हलकेच जाग मज आली

रात्री विरहाच्या कळा पांघरून येतात, डोळ्यांत तुझ्या संदेशांच्या चाहुलींची वलयं उमलू लागतात. देहभान आसपास मिसळत जाते, आठवणींचे जन्म वेदनांचे वंश बेगुमान वाढवतात. त्यांनासुद्धा उभ्या रकान्यात बसवता येते म्हणे. मला ते कळणे अवघड होते. लोलकाच्या विकीरणाला सात रंगात सोयीपुरतं भागता येतं, मला तो सलगच पट्टा वाटतो, एकाच मोठ्या वारंवारतेचा. ह्या सलग वेदनाच मला लपेटून जाताना, माणसांना वेगळं करणाऱ्या पडद्यांचे लांबून पाहिलेले कड बुबुळाला स्पर्शु लागले. आता उठतोय, स्वप्नं-बाहेरचं मंद ऊन अशा मिश्रणापुढे निष्प्रभ होता होता.
तुझा एकेक शब्द खरा आहे, आता स्पष्ट कळतंय.
तू बोलताना उरणारे स्तब्ध क्षण आता सगळं काव्य रचून जातात.
माझ्याकडे तुझ्या वेदनांचे एकेक प्रवाह आले, आणि आतापर्यंत अभिज असणाऱ्या माझ्या गावी पूर लोटले.
त्या पाण्यात घुसळून निवळ झालेली शांतता आहे, स्वीकाराचे तळ दिसले त्या अपारदर्शकतेतून. गढूळ काहीच नव्हतं. कधीच नव्हे.
मी भुलीच्या संज्ञा दिल्या, सूत्रांमध्ये त्यांची मांडणी केली. तेव्हा तुझा जीव ह्या सगळ्यांच्या पार जाउन लखलखता वाहता झालाय हेच उमजून आलं.
त्या आपलेपणाच्या जवळपास देखील मी फिरकू शकणार नाही, तुला स्पर्शणाऱ्या उतरणीला देखील मला काठावरूनच पहावी लागेल.
परत त्याच अवशेषांना मांडून ठेवताना मला बांधून ठेवणारे सांधे दिसू येतात, आणि परत ते सारं उभं करता येत नाहीये त्यानं अस्वस्थ होतो मी.
पण अवशेष अधिक सुंदर दिसावेत हाच स्थळं उद्ध्वस्त होण्यामागे नियम असावा का? आपण इथं-तिथं गोळा केलेल्या वेळा आता रिकाम्या, तरी मी संदर्भ शोधायला जातोच आहे. परत परत आपण एखाद्या झाडा-डोंगराकडे जातो तसे. आणि तू उरात दडवलेल्या वाऱ्याचे जाणवणे उघड्या पाठीला भिडत जाते.
शहारे नव्याने वसू लागतात.
शरीराचे बांध नव्हेत फक्त. तुझ्याच शब्दांच्या ओसरी जाउन, केवळ गरम रक्ताचे वाहणे नाही. त्यांना तापमानाच्या बदलांचे आघात लाभले, दबा धरून बसल्यासारखे नाही. जाणीवेने जडत गेलं होतं, आधण आले असेल. ते चुकतं तर सजीवतेवर ठपका लागला असता. देहाच्या मसुद्यांत उच्चांक नीचांक नोंदवत बसू का? नाही.
खूप प्रेम जडत जातं तुझ्यावर, नकळत, मलादेखील.

मनातल्या वसाहती म्हणतोस, चहुबाजूंना युद्धाचे उच्चरव ऐकू यावेत आणि साम्राज्याच्या सीमा पसरण्याच्या वार्तांनी समूहात असण्याच्या चित्ताला अस्वस्थता मिळावी तशी माझी कोंडी होऊ लागते. चिंता लागत नाही, किंवा उत्सवांचे बेहोष लोट दिसतात तरी भान हरपून गर्दीत गर्दी होऊन जायचे हे पटलेच नाही.
बेहोशी मिळवली ते चौक वेगळे होते.
तिथं आता तुझ्या स्तंभांना भक्कम जागा आहे, अविचल. जीव तोडून सांडणाऱ्या इतिहासात तुझे स्तंभ बेहोषीचे, कृतज्ञ अभिमानाचेच लेख मिरवतील.
खूप प्रेम जडत जातं तुझ्यावर.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

निव्वळ शीर्षक नव्हे तर लिखाणाच्या गूढ पोताकडे त्रयस्थ नजरेने भिडताना जे उमटलं त्या विचारकिरणांना वाट मोकळी करून देणं इतकाच क्षोभ ही लेखणी करू शकते.
म्हणून हा पिंपळप्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे काही आहे ते छान वाटतय. स्वप्नील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
म्हणजे रसिक म्हणून या शैलीकरिता माझा पिंड नाही. तरी तसा पिंड असलेल्या रसिकाला छान वाटेल असे वाटते आहे.
---
मनातील उत्कट भाव शब्दात अभिव्यक्त करण्याचा मोकळेपणा आणि धैर्य या लेखकापाशी आहे. हा आवश्यक गुण लेखकापाशी आहे, हे उत्तम. परंतु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0