काळ्या गाजराची कांजी

कांजी काळ्या गाजरांपासून, पूर्वी हिवाळ्यात अर्थात जनवरी सुरूझाल्या बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते. बनविण्याची रीत अत्यंत सौपी आहे.

साहित्य : पावभर काळे गाजर, हिंग (१छोटा चमचा), काळे मीठ (१ चमचा), मोहरीची डाळ (१ १/२ चमचे) व पाणी ३ लिटर (स्वच्छ) बस एवढेच.

कृती: गाजर धुऊन, साल काढून, गाजराचे लहान लहान तुकडे करा. एका काचेच्या भांड्यात पाणी घालून त्यात गाजरांचेचे तुकडे टाका, हिंग,मोहरी आणि काळे मीठ टाकून भांडे झाकण लाऊन बंद करा. तीन ते चार दिवसात कांजी तैयार होईल. मुंबई सारख्या ठिकाणी २-३ दिवसातच. कांजी ७-८ दिवस व्यवस्थित राहते. जास्ती कडक वाटल्यास आणखीन पाणी घालता येते.

सर्व करण्याची विधी: गाजरांच्या तुकड्यांसहित कांजी एका ग्लासात टाका. स्वाद वाढविण्यासाठी लिंबू आणि चाट मसाला ही घालता येते. गाजराचे तुकडे खात कांजी पिण्याच्या आनंद काही औरच येतो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

इंटरेस्टिँग! पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार. काळे गाजर म्हणजे काय बीट नाही ना? रंग तसाच दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळी गाजरे हिवाळ्यात डिसेंबर शेवट आणि जनवरी महिन्यात बाजारात येतात. सलाड आणि कांजी बनविण्यासाठी त्यांचा वापर होतो. पण आजकाल हा पेय पदार्थ कालबाह्य होत चालला आहे. पूर्वी जुन्या दिल्लीत थंडीत हा पेय ठेल्यांवर मिळत असे. आज ही काही ठिकाणी कांजी विकणारे दिसतात. पण बनवायला अत्यंत सौपी अशी कृती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आम्हांसही उद्भवली होती. (आम्हांस काय, काला गाजर बीट बराबर; चालायचेच!)

....................................................................................

'आणि कांजी म्हणजे जपानी चित्राक्षरलिपी' हेदेखील वाटल्यास चवीनुसार घालून घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंग आकर्षक आहे. गाजर काळे असते/मिळते ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. चित्रे गूगलवर पाहिली. नेहमीच्या लाल गाजरापेक्षा ह्याची चव वेगळी असते का ?
(विनंती : 'सर्व करण्याची विधी' ह्या वाक्याऐवजी 'सर्व्ह् करण्याची पद्धत :' किंवा 'पेश असे करावे :' अशी शब्दयोजना करावी.
मराठीत 'सर्व' हे 'सारे, सगळे' ह्या अर्थी वाचले गेले. 'विधी' हा हिंदीत रूढ असला तरी मराठीत 'विधी'च्या वेगळ्या अर्थामुळे ते थोडे विनोदी होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीत चौकाचौकावर हिवाळ्यात गाजराचा ज्यूस मिळतो. कॉलेजात असताना लै प्यायचो. कांजी मित्रांनी कधी पाजवली असेल पण नाव तरी लक्षात राहिले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

महाराष्ट्रातही बर्‍याच ठिकाणी हल्ली मिळतो हल्ली गाजर ज्यूस. (पुणे व औरंगाबाद इथे तर नक्कीच.)
गाज्र ज्यूस, तृण ज्यूस व अजून काय काय कडावट काढे प्यायल्यावर आयुष्याचे कल्याण होत न केलेल्या व्यायामाची,
अतिरिक्त मद्यपानाने झालेल्या नुकसानीची व चुकीच्या जीवनशैलीमुले झालेल्या नुकसानीची कसर भरून निघेल असं समजणारं बरच नव उच्च मध्यमवर्गीय पब्लिक इथं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोचक पाककृती. थोड्या वेगळ्या स्थानिक पेयाबद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद.
जालावर थोडा शोध घेतला तर ही काळी(जांभळी) गाजरे दिल्लीत थंडीच्या दिवसांत मिळतात असे दिसते.
हीच पाककृती मी बरेचदा पहात असलेल्या या जालनिशीवरही दिसली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात उत्तरेकडे ही काळपट जांभळट गाजरे मिळतात.चव गोड आणि किंचित तीव्र असते. मी एकदाच खाल्ली होती तेव्हा मला विशेष आवडली नव्हती. पण पुण्या-मुंबईकडे बारा महिने मिळणार्‍या केशरी फिकट गाजरांपेक्षा जास्त चवदार होती.
हिवाळ्याच्या सुमाराला महाराष्ट्रातही चविष्ट अशी गडद लाल- गुलाबी गाजरे येतात. त्याचीही अशीच कांजी करता येते. फक्त आपल्याला कांजी म्हणजे पेज- लापशीसारखा शिजवलेला पदार्थ म्हणून माहित असल्यामुळे ह्या पेयाला कांजी म्हणणे थोडे विचित्र वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात मला एक छोटी शंका आहे.

कृतीमध्ये कोठेच शिजविणे, वाफलणे, भाजणे असा काही उल्लेख नाही. मीठ घालण्याचा उल्लेख आहे पण ते मीठ चवीपुरतेच आहे, preservative सारखे होईल इतके जास्त नाही. अशा परिस्थितीत कच्च्या गाजरांमध्ये नुसते पाणी घातले तर ते खराब न होता किती दिवस टिकेल? असे नुसते कच्चे, तेहि तीनचार दिवसांनंतर खाणे हे आरोग्याला धोकादायक नाही काय?

चिवडा, कोशिंबिरी, ऑमलेट असल्या सोप्या बाबींपलीकडे मला स्वयंपाक करण्याचा अनुभव नाही म्हणून ही मूलभूत शंका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत चांगला बनलेला गाजराचा हलवा (बहुतेक दुधात)शिजवून केलेला होता. तरी चार पाच दिवसातच खराब झाला. हा माझा अनुभव ताजा आहे.
तेव्हापासून गाजराचा हलवा दिसला, की शक्य्तो त्याच दिवशी किंवा फार तर दुसर्‍या दिवशी संपवावा असाच प्रयत्न असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा पदार्थ उत्तर भारतासारख्या प्रदेशात हिवाळ्यात करण्याचा आहे. तेव्हा तीन -चार दिवसात पदार्थ खराब होत नाही. थोडा आंबतो, पण ते आंबवणे हाही पाककृतीचा भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे एका रेसिपी शोमधे बीटाच्या कांजीची साधारण अशीच कृती पाहिली होती. काळी गाजरं तर मिळणार नाहीत, पण बीटाची करून पहायला हवी.

'सर्व' हा शब्द बदलावा ही अमुक यांची सुचना योग्य वाटते. माझाही क्षणभराकरता गैरसमज झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0