आम्ही भेटतोय, कुणाकुणाला वेळ आहे?

"अनेक लहानमोठे कट्टे होऊ द्या, गप्पा रंगू द्या, फेस भराभर उसळू द्या..." अशी आशीर्वचनं गुर्जींनी काढलीच आहेत.

त्यांपासून प्रेरित होऊन आम्ही काही मंडळी काही कट्टे प्ल्यान करतो आहोत.

त्याबद्दल कुणाकुणाला विचारायचं असा खल करत असताना लक्षात आलं, आपल्यासारखेच काही पोटगट स्वतंत्रपणे भेटायचं ठरवत असणारच. त्यांनी आपल्याला कळवलं नाही आणि केलेल्या मज्जेचे / कुटाळक्यांचे नुसते फोटू नि वृत्तान्त टाकले तर मेजर जळजळ होणार. ती वर्णनं आंबट तोंड करून नुसतीच वाचायची आणि हळहळत राहायचं - असा मामला उभयपक्षी होणार. त्याहून असल्या कट्ट्यांची माहिती पुरवणारा एक धागाच टाकावा, ते दूरदृष्टीनं पाहता अधिक फायद्याचं ठरेल.

म्हणून हा कट्टास्पेशल धागा. इथे आपल्या कट्ट्याची माहिती देताना जागा, वेळ, अपेक्षित लोकसंख्या, खर्च आणि कार्यक्रम यांचे ढोबळ तरी तपशील देणं अपेक्षित आहे.

***

तर संभाव्य कट्टा:

शनिवार संध्याकाळ ६:३०-७ वाजता, पुण्यात युनिव्हर्सिटीच्या आसपास, भंकस आणि जेवणखाण, आपापला जेवणखर्च. कोण कोण येणार?

*********
संपादकः
सुचना:

  • या पुढे हा एकच धागा अश्या आगामी कट्ट्यांच्या सुचनांसाठी वापरला जाईल.
  • प्रत्येक कट्ट्यासाठी नवा धागा काढू नये. तो या धाग्यावर हलवला जाईल.
  • इथे जास्त अवांतर/वैयक्तिक चर्चा टाळायचा प्रयत्न करावा, एकमेकांना संपर्क साधायसाठी व्यनीचा सढळ वापर करावा.
  • धाग्याची लांबी फार वाढली तर नवा भाग सूरू केला जाईल, मात्र आधीचा भाग वाचनमात्र केला जाईल.
धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला आत्ता तरी जमेलसं वाटतं आहे. पण दिवस मोजके असल्यामुळे दुसरी डेट मिळाली तर कलटी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच! आमच्या जवळच आहे की हे! मी नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याचा संभाव्य कट्टा झाला की पुढचा शनवार.
वेळ: कलती उन्हे
खादाडी: दुपारचं किंवा रातचं जेवण. तांबडा पांढरा, रक्ती, मटणाचं लोणचं वगैरे, शाकाहारी मध्ये इतर सर्व.
गप्पांची संभाव्य स्थळे: रंकाळा, युनिव्हर्सिटी, पन्हाळा इत्यादी.
खादाडीची संभाव्य स्थळे: दौलत, निलेश, महादेव प्रसाद, शेतकरी धाबा आदि

कुणी इच्छुक असतील तर चर्चा करुयात आणि पुढचं ठरवुयात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधे एक शनिवार जाऊ दिलात, तर मी उत्सुक आहे. पण लागोपाठचे वीकान्त गावाबाहेर म्हंजे.... बघा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अर्थातच. पुढच्याचा पुढचा शनवार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधला अधला एखादा दिवस चालत असेल तर बघा! मी आस्तोय तितं कधीमधी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

अधल्य अमधल्या दिवशी संध्याकाळी साडे सहानंतर वगैरे मी मोकळा असू शकतो.
पण एकूणात ट्राफिक, प्रवासाला लागणारा वेळ गृहित धरला, तर प्रत्यक्ष भेट फारच थोड्या वेळाची असेल.
उदा :-
मी साडे सहाला फ्री होइन. पण शहराच्या कुठल्याही भागात तिथून पोचायला तासभर तरी लागेल.
म्हणजे साडे सात आथ शिवाय भेट नाही.
शिवाय नउ वाजले की निघायची घाई सुरु होणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अहो काका! मी प्र यांना क्वाल्लापुराबद्दल विचारत होतो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

एखादा कट्टा आमच्या डोंबिवलीला पण करू या.

काय ते सारखे ठाणे आणि पुणे?

