.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
एवढे मोठे आणि त्याचबरोबर
एवढे मोठे आणि त्याचबरोबर सुंदर लिहिलेले लेख बघून कौतुक वाटतं, पहिल्यांदा माहिती जमवून ती कोणत्या शब्दात मांडायची ठरवून नंतर ते मराठीतून मोठ्या लेखाच्या स्वरुपात लिहिणं मलातरी अवघड वाटत. विचार करून एवढे मोठे लेख लिहायला वेळ लागतो आणि आपली कामधाम सांभाळून गवि आणि इतरहि बरेसचे लोक इतके सुंदर लिहितात त्याच मला कौतुक वाटतं.
नेहमीप्रमाणेच
खिळवून ठेवणारं लिखाण. तांत्रिक भाग समजावून सांगण्यासाठी दिलेल्या आकृत्यांमुळे प्रसंग स्पष्ट व्हायला मदत होते.
हा लेख वाचून माझ्या मनात वेगळा विचार आला. आपण शाळेत काहीतरी घोकंपट्टी करून शिकतो. पण त्यातला बहुतांश भाग नीरस असतो. त्यापेक्षा एक एक संकल्पना शिकवण्यासाठी अशी रोमहर्षक कथा गुंफली तर अनेकांना ती संकल्पना आपोआप लक्षात राहील. ट्रांझिशन लेव्हल, आल्टिट्यूड, फ्लाइट लेव्हल या सर्व गोष्टी आता मी जन्मभर विसरणार नाही. एवढंच नव्हे तर त्या संकल्पनेचा प्रत्यक्ष जगात कुठे संबंध येतो याचीही पक्की जाण येईल.
दुर्दैवाने शिक्षण देताना मुलांना किती आनंद होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे ही आजकाल रुजायला लागलेली कल्पना आहे.
काळ आणि वेळ
अरेरे.. काळ आणि वेळ एकदम आली! :(
असो. काय झ्याक समजावता हो तुम्ही! येत राहुदे असे काहि