डॉ एन राजम

(संपादकाना विनंति - कृपया लांबी-रुंदी संपादित करु नये)

काल मी साक्षात् सरस्वतीची छबी माझ्या कॅमेर्‍यात टिपली.

सरस्वती नेहमी वीणावादन करते. पण तिला वीणा वाजवायचा कंटाळा येतो तेव्हा ती व्हायोलिनपण वाजवते. ही व्हायोलिनधारक सरस्वती म्हणजेच पद्मभूषण डॉ एन राजम.

विम व्हॅन देर मिर नावाचा एक संगीत अभ्यासक (musicologist) एकदा पंडित उदय भवाळकरांकडे भेटला होता. त्याने बोलताना प्रश्न स्वत:च एक प्रश्न उपस्थित केला आणि स्वत:च त्याचे उत्तर देऊन टाकले. तो म्हणाला, "खरा श्रेष्ठ म्युझिशिअन कोण?" "जो दोन सुरांमधले अवकाश दाखवु शकतो तो". त्याची ही व्याख्या मला एकदम मनोमन पटली. पण काल श्रीमती एन राजम यांचे व्हायोलीन ऐकताना ही व्याख्या थोडी आणखी सुधारावी असे वाटले -

"खरा श्रेष्ठ म्युझिशिअन कोण?"
"जो दोन सुरांमधला आणि दोन मात्रांमधले अवकाश दाखवु शकतो तो"

एन राजम ओंकारनाथ ठाकुरांकडे शिकल्या. पण मला स्वत:ला, का कुणास ठाउक, ओंकारनाथ ठाकुर एव्हढे भावले नाहीत, पण राजम बाईंच्या व्हायोलिनमधुन जे दिसले ते एक प्रकारचे ठाकुरांचे स्वरानी रंगवलेले भन्नाट चित्रच म्हणावे लागेल. मला ते जास्त भावले. मूळ विषयापेक्षा कधीकधी आपल्याला प्रतिमा, प्रतिबिंब जास्त आवडते, तसे काहीसे हे म्हणता येईल

तांत्रिक कारणामुळे तासभर उशीरा सुरु झालेल्या कार्यक्रमात पंडित सुरेश तळवळकरांचा, योगाचार्य व्यवहारे आणि पं. शेवलीकर यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा बोलताना तळवळकरांनी रियाझ आणि साधना यातला फरक सांगितला. तो असा, "रियाझ उणे अहम् म्हणजे साधना".
ही पण व्याख्या बरेच काही सांगुन जाते.

तुंडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात राजम बाईनी तासभर यमन मग एक नाट्यपद आणि शेवटी भैरवी वाजवली. तबल्यावर रामदास पळसुले आणि व्हायोलिन साथ राजम यांची नात रागिणी शंकर हिने केली. रागिणी आपल्या आजीचा दिव्य वारसा पुढे चालवणार यात शंकाच नाही.

मी व्हायोलीनबरोबर काहीकाळ झटापट केलेली आहे. त्यामुळे "व्हायोलिन कशाशी खातात" हे मला पुरेपुर ठाउक आहे. गुंतागुंतीच्या स्वरकृतीनी नटलेले हे वादन अचंबित करणारे होतेच पण तरीही प्रासादिकतेला कुठेही धक्का पोचला नव्हता. पण एक मात्र खरे दोन शैलींचा संकर जेव्हा राजम यांच्या सारखा समर्थ कलाकर घडवतो, तेव्हा तो जे नवे निर्माण होते, ते कलेचा प्रवाह खळाळत पुढेच नेते.

काल मी डॉ एन राजमना मैफलीत प्रथमच ऐकले पण मला त्यांचे फोटो पण काढता आले. "हर्षेण जाता मम काप्यवस्था न तामहं वर्णयितुं समर्थ:..."

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

तुफान!

यांचे काही तुकडे जालावर ऐकता येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटोंची तांत्रिक माहिती

कॅमेरा - कॅनन ५५० डी
१ले तिन ७०-३०० मिमि(व्हाईट) लेन्स वापरुन काढले
४ था ५० मिमि प्राइम वापरुन काढला

लाईटरुम ४.२ मध्ये संपादित केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजम बाई महान आहेत. इतकं सहजपणे वाजवतात की बास. वाजवताना फार कसरती करतायत असं कधी वाटत नाही. एकदम प्रवाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वाह छान! लेख आणि फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख फोटो !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

मोठा मॉनिटर असल्याचा आनंद झाला, सुरेख फोटो. आजचा दिवस यूट्यूबवर एन. राजम.

(मला कृष्णधवल फोटो जास्त आवडले. रंग distracting वाटले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राजम बाईंच व्ह्यायोलिन ऐकलंय. मराठी गाण्यांचे / शब्दांचे बोल अतिशय जाणकारीने वाजवल्याचं स्मरतं.

त्या सुरांना साजेसा अप्रतिम फोटो आहे पहिला. छाया/प्रकाशाचा खेळ, व्ह्यायोलिनवरच्या रेघा, कंपोझिशन (एका बाजूला ठसठशीत चेहेरा), आणि मुख्य म्हणजे त्यांची एक्स्प्रेशन ... व्वा! सुरांच्या तोलामोलाचा फोटो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0