जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची,
आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची,
विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही,
तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही,
खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती,
सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी,
दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात,
काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

पाणी नसल्या विहिरीच्या काठावर झुंबड हीऽ मोठी
माणसांची, पोरांची, पोरींची आणि गावच्या पुंडांची
'भाईयो और बहनो स्पेशल शो, विहिरीतला तमाशा,
साथमें खाओ, या फिर पिओ मस्त थंडा पेप्सीकोला'
पेप्सीकोला घेई हाती नि चिमणी बघते दुरून,
'काम' सोडून पुंड बसला निवांत टमरेल झाकून

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

शाळेची घंटा झाली. आता जन गण मन' म्हणा
सारे प्रार्थनेला उभे रहा, राष्ट्रगीताला मान द्या
एऽ जब्या, हलू नकोस, हात हवेतला वळवू नकोस,
रग लागल्या पायावरचा भार मुळी सोडू नकोस
आपल्या महान देशाबद्दल थोडा आदर असू दे
'भारतमाता की...' लाही 'जऽय'चा प्रतिसाद दे

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

अरे, बेहत्तर आहे दगडावरची पकड सुटली तरी,
अरे, बेहत्तर आहे पुन्हा तळाशी कोसळलास तरी
नेहेमीप्रमाणेच एक-दोन हाडेच काय ती पिचतील,
कदाचित बापासारखे तुझे गुडघेसुद्धा फुटतील,
सावळ्या देहावरती कुठे रक्ताचे ओघळ वाहतील
पाहशील तू, काठावरचे त्यांना सुद्धा दाद देतील

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

हा तर पोचला काठापर्यंत, फारच आहे माजला
हाणा सारे नेम धरून, होउ द्या वर्षाव दगडांचा
साला इतक्या लवकर शो संपवतो म्हणजे काय,
इथे आम्हाला तर अजून 'प्रेशर' पण आला नाय
साल्या, इथून कटायचं. इथे काठावर नाही यायचं,
ज्यानं त्यानं आपापल्या पायरीनंच असतं र्‍हायचं

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

काठावरची ती अबोल चिमणी काठावरच राहील,
पेप्सीकोला संपला की आपल्या घरी निघून जाईल
येड्या, विहिरीतल्या जीवांसाठी नसते कधी चिमणी,
शिटणार्‍या पारव्यांशीच विहिरीची असावी सलगी
तळाच्या पारव्याने नसते अशी झेप कधी घ्यायची
उंच झाडावरच्या चिमणीची नसते आस धरायची

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

कडक कपड्यातले काही लोकही विहीरीवरती आले,
पॉपकॉर्नच्या पुडीसोबत थोडे त्यांनीही येन्जॉय केले,
थोड्या वेळात वैतागले, म्हणे वेळ साला फुकट गेला
याच्या पेक्षा ढिशुम ढिशुम पिक्चर असता पायला
शालू बी साली चिकणी नाय, एक लवसीन बी नाय
चंक्याची असली खडकाळ विहीर पायची काय?

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

चंक्या लेका फुकट रे फुकट केलास सारा खटाटोप,
विहीरीच्या तळातले विहिरीतच राहणार लोक
दिगंताची सारी खडकाळ, वांझ जमीन पाहिलीस,
काठावरच्या माणसांची पण नियत नाही जाणलीस
या असल्या खडकात कुठे रुजते अबोलीचे बीज?
साध्या हिरव्या अंकुराचीही इथे नसते कुठे वीण
इथे हवा गुलाबांचा ताटवा, वॅलंटाईन 'डे'चा फुलोरा,
सलमानच्या फाईट्सवर 'चिकनी चमेली'चा उतारा

थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ

field_vote: 
4.444445
Your rating: None Average: 4.4 (9 votes)

प्रतिक्रिया

Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता सिनेमा पहायलाच लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट पाहिला नाही.. पण कविता अशी की ती समजून धेताना जे लहानपणापासून पाहात, वाचत आलो आहे त्याशिवाय इतर संदर्भाची गरजच भासू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ररा, तुमच्या कवितेने पुन्हा नागराज मंजुळेंची मुलाखत आठवली Smile मुक्तांगणचा संघर्ष सन्मान पुरस्कार यावर्षी त्यांना मिळाला आहे. त्यांच्याविषयी माहिती सांगताना ते पारधी समाजाचे आहेत असा उल्लेख झाला. ती चुक लक्षात आणुन देत त्यांनी सांगितले की ते वडार समाजाचे आहेत. पुढे अतिशय मार्मिकपणे म्हणाले कि हि चुक अशीच व्हावी. अशीच होत जावी. जातींचा उल्लेख चुकत रहावा. शेवटी सारे एकमेकात मिसळुन जावे आणि जात राहुच नये.

फार वेगळ्या तर्‍हेची मुलाखत होती ती. इतकं प्रांजळपणे बोलणारा माणुस क्वचितच पाहिलाय.

कडक कपड्यातले काही लोकही विहीरीवरती आले,
पॉपकॉर्नच्या पुडीसोबत थोडे त्यांनीही येन्जॉय केले,
थोड्या वेळात वैतागले, म्हणे वेळ साला फुकट गेला
याच्या पेक्षा ढिशुम ढिशुम पिक्चर असता पायला
शालू बी साली चिकणी नाय, एक लवसीन बी नाय
चंक्याची असली खडकाळ विहीर पायची काय?

या ओळींसाठी आपल्याला दंडवत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

ररा! असे लिहिता म्हणून कधीतरीच लिहिण्याबद्दलही काही वाटत नाही.
एकदा लिहिता नी वाचणार्‍याला कित्येक दिवसांचं खाद्य देता..

चित्रपट बघितलाच पाहिजे आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आजच सिनेमा बघून आलो आणि पुन्हा ही कविता वाचली. सगळे संदर्भ लागले. नागराज मंजुळेंना ही कविता जरूर पाठवा. सिनेमा पाहून ते वास्तव शब्दांत मांडावंसं वाटणं आणि इतक्या समर्थपणे ते मांडणं ही उत्कृष्ट दाद आहे.

बाकी ते कडक कपड्यातले विहिरीवर आलेले लोक दुर्दैवाने मलाही भेटले. मोडलेलं स्वप्न वाहनावर लादून घेऊन हताशपणे जड पावलं टाकत परत येण्याच्या सीनमधूनही त्यांना काहीतरी कॉमेडी दिसायला हवं होतं, त्यांनी शोधलं आणि त्यांना सापडलंही. कारण खदाखदा हसण्याचे आवाज येत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोडलेलं स्वप्न वाहनावर लादून घेऊन हताशपणे जड पावलं टाकत परत येण्याच्या सीनमधूनही त्यांना काहीतरी कॉमेडी दिसायला हवं होतं, त्यांनी शोधलं आणि त्यांना सापडलंही. >> अडचण हीच आहे. चित्रपटात काय दाखवावे हे आम्हीच सांगणार, कुठल्या विषयावर चित्रपट काढूच नयेत इतक्या टोकालादेखील जाणार आम्ही, मग आम्हाला जे पसंत नाही ते प्रकाशित/प्रसारित होताच कामा नये हा उद्दामपणाही आम्ही मिरवणार. दुसरीकडे प्रत्यक्ष चित्रपटात, कथेत प्रत्यक्षात काय आहे यापेक्षा 'काय आहे असे मला वाटते' यावरच आम्ही आहे असे समजून तसे एन्जॉय करणार, इतरांनी ते तसेच पहावे हा आग्रहही धरणार. एकुणात काय तर समोरच्याला काय म्हणायचे/सांगायचे आहे हे महत्त्वाचे नाही, आम्ही ते ऐकणार नाही आणि आसपासच्या इतरांना ऐकू देणार नाही. आम्हालाच काय ते सारे बरोब्बर समजले आहे नि तेच सार्‍यांनी ऐकले पाहिजे हा उद्दामपणाही जोडीला असणार.
आणि हे दुराग्रह सामान्य प्रेक्षकांपुरते मर्यादित आहेत असंही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

आणि हे दुराग्रह सामान्य प्रेक्षकांपुरते मर्यादित आहेत असंही नाही.

