उसगावात यशस्वी होण्यास वंशाचा (Race) वाटा किती?

Amy Chua आणि वादंग यांचा संबंध तसा बर्‍यापैकी जुना....या बाई येल विद्यापीठात कायदा विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
बालसंगोपनाविषयी (अमेरिकेतील) पौर्वात्य व पाश्चिमात्य पालकांतील (त्यांना जाणवलेल्या) फरकांवर त्यांनी एक पुस्तक (http://en.wikipedia.org/wiki/Battle_Hymn_of_the_Tiger_Mother) २०११ साली लिहिले. त्यात त्यांनी असा दावा केला की कठोर (प्रसंगी जाचक वाटेल अशी) शिस्त लावणारे पालक (पक्षी: चिनी व तत्सम आशियी वंश) हे इतर पालकांपेक्षा (पक्षी: अमेरिकीय) वरकस ठरतात..

त्यांचे नवे पुस्तक (The Triple Package) असे मांडू पहाते की, उसगावात (पक्षी: अमेरिका) यशस्वी होणार्‍या काही वंशसमूहांत (चिनी, मॉर्मन, भारतीय, ज्यू, इराणी, लेबनीज, नायजेरीयन आणि क्यूबन) खालील तीन गोष्टी प्रामुख्याने आढळतात:
१. स्वतःबद्द्लचा (साधार/निराधार) अभिमान (a superiority complex चे नेमके रुपांतर कसे करावे?)
२. स्वत:बद्द्ल / आपल्या क्षमतांबद्द्ल अपूर्णतेची भावना (आपण याहून चांगले करु शकतो)
३. स्वतःवरील ताबा/नियंत्रण

या पुस्तकाचा परिचय टाईम वेबसाईटवर खालील लिंकवर वाचता येईल..
http://ideas.time.com/2014/01/31/amy-chuas-new-book-might-make-you-uncom...

तर मग होऊ द्या चर्चा!

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स

सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स = अहंगंड

धागा

धागा वर आणत आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

समीक्षा आवडली, विशेषतः ;-)

न्यु यॉर्करच्या समीक्षेतील वाक्य

Still, the book is profoundly regressive—...grandparentish,

आस्मादिकांनी न्यु यॉर्क टाईम्सच्या लेखावर दस्तुरखुद्दांच्या मित्राच्या फेसबुकावर दिलेल्या प्रतिक्रीयेतील भाग.. (जानेवारी २६)

Some of the comments are (refreshing?) reminders of people of my grandfather generation.

न्यु यॉर्कातील ज्यू आजोबा पिढी आणि आमच्यासारख्या घाटी लोकांची आजोबा पिढीतील साम्य गमतीदार आहे! (डोळा मारत)

धन्यवाद

सर्वप्रथम निळे व चिंतातुर जंतू यांचे लिंकांबद्दल आभार..

मला स्वत:ला केवळ या बातमीच्या अनुषंगाने चर्चा अपेक्षित होती (बहुदा 'ही बातमी कळली का' हा धागा अधिक उचित ठरला असता, असं आता वाटतंय..असो)

घासकडवींचा सिलेक्शन बायसचा मुद्दा अचूक आहे.

<<सांस्कृतिक/धार्मिक विविधता भरपूर असणार्‍या कोणत्याही देशांत ते तितकेच लागु व्हावे.>>
ही पुढली पायरी झाली..विदा मिळाल्यास यावर छान काम होऊ शकेल..

ओह अच्छा.

ओह अच्छा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

विदा गोळा केल्यावर अनालिसिस

विदा गोळा केल्यावर अनालिसिस सोपा आहे. अडचण आहे ती म्हणजे माझ्याकडे तो विदा नाही.

येकतर मी उसगावात नाही दुसरे,

येकतर मी उसगावात नाही
दुसरे, मी यशस्वी आहे.
सबब, या चर्चेत माझा काय्बी संबंद न्हाई.
बाय्बाय टाटा!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माझा दावा असा आहे की

माझा दावा असा आहे की व्हेरिएबल कंट्रोल करून रिग्रेशन अॅनालिसिस केल्यास 'पालकांची शैक्षणिक पातळी' हा मुद्दा वंशापेक्षा महत्त्वाचा ठरेल. हा अॅनालिसिस करणं कटकटीचं आहे, त्यामुळे मी नुसता दावा मांडूनच थांबतो.

फार कै कटकटीचं नै. एकतर रिग्रेशन करा नैतर सरळ झेड टेस्ट केली तरी चालू शकेल. रिग्रेशन टेस्टीत तर दोन्ही फ्याक्टरची पी व्हॅल्यू कंपेअरवली तर फटक्यात समजून येईल.

