चपाती "खाण्याचा" कंटाळा आल्यावर करायचे पराठे

साहित्यः
एक वाटी मैदा, एक वाटी गव्हचे पीठ,
ओवा, भजलेले तीळ, जीरे (सर्व १ चमचा)
२ चमचे कसुरी मेथी गरम पण्यात भिजवून
चवीनुसार मीठ, चाट मसाला, तेल, टेबल बटर, पाणी

क्रुती:
मैदा आणि गव्हचे पीठ चाळून घ्या. त्यात ओवा, भजलेले तीळ, जीरे, भिजवलेली कसुरी मेथी, मीठ, पाणी घालून मळून घ्या. मळलेल्या पीठाला थोडे तेल लावून पुन्हा थोडे मळून घ्या. एका ओल्या सुती कापडात हा गोळा गुन्डाळून ठेवा.

तासाभरानी ही कणिक चान्गली भिजेल. आता कणकेचा गोळा करुन मैद्यावर मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या. त्यावर बोटाने थोडे तेल आणि चाट मसाला लावून घ्या. पोळीची त्रिकोणी घडी करून घ्या. घडी करताना प्रत्येक घडीला मध्ये तेल आणि चाट मसाला लावून घ्या. आता हलक्या हाताने पराठा लाटून घेऊन तो बटर लावून भाजून घ्या.

हे पराठे पन्जाबी भाज्यान्बरोबर मस्त लागतात.

मला इकडे भेटा:
मुलुखगिरी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

ऐसीवर स्वागत.
पाकृ सोपी सुटसुटीत आहे. करून बघेन बहुदा

पाकृ बरोबर तयार पदार्थाचे फोटोही बघायला आवडतील.
फोटो कसे चढवावेत हा धागा मार्गदर्शन करेलच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाकृ बरोबर तयार पदार्थाचे फोटोही बघायला आवडतील.>>> +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला असे दिसते छोटुकलीबाईंचा (वदतो व्याघाताचे उत्तम उदाहरण!) ब्लॉग आहेच आणि तेथे त्या फोटोहि चिकटवतात. तेथे लेख प्रथम प्रसिद्ध करून त्याचे readymade HTML coding तेथून उचलले आणि 'ऐसी'च्या 'लेखन करा'मध्ये चिकटविले तरी सर्व चित्रे येथे दिसतील. ह्याचा आणखी लाभ असा की चित्रे साठवण्याच्या अन्य काही संस्थळांवर विनामूल्य सदस्यांच्या चित्रसंख्येवर बंधन असते तसे येथे काहीच बंधन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान! सोपी पाककृती आहे. तरी फोटो पाहीजेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

फोटो नसल्याने चपातीचा कंटाळा येऊ द्यावा किंवा कसे हा गहन प्रश्न सुटला नाही, सबब तोंपासु असा प्रतिसाद देता येत नाहीयेय!

- (छोटूकले फुलके आवडणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवरती स्वागत. करायला अतिशय सोपा प्रकार वाटतो आहे. पण फोटो नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी कल्पनाशक्तीवर सोडायला लागल्या. असो. अशाच पाककृती टाकत जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैदा हा पदार्थ वगळुन हे करता येणार नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मैदा व गव्हाचे पीठ यात फरक काय?
(पाकअज्ञानी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

Maida is a finely milled and refined and bleached (either naturally due to atmospheric oxygen or using other chemical bleaches) wheat flour

http://en.wikipedia.org/wiki/Maida_flour

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

घासलेट ऐवजी केरोसिन वापरुन हे पराठे केल्यास ते अगदी चपातीसारखे लागतात. शप्पथ!

अवांतर: चपातीचा कंटाळा म्हणजे चपाती करायचा कंटाळा की चपाती खायचा? जरा घोटाळा झाला आमचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

ऐसीवर स्वागत. सोपी पाककृती आवडली.

कसुरी मेथी गरम पण्यात भिजवून

यामागे काही कारण आहे का? मी कसुरी मेथी जेव्हा कमी प्रमाणात वापरते, तेव्हा पाण्यात न भिजवताच वापरते सहसा, म्हणून विचारले.

अतुल ठाकुर, मैदा वगळूनही हे पराठे करता येतील, पण ते दिसायला, चवीला किंचीत वेगळे असतील. त्यांचा पोतही वेगळा असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसुरी मेथी पण्यात भिजवल्याने तिचा वास टिकुन रहातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे 'चपाती (करण्या)चा कंटाळा आल्यावर करायचे पराठे' नसून 'चपाती (खाण्या)चा कंटाळा आल्यावर करायचे पराठे' आहेत हे समजण्यास वेळ लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजी अॉप्शनला टाकून दह्याबरोबरही चांगले लागतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...पराठे ऑप्शनला टाकून नुसतेच दही खाल्ले, तरी दहीसुद्धा चांगले लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटु टाकलाच पाहिजे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अक्षय पूर्णपात्रे, शीर्षक बदलत आहे. सूचनेबदाल आभारी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते आता "चपती" झाले आहे "चपाती" ऐवजी!

तशी "चपटी" असते...पण ती वेगळी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सर्वान्ना अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. आता पुन्हा एकदा हे पराठे बनवेन आणि प्रकाशचित्रे टाकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील पाककृती "पाव खाण्याचा कंटाळा आल्यावर करण्याच्या केक"ची टाकावी, ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------/\--------------
==))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मारी आन्त्वानेतसाहिबांनी स्वप्नात येऊन फर्माईश तर नाही ना केली "बै गं गिलोटीनने मरण्याआधी एक केक तरी खायचा होता तो राहिला" म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मारी आन्त्वानेतबाई माझ्या स्वप्नात येऊन मला "बै ग" कशासाठी म्हणेल? (नाही म्हणजे, आन्त्वानेतबाईने माझ्या स्वप्नात यायला आक्षेप नाही, पण...)

(बैदवे, आन्त्वानेतबाई "पाव मिळत नसेल, तर केक खा" असे म्हणालीच नव्हती, ते नंतर कोणीतरी तिच्या नावावर उठवून दिले, अशीही एक थियरी वाचण्यात आलेली आहे.)

================================================================================================================

माणसाने स्वप्ने नेहमी मोठमोठी पाहावीत.

इन विचेवर सेन्स ऑफ द वर्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बै गं हे स्वतःसाठी म्हणाली असेल.

अन पाव नै तर केक खा हे कदाचित वधस्तंभाकडील रस्त्यावरच्या बेकरीकडे पाहून म्हटल्या गेले असावे.

थेरी मीपण ऐकलीये पण थेरीपेक्षा थेरे जास्त रोचक या न्यायाने क्षणमात्र अस्मादिकही थेरवादी जाहले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बै गं हे स्वतःसाठी म्हणाली असेल.

हाय दैवा! एवढी मारी आन्त्वानेतबाई आमच्या स्वप्नात येऊनसुद्धा तिने शेवटी स्वतःशीच बडबडावे ना! हन्त हन्त!! हाय हा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याशी बोलली असेल तो भाग तुम्ही इच्छेप्रमाणे भरावा म्हणून मोकळा ठेवला इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो बोलली खरी. 'पार्डन माय फ्रेंच' अशी इंग्रजीतून प्रस्तावना करून उर्वरित सर्व ती फ्रेंचमधून बडबडली. दुर्दैवाने आम्हांस फ्रेंच कळत नसल्याकारणाने आमच्याकरिता ती अगम्य बडबड स्वतःशी केल्यासारख्यातच जमा होती.

अर्थात, आन्त्वानेतबाई जन्माने ऑष्ट्रियन असल्याकारणाने ती जर्मनमधून बडबडली असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही; आमचे जर्मनचे अज्ञान आमच्या फ्रेंचच्या अज्ञानाइतकेच अगाध असल्याकारणाने नक्की सांगता येणे आम्हांस अशक्य आहे. केवळ त्या 'पार्डन माय फ्रेंच'वरून आम्ही ती फ्रेंचमधून बोलत असावी अशी अटकळ बांधली, इतकेच. (एलेमेंटरी, माय डियर...)

मात्र, अधिक विचाराअंती, ती त्या वेळी वधस्तभाकडे चालली होती - मच अगेन्स्ट हर ओन विल, ऑफ कोर्स - हे लक्षात घेता, ते 'पार्डन माय फ्रेंच' हे 'त्यांना (पक्षी: तिला वधस्तंभाकडे नेऊ करणार्‍या त्या फ्रेंचांना) क्षमा कर (कारण ते काय करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही)' अशा अर्थाने घेता यावे किंवा कसे, अशी शंका आता येऊ लागते. ('पार्डन माय फ्रेंच' मधील 'माय'वरून तिला फ्रेंच जनतेबद्दल प्रचंड ममत्व शेवटपर्यंत वाटत होते, आणि/किंवा ती फ्रान्सला 'आपली फ्रेंच मायभूमी' मानू लागली होती, असे निष्कर्षही अर्थात काढता यावेतच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र, अधिक विचाराअंती, ती त्या वेळी वधस्तभाकडे चालली होती - मच अगेन्स्ट हर ओन विल, ऑफ कोर्स - हे लक्षात घेता, ते 'पार्डन माय फ्रेंच' हे 'त्यांना (पक्षी: तिला वधस्तंभाकडे नेऊ करणार्‍या त्या फ्रेंचांना) क्षमा कर (कारण ते काय करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही)' अशा अर्थाने घेता यावे किंवा कसे, अशी शंका आता येऊ लागते. ('पार्डन माय फ्रेंच' मधील 'माय'वरून तिला फ्रेंच जनतेबद्दल प्रचंड ममत्व शेवटपर्यंत वाटत होते, आणि/किंवा ती फ्रान्सला 'आपली फ्रेंच मायभूमी' मानू लागली होती, असे निष्कर्षही अर्थात काढता यावेतच.)

यावरून गाळीव इतिहासातील मायदेशावरची पुल-कोटी आठवली.

बाकी आन्त्वानेतबाई स्वप्नात आल्याबद्दल हबिणंदण!!! केक्स ऑल ओव्हर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

केक्स ऑल ओव्हर

म्हणजे 'केकावली'च म्हणून सोडा की हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिळे जरि न पौलिका, तरिच हादडा केक हो |
म्हणे खरिच आंतुआनित बघा, अहो लोकहो |
फरान्स् जनपदीं जणों तुमुल पूर्ण केकावली |
मयूरकवि तो जशी रचत पृथ्वि छंदातली ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोनदा उमटल्याने प्रस्तुत प्रतिसादाची ही डुप्लिकेट कॉपी काढून टाकण्यात आलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0