अनुभव-कथन...

चार बायका एकत्र जमल्या की काय करतात..... एक स्वानुभव!

नोव्हेंबर ’०९ महिन्याच्या ‘वाचकघर’चा विषय होता ‘माझा आवडता पुरूष लेखक’. आधीपासून ठरवूनही निम्म्याजणी काहीही तयारी न करता आल्या. पण ख्रर्‍याखुर्‍या वाचक असल्याने आपल्या स्मरणशक्तीच्या आधारे आवडत्या पुरूष लेखकाविषयी भरभरून बोलल्या.

राधिका व. पु. काळेंविषयी तर हर्षदा पु .ल. देशपांडे ह्यांच्या दोन पुस्तकांविषयी बोलली. ‘एक शून्य मी’ आणि ‘दाद’ ह्या दोन पुस्तकांच्या वाचनाने आपली मराठी भाषेची जाण समृध्द झाली हे हर्षदाने आवर्जून सांगितले.

दीपालीने ग. दि. मांच्या काव्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याचे तिच्या लिखाणातून जाणवले. संत-साहित्याप्रमाणे आपल्या जगण्याचे सार ग. दि. मांनी काव्यरूपाने आपल्यापुढे किती सोपेपणाने मांडले आहे असे दीपालीला मनापासून वाटले.

मंगलाने ग. दि. मांच्याच एकंदर साहित्याविषयी लिखाण (नेहमीप्रमाणे) केले होते.

मीरा भैरप्पांविषयी बोलली. त्यांच्या निरनिराळ्या कादंबर्‍यांतील स्त्री-चित्रणाने आणि ‘वंशवृक्ष’ कादंबरी-वाचनाने आपल्याला कसे अस्वस्थ केले हे तिने सांगितले.

चित्राला आपल्याच पिढीतील मिलिंद बोकीलांचे लिखाण आवडते. ‘एकम’ ची साठी पार केलेली नायिका आणि ‘शाळा’ मधील नववीच्या वर्गातील विद्यार्थी अशा दोन टोकांच्या वयोगटांतील व्यक्तींच्या भावजीवनच्या चित्रणाने आपण भारावून गेलो असे ती म्हणाली.

रेवतीला विजय पाडळकरांचे समीक्षात्मक लिखाण आवडते. पाडळकरांनी आपल्याला आवडलेली पुस्तके आणि चित्रपट ह्यांविषयी केलेल्या लिखाणाने आपल्या वाचनविषयक जाणीवा स्पष्ट झाल्या असे ती म्हणाली.

गौरीने वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे पुरूष लेखक का आवडत असत ते सांगितले. साने गुरूजी, प्रकाश संत हे जसे आवडतात तसेच अनिल अवचट हे आवडते पुरूष लेखक असल्याचे सांगितले. ह्यावेळी तिने बर्‍याच दिवसांनी छान लिहून आणले होते. सुरूवातीलाच `माझा आवडता पुरूष लेखक' ह्या विषयाने आपल्या मनात काही शंका उपस्थित झाल्याचे सांगितले. ती म्हणाली, `सच्च्या वाचकाची वाचनाची आवड लिंगाधारित असते का? स्त्री किंवा पुरूष असल्याने त्यांच्या लिखाणात, त्यांच्या दृष्टिकोनात काही फरक असतो का? मग मला नेमकं काय आवडतं? आपल्या प्रकृतीधर्माला साजेसं, भावविश्वाशी जुळणारं आणि अंगावर न येणारं लिखाण मला आवडतं...' असं ती म्हणाली.

सगळ्याच वाचक-मैत्रिणींचा ‘वाचन’ हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आपल्या आवडत्या पुरूष लेखकाचे लिखाण त्यांनी किती मनापासून वाचले आहे हेच अधोरेखित झाले.

१७.११.२००९

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वार्तांकन, मिनीट्स ऑफा मिटिंग म्हणून छान
पण त्यासोबत तुमच्या आवडत्या लेखकावर जरा भरभरून, विस्ताराने वाचायला आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश,

खालील धागा वाच..

एक लेखक - एक वाचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक लेखक एक वाचक... हा धागा वाचावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0