ठाणे कट्ट्याचा वृत्तान्त

स्मार्ट दिसण्याच्या क्षणभंगुर मोहापायी खादीचं जाकीट चढवलं, तेव्हाच या कट्ट्याचा वृत्तान्त सादर करण्याचं गोड झेंगट आपल्या गळ्यात येऊन पडणार याबद्दल नियती पूर्वसंकेत देते आहे हे मला कळायला हरकत नव्हती. पण स्वखुशीनं पत्करलेल्या स्थानिक यजमानपदाच्या उत्साहात गर्क असताना, गुर्जींनी माझी बकरी कधी केली ते माझ्या नजरेतून निसटलं. मग शहाण्या आणि अभ्यासू मुलासारखे फोटू काढणं, एका जागी जमवणं, फेसबुकावर डकवणं आणि अक्षम्य उशीर होण्याआत वृत्तान्ताची डेडलाईन गाठणं आलंच. परिणामी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेला कट्टा रविवारी दुपारी १२:३० पर्यंत संपल्यानंतर त्यातली झिंग अनुभवत निवांत लोळण्याऐवजी मी सचिंग मुद्रेनं ल्यापटॉपसन्मुख होत्साती झाले. असो.

या कट्ट्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आंतरजालीय एकात्मतेचं हृद्य का काय ते प्रदर्शन. उपस्थित सदस्यांची यादी नजरेखालून घातली, तरी चाणाक्ष आंतरजालीय वाचकांच्या हे तत्काळ लक्षात येईल. (मुक्तविहारी, सर्वसाक्षी, अस्मादिक, मणिकर्णिका, राधिका, सुनील, राजेश घासकडवी, ऋषिकेश. सलिल (लि र्‍हस्व), विश्वनाथ मेहेंदळे, मस्त कलंदर. गवि, रामदास, निखिल देशपांडे, नितीन थत्ते, चित्रा राजेन्द्र जोशी)

(सगळ्यांचा एकत्रित फोटो उपलब्ध नाहीये, कृपया त्यावरून कुरकुर करू नये.)

”शेवटी मराठी आंतरजाल तर एकच आहे, कुठलं का संस्थळ असेना..." वगैरे बंधुभाव दाखवत मंडळी कट्ट्याला एका पंगतीत जेवायला बसल्यामुळे मला थोडं गहिवरून आलं होतं. त्यात ’स्त्रिया नि पुरुष असे विभाग पडणं बरं नव्हे’ असा आग्रह धरून मालकाचं खास स्थान दर्शवणारी (आणि टेबलाच्या दुसर्‍या टोकाला काय(-काय) चाललंय त्याचं परिप्रेक्ष्य पुरवणारी) आपली खुर्ची न सोडणारे गुर्जी; पॉप टेट्सबद्दलचं प्रेम, खाद्यपदार्थांबद्दलचा (हॅरेसमेंटी) चोखंदळपणा आणि ऐसीकरांबद्दलचा जिव्हाळा सिद्ध करत पंगतीत जातीनं फिरून लक्ष देणारे गवि; कोणत्याही मराठी आंतरजालीय संस्थळाचं सदस्यत्व नसतानाही टेबलाच्या मधोमध जागा पटकावणारे सलिल (ल र्‍हस्व); धाग्यावर खडाजंगीच्या उंबरठ्यावर पोचूनही कट्ट्यावर त्याचा मागमूसही न ठेवणारी राधिका... यांमुळे या गहिवरलेपणात भरच पडली. पण मालकांनी त्यांची ती सुप्रसिद्ध भेटपिशवी बाहेर काढली मात्र - लोक तरारून उठले.


’पुण्यातल्या कट्ट्याला छोट्टी छोट्टी पुस्तकं, आणि मुंबईतल्या कट्ट्याला मात्र जाडी जाडी पुस्तकं काय? हा सापत्नभाव बरा नाही..’ असा उघड निषेध पुण्यनगरीच्या एकमात्र प्रतिनिधींनी नोंदवला. पुस्तकांवरून अस्मादिक आणि मणिकर्णिका यांच्यात थोडा तात्त्विक मतभेदही (काही जण याला कॅटफाइट अशी तद्दन मेल शॉवनिस्ट संज्ञा वापरतात. पण ते असो. ’ऐसी’च्या लिबरल वातावरणात असले उल्लेख शोभत नाहीत.) झाला. तेव्हा कुठे गुर्जी पुस्तकं देत असल्याची कुणकुण नक्की कोणकोणत्या संस्थळांवर पोचलीय बरं, असा एक क्षुद्र विचार माझ्या तोवरच्या निरागस आणि बंधुभावव्यापित मनात प्रथमच डोकावला. पण मग मुक्तविहारींकडून आलेल्या आल्याच्या वड्या, सर्वसाक्षींनी आणलेली चाकलेटं, रामदासांनी आणलेली आवळा क्याण्डी आणि राधिकानं आणलेली बिस्किटं चापताना मी पुन्हा एकदा आंतरजालीय भ्रातृभावाच्या पक्षात सामील झाले.

टेबलाच्या एका टोकाला आनंदी घटकेतलं सोनेरी द्रव्य उसळत होतं.


दुसर्‍या टोकाला मात्र लोक ठणठणीत कोरडे होते (तिकडच्या लोकांनी इकडच्या लोकांना ’निर्व्यसनी लेकाचे’ अशी शिवी हाणलीच). ते न साहिल्यामुळे द्रव्यसाधनेत सहभागी होऊन समतोल साधायचे आपले समन्वयवादी प्रयत्न गुर्जींनी प्रामाणिकपणे लावून धरले होते. उरलासुरला कोरडेपणा दूर करायला गविंनी पुढाकार घेतला आणि कोरड्या टोकाकडच्या निर्व्यसनी (वा तशी प्रतिमा ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या) मंडळींसाठी पेरूचं एक पेय मागवलं. शेवटपर्यंत गवि बिचारे आपली जाणकारी सिद्ध करत अवघड अवघड नावांचे पदार्थ मागवत होते आणि नावं लक्षात ठेवण्याची तसदीही न घेता कट्टेकरी ते चापत होते.

(हा असमतोल दूर करण्याचं कार्य नंतर विश्वनाथ मेहेंदळेंनी हाती घेतलं आणि कॉर्पोरेट डिस्काउंट न देणार्‍या पॉप टेट्सच्या अन्यायी व्यवस्थापनाशी यथाशक्ती चर्चा (च्च च्च! भांडण नव्हे हो, भांडण नव्हे. च ह र ह चा हा.) करण्यापर्यंत निभावलंही.) सुरुवातीला एकसंध भासणारी पंगत हळूहळू विखरत गेली. रामदास-सर्वसाक्षी-सुनील-मुक्तविहारी असा एक अक्ष, निखिल देशपांडे-मस्त कलंदर-विश्वनाथ मेहेंदळे-ऋषिकेश असा एक अक्ष, सस्मित चेहर्‍यानं सगळ्या गटांमधल्या चर्चांचा अंदाज घेणारे गुर्जी, ब्लॉगविश्वाची उपेक्षा सहन न होऊन (किंवा ’हे काय? ब्लॉगवर जुना फोटो लावलायस का गं तू? त्यात वेगळीच दिसतेस की!’ या मस्त कलंदरच्या निरागस पृच्छेमुळे आणि त्याहून अधिक ’इतकं काय वाटून घेतेस अगं? मी’पण’ लठ्ठ झालेय किती!’ या तिच्या मागाहूनच्या सारवासारवीमुळे) व्यथित झालेली मणिकर्णिका, संख्याशास्त्र-मुद्रितशोधन, प्रंमाणलेखन अशा गहन विषयांवर चर्चा करून कट्ट्याला येण्याचा आपला हक्क शाबीत करणारा सलिल (राइट! लि र्‍हस्व!), मधेच टपकून मग कौटुंबिक जबाबदार्‍यामुळे काढता पाय घेणारे थत्तेचाचा आणि चित्राताई... असं एकंदर हृदयंगम का काय ते दृश्य होतं.

कट्टेकरी पुन्हा एकदा एकसंध झाले, ते ’मराठी आंतरजालाचा इतिहास’ या सर्वप्रिय (आणि कट्ट्यासाठी कंपलसरी) विषयाला सलिलनं (लि- ह्म्म) तोंड फोडल्यानंतर. ’मराठी आंतरजालाचा इतिहास कुणी लिहिला आहे का?’ या त्याच्या प्रश्नावर मंडळींनी खाण्यापिण्यातला रस बाजूला ठेवून कान टवकारले. मग गुर्जींनी चपळाईनं व्यासपीठाचा ताबा घेतला आणि ’ऐसी’च्या ’स्थापने’मागची (माझा नाही, त्यांचाच शब्द. लागोपाठ तीन वाक्यांत त्यांनी ’ऐसीची स्थापना’ असा शब्द वापरल्यानंतर ते रंगात येऊन चुकून ’ऐसीची प्रतिष्ठापना’ वगैरे म्हणतात की काय, अशी भीती वाटून मी जीव मुठीत धरून बसले होते. न जाणो - जालकर्‍यांना प्रिय असलेली आस्तिक-नास्तिक चर्चा पुन्हा सुरू झाली तर काय घ्या?) भूमिका विशद करायची संधी साधली. मग बराच काळ स्थापना, भूमिका, तात्त्विक मतभेद, इनडिक्वेट प्लॅटफॉर्म, लिबरल वातावरण, सांस्कृतिक कार्य... इतकंच ऐकू येत होतं. जिवाचा कान करून ऐकणारे कट्टेकरी (यामागे ऐसीच्या भूमिकेबद्दलचं कुतूहल नसून गुर्जींचा मृदू आवाज होता, असाही एक प्रवाद आहे); ’श्रेण्या वगैरे तपशील झाला, खरं महत्त्वाचं आहे ते...’ वगैरे म्हणत चर्चेला विधायक दिशा देणारे (किंवा गुर्जींना किल्ली मारणारे) रामदास; आणि भेदरल्या नजरेनं टेबलाकडे नजर ठेवून असणारे किमान ३ होशिय्यार वेटर्स - असं दृश्य साधारण अर्धापाऊण तास तरी दिसत होतं.


कॉर्पोरेट डिस्काउंट न देण्यावरून हॉटेल व्यवस्थापनाशी झालेल्या उपरोल्लिखित वाटाघाटी असफल झाल्या आणि ’बिल बदलता येत नाही म्हणजे काय? विमे, बनवच तू एक सॉफ्टवेअर’ या निखिल देशपांडेंच्या गंभीर उपसूचनेनंतर मंडळी हळूहळू बाहेर पडली. मग बराच वेळ पुढच्या गप्पा कुठे रंगवायच्या यावर एक फड रंगला आणि शेवटी मॉलच्या फुकट बाकांवर स्थानापन्न होऊन लोकांनी सिनेमांची देवाणघेवाण, पुढल्या कट्ट्यांचे बेत, फोटू काढणे, पळ काढलेल्या लोकांबद्दल करण्याची गॉसिप्स अशी सांस्कृतिक देवाणघेवाण केली. या देवाणघेवाणीचा श्रमपरिहार करण्यासाठी कॉफीपान हवंच होतं. त्यासाठी लोक पुन्हा खालच्या सीसीडीत जमले, ते तिथल्या निर्धारी व्यवस्थापनानं दिवे घालवून कट्टेकर्‍यांना अक्षरश: कटवेपर्यंत. रात्री मुक्कामी रंगलेल्या गप्पा, सकाळी मिसळ + मॅजेस्टिक बुकस्टॉल असा एक उपकट्टा, मग काही जणांच्या घरी जाऊन पुस्तकांच्या कपाटापर्यंत मारलेली उपटसुंभ मजल (स्वारी, नावं जाहीर करण्याची अनुज्ञा नाही.) असं करत करत... कट्टा कधीतरी संपला.

पुढचा कट्टा होणार आहे काय, याबद्दल अजून तरी काही बातमी नाही. मुंबई - पुणे तर झाले. आता मालक भारतात असेस्तोवर विदर्भवासीयांनी (पक्षी: उसंत सखू) त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचं मनावर घ्यावं आणि नागपूर कट्ट्याचा एक रंगीन वृत्तान्त घडू द्यावा, म्हणजे झालं!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

चहामारी! फोटो बघुन आधीच जळजळ झालेली त्यात हा वृतांत... ठाणे कट्टा एकदम व्हायब्रंट झाला असं दिसतय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा जोरदार झालेला दिसतोय! थेट मनोगतापासून ते ब्लॉगविश्वापर्यंतच्या सदस्यांनी एकाच कट्ट्यावर हजेरी लावली हे पाहून फारसे आश्चर्य वाटले नाही. स्थान(क)महात्म्य आणि गुर्जींची उपस्थिती यामुळे हे शक्य होणार, याबाबत अजिबात शंका नव्हती Wink

फोटू पाहून गेल्या खेपेच्या कट्ट्याच्या आठवणींनी अं.ह. झाल्या गेल्या आहे. बाकी पॉप टेट्सच्या हॅपी अवरची वेळ अजूनही ७:२७ पर्यंत आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा !!! मस्तच. जोर्दार पार्टी झालेली दिस्ते. वृत्तांत आवडला हो, मेघनामॅडम. ठाण्याबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर असल्याने आणखीनच.

ते सोनेरी द्रव्य पिणारे - ब्रह्मा विष्णू महेश - या तिघांना स्पेशल प्रणाम ... अस्सलामु आलेकुम - त्यांची ओळख करून घ्यावीशी वाटते. (ते काळा टीशर्ट घातलेले, बदामी/भुरा शर्ट घातलेले व निळापांढरा टीशर्ट घातलेले - या तिघांची ऐअ नामे कळतील तर ... मजा आ जायेगा.). बाकीच्यांना (हाय कंबख्त तूने ....) माझा नम्र प्रणाम.

ते जांभळा शर्ट घातलेले, बुल्गानियन दाढी असलेले, पत्रकार-कम-इंटेलेक्च्युअल दिसणारे गवि का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सोनेरी द्रव्य पिणारे - ब्रह्मा विष्णू महेश - या तिघांना स्पेशल प्रणाम ... अस्सलामु आलेकुम - त्यांची ओळख करून घ्यावीशी वाटते. (ते काळा टीशर्ट घातलेले, बदामी/भुरा शर्ट घातलेले व निळापांढरा टीशर्ट घातलेले - या तिघांची ऐअ नामे कळतील तर ... मजा आ जायेगा.).

हपिसातून फोटो दिसत नाहीएत. परंतु जे काही अंधुकसे आठवते त्यानुसारे -

१. काळा टीशर्टवाले अस्मादिक.
२. बदामी/भुरा शर्टवाले - जयंत फाटक (ऐसी) उर्फ मुक्तविहारी (मिपा)
३. निळापांढरा टीशर्ट सर्वसाक्षी

ते जांभळा शर्ट घातलेले, बुल्गानियन दाढी असलेले, पत्रकार-कम-इंटेलेक्च्युअल दिसणारे गवि का ?

होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा वा. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टी मराठी आंतरजाल तर एकच आहे, कुठलं का संस्थळ असेना..." वगैरे बंधुभाव दाखवत मंडळी कट्ट्याला एका पंगतीत जेवायला बसल्यामुळे

अरे कुठे तो मराठी बाणा अन कुठे हा बंधुभाव! छ्या! मुंबईच्या लोकांनी पार निराशा केली ब्वॉ! आमच्या कट्ट्यात आम्ही यथेच्छ बाणेदारपणा केला होता (म्हणूनच वृत्तांत वगैरे लिहण्याचा कोणी फंदात पडलं नाही म्हणतात)! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कट्टा झाला असे म्हणतात. वृत्तांत वाचून बहुतेक झाला असावाच, असे वाटते.

मला तर काहीच आठवत नाही!

संध्याकाळी पाच वाजता कट्ट्यासाठी घरून निघालो तो रात्री पावणे बाराच्या सुमारास परत पोचलो. सकाळी मेजावर दोन पुस्तके पाहून, "पॉप टेटात गेलेलात की बूक स्टोअरात? आजकाल इकडेही बूक स्टोअरात "असली" सोय होते वाट्टं?".

पुढचे मी ऐकले नाही!

फारीनात बॉर्डर नामक पुस्तकविक्रेत्याने ग्राहकांना कॉफी पीत अमर्याद वेळेपर्यंत पुस्तके चाळण्याची आणि आवडल्यास विकत घेण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. पुढे आम्ही दर विकांताला तीन कॉफीत दोन पुस्तकांचा फडशा पाडून रिकाम्या हाताने परत येण्याचा सपाटा लावला! बहुधा आमच्यासारख्यांचीच संख्या अमर्याद वाढल्यामुळे मालकाने दुकानांना टाळे ठोकले, अशी अफवा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पळ काढलेल्या लोकांबद्दल करण्याची गॉसिप्स अशी सांस्कृतिक देवाणघेवाण"....
मस्तच!
काही गोष्टींची लागलेली रूखरूख ----
१. खूप आधीपासून ठाऊक असूनही, घराच्या जवळ असूनही वेळेचे व्यवस्थापन नीट करू न शकल्याने हुकलेली मैफिल
२. खरी नावे दडवून इथे-तिथे मस्त-बिनधास्त वावरणार्या मित्र-मैत्रीणींशी खरीखुरी ओळख होण्याची हुकलेली संधी
३.वाचनप्रेमी काय काय वाचतात हे इथे समजत असले तरी त्याविषयी थेट जाणून घेता येण्याची हुकलेली संधी
आणि
सर्वांत शेवटचे व अतिमहत्त्वाचे....
४.न मिळालेली पुस्तक-भेट... त्याविषयी काहीतरी सांग ना, मेघना! कोणते पुस्तक ते. की थेट वाचूनच लिहिणार पुस्तकाविषयी??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून काय वाचलं नाही हो. 'मला वाचायला प्रॉब्लेम्स येताहेत' असे गळे मी गेले कित्येक दिवस काढतेय, तुमच्या नजरेस पडलेले दिसत नाहीत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.न मिळालेली पुस्तक-भेट... त्याविषयी काहीतरी सांग ना

असं एकच पुस्तक नव्हतं
गुर्जींनी काही पुस्तकं आणली होती, पैकी प्रत्येकाने एकेक उचललं. तुम्ही येईपर्यंत बहुदा संपली होती.

माझ्या हाती धारपांचा "टोळधाड" हा कथासंग्रह लागलाय. धारपांनी गुढकथांसोबत विविध प्रकारचे लेखन केले आहे. प्रस्तुत कथासंग्रह विज्ञानकथा हाताळतो. लहान, प्रभावी कथा आहेत. अर्थात कथेपेक्षा त्यांची वर्णनशैली, बारीक बारीक तपशीलांचे निरिक्षण व ते मांडण्याची हातोटी, कथा अधिक खुलवून जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खी खी खी आणि ख्या ख्या ख्या चा आवाज कानात कालपर्यंत अख्ख्या कोरम मॉलातच नाही तर माझ्या कानातही घुमत होता.
ध ह मा हा ल कट्टा!!

कट्ट्याला अनेक गोष्टी नव्याने समजल्याही. गुर्जी हे नुसते विद्रट नसून उत्तम नटही आहेत,(त्यातही स्थिर बाहुल्यांचा अभिनय तर क्या कहने!), गविंची पदार्थांची जाणकारी नुसत्या चवीपुरती नसून त्याची क्वांटिटी, क्वालीट, किंमत अश्या चहुंअंगाने जाणारी आहे (यावेळी मेन्युकार्डाला स्पर्शही न केल्यामुळे मला -व पोटालाही - इतकं भरून आलं), राधिका हरतर्‍हेचे खाणे खाते वगैरे हे प्रतिसादापुरते नसून त्यासंबंधीच्या हाटेलांची माहिती सांगताना सरस्वती तिच्या जीभेवर (हो हो! अगदी केस मोकळे सोडून, शंकराकडून रूंडमाळा उसन्या घेऊन वगैरे) तांडव करते, मणिकर्णिका 'ठ' आणि विशेषतः 'ठ्ठ' हे जोडाअक्षर देवनागरीतून काढून टाकावे यासाठी वेगळे आंदोलन चालु करणार आहे (न जाणो आआपचे तिकीट उत्तर मुंबई लोकसभेतून मिळेलही), मकी नवर्‍यांचे "वळण" सरळ कसे करावे यावर एक पुस्तक लिहिणार आहे आणि त्याची प्रस्तावना निदे करणार आहे, नाटकांच्या तिकीटांचा वापर एक अनोखा खेळ खेळण्यासाठी कट्ट्याच्यावेळी करता येतो (ज्या खेळात मला शुन्य मार्क मिळाले), विश्वनाथ मेहंदळे आणि मणिकर्णिका यांच्या नावांचे खास असे उगम आहेत (अर्थातच ते असे जाहिर करणार नाहीयोत, लगेच डोळे टवकारू नका), रामदास काका हे अतिशय व्यासंगी व प्रभावी व्यक्ती आहेत इतकेच ऐकून होतो पण त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या (चक्क) पाठिमागे(ही) केली जाणारी स्तुती खरी आहे हे पटले, सुनील-सर्वसाक्षी-जफा हे निराळ्या 'उंचीवरच्या' अक्षावर राहुनही आमच्यासारख्या अर्थली ऑब्जेक्ट्स सोबत यथास्थित गप्पा हाणत होते (आता ते सुनील विसरलेत हे छानचे Wink ), आणि (खादी ज्याकेटधारी) यजमानीण बै आपला रोल अतिशय सिरीयसली सांभाळतात आणि कट्ट्यापुरतेच नाही तर उपकट्ट्यावरही ऐसीकरांसाठी (मॅजेस्टिकच्या स्टाफसकट) कोणाशीही "चर्चा करण्यास" तयार असतात.

बाकी सलिल(र्‍हस्व लि) यांनी इथे सभासदत्त्व घेताच त्यांचेही बिंग फोडण्यात येईल. घ्या हो सदस्यत्त्व बघितलंत ना आम्ही कित्ती कित्ती साधे सोज्ज्वळ आणि पापभिरू (आणि हो! लिबरल, लिबरल!) जन्ता आहोत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या अशा सुंदर व्रुत्तांताला, आमच्या २/४ शब्दांची भर न घालता, सरळ फोटो चिकटवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

वृतांत वाचून आणि वरच्या प्रतिसादातला पहिला फोटो पाहून मेघनासाठी काऊगर्ल बूट्स आणण्याचा निर्धार केला आहे.

मेघना, सलिलमधला ल ऱ्हस्व का लि? एकदा काय ते ठरवून सांगा पाहू. शुद्धलेखनाने वात आणलाय.

(बाकी कट्ट्याबद्दल काही न बोलल्याचं सुज्ञजनांच्या लक्षात आलंच असेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्रितशोधकासाठी आमिष म्हणून ठेवलेली चूक आहे ती. नेमकी तूच गळाला लागलीस? तुझ्यात पोटेन्शिअल दिसतंय मला! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"सलिल मधला लि र्‍हस्व" असं वाचून लि'ल बॉयची आठवण झाली. अर्थात त्या लि'ल बॉयचे कुठले गुण सलिलमध्ये दिसले नाहीत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्वा... मस्तं झालेला दिस्तोय कट्टा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आजवर अनेक कट्टी झाले. मुंबईत झाले, ठाण्यात झाले, पुण्यात झाले. (नेमक्या त्या ऐतिहासिक एकमेवाद्वितिय पिरंगुट कट्ट्याच्या वेळी आम्ही बालवर्गात होतो त्यामुळे नव्हतो)... अचानक झाले, ठरवून झाले... दोघा तिघांचे झाले, अठरा वीस लोकांचे झाले.... घरात झाले, हाटेलात झाले.... जळवणारे झाले, ’बरं झालं गेलो नाही’ टाइप झाले, ’उगाच आलो’ टाइपही सुटला नाही... अनेकानेक पद्धतीने झाले. मात्र मराठी आंतरजालावर कोणत्याही एका संस्थळापुरताच अडकला नाही असा हाच बहुतेक. कट्टा चालू असताना, फ़ोटो येत होते, अपडेट्स येत होते. मी आख्खी इनोची बाटली, जेलुसिलचं एक कार्टन, जीरा सोड्याचं एक क्रेट इत्यादींचा आस्वाद घेत ते फ़ोटो आणि अपडेट्स बघत वेळ अतिशय सुंदर घालवला. (दुसर्‍या दिवशीचे फ़ोटोही पाठवायचे बाकी ठेवले नाही गधड्यांनी!)

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

वृत्तांत आवडला. एवढ्या उंचीच्या व्यक्तिमत्वांमधे आपण केवळ पेपरवेट ठरलो असतो हे उमगले. पुढील कट्ट्याला आगाऊ शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता गुर्जी हे विधान खोडून काढायला कट्टेकर्‍यांच्या उंचीचा आलेख देणार हे भविष्य वर्तवतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चंद्राचे फोटो काढले होते ते दिसत नाहीयेत. :-S

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यांचा ऐसीवरचा आयडी सांगा की, म्हणजे आम्हालाही कळेल! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चंद्रा पण आली होती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेघने , विदर्भात माझ्याशिवाय कुणी कट्टेकरी आहेत काय शिल्लक Fool ? तर ते असो . राजेश नागपुरात एका बखरकाराला आणि नाटककाराला भेटायला माझ्यासोबत :O येणार म्हटल्यावर ते घाबरून भूमिगत झाले . त्यांची प्रतिष्ठा :-B आणि माझा दरारा ;;) पणाला लागला होता ना काय करणार ? शिंगरू मेलं हेलपाट्याने ROFL अशी गत करू नका हो आपल्या राजेशची Wink . परमकरुणानिधी विदर्भ Blum 3 स्वतः येऊन शिंगरूला उप्स sss राजेशला मुंबईला भेटून उपकृत झालेला आहेच Dirol . आपले सगळ्यांचे मुंबई गेट टुगेदर धम्माल विनोदी झाले . ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'होणार होणार' म्हणून या कट्ट्याच्या दवंड्या पिटत होत्या गेले तीन आठवडे. त्याआधी बराच काळ 'व्हायला हवा, व्हायला हवा' असे तरंग मनामनांतून उसळत होते. मग नववधूप्रमाणे बावरत 'लाजते, पुढे सरते, फिरते' करत तारीख ठरण्यात वेळ गेला. शिवाजीपार्क की ठाणे याबाबत आतले मुंबईकर आणि गावकुसाबाहेरचे, स्वतःला मुंबैकर म्हणवणारे यांच्यात थोडी रस्सीखेचही झाली. या सगळ्या विभ्रमांना काही खाष्ट (खाष्ट म्हणजेच खास. बेष्ट म्हणजे ब्येस असतं तसंच) पुणेकरांनी त्याबद्दल मुंबैकरांना चिडवूनही घेतलं. पण शेवटी झालं गेलं कचराळी तलावाला मिळालं, या न्यायाने ठाण्यात कट्टा संपन्न झालाच.

पुण्याच्या कट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या दहा मिंटं आधी गेल्यावर जो सन्नाटा अनुभवायला मिळाला तो टाळावा म्हणून यावेळी मी अर्धा तास उशीरा गेलो, तर साताठ लोकं आधीच येऊन बसलेले होते. मी सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्यावर नवीन येणारांना नावांची यादी करून नावं आणि माणसं जुळवण्याची कसरत करायला लावली. नंतर आलेल्या निखिल आणि विमेने सगळीच नावं बरोब्बर ओळखली. इतरांनीही बहुतेक नावं ओळखली.

जयंत फाटकांनी आल्या आल्या आल्याच्या वड्या दिल्या, ('मात्र जाताना गेल्याच्या वड्या दिल्या नाहीत' असा विनोद करू नये अशी मला जाहीर विनंती झाली) सर्वसाक्षींनी सर्वांना चॉकोलेटं दिली, राधिकाने जग काळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवणाऱ्या कुकीज दिल्या (आणि प्रत्येकाला नम्रपणे 'नाही त्या मी केलेल्या नाहीत' असं सांगून घाबरू नका, खुशाल खा असं म्हटलं.) आणि रामदासांनी प्रतापगड सर करून आणलेल्या आवळ्याच्या वड्या हिट्ट झाल्या. या सगळ्या खाण्यामुळेच लोकांनी जेवण कमी घेतलं आणि त्यावरूनच पॉपटेटियनांनी चिडून कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यास नकार दिला असाही प्रवाद आहे.

ओळख होता होता सगळेजण कुठचे कुठचे 'कर' आहेत ते कळायला लागलं. म्हणजे मुंबईकर ठाणेकर पुणेकर वगैरे वगैरे. ठाणेकरांची अर्थातच मेजॉरिटी झाली. आणि त्यांच्यापैकी सगळेच जण कोरम मॉलापासून पाच मिंटं चालत जाण्याच्या अंतरावर रहात आहेत असं कळलं. यावरून एकतर ठाणं अगदी छोटं असावं किंवा कोरम मॉल परिसर हा मराठी संस्थळपडीकांसाठी काहीतरी एक विशेष आकर्षण घेऊन तयार झालेला असावा असे दोन अंदाज मनात बांधले. मुंबै-पुणे या दोन अक्षांच्या बाबतीत मी दोन्ही डगरींवर पाय ठेवून असल्यामुळे मला यावेळी 'लहानाचा मोठा मुंबईतच झालो की' असं सांगण्याची संधी मिळाली. पण सध्याच्या आधुनिकोत्तर भंजाळलेल्या अस्मितांच्या जगात इतरही 'कर'पणात सगळे विभागले होते. उदाहरणार्थ मायबोलीकर, मनोगतकर, उपक्रमकर, मिपाकर आणि केवळ ऐसीकर... याचीही एकवार उजळणी होऊन कोणाच्या छातीवर किती बिरुदं आहेत हे कळलं.

सुरूवातीला सगळे वेटर आम्हाला इतर कष्टमरांप्रमाणेच वागवत होते, पण एकदा गवि आल्यावर मात्र त्यांच्या नजरेत आमच्याविषयी एकदम आदराची भावना निर्माण झाली. नुसत्याच मेक्सिकन हॅटीवर वावरणाऱ्या वेटरांनी त्यांच्या सोंब्रेरो वगैरे चढवल्या. गविंनी सराईताप्रमाणे गार्लिक चीज ब्रेड, चीजबॉल्स, आफ्रिकन फिश, पेपर स्प्रेय्ड फिश वगैरे एक से एक छान गोष्टी मागवून जिभेचे चोचले पुरण्याची व्यवस्था केली.

सध्या इतकंच. जसजशा गोष्टी आठवतील तशा त्या लिहीत जाईनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile झकास प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयत्या वेळेस उपटलेल्या कामांमुळे येऊ शकलो नाही आणि मराठी जालाच्या कानाकोपर्‍यांतील लै लोकांना भेटण्याची संधी घालवली याबद्दल हळहळ वाटते आहे.
जबराट झालेला दिसतोय कट्टा. संस्थळीय भेदभावापलीकडचा कट्टा आवडला लैच. मुंबैकरांना स्पेशल भेटायला एकदा यावेच लागणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मग शेवटी एकंदर खर्च किती झाला म्हणे? एकूण गविकृत अंदाजपत्रकाच्या तुलनेत डेफिशिट की सरप्लस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनेरी द्रव्याच्या वाटेस न जाणार्‍यांना रुपये ३१० प्रत्येकी. जाणार्‍यांचे किती झाले? मी विसरले आकडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरे वा... मानले! एकदम परफेक्ट अंदाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनेरी द्रव प्राशकांना प्रत्येकी रु २४०.०० (रुपये दोनशे चाळीस मात्र, रोख) वरील प्रतिसादात दिलेल्या रकमेव्यतिरिक्त अधिक द्यावे लागले. सात रसिकात पाच कमंडलु आणि हौसेचे मूल्य रु २४० प्रति रसिक म्हणजे उत्तमच.
कट्टा झकास झाला. आल्हाददायक हवा, दिलखुलास गप्पा, काही नविन ओळखी...एकुण मजा आली. वेळेवर उपस्थित असल्याने पुस्तक हवे ते मिळाले. आयोजक, संस्थळाचे मालक आणि सर्व उपस्थित सदस्यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनेरी द्रव्याच्या वाटेस न जाणार्‍यांना रुपये ३१० प्रत्येकी.

ते प्रत्यक्षात ३०६ (तीनशे सहा मात्र) होते हे नोंदवतो.

कलेक्षनच्या सोयीसाठी त्याचे ३१० असे राउंडीकरण केले गेले होते.

चि. मणिकर्णिका यांच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत.

शिवाय केवळ मी धाग्यावर घेतलेल्या उदाहरणाखेरीजही मेंबरांनी अनेक अधिकचे पदार्थ मागवले गेले होते..

उदा. चार व्हेज / प्रॉन्स इ विविध प्रकारच्या बिर्यानी आणि एक थाई करी राईस.
पेपर ब्लास्टेड फिश
किमान ३ थ्री जी मॉकटेल्स (हे अपेयाच्या बिलात येत नसून सामान्य खाद्यबिलातच येते)

मुळात काहीही मागवले असले तरी खाणार्‍यांची संख्या आणि मागवले जाणारे पुरेसे अन्न यांचे प्रमाणच लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवला होता. त्यामुळे तीस लोक जरी जमले असते आणि तिप्पट व्हरायटी आणि क्वांटिटी मागवली असती तरी तत्समच गणित झाले असते.

दोनच रुपयांनी अंदाज चुकला याचे दु:ख आणि अधिक रुपयांनी चुकला नाही याचे समाधान लाभले.

बाकी कट्ट्यावर मला मिळालेले पुस्तक मी अखेरच्या फोटोसमयी टेबलवर ठेवले आणि परत घ्यायला विसरलो. हा करंटेपणा झाला आहे. कृपया ज्या कोणी ते घेतले आहे ते पुढील कट्ट्यास देण्याचे करावे.

धारपांचे पुस्तक - निळ्या कव्हरचे.. नाव आठवत नाही. बहुधा टोळधाड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सापडलं!

हे पहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

छान. बर्‍याच दिग्गजांचे दर्शन झाले.
दोन्ही कट्ट्यांचे फोटो आणि वृत्तांत आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरम मॉलमध्ये कट्ट्यासाठी कोरमही भरू शकणार नाही, असे वाटत असतांना सगळे सुरळीत पार पडल्याचे पाहून तोंड कडवट झाले. यावेळी छायाचित्रण करतांना काही विसंवादी व्यक्तिकेंद्रीत अस्मितांनी बंड पुकारल्याने सर्व कट्टेकर्‍यांचे चेहरे दिसू शकले नसावेत काय? केवळ एक अपवाद दाखवून पॅनमराठीआंजा कट्टा असल्याचा निष्कर्ष काढणार्‍या ऐअकरांना कारणमिमांसा विचारून जळजळ व्यक्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते इंग्रजी क्वोरम नसून संस्कृताळलेलं 'कोsरम' आहे, कोsहम प्रमाणे. त्यामुळे तोंड कडवट होत असल्यास थोडा कोकाकोला घालून प्या.

कट्ट्याचे अजूनही काही फोटो आहेत. पण त्यांना वयोमानाप्रमाणे गुढगेदुखीचा रोग जाहल्याने त्यांना अपलोडवताना त्यांची दमछाक होते, व त्यामुळे ते अजून पोचलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या दिवशीच्या कट्ट्याचे आम्हाला सांगितले नाहीत ते.. दुष्ट कुठले हायवे अलिकडले ठाणेकर ते!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

आयत्या वेळी ठरला अहो तो कट्टा. तुम्हांला चेंबुरातून कुठून बोलावून घ्यायचे, म्हणून नाही सांगितले! (ठाण्यातल्या लोकांनी बोंबाबोंब करू नये. त्यांच्या रविवार सकाळीत व्यत्यय आणू नये म्हणून नाही सांगितले, हे उत्तर माझ्याकडे तयार ठेवलेय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन


गार्लिक चीज ब्रेड


फिश आफ्रिकानो


चीज बॉल्स (हादडून संपण्यापूर्वी)


खाण्यात मग्न ऐसीकर


तेच ऐसीकर, थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून


चढलेली संध्याकाळ, आणि कोरम मॉलातला जवळपास भरलेला क्वोरम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी संस्थळीय+जालीय एकात्मतेचा डांगोरा पिटून मग, फोटोत सगळ्यांना ऐसीकर म्हणणं ही कल्पना आवडली. पूर्वी कसं, विहीरीत पाव टाकून हिंदूंना ख्रिश्चन बनवायचे, तसंच. फोटोतला चीजी पाव हे प्रतीक नसून खरंच त्याला काही अर्थ आहे तर. तसंही गुर्जी नास्तिक चर्चचे पास्तर आहेतच; असे बरेच अनुभव असणार गुर्जींना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही बोला उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे - ऑम्लेट! (इति पुल).

तसेच, काही बोला विक्षिप्तबै, सर्व संस्थळे सारखी - चिजाळलेला लसूणी पाव!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आस्तिक असोत, नास्तिक असोत; ऐसीकर असोत किंवा मिपाकर असोत; सगळी या उत्क्रांतीचीच लेकरं. सर्वांनाच वेगवेगळी जनुकं मिळणं ही त्या उत्क्रांतीचीच करणी. पण या जनुकांतून आलेले भेदभाव हे वरवरचे आहेत. गुणसूत्रांच्या जोड्या सगळ्यांच्या तेवीसच! प्रत्येकाकडे एकतरी एक्स क्रोमोजोम असतोच असतो. नैसर्गिक निवडीतून सगळेच तावून सुलाखून निघालेले आहेत. 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट'चा कोता अर्थ घेता कामा नये. (नाहीतर या फोटोतले विमे सोडून कोणी सर्व्हाइव्ह होणार नाही) केवळ सर्वशक्तिमान शिल्लक राहणार, आणि बाकीचे दुर्बळ मरणार - तसे ते मेलेच पाहिजेत असं नाही. 'जीवो जीवस्य जीवनम' म्हणजे सगळ्यांनी एकमेकांचा जीव घ्यायचा असा नाही. (संस्थळांवरच्या काही चर्चांवरून तसा गैरसमज होईल कदाचित) किंबहुना सर्वांच्याच अंतरात असलेली परोपकारी बुद्धी, इतरांवर प्रेम करण्याची कामना, आणि आपल्या सर्व्हायव्हलवर ताण देऊनही इतरांचं भलं करण्याची प्रवृत्ती - हीही उत्क्रांतीदेवीचीच देण आहे!

तेव्हा बंधू, भगिनी आणि इतर सर्वहो, जगावर प्रेम करा. असेच एकत्र जमा, खा, प्या, हसा, खिदळा, फोटो काढा, वृत्तांत लिहा... का की यातच आपल्या सर्वांचं आणि सर्व प्राणिमात्रांचं, विश्वाचं, चराचराचं हित आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते शेवटचं आमेन राहिलं, किंवा तुमच्या चर्चात जे काही म्हणत असतील ते! पण त्या शिवाय मजा नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

शिवाय 'कां की' सुद्धा Smile

१. फुलटॉस सोडून दिल्या गेल्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का की आहे की तिथे! (का अनुस्वारावर फोकस आहे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

पाहिलंच नव्हतं. पण बरोबर आहे, अनुस्वार हवाच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वांटंलेंचं! तुंम्हांसं अंनुंस्वांरांचेंचं कौंतुंकं अंसंणांरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

बिंदूगामी प्रतिक्रिया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकाकडे एकतरी एक्स क्रोमोजोम असतोच असतो.

गुर्जींमधला एक्स-फॅक्टर या वेळेस दिसल्याचं ऋच्या प्रतिसादात वाचलंच. त्याचं कारण आत्ता समजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

च्यायला , पुढच्या कट्ट्याला येण जमवायला हवं(च).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

जमवाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋषिकेश, गुर्जी, ज्याकीटधारी यजमान यांसि पुनश्च पाहून आनंद जाहला(ठाणेकर चाचा कुठे दिसेनात). मजलेखी काही परिचित/अपरिचित आयड्यांना चेहरे मिळाले अन् बर्‍याच आयड्यांना घसघशीत बॉड्यादेखील मिळाल्या(गुर्जींनी त्यामानानेच पुस्तके आणलीत की काय?). ओला कट्टा करुन ते करुन वर काही प्लेटांचे फोटो डक्वुन आमचं तोंड ओलं केल्याबद्दल निव्वळ निषेध. आणि वरती दुसर्‍या दिवशीही गोंधळ घातला, त्याबद्दलही निषेध. बाकी सर्व कट्ट्यांस गविंसारखे मातबर अंदाजसम्राट आणी खिलवय्ये मिळोत ही मनोकामना व्यक्त करून वृत्तान्त मात्र आवडल्याची पावती देतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यावर खडाजंगीच्या उंबरठ्यावर पोचूनही कट्ट्यावर त्याचा मागमूसही न ठेवणारी राधिका...

काही हुषार चित्रनिर्माते आपला चित्रपट "गाजावा" यासाठी मोर्चे, निदर्शने इत्यादि प्रायोजित करतात. तसेच, हा कट्टा गाजावा यासाठी केलेला हा पूर्वनियोजित कट असावा, असे ऐकिवात आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका, मी थोडक्या प्रसिद्धीसाठी तुझी सामाजिकन्यायबुद्धी विकत घेतली असा आरोप करतोय सुनील तुझ्यावर. याची योग्य ती दखल तू घ्यावीस अशी माझी तुला जाहीर विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता बिंग फुटलेच आहे, तर आयोजकांनी या प्रसिद्धीबद्दल मला जे कमिशन द्यायचे ठरले होते ते अजून थकित असून वेळच्या वेळी चुकते करावे अशी जाहीर विनंती करून टाकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

सुनीलकडून किती कमिशन चुकतं झालं तुला, ते आधी सांग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा घ्या चंद्राचा फोटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

ही आमची चंद्रा !! हिच्यावर आमचा भारी जीव !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा कशाबद्दल? 'चंद्र होता साक्षीला' म्हणून?

आणि त्या चंद्राचा रंग असा चमत्कारिक का दिसतोय? (नारिंगी रंगाचा चंद्र आजवर नव्हता पाहिला बुवा! पहिल्यांदाच पाहतोय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा वन्स इन अॅन ऑरेंज मून झाला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे ओशाळला निळा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा कशाबद्दल? 'चंद्र होता साक्षीला' म्हणून? >> व्हेलेँटाइन दिनी पौर्णिमा आल्याने चंद्रात एवढा इंटरेस्ट असेल Blum 3

(नारिंगी रंगाचा चंद्र आजवर नव्हता पाहिला बुवा! पहिल्यांदाच पाहतोय.) >> सिरीअसली?? उगवताना आणि मावळताना चंद्र पिवळा नारंगीच दिसतो की! पौर्णिमेला जास्त जाणवत हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषकरून पानगळीच्या दिवसांत चंद्र नारिंगी दिसतो. त्याला 'पतझड का चाँद' म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सिरीअसली?? उगवताना आणि मावळताना चंद्र पिवळा नारंगीच दिसतो की! पौर्णिमेला जास्त जाणवत हे.

बिलिरुबिन जास्त झाल्यागत पिवळाजर्द दिसू शकतो / दिसतो, इथवर ठीकच आहे.

पण इतका नारिंगी?

--------------------------------------------------

म्हणजे, साधारणतः, कावीळ झाल्यावर डोळे दिसतात, तसा. (चूभूद्याघ्या.)

बोले तो, तितका तो कधी (चुकून, फॉर अ चेंज) मीही पाहिलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

सगळे फटू मस्तं आहेत.

शेवटचे ३ विशेषकरून आवडले. मेघनाक्का कुणाला बघून हात जोडताहेत?

विमेकाका कसले अर्ग्युमेंट करताहेत?

लाष्टच्या फटूत ऋच्या डोळ्यांतील लाल चमक पाहून टर्मिनेटर पार्ट २ ची आठवण होऊन डॉळे पाणावले. मक म्यामचे एक्स्प्रेशनही विधानसभेत एखादे विधेयक ऐकावे तसे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघनाक्का कुणाला बघून हात जोडताहेत?

कै नै, त्या खादीचं ज्याकेट घालून जन्रल फुडारीगिरी करताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहो, असंय काय! औंदाच्या निवडणुकीला एक फ्लेक्स पाडून टाकू त्यांचा मग, हाकानाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विमेनी एका मित्राला किडनी दिलीवती, त्याची गोष्ट सांगताहेत ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किडनी बीन्स काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

नाय नाय, किडनी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐला किडनी दिली _/\_

हे ऐकून विमेंबद्दलचा आदर शतपटीने वाढला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दिलीवती

का दिली आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दिलीवती! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता या डोळामारु स्माईलमुळे शंका येऊ लागली आहे.

मित्राला स्वतःची किडनी प्रदान केली की मित्राला पुरेपूर कोल्हापूरमधे अन्य खाद्यजीवांची वजडी खाऊ घातली याची शंका येऊ लागली आहे.

प्रथम कार्य अत्यंत धीराचे आणि उच्च कोटीच्या त्यागाचे आहे.

दुसरेही बर्‍याच कमी कोटीतल्या पण अल्पश्या आर्थिक त्यागाचेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकेशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...डोण्ट स्पिल द बीन्स!

(सवितातैंच्या वरील किडनी बीन्ससंबंधीच्या शंकेच्या अनुषंगाने.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी आणि निखील उशीरा पोहचल्यामुळे पुस्तकाचे लाभार्थी झालो नाही. मकी असल्याने निखीलला वेगळा फायदा प्रशासकीय धोरणात बसत नसेल पण माझं काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५ वर्षांपूर्वीचा, हा कट्टावृत्तांत सॉलिड्डे!!! मी पाहिलाच नव्हता. काल मेघनाचे सगळे लेख/कविता वाचल्या त्यात मिळाला.
_____________
मीही त्या वर्षी गेले होते पण नोव्हेंबरमध्ये. त्यामुळे हा मिस केला नाहीतर गेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0