नोकरदार...१

"अरे यार! या साल्यांनी याही वेळी हाईक कमी दिलीये. यंदाही त्या आशेपायी थांबायलाच नको होतं. साले नको तिथे पैसे घालतील पण पगार द्यायची वेळ आली की बेल कर्व्हपासून ते स्टॅग्नेशनपर्यंत सगळं आठवेल यांना. एकदा हे बेलकर्व्हच त्यांच्या फुल्यांफुल्यांत घातले पाहिजे" राजेश चांगलाच संतापला होता. त्याच नादात तो क्यांटिनमध्ये मोठ-मोठ्याने बोंबलत होता.
"कोणाचे कर्व्हज कसे आहेत - आय मीन कोणत्या आलेखांचे कर्व्हज कसे आहेत - याची बित्तंबातमी असणार्‍या या पठ्ठ्याला हे बेलकर्व्हचे गणित मात्र कधीच सुटलेले नाही." मनोबा हळूच पुटपुटला नी त्यावर त्याने ऋष्याकडून टाळी + हशा मिळवता. शिवाय मनोबाच्या डोक्यावर त्याने दिलेल्या मार्मिक श्रेणीचे चिन्ह दिसू लागले. समोर मेघना आपल्या डोळ्यावर व्हॉट्स अ‍ॅपचा चष्मा लावून शांतपणे वाचत बसली होती. तिचं लक्षच नव्हतं.

"अरे पण यंदा कोणालाच हाईक नाहीये." असं म्हणून ऋष्याने आपल्या डोक्यातून दोन-तीन लिंका काढून राजेशकडे कॅरमच्या सोंगट्या भिरकावाव्यात तशा भिरकावल्या. राजेश त्या लिंका बघण्या-वाचण्याच्या मन:स्थितीतच नव्हता. तोवर मेघनाने "राजेशला इतकं संतापलेलं कोणी बघितलं आहे का?" असा कौल मनातून जालावर टाकताच जगभरातून प्रतिसाद येऊ लागले. मनोबाला मात्र त्या ऋष्याने भिरकावलेल्या लिंकामध्ये प्रचंड रस होता. त्याने अधाश्यासारख्या त्या आपल्या मेंदूत कोंबल्या.
"हो रे! च्यामारी! बरं झालं मी ती ऑफर नाकारली. त्यांनी तर हाईक सोड पगार कमी केलेत." मनोबाच्या डोक्यावर १ रोचकही झळकू लागली.

"बघा बघा जगातील कोणीही राजेशला इतकं भडकलेलं बघितलं नाहीये!" मेघना चष्मा काढत म्हणाली. तिच्या एका डोळ्यावर "येस" लिहिलं होतं तर दुसर्‍यावर "नो". येसवाल्या डोळ्यात शून्य दर्शवणारं बुबूळच होतं मात्र नो वाल्या डोळ्यात बुबुळाच्या जागी १०० हा आकडा होता. काही मिनिटांतच मेघनाच्या डोक्यावर ५ माहितीपूर्ण श्रेण्या दिसू लागल्या. मग तिने डोळे मिचकावले आणि ती पूर्ववत दिसू लागली.

मग तिने क्यांटिनवाल्याच्या दिशेने दोन ऑर्डरी कॅरमसारख्या भिरकावल्या. इतक्यात मनोबाचे डोळे चमकले नी मनोबा म्हणाला, माझंही लेटर आलं वाटतं
"अरे यार! मलाही हाईक नाही!!!! च्यामारी इतकं काम करतो. शनिवारीसुद्धा येतो हाफिसात. आपलं प्रोजेक्ट तर बघतोच, दुसर्‍यांच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा राबतो. बस्स आता मीही ठरवलंय की ह्या ऋष्यासारखं अजिबात काम करायचं नाही! या जगात काम करणार्‍याची किंमतच नाहीये!"

"मी तर तुम्हाला किती दिवस सांगतोय. नोकरी ही फक्त गरज म्हणून करावी. नोकरी ही नोकरी असते. याचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट असतो की तुम्ही दुसर्‍यासाठी काम करता, आपल्या घरचं काम नसतं ते. ते काम झालं किंवा झालं नाही तरी तुमच्यावर होणारा परिणाम एकूण कंपनीवरच्या परिणामापुढे क्षुल्लक असतो. तुम्ही मरमरून काम करत आला आहात, त्यात तुम्हाला अ‍ॅवरेज ५-८% हाईक मिळतही आलीये. मला तुमच्याहून भरपूर कमी काम करूनही ४ते६% हाईक मिळते इतकेच. दरमहा अधिकच्या २-४हजार रुपयांसाठी तुम्ही इतके का राबता हेच कळत नाही. त्यातही टाइम इज मनी धरलं नी मला मिळणारा वेळ जमेस धरला तर माझी हाईक तुमच्या इतकीच होते.", ऋष्या बोलला.

"बरोबरे" मेघनाने आपल्याकडील पुडक्यातून काहीतरी तोंडात टाकत ऋष्याला अनुमोदन दिले "फक्त मला तुझे 'कामापुरती नोकरी' मंजूर नाही. नोकरी ही आवडीच्या क्षेत्रातच असली पाहिजे". मेघनाच्या डोक्यावर मघाशी मिळालेल्या पाच माहितीपूर्ण सोबत ३ मार्मिकही दाटीवाटी करून उभे राहिले. ऋष्याचे लक्षच नव्हते. त्याला कोणतातरी पक्षी दिसला असावा. त्याने बर्ड सर्चचा चष्मा काढून काहीतरी बघायला सुरुवात केली होती.

"ऋष्या!!!" राजेश, मनोबा नी मेघना तिघेही एकाच वेळी ओरडले. "आम्ही काय बोलतोय, तुझं लक्ष कुठाय" मेघनाने फैलावर घेतला. तिच्या कानावर या ड्वायलागसाठी ३ स्त्री-वादी लाइक दिसू लागले. ऋष्या वरमला "सॉरी, हा तर काय म्हणत होतीस?"
"कामापुरती नोकरी नको, आवडत्या क्षेत्रातच हवी" मेघना घुश्शातच म्हणाली.
"माझा प्रश्न आहे एखाद्या आवडत्या क्षेत्राकडे आपले पोटापाण्याचे साधन म्हणून बघायला लागल्यावरही ते क्षेत्र आवडू शकतं का? का त्यासाठी एकदा का मोबदला मिळू लागला की त्या कामाची किंमत होते नी त्याची आवड निघून जाते" ऋष्या बोलल्यावर त्याच्याही डोक्यावर ३ मार्मिक आणि १ खवचट दिसू लागली.

राजेश आता जरा शांत झाला होता. "ऋष्या तुझं ठीके. तुझ्या डोक्यावर आमच्या इतकं कर्ज नाहीये"
"तुम्हाला गरज नसताना कर्ज काय मी सांगितलं होतं का घ्यायला?"
राजेश काही बोलणार मनोबा म्हणाला, "इन्व्हेस्टमेंट नको का? म्हातारपणी काय करणार? तुझं काय तुझ्या कडे असेल बक्कळ पैसा. परदेशात फिरायला जात असतोस, गाड्या घेतोस, तुला काय कळणार!"
"सालेहो! बक्कळ पैसा कसला? कमावती जोडीदारीण आहे, नी फक्त राहत्या फ्लॅटचं कर्ज आहे. त्यामुळे जरा शिल्लक उरते. ती साठवतो नी खर्च करतो. तुम्ही तेच पैसे वापरून 'सेकंड होम नी फार्म हाउस नी काय काय' घेता ते. खरंतर म्हातारपणाची इतकी तजवीज झाल्यावर तुम्ही नोकरीही करायला नको!" बोलताना ऋष्याने मिचकावलेला डोळ्या प्रत्येकाला टोचला.

राजेश आता पूर्ण नॉर्मल झाला होता, "पण खरंच रे, आता नोकरी आहे तोवर ठीके पण मग तू काय करणार? आपल्याला पेन्शन कुठाय? पोराबाळांवर विसंबण्याचा जमानाही गेला. हे बघ हल्ली ही तजवीज करणं कसं गरजेचंय ते" असं म्हणून राजेशने हवेतच काही तक्ते, आलेख भिरकावले. मनोबा, मेघना दोघांनीही त्यात डोके घालते व प्रतिमांची कॉपी खेचून घेतली.
एकीकडे ऋष्या बोलत होता, "अरे काय करायचाय म्हातारपणी इतका पैसा? आता तब्येत साथ देतेय तोवर फिरतोय दूरचे महागडे देश, चाळिशीनंतर स्वस्तातल्या ट्रिपा काढू, पन्नाशीनंतर शरीर व पैसा दोन्ही रोडावेल तेव्हा भारतातच फिरायचं आणि रिटायर झाल्यावर शरीर व पैसा दोन्ही जपत "गड्या अपुला गाव बरा" हेच खरं म्हणायचं. म्हातारपणी पैसा लागेल तो आरोग्याच्या तक्रारींना, मोठी व्याधी उद्भवली तर कितीही पैसा साठव कमीच पडेल हे नक्की"

अचानक ऋष्याच्या कानात दिवे लागले नी हृदयाच्या ठोक्यांचा मोठ्याने आवाज येऊ लागला. "एक्सक्युज मी बायकोचा फोन!" ऋष्याने डोळे मिटले व कानावर हात ठेवला. त्याच्या अंत:चक्षुंपुढे त्याची बायको आली.
"काय रे आहे का नोकरी शाबूत?" तिने विचारले.
"हो हो आहे. शिवाय ४% हाईकही मिळालीये."
"अरे वा, मजाय!"
"तुझं काय गं? "
"माझीही नोकरी टिकलीये. शिवाय ५% हाईकही आहे."
"उद्या मी वर्क फ्रॉम होम घेतोय, तूही घे, पिच्चरला जाऊन येऊया!"

तोवर समोरच्या दारातून अरुण नी बॅट्या स्केट करत येत होता. ते ही त्याच टेबलवर आले

अरुण आल्याआल्याच म्हणाला "काय आली ना लेटर्स? झाली ना रडारड नी दु:ख सुरू. म्हणून मी म्हणत होतो, पूर्वीच्या लोकांना लेटर्सच येत नसत ती अधिक सुखी होती"
अरूणच्या डोक्यावर श्रेण्यांचं वादळ घोंगावू लागलं..

(क्रमशः)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

माहितीतली पात्रं घेउन कथा प्रोब करण्याची शैली भारीच.
पाच सात वर्षापूर्वी सखाराम गटण्यानं मिसळप्वावर वापरली होती.
त्यानंतर थेट आज.
पण ह्यातला एकूण बाज, हवेत लिंका भिरकावणं, टपल्या देणं आवडलं.
(हो टपल्या खाऊनही आवडलं!)
लिखते रहो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सारे ऐसीकर एकाच कंपनीत खरोखरच कामाला असते तर काय धमाल आली असती!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फक्त धमालच आली असती.
कंपनीचा कारभार बोंबलला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आणि जर अरुण जोशी हे मेघना, मनोबा, घासुगुर्जी, अदिती, थत्तेचाचा यांचे मॅनेजर असते तर अजून धमाल आली असती (बाकीच्यांना)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या प्रतिसादाला 'हलकट' अशी एक सकारात्मक श्रेणी देता आली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिवाय सारखे कट्टे करून अरुण जोशींना बोलावत नाहीत म्हणजे तर काय ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग मी नक्की 'न'डूआयडी घेतला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाह!!! राजेश नॉर्मल होण्याचा अन बेलकर्व्हचा काही संबंध आहे किंवा कसे, असा विचार क्षणभर मनात तरळून गेला. ऋष्या, मनोबा अन मेघनाचे संवादही छानच रंगलेले आहेत.

अन आमची एंट्री स्केटिंग करत दिल्याबद्दल धाग्याला एक ५ स्टार दिलेले आहेत. फक्त एक दुरुस्ती सुचवतो: बॅटमॅनच्या वेषात स्केटिंग करण्यापरीस खाली दाखवल्याप्रमाणे बॅटपॉडवरून एंट्री जास्त सुखकर झाली असती.

किंवा स्केटिंग करायचे तर एल ओ टी आर च्या पार्ट २ मध्ये हेल्म्स डीप नामक रोहान राज्याच्या किल्ल्यात ऑर्क अन उरुक-हाईंशी लढाई करताना तटबंदीच्या पायर्‍यांवरून स्केटिंग करीत बाण मारणार्‍या लेगोलाससारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आह्हा! ढिश्क्यांव! राजेश संतापलाय, बोंबलतोय वगैरे आलं तेव्हाच हा लेख फ्यांटसी आहे हे समजले!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मस्तच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश हे नाव पाहिल्यावर पहिल्यांदी म्हटलं की असेल एखादा... त्यावेळी राजेश खन्ना दिल की धडकन होता म्हणून अनेकींनी आपल्या मुलांची नावं राजेश, राजेंद्र, राजन, राजीव वगैरे ठेवली होती. पण नंतर स्टोरीमध्ये