जपानी नेत्रपल्लवी

गेले काही महिने/वर्ष भारत आणि जपानमध्ये कमालीची जवळीक आलेली 'दिसते' आहे. श्री सिंग यांची जपान यात्रा झाल्यानंतर गेल्याच महिन्यात जपानच्या महाराजा व राणीने केलेली भारतवारी अनेकांच्या भुवया उंचावून गेली. एकूणच जपानी वर्तुळांत त्यांच्या राजाची भेट ही केवळ मित्र राष्ट्रांना - ती ही अतिशय क्वचित- ऑफर केली जाते. त्या लगोलग २६ जानेवारीच्या सोहळ्यात जपानी पंतप्रधानांना मिळालेले आमंत्रण भारताकडून उचललेले 'परतफेडीचे' पाऊल आहे असे वाटत असतानाच ही बातमी येऊन थडकली.

आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, भारत आता जगासाठी एक नवयौवना आहे. बाल्यावस्थेत भारताकडे ढुंकनही न पाहणारे, बघितल्यास कमी प्रतीच्या धान्याची भीक देणारे, कधी आपल्याला ओरबाडणारे - प्रसंगी लचका तोडणारे, आपल्यावर डोळे वटारणारे, कधी आपल्याला एक्सप्लॉईट करणारे असे सारे जण, या विपरीत परिस्थितीतूनही हळूहळू परंतु तरीही आश्वासक प्रगती करत तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारत नावाच्या यौवनेशी आता लाडिक संबंध ठेवू पाहत आहेत. अर्थात याचे कारण नुसते या यौवनेचे वधारलेले सौंदर्य इतकेच नसून अनेक 'जुन्या अने जाणित्या' थेरड्यांना असलेली गरजही आहे. त्यात अजून एक गोष्ट अशी की भारतही त्यांच्या आधीच्या वागणुकीला सतत उगाळत न बसता त्यांना कधी झुलवत, कधी खुलवत, कधी हेलपाटे मारायला लावून का होईना पॉसिटिव्ह प्रतिसाद देऊ लागला आहे. एखाद्या धनाढ्य राजाच्या राजकन्येने स्वयंवर मांडावा आणि समोर रीघ लागावी अशी आपली परिस्थिती नसली तरी आपण 'अव्हेलेबल' चा सिग्नल नक्कीच देत आहोत.

या बातमीकडे बघताना आपले जपान बरोबरचे संबंध, जपान-चीन प्रश्न, अमेरिका-चीन संबंध आणि एकूणच आग्नेय आशियातील राजकारण या सार्‍यांचा एकत्रितपणे विचार करणे क्रमप्राप्त आहे. भारत, जपान, चीन आणि अमेरिका या चौघांचे परस्परसंबंध एकमेकांत अत्यंत गुंतलेले आहेत. मात्र याचा अर्थ हल्लीच्या वृत्तपत्रांतून अनेकदा रंगवले जाणारे भारताने जपानशी जवळीक वाढवली, म्हणजे ते लगेच चीन विरोधात आहे वगैरे निष्कर्ष आततायी ठरावेत असे माझे मत आहे. भारताची भूमिका, बदलते/वाढते संबंध, त्याबद्दल माझे अंदाज/अवलोकन/चिकित्सा वगैरेवर येण्याआधी मी या देशांच्या विशेषतः जपानच्या गेल्या काही दशकांतील अंतर्गत परिस्थितीवर या लेखात थोडे लिहिणार आहे.

जपान सध्या एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की जपानला सध्या आर्थिक अचलता (स्टॅग्नेशन) आणि वयोवृद्धांचा वाढता दर / तरुणाईची कमतरता या दोन मोठ्या प्रश्नांनी ग्रासले आहे. चीनचा धोका वगैरे आहेच पण त्याहून अधिक परिणाम जाणवतो आहे तो जपानच्या बदलत्या स्थलांतरविषयक धोरण अर्थात इमिग्रेशन पॉलिसीमुळे. या उघडणार्‍या दरवाज्यातून जगभरातील संस्कृतीचे आक्रमण जपानी जनमानस ढवळून काढत आहे. आपले सांस्कृतिक श्रेष्ठत्व मानणार्‍या व ते जीवापाड जपणार्‍या समाजाला हे सांस्कृतिक आक्रमण काहीसे अस्वस्थ करणारे आहे. पण आर्थिक स्थितीमुळे त्यांचा नाईलाज आहे. अश्या वेळी शिंझो अ‍ॅबे जपानला नव्या आर्थिक युगात घेऊन जाण्याची आश्वासने देत सत्तेत तर आले पण अजून तरी त्यांना अपेक्षित सुधारणा करणे जमलेले दिसत नाहीये. येन आणि जपानी निर्यात उद्योग दोन्ही उतरणीला लागलेले आहेत. आण्विक वीजनिर्मितीत केलेली कपात सरळसरळ पारंपरिक/तेलजन्य इंधनाची वाढणारी आयात दाखवतो आहे.

अशावेळी अ‍ॅबे यांची खेळी अगदी अपेक्षित आहे. त्यांनी जपानच्या जुन्या सांस्कृतिक वारशाची आठवण काढली आहेच शिवाय जनतेला एकूणच जुन्या दिवसांची आठवण देत आम जनतेवर तसेच संस्थांवर सरकारी अंकुश वाढवायचा घाट घातला आहे. नुकतीच जपानने आपली "राष्ट्रीय गुपिते" उघड करण्यावर निर्बंध घालणारा कायदा बनवला आहे. याद्वारे जो सरकारी अधिकारी हे पाप करेल त्याला १० वर्षे तर जो पत्रकार ही माहिती उघड करेल त्यालाही ५ वर्षांची कैद आहे. मात्र याही टोकाला जनतेने पाठिंबा दिलेला नाही. एकूणच राजकीय सजगता म्हणा किंवा सरकारविरुद्ध उघड घोषणाबाजी/निदर्शने करण्याची प्रवृत्ती नसणार्‍या जपानमध्ये या कायद्याविरुद्ध मात्र जनता रस्त्यावर उतरली आहे. हा कायदा जपानी सैन्याला बाहेरील युद्धांत सहभागी करण्याच्या योजनेतील पहिले पाऊल समजले जात आहे. अ‍ॅबे ज्याला "ब्रेकिंग आऊट ऑफ बॉक्स" म्हणतो आहे त्याद्वारे सद्य सरकार जपानच्या संविधानात बदल घडवायच्या मागे आहे ज्यामुळे जपानला बाहेरील युद्धांत नुसते सहभागी होता येईल, इतकेच नाही तर जपानला शस्त्राची निर्यातही करता येईल! तेव्हा हा सारा खेळ निर्यात उद्योग बाय हूक ऑर क्रूक निर्यात उद्योग वाढवायसाठी बराच अधिक आहे. रोचक (व तरीही अपेक्षित) गोष्ट अशी की याला अ‍ॅबेना उजव्या गटाने पाठिंबा दिला आहे. एकीकडे वरवर सांस्कृतिक स्वाभिमानाला हाक, दुसरीकडे युद्धज्वर चढणे दिसत असले तरी प्रत्यक्षात हा सारा खटाटोप शस्त्र निर्यातीसाठी चालला आहे. हे मोठे चित्र लक्षात घेतले की उजव्यांच्या पाठिंब्यासाठी मग अ‍ॅबेंचे यासुकुनी स्मृतीस्थळाला भेट देणे वगैरे तुकडे मोठ्या चित्रात आपोआप बसतात.

दुसरीकडे जपान चीनला आव्हान देतानाही 'दिसतो' आहेच. सेन्काकु/द्योयु (जपानी/चायनीज नावे) बेटांवर वाद आहेच. पण त्यावर काही पॉइंट्स मिळवणे व आपल्या घटनादुरुस्तीसाठी व्यापक पाठिंबा निर्माण करणे याहून अधिक विचार अ‍ॅबे यांच्या मनात आहे असे मानायला काही आधार मिळत नाही. याचे अजून एक कारण म्हणजे जपानचे चीनवर असणारे व्यापारी अवलंबित्व. त्यामुळे शांतता दिसणार नाही, चीनचा बागुलबुवा उभा राहील व त्यायोगे जनमत तयार होऊन देशाबाहेर युद्धात परवानगी देण्यासाठी घटनादुरुस्ती करता येईल व शस्त्रास्त्रांची विशेषतः आण्विक शस्त्रांची विक्री वाढून आर्थिक घडी सुधारेल अशी योजना दिसते आहे. (देशाबाहेर युद्धात उतरण्याची परवानगी मिळाल्यावर जवळजवळ अमेरिकेच्या वतीने अफगाणिस्तानातही सैन्य पाठवता यावे व भारताने एका मर्यादेबाहेर चीन-पाकिस्तानशी वितुष्ट घेण्यास नकार दर्शवल्याने, तिथे पाकिस्तानच्याआडून होणारी चीनची मुसंडी रोखता यावी हा अमेरिकन उद्देश)

अर्थातच अणुचाचणीनंतर भारतावर घातलेले निर्बंध २-३ वर्षातच सैलावले होते तरी आता ते पूर्णपणे विसरून भारताकडे मुख्य ग्राहक म्हणून बघणे जपानला अगत्याचे झाले आहे. गेल्या वर्षी जपानने सिविलीयन न्यूक्लिअर डिल टर्कीसोबत केले, व्हिएतनामबरोबर अश्याच स्वरूपाच्या कराराबद्दल जपानला आशा आहे. पण भारतासारख्या ६०बिलियन डॉलर्स खर्चायला तयार असणार्‍या ग्राहकाची सर या लहान करारांना येणार नाही. अर्थात आता जपानची नेत्रपल्लवी का चालू आहे हे स्पष्ट झाले असेल. मला अधिक रोचक वाटत होते ते भारताचे प्रतिसाद. आपली आण्विक अस्पृश्यता अमेरिकेला हाताशी धरून संपवल्यावर भारताला एक खात्रीशीर सप्लायर शोधायला हवा. असे असतानाही जपानसारखा भिडू निवडलेला बघून अनेक भुवया उंचावल्या होत्या. जपान अन्य वेळी भरवशाचा असेलही पण आण्विक बाबींमध्ये जनमत कधी फिरेल सांगता येणार नाही. मग भारताने ही जवळीक का केली असावी? चीनशी उद्या लष्करी बाबींमध्ये दोन हात करायची वेळ आली तर सोय असा यात भारताचा उद्देश असावा का? विविध शक्यता बघुयातः
आण्विक इंधनासाठी खरंतर भारताने जपानशी संपर्क करायची गरज नव्हती कारण आता जगभरातील अनेक राष्ट्रे हे इंधन द्यायला तयार आहेत.
अजून एक मतप्रवाह असा की जपान-अमेरिका-ऑस्ट्रेलिया यांच्या त्रिकुटाने भारताला त्यांच्या तथाकथित 'चौरंगी सुरक्षाव्यवस्थेसाठी' चौथा भिडू होण्यासाठी मागे लागले आहेत. मात्र मला या दाव्यात एक त्रुटी जाणवते ती अशी की भारत गरज पडल्यास चीन विरुद्ध आणि या देशांसोबत उभा राहायला तयार आहे हे गृहीतक! उद्या चीन विरुद्ध जपान युद्ध झाले तर भारत कोण्या एका देशाच्या बाजूने नि:संदिग्धपणे उभा राहील ही शक्यता बरीच कमी आहे, आणि भारत-चीन अशा थेट युद्धापेक्षा कोरिया-जपान युद्ध होणे चीनला (व अमेरिकेलाही) अधिक परवडणारे आहे. शिवाय आपल्या पत्रकारांनी कितीही बोभाटा केला तरी चिनी बॉर्डरवरील पायाभूत सुविधांमध्ये भारतीय बाजूनेही वाढ झाली आहे. चीन युद्धानंतर झालेल्या बहुतांश चकमकी भारताने जिंकल्या आहेत. तेव्हा भारत गाफील आहे किंवा चीन पुढे कमजोर आहे असे वाटत नाही.
जपानशी वाढत्या संबंधांमागे ही कारणे नाहीतच असे नाही, पण हे उद्देश आहेत का? याबद्दल मी साशंक आहे.

माझ्या मते भारताची ही जवळीक काहीशी अपरिहार्य होती. भारतात जपानची गुंतवणूक व मदत प्रचंड आहे हे आहेच. आर्थिक/व्यापारी दृष्ट्या जपानला डावलता येणे शक्य नाही. या वर्षी दोघांमधील व्यापार $१८.६ बिलियनला पोचला आहेच, शिवाय एकट्या जपानने भारतात१.७५ बिलियन डॉलर्सची मदतच केली आहे, अनेक रस्ते, बागाच नाही तर कित्येक पायाभूत सुविधांमध्ये जपानने सक्रिय मदत केली आहे. रिटेलमध्येही कोणी पुढे येत नसताना जपानने इथेही गुंतवणूक केलेली दिसते. थोडक्यात जपानला भारताची गरज इतिहासातील कोणत्याही क्षणापेक्षा अधिक आहे हे मान्य केलं तरी एक मैत्रीपूर्ण संबंध कसणारा देश म्हणून जपान मैलभर चालल्यावर भारतालाही काही पावले तरी टाकणे भाग आहे.

सध्याचे अ‍ॅबे सरकार आणि भारताचा ऋणानुबंधही तसा जुना आहे. युद्ध-गुन्ह्यांसाठी चीन ज्यांना जबाबदार धरते, त्या तत्कालीन पंतप्रधान नोबुसिके किशी यांच्या राजकीय अस्पृश्यतेला भारताने त्यावेळी (१९५७) धुडकावले होते व आपला अलिप्ततावाद बाजूला ठेवत त्यांना उघडपणे भारतात भेटीसाठी बोलावले होते. आताचे अ‍ॅबे हे त्याच किशी यांचे नातू आहेत. आणि काव्यागत न्याय असा की त्यांच्याही राजकीय प्रश्नावरचे उत्तर ते भारतातच शोधत आहेत.

अर्थात तूर्तास तरी या नेत्रपल्लीवीच्या तारेवरच्या कसरतीत भारत आपली पावले सावध तरीही योग्य तिथे ठेवताना दिसतो आहे. म्यानमार वगैरे ठिकाचीन्व्यापाराच्या संधी बर्‍याच आहेत. पण एकट्याला हे आव्हान पेलायचे तर चीनशी थेट स्पर्धा करावी लागेल. त्यापेक्षा जपानच्या सहभागाने यास जपानला चीनचा वाढता प्रभाव कमी करता येईल व इशान्येला भारताच्या पायाभूत सुविधांत वाढही करता येईल व म्यानमारशी व्यापारही वाढेल अशी विन-विन सिच्युएशन आहे. तिथे चीनचा प्रभाव होणे ही काही भारताची गरज नाही (झालंच तर चांगलंच आहे पण तो उद्देश नसावा). तेव्हा या सुधारत्या संबंधाचे महत्त्व खूप असले तरी हे संबंध एका मोठ्या चित्रातील छोटा तुकडा आहेत हे लक्षात ठेवून पुढील पावले टाकली तर अधिक चांगले ठरेल इतकेच!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4.285715
Your rating: None Average: 4.3 (7 votes)

प्रतिक्रिया

मस्त विषय. लेख दोनदा वाचला. अधाशासारखा.
---

चीन युद्धानंतर झालेल्या बहुतांश चकमकी भारताने जिंकल्या आहेत.

हा निष्कर्ष कसा काढलात ते जाणून घेऊ इच्छितो. कुतुहल म्हणून.

---

अलिप्त राष्ट्र चळवळीबद्द्ल भारत सरकारला आज काय वाटते व चीन चा फिलिपिन्स बरोबर चालू असलेला संघर्ष - हे दोन मुद्दे विचारात घेणे आवश्यक.

---

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडलात नकाराधिकार युक्त जागा हा ही महत्वाचा ड्रायव्हिंग फॅक्टर आहे या सगळ्या डायनॅमिक्स च्या मागे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीन युद्धानंतर भारताने चकमकी कोणत्या जिंकल्या आहेत त्याचा विदा जरा उत्खनन करून देतो. इथे काही साईट्स अ‍ॅक्सेस होत नाहियेत.
==

अलिप्त राष्ट्र चळवळीबद्द्ल भारत सरकारला आज काय वाटते

राव सरकारने अलिप्ततेचे परिमाणच बदलले आहे. पूर्वी (प्री-राव काळात) अलिप्तता म्हणजे आम्ही कोणाच्याच बाजुने नाही असा काहीसा एकलकोंडा अ‍ॅटिट्युड होता (जो सुरवातीच्या काही काळात गरजेचाही होता, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर तो हळूहळू डोईजड (व काहीसा इर्रिलेव्हन्ट) होऊ लागला होता). राव सरकारने आम्ही राजकीयादृष्ट्या अलिप्त असलो तरी व्यापारी/लष्करी/सामरिकदृष्ट्या सार्‍यांशी सामंजस्याने वागणार आहेत - कोणा एकाच्याच बाजुचे असे नाही- असा आयाम दिला व कित्येक देशांशी संबंध जोडले. इस्रायल असो की म्यानमार अनेक संबंधांची सुरूवात तेव्हा झालेली दिसेल जी आज आपल्याला अतिशय फायद्याची ठरते आहे. त्यानंतच्या सरकारांनी हीच कल्पना एक्सटेंड केलेली दिसते.
==

चीन चा फिलिपिन्स बरोबर चालू असलेला संघर्ष

याचा भारत-जपानशी संबंध असलाच तर फारच दुरून आहे. फिलीपिन्स हे काही भारताचे मोठे मित्रराष्ट्र नव्हे. आपले संबंध तळ्यात मळ्यातच राहिले आहेत.

==

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडलात नकाराधिकार युक्त जागा

तुर्तास भारताचा डोळाअ केवळ परमनंट जागेकडे आहे. नकाराधिकारयुक्त जागा लगेच मिळणार नाही हे भारताने कुठेतरी स्वीकारल्यासारखे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा निष्कर्ष कसा काढलात ते जाणून घेऊ इच्छितो. कुतुहल म्हणून.

चीन युद्धानंतर भारताला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण व वाढ! आता जगातील तिसरे मोठे भुदल सैन्य बाळगणारे आपण चीन युद्धाच्या वेळी लष्करी तयारीत अगदीच "मागास" होतो. मात्र चीनी झटक्यानंतर भारताने केवळ सैन्यबळातच नाही तर पायाभूत सुविधा, लष्कराला उपलब्ध होणारी साधने, पुरवणी साधने, दारूगोळा व हत्यारे यांच्यातही लक्षणीय वाढ केली. चीन हा आपला हितचिंतक किंवा मित्र आहे या भाबड्या समजुतीला तिलांजली मिळाली व त्याच्याकडे आधी काही काळ शत्रु व नंतर आता एक चतुर व धोकादायक स्पर्धक म्हणून बघितले जाते.

चीन युद्धानंतर झालेल्या मोठ्या घटनांपैकी दोन वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या काळात झालेल्या लष्करी घटनांकडे व त्या ठिकाणच्या सद्य स्थितीकडे बघुयात, मग आपली पावले कुठे/कशी पडत आहेत त्याचा ढोबळ अंदाज यावा:
१. १९६७: चोला व नथुला मधील चीनी आक्रमणे: चीन युद्धानंतर काही दिवसांतच सिक्कीम येथील नथु-ला व चो-ला ("ला" म्हणजेच खिंड त्यामुळे नथुला खिंड वा नथुला पास ही द्विरुक्ती झाली) येथे चीनी सैन्याने आपल्या पोस्टस्ट उभारल्या होत्या. इथे दोन्हीकडे एखाद्या चित्रपटात साजेसे अनेक प्रसंग घडले. अनेक भारतीय सैनिकांनी 'हिरॉईक' पर्फॉर्मन्स दिला आणि शेवटी या दोन्ही ठिकाणी भारताचा क्लेम चीनने (ताबडतोप नाही पण काही काळाने) मंजूर केला. या चकमकीमध्ये भारताला आपली इंचभरही जमिन द्यावी लागली नाहीच शिवाय, भारताचे ८८ जवान शहिद झाले तर त्यांनी चीनचे ३०० हून अधिक जवानांचे बळी घेतले. कालांतराने गेल्या दशकात चीनने सिक्कीम भारताचा अविभाज्य भाग दाखवायला सुरवात केली आहेच, भुतानचे भारताचा अंकीत असणेही मान्य केले आहे आणि हाच नथुला पास २००६ साठी व्यापारासाठी खुला झाला आहे!

२. १९८७: अरूणाचल मधीम समडोरांग-चु व्हॅलीमधील आक्रमणः
१९८६मध्ये अरूणाचलला भारताने पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यानंतर चीनी पुन्हा खवळले. त्यात भारताने तवांग इथे अख्खी मराठा रेजिमेंट तैनात केली. हे चीनला खिजवणे आहे असे वाटले. या भातात भारताची सीमा नक्की कोणती याबद्द्ल बरेच वाद आहेत. यावेळी चीनची भाषा '६२ सारखी होऊ लागली. आता युद्ध होणार यावर जगभरात पैजा लागु लागल्या. त्यावर भारताने ऑपरेशन फाल्कन सुरू केलं. Mi-26 सारखी वाहने वापरून सिक्कीममध्येही रनगाडे काही दिवसांत तैनात करून दाखवले. अजून अकाही बटालियन अरूणाचल मध्ये पोचल्या. आपली तयारी बघुन चीन काय ते समजला.
मग एन्डीतिवारी व राजीव गांधी चीनला गेले व प्रश्न निवळला.

सध्या होणारी घुसखोरी वगैरे तत्कालिन घटना आहेत. कोणतीही घटना चकमकीपर्यंतही जात नाहीये. भारताने गेल्याच वर्षी आपले लडाखमधील विमानतळ यशस्वीपणे वाप्रून दाखवले आहे. रोहतांग पासच्या बोगद्याचे काम चालु आहे (अतिअवांतरः ज्यांना लाहौल-स्पीती सहल करायची आहे करून घ्या हा बोगदा झाला की 'हवशी' पर्यटकांचे पीक माजेल त्या भागात!) इतरही अनेक लहान-मोठ्या गोष्टी आहेत ज्यामुळे चीन कोणतीह ईमोठी आगळीक करत नाहीये व हल्लीच्या काळात त्याची गरजही नाहिये.

याहून एक वेगळी गोष्ट चीनने केली ती मात्र अतिशय धोकादायक आहे. पं बंगालातील नक्षलबारी या गावातून सुरू झालेल्या आंदोलनाला चीनने आह्दी उघड पाथिंबा दिला होता. कालांतराने तो काढून गेतला खरा पण तिथून सुरू झालेली ही लक्षलवादाची कीड अजूनही मुळे धरून आहे. त्यावर भारताला परमनंट तोडगा मिळालेला नाहीये. Sad

काही रोचक वाचने:
नक्षलबारी दिवस - कम्युनिस्ट नजरेतून
इंडो-चायना वॉर वरील हा व्हाईट पेपर

अजूनही वाचने आहेत जरा वेळ मिळाला की देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंडो-चायना वॉर वरील हा व्हाईट पेपर

नेव्हिल मॅक्स्वेल चे पुस्तक २००६ मधे अर्धेमुर्धे वाचले होते व त्याच्यातल्या मजकूराच्या जोरावर एका ऑफिसबंधूशी वाद घातला होता ते आठवतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाला माहितीपूर्ण श्रेणी देण्याची सोय असती, तर बरं झालं असतं.

मलाही गब्बरसारखंच म्हणायचं आहे. एकूणच अशा विषयांवर लिहिताना (राजकारण, आंतरराष्ट्रीय डावपेच, परिस्थिती) हे निष्कर्ष कसे काढले असतील, असं एक कुतूहल वाटतं. (माझं या विषयांवर काहीच वाचन नसल्यामुळेही असेल.) तर अगदी संदर्भसूची जरी नाही, तरी काही प्रमुख लेखांचे दुवे, किंवा या लेखासाठी आधारभूत ठरलेली प्रमुख नियतकालिकांची नावं अशा प्रकारच्या लेखांखाली दिले तर फारच बरं होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चार तारका देता येतात न पण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यातील बरीचशी माहिती एका लेखात/काही ठराविक लेखांत मिळून आली नाहीये. यासंबंधीच्या बातम्या/माहिती दिसेल तिथून आधाशासारखी वाचली जाते. कित्येकदा नक्की कुठे वाचलंय हे सांगणही कालांतराने कठीण जातं. पण आवडता विषय असल्याने मुळ माहिती बर्‍यापैकी लक्षात असते. हे असे लेख लिहिताना त्या तुकड्या तुकड्यातून मिळालेल्या लेखांचं जमेल तितकं कोलाज करायचा प्रयत्न करतो. याने वाचणार्‍यालाही एकसंध-एकगट्ठा माहिती मिळते आणि माझ्याही माहितीला वर्गीकृत करून ठेवणे मला सोपे जाते.

अर्थात कोणी संदर्भ मागितल्यावर ते देता आले पाहिजेत हे खरेच. वर गब्बरसिंगने मागितले आहेत त्या माहितीचे संदर्भ/विदा देतो आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मान्य आहे, मी फारच मागते आहे. पण या विषयात अधिक रस निर्माण झाला, तर त्या माणसाला अधिकचं वाचन कुठून करावं याची एक दिशा मिळते. म्हणून आग्रह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओ बाई.
वाचन वगैरे काही करायचं नसतं आंतरराष्ट्रिय वगैरे विषयात.
द्यायचं ठोकून वाटेल ते.
तुमचं आंतरजालावरील वय फारच कमी असावं Wink
कोण कधी +१ म्हणेल नेम नसतो.
शिवाय ठासून "तुम्ही चूक म्हणताय" असं म्हटलं की समोरचाही उगाच दबकून राहतो.
आणि फारच विचारलं काही, तर गूगल मधून जे काही समोर येइल त्या लिंका बेदिक्कत स्वतः न वाचता द्यायच्या टाकून थोबाडावर. हाकानाका.
स्वनुभवावरुन सांगतोय मावशे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

द्यायचं ठोकून वाटेल ते

म्हणून तर तुलाच कवाचं सांगून र्‍हायलो की तुच या विषयांवर लेख लिही! तर आयकत न्हायी! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या प्रतिसादातून माझे प्रयत्न प्रतीत व्हावेत अशी इच्छा आहे.
नम्रपणे सुचवू इच्छितो की ह्या धाग्यावर एकाही प्रतिसादात चार्ट, ग्राफ , रेफरन्स असलं काहीही वापरलेलं नाही पण ठामपणे बकबक केली आहे.
जे प्रतिसादातून साध्य होते ते करण्यासआठी लेख का पाडावेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओके नका पाडू. मी आपलं सुचवून पाहिलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख उत्तम आणि माहितीपूर्ण आहे.
भारत-जपान सबंधांबाबत जापनिज लेखक/संपादक/पत्रकार/मुत्सद्दी/राजकारणी यांच्या लेखनांचा विदा देता येईल का?
शिवाय पूर्वी स्वीकारलेल्या धोरणांचे पुढच्या पिढीमध्ये कसे संक्रमण होते, ते जपान आणि भारताबद्द्दल, स्वतंत्रपणे कसे तपासावे/तपासले जाते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख. माझ्या अल्प निरीक्षणानुसार कोणाशी कोणाचं युद्ध झाल्यास कोण कोणाच्या बाजूने लढणार हा प्रश्न काहीसा गौण झालेला आहे. कोण कोणाचा माल घेणार, आणि तांत्रिक कंत्राटं कोणाला देणार या परस्परव्यापाराची गणितं पुढे आलेली आहेत. सर्वच प्रगत देश गेले काही वर्षं जवळपास शून्य ग्रोथवर अडकले आहेत. सर्वच प्रगतीशील देश गेल्या काही दशकांत खालील टप्प्यांनी प्रगती करताना दिसतात.
१. जास्त लोकसंख्या, सुशिक्षित तरुण पिढी, यातून उपलब्ध स्वस्त मनुष्यबळाच्या जोरावर बाजारपेठा काबीज करायच्या
२. निर्यातदार म्हणून पैसा कमवून सुबत्ता साधायची
३. मग सर्वच सुस्थितीत गेल्यावर मनुष्यबळ महाग होतं
४. दरम्यान शिक्षणात वाढ, फर्टिलिटी रेटमध्ये घट, मुलं होण्याचं वय पुढे ढकललं जातं, मृत्यूदरात घट होते
५. त्यामुळे एकेकाळी लोकसंख्येत असणारं तरुण पिढीचं प्रमाण कमी होऊन वयस्क पिढीचं प्रमाण वाढतं.
६. या सगळ्यामुळे एके काळी साधलेला ८-१० टक्के जीडीपी ग्रोथ साधणं अशक्य होतं.
७. पहिल्या पायरीवर असलेल्या इतर देशांशी स्पर्धा करणं अशक्य होतं.

जपान सुमारे ७० च्या दशकात पहिल्या पायरीवर होता आणि त्यांची सातव्या पायरीपर्यंत प्रगती पूर्ण झालेली आहे. चीन त्याच टप्प्यावर सुमारे पंधरा वर्षांनी आला, आणि अजून काही काळ वाढ होईल. किती काळ हे सांगता येत नाही. भारत चीनच्याही पंधरा वर्षं मागे आहे, आणि पुढच्या दशकांत चीनची वाढ मंदावेल तशी भारताची तेज होईल. अशी तेजी असताना आत्ता जसा चीन सगळ्या जगाला माल पुरवतो तसा भारत होईल. हे स्वच्छ दिसत असताना आर्थिक संबंध दृढ करणं जपानला फायद्याचंच आहे. त्यामुळे नवयौवनेची उपमा चपखल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा तर्क नेहमीच ऐकू येतो. कित्येक उदाहरणांत खराही आहे.
पण एखादा देश "तरुण आहे म्हणून प्रगती करत आहे" हे पटत नाही.
भारत मागील पन्नास वर्षेही तरुणच होता. जपाननं सलग वीसेक वर्षे आर्थिक प्रगतीचा दर पंधरा एक टक्क्याच्या आसपास राखून जगाला चकित केलं; ते फक्त तो देश तरुण होता म्हणून नसावे. त्यावेळी भारत्,बांग्लादेश्,पाक हेसुद्धा तरुणच होते.
भारत आजही चीनपेक्षा तरुण आहे. (चीनचे सरासरी वय व भारताचे सरासरी वय ह्यात पाचेक वर्षांचा तरी फरक असावा.)
पूर्वीचे वृत्तपत्रीय मथळे व चर्चा खर्‍या धरल्या तर २०१४पूर्वीच भारतानं चीनला ओव्हरटेक करुन पुढं जायला हवं होतं, निदान जीडीपी ग्रोथ रेट बाबत.
ते तर झालं नाहिच, चीनचं hard landing किंवा cash landing ही झालं नाही. ते मंदावलेत तरी तुमच्याहून अधिक वेगवान आहेत.
सातेक ट्रिलियनची चीनी अर्थव्यवस्था सात साडेसात टक्क्यानं वाढते आहे. त्यापेक्षा भलतीच लहान सव्वा ते दीड ट्रिलियनची भारतीय अर्थव्यवस्था
साडे चार पाच टक्क्यानं वाढते आहे. वस्तुतः इतका आकार वाढल्यावर त्यांचा वेग आपल्याहून कमी असायला हवा, पण ते होत नाही.
नियोजन, सचोटी ,प्रत्यक्ष अंमल बजावणी वगैरे गोष्टी अल्पांशानं का असेना, लागत असाव्यात.
.
.
"भारिच नाअ, फारच जोर्रात चाल्ले भो तुम्ही . काही दिवसात चीनपेक्षा मोठे होणार ब्वा तुम्ही " असे वीसेक वर्षापूर्वी भारताला म्हणणारे लोक "चीनपेक्षा मोठे तर काही होउ शकणार नाही पण निदान त्यांच्या जीडीपी ग्रोथ रेटच्या अधिक रेट गाठू शकाल" इतपत टोन डाउन झाले आहेत.
.
.
काहीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लोकसंख्या नुसती तरुण असून चालत नाही. तर ती सुशिक्षित असावी लागते. सुशिक्षिततेच्या बाबतीत चीन भारताच्या पंचवीस ते तीस वर्षं पुढे आहे. दोन्ही देश बऱ्यापैकी अशिक्षित होते तेव्हा चीनचा ग्रोथ रेटही फारच वाईट होता.

पूर्वीचे वृत्तपत्रीय मथळे व चर्चा खर्‍या धरल्या तर २०१४पूर्वीच भारतानं चीनला ओव्हरटेक करुन पुढं जायला हवं होतं

पूर्वीच्या चर्चा कशावर आधारित होत्या हे माहीत नाही. मी फक्त आजवर अनेक विकसनशील देशांचे विकासाच्या मार्गावर झालेल्या प्रवासाचे टप्पे सांगितले आहेत. भारत ग्रोथ रेटबाबत चीनला कधी ओव्हरटेक करेल याबाबत काही तारखा प्रेडिक्ट करण्याइतकं चांगलं मॉडेल माझ्याकडे नाही. पूर्वीच्या चर्चा करणारांकडेही नव्हतं असं दिसतं आहे. पण तारखा चुकल्या म्हणजे निदान चुकलं असा अर्थ होत नाही.

सातेक ट्रिलियनची चीनी अर्थव्यवस्था सात साडेसात टक्क्यानं वाढते आहे. त्यापेक्षा भलतीच लहान सव्वा ते दीड ट्रिलियनची भारतीय अर्थव्यवस्था साडे चार पाच टक्क्यानं वाढते आहे.

काहीतरी गल्लत होते आहे हो तुमची. २००० सालपासनं सरासरी जीडीपी ग्रोथ रेट साधारण ७% च्या आसपास आहे. २००३ ते २०१२ मोजला तर तो ८.५% च्या आसपास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागच्या पंधरा वर्षाची, दहा वर्षाची सरासरी म्हणत नाहिये.
एकेकाळी गाठलेला वेग सध्या कितपत मंदावलाय ते म्हणतोय.
भारत्-चीन दोघेही मंदावलेत. पण चीनचं मंदावणं समजू शकतो.
आकार खूप मोठा झाल्यावर वाढीला मर्यादा येउ शकतात.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकरच तुलनेत लहान आहे, ह्यांनी का मंद व्हावं?
अर्थात ह्याविरुद्धही आर्ग्युमेंट आहेच म्हणा resource depletion वजा जाता शिल्लक उरलेली प्रगती(चीनचे रिसोर्स exhaust होताहेत वगैरे) व इन्फ्लेशन अ‍ॅडजस्टेड ग्रोथ.
पण नको ते जंजाळ झमेलं किचकट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा युक्तिवाद हा वर्षावर्षांत होणाऱ्या फ्लक्चुएशन्स सरासरीने स्मूथ आउट केल्या तरच लागू होतो.

एकेकाळी गाठलेला वेग सध्या कितपत मंदावलाय ते म्हणतोय.

चार साडेचार टक्क्याला मंदावलेला वेग म्हणणं हेच बरंच काही सांगून जातं. साठ-सत्तरच्या दशकांत साडेतीन-चार टक्क्याला 'हिंदू ग्रोथ रेट' वगैरे नावं देऊन तो जणू काही भारताचा स्थायीभाव आहे असं सुचवलं जायचं. आता हा शब्दप्रयोग अर्थातच मागे पडला आहे. Smile

पण अर्धा रिकामा ग्लास पहाणाऱ्यांना 'गेली दहा वर्षं साडेआठ टक्के वाढ असेल हो, पण गेल्या दोन वर्षांत ती साडेचार टक्क्यांवरच आलीय त्याचं काय?' असा युक्तिवाद द्यावा लागतो यातूनच ग्लास किती भरलेला आहे याची कल्पना येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो जितकं पुढे जाल तितकं मंदावणं अपेक्षित आहे; असं म्हणायचं आहे.
जपान, कोरिया,ग्रीस सर्‍अयच एकेक्काळी raoring economies, miracles economies होत्या.
आता सार्‍याच ंदावल्या.
पण मंदावण्यापूर्वी त्यांनी एक विशिष्ट पातळी गाठली होती.
(थोडक्यात, ते जेव्हा साडेचार पाच टक्क्यवर आले तेव्हा तिथे सरासरी राहणीमान बर्‍यापैकी सुधारलं होतं.
ते एक दीड टक्क्यवर आले, तेव्हा पश्चिम युरोपशी स्पर्धा करण्याइतपत , comparable स्थितीत ते आले होते.
आपण साडेचार पाच टक्क्यवर घसरलोत, तेव्हा आपलं सरासरी राहणीसरासरीदरडोइ उत्पन्न युरोप - अमेरिकेच्या किती टक्के आहे ?
)
वेग साडेचार टक्क्यांवर येण्याइतपत आपली प्रगती आधीच झाली आहे का ?
तितका मोठा बेस अजून झालेला नाही असं माझं म्हणणं आहे.
७०च्या दशाकापेक्षा वगैरे स्थिती चांगली असेलही. पण सध्या कौतुक केलं जातं त्याबद्दल साशंकता अहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपले ४/४.५% हा दर स्थायी/स्थिर झाला आहे असे का वाटावे? इतर अर्थव्यवस्था ४/४.५%ला आल्या म्हणजे तिथे स्थिरावल्या. भारत ४/४.५%वर स्थिरावला आहे की ही तात्पुरती फेज आहे हे सांगणे (व त्यामुळे छ्या! आपण म्हणजे हॅ! असे म्हणणे) आततायी ठरावे. असो हे बरेच विषयांतर असल्याने मी थांबतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेवटची दोन्ही वाक्ये योग्य वाटतात्.त्यावर सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जपानी नेत्रपल्लावी हे शिर्षक वाचून वेगळ्याच अपेक्षेने धागा उघडला होता Wink

असो, माहितीपूर्ण लेखाशी बहुतांशाने सहमत!

- (जपान रिटर्न्ड) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही असेच काहीसे वाटले होते.
आपल्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील आशावाद खरा ठरो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

काय की.
आंतरराष्ट्रिय वगैरे पातळीवरच काहीह्ही कळणं समज्णं जामच अवघड वआटतं बुवा.
पण हे काय पाहन्यात आलं ते लिहितोय :-
http://economictimes.indiatimes.com/news/economy/infrastructure/china-of...
.
.

China offers to finance 30 per cent of India’s infrastructure
development plan

China wants to fund a
big chunk of India's infrastructure development even though previous attempts have
been rebuffed by a government nervous about allowing its neighbour to enter
critical areas such as telecom or power over security worries.

But that
hasn't discouraged the Chinese from making a concerted bid that envisages its
companies and workers getting deeply involved in upgrading India's decrepit
rail, road and power infrastructure besides telecom.

A Chinese working group submitted a five-year trade and economic planning
cooperation plan to the Indian government in the first week of February,
offering to finance as
much as 30 per cent of the $1trillion targeted investment in infrastructure
during the 12th Five-Year Plan (2012-17) to the tune of about $300
billion.

That's the biggest such offer by any one country, exceeding the funds
contributed by Japan, which has traditionally financed some of India's most
ambitious projects. The commerce department is likely to hold an
inter-ministerial meeting next week to discuss the investment proposal by China
to identify sectors of India's interest, a government official familiar with
developments told ET.

China has more than $3.8 trillion in reserves — which
keeps rising thanks to trade surplus ..

A Chinese interest is particularly high in railways, in particular
electrification, high-speed trains, wagons, last-mile connectivity and gauge
conversion. It has also identified sewage treatment and tunnel building as areas
where it can offer substantial expertise.

India however is not keen on allowing Chinese
investment in sensitive areas like the northeast and Jammu & Kashmir. The
two countries share a turbulent past, having gone to war with each other in 1962
leaving unresolved border issues that flare up occasionally.

As the two most
populous countries in the world, they also compete for resources globally, with
the Chinese more successful at adding to their reserves.

The home and
defence ministries are wary of Chinse investment for strategic and security
reasons, the latest example being 100 per cent FDI in railways that the government aims to
allow.

Regarding this, the home ministry has already flagged security
concerns concerns over Chinese companies investing in sensitive areas such as the
northeast and Jammu and Kashmir.

"The Chinese have offered to make big
investments in India," a Planning Commission official said. "Since there are nine ministries
that have been engaging with China at different levels, the department of
commerce wants to strike a common strategy."

China contributed just
0.15 per cent or $313 billion of India's total foreign direct investment (FDI)
inflows between April 2000 and December 2013.

Japanese investment
amounted to $15.3 billion, about 7.3 per cent of the total. The big Japan-funded
projects include the ongoing Delhi Mumbai Industrial Corridor and Delhi Metro.
The Japanese are also in talks to build a road network in the northeast region.

The Japanese government has approved $4.5 billion for non-commer ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(काही वेळा) जेव्हा राष्ट्रांकडे ट्रेड सरप्लस असतो तेव्हा ते सॉव्हरिन वेल्थ फंड काढतात. व त्याद्वारे गुंतवणूक करतात. सीआयसी असाच चायनीज सरकारचा फंड आहे. पण त्याचा उल्लेख वरील मनोबांनी डकवलेल्या मजकूरात नाही याचे थोडेसे आश्चर्य वाटले. सॉव्हरिन वेल्थ फंड हे राडा करू शकतात अशी धोक्याची घंटा लॅरी समर्स यांनी इथे वाजवलेली आहे. हो तेच ते वादग्रस्त लॅरी समर्स. पण सीआयसी ही इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर दिस्ते (म्हंजे पोर्टफोलिओ मधे गुंतवणूक करायची थेट प्रकल्पात करण्याऐवजी - असे धोरण बाळगणारी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लेख - http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/In-Japans-drill-w...

गोषवारा - जापान व अमेरिकेचे संयुक्त युद्धसराव चालू आहेत व त्यांचा छुपा उद्देश चीन ला चुनौती देणे हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख बराचसा भाबडा आहे Wink

याचा मुख्य उद्देश चीनला चुनौतीवगैरे देण्यापेक्षा जपानी सैन्याची एफिशियन्सी वाढवणे व गरज पडल्यास अमेरिकन व जपानी सैन्यात अधिक ताळमेळ असण्यासाठी आहे.
अश्या जॉइंट ड्रील्समध्ये काहीच नाविन्य नाही. अमेरीका-जपानतर गेले कित्येक वर्षे असे ड्रील करत आले आहेत.
भारत-जपान, भारत-अमेरिका, जपान-अमेरिका-ऑस्ट्रेलिया वगैरे विविध देशांचे असे संयुक्त सराव होतच असतात.

इतकेच काय २०१३मध्ये भारत-चीनने असे जॉइंट मिलीटरी ड्रील केले होते. आता ते कोणाला चुनौती देण्यासाठी असेल बरं? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारत-चीन ह्यांच्या अधेमधे कडमडणार्‍या भूतान किंवा नेपाळला चुनौती देण्यासाठी त्या असाव्यात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars