रसातळाला खुपस !

सुप्रसिद्ध लेखक सतीश तांबे यांची 'रसातळाला खपच' ही कथा मला आवडते . त्याचं थोडक्यात सार असं आहे .
वेगळ्या प्रकारचे कथालेखन करणाऱ्या आणि नवीन कथासंग्रह गाजत असलेल्या लेखकाला त्याच्या कथा वाचून त्याची बालमैत्रीण सुमती भेटायला बोलावते .
त्याच्या कथासंग्रहाची स्तुती करते .तिच्या आयुष्यातली एक गुप्त घटना केवळ तोच समजू शकेल म्हणून विश्वासात घेऊन सांगते . एका कुरियरवाल्याच्या ब्लॅकमेलमुळे त्याच्या वासनेला बळी पडल्यावर तिला त्याचे विचित्र आकर्षण वाटू लागते आणि ती त्या लफड्यात खोलवर गुरफटते . पंचेचाळीसाव्या वर्षी व्हीआरएस घेतल्यावर तिच्या लक्षात येतं की ऑफिसातल्या पुरुषांचं गोंडा घोळण आणि लाडीगोडी यांची तिला चटक लागली असते . कुरियरवाल्या तिच्याहून अर्ध्या वयाच्या मुलाबद्दल तिला ओढ वाटते . पांढरपेशा समाजाचे जीवन फक्त खाणे ,पिणे आणि चढणे ( ख प च ) इतकेच मर्यादित झाले आहे असे निरीक्षण असलेला लेखक तिच्या कथेत गुंतत जातो .

सतीश तांबे यांनी माझ्या कथेचे खुशाल विडंबन कर असे म्हणताच ,मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन प्रयत्न केला आहे .
सतीश तांबेच्या अंधभक्तसाठी सूचना : भावना दुखावणार असतील तर त्यांनी त्वरित गुरुमाउलीकडे माझी तक्रार करावी. आमेन !

रसातळाला खुपस !
सुप्रसिद्ध लेखक कपिश कांदे आपल्या " राज्य गाढवांच असत "या कथासंग्रहाच्या रसग्रहणात्मक स्तुतिसुमनांच्या कुरणात हुरळलेल्या मेंढीगत चरत अन मनोमन बहरत होता . त्याच्या आंतरजालीय आखाड्यात अन थोबाडचोपडीत लायकिंग पोवाडे अन पोकिंग आरत्यांचा एकच धुरळा उडून त्याच्यासकट भक्तजनांना तात्पुरते कायमचे अंधत्व अन बधिरत्व का कायसे आले
होते असे फेकिंग न्यूजमध्ये सांगितले . कपिश सुषुम्नावस्थेत असतानाच त्याच्या मोबाईलवर ," गालावर दाढी डोळ्यात धुंदी , ओठावर झुरे बिडी उंटछापची "असा मंजुळ रिंगटोन वाजू लागला . त्याने मधाळ स्वरात " शष्प " म्हटले . तो हॅलो ऐवजी शष्प म्हणत असे .
( याचा अर्थ मुंबई पुण्यातल्या निवडक नगांना कळे अन बृहन महाराष्ट्र बुचकळे !.मुंबई पुण्यापलीकडच जग असून नसल्यासारखच आहे असे संत कूपमंडूकराम यांनी मंडूकनीती या बोधग्रंथात म्हटले आहे .)
तिकडून त्याची बालमैत्रीण लटिकेच म्हणे , " अय्या तू कित्ती संमोहक स्वरात शष्प म्हणतोस रे कप्या "अय्या" ऐकूनच कपिशच्या हृदयाचा ससा झाला अन टणाटणा उड्या मारू लागला , " कोण बोलतंय ?" तो उगाच म्हणाला ." मी कुमती बोलतेय , माझ्या घरी ये ना गडे, माझा खून होण्यापूर्वी माझे लफडे तुला कथा लिहिण्यासाठी भविष्यात उपयोगी पडावे म्हणून सांगायचे आहे . 'मरावे परी लफडेरुपी उरावे 'असे इदी अमीनने म्हटलेच आहे . "
कपिश खाडकन भानावर येत टुणकन तिच्याघरी पोचला . कुमती एकदम सिनेनटी संध्यासारखी शरीरातला कण न कण थिरकवत ज्वानीच्या आगीची मशाल घेऊनच दार उघडती झाली . कपिश वितळून मेण झाला . तिने तो मेणाचा गोळा सोफ्यावर ठेवून वात पेटवली . मग त्याच्यात धुगधुगी येऊन तो ऐकू लागला .संध्या नामक नटी अख्ख्या जगात फक्त व्ही शांताराम आणि कपिशला आवडते हे दिव्य ज्ञान होताच वाचकांना जीवनात अधिक काही जाणून घ्यायची इच्छा शिल्लक रहाणार नाही . तर ते असो .
कुमती सांगू लागली . " ऑफिसातल्या डायबेटीक भाटांच्या नुसत्या शाब्दिक कुरवाळण्याला मी कंटाळले आणि व्हीआरएस घेऊन घरीच बसले .तर काय सांगू कप्या , घरी चित्रकार नवऱ्याचे स्वकेंद्रित, रटाळ ,शाकाहारी गुर्हाळ पाहून कंटाळून गेले . जणुकाय मी असून नसल्यासारखीच होते. मला चमचमीत मांसाहार हवा होता . मग केंटकी फ्राईड चिकनची होम डिलिव्हरी मागवली . तर काय मजा !! एक माजलेला सांड फ्राईड चिकन घेऊन हजर झाला . त्याने भक्कम शिवीगाळ करतच माझा खिमा केला .नंतर त्यानेच माझा लगदा नीट गोळा करून मला पुन्हा सुबक ठेंगणी केले अन फ्राईड चिकन भरवून माझ्यात प्राण फुंकले .माझ्या शरीरात एकच हिंसक हर्षस्फोट झाला .मग काय विचारतोस मी रोजच नवरा बाहेर गेल्यावर याच सांडाकडून चिकन मागवू लागले" .कपिश अवाक झाला .तिला भविष्यात होणाऱ्या खुनापासून वाचवून त्याला कथेचे सूत्र आपल्या हाती घ्यायचे होते . या मांसाहारी वाघिणीला गवत खायला घालायचा निश्चय करूनच तो बाहेर पडला . त्याने बिग बॉस या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमाच्या निर्माता असलेल्या आपल्या लंगोटीयाराला फोन केला . यावेळी बिग बॉस होमो थीमच्या शेड्युलमध्ये गुलजार , चिकण्या सहा पुरुषांसोबत फक्त
राक्षस खलीची निवड झाली होती .कपिशने या माजलेल्या सांडाला पैसे आणि प्रसिद्धीचे आमिष दाखवताच तो लगेच तयार झाला आणि त्याची रवानगी ३ महिन्यासाठी बिग बॉसच्या घरात झाली .आपल्याच नाही तर अरब देशातही सांड लोकप्रियतेच्या अत्त्युच्च शिखरावर विराजमान झाला .
इकडे कुमती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली . कपिशने तिची समजूत घातली " अग दुसऱ्यासाठी जगलास तर मेलास असे किमर्थ कामदासांनी म्हटलेच आहे न ? मग आता नवऱ्यासाठीच जग म्हणजे तू मेल्यातच जमा होशील "तिने गत्यंतर नसल्याने मान डोलावली आणि कपिश अत्यानंदाने एक नवीन गोग्गोड कथा "रसातळाला खुपस" लिहायला प्रस्थान करता झाला .

