ऱ्हायनो सिझन

पिफमधल्या आवडलेल्या काही चित्रपटांपैकी एक ऱ्हायनो सिझन. इराणच्या कट्टर इस्लामिक राजवटीमधे एका कवीला आणि त्याच्या बायकोला ब्लास्फेमीच्या आरोपाखाली वेगवेगळ्या तुरुंगात टाकलं जातं, ३० वर्षानंतर सुटल्यावर बायकोचा शोध घेणाऱ्या कवीची हि कथा.

१९७९-८०च्या काळात बंडखोरांनी शहाची राजवट उलथवून लावत इराणमध्ये इस्लामिक राज्याची स्थापना केली, मग साहजिकच इस्लामविरोधी ठरवून अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचे सत्र चालू झाले, ह्याचा एक बळी होता कुर्दिश-इराणी कवी Sadegh Kamangar, Sadegh च्या रोजीनिशीवर बेतलेला चित्रपट म्हणजेच ऱ्हायनो सिझन.

turtles can fly आणि no one knows about persian cats हे चित्रपट देणाऱ्या Bahman Ghobadi ला धमक्या मिळाल्या मुळे २००८ मध्ये इराण सोडून जावं लागलं, Bahmanने तब्बल ४ वर्षाने हा चित्रपट बनवला. चित्रपटातील मुख्य पात्राची भूमिका करणाऱ्या Behrouz Vossoughiला देखील १९७९ च्या बंडखोरीच्या काळात परागंदा व्हावं लागलं होतं, इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या Vossoughiने ३० वर्षानंतर हाच चित्रपट करावा हे रोचक आहे. Monica Bellucciहि ह्या चित्रपटात एका कमी आकर्षक भूमिकेत अत्यंत सहजपणे वावरताना दिसून येते.

Bahman राखी रंगाचे प्राबल्य असेलेल्या सिनेमाटोग्राफीतून व ‘आकाशातून पडणारी कासवे’, ‘घोड्याचा कोल्ज-अप’, ‘खोल पाण्यात असलेला Sadegh’, ‘गाडी चालवताना मधेच आलेला एक ऱ्हायनो’ अशा प्रतीकांचा वापर करून तसेच Sadeghचा भूतकाळ फ्लॅशबॅक आणि कवितेच्या माध्यमातून उलगडत थोडासा सरिअलिस्टिक आणि बराचसा काव्यात्मक ऱ्हायनो सिझन सादर करतो.

Martin Scorsese, Monica Bellucci, Vossoughi ह्या नावांचा वापर Bahmanने आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली जावी म्हणून केला पण इराणमध्ये जाफर पनाहीवर घातलेल्या चित्रपटनिर्मीती बंदीच्या पार्श्वभूमीवर तो वापर बहामनला मिळालेल्या इतर फायद्यापेक्षा इराणी कलाकारांसाठी आशादायक स्थिती निर्माण करण्यास हातभार लावतो.

इराणच्या, Bahmanच्या आणि Vossoughiच्या इतिहासाशी परिचित नसल्याने आपल्याकडील प्रेक्षक चित्रपटात गुंतून जाण्यास थोडाफार अपयशी होतो, पण निदान Vossoughiच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहण्याची शिफारस मी नक्कीच करेन. Sadeghची भूमिका करणाऱ्या Vossoughiचा अभिनय संपूर्ण चित्रपटभर खिळवून ठेवतो, मोजकेच संवाद असतानाही केवळ देहबोलीतून आणि चेहऱ्यातून सादेघचे दु:ख Vossoughi सहजगत्या मांडतो.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

भारावुन जाण्याच्या, आवडी निवडींना नवे पैलु मिळण्याच्या वयात पाहिला होता. त्याची तीव्रता स्मरणात आहे.
Bahman ची शैली काव्यात्मक आहेच, माजिदिच्या symbolismचं दाहक एक्सटेंशन जाणवतं. प्रवास(बाह्य आणि आंतरिक दोन्ही), सीमांतर-अवस्थांतर आणि प्रतीकात्मता यांचं विलक्षण रसायन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेमात पडावा असा सिनेमा. पुणे फिल्म फेस्टिव्हलला मला प्रचंड आवडलेल्या तीन सिनेमांपैकी एक. यावर सवडीने लिहितो. आत्ता फक्त एका उत्कृष्ट सिनेमाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही हा चित्रपट अतिशय आवडला होता. काही सीन्सबद्दलचा अमंजस नंतरच्या जिंजंसोबतच्या गप्पांतून कमी झाला / दूर झाला नी चित्रपट अधिकच आवडू लागला.
हा चित्रपट (किंवा हाऊस विथ टरेट) किमान ज्युरिंच्या मते पिफ जिंकेलसे वाटले होते (अर्थात विजेता चित्रपट पाहिला नाही त्यामुळे तुलना करता येणार नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!