.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त लिहीलय Smile अजुन येऊदेत
युद्धःस्य कथा रम्यः

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आली. अजून येऊद्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही लढाई महत्वाची आहे खरी.पार्श्वभूमी देतोयः-
भाग१:-
काही जणांना वाटते की शिवाजी महाराजांनी थेट वीसेक वर्षाच्या वयापासून स्वातंत्र्य घोषित केले आणि अखेरपर्यंत सलग स्वतंत्र राहिले; पण वस्तुस्थिती तशी नाही.
अगदि सुरुवातीच्या काळात सुरुवातीला आपण आदिलशहाचेच चाकर आहोत असे नाटक करत त्यांनी सुरुवातीचे तोरणा,पुरंदर व इतर आसपासचे पुणे जिल्ह्यातले किल्ले घेतले.हे १६५०ते १६५५-१६५६ पर्यंत चालले. नंतर आदिलशाहीशी उघड उघड भांडण मांडून अंगावर चालून आलेल्या अफजल खानाचा नायनाट केला.(नोव्हे १६५९) नंतरच्या दोनेक महिन्यात झपाझप स्वराज्याचा विस्तार वाढवत आजच्या पुणे जिल्ह्याच्या बाहेर पडून थेट दक्षिणेला कोल्हापूर्,सातारा,सांगली ह्याबाजूला विस्तार केला.थेट कर्नाटकात गदग व आदिशहाची राजधानी विजापूरवरच हल्ल्याचा प्रयत्न केला. सोबतच कोकण किनारपट्टीवर अंमल वाढवायला सुरुवात केली.किनार्‍यावर आंग्रे बहुदा आधीपासूनच होते. त्यांच्यासोबत इतर सत्तांविरुद्ध आघाडी उभी केली.
धडाधड एकामागोमाग एक किल्ले घेतले, कित्येक नवीन उभे केले.

भाग२:-
हा वाढता अंमल दख्खनवर वर्चस्वासाठी झगडणार्‍या मुघलांनाही धोकादायक वाटला. त्यांनी शाहिस्तेखानाला प्रचंड फौज देउन पाठवले. तो थेट पुण्यातच अजस्त्र, लाखभर सैन्यानिशी तळ देउन बसला. अगदि ह्याच वेळेस तिकडे सिद्दी जौहरने पस्तीसेक हजाराची फौज घेउन महाराजांना पन्हाळ्यावर कोंडून ठेवले होते. शिवबा कधीही पकडला जाइल अशी स्थिती आली. तिकडे पुणे अजगर गिळतच होता. आता?
सुप्रसिद्ध शिवा-न्हावी, पावनखींड्-बाजीप्रभू वगैरे प्रसंगानंतर राजे सुटले, निसटले.(जुलै १६६०). पण अफाट अशी मुघल फौज अजूनही शिवबाच्या भागात होतीच. नंतर दोन अडीच वर्षे उंबरखिंडित लढाया वगैरे करुन काही शाहिस्ता निर्णायक परास्त होइना. एप्रिल १६६३ मध्ये शाहिस्तेखान्-लाल म्हाल्-तुटलेली बोटे प्रसंगानंतर पुणे अजगर मिठितून सुटले. पुन्हा शिवबाचा अंमला वाढू लागला. गेलेला प्रभाव त्याने शिताफीने परत मिळवला होता.पुण्याला झालेल्या नुकसानीची किंमत मुघलांची पश्चिमेतील आर्थिक राजधानी आणि भरभराटीचे शहर सुरत लुटून्,सहज फस्त करून वसूल केली.(जानेवारी १६६४) त्याद्वारे मिळालेल्या पैशातून ह्यावेळेस मोठा फौजफाटा उभारणे सुरु केले. प्रथामच स्वराज्याची फौज तीस्-चाळिस हजाराच्या पुढे गेली.

भाग३:-
ह्या प्रकाराने बेचैन व क्रुद्ध झालेल्या मुघलांनी १६६५ च्या उन्हाळ्यात अजून मोठ्या फुअजेसह धुरंधर्,धोरणी,मुत्सद्दी अशा मिर्झाराजे जयसिंगास पुण्यावर पाठवले.दोन्-पाच महिन्यातच शिवबाला त्याने जेरीस आणून जून १६६५ मध्ये तह करायला लावला.तहमध्ये फार मोठा मुलूख, जवळपास ६६% स्वराज्याचा भूभाग गमवावा लागला. इथेच turning point आहे.

भाग ४:-
१६६६ च्या प्रारंभी शिवाजीराजास थेट मुघल दरबारात हजर रहावे लागले. जवळपास त्यांना राजपुतांप्रमाणेच पूर्ण मुघल सरदार सरदार बनवायचाच मुघलांचा प्रयत्न होता. त्यानंतर ते कैद झाले.१६६६ च्या हिवाळ्यात निसटले.पण निसटून आल्यावरही त्यांनी दिलगिरीचे पत्र औरंगजेबाला पाठवले. मुघलांचा सरदार म्हणून रहायचे नाटक करणे धूर्तपणे सुरु केले.अगदि जंजिर्‍यावर मोहिम सुरु असताना ती अर्धवट सोडली, व कारण सांगताना हे सांगितले की "सिद्दीही बादशहाचे चाकर, आम्हीही. अधिक भांडणे का करावीत? आम्ही मोहिम थांबवीत आहोत." (खरे कारण युद्धशास्त्रीय द्रुष्ट्या नफा-तोट्याचे व हानी-फायद्याचे गणित होते. )

भाग ४.५ :-
हा तथाकथित "सरदारकीचा", "चाकरीचा" व "शांततेचा काळ" चारेक वर्षे चालला. ह्यात त्यांनी सातत्याने स्वराज्याची घडी बसवली. कायदा-सुव्य्वस्था प्रस्थापित केली. संपर्काचे जाळे उभारले. लोकसंग्रह अजूनच वाढवला. योग्य त्या कहाण्या पसरवल्या. जनतेचा विश्वास अधिक भक्कम करून घेतला.घोड्यांना दाणा-पाणी मिळून ते चुस्त झाले. कुणाच्याच डोळ्यावर येउ न देता अलगद फौजफाटा वाढवला. आतल्या आत लहान लहान दौरे करून पुढील गोष्टींची आखणी करण्यास सुरुवात केली.वरवर बघता सगळे कसे शांत शांत होते. खरिप्-रबी पिके घेउन शेतकरी झोपतात असे दिसत होते. पण हेच शेतकरी लष्करातही मोठ्या प्रमाणात भरती होताहेत हे अजून कळले नव्हते.
शांत शांत्..निवांत निवांत असा महाराष्ट्र होता. आणि अचानक..........

भाग ५ climax :-
एकाएकी १६७० च्या सुरुवातीला मराठ्यांनी मुघलांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली.एकाच वेळी वेगवेगळ्या मुघल ठाण्यांवर व्यूहात्मक(strategic,planned,organised) हल्ले सुरु केले. तिकडे तान्हाजीने पराक्रमाची शर्थ कररात्रीत्झेपेत कोंढाणा कमावला. तिकडे खुद्द शिवबा पुन्हा सुरतेवर चालून गेला. अधिक लूट घेउन आला. लूट घेउन येताना झालेल्या वणी-दिंडोरीच्या लढाईत खुल्या मैदानात मुघलांना जोरदार चोप दिला. संपत्ती मिलाल्याने पुन्हा अधिक लॉजिस्टिक्स घेउन उरलेली मोहिम धडाक्यात सुरु ठेवली. २/३ गेलेले स्वराज्य परत मिळवलेच उलट मुघलांचा प्रदेशही नव्याने जिंकायला सुरुवात केलीं. कोकणावर अंमल होता. त्याच्या वरती उत्तरेला नाशिक येते.तिथलेही छोटे मोथे किल्ले घेतले व साल्हेरची कारवाई सुरु केली. आता त्यांनी उघड उघड पुनश्च मुघलांशी भांडण घेतले होते. हे सर्व करण्यास एकाच माणसात एकाच वेळी उत्तम प्रशासक,धूर्त राजकारणी, शूर/धडाडीचा सेनापती व भूभागाची,भूगोलाची व समाजकारणाची व स्वतःच्या बलस्थानांची उत्तम जाण, माण्साची पारख ह्यातला प्रत्येक गुण अत्युच्च पातळिचा असणे आवश्यक होते.आणि त्यांच्याकडे होते!

आता एक स्वतंत्र राजा म्हणून त्यांचे नाव आख्ख्या दक्षिण आशियात गाजू लागले. ते लवकरच वाढत्या मराठा सत्तेसह जगभरात जाणार होते.
त्यांच्या ह्या १६७० च्या मोहिमेतला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे साल्ह्र्-मुल्हेर चे प्रकरण.
बर्‍याचदा अफझल्-शाहिस्तेखान्-मिर्झा-सिद्दी जौहर्-आग्रा-कोंढाणा-तानाजी ही प्रकरणे आपल्याला स्वतंत्र, वेगवेगळी,सुटीसुटी म्हणून ठावूक असतात. पण त्यांचा कालानुक्रम व त्यामागची पार्श्वभूमी व तेव्हाची मराठा सत्तेची मानसिकता ठाउक नसते. म्हणून एखाद्या विषिष्ट घटनेचे वर्णन न करता मराठी सत्तेची पावले कशी पडत होती ते सांगायचा प्रयत्न केला आहे.
लेख चांगला वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरील लेखाइतकीच, किम्बहुना काकणभर सरसच, उत्कृष्ट पोस्ट. स्वतन्त्र लेख विषय व्हावा!
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंतोतंत सहमत. अगदी समग्र चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपण दिलेल्या या विशिष्ट टप्प्यान्च्या माहितीत भर पडावी/सहाय्यकारी व्हावे म्हणून http://www.aisiakshare.com/node/272 येथे महत्प्रयासाने, मायबोलीवरील माझी २००५ सालची पोस्ट पुनःसंपादीत्/टाईप करुन टाकली आहे. कृपया नजरेखालून घालावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाजी महाराज यांचा विजय असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वाचतोय.
या विषयावर अजून वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

युद्धाचं वर्णन करणारा सुरेख लेख, आणि त्याबरोबर त्या युद्धाची पार्श्वभूमी सांगणारा मन यांचा अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद! छापील माध्यमापेक्षा आंतरजालीय लेखन कशा प्रकारे सरस ठरू शकतं याचा हा परिपाठच आहे.

>>बर्‍याचदा अफझल्-शाहिस्तेखान्-मिर्झा-सिद्दी जौहर्-आग्रा-कोंढाणा-तानाजी ही प्रकरणे आपल्याला स्वतंत्र, वेगवेगळी,सुटीसुटी म्हणून ठावूक असतात. पण त्यांचा कालानुक्रम व त्यामागची पार्श्वभूमी व तेव्हाची मराठा सत्तेची मानसिकता ठाउक नसते. म्हणून एखाद्या विषिष्ट घटनेचे वर्णन न करता मराठी सत्तेची पावले कशी पडत होती ते सांगायचा प्रयत्न केला आहे.

मी शाळेत इतिहास शिकलो पण असं समग्र चित्र कधीच उभं राहिलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>> मी शाळेत इतिहास शिकलो पण असं समग्र चित्र कधीच उभं राहिलं नव्हतं.
अहो, ही तुमचीच गत नाही, सगळ्यान्चीच आहे. शिकवलच नाही अशाप्रकारे तर कस काय शिकणार?

[माझ्या मते मात्र न शिकविण्यामागे निधर्मी पासून ते सर्वधर्मसमभावापर्यन्त यच्चयावत कॉन्गी कारणे आहेत. सध्या तर, शिवाजी सर्वधर्मसमभावीच होता, "गोब्राह्मणप्रतिपालक" हे बिरुद देखिल बामणी कारस्थान होते, असे ठासून सान्गण्याची अहमहमिका लागलीये.
असो.]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. लढाई ज्या भागात झाली तो कसा आहे हे पहायचे असेल तर साल्हेर, मुल्हेर गडांचा ट्रेक करावा. जवळचे जैनांचे 'मांगी-तुंगी' ही बघावे. साल्हेर गड समोरुन पाहिला तर इतका अजस्त्र दिसतो की यावर चढणार कसे असा प्रश्न पडतो. पण वर जायची वाट इतकी खुबीने काढली आहे की जवळ गेल्याशिवाय दिसतच नाही. साल्हेर, मुल्हेर सटाण्याजवळ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

धन्यवाद सर्वांना....
आपल्या प्रतिक्रीया माझ्यासाठी मोलाच्या आहेत.
धन्यवाद...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मन यांचा अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. विशेषत: घटनाक्रम सांगितल्यामुळे अनेक गैरसमजुती/शंका कुशंका दूर होण्यास मदत झाली.

मूळ लेखही उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मूळ लेख व वरील मन यान्च्या पोस्टला अनुसरुन, मी मागे २००५ मधे मायबोली साईटवर संग्रहित केलेली शिवाजी महाराजांबद्दलची सनवार माहिती इथे तात्पुरती पोस्ट करायचा प्रयत्न केला, पण तेव्हान्चा तो फॉण्ट युनिकोड नसल्याने जमत नाहीये. तसेच तेथिल ही लिन्कही चालत नाहीये. Sad
तेथिल लिन्क = http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=34&post=674982#POST6...

ऐसीअक्षरे वरच http://www.aisiakshare.com/node/272 येथे ती माहिती महत्प्रयासाने मायबोलीवरील माझ्या २००५ सालच्या पोस्टमधुन पुनःसंपादीत/टाईप करुन टाकली आहे. जिज्ञासून्नी अवश्य लाभ घ्यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळ लेख आवडलाच तितकाच मन यांचा अभ्यासपुर्ण प्रतिसादही!
दोघांचे आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

limbutimbu,मेघना भुस्कुटे,राजेश,नितिन थत्ते,ऋषिकेश ह्यांचे कौतुकाबद्द्ल आभार.

@limbutimbu:- गोब्राम्हणप्रतिपालक असे त्यांना त्यांना कोण्या भिक्षुकानेच म्हटल्याचे कागदपत्रे आहेत म्हणे. स्वतः महाराजांनी तसे म्हणवून घेणे, व एखाद्या ब्राम्हणाने तसे म्हणणे ह्यात थोडेसे अंतर आहे. असो. तो वेगळा विषय आणि वेगला धागा होइल.
संभाजी ब्रिगेड्-दादोजी-रामदास्-तुकाराम-छत्रपती आणि "खरे" छत्रपती, जातीच्या चष्म्यातून व धर्माच्या चष्म्यातून प्रचंड चर्चून झालेले आहेत जालावर वगैरे. आपण मिसळपावावर असाल, तर तिथल्या चर्चा पाहू शकता.
मला वरच्या परिच्छेदातल्या कुठल्या बाजूला ते होते हे सांगण्यापेक्षा प्रशासक* म्हणून्,नेतृत्वगुण** असणारी व्यक्ती म्हणून शिवाजी नावाची व्यक्ती कशी होती हे बघण्यात जास्त रस आहे, त्या अंगाने मी माहिती गाळून घेत असतो.आपण दिलेला दुवा उघडत नाहीये.
आपणाकडे एखादा बॅकप असेल त्या लेखाचा तर इथे पुन्हा धागा टाकू शकाल काय? तेवढेच काही हाताशी तरी लागेल.

उत्तम प्रशासक म्हणजे जो राज्यशकट व्यवस्थित चालवू शकतो तो:- फक्त पाचेक वर्षाच्या कारकिर्दितला शेरशाह सूरी, प्रदीर्घ काळ राज्य केलेला अकबर्,माधराव पेशवे,मलिक अंबर्,आकण्णा-मादण्णा द्वयी,केमाल अतातुर्क(पाशा?) हे सर्व उत्तम राज्यकर्ते/प्रशासक होत.त्यांनी उपलब्ध राज्ये उत्त्तम चालवली, जनतेला न नागवताही महसूल रचना चांगली ठेवली.राज्यांतर्गत कायदा व सुव्यवस्था,व्यापार उदीम वाढवला. दळणवळण वाढवले. थोडक्यात infrastructure.

तर उत्तम योद्धे/नेते/सेनापती म्हणजे Alexander,Napoeleon,William Warrace, Julious Ceasar,Hannibal,चंद्रगुप्त, बाजीराव पहिला,आसामातला बडफुकन,अब्दाली,चंगीझ्,तैमूर,अरबांचा प्रथम खलिफा अबु बक्र हे सगळे आणि ह्यासम.झपाट्याने मैदान मारणे, प्रतिकूल परिस्थितीही पालटवणे, विषम लढाईत थोडेसेच सैन्य जवळ असताना चमत्कार वाटावेत असे अतर्क्य विजय मिळवणे हे सर्व ह्या योद्ध्यांनी केले आहे.

ईस्ट इंडिया कंपनी,हैद्राबादचे पहिले तीन्ही निजाम्,चाणक्य,सध्याचे अदृश्य अमेरिकन साम्राज्य हे धूर्त्,मुत्सद्दी,कुटील, धोरणी म्हणून उंच वाटतात.

आता गंमत अशी की ह्या तीन्ही याद्यात शिवाजी महाराजांचे नाव सहज बसते. त्यांच्या ह्या गुणांबद्दल मला कुतूहल आहे.
त्यांच्या हिंदुत्ववादी किंवा सक्युलर असण्याबद्द्लची चर्चा आधीच झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>> आपण दिलेला दुवा उघडत नाहीये. आपणाकडे एखादा बॅकप असेल त्या लेखाचा तर इथे पुन्हा धागा टाकू शकाल काय? तेवढेच काही हाताशी तरी लागेल.

या इथे ऐसीअक्षरेवरच मी तो तपशील पुन्हा टाकला आहे. http://www.aisiakshare.com/node/272

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी बरोबर. (अवांतरः या संदर्भात नरहर कुरुंदकरांच्या 'छत्रपती शिवाजी: जीवन आणि रहस्य' या पुस्तिकेची आठवण झाली. शिवाजीबद्दलच्या नेहमीच्या यशस्वी - भावनाप्रधान आख्यायिका बाजूला ठेवून शिवाजी नेमका कशासाठी मोठा ठरतो, या प्रश्नाची कुरुंदकरांनी चर्चा केली आहे.)
राज्यकर्त्यांच्या गुणांची नेमके वर्गीकरण आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख आणि मनोबांचे प्रतिसाद (कांकणभर जास्त) आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0