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile

याला विडंबन म्हणावे का विडंबित पार्श्वभूमी हा प्रश्न पडला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गालावर दाढी डोळ्यात धुंदी , ओठावर झुरे बिडी उंटछापची

मी माझ्याही नकळत हे गाणं चालीवर म्हणून बघितलं, अ‍ॅक्चुअली फर्मास जमलंय. फक्त उं वर जरा वेळ थांबायला लागतं. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

ही नेमकी काय चाल आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. हे लेखक लोक इतकंसं सांगण्यासाठी पानंच्या पानं का खर्च करतात? त्यांना पर्यावरणाचं काही भानच नाही का? कपिशच्या कथेपायी किती झाडांना आत्मबलिदान करावं लागलं असेल पण त्याची तमा कोण बाळगतं?

तुम्ही एका पानात तिचा सारौंश, तोही इतक्या गमतीदार पद्धतीने मांडल्यामुळे 'लोणीतू गाईड'वाले लोक तुमच्यामागे कपिशसारखेच टणाटण उड्या मारत येणार बघा.

ही कथा सातवीच्या पाठ्यपुस्तकात आहे अशी कल्पना करून त्यावर काही स्वाध्यायासाठी प्रश्न काढता येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा सातवीच्या पाठ्यपुस्तकात आहे अशी कल्पना करून

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. कपिशला संध्या का आवडत असावी, कल्पनाविस्तार करा.
२. कथावस्तू नेमकी आहे वस्तुकरण झालेली आहे?
३. कथेतल्या मेणबत्तीवर गाईडातलं लोणी वितळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
१. अय्या ऐकून कपिशच्या हृदयाचा ससा का झाला ?
२. मांसाहारी वाघीण गवत कधी खाते ?
३ . किमर्थ कामदास कोण होते ? त्यांचा आणि तनाचे श्लोकचा काय संबंध आहे ?
४. डायबेटीक भाटांची कार्यालयीन दिनचर्या तपशीलवार वर्णन करा .
५ . इदी अमीनची पाच लफडी सविस्तर लिहून काढा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्गात चर्चा करण्यासाठी विषय:
१. तुमच्या हृदयाचा ससा किंवा सशी कसा किंवा कशी झाली - याचे अनुभव सर्वांनी वर्तुळात बसून जमेल तितक्या वास्तविक शैलीत सांगा.
२. या कथेत कोणीही कोणाच्या घरी गेलं की त्यांपैकी एकाचा 'वितळलेल्या मेणाचा गोळा होतो' किंवा 'खिम्याचा लगदा' होतो. मग दुसरी व्यक्ती ती तो एकत्र करते आणि त्यावरची वात तरी पेटवते किंवा एकत्र करून आकार देते. या कृत्यामुळे धुगधुगी येते किंवा स्फोट होतो. तेव्हा
- उष्णतेमुळे घनाचा द्रव आणि मग अजून उष्णतेमुळे द्रवाचा वायू होतो आणि अजून उष्णता बाहेर पडते. या अवस्थांतरांचा भौतिकशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करा.
- दोन प्रसंगात स्त्री व पुरुष यांच्या जागा बदललेल्या आहेत. अशा वेळी वर्णनांत नक्की कुठचा फरक येतो? लिंगभानात्मक भूमिकांतून विचार करा.
३. किमर्थ रामदासांनी केलेल्या तनाच्या श्लोकाच्या कॉप्या मिळवून त्यांचं वर्गात जाहीर वाचन आळीपाळीने करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरुत्तर !! सुइ पटक सन्नाट्टा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... उष्णतेमुळे घनाचा द्रव आणि मग अजून उष्णतेमुळे द्रवाचा वायू होतो आणि अजून उष्णता बाहेर पडते. या अवस्थांतरांचा भौतिकशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करा.

हा विषय खरंतर एवढा sublime आहे की यात घनाचा थेट वायूच झाला पाहिजे. (सॉरी सखूमावशी, असल्या विनोदांबद्दल कृपया मारू नये.)

किमर्थ रामदासांनी केलेल्या तनाच्या श्लोकाच्या कॉप्या मिळवून त्यांचं वर्गात जाहीर वाचन आळीपाळीने करा.

नाही, नको. काही बोलत नाही. काही लोकांना या विषयाचं एवढं वावडं आहे की एक जाहीर विनोद केला तर मी या विषयाबद्दल obsessed असण्याचा आरोप होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक माजलेला सांड फ्राईड चिकन घेऊन हजर झाला . त्याने भक्कम शिवीगाळ करतच माझा खिमा केला .नंतर त्यानेच माझा लगदा नीट गोळा करून मला पुन्हा सुबक ठेंगणी केले अन फ्राईड चिकन भरवून माझ्यात प्राण फुंकले .माझ्या शरीरात एकच हिंसक हर्षस्फोट झाला

मेलो! यापेक्षा किंचितही जास्त रोमँटिक वर्णन जर मला जमले तर काय बहार येईल! Wink

धमाल विडंबंन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Biggrin Biggrin मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळ कथा जालावर कुठे वाचायला मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळ कथा पीडीएफ स्वरूपात माझ्याकडे आहे . सतीश तांबे यांना विचारून तुम्हाला इमेल करते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुप्रसिद्ध लेखक सतीश तांबे

हे नक्की कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीच तर नाहीत? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तांबेंची मूळ कथा आणि ह्या लेखात बरच साम्य जाणवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपिशचे आडनाव 'लोखंडे' असे असायला हवे होते म्हणजे पुरूषांचे वस्तुकरण अधिक ठळक झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबई पुण्यापलीकडच जग असून नसल्यासारखच आहे असे संत कूपमंडूकराम यांनी मंडूकनीती या बोधग्रंथात म्हटले आहे >>
आमच्या परवानगी विना आमच्या ग्रंथातील वाक्य उद्धृत केल्याबद्दल तुम्हाला प्रवीण दवणे यांच्या कविता वाचण्याची शिक्षा का देण्यात येऊ नये (ती देखील इन्सुलिन न घेता)? ताबडतोब लेखाइतक्या आकाराचा माफीनामा छापावा अन्यथा परिणामास तयार रहावे.

-हुकूमावरून

आपला नम्र,
-कूपमंडूकराम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

बारामतीचे बेडुक येउन तुमची फी Blum 3 घेउन गेले .तुम्ही बसा दवणिय कविता वाचत ;;) ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I admire and love the people who surf porn sites. Rather, who chat on porn sites. and do that openly.
च्याय्ला, ढोंग करीत नाहीत लेकाचे.
ताकाला जाऊन भांडे लपवणे सोडा, झ्झ्झ्झला जाऊन ल्ल्ल्ल्ल लपवत नाहीत असे लोक्स. याहू वा एमेसेनला पोर्न चॅनल्स वर जे लोक भेटत, किंवा आजही आयारसीच्या पोर्न साईट्सवर जितकी क्लीन व आदबशीर चर्चा होते, डिसेंट लोक भेटतात, तितके सो कॉल्ड क्लीन चॅट रूम्समधे भेटत्/दिसत नाहीत. एकच अजेंडा असतो ऑनलाईन. यू क्नो व्हाट दॅट इज.. पोर्न साईटवर मात्र मस्त तात्विक / गीक इत्यादी चर्चा होतात. रेअरली पोर्न रेफरन्सेस येतात, तेही नवख्या चॅटर्सकडून.
असो.
नेक्स्ट टाईम मचाकच्या एकाद्या कथेचे रसग्रहण/रसग्रहणात्मक विडंबन/विडंबनात्मक रसग्रहण इ. करा. जास्त मजा येईल.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

Biggrin
भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !