माकडचाळे

मानव व माकड ह्यांचा पूर्वज एकच होता असे म्हणतात. म्हणूनच पब्लिक माकडचाळे करायचं सोडत नसेल.
विविध वेळी आपण काहीतरी गमतीजमती करतो, निसर्गदत्त मूर्खपणा दागिन्याप्रमाणे वागवतो.
कधी कधी ऑक्वर्ड, अवघडलेल्या प्रसंगात जातो.
असे तुमचे काही प्रसंग आहेत का ? (कींवा इतरांचे तुम्हला ठाउक आहेत का?)
चला, मानवी मूर्खपणाचा एनसायक्लोपिडिया बनवूया.
प्रसंग एक :-
मेघु तैंच्या हापिसात एक विदेशी सद्गृहस्थ महिलांच्या रेस्ट रूम मध्ये शिरले!
.
.
प्रसंग २:-
मनोबांनी साखर समजून तुरटी घातली सरबतात, लाइट गेलेली असल्यामुळं.
.
.
तुमच्या प्रस्म्गांची सुरु वात अक्रा.
तोवर मीही माझे टंकतोय.
स्वतःचाच मूर्खपणा लिहिला पाहिजे असे नाही. इतरांचेही प्रसंग चालतील.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

लेखात दिलेले दोन्ही प्रसंग हे अनवधानाने घडलेले दिसतात. याउलट "माकडचाळे" हे जाणूनबुजून केलेले असतात. तेव्हा उदाहरणे चुकलेली आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दाम केलेल्या गोष्टी किम्वा चुकून घडलेले प्रसंग .
काहीही चालेल.
फक्त त्यात थोडं रंजनमूल्य किम्वा बातमीमूल्य हवं.

@ सोत्रि :-
अहो बाप्यानं मुलींच्या रेस्ट रुम कशाला शिरावं? तो तिथे मस्त केस विंचरत होता. आणि एका स्त्रीशी नज्रानजर झाल्यावरही पहिले काही सेकंद आपण कुठे आहोत हे त्याच्या ध्यानात आलच नाही.
आलं तेव्हा बिचारा गोंधळला, अवघडून गेला. नंतर त्या महिलेशी नज्रानजरही टाळत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखात दिलेले प्रसंग आणि प्रतिक्रीया वाचल्यावर असे वाटले की शीर्षक " फजीती " असायला हवे होते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघु तैंच्या हापिसात एक विदेशी सद्गृहस्थ महिलांच्या रेस्ट रूम मध्ये शिरले!

हा नेमका मूर्खपणा कसा हे विषद केलेस की नक्की कसले प्रसंग टंकायचे ते लक्षात येईल!

- (मूर्ख शिरोमणी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा दुवा चालतो का बघा बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमचे माकडचाळे:

लहानपणी चिरमुरे पाण्यासोबत कसे लागतात ते पाहण्यासाठी वाटीभर चिरमुर्‍यांत पाणी टाकले अन खाल्ले.

शिर्‍यासोबत कांदा खाल्ला.

पुरंदर ट्रेकला मुद्दाम किडे म्हणून सोपी वाट औघड केली अन अडनीड जागी अडकून बसलो.

बागेतल्या आंब्याच्या झाडावर चढलो पण उतरता येईना मग कळायचं बंद झालं.

अनवधानाने घडलेला किस्सा:

स्वारगेटसमोर प्रायव्हेट गाड्यांमध्ये तिकिटासाठी बारगेन केले अन सांगलीऐवजी शेजारच्या कोल्लापूरच्या गाडीत जाऊन बसलो. मग सांगली फाट्यास्नं दोन ट्रक बदलून मिरजेला आलो.

लागलेली वाटः तुंग ट्रेकनंतर उतरलो ते जवळपास वाहन कुठे मिळालेच नाही. मग तस्सेच मेन रोड लागेस्तवर ८ किमी चालत गेलो. तिथून लोणावळ्याला हिचहाईक केले अन मग तिथून लोकल पकडून शिवाजीनगर अन मग घर.

सध्या इतकेच आठवतेय. बाकी नंतर यथावकाश सांगेनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्याच गुंगीत मी बसस्टॉप वरुन घराकडे चालत चाललेले. संध्याकाळचे ८ वाजले असतील. रस्ता बर्यापैकी निर्जन होता. तर एक मुलगा बाईकवरुन आला आणि मला थांबवल. मी थांबले. मग तो सांगायला लागला "माझं नाव क्ष. मी भारतीमधे TE ला आहे. तुला रोज सकाळी बसस्टॉपवर पाहतो...." वगैरे... मी हम्म हम्म करतेय. मग त्याने इकडे तिकडे पहात, केसातून हात फिरवत विचारल "see umm will you be my sister?" मला हसुच आल एकदम :-D. मग मी त्याला विचारल "का?" तर म्हणे त्याला कालिजातली की क्लासमधली कोणीतरी पोरगी आवडत होती. आणि तिला कसं अप्रोच कराव हे त्याला कळत नव्हत. मग मी त्याची बहीण बनुन तिच्याशी बोलायच वगैरे... काय राव लोक पण गंमतशीरच असतात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घोर कलियुग.
इतक्या साध्या विन्वणीवर हसू यायला लागलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डायरेक्ट विचारायचं की राव. लग्नाला काय बहिणीचा हात धरून उभा राहणार होता का? पोरंपण म्याडच असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पोरंपण म्याडच असतात. >> +१. रस्त्यावरच्या अनोळखी मुलीशी एवढं बोलू शकता, तर क्लासमधे रोज दिसणार्या मुलीशी बोलायला काय कचरतात काय माहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसं नैये ते. रोज दिसणार्‍या मुलीवर जीव जडला असेल तर फीअर ऑफ रिजेक्शन जास्त असतं. अनोळखी मुलीशी बोललं तर तिने हाड म्हटल्यावर तितकं कै वाटणार नै कारण रोज कै बघत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो रे बाबा ते माहितीय. पण त्यात एवढ काय घाबरायच... एकीने नै म्हणल तर दुसरी. तिनेपण नै म्हणल तर तिसरी. उम्मिद पे दुनिया कायम है Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय पण हे प्रत्यक्ष प्रयत्न करणार्‍यासाठी अवघड असतं. रिसीव्हिंग एंडला आरामात बसून फंडे देणं लै सोपं असतं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटॅ...बॅटॅ... दांडगा अनुभव दिसतोय, अनुभवाचे बोल काळजापर्यंत पोहोचत आहेत Wink