(चला काडी टाकून झाली, एकाच वेळी २ ठिकाणी आग लावली आहे, आता पळावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

वा हा धागा काढला ते बरं केलं. मी दिवसाच्या कट्ट्यांना हजेरी लावायचा प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पुण्यात २५ एप्रिल ते १४ मे ह्या काळात केव्हातरी ७-८ दिवस असणार आहे. पूर्ण कार्यक्रम अद्यापि निश्चित नाही. ह्या काळात कोठे कट्टा पुण्यात असल्यास यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारिख नेमकी ठरली की कळवा इथेच. वाट पहात आहे.
ज्यांना शक्य असेल ते अवश्य भेटण्याचा प्रयत्न करतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यायला आवडेल आणि यायची खुप इच्छा आहे पण काही न टाळता येणारी अगदीच महत्त्वाची कामं आहेत. थोडा काम-चुकारपणा करता आला (जो मी नेहमीच करतो) किंवा गोड बोलून ती कामं दुसर्‍याच्या खात्यावर ढकलता आली (ती तर खासीयतच आहे आपली) तर नक्कीच येण्याचे जमवीन Smile त्यातल्या त्यात गुर्जी येणार असतील तर नक्कीच ते 'युएसात' जाण्याआधी त्यांना पुन्हा एकदा भेटायला आवडेल Smile

(ठाणे कट्ट्याचा वृत्तांत वाचून आणि फोटो पाहून झालेली जळजळ अजून काही शमली नाही, त्यामुळे ह्या छोट्या कट्ट्याला हजेरी लावून ही अ‍ॅसिडीटी जरा कमी करावी म्हणतो Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे या पुण्यामुंबईच्या कट्टेक-यांसाठी काही वेगळा समुदाय वगैरे काढा की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मेघना, हा कॉमन धागा काढल्याबद्दल आभार.

सुचना:

  • या पुढे हा एकच धागा अश्या आगामी कट्ट्यांच्या सुचनांसाठी वापरला जाईल.
  • प्रत्येक कट्ट्यासाठी नवा धागा काढू नये. तो या धाग्यावर हलवला जाईल.
  • इथे जास्त अवांतर/वैयक्तिक चर्चा टाळायचा प्रयत्न करावा, एकमेकांना संपर्क साधायसाठी व्यनीचा सढळ वापर करावा.
  • धाग्याची लांबी फार वाढली तर नवा भाग सूरू केला जाईल, मात्र आधीचा भाग वाचनमात्र केला जाईल.

याच सुचना मुळ धाग्यात अ‍ॅडवत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सारखं कट्टा कट्टा कट्टा....

कंठाळा आला नुसता. अरिष्ट नायतर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला तुमची चिडचिड कळू शकते. कारण कट्ट्यांबद्दल मीही या प्रकारची नापसंती यापूर्वी अनुभवली आहे. तुमचा प्रतिसाद हलकाफुलकाही आहे, पण मी सिर्‍यस उत्तर देणार आहे.

***

प्रत्यक्ष भेटणं अशक्य आहे अशा लोकांसाठी आणि / किंवा कोणत्याही कारणांमुळे प्रत्यक्ष भेटण्याहून हा आभासी संपर्क ज्यांना सोईचा आहे अशांसाठी संस्थळं असतात - मान्य. मी बराच काळ या गृहीतकाला चिकटून राहिले.

पण गेल्या महिन्याभरात बर्‍याच लोकांशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यांतल्या सगळ्यांशी घट्ट आणि दीर्घकालीन मैत्री होणं अशक्य आहे, मान्यच आहे. पण प्रत्यक्ष भेटण्यामुळे इथल्या संबंधांची परिमाणं काही प्रमाणात तरी बदलली. (प्रचे शब्द उसने घेतेय!) आयड्यांना बॉड्या मिळाल्या, वाद करताना सहजासहजी सुरात येऊ शकणारा करकरीतपणा कमी झाला, संवादाची शक्यता वाढली हा माझा अनुभव.

गेली काही वर्षं संध्याकाळी नाक्यावर कटिंग ढोसताना करण्याची सिर्‍यस भंकस करायला गावात एकही समानशील मित्र न उरणं हा माझ्यापुढचा एक त्रासदायक प्रश्न होता. तो संस्थळांनी काही प्रमाणात सोडवला होताच. पण फेसबुक, व्हॉट्सॅप, गटॉक आणि ब्लॉग-संस्थळांच्या आभासी विश्वात रमलेल्या स्वतःच्या शहाणपणाबद्दल (सॅनिटीबद्दल) अधून मधून मेजर शंका सतावत असे. प्रत्यक्ष भेटण्यामुळे या मैत्रीला चेहरा मिळाला आणि समोरासमोर बसून मनसोक्त भंकस+गप्पा+कुटाळक्या+गॉसिप्स+चर्चा+वाद करण्याची भूक काही प्रमाणात तरी हेल्दी पद्धतीत भागली, हा कट्ट्यांचा मोठा फायदा आहे.