अगदी नेमके. मेरे तरफ से एक मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याला खवचट का म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही हाच प्रश्न पडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी क्षेणी बद्दल्ली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो खवचट भौ/तै कारण तर कळु द्या खवचट क्षेणी मागचं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.

खवचटश्रेणीदात्याने कॄपया कारण विशद केल्यास आभारी राहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुसरीकडे प्रत्यक्ष चित्रपटात, कथेत प्रत्यक्षात काय आहे यापेक्षा 'काय आहे असे मला वाटते' यावरच आम्ही आहे असे समजून तसे एन्जॉय करणार, इतरांनी ते तसेच पहावे हा आग्रहही धरणार.

एका पातळीवर शेवटी काय आहे असं मला वाटतं, हेच असतं. कारण प्रत्यक्ष सत्य किंवा अॅब्सोल्यूट सत्य हे विज्ञानात असलं तरी कलानुभवात मला काय वाटलं हेच महत्त्वाचं ठरतं. तेव्हा एका मर्यादेपर्यंत प्रतीतात फरक असतो, आणि असावाही - त्याशिवाय कलानुभव भरीव होणार नाही. मात्र आपली अनुभूती इतरांवर लादणं योग्य नाही.

प्रेक्षकांची ही वागणूक काहीशी बेशिस्त ड्रायव्हिंगसारखी वाटते. रस्ते आहेत म्हणजे सर्वजण एकाच ठिकाणी पोचतात असं नाही. पण त्या त्या मार्गावर सर्वसाधारणपणे सर्वजण लेनमध्ये राहिले तर ड्रायव्हिंग सगळ्यांसाठीच सुखकर होतं. मला वाटतं ही शिस्त यायला ड्रायव्हर्सच्या काही पिढ्या जाव्या लागतील.

आणि हे दुराग्रह सामान्य प्रेक्षकांपुरते मर्यादित आहेत असंही नाही.

सामान्य प्रेक्षकांपलिकडे कुठच्याही 'सेनां'चे लोक अर्थातच अशी मुस्कटदाबी करून आपलं म्हणणं लोकांवर लादतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एका पातळीवर शेवटी काय आहे असं मला वाटतं, हेच असतं.

अन्यथा सांगणार्‍याने उचकटून सांगायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ररांच्या या प्रतिसादाशी निगडीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला ! मला वाटलं आकुर्डीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या पीजेसाठी माझ्या तर्फे एक निरर्थक बहाल केली खरी पण विनोदीची मेजॉरीटी दिस्तेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निगडित आणि निगडीतमध्ये फरक आहे त्यामुळे विनोद अस्थानी वाटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर लिंकांचा किंवा jargonsचा भडिमार न करता शेवटचा प्रतिसाद्/युक्तीवाद कधी केला होतास ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण इथे युक्तिवाद कुठे केलाय मी ?

---

तुम्हाला सगळं स्पून फीडींग पायजे. व्हिडिओ लिंका दिल्या (व त्या अतिसुलभ असल्यातरी) तुम्ही बघत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> चित्रपटात काय दाखवावे हे आम्हीच सांगणार, कुठल्या विषयावर चित्रपट काढूच नयेत इतक्या टोकालादेखील जाणार आम्ही, मग आम्हाला जे पसंत नाही ते प्रकाशित/प्रसारित होताच कामा नये हा उद्दामपणाही आम्ही मिरवणार. दुसरीकडे प्रत्यक्ष चित्रपटात, कथेत प्रत्यक्षात काय आहे यापेक्षा 'काय आहे असे मला वाटते' यावरच आम्ही आहे असे समजून तसे एन्जॉय करणार, इतरांनी ते तसेच पहावे हा आग्रहही धरणार. एकुणात काय तर समोरच्याला काय म्हणायचे/सांगायचे आहे हे महत्त्वाचे नाही, आम्ही ते ऐकणार नाही आणि आसपासच्या इतरांना ऐकू देणार नाही. आम्हालाच काय ते सारे बरोब्बर समजले आहे नि तेच सार्‍यांनी ऐकले पाहिजे हा उद्दामपणाही जोडीला असणार.
आणि हे दुराग्रह सामान्य प्रेक्षकांपुरते मर्यादित आहेत असंही नाही. <<

हलक्याने घ्यायचा प्रतिसाद : रोख तथाकथित विचारजंती समीक्षकांकडे आहे की काय? Wink
गंभीर प्रतिसाद : पण एकाच कलाकृतीकडे वेगवेगळ्या अंगांनी पाहता येतं आणि आस्वादात रुचिर्भिन्नता अंतर्भूत असते त्यामुळे कोणाला काय आवडतं ह्यात सापेक्षता असते हे लक्षात घेऊन मग आपण ह्या बाबतीत काय करू शकतो? संगीत-नाटक-सिनेमासारख्या सामूहिक आस्वादाच्या कलांच्या बाबतीत इतरांच्या आस्वादात आडकाठी उत्पन्न होईल असं वर्तन करू नये एवढी तरी अपेक्षा निदान बाळगता यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोख तथाकथित विचारजंती समीक्षकांकडे आहे की काय?>> रोख तसा कुठेही नाही. (समीक्षकांना इतके महत्त्व काय द्यायचे?) 'इफ द कॅप फिट्स' प्रकारचे विधान आहे ते. रच्याकने 'विचारजंती समीक्षक' ही द्विरुक्ती होते आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

'विचारजंती समीक्षक' ही द्विरुक्ती होते आहे.

मतभेद नोंदवून थांबते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्मायल्या वाचण्याची पद्धत अस्तंगत होऊ पाहते आहे हे नोंदवून थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

बरं बरं! ह.घ्यायचं होतं काय? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता सिनेमा बघावाच लागणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल रात्रीच सिनेमा बघितला.
आवडला असं नाही म्हणनार. आवडण्यासारखं आहे तरी काय सिनेमात ?

शेवटच्या सिनमघे फुले,आंबेडकर,सावित्री,गाडगे बाबा यांचे फोटोत फँन्ड्री आणि जब्या ला बघणारे 'डोळे' बरचं काही बोलुन गेले.

आपल्या लेखनीला __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फँड्री:इतके कौतुक कशाला? उत्तर- ज्या लोकांना तो आवडला तो ते व्यक्त करण्यासाठी. जी गोष्ट आवडली त्या गोष्टीचे कौतुक करणे हा मानवी अभिव्यक्तीचा भाग आहे. आता का आवडला याचे समोरच्याला पटेल असे उत्तर मिळू शकत नाही. एखाद्याला बोंबील आवडते तर एखाद्याला नाही आवडत.मी फॆन्ड्री पाहिला मला आवडला. मी त्यात उच्च अभिरुची मूल्य वगैरे शोधत बसलो नाही. करमणूक झाली. ;तो काही समाज बदलवण्याच्या हेतुने निर्माण केलेला प्रबोधनपट नाही असे 'मला' वाटते. मी खेड्यात लहानाचा मोठा झालो. यामुळे कदाचित तो मला जवळचा वाटला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सगळं वाचत असताना मुखपृष्ठावरची ही कविता पूर्ण वाचायचीच राहिली. कदाचित तिच्या शीर्षकामुळे माझा सबकॉन्शस तिला निकालात काढून, स्टीरीओटाईप करून मोकळा झाला असावा.
माझ्या सबकॉन्शसकडून इतकी घनघोर चूक याआधी झालेली नाहीये.
कविता, अत्यंत आशयघन, रुपके ह्यांचा अतिशय अप्रतिम वापर करून जी घट्ट बांधलेली आहे, त्यात एकही अक्षर इथेतिथे झालेलं नाही, ना त्यातून कवितेचं यमक तुटलंय. चित्रपटाचा इतका सुंदर सारांश दुसरीकडे कुठेही पहायला मिळणार नाही. थोडं ज्वालाग्राही बोलायचं झालं तर जनरली अशा कवितांना एक 'अगतिक' टोन असतो, जो इथे कणमात्रही दिसत नाही. कवितेची अतिशय थेट, आणि रोखठोक भाषा तिच्या अलंकारिक सौंदर्याला कुठेही बाध आणत नाही. हा एक मुद्दा फार म्हणजे फारच अभावाने आढळतो. अजी़म नवाज राही ह्यांनी सुरु केलेल्या 'कल्ट'ची ही कविता प्रतिनिधी म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.