पण मग त्यात जर दोन्हीही सिग्निफिकंट आले तर मात्र मजा आहे खरी (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तर त्यामागची कारणमिमांसा

तर त्यामागची कारणमिमांसा मांडताना जमातीच्या संस्कृतीचा आधार घेतल्यास त्यास रेसिझम न ठरवता विश्लेषणाचा एक मुद्दा म्हणून बघता येऊ शकतं.

बरोब्बर! जनुकीय आणि सांस्कृतिक कारणांची गल्लत होत नाही तोपर्यंत असं डोळस विश्लेषण फायद्याचं ठरू शकतं.

वाटप हा शब्द मला आता चुकीचा

वाटप हा शब्द मला आता चुकीचा वाटतो. कारण त्यात थोडं झीरो सम गेमचा वास येतो. मला तिथे वाटप हा शब्द स्टॅटिस्टिकल डिस्ट्रिब्यूशन या अर्थाने म्हणायचा होता. 'पालकांमध्ये असलेलं शिक्षण/इच्छा/ऐपत या गोष्टींचं वैविध्य (स्टॅटिस्टिकल डिस्ट्रिब्यूशन) हे खरं मूलभूत कारण आहे, वंश नव्हे. वंश हे कारण असल्याचा आभास निर्माण येतो कारण विशिष्ट वंशाचे लोक या लोकसंख्येत समाविष्ट झाले, ते एका चाळणीतून (शिक्षण/इच्छा निवडणाऱ्या) पार झालेले आहेत. गेल्या काही वर्षांत या दोनच्या जोरावर त्यांनी ऐपतही मिळवली आहे.'

माझा दावा असा आहे की व्हेरिएबल कंट्रोल करून रिग्रेशन अॅनालिसिस केल्यास 'पालकांची शैक्षणिक पातळी' हा मुद्दा वंशापेक्षा महत्त्वाचा ठरेल. हा अॅनालिसिस करणं कटकटीचं आहे, त्यामुळे मी नुसता दावा मांडूनच थांबतो.

न्यू यॉर्करमधली समीक्षा

ह्या पुस्तकाची मला आवडलेली समीक्षा 'न्यू यॉर्कर'मध्ये आली होती - दुवा. दोन मार्मिक वाक्यं -

The book feels expressive, rather than analytical.

By articulating the world view behind their parenting style, they [लेखक] hope to make it seem less strange, both to us and to themselves. If that’s the case, the book is actually quite American in its outlook. Its goal is self-understanding, also known as “feeling secure about yourself” and “embracing yourself as you are.”

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मत

एमीचे पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे खालील मत वृत्तपत्रांमधे वाचलेल्या लेखांवरुन झाले आहे, पुस्तकाचे नाव आणि काही घाई-गडबडीत काढलेल्या निष्कर्षांबद्दल सर्वसाधारण टिका आढळून आली.

त्यामुळे 'रेस' (वंश) या घटकापेक्षा शैक्षणिक 'रेस'मध्ये (स्पर्धेत) भाग घेण्याची, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी/इच्छा असलेल्यांची मुलं तिथे यशस्वी होतात. यात खरं तर आश्चर्यकारक काहीच नाही.

एमीचं पुस्तक जबरदस्तीचं रिडक्श्निझम आहे असा आरोप काही रिव्ह्यूंमधे जाणवला. राजेशचं वरचं वाक्य मला ओव्हर-सिम्प्लिफिकेशन किंवा ओव्हररिडक्शन वाटलं. ठराविक पातळीवरचं विश्लेषण कृतीशील निष्कर्षाला पुरक ठरतं, काहिच जमाती सातत्याने जर यशस्वी होत असतील तर त्यामागची कारणमिमांसा मांडताना जमातीच्या संस्कृतीचा आधार घेतल्यास त्यास रेसिझम न ठरवता विश्लेषणाचा एक मुद्दा म्हणून बघता येऊ शकतं.

एमीचं हेच विश्लेषण ठराविक प्रमाणात अमेरिकन मुख्य प्रवाहात इतरही विचारवंत नियमीत करत असावेत, त्याचंच एक प्रतिबिंब यशस्वी ठरलेल्या अमेरिकेतल्या कीप चार्टर शाळेच्या पद्धतिमधे दिसतं. कीपच्या यशाबद्दल थोडाफार वाद असले तरी त्यांच्या यशासाठी त्यांच्या पद्दतीलाच श्रेय दिले जाते.

मजेशीर बाब ही की - टाईम वालेच नेहमी विविधता हवी विविधता हवी अशी बोंब मारत असतात. पण ज्या क्षणी तुम्ही रिलेटिव्ह परफॉर्मन्स बद्दल बोलायला सुरु करता त्याक्षणी तुम्ही रेसिस्ट ठरता.

काही अंशी सहमत.

>> This question is at the

>> This question is at the root of the socialism vs capitalism debate.

ह्म्म्म

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मुख्य प्रश्न सुबत्ता आणि

मुख्य प्रश्न सुबत्ता आणि शिक्षणाचं योग्य वाटप करण्याचा आहे.

शंभरातले पाचशे लोक माझ्याशी असहमत असणारेत. पण - This question is at the root of the socialism vs capitalism debate.

त्याच प्रमाणे, इथेही इच्छा,

त्याच प्रमाणे, इथेही इच्छा, ऐपत आणि संस्कार या गोष्टी 'रेस'पेक्षा महत्त्वाच्या आहेत. पण ही छापण्याइतकी चमचमीत गोष्ट नाही.

१) इच्छा
२) ऐपत
३) संस्कार

यातील क्र. ३ हा क्र. १ चा ड्रायव्हर आहे असे मला वाटते. किमान काही प्रमाणावर तरी.

व क्र. ३ हा रेस नुसार बदलतो असे म्हणण्याचे unsubstantiated धाडस करतो.

मायकेल पोर्टर ने त्याच्या स्ट्रॅटेजी वरच्या पुस्तकात असे म्हंटले होते की - Strategy will be successful if actions that support the strategy essentially reinforce each other. (शब्द माझे, आशय त्यांचा.) ते आठवले.

+१

इथेही इच्छा, ऐपत आणि संस्कार या गोष्टी 'रेस'पेक्षा महत्त्वाच्या आहेत. पण ही छापण्याइतकी चमचमीत गोष्ट नाही.

अगदी असेच.

मूळ लेख वाचायच्या आधीच माझी

मूळ लेख वाचायच्या आधीच माझी काही निरीक्षणं सांगतो.

सर्वप्रथम यशाची व्याख्या ही भौतिक सुखांनी मोजणं सगळ्यात सोपं जातं (ती योग्य आहे असं नाही) त्यामुळे अमुकतमुक यशस्वी झाला म्हणजे त्याच्याकडे 'अमेरिकन ड्रीम'साठी आवश्यक अशा गोष्टी असणं ही घेतो आहे. म्हणजे उच्च शिक्षण, चांगला पगार/नोकरी, घर, गाड्या, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे उत्पन्न.

अशा तुलनांना एक प्रचंड सिलेक्शन बायस असतो. गेल्या पंधरावीस वर्षात अमेरिकेत आलेले भारतीय आणि चीनी लोक हे मुख्यत्वे त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वावर आले. शिका, कष्ट करा, नोकरीत भरपूर काम करा हा मंत्र अंगीकारलेले लोक अमेरिकेत आले. आणि त्या स्वभावातही भर असते ती म्हणजे पैसा मिळवण्यासाठी आपला देश सोडून नवीन ठिकाणी स्थायिक होण्याची इच्छा असलेलेच लोक आले. म्हणजे अमेरिकेत पिढ्या न पिढ्या काढलेले आणि हे नवअमेरिकन यांच्यात अनेक बाबतीत सरासरीत फरक आहे.

अशांची मुलं ही अभ्यासात पुढे असतात. याचं कारण म्हणजे त्यांच्यावर जे संस्कार झाले तेच ते आपल्या मुलांवर करतात. 'शिक्षणात अव्वल असणं प्रचंड महत्त्वाचं आहे' हे गृहितक मुलांवर बिंबवतात. मुलाने अभ्यासात पुढे असावं यासाठी कष्ट घेण्याची तयारी आणि क्षमता बाळगून असतात, आणि ती ते वापरतात. सरकारी शाळांमध्ये घालण्याऐवजी महागड्या, खात्रीने शैक्षणिक तयारीवर भर देणाऱ्या शाळांमध्ये मुलांना घालण्याची त्यांची तयारी आणि ऐपत असते. (बे एरियामध्ये एक महिना १०००-१५०० डॉलर घेणारी नावाजलेली शाळा आहे. या शाळेत ९७% विद्यार्थी आशियाई असतात. याउलट सरकारी शाळांमध्ये शिक्षण फुकट असतं. त्याही शाळा छानच असतात, पण ही अधिक चांगली आहे.) हे वाईट आहे असं म्हणत नाही, फक्त वेगळेपणा सांगतो आहे. या सर्वांचा परिणाम अर्थातच दिसतो.

त्यामुळे 'रेस' (वंश) या घटकापेक्षा शैक्षणिक 'रेस'मध्ये (स्पर्धेत) भाग घेण्याची, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी/इच्छा असलेल्यांची मुलं तिथे यशस्वी होतात. यात खरं तर आश्चर्यकारक काहीच नाही.

अशा सिलेक्शन बायसमुळे गंडलेल्या इतर अभ्यासाचं उदाहरण सांगतो. 'अमेरिकन लोकसंख्येत काळ्यांचं प्रमाण १०% असूनही तुरुंगांत मात्र ४०% काळे दिसून येतात' यावरून अनेक चुकीचे निष्कर्ष काढता येतात. उदाहरणार्थ
- काळ्या वंशाचे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात.
- अमेरिकेत वंशभेदापोटी काळ्या लोकांवर अन्याय केला जातो.
नीट तपासून बघितलं तर असं लक्षात येतं की बहुतांश गुन्हेगार हे गरीब/अशिक्षित असतात. अशा लोकसंख्येचं प्रमाण काळ्या आणि गोऱ्यांमध्ये बघितलं तर तुरुंगातल्या लोकसंख्येशी मिळतंजुळतं ठरतं. तेव्हा योग्य निष्कर्ष असा आहे की काळा असो की गोरा, गरीब/अशिक्षित लोक अधिक प्रमाणात गुन्हे करतात, आणि न्यायव्यवस्था ठीकठाक चालली आहे. मुख्य प्रश्न सुबत्ता आणि शिक्षणाचं योग्य वाटप करण्याचा आहे.

त्याच प्रमाणे, इथेही इच्छा, ऐपत आणि संस्कार या गोष्टी 'रेस'पेक्षा महत्त्वाच्या आहेत. पण ही छापण्याइतकी चमचमीत गोष्ट नाही.

Suketu Mehta writes in TIME

Suketu Mehta writes in TIME that the book represents “the new racism—and I take it rather personally.” Mehta adds that “the language of racism in America has changed . . . It’s not about skin color anymore—it’s about ‘cultural traits.’”

फक्त रेफरन्सेस देतो - गॅरी बेकर, थॉमस सॉवेल आणि नुकतेच निवर्तलेले डेव्हिड लँडेस या तिघांनी सुद्धा याविषयावर लिखाण केलेले आहे. "कल्चर" हा प्रायमरी ड्रायव्हर आहे यशस्वितेमागे असे लँडेस व सॉवेल यांनी म्हंटलेले आहे. हे तिघे त्यामुळे (अर्थातच) वादाच्या भोवर्‍यात सापडले होते.

---

मजेशीर बाब ही की - टाईम वालेच नेहमी विविधता हवी विविधता हवी अशी बोंब मारत असतात. पण ज्या क्षणी तुम्ही रिलेटिव्ह परफॉर्मन्स बद्दल बोलायला सुरु करता त्याक्षणी तुम्ही रेसिस्ट ठरता.

बहुधा हायली टॅलेंटेड मुलांना

बहुधा हायली टॅलेंटेड मुलांना पेरेंटिंग कसे आहे त्याने खूप फरक पडत नसावा (त्यांना कशानेच काही फरक पडत नाही म्हणा).
पण मॉडरेटली टेलेंटेड आणि मिडिऑकर मुलांना फरक पडत असावा. म्हणजे या गटातल्या ज्या मुलांचे पालक पंतोजी (रेजिमेंटेड अपब्रिंगिंग) असतील ती मुले ज्यांचे पालक हॅपी गो लकी असतील त्यांच्यापेक्षा अधिक यश मिळवत असतील. [असा माझा हंच आहे].

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

+१००

हेच टायपायला आलो होतो.

शिवाय कष्ट करुन पै-पै जोडून श्रीमंत झालेला माणूस यशस्वी की पैसे येतील तसे उडवून आणि वर कर्ज काढून मजेत जगलेला माणूस यशस्वी यावर वेगळा वाद होऊ शकतो.

Hope is NOT a plan!

रोचक आहेच. पण हे परिमाण फक्त

रोचक आहेच. पण हे परिमाण फक्त उसगावीच का असावे?
सांस्कृतिक/धार्मिक विविधता भरपूर असणार्‍या कोणत्याही देशांत ते तितकेच लागु व्हावे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वप्रथम यशस्वी होण्याची व्याख्या सांगा

सर्वप्रथम या चर्चेत अभिप्रेत असलेली यशस्वी होण्याची व्याख्या सांगा. अमेरिकेत गेलो म्हणजेच यशस्वी झालो अशीही व्याख्या असू शकते. त्यामुळे चर्चेत घोळ नको.

चर्चा करायची असेल तर जरा विस्तारीत संदर्भ तरी द्या.

एमीकाकूंचा याविषयावरील दिर्घ लेख इथे वाचता येईल.
http://www.nytimes.com/2014/01/26/opinion/sunday/what-drives-success.htm...