हां, कट्ट्यांमधे अडकून नुसताच टीपी करण्याचा कंटाळा मला आणि इतरही अनेकांना काही दिवसांनी येईलच. त्यावर उपाय म्हणजे - लगेच जरी नाही, तरी इथून पुढे - काहीतरी उपक्रम / कार्यक्रम ठरवून त्याकरता भेटणे हा दिसतो. (नि तो कितीही अभ्यासू / चष्मिष्ट वाटला तरी) मी तो करून पाहणार आहे. पाहू...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(थोड्याश्या अवांतराचा धोका पत्करून)
संवादाची शक्यता वाढते हे मान्य. केवळ आभासी संवादमात्र राहिलो की बऱ्याचदा न पटणाऱ्या मुद्द्यावरून थयथयाट करताना विसंवाद वाढतो. भेटीतून सामंजस्याची, चर्चा पुढे नेण्याची, भीड चेपण्याची प्रक्रिया काही अंशी का असेना सुकर होते. शुद्ध भंकसी शिवाय इतर सांस्कृतिक देवाण-घेवाणी शक्य आहेत. जसे की पिच्चर, सिरियली, गाणी.
कट्ट्याला असलेले सध्याचे जरासे खर्चिक रूप बदलले, काहीतरी उपक्रम / कार्यक्रम ठरवून त्याकरता भेटणे असे काहीसे झाले तर त्यांचा कंटाळा, अढी येणार नाही हे खरे.
परंपरा, प्रथा यांविषयी मतांतरे असली तरी एखाद्या चांगल्या उपक्रमाला त्यांचं रूप देणं अवघड नाहीच तर बऱ्याचदा आपली भावनिक, वैचारिक अशी एक विधायक गुंतवणूक होते हेही खरं. ऐसीचे दोन्ही 'दिवाळी अंक' उत्तरोतर असेच दर्जेदार, आनंददायक असावेत असं मनापासून वाटतंच.
महाराष्ट्र शासनाने पुण्याच्या फिल्म फेस्टला शासनाचा अधिकृत म्हणून स्वीकारले. ऐसी ने देखील असाच एखादा/ असेच काही फेस्ट ऐसीपुरता अधिकृत करावा/करावेत, तशी प्रथा पडली तर चांगलंच. तिथे शक्य तितक्या ऐसीकरांना त्यांच्या स्वातंत्र्यासहित मुक्त चर्चा वादविवाद धिंगाणा करू द्यावा, लिहावे इत्यादी.
(कोल्हापुरात पुढचा कट्टा झालाच तर त्यात हिमांशू भूषण स्मार्त यांच्याशी अनौपचारिक गप्पा, त्यांच्या एखाद्या नाटकाचे/ललित लेखांचे अभिवाचन, त्यांचे एखादे अनौपचारिक लेक्चर करावे असे वाटत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ आभासी संवादमात्र राहिलो की बऱ्याचदा न पटणाऱ्या मुद्द्यावरून थयथयाट करताना विसंवाद वाढतो. भेटीतून सामंजस्याची, चर्चा पुढे नेण्याची, भीड चेपण्याची प्रक्रिया काही अंशी का असेना सुकर होते.

गरज काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेली काही वर्षं संध्याकाळी नाक्यावर कटिंग ढोसताना करण्याची सिर्‍यस भंकस करायला गावात एकही समानशील मित्र न उरणं हा माझ्यापुढचा एक त्रासदायक प्रश्न होता>>> ++१११११
अगदी अगदी!!!

"अपुल्या जातीचे भेटावे कोणीही| अपुल्या मातीचे बोलरे कोणीही||"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारखं कट्टा कट्टा कट्टा....
पण मज्जा येतीये सर्व वाचताना. त्यामुळे , करा कट्टे नि टाका फोटो अजून. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझ्या हापीसात संध्याकाळी ६.३० नंतर.
काय करायचे -गफ्फा हाणायच्या.
आणि काय ? आठवड्याभरात ख्रेदी केलेली पुस्तके चाळणे.
शक्य झाल्यास सिनेमे बघणे किंवा गाणि ऐकणे.
एखाद्या दृकश्राव्य माध्यमातील मित्राला बोलवून गफ्फा
खर्च कमी कसा करणे.
की बोर्ड वापरताना हात ओले-तेलकट नसावे यासाठी आणलेले खाद्यपदार्थ हाणणे.खारी -टोस-फरसाण -भत्ता- केका-......सोबत चहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तयार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तारीख कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारीख प्लीज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक भोचक सूचना.

रिअल टाईमात जरा कमी भेटा.
अन्यथा संस्थळावर लिहिणे बोलणे कुंठते, खुटते, इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शिवाय संस्थळावरील लेखनात कट्ट्यांमधले संदर्भ घेऊन काही लिहिले जाते. जे कट्ट्यास उपस्थित नसलेल्या इतरांस कळत नाही.

कट्ट्यात रेग्युलरली भेटणार्‍यांचा कंपू बनू शकतो. (पक्षी - कंपू बनला आहे असे इतरांना वाटू शकते. संदर्भ- इतरत्र होणारी कंपूविषयक चर्चा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शिवाय संस्थळावरील लेखनात कट्ट्यांमधले संदर्भ घेऊन काही लिहिले जाते. जे कट्ट्यास उपस्थित नसलेल्या इतरांस कळत नाही.

सहमत. याच कारणामुळे 'मायबोली'वर अनेकदा प्रयत्न करुनही रुळणे जमले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैच्याकै.
रिअल टायमात भेटणे महत्वाचे. ज्यांना लिहायचे ते लिहीतातच. आता तुम्ही नाव गाव लपवून फिरता तसेच इतरांनी का करावे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिअल टाईमात जरा कमी भेटा.
अन्यथा संस्थळावर लिहिणे बोलणे कुंठते, खुटते, इ.

असे का व्हावे? असे होत असेल असे जरी गृहित धरले तरी, या कारणास्तव न भेटणे रास्त होणार नाही.

व्हर्चुअर आणि रिअल आयुष्यातील फरक ठेवा असा मुद्दा इथे दिसतो. मी म्हणेन की हळू हळू ही दोन्ही विश्वं एकच होणार आहेतच. तुम्ही भेटला नाहीतर तर तुमचे घड्याळ इतरांपेक्षा हळू चालेल एव्हढंच. (याची तुलना, शाळेतील/वर्गातील/ऑफिसातील मित्रांनी एकत्र भेटू नये का? याच्याशी करता येईल.)

उलट मी तर म्हणतो जरूर भेटा, एकमेकांचे विचार नीट समजून घ्यायला मदतच होईल. त्यानंतरचा संस्थळावरचा संवाद कदाचित पुर्वीपेक्षा जास्त समृद्ध असेल. (चर्चा-वादविवाद पकडून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

व्हर्चुअर आणि रिअल आयुष्यातील फरक ठेवा असा मुद्दा इथे दिसतो.

इथपर्यंत बरोबर.

रियल लाईफ भेट अन व्हर्चुअल भेट यांत फरक आहे, अन असायलाच हवा.
निळ्या, मी तुला समोर भेटलो, (हे: "Nile, मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो, तर", असे वाचावे.) तर आपण दोघांनी एकमेकांशी, खरं खरं आतल्या मनातलं बोलायला सुरू करायला किती दिवस लागतील?

मला माझ्या सर्व काँटेक्स्ट्स बाजूला ठेवून नेकेड थॉट्स मांडणे शक्य होण्याची काही कारणे असतात.
अनेकदा काही मते मांडल्यावर भडक प्रतिक्रिया येतात.
उदा.
हा वरती जो 'चायवाला' नामक आयडीधारक मंदार जोशी नावाचा माणूस आहे, याने मला एकदा इतर संस्थळावर, डेक्कनच्या बस स्टॉपवर ये, मग बघतो तुला, अशी धमकी दिलेली आहे, अन यानंतर किमान २ वेळा याला माथेफिरूपणा केल्याबद्दल तिथून हाकलून दिले गेले आहे, हा इतिहास आहे. तरीही या महोदयांचा कडवे/कडवटपणा कमी होत नाही, होणार नाही.

नेट इज ऑल्वेज अँड विल बी, वर्चुअल.

डॉक्टर म्हणून मी व्यक्तीशः डॉक्टर-पेशंट रिलेशन्शिपमधे जात पात धर्म लिंग पाळत नसलो, तरीही, अमुक धर्माची पेशंट आहे का? मग तमुक प्रकारच्या विकृतीने वाग, असे करणारी मुले/'डॉक्टर्स" मी पाहिली आहेत.

असो.

तुमच्या भेटीवर विरजण घालणे हा हेतू नव्हे, भेटल्याने विसंवाद कमी होतो याबद्दल दुमत नव्हेच, पण तो विसंवाद कमी झाल्याचे केवळ 'दिसते'. कारण तोंडावर भेटल्यास माझ्या/तुमच्या शारिरिक्/सार्वजनिक "मापा"कडे पाहून बरेच लोक बरीच तात्विक मुरड "घालून घेऊ" शकतात, असेही असू शकते.

For me, for the timebeing, net IS virtual, and shall be.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रियल लाईफ भेट अन व्हर्चुअल भेट यांत फरक आहे, अन असायलाच हवा.

इथेच असहमती व्यक्त करतो.

तुम्ही दिलेली उदाहरणं डॉक्टर-पेशंट नात्यात ठिक आहेत. (इथे डॉ. हाऊस आठवला.)

व्हर्चुअल जग हे तुमच्या अनेक इतर कंपूप्रमाणेच आहे. शाळेत असताना वर्गातील सर्वांनाच तुम्ही मित्र म्हणून बाहेर भेटत नाही, किंवा ऑफिसमधील सर्वांनाच तुम्ही घरी चहापाण्याला बोलावत नाही. (त्यातल्या त्यात तुम्हाला नावडणा-यांशी तर नाहीच नाही.)

ऑफिसमधील लोकांशी मैत्री कैल्याने ऑफिसमधील तुमचं नातं बदलू शकतंच, पण म्हणून तुम्ही ऑफिसमधल्या लोकांशी मैत्री करूच नये असं नाही. मित्रांशी असलेल्या मतमतांतरासकटही प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका वास्तव आयुष्यात बजावतच असतो.

मला माझ्या सर्व काँटेक्स्ट्स बाजूला ठेवून नेकेड थॉट्स मांडणे शक्य होण्याची काही कारणे असतात.

थोडक्यात, तुम्ही म्हणता तसे विचार मांडता आले पाहिजेत हे वास्तव आयुष्यातही खरं आहेत. व्हर्चुअल आयुष्य हे ह्या वास्तवाचंच एक अंग होऊ पाहत आहे. तसे होऊ नये असे मला वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुम्ही दिलेली उदाहरणं डॉक्टर-पेशंट नात्यात ठिक आहेत.

मी हेही विधान मान्य करायला तयार नाही. डॉक्टर ज्या ज्या गोष्टी निदानासाठी वापरतो त्या त्या व्हर्च्युअली करणंही शक्य आहेच. किंबहुना आपल्या कित्येक डॉक्टरभेटी या कन्सल्टेशन्स असतात. ज्या व्हर्च्युअलीही करता याव्यात. (आता श्री. आडकित्ता येऊन मला चार शब्द सुनावून जातील असं मी 'निदान' करतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतंय त्यांचं म्हणणं हे डॉक्टर पेशंट जर इमोशनली गुंतलेले असतील तर निर्णय घेताना त्या नात्यामुळे डॉक्टर चुकीचे निर्णय घेऊ शकतो. (हे विशेषतः सर्जन लोकांबाबत बोलले जाते.)

म्हणून डॉ. हाऊस आठवला असे वरच्या प्रतिसादात म्हणले आहे. त्यात मैत्री, प्रेम आणि डॉक्टर पेशंट नात्यातील हे कंगोरे छान दाखवले आहेत. क्लिप मिळली तर देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

व्हर्च्युअल की रिअल या शब्दांच्या कंगोऱ्यात किंवा वादात पडण्याची इच्छा नाही. 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील लेखनाचा आस्वाद घेण्यासाठी मला 'गुर्जी' कोण (आणि का?) किंवा चिंतातुर जंतू यांनी फोनवर काय म्हटले होते हे माहीत असणे अपेक्षित असेल तर संकेतस्थळावरील लेखनाचा पुरेसा आस्वाद घेणे हे या स्वरुपाच्या कट्टा संस्कृतीमुळे शक्य होणार नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्या (शनिवार २२ फेब्रु) दुपारी ४:१५वाजता मी आणि मनोबा इ-स्वेअर, युनिव्ह रोड, पुणे इथे फँड्री बघणार आहोत.
मी आज दुपारी १ वाजता तिकिटे काढेन (रु. १३०)

कोणी इंटरेस्टेड असेल तर त्वरीत(आज दुपारी १ च्या आत) सांगा. नंतर/तुमची तुम्ही तिकीटे काढली तर बसायला एकत्र मिळायची शक्यता कमी, इतकेच, पण चित्रपटा आधी/नंतर जरा गप्पा होतीलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> उद्या (शनिवार २२ फेब्रु) दुपारी ४:१५वाजता मी आणि मनोबा इ-स्वेअर, युनिव्ह रोड, पुणे इथे फँड्री बघणार आहोत.
मी आज दुपारी १ वाजता तिकिटे काढेन (रु. १३०) <<

प्रतिसाद आत्ता बघितला. शनिवार संध्याकाळच्या कट्ट्याला यायला जमणार नाही, पण फँड्री थिएटरमध्ये पाहायला आवडेल. माझं मी तिकीट काढून येईन. एकत्र बसता आलं नाही तरी आधी/नंतर भेटता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे आधी काय टोरंटवर पाहिला होता का काय? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> म्हणजे आधी काय टोरंटवर पाहिला होता का काय? <<

हा हा हा. एक खवचट श्रेणी द्यायला हवी, पण उगीच धाग्यावर अवांतर नको आणि मालकीणबाईंशी पंगा पण नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असं म्हणूनही दिलेली दिसते! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पण उगीच धाग्यावर अवांतर नको आणि मालकीणबाईंशी पंगा पण नको.

पण उगीच धाग्यावर अवांतराचा दंगा नको आणि मालकीणबाईंशी पंगा पण नको

अशी व्हर्जन सुचवितो.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भेटीगाठी - तुरळक विस्कळित नोंदी.
सव्वाचारच्या शो साठी एक मिनिट उशीर झाला. खुर्ची पकडेपर्यंत ४.१६ झाले होते.
त्यानंतर घड्याळाकडे पाहिलं तेव्हा थेट सहा ला पाच मिनिटं कमी अशी काहीतरी वेळ होती. दरम्यान फक्त चित्रपट.
ऋच्या पलिकडे एक फ्रेंच कट दाढी होती. हसतमुख, प्रसन्न पण पोक्त भाव चेहर्‍यावर होते.
चिंता चेहर्‍यावर नव्हती. तरी त्याचे नाव चिंतातूर जंतू होते.
चिंज टी शर्ट घालू शकतात असे वाटले नव्हते. ते सलवार - झब्बा स्टाइल काहीतरी घालतील असे वाटले.
(मला पूर्वग्रह करुन घेणे; लेबले लावत बसणे ही माझी खोड आहे. जाता जात नाही.)
बोलायला लागल्यावर "पर्फेक्ट! ते धागे जो लिहितो तो हाच आहे" असे वाटले.
शांत, हळूहळू पण स्पष्ट एका लयीत उच्चार.
बोलण्याची ढब झकास.
मंद मिश्किलपणा स्वभावात.
चिंजच्या बोलण्यातून थेट "अमुक एक गाढव आहे" असा उल्लेख येणे दुर्मिळ असावे.
ज्यांना गाढव, बिनडोक म्हणायचे आहे, त्यांनाही ते अगदि अल्लाद, सौम्य शब्दांत म्हणतील.
ते इतकं सौम्य(खरं तर सट्ल) असेल की ते समोरच्याला गाढव म्हणताहेत हेच मुळात त्यांच्या शैलीचा अंदाज असल्याशिवाय समजणे कठीण.
नेमकं सांगता येणं कठीण आहे; पण प्रयत्न करतो . अर्थात मला ती भाषा/शैली नेमकी जमत नसल्याने मर्यादा आहेतच.
उदा :- एखाद्या सुमार बॉलीवूड कमर्शिअलपटाबद्दल बोलताना " दळभद्री भिकार" असे म्हणून आपण मोकळे होउ ना ?
इथे तसे नाही. सगळे कसे संयत संयत, शांत अलगद शब्दात. (गोल्फ खेळणारे ब्रिटिश रावसाहेब असतात ना, तसे.)
"अपेक्षा बाजूला सारल्या तर चांगल्यापैकी वेळ घालवण्याचे साधन हा सिनेमा".
ह्यातल्या "अपेक्षा बाजूला सारणे" हा क्लॉज इतका अल्लाद येइल, की हा माणूस चित्रपटाला दळभद्री म्हणतोय, ह्याचा पटकन अंदाज येणं कठीण.
किंवा ज्यावर झटकन पब्लिकच्या प्रतिक्रिया येतील असा एक सोपासा प्रश्न/काडी टाकून स्वतः काहिच प्रतिक्रिया न देता इतरांना बोलतं करणे व शांतपणे इतरांचं अवलोकन करणे ही स्टाइलही उत्तम. "आम आदमी पार्टीबद्दल काय मत" ही इतकी उचकावणारी काडी आहे की सांगता सोय नाही.
हरेक माहिती, किंवा हरेक तपशील हरेकाकडे असतील की नाही माहित नाही. पण अशा काही विषयांवर पब्लिकला ठाम असं एक मत असतं. किंवा निदान स्वतःचं मत हिरीरीनं मांडायचा उत्साह असतो. मी ही तोंड उघडून
"कसं आहे, की...
आम आदमी पार्टीवाले प्रत्यक्ष काय कृती करताहेत हे वेगळं. पण लोकशाहीमध्ये पर्याय असणं, दिला जाणं आवश्य्क आहे.
लोकशाही अमुक आहे, लोकशाही तमुक आहे. पर्यायाला महत्व आहे.
"
वगैरे बडबड सुरु केली. पण लागलिच क्लिक झालं. हे सगळं इतकं obvious आहे ; ह्याबद्दल बोलायचीही गरज पडू नये.
किम्वा हे सगळं ह्या माणसाला ठाउक नाही असं शक्यच नाही.
म्हणजेच, मग इतका साधा दिसणारा प्रश्न ह्यानं विचारलाय म्हणजे तो नेमका का ?
ठाउक नाही.
मिश्किल मूडमध्ये असल्याने विचारला असावा का ? असेलही .
मुळात तो स्पेसिफिकली बिकांना विचारलाय की मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी बिकाकडे वळून मग त्याला विचारलय?
ठाउक नाही. असेलही.
.
.
असो. मेघना नेहमीप्रमाणेच डॅशिंग. सिफरशी बर्‍यापैकी गप्पा झाल्या होत्या मागीलवेळी.
काल खूपच शांत वाटला. (की मीच अज्ञान पाजळत कुणाला बोलू देत नव्हतो ? असेलही.)
.
.
मिहिर हे कोल्ह्पुरी दादाचे ऊर्फ विनायक पाचलग ह्याचे दोस्त आहेत. सध्या शिक्षण घेत आहेत.
विनायक पाचलग हे मिपावर विशेश लक्षात राहिलेलं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे इंट्या, टार्‍या, ही सगळी माणसं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची असली, तरी एक खासं अस्तित्व त्यांच्या आयडीला होतं, एक ओळख होती, तसच कोल्हापुरी दादाचं. असो.
.
.
राजेशच्याही ही नेहमीप्रमाणे विचारपूर्वक कमेंट्स, कधी खुसखुशीत संवाद चालले होते.
मधूनच माझ्यासाठी मेघनानं आणलेली पुस्तकं ढापण्याचा प्रयत्न होत होता.
.
.
बिका :-
ह्यांच्याशी बोलायला, वाद घालायला चार पाच तासाचा वेळ खूप म्हणजे खूपच अपुरा वाटला.
बिकांचं जाणं झालं तिथलं तिथलं जमेल ते निरिक्षण करणं, तिथल्य अस्थानिक गोष्टींची शिकण ; ज्या सहजतेने केलं गेलं ते भारी वाटलं.
अजून सलग आठ दहा तास असते, तरी सगळ्यांशी बोलायला कमीच पडले असते ह्याची खात्री आहे.
अगदि पायमोजे आणि बूत घालून निघत असतानाही, जाइजाइपर्यंत बोलणं सुरुच होतं.
मेघना व (स्नेहल ?) नागोरी हे अगदि निघत असताना अत्यंत उचकावणार्‍या गोष्टी निअर इस्ट किम्वा मध्य पूर्व आशियाबद्दल बोलत होत्या.
.
.
मला नंतर जाणवलेली गोष्ट म्हणजे अतिउत्साहात अगणित वेळेस समोरच्याचं वाक्य मी अर्धवट तोडलं.
.
.
आपल्यापेक्षा उंच लोकांसोबत राहिल्यावर जरा छान वाटतं. मला तसच काहिसं वाटलं.
अर्थात उंच माणसांना इतरांना सहन करत राहणं कटकटीचं वाटू शकणं शक्य आहे.
पण जोवर तसं थेट , स्पष्ट त्यांच्याकडून म्हटलं जात नाही; तोवर त्यांच्या भिडस्त स्वभावाचा फायदा घेत पंडितमैत्रीची हौस भागवून घेत रहावी हेच उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शांत, हळूहळू पण स्पष्ट एका लयीत उच्चार.
बोलण्याची ढब झकास.
मंद मिश्किलपणा स्वभावात.
चिंजच्या बोलण्यातून थेट "अमुक एक गाढव आहे" असा उल्लेख येणे दुर्मिळ असावे.
ज्यांना गाढव, बिनडोक म्हणायचे आहे, त्यांनाही ते अगदि अल्लाद, सौम्य शब्दांत म्हणतील.

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।

हा गीतेतला श्लोक आठवला Smile

मिहिर हे कोल्ह्पुरी दादाचे ऊर्फ विनायक पाचलग ह्याचे दोस्त आहेत. सध्या शिक्षण घेत आहेत.

या दोन वाक्यांतील परस्परसंबंधांच्या सक्लॉज् शक्यता पडताळून पाहणे रोचक ठरावे ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून काही :-
आफ्रिका खंडात काही ठीकाणी युरोपीय मूळ असलेल्या भाषा प्रथम भाषा झाल्यासारखी स्थिती आहे.
"अरे बापरे हे किती वाईट आहे." किम्वा "कसं होइल अशानं" किम्वा "काय वाटत असेल त्यांना स्वतःबद्दल" ह्या स्टाइलचे उद्गार मेघनाचे होते.
ह्यातल्या "काय वाटत असेल त्यांना स्वतःबद्दल" ह्या क्लॉजबद्दल मला काही सांगायचं होतं.
खरं तर स्वतःबद्दल काहीही विचित्र नॉर्मल माणसाला वाटणार नाही. अमुक एक स्थित्यंतर झालं नसतं; तर आपण वेगळे असलो असतो; असं वाटू शकतं.
पण आपण आहोत ते फार विचित्र आहोत; असं कुणाला वाटत नाही.
स्थित्यंतर, transition होतानाची पिढी तेवढी काय तो त्रास छळते; नंतर स्मृती क्षीण व बर्‍याच प्रमाणात निरर्थक ठरत जातात हा राजेश व बिका ह्यांचा सूर पटला.
उदाहरणासाठी पाच सात किम्वा अधिक पिढ्यांपूर्वी मुस्लिम झालेल्या लोकांना काय वाटत असेल ह्याचा अंदाज व उदाहरणे बोललो.
स्थित्यंतराच्या वेदनेबद्दल कराची- लाहोर विरुद्ध काश्मीर अशी उदाहरणं मी दिली.
किम्वा खुद्द आपण सध्या आहोत, ते आपल्याला काही विचित्र वाटतं का ?
कुठली तरी काही स्थित्य्म्तरं काही पिढ्यांपूर्वी झाली म्हणूनच आपण इथवर पोचलो ना ?
आप्ण किती सर्रास इंग्लिश वापरतो, तेही अगदि नकळतपणे; ह्याबद्दल काही विचित्र वाततय का ?
मूळ मराठी/प्राकृत म्हणवली जाणारी भाषा नंतर इस्लामी राजांच्या कारकिर्दीत फार म्हणजे फारच नवीन लहेजा घेउन आलेली दिसते.
आपण जी वापरतो, ती बव्हंशी अशी फारसी- अरबी मिश्रित आहे. ह्याबद्दल कुठे काय आपल्याला विचित्र वाटतं ?
(मला शालेय व महाविद्यालयीन ते फार विचित्र वाटे. आपल्या भाशेवर अत्याचार झालेत अशी जाणीव होइ. बहुतांशाना तसे कधीच वाट्त नाही, असा अंदाज आहे. )
चर्चा इतकी रंगात असतानाही मला निघावं लागलं. मी गंतव्य स्थानी पोचल्यावर तिथूनच कॉल लावून माझा उरलेला मुद्दा पूर्ण केला.
त्यावर राजेश व मेघना ह्यांना बरच काही म्हणायचं असावं असं दिसलं. पण मी तोवर डेस्कपर्यंत पोचलो असल्या कारणानं फोन ठेवून कामाला लागणं भाग होतं.
त्यांचे मुद्दे ऐकून न घेताच कॉल संपवला.
.
.
कुठेही कधी खादाडीला वगैरे गेलो, तर बिका ह्यांना डोळे झाकून अनुमोदन देउ शकेन असं वाटतं.
मला विशेष प्रिय असलेल्या डिशेस/मेन्यु/पदार्थ नेमके त्यांनी ऑर्डर केलेल्या, उल्लेख केलेल्या गोष्टींसारखेच आहेत.
.
.
अजून बर्‍याच मुद्द्यांवर बरच काही बोलायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय ड्याशिंगपणा केला रे मी? आँ?

पण खरोख्खर - आम्ही साधारण १२ वाजेपर्यंत गप्पा हाणतोय (वाद घालतोय, असं वाचा. त्यावर धागा टाकतेय.) नि हा गडी मधेच हापिसात चालता झाला. झाला तर झाला, बाहेर पडून ५ मिनिटं नाही होताहेत, तो याचा फोन. "माझा मुद्दा असा होता...."

मी विचारलं, "स्पीकरफोनला टाकू का..." तर हो म्हणाला.

मग मधे फोन आणि आजूबाजूला मी, गुर्जी, बिका, स्नेहल, मिहिर (हा एक अत्यंत शांत शालीन माणूस आहे) असे आळीपाळीनं फोनशी वाद घालतोय असं चित्र होतं.

एपिक मोमेण्ट होती ती....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय ड्याशिंगपणा केला रे मी? आँ?

या पृच्छेतच सारा ड्याशिंगपणा सामावलेला आहे. जै हिंद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही खादाडी कुठे केली, ते मुद्द्याचं कसं लिहीलं नाही मनोबा? मला ब्वा खाणे-पिणे ह्या वृतांतामधे रस आहे.

कुठल्या हॉटेलात खाल्ले, काय काय खाल्ले-प्यायले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरीच ऑर्डर केले.
इतरांचे तपशील आठवत नाहित.
मी कांदा- भाकरी व इलुशी पनीरच्या भाजीची करी खाल्ली.
कधी नव्हे ते खाण्याकडे फारसे लक्ष नव्हते माझे.
मागाहून व्यवस्थित बडिशेप मिळाली त्याबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसादास खवचट ही श्रेणी का आहे?
मी खरच जे खाल्लं ते लिहिलं.
सरळपणानं जे जसं वाटलं ते तसं लिहिलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मीही मला वाटली ती श्रेणी दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथून पुढे श्रेणी कोणी दिली/का दिली/कोणती दिली इ. बद्दल बोलणार्‍या प्रतिसादांना निरर्थक श्रेणी दिली जावी असे आवाहान मी करतो. सुरवात या माझ्याच प्रतिसादापासून करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

यातील चिंजं व मिहिर या दोघांस भेटायचे राहिले.

बाकी मेघनातैंच्या ड्याशिंगपणाबद्दल वादच नाही, पण यावेळेस तो कसा दिसला ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

बिकांबरोबरही पुनरेकवार गप्पा मारावयास आवडतील.

अन स्नेहल नागोरी नामक व्यक्तिविशेषाचा उल्लेख आलाय. या कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही माझी मैत्रीण. शाळेपासूनची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओह अच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाक्यात दुरुस्ती सुचवतो :-
हीच काय ती माझी मैत्रीण. शाळेपासूनची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपण ठाण्याच्या कट्ट्याला न आल्याचं सिद्ध केलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी गंतव्य स्थानी पोचल्यावर तिथूनच कॉल लावून माझा उरलेला मुद्दा पूर्ण केला.>>>>>>>>
आहाहा..

उत्तम वर्णन... कट्ट्याला उपस्थित अस्ल्यासार्खे वाटले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी घरी गेल्यानंतरचा भाग लिहिला असेल तर मी तो वाचलेला नाही असे पटवु इच्छितो

-(इनोप्रेमी) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नितिन थत्ते आणि अतिशहाणा यांच्याशी सहमत. जुने लोक्स एकमेकांना ओळखत असल्याने ते लगेच मिसळुन जातात. तर कट्ट्याला नविन आलेला बुजुन जावु शकतो.जुने लोक जुन्या संदर्भात (कट्टा/धागा)काही चर्चा करत बसले तर म्हणतोय मी. शिवाय "अतिपरिचयात अवज्ञा" हेही तितकेच खरे. आत्ता सुद्धा गुर्जी कोणाला म्हणतात तेच काही जणांना (मलाही) माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमन , अस्मि ह्यांचा प्रवेश आघाडिच्या इतर सदस्यांपेक्षा फारच उशीरा झालेला आहे.
पण ते सहज गप्पांत सामील होतात असे दिसते.
अशी इतरही उदाहरणे असावीत.
मी जुना असूनही बुजल्यासारखा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी जुना असूनही बुजल्यासारखा असतो.

And I thought my jokes were bad.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील प्रतिसादास 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी देणारांस दाद द्यावीशी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके!!!

माहितीपूर्ण श्रेणी देणार्‍यांस पुढच्या चार श्रेण्या (प्रत्येकी) खौचट मिळोत एवढे बोलून मी ही प्रतिक्रिया संपवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आख्ख्या धाग्याला "माहितीपूर्ण" श्रेणी देउन ठेवलिये पब्लिकनं!
द्या.
आता ह्या प्रतिसादालाही माहितीपूर्ण श्रेणी द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एकाच गावात रहाणार्‍या ऐसी अक्षरे वरच्या दोस्त मंडळींनी महिन्यातला एखादा दिवस ठरवून भेटयला काय हरकत आहे? तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीच हरकत नाही. कुठे राहता तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन