द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ!

द बॅड म्हणुन काम केलेला “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंजल आय ली व्हान क्लीफ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान. त्यातुन सर्जीयो लिऑनसारखा क्लोजअपवेडा दिगदर्शक मिळाल्यास पाहायलाच नको. सर्जियोने या नजरेचा पुरेपुर वापर करुन घेतला आहे. उंचीपुरी देहयष्टी, त्याला सजेसा वेस्टर्नपटातील तो पोशाख. ओठात पाईप पकडुन व्हानक्लीफ पडद्यावर आला की बाकीचे सारे काहीवेळ धुसर वाटु लागतात. त्याचं आगमनच स्क्रीन व्यापुन टाकणारं असतं. हे जणुकाही कमीच म्हणुन की काय त्याचा तो बसकट, काहीसा खर्जातला धडकी बसवणारा आवाज. तो बोलु लागल्यावर तो आवाज आणि ती नजर प्रेक्षकांना खिळवुन टाकते.

व्हान क्लीफच्या “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंट्रीला इनिओ मोरीकोनने असं काही पार्श्वसंगीत वापरलं आहे कि या माणसाच्या येण्याने भयंकर वादळ येणार आहे याची प्रेक्षकाला चाहुल लागावी. त्यानंतरचे दृश्य हे चवीचवीने पाहण्याजोगे. सर्जियोचे टाईट क्लोज अप्स आणि वेस्टर्नपटातील ते रापलेले चेहरे. बराचवेळ कुणीचे काही बोलत नाही. आणि मग समोरच्याला व्हानक्लीफची ती नजर जणु असह्य होते आणि तो बोलु लागतो. व्हानक्लीफ त्याला मांजराने उंदराला मारण्याआधी खेळवावं तसा खेळवतो. हवी ती माहीती मिळाल्यावर ठार मारतो. त्याच्या मुलालाही सोडत नाही. आणि ज्याच्याकडुन पैसे घेतले त्यालाही ठार मारुन दडवलेल्या संपत्तीच्या मागावर स्वतःच बाहेर पडतो.

व्हानक्लीफचा एंजल आय हा चित्रपटातील वेगळा खलनायक गणला जायला हवा. अत्यंत हिशेबी, थंड डोक्याचा, सावजाच्या मागावर चिकाटीने असलेला, काम साधण्यासाठी कुठल्याही थराला जाणार्‍या असा खलनायक व्हान क्लीफने या चित्रपटात उभा केला आहे. विद्युतवेगाने पिस्तुल काढुन अचुक नेम साधण्याची क्षमता असलेल्या या माणसाशी मुकाबला करण्यासाठी त्याच्यासारख्याच नेमबाज अशा दोघांना एकत्र यावं लागतं यातच त्या भुमिकेची ताकद दिसुन येते.

मला आजही असं वाटतं की व्हान क्लीफच्या प्रतिभेला योग्य न्याय देणार्‍या भूमिका त्याच्या वाट्याला फार कमी आल्या. विधात्याने हॉलिवूडसाठी ली व्हान क्लीफ हे रसायन एकदाच तयार केलं. तसा पुन्हा होणे नाही.

अतुल ठाकुर

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

बॅडचं नाव ली व्हान क्लीफ आहे हे आज नव्याने कळाले!!! नवीन माहितीकरिता धन्यवाद. Smile

त्या संपूर्ण पिच्चरमध्ये त्याची अ‍ॅक्टिंग जबरी आहेच-त्यातही शेवटच्या ८ मिनिटांच्या ट्रिपल थ्रेट सीनमधले नाट्य सर्वांत जबरदस्त. अन गुड & अग्लीची जुगलबंदीही तितकीच जबरी!!!

तो पिच्चर साला लै खतरनाक आहे. ते जगप्रसिद्ध मूझिक, ते टिपिकल वाईल्ड वेस्टमधले लढाई अन मारामारीचे जबराट सीन्स आणि तितकेच मस्त ड्वायलॉक्स आणि काही फँटास्टिकली विनॉदी सीन्स-बॉलीवुडाची आठवण येणारे- उदा. शिग्रेटीने तोफ डागण्याचा शीन- हे सर्व रसायनच एकदम नादखुळा आहे.

त्यातला तो "व्हेन यू हॅव तु शूत, शूत. दोन्त तॉक!" हा 'द्वायलाक'ही तितकाच जबराट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याच्या नजरेचं वर्णन आवडलं. "भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर..."

ली व्हान क्लीफचा, या ट्रिलॉजीमधल्या दुसऱ्या सिनेमातला अभिनयही खतरनाक आहे. शेवटी जेव्हा रहस्य उलगडतं तेव्हा याचा 'दगडी' चेहेरा काय बघायचा असा प्रश्न पडेल, पण तरीही ते त्याने निभावून नेलंय.

मला तिसऱ्या सिनेमातला टुकोच सगळ्यात जास्त आवडतो. टुकोचं पात्र भावखाऊ लिहीलेलं आहे आणि एली वॉलाशने ते कामही भारी केलंय. 'गॉडफादर'च्या कोणत्याशा भागात (बहुदा दुसरा भाग) एली वॉलाश पुन्हा दिसतो, तेव्हा त्याला पाहून फारच आनंद झाला होता. भूमिका फारच निराळी, पण छोटी असली तरीही तो लक्षात राहिलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.
त्यातला अग्ली म्हणजे ली व्हॅन क्लिफ आणि बॅड म्हणजे एली वालाच असे आतापर्यंत वाटत होते. पुन्हा बघायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान.

मस्त! याच ली व्हान क्लिफने फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर मध्येही छान काम केलं आहे. त्यातला क्लिंट ईस्टवुड आणि त्याचा टोपी उडवण्याचा सीन तर मनात घर करून बसणारा आहे.

वेस्टर्न सिनेमांमध्ये येणारी पात्रं ही 'एनिग्मॅटिक' (प्रतिशब्द?) असतात. बोलतात कमी. आत काहीतरी साठवून ठेवतात. चेहऱ्यावरच्या हावभावांनी खूप काही सांगतात. तसं सांगणाऱ्या बोलक्या चेहेऱ्यांपैकी हा एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Enigmatic - गूढ, कूट चालेल का?

- (शब्दप्रेमी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0