया सल्फेट तरी जाणिवपुर्वक वाटल होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्युतिअम सल्फेट जास्त नैसर्गिक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जेव्हा विद्या बालन हा शब्द ऐकला तेव्हा काही लोकांनी विद्या बाळांचा उल्लेख तसा केला असावा अशी समजूत होती.नंतर नंतर जसा तो गवगवा वाढला तेव्हा हे काहि तरी वेगळे प्रकरण आहे हे लक्षात आले. पुढे मग कळाले की ही कोणीतरी नटी आहे म्हणुन. मग म्हणल हा आपला प्रांत नाही असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/