स्त्रियांचे राज्य

काळ झपाट्याने बदलत चालला होता बघता बघता ३००० वे साल उजाडले. ह्या एवढ्या वर्षात बरेच बदल झाले होते.आपल्या भारतात आता स्त्रियांचे राज्य आले होते.सर्व प्रमुख पदांवर स्त्रिया कार्यरत होत्या. पुरुषांनी त्यांच्यावर हजारो वर्षापासून केलेल्या अत्याचारांची सव्याज भरपाई करत होत्या.
गायात्रीबाई ह्या देशाच्या मुख्य होत्या. त्या अत्यंत सनातनी वृत्तीच्या होत्या.त्यांनी सत्तेवर आल्या आल्या समस्त पुरुषांची पंचाईत करून ठेवली होती. ‘वंशाचा दिवा’ हि पुरुषांची पदवी जाऊन त्या एवजी ‘वंशाची टूबलाईट’ हि नवी पदवी स्त्रियांना मिळाली होती.
गायत्री बाईनि सत्तेवर आल्या आल्या समस्त पुरुषवर्गाच्या अंग् प्रदर्शना वर बंदी टाकली होती.बनियन व बर्मुडा ह्या वेशांवर बंदी आली होती. पूर्वीच्या काळी स्त्रियांचे केशवपन करत, त्यांना सती जायला भाग पाडत, साठ वर्षाचा थेरडा दहा वर्षाच्या मुलीशी लग्न करे, त्या मुळे कुमारी विधवांचाही प्रश्न त्यावेळी चर्चेत होता. स्त्रियांना शिक्षण हि दिले जात नसे तिचे सर्व अस्तित्व पुरुषावर अवलंबून असे. स्त्रीभ्रूण हत्या होत. पण तेव्ह्याच्या थोर समाजसुधारकांनी लोकांचे दगड पचवून स्त्रियांसाठी कार्य केले त्याचाच परिणाम म्हणून स्त्रिया स्वताच्या पायावर उभ्या राहिल्या. त्याच बळावर आज स्त्रियांची सत्ता आली होती.
पुरुषांच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली. शारीरिक दृष्ट्या ताकतवान असल्याने त्यांना फक्त जड कामे दिली जात. ऑफिस मधल्या सर्व जागा ह्या स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.पुरुष हे सर्वस्वी बायकांवरच अवलंबून होते पुरुषांना संघटना करण्यावर हि कायद्याने बंदी होती.
पुरुषांच्या एका गटाने मध्यन्तरी स्वताचे एक लेझीम पथक काढले होते तर काही सनातनी बायकांच्या संघटनांनी त्यांच्यावर हल्ला करून लेझीमच्या काठ्यांनी त्यांना बदडून काढले होते. पुरुषांच्या ह्या साऱ्या असहायतेचा फायदा नाटे क्लासने उचलला होता. त्यांनी पुरुषांसाठी शिवणकाम, स्वयंपाक कसा करावा, असे उपयोगी कोचिंग क्लास काढले होते. त्या क्लासमध्ये जाणे हे पुरुषांत प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाऊ लागले.
याविरुद्ध बंड करायचे ठरवले ते गोपीने. गोपी हा तब्बेतीने अतिशय मजबूत होता त्या मुळे त्याला इम्प्लोयमेंट ऑफिस मधून नोकरी मिळाली होती. तो रेल्वे स्टेशनवर कुली चे काम करी.’संसार हा स्त्री पुरुष ह्या दोन चाकांनी बनलेला असतो दोनीही चाके मजबूत असतील तरच हा रथ वेगात पळतो’ हे त्याला ठाऊक होते. त्याने पुरुषांसाठी शाळा काढायचे ठरवले. त्याला तुफान विरोध झाला पण तो आपल्या निश्चयावर ठाम राहिला
त्याने तबेल्यात पुरुषांसाठी शाळा काढली. त्याच्या एका मैत्रिणीने त्याला थोडी अक्षर ओळख करून दिली होती. ते शिक्षण आपल्या पुरुष बांधवाना देण्यासाठी त्याने कंबर कसली.पण त्याच्या ह्या उपद्व्यापाचा सरकारला पत्ता लागला त्यांनी तबेल्यावर महिला पोलिस पाठवून सर्व विद्यार्थ्यांची धुलाई केली. गोपिवर तबेल्यातल्या शेणाचा मारा झाला. त्याला अटक करून देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
फाशी देण्यासाठी त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले.फासाचा दोर गळ्यात पडल्यावर गोपी हात पाय झाडू लागला. तेवढ्यात त्याला आवाज आला “अहो,असे झोपेत काय हातपाय झाड्तायत, उठा”. गोपी ताडकन उठून बसला आपण पाहतो ते स्वप्न आहे हे लक्षात येउन त्याचा जीव भांड्यात पडला.”काही नाही ग स्वप्न पडले होते”. तो मैनेला म्हणाला.
मैना ऑफिस मधून नुकतीच येउन स्वयंपाकाला लागली होती गोपी तसाच स्वयपाक घरात आला व तिला म्हणाला “काय करतेस? “अहो स्वयपाक, चपात्या करायच्यात, भाजी करायची आहे. “थांब मी तुला मदत करतो”, असे बोलून गोपी फ्रीज मधली भाजी काढायला पळाला.

field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (3 votes)

प्रतिक्रिया

ह्या विसह्यावर ऋषिकेशने एक भन्नाट धागा , ललित लेखन केलं होतं मिपावर.
"पुरुषांना गृहिणी बनवून घरी डांबून टाकालय" असं काहितरी चित्र त्यात होतं.
कुणाल मिपा अ‍ॅक्सेस असेल तर ते बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars