डार्क चॉकलेट ट्रफल्स

_DSC0282

काही वर्षांपूर्वी एरो चॉकलेट्सची एक जाहिरात पाहिली... त्यातला मदनाचा पुतळा बरंच काही बोलतो पण एकूण त्या जाहिरातीत लक्ष इतकं विचलित होतं...:p की काही मोजकेच शब्द ऐकू येतात. जसे "चॉकलेट ३६ अंश तापमानाला वितळतं" वगैरे. अर्थात या शब्दांखेरीज बाकीचं काहीच महत्वाचं तो बोलत नाही हे एकदा डोळे मिटून ऐकल्यावर कळलं.

चॉकलेटचं असं शरीर तापमानाला वितळणं, त्याचा गडद तपकीरी रंग, किंचित कडवट पण तीव्र चव, त्याची स्निग्धता वगैरे गुणधर्मांनी माझं चॉकलेट्सबरोबर मोठंच प्रेमप्रकरण आहे. अर्थात ते चॉकलेट डार्कच हवं, फार गोडही नको, फार अगोडही नको, गार नको, मऊ हवं पण अगदी वितळलेलं नको वगैरे अनेक 'गोल्डीलॉक्स मागण्या' असल्याने बाजारतून आणलेलं काहीही चालेल असं होत नाही. घरी बनविलेल्या डार्क चॉकलेट ट्र्फल्सचं मात्र जेवण करू शकते.
ही ट्रफल्स बनवायला अतिशय सोपी असतात पण त्यात वापरलेले जिन्नस फार चांगल्या प्रतीचे वापरले तरच त्याचा स्वाद मनासारखा उतरतो. त्या जिन्नसांबद्दलच्या टिपा खालीलप्रमाणे:
१) चॉकलेट : किमान ७०% कोकोचे प्रमाण असलेले उत्तम प्रतीचे चॉकलेट. वाण्याच्या दुकानात सहजपणे मिळणार्या ब्रँड्सपैकी लिंड्ट किंवा ब्लेक्स ही दोन्ही चॉकलेटे वापरून मी यशस्वीपणे ट्रफल्स बनविली आहेत.
२) क्रीम - हे क्रीम 'डबल क्रीम', 'हेवी व्हिपिंग क्रीम' वगैरे नावांनी ओळखले जाते. या क्रीममधे किमान ३५% घनता असल्याशिवाय ट्रफल्सचा गोळा होणार नाही.
३) लोणी - शक्यतो उत्तम दर्जाचे लोणी वापरा. माझ्या अनुभवाप्रमाणे ऑर्गॅनिक विभागात मिळणारे, किंचित पिवळसर दिसणारे आणि आर्द्रता कमी असलेले लोणी वापरलेले चांगले.
४) कोको पावडर - साखर न मिसळलेली (डच किंवा साधी) अनप्रोसेसेस्ड कोको पावडर.
५) संत्र्याची साल - ट्रफल्समधे संत्र्याची किसलेली साल छान लागते पण साल किसताना फक्त त्याचा केशरी भाग घ्यायची काळजी घ्यावी कारण पांढरा भाग खूप कडू असतो. ही साल कशी किसायची वगैरेसाठी इथे थोडी माहिती आहे. हे संत्रे म्हणजे साल सहज निघून येणारे नागपुरी संत्रे नव्हे तर मोसंबीसारखी कठीण साल असलेले संत्रे.

साहित्यः

डार्क चॉकलेट २५० ग्रॅम
डबल क्रीम १७५ मिली (पाऊण कप- २५० मिलीचा)
मध ६५ मिली
लोणी ६५ ग्रॅम
संत्र्याची किसलेली साल १ चमचा
वरून लावण्यासाठी - आवडीप्रमाणे कोको पावडर किंवा बदामाचा अथवा पिस्त्याचा चुरा किंवा डेसिकेटेड खोबरे इत्यादी.

Truffles-1 Truffles-2
Truffles-3 Orange-2
Orange-1 Truffles-4
Truffles-5 _DSC0276
_DSC0279 Truffles-6

कृती:

१) चॉकलेटचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यावे. तुकडे जितके बारीक करून घ्याल तितके ते पटक्न वितळतील.
२) एका उथळ भांड्यात (बाऊलमधे) चॉकलेटचे तुकडे ठेवावेत.
३) एका भांड्यात क्रीम गरम करायला ठेवावे, उकळू नये पण चांगले गरम करून घ्यावे.
४) संत्र्याची साल किसून घ्यावी.
५) चॉकलेटच्या तुकड्यांवर गरम क्रीम ओतावे व चमच्याने घोटत एकसंध करत रहावे, मध आणि लोणीही मिश्रणात मिसळावे.
६) चॉकलेट पूर्ण वितळले पाहिजे, त्यामुळे क्रीम गरम असतानाच चांगले घोटावे. तरीही गुठळ्या राहिल्याच तर डबल बॉयलरवर मिश्रण थोडे गरम करत घोटावे.
७) या प्रकारे तयार झालेल्या चॉकलेटच्या चकचकीत मिश्रणाला चॉकलेट गनाश म्हणतात. या गनाशमध्ये आता संत्र्याची किसलेली साल मिसळावी. संत्र्याच्या सालीऐवजी पुदीना, रम किंवा इतर कोणते स्वाद आवडत असतील तर तेही याच वेळेस मिसळता येतील.
८) चॉकलेट गनाश एका डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवावे. दोन ते चार तासांत मिश्रण छान घट्ट जमून येईल. फ्रीजच्या तापमानावर किती वेळ लागेल ते ठरेल, काहीवेळा रात्री बनवून सकाळपर्यंत ठेवावे लागते.
९) एका थाळीत कोको पावडर (किंवा बदामाचा चुरा किंवा पिस्त्याचा चुरा किंवा डेसिकेटेड खोबरे) पसरून घ्यावी.
१०) एक चमचा गरम पाण्यात बुडवून घ्यावा व गनाशमध्ये ओढून एक चमचाभर गनाश हातावर घेऊन त्याची गोळी बनवून घ्यावी. हाताच्या उष्णतेने चॉकलेटचा वरचा भाग थोडा वितळेल आता तो गोळा कोको पावडरमध्ये घोळून घ्यावा.
११) ट्रफल्स तयार झाल्यावर लगेच खावेत आणि उरलेले फ्रीजमध्ये ठेवावेत, साधारण आठवडाभर छान रहातात.
१२) उरलेल्या ट्रफल्सचे हॉट चॉकलेटही चांगले बनते, एका कपमध्ये एक-दोन ट्र्फल्स टाकून त्यावर गरम दूध ओतावे व त्यात चॉकलेट विरघळून घ्यावे, हवे असल्यास त्यात थोडी साखरही मिसळावी.

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

तोंडाला पाणी सुटलं, कशामुळे ते अगदी स्पष्टपणे सांगायची गरज नसावी, नाही? Wink

येत्या आठवड्यात सवडीने हे बनवते आणि गुरुदक्षिणा म्हणून फोटो दाखवते. बाकी लोकशाहीचा विजय असो. खरडवहीत जाऊन घोषणा देण्याचाही विजय असो. आता पुढची फर्माईश बिस्कोटीची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आहाहा!!! नेहमीप्रमाणाचे झकास पाककृती _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह वाह प्रकरण भारी दिसतंय, आणि तितकंच भारी लागेल असेही दिसतेय! पण आम्ही सध्या वेगाने वाढत चाललेल्या वजनामुळे चिंतेत आहोत, बहुतेक फोटो पाहूनच अर्धा एक किलो वाढलं असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

या कृतीने बनलेली ट्रफलं स्वतः खाल्लेली असल्यामुळे

ट्रफल्स तयार झाल्यावर लगेच खावेत आणि उरलेले फ्रीजमध्ये ठेवावेत, साधारण आठवडाभर छान रहातात.

यावर बिलकुल विश्वास नाही. हा प्रकार आठवडाभर टिकणं शक्य नाही. कितीही केली असली तरी दोन दिवसांतच त्यांची चटणी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाककृतीत दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात आणि चित्रात दाखविलेल्या गोळ्यांच्या आकारमानाने साधारण किती ट्रफल्स् बनतील ?
(करता करता पोटात गेलेली ट्रफल्स धरून सांगा बरं का ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारणपणे ३०-३५ ट्रफल्स बनतील, अर्थात आकारावर अवलंबून आहे. मला ते छोटेच बनवायला आवडतात म्हणजे आख्खे तोंडात टाकता येतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव म्हंजे शिंपळी वॉव!!

आता नेहमीसारखेच प्रश्नः
यातील चांगल्या मट्रियल्ससाठी भारतातील ब्रॅन्ड्स (तुम्ही नैतर इतर कोणी भारतातल्यांनी) सांगा प्लीज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, हा ब्लॉग पाहून घ्या, पाश्चात्य पदार्थांसाठी भारतात मिळणारे सबस्टिट्यूट्स इथे दिले आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमूलचे क्रीम आणि Callebaut and Ghiradelliचे चॉकलेट भारतात मिळेल. मला वाशीच्या एका मॉलमधे लिंड्टचे डार्क चॉकलेट पाहिल्यासारखे वाटतेय. क्रीमबद्दल एक सूचना, जर त्याचा स्निग्धांश ३५% हून कमी असेल तर क्रीमचे प्रमाण थोडे कमी करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक आभार!हे लय झ्याक काम केलंत!
धागा वाचनखूणेत टाकतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> यातील चांगल्या मट्रियल्ससाठी भारतातील ब्रॅन्ड्स (तुम्ही नैतर इतर कोणी भारतातल्यांनी) सांगा प्लीज <<

पुण्यात फाईन फूड्स आणि दोराबजीकडे डबल क्रीम आणि डार्क चॉकलेटची जाड लादी मिळते. शिवाय अगदीच हवं असेल तर प्रेसिडेंट्स बटर वगैरेसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरे ट्रफल्स हा एक कंद असून युरोपातील एक दुर्मिळ खाद्यपदार्थ आहे. खरी कॅविआर जशी दुर्मिळ आहे तसेच. अधिक माहितीसाठी पहा http://en.wikipedia.org/wiki/Truffle.

चॉकोलेट ट्रफल्स म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या ट्रफलचा आणि या ट्रफल्सशी काहीच संबंध नाहीय हे खरे आहे, कदाचित आकाराच्या साधर्म्यामुळे तसे म्हटले जात असावे.
पण 'दुधाची तहान ताकावर'शी असहमत. ब्लॅक आणि व्हाईट ट्रफल्स दोन्हीचा आस्वाद घेतला आहे आणि त्याच्या स्वादाचे तेलही स्वयंपाकात वापरते त्यामुळे तो खरोखरीच उत्कृष्ट स्वाद (आणि मुख्यतः वास) असला तरी केवळ नावाशी साधर्म्य असलेले हे चॉकलेट ट्रफल्सही काही कमी चविष्ट नाहीत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची माहिती बरोबर आहे. अतिशय दुर्मिळ आणि त्यामुळेच फार महाग असा हा कंद आहे. त्यामुळे त्याला 'काळा हिरा' असेही संबोधले जाते. कंदाची चव तीव्र असते आणि ट्रफलचे तेलही स्वयंपाकात वापरले जाते.
असे असले तरी शेवटचे वाक्य अस्थानी वाटले. हे म्हणजे गुलाबजामुन पाहून खर्‍या जामुनाचे (जांभळाचे) चित्र दाखविण्यासारखे आहे.
ट्रफल्सच्या केवळ दिसण्यातील साधर्म्यामुळे हे नांव पडले आहे. इथे पाहा. ते अक्षरशः चॉकलेट ट्रफलसारखेच दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चॉकोलेट ट्रफल्स म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे आहे.

हे(च) ट्रफल्स खाल्लेले असल्याने म्हणतो, तक्रं शक्रस्य दुर्लभम् Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सुंदर पाककृती Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाककृती आणि फोटो - नेहमीप्रमाणेच क्लास!
(संत्र्याच्या सालीप्रमाणेच चॉकलेटचा स्वाद अधिक खुलवण्यासाठी जराशी कॉफी या पाकृत चालून जावी काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहित्यातील क्रीमचे प्रमाण दोन-तीन चमच्यांनी कमी करून त्याजागी तेवढीच एस्प्रेसो किंवा तशीच स्ट्राँग कॉफी नक्कीच चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डार्क चॉकलेट(च) आवडते. नक्की करून बघणार. स्लो कुकरबरोबर एक छोटं भांड आलं आहे, डीपर म्हणून, त्यामुळे डबल बॉयलरचीही भानगड नाही करायला लागणार. भांड्याच्या उद्घाटनासाठी एक छानशी रेसीपी शोधतच होते. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0