- (अवघड प्रयत्न करुन बघितलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक तुम्हीच बघा, सोत्रिअण्णा Wink

(प्रयत्नांती परमेश्वर किंवा जोडा यांपैकी काहीच न मिळालेला) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साधीच विनंती काय रे?? त्यानंतर मी आजपर्यँत विचार करतेय, निरुपा रॉय कशी 'आई' वाटते तशी मी 'बहीण' वाटते की क्काय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, आधी हेच लिहिणार होतो.
नक्की आक्षेप कशावर आहे? रस्त्यात थांबवून चौकशी करण्यावर की आपल्याला 'बहिण' हा रोल देण्यावर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

;-). मला असे अजुन २ ३ अनुभव आलेत. मुलं ओळखीतलीच होती, पण आधी कधी बोलली नव्हती. तर ती येतात "हाय! मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही पण ब्ला ब्ला ब्ला" अशीच सुरुवात करतात. काय गौडबंगाल आहे काय कळत नै Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मय्त्रि कर्न्र कं????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघ हां. बहिणीचा रोल मागत नैये, सर्रळ फ्रेण्डशिप मागतोय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

i m in sistership of someone.
मला बहिन्शिप देनर कं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नै कर्नर ज्जा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका मैत्रिणीला 'औटॉफ ऑफीस ऑटो रिप्लाय' म्हणजे नक्की काय, ते कसे चालते वगैरे भानगड ठाऊक नव्हती. नवीन नवीन जॉब करायला लागल्यानंतर पहिल्यांदाच मोठी सुटी घ्यायची वेळ आली तेव्हा तिला कुणीसे म्हणाले, ते औटॉफ ऑफीस ऑटो रिप्लाय टाकून जा. माहीत नाही आपल्याला तर विचारावे का नै? बाईंनी मेल डिस्ट्रिब्यूशन लिस्टमधल्या प्रत्येकाला मेल लिहिली, मी अमुक तारखेपासून अमुकपर्यंत सुट्टीवर आहे हो... सब्जेक्टमधे 'औटॉफ ऑफीस ऑटो रिप्लाय'.

जनता आधी बुचकळ्यात पडली आणि मग 'ही कोण बॉ मुलगी' अशा कुतुहलाने लोक जातीनं येऊन तिला भेटून गेले. Smile

तसा हापिसातला आणि एक ऐकलेला किस्सा म्हणजे - कुणी काही चाकलेटेबिकलेटे आणली की आपल्या डेस्कपाशी नाहीतर पॅण्ट्रीमधे ती ठेवून जनतेला मेल लिहायची पद्धत असते - की बाबा, या आणि गिळा. मग लोक कामाची नाटकं सोडून धावत जाऊन काय ते हादडून येतात. तशी त्या कुणा बिचार्‍या मुलीनं 'प्लीज कम. स्वीट्स इन पॅण्ट्री.' अशी मेल लिहिली. दुर्दैव बिचारीचं, स्पेलिंगात r लिहायला विसरली.

यावर जे काय झालं, ते झालं! परत बिचारी हापिसात आली की तिनं नोकरी सोडून पलायन केलं, ते काय ठाऊक नाही. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमच्या एका प्रोजेक्ट म्यानेजर बाईने ऍडमिनिसिट्रेशन असिस्टंट बाईला मोठी कॉन्फरन्सरुम बुक करण्याची विनंती करताना Please reserve some sluts for us as well... असा मेल लिहून सगळ्या टीमला कॉपीही केले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या याच मैत्रिणीचा किस्सा:

जर्मन शिकताना 'Verhühtungsmittel' असा शब्द आम्हांला आला. शिक्षिकेनं त्या शब्दाचं दिलेलं स्पष्टीकरण धड ऐकू आलं नाही. 'काहीतरी पिल' इतकंच बोलल्याचं ऐकू आलं. 'पिल'वरून आणि बाकीच्या संदर्भावरून नेमकी कसली पिल / गोळी असेल त्याचा अंदाज जनतेनी बांधला. फार काही चर्चा न होता वर्ग पुढे चालू झाला. इतका वेळ तिसरंच काहीतरी करणार्‍या आणि एका मैत्रिणीनं हिला विचारलं, "काय काय? कसली पिल?" त्यावर ही अतीव आत्मविश्वासानं म्हणाली, "अगं, स्लीपिंग पिल! असं काय करतेस! स्लीपिंग पिल नसते का, आज्या वगैरे घेतात जनरली... ती!"

सुदैवानं शिकवणं थांबवून आमच्या शिक्षिकेनं हे ग्यानवाटप ऐकलं आणि बाईंच्या डोक्यातला गोंधळ दूर केला. तेव्हापासून आमच्यात कॉण्ट्रासेप्टिव पिलला 'स्लीपिंग पिल' असं संबोधण्याचा प्रघात आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमच्या हापिसात घडलेले सुद्धा दोन असेच गमतिशीर किस्से ...केवळ इंग्रजी लिहितांना एक अक्षर राहून गेल्याने उडालेला गोंधळ (माकडचाळे म्हणण्यासारखं असं काही नाही म्हणा) Smile

१.
काही वर्षांपुर्वी आमच्या हापिसात एक अमेरीकन 'क्लाइंट' आला होता... तो जाण्याची वेळ आली तेव्हा त्याला कूठेतरी पारंपारीक भारतीय पद्धतीच्या ठिकाणी न्यायचे ठरले... टिम मधले लोक 'इमेल' वरुन त्या 'क्लाईंट' ला बरेच पर्याय देत होते (बाकी टिम ला 'CC' मधे ठेऊन)... 'चोखी-ढाणी', 'संस्कृती' वगैरे वगैरे ... आणि त्या प्रत्येक ठिकाणाची माहितीही... तर त्याने त्यातला एक पर्याय निवडला ... जो टिम-मधल्या एका मुलीने सुचवला होता... खुश होऊन तिने त्याला घाई-घाईत 'रीप्लाय' केला (आधीच तिच्या इंग्रजीचे वांदे) .... "I will be good for you tonight" .... (बिचारीला " It will be good for you tonight" असं म्हणायचं होतं...) Biggrin

२.
मी माझ्या एका अमेरीकन सहकारीणीशी Yahoo Messenger वर कामाबद्दल बोलत होतो... मला तिची टेक्नीकल मदत हवी होती... पण मला नेमकी काय मदत हवी आहे तेच तिला कळत नव्हतं ... म्हणुन ती मला शेवटी वैतागून म्हणाली (तिच्या कडे खुप रात्र झाली असल्याने) ... "I understand that all... but tell me what exactly you want from me at this moment" ... आता हिला नेमकं कसं सांगावं म्हणुन विचार करायला वेळ हवा होता म्हणुन मी तिला " Just a sec" च्या ऐवजी "Just a sex" असं लिहीलं ... मी पुन्हा पाहिलं आणि घामच फुटला मला...१०-१५ वेळा 'सॉरी' म्हणालो असेन मी... तीने त्यावर मोठ-मोठे , दात दाखवणारे आणि गडाबडा लोळणारे 'स्माईली' पाठवले... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

दोन्ही ख-ह-त-ह-रा-हा किस्से आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तेव्हापासून आमच्यात कॉण्ट्रासेप्टिव पिलला 'स्लीपिंग पिल' असं संबोधण्याचा प्रघात आहे. Biggrin

दूरान्वयाने अगदीच चूक आहे असे म्हणवत नाही.

असो चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते अजूनच वेगळं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किंवा परंपरागत दृष्टीकोनातून "पाय घसरला" वगैरे पाहिल्यास 'स्लीपिंग पिल' इतकेच "स्लिपिंग पिल " हे सुद्धा अगदिच चूक आहे असे म्हणवत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

न्यू जॉईनी होतो तेव्हाची गोष्ट. आपला हा हा बॉस कसा खत्रुड आहे. कसा येडचाप आहे. कसा हास्यास्पद वागतो वगैरे वर्णन एमेल्स मधून चालली होती. अगदी तो गाजरे खातो त्याचा आवज कसा सगळीकडे घुमतो किंवा बायकोचा फोन आला की कसा घाबरतो वगैरेंची रसभरित वर्णने मंडळी करत होती.

मग एकाच्या अचानक लक्षात आलं की या गोंधळात तो बॉसच मेल चेनमध्ये आहे Smile

अर्थात त्या सायकलच्या रेटिंगचं काय झालं हे लिहायला नकोच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाप रे.... रेटिंग मरू देत. त्या बॉसला नंतर ऑफिसात फिरताना कसली लाज आली असेल?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छ्या! तो त्याच्या लै पुढे पोचलेला निगरगट्ट प्राणी होता! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगागागागाङागागागागागा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही वर्षांपूर्वी आमचा एक सहकुटुंब असलेला बॉस सर्वांशी जास्तच मिळून मिसळून वागत होता. ब्याचलर लोकांचा कुठे काही प्लॅन असला तर बोलवत जा वगैरे म्हणायचा. वीकेंड साजरा करण्यासाठी आम्ही पाचसहा जणांनी क्याप्टन मॉर्गनची बाटली आणली. शनिवारी रात्री उघडून बसलो आणि अर्धी बाटली संपल्यावर बॉसला बोलवायला हवे होते अशी कुणीतरी टूम काढली. मग एकाने त्याला (रात्री 11:45 ला) फोन लावला. बॉसने प्रेमाने नकार दिला. मात्र फोन लावणारा (टुन्न असल्याने) फोन कट करायचे विसरला. बॉस आता आपल्यासोबत येण्याऐवजी आता त्याच्या बायकोसोबत काय करत असेल याची चर्चा करण्याची हुक्की एका उत्तर भारतीय मित्राला आली आणि त्याने रसभरीत चर्चाप्रस्ताव मांडला. असो. guilt by association मुळे आमचे त्यावर्षीचे अप्रेजल गंडले हे वेगळे सांगायला नको.

दुसरा असाच प्रसंग कॉलेजनंतर नव्या नोकरीच्या जीवनात. सर्वांकडे प्रथमच मोबाईल फोन आलेले. त्यावेळी डायल करणाऱ्यानेच कट केल्याशिवाय फोन बंद होत नसे. रिसिविंग एंडवाल्याने फोन ठेवून दिला तरी लाईन ड्रॉप होत नसे. (ही अडचण अलीकडेही जाणवली होती).. असो. एका मित्राकडे 'शैक्षणिक' चित्रपट पाहण्याची योजना ठरली. चित्रपटाची नायिका ऐश्वर्या राय किंवा प्रीती झिंटासारखी दिसते असा दावा हा चित्रपट रेकमेंड करणाऱ्या आमच्यामधील एकाचा दावा होता. सर्वजण मित्राच्या घरी त्याच्या प्रायवेट खोलीत बसलेलो. मित्राचे आईबाबा कामावर गेलेले. संध्याकाळची साडेचार पाचची वेळ.. चित्रपट रंगात येऊ लागला होता. अचानक दुसऱ्या एका मित्राला 'रात्री बाहेर जेवायला जायचे आहे, त्यामुळे स्वयंपाक करु नका हे घरी सांगायचे विसरलो' ही आठवण झाली. त्याने ऐटीत मोबाईल वरुन फोन लावला. घरी निरोप दिला आणि (कट करायचे राहून गेलेला) फोन बाजूलाच खिडकीमध्ये ठेवला. चित्रपट पुन्हा चालू झाला. दोनच मिनिटात आमच्या होस्ट मित्राच्या ल्यांडलाईनवर दुसऱ्या मित्राच्या घरुन फोन. अरे xxxला सांग तुझा मोबाईल चालूच आहे. Smile

असो. प्रत्येकवेळी चापून चिकन खाणाऱ्या आमच्या त्या मित्राला रात्री जेवण गेले नाही. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एकदा लसणाचे तुकडे खिरीत घालायचे काजूचे तुकडे समजून बचाकभर तोंडात घातले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चांगला चौथीतला घोडा असूनही मी आजोबांच्या खोलीतल्या टेबललॅम्प चा बल्ब काढलेला असताना होल्डरमध्ये बोटे घातली... असा शॉक पुन्हा कधीच बसला नाही... शॉक म्हणजे काय बरोब्बर कळालं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एका मंगल कार्यालयातल्या लायतिंग्वाल्या बल्ब शी खेळताना बेक्कार शॉक बसला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

COEP होस्टेलला ४-५ दिवस पाणी नव्हते. त्यावेळेस मी टेल्कोमधे sandwich trainee होतो. मी चक्क बनियन अंडरवेअर कंपनीत घेऊन जाऊन तिथेच आंघोळ करत असे. हा माकडचाळा अल्पांशाने होता.

आमच्या डिजाईन डीपार्टमेंटमधे जे ड्रॉइंगचे मोठे मोठे बोर्ड असत त्यावर मी बनयान, अंडरवेअर आणि टॉवेल वाळायला घालत असे. आमचे एन के पांडे म्हणून HOD होते. ते मला 'जोसी' म्हणत. इतका अशक्य गाढवपणा मी करू शकेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. शेवटी त्यांनी मला कंपनीत आंघोळ करायला आणि कपडे वाळत घालायला योग्य जागा स्वतः दाखवून दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे बाकी भारीच!!!

आमचेही सीओईपीतले चाळे एकत्र केले तर लैच मोठी लिष्ट तयार होईल. गेले ते दिवस....अन आता मुळेकाठी कॉलेज पहिले राहिले नाही तेही खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतक्या वर्षांनी कळलं कि आपल्या कॉलेजेची नदी मुठा. साला किती लोकांना विचारून र्‍हायलो कि ही नदी मुळा कि मुठा कि अजून कोणती? आणि कॉलेज ते राहिलं नाही म्हणजे नक्की काय झालं हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

च्च च्च च्च!!! मुठा नाही मुळा. कॉलेजजवळच पुढे संगमपूल आहे तिथे दोन्हींचा संगम होतो. मुठा येते कोथ्रूडकडनं अन मुळा येते चिंचवड वैग्रेकडनं.

कॉलेज पहिले राहिले नै म्हणजे अ‍ॅकॅडेमिक्स भलतेच स्ट्रिक्ट केलेय आता. अटेंडन्स इ.इ. क्रॅप फार जास्त.

शिवाय आधी ९ डिपारमेणचे ९ इव्हेंट्स असायचे त्याचा एकच एक इव्हेंट केलाय.

लै टाईट्ट केलंय सगळं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरीच मी घासकडवींना जे म्हणत असतो कि वरचेवर सगळं टाईट होत चाललंय हे चिंताजनक आहे, का जाणो त्यांना पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे मजेत आहे की शिर्यस?

शिर्यस असेल तर मात्र 'श्वानं युवानं मघवानमाह' Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुण्यात मुठा आहे आणि पिँचिंमधे मुळा. COEP पाशी संगम ब्रीज आहे ना तिथेच त्यांचा संगम होतो. पुढे तिला काय म्हणतात ठाऊक नै. चुभुद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक........

बर्रेच लोक तिला पुण्याचं गटार म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१०१०((((१०!)!)!)!)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्या काळात लाल कि निळी इंक वापरली, ड्रॉइंगचा तो तुकतुकित प्लास्टिकचा कपडा तिरका बसला, काळवंडला इतक्या क्षुल्लक कारणावरून लोकांच्या नोकर्‍या जात त्या काळात मी त्या बोर्डांवर अंडरवेअर वाळायला घालत असे. लोक त्या कॉरिडॉर्मधून जात तेव्हा असे विलक्षण भाव त्यांच्या डोळ्यात अवतरत कि विचारता सोय नाही. तदनंतर वेळोवेळी पांडे सर 'तुम्हारे हॉस्टेल में पानी ठीक से आता हैं ना?" म्हणून शेवटपर्यंत चौकशी करत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी एका रिमोट ऑफिस ला भेटीला गेले असताना मेल रेस्ट रूम मध्ये शिरले होते.

म्हणजे झाले असे की त्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या विभागात , वेगवेगळ्या मजल्यावर रेस्टरूम्स होती - मेल रेस्टरूम आनि फिमेल रेस्टरूमचे दरवाजे अगदी समोरासमोर - डावीकडचा फिमेल, उजवीकडचा मेल (किंवा असेच काहीतरी - मोरल ऑफ स्टोरी : तुम्ही सरळ चालत गेल्यानंतर फिमेल रेस्टरूम कायम एका ठराविक दिशेचा दरवाजा असायचा)

एक दिवस पॅन्ट्रीमध्ये लंचनंतर मी त्याच्यालगत असलेल्या रेस्टरूम मध्ये घुसले, हे गृहित धरून की बाकी सगळीकडे ज्या दिशेला फिमेल रेस्टरूम असते तिकडेच इथले पण असणार, दरवाज्यावरची पाटी वाचलीच नाही विचारांच्या तंद्री मध्ये!

आत गेल्यावर आतमधला किंचित वेगळा सेटअप बघून मी विचार पण केला की हे जरा इतर रेस्टरूम पेक्षा थोडे वेगळे वाटतेय. (अर्थात अगदी व्हिजिबली मेल स्पेसिफिक तिकडे काही नव्हते)

तशी मी आत एकटीच होते. बाहेर आले आणि येता येता बाहेरच्या दरवाज्या वरची पाटी सहज वाचली गेली आणि इतके ऑकवर्ड वाटले!
नशीब कोणी मला आत जाताना/गेल्यावर/बाहेर येताना पाहिले नव्हते.

तरी त्या दिवसानंतर मी जितके दिवस त्या ऑफिस मध्ये होते, पॅन्ट्री मध्ये जेवायलाच गेले नाही, जागेवर बसूनच लंच केला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

तुम्ही त्या मेघनाच्या गावकरी मित्राप्रमाणे कोणा पुरुषाला एक स्माईल देताहात असे कल्पिले आणि ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बीयरवरून हार्ड ड्रिंक्सला जेव्हा सुरुवात झाली त्या पहिल्या वेळी क्वार्टर, हाफ आणि फुल असले फंडे काही माहिती नव्हते, त्याधि कोणाकडून तरी भरलेले ग्लासच मिळले असल्याने. जेव्हा दुकानात घ्यायला गेलो त्यावेळी वाइन शॉपवाल्याने विचारले की क्वार्टर, हाफ आणि फुल? काही शष्प न कळल्याने बडेजाव म्हणून फुल म्हणालो आणि त्याने दिलेल्या खंब्याची किंमत ऐकून डोळे पांढरे झाले कारण तेवढे बजेटच नव्हते आमचे. बरोबरच्या मित्राने नंतर क्वार्टर आणली खरी पण पेग कितीचा आणि कसा बनवायचा असतो हे कोणाला माहिती होते? फक्त सोड्यात घ्यायची एकढेच माहिती होते. त्यामुळे त्यानंतर जे झाले ते माकडचाळ्यांच्या पलिकडचे होते.

- (माकडचाळे करण्यात अग्रेसर) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्य अनुभवाने शिकतो. मीहि एक साधी गोष्ट कशी शिकलो तो किस्सा सांगतो. गोष्ट जरा लांब आहे तेव्हा धीर धरा.

५८ साली सातार्‍याहून पुण्यात कॉलेजसाठी आलो. काही दिवस बाहेरूनच पाहून धीर चेपल्यावर जिमखान्यावर गुडलकमध्ये शिरलो. एकजण केक खात होता. मीही केकची प्लेट मागविली. प्रत्येकी दोनदोन असे ५ प्रकारचे १० केक समोर आले. (किंमत फक्त १ रु.) अळेबळे सगळे संपवले. मग रोजच कॉलेजकडे येताजाता गुडलकमध्ये शिरून केकचा रतीब सुरू केला. प्रत्येक वेळी शेवटचे २-३ केक अळेबळेच पोटात ढकलावे लागत पण पैसे देऊन घेतलेले केक टाकवतहि नसत म्हणून खात होतो.

एक दिवशी असाच शिरलो तर आणखी एकजण केक खात होता. त्याने तीनच केक खाल्ले आणि प्लेट तशीच टाकून काउंटरकडे पैसे दयायला गेला. 'काय उधळ्या माणूस आहे, किती केक टाकतोय' इति अस्मादिक स्वतःशीच आश्चर्य करीत असतांना वेटर त्याच्या टेबलापाशी गेला आणि तीन केक ३० पैसे असे त्याने ओरडून काउंटरवरच्याला सांगितले.

तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की समोर ठेवलेले सगळे केक अळेबळे संपवायची काहीहि सक्ती नसते. हवेत तितकेच खायचे आणि गुणिले १० पैसे इतके बिल द्यायचे. त्यानंतर कधीहि अळेबळे केक खावे लागले नाहीत.

(इराणी आणि त्यांच्या गिर्‍हाइकांच्या डोक्यात उष्टेपाष्टे, हायजिन असले काही नसे हे ओघानेच आले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सौम्य माकडचाळे आहेत बुवा. सावधगिरी बाळगून मुलाखतीत सांगितल्या जाणार्‍या विकप्वाईंटासारखे माकडचाळे सांगणं चाललंय.
चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Amateurs!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अर्थातच. तुमच्याइतके मंजलेलो असतो तर स्वतंत्र धागे नस्ते काढले त्यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यौवनात ना तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

वय से फर्क नै पडता अण्भव से पडता है. म्हणून मंजण्याचा उल्लेख केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही उदाहरण्म मुलाकह्तीत सांगितली जाणार्या वीकपॉइण्टासारखी असतील, तर खरीखुरी धमाकेदार उदाहरण्म लिहावीत अशी मी ननि ह्यांना विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमच्या भांडकुदळ शेजार्यांना ३ राक्षशीण मुली होत्या . त्यांना आम्ही त्राटिका , हिडींबा आणि शूर्पणखा म्हणायचो . यथावकाश शूर्पणखेच लग्न झाल . जावई अगदी मवाली दिसणारा आगाऊ मनुष्य आहे . मी त्यांच्या लग्नातच हे सजवलेले मवाली माकड बघितले होते . नंतर काही महिन्यांनी एकदा मी स्कूटरवरून ऑफिसात जात होते . तर एका सुनसान रस्त्यावर आउट ऑफ द ब्लू ,हे माकड माझा पाठलाग करत आले . मग म्हणे काय , ओळखले का ? मी म्हटले नाही . मग माकडाने गॉगल काढला आणि दात विचकून म्हणे आता ओळखले का ? मी हास्यस्फोट पराकाष्ठेने कंट्रोल करून म्हटले नाही . तर तो म्हणे , अहो मी तुमच्या शेजार्यांचा जावई . मी बळेच दात दाखवले आणि वेगाने स्कूटर हाकली . नंतर दुर्दैवाने तो माझ्या बिल्डींगमधेच रहायला आला . आणखी काही माकडचाळे बघावे लागले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसं कसं सुचतं हो तुम्हाला ? मवाली माकड काय, राक्षस काय मागे एका धाग्यात "तो डॉक्टर गोग्गोड ससा होता" असं अद्भुत वाक्य होतं.
एका विचित्र लहेज्यात लिखाण असतं ब्वा तुमचं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सगळं सांगत बसलो तर नोकरीवरून काढतील.

स्थळः आमची प्राथमिक शाळा
इयत्ता दुसरी.

आमच्या शाळेची इमारत (आम्ही बालवाडीत असतानाच नविन बांधून) चार मजली (म्हणजे तळ ते तिसरा) होती. त्यावेळी आमची डोस्की थोर चालत असली तरी डोकी लहान होती. वर्गाच्या खिडकीच्या ग्रीलमधून आमची डोकी बाहेर जात असत. दरवाज मेटल फ्रेमचे आणि मध्ये काच असे होते. मेटल फ्रेम उघड बंद आणि लॉक करण्याकरता दरवाजाला हँडल असते. त्याकरतां तिथे आयताकृती ग्रिल मोकळे सोडलेले असते, बाकी पूर्ण बंद. तिथून आम्ही डोकी बाहेर काढत असू.

तर चौथ्यामजल्यावरून खालच्या यःकच्शित लोकांकडे बघायला फार मजा यायची (तिथून जवळच, सकाळी दूधबाजार वगैरे भरत असे, एकंदरीत कॅरॅक्टरांची रेलचेल असे आणि वरून त्यांच्यावर काय काय फेकताही यायचे.), आणि त्यामुळे डोस्की घालायला आमची चढाओढ असायची. आमच्या वर्गातून मास्तराचा पाय बाहेर गेला की सुरू. अशाच एका वेळी घाईत एकाने हाताने खिडकीला ढकलंल. काच थेट खाली जाऊन एका (दुर्दैवी) काकूंच्या टाळक्यात! (इतर खिडक्यातून एव्हाना चार डोस्की बाहेर आल्याने नक्की काय प्रकार झाला हे कळायला खालच्या लोकांना वेळ लागला नाही. झालं, डोक्याला काहीतरी पट्टी लावून काकू आणि इतर दोन चार लोक आमच्या हेडमास्तरांसकट वर्गात पाच मिनिटांत दाखल झाले. (फारसं लागलं नसावं, नाहीतर हास्पिटलात जायचं सोडून वर्गात आले नसत्या.) पण आमची नावं सांगणार कोण हो. (नक्की कोणी ढकलल्यानं काच पडली हे सांगणे आमच्या ओमेर्तामुळे अजूनही शक्य नाही!) झालं सगळ्या वर्गाला (फक्त मूलं, मुली नाही) चौथ्या मजल्यावर रांग करून हेडमास्तरांच्या हाफिसात नेऊन एकेकाला छड्या देण्याचा प्रकार सूरू झाला. अस्मादिकांनी हुशारीने हेडमास्तरांच्या हाफिसच्या बाहेरून, शिपायाच्या नजरेस न पडता, छडीकरता जाण्यार्‍या रांगेतून हळूच छडी घेऊन परतणार्‍या रांगेत शिरकाव केला. पुन्हा, नाव सांगणार कोण हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जहापनाह, तुसी ग्रेट हो!!!! तोहफा कुबूल करो!!!!!

(अप्रोप्रिएट स्मायली इच्छा नसतानाही कल्पावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या एका भूतपूर्व बॉसला एका उर्ध्वगामी "मारा"मारीत (upward feedback) "तू टीमबरोबर मिक्स होत नाहीस, शिष्ठ आहेस" असा शालजोडीतला मिळाला. हे पाप धुण्यासाठी त्याने लगेच "टीम लंच" ठेवला. त्याचं रीतसर मीटिंग इन्व्हाईट वगैरे धाडलं आणि प्लेस मध्ये TBD लिहिलं (To be decided या अर्थाने).

बॉसची शेक्रेट्री आशा जरा वेळाने आली आणि TBD वाचून बुचकळ्यात पडली. तिने "TBD म्हंजे काय?" असा बॉसच्या प्रजेला उद्देशून जाहीर सवाल टाकला. आम्हाला वाटलं ती आमची खेचते आहे - कारण TBD म्हणजे To be decided हे कोणापण गण्यागंप्याला माहीत असतं.

"TBD म्हणजे ताज ब्लू डायमंड, आशाताई*!" मी चेहेरा सरळ ठेवून म्हणालो.

आशाताईंनी परस्पर ताज ब्लू डायमंडमध्ये टेबलं बुक करून टाकली! बॉसोबा नंतर लय खवळले होते. पण आता TBD मध्ये टीम लंच ठेवलं नसतं तर अब्रू गेली असती. त्यामुळे तो सोहळा बॉसला चांगलाच खड्ड्यात घालून गेला. आशाताई माझ्यावर बरेच दिवस खार खाऊन होत्या.

*त्यावरून आठवलं - ही आशा सोम ते बुध काम करायची आणि दुसरी बया गुरू-शुक्र तिचा "जॉब शेअर" करायची. हिला आशाताई म्हणायचे म्हणून दुसरीला "लतादीदी" नाव ठेवलं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अनेक विद्यापीठांमधे इमेल्ससाठी pine हा अतिशय साधा प्रोग्रॅम वापरला जातो. यात बरेच खेळ करता येतात.

एकदा एका मैत्रिणीला आम्ही तिच्याच नावाने इमेल केलं होतं. ती नुकतीच आली होती, तिला हे खेळ कसे खेळायचे किंवा ओळखायचे हे माहित नव्हतं. इमेलमधे असं दिसत होतं, की हे इमेल तिच्या बॉसलाही गेलेलं आहे. त्यात तिने इंग्लंड कसा भिकार देश आहे, हे विद्यापीठ कसं सडकं आहे असं लिहीलेलं आहे. तिच्या बॉसला हे काही माहित नसल्यामुळे त्याने काही विषयच काढला नाही. तीनेक दिवस तिला पिळलं.

एकदा हीच ट्रीक मित्राने माझ्यावर केली. आम्ही नवीन प्रकल्प सुरू करणार होतो, म्हणून एक फॉर्मल मीटींग ठेवली. त्याने माझ्या नावाने आमच्या बॉसला इमेल केलं. त्यात लिहीलं होतं की मिटींग आहे तर फक्त चहाच कशाल बिस्कीटंही हवीत. त्याने खरंच बिस्कीटं मागवली. त्या वेळेला मी बरेचदा काहीबाही खाते, तेव्हा समोर होती म्हणून बिस्कीटं चरली. मिटींग संपल्यावर बॉसने "पोस्टडॉकनाही एवढा कमी पगार मिळतो का?" अशी काही कॉमेंट केली. मला काही समजेना. मी पण "बघ ना, मी किती कुपोषित रहाते" वगैरे टाईमपास केला. मग मित्राने बॉससमोरच सांगितलं, हा सगळा बनाव त्याचा होता. आणि ते इमेल पाठवल्याचं मला माहित नव्हतं वगैरे. हा मित्र तसाही कानफाट्या म्हणूनच प्रसिद्ध असल्यामुळे कोणाला त्याबद्दल काही आश्चर्य वगैरे वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

११वी किँवा १२वी त असेन. ट्युशन संपायची वेळ झालेली आणि लाईट गेले. जनरेटर नव्हता. वॉचमनने मेणबत्ती लावायची वगैरे वाट न पाहता, मी गडबडीत, घरी जायच म्हणुन अंधारातच शु-रअॅक वरच्या चपला साधारण कुठे ठेवल्या त्या अंदाजाने घेतल्या. आणि सायकल दामटत गेले घरी. तिथे पाहिल तर काय, एक चप्पल माझी होती, दुसरी बरीच मोठी, झिजलेली, स्लिपर होती आणि दोन्ही चपला उजव्या पायाच्याच Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या वर्गात चौथीपर्यँत मुलं होती. पुढे फक्त मुलीँची शाळा. मी पाचवीत असताना घराच्या पायर्याँवर अभ्यास करत बसलेले. तर माझा एक्सक्लासमेट सायकलच टायर घेउन आला आणि समोरच्या रस्त्यावर हिरोगिरी करायला लागला. 'एक नंबर की लडकी' गाणं म्हणत (मी शाळेत पहीली यायचे म्हणुन) ड्यान्स, लोळण, ते टायर कमरेभोवती फिरवण वगैरे =)). थोडा वेळ करुन पळुन जायचा. त्याचे ३-४ मित्र गल्लीच्या कोपर्यावर लपुन पहात होते. ते परत त्याला पाठवत. असं ४-५दा झाल. मग माझी सटकली... तो लोळत असताना मी पळत गेले त्याच्याकडे. डाव्या हाताने कान पकडायचा आणि उजव्या हाताने सण्णकन ठेउन द्यायची असा विचार होता, पण हातात कानाऐवजी शेंबडं नाक आल ईईई :-(. तरी मी मारल त्याला थोड Wink आणि परत पळत पळत घरात जाऊन लपुन बसले :-D.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!
हाण्ण च्यामारी... पाचवीतच फुल्टु मारामारी! Wink चांगली सुरूवाते Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<< पाचवीतच फुल्टु मारामारी! >>

तरीच!

उगाच नाही लोकांना त्यांच्यात ताई दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेंबड्या नाकावरून आठवलं:-

बरोबरचा एक मुलगा मारामारी करताना कडकडून चावला, म्हणून माझा एक भाऊ रडत घरी आला.

त्याच्या आईनी वैतागून त्याला विचारलं, "रडतोस काय मग? तो चावला, तर तू त्याला चावायचंस ना! का चावला नाहीस?"

तर रडता रडता थांबून म्हणाला, "शी आई! किती काळा होता तो! त्याला कसं चावणार? मला घाण वाटली."

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारताबाहेरच्या हापिसात एक मल्याळी कलिग होता. कलेक्शन टीमचा हेड होता. चांगला पन्नाशीचा वैग्रे होता. एक नंबर हरामखोर माणूस. एक दिवस अचानक रिझाईन केलं आणि दुसर्‍या दिवशी रिलिझ. तिसर्‍या दिवशी कळलं ते असं... महाशय रोज हापिसातूनच काही 'मैत्रिणीं'बरोबर एक्स्प्लिसिट चॅट करायचे. त्या दिवशीही हेच चालू होते. एकीकडे चॅट आणि दुसरीकडे बॉसला द्यायचा मंथली कलेक्शन रिपोर्ट. मंथली रिपोर्ट बनवताना बर्‍याच ठिकाणचा डेटा चोप्य पस्ते करावा लागायचा. त्यात चुकून चॅटमधली काही भलतीसलती (खरं तर भलतीसलती हा सौम्य शब्द आहे... ती वाक्य म्हणजे अगदी म्हणजे अगदीच एक्स्प्लिसिट होती!) वाक्यं त्या मंथली रिपोर्टात पेस्टली गेली. तो रिपोर्ट गेला तसाच बॉसकडे. हा बॉस म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. त्यानेही तो रिपोर्ट वरवर बघून त्याच्या बॉसकडे (प्रेसिडेंटकडे) घेऊन गेला. चर्चा करायला. व्हा. प्रे. चं नशिब थोर की प्रेसिडेंट जरा व्यग्र होता म्हणून कॉन्फरन्स रूम मधे बसून असताना परत एकदा रिपोर्ट बघत होता आणि हे सापडलं. तातडीने डिलिट केलं त्याने. पण मग याची नोकरी गेलीच!

दुसरा किस्सा... पहिल्या नोकरीच्या ठिकाणी... एक कलिग टॉयलेटमधे गेला. आणि दोन्ही युरिनल एंगेज्ड होती म्हणून बेसिनवरच्या आरशात बघत उभा राहिला. केस नीट कर, मिशीचा कट नीट आहे चेक कर वगैरे चाललं होतं. तेवढ्यात त्या आधीच आलेल्या दोघांशी बोलणं चाललं होतं. आणि एकदम तो विसरलाच, (स्वतःला निरख्ण्याच्या नादात आणि गप्पांच्या नादात) की तो बेसिनसमोर उभा आहे.... तिथेच कार्यक्रम उरकायची तयारी केली... इतर दोघांपैकी एकाचं आटोपलं तेवढ्यात आणि तो मागे वळला तर हा प्रकार... तो जोरात ओरडला म्हणुन अनर्थ टळला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

लहानपणीचीचा एक किस्सा आठवला !

एकदा एक चिमणी मेली कशी आठवत नाही पण बहुदा इलेक्ट्रिक चा धक्का बसला असवा.
लहानपणापासूनच कदाचित आम्हा भूतदयेचे सौम्य मानसिक धक्के येत असावेत , चिमणी चा अंत्यसंस्कार करावा म्हणून आम्ही मित्र मैत्रीण मिळून काड्या जमवून एक छोटीशी शिडी तयार केली त्यावर ती चिमणी ठेवली आणि राम नाम सत्य वेगैरे पण केल, मग कागदं पेटवले , चिमणी ती ला अग्नी देत होतो, कागद जाळून गेले पण चिमणी काही पेट घेईना ,
तितक्यात हा शिवप्रताप आमच्या जिजाऊने पहिला, "काय करून राहिले रे पोट्टेहो ?" सगळे पळले आम्ही मात्र सापडलो मग काय विचारता लै आडवा-तिडवा धुतला.

सगळ शांत झाल्यावर मी जिजाऊ ला विचारलं सगळ्या माणसांना जाळतात तर चिमणी पण तर जीवच ना?
जिजाऊच्या डोळ्यात जागेवर पाणी ? एकदम सेंटी सीन !!!

मले मारल काहून ते बी नाही समजल अन डोळ्यात पानी ते बी नाही
तेव्हा ह्या बायका काही आपल्याले समजल्या नाही ब्वा … स्वतःच मारतील अन मंग स्वतःच रडतीन बी

पण आता थोड थोड समजायला लागलये !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या गमतींमुळे काही आठवलेले मार:

१. इयत्ता तिसरी. कोणीतरी सांगितलेलं निबंधाची सुरूवात बाईंना आवडेल अशी करावी. अस्मादिकांनी केलेली सुरवात "आमच्या बाई शहाण्या आहेत. की त्यांनी हा विषय दिला." माझ्या मातोश्री त्याच शाळेत. टिचर्स रूम मध्ये आमच्या बाईंनी बघा तुमच्या मुलाने काय लिहिलंय म्हणून सगळ्या शिक्षिकांसमोर मोठ्याने निबंध (ती ओळ) वाचुन दाखवला. माझे मार्क वगैरे कापले नव्हते की बाई मला काही बोलल्याही नाहीत. घरी गेल्यावर मात्र आईने जे चोपलंय त्याला तोड नाही. (बहुदा) तेव्हापासून वाक्यातील प्रत्येक शब्दाकडे मी अधिक चिकित्सेने बघु लागलो.

२. इयत्ता चौथी. (इंडो-जपान या) जापनीज संस्थेने शाळेत चित्रकला स्पर्धा घेतलेली. मुंबईतून ४ चित्रे जपानला जायची होती. मी होळीचे चित्र काढले व प्रत्येक मुलाचे केस वेगवेगळ्या रंगात रंगवले व काय हुक्की आली देव जाणे आई झोपली होती तिचेही केस रंगवले. आईने उठल्यावर बेदम नसले तरी मार दिला होत. त्यात घरात कोणीतरी काहीतरी टोमणा मारल्यावर मी भलाताच रागावलो व त्या रागात सगळ्या चित्रावर सगळीकडे काळा (बहुदा मेणरंग) हलकाच फासला व चित्र तसेच सबमिट केले. गंमत म्हणजे ते चित्र जपानला गेले. त्या जापनीझ परिक्षकांना म्हणे तो होळी मुळे तयार झालेला धूर आणि सणांमुळे होणारे प्रदुषण दाखवले आहे असे वाटले! Wink

बाकी वरच्या स्पेलिंगच्या गंमतीवरून आठवलेली गंमतः
एका बॉसने क्लायंटला लिहिलेल्या इमेलची केलेली सुरूवात (Hell Andrew) त्याला अर्थात लिहायचं होतं Hello Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!