बासरीचे गुपित

नित्य हरिचे अधरामृत
सेवन तू करिशी
भाग्यवंत तू बासरी
अभागी राधा मी बावरी

काय तप केले?
कोण पुण्य संपादिले?
मज सांगी तू बासरी
विनवी राधा मी बावरी

अहं भुसा टाकूनी
पोकळ जाहले
ऐक राधे गे साजणी
गुपित सांगतसे बासरी

- देवदत्त परुळेकर

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

अहं भुसा टाकूनी
पोकळ जाहले

बासरीचा आणि अहंचा काय संबंध आहे ते कळेना.
अवांतरः 'हरी फुकेल तशी मी वाजेन' असा स्त्री-वादाला काट संदेश तर जात नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हरी फुकेल तशी मी वाजेन' असा स्त्री-वादाला काट संदेश तर जात नाही ना?

कृष्ण आणि बासरी यांचा संबंध पण स्त्रीवाद/स्त्रीमुक्ती याच्याशी लावला गेला का म्हणजे? अरे अरे अरे वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आम्ही इतके कन्फ्युज्ड आहोत की कुठल्याही प्रसंगी,अरे वा,अरेच्चा,अरे बापरे आणि अरेरे यातले काय म्हणावे हेच कळेनासे झाले आहे.त्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नित्य हरिचे अधरामृत
सेवन तू करिशी

रामजोश्यांची छेकापन्हुती आठवली.

"सासुसासरा पति यांदेखत अधरामृतमाधुरी, घेतसे काय वदावे तरी!!!
तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हय्या हरी, उंहूं उंहूं, नव्हे गं हा मधुकर पंकज हरी!!!"

अन बासरीबद्दलः

"अधरचुंबिनी वंशसंभवा लालसमधुरध्वनी ।

असावी मुखासि मुख लावुनी ।

वृषभानूची सुता काय ती राधा...?

नव्हे रे मुरली जगमोहिनी"

अवांतरः पुढे वर्णन चालू:-

"गुणवंत कुचावर लोळे अति शोभला, तो कृष्ण काय गे सांग मला!
नव्हे गे हार कळेना तुला"

अतिअतिअवांतरः

"मज शीतळ करितो श्रमी होऊनिया भला, तो कृष्ण काय गे सांग मला!
नव्हे गे व्यजन सुवंशातला!!!"

कवितेबद्दल अन रामजोश्यांची आठवण करून दिल्याबद्दल कवीचे अनेक हाबार्स!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके सारे अवांतर झालेच आहे तर आणखी एक कडवे :
"अंबरगत परि पयोधरांतें रगडुनि पळतो दुरी",
"तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हय्या हरी"
"नव्हे गे, मलयज करी माधुरी"

राधासखिसंवादें छेकापह्नुति ही आयका; रसिकहो, किती चतुर बायका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

जय छेकापन्हुति, जय रामजोशी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

९ र‌ंध्रे अस‌लेले श‌रीर म्ह‌ण‌जे बासरी आणि ब्र‌ह्म‌र‌ंध्रातुन प्राण फुंक‌ले की जे च‌ल‌न‌व‌ल‌न/कृती होतात ते म्ह‌ण‌जे स‌ंगीत अशी एक अध्यात्मिक काव्य‌क‌ल्प‌ना वाच‌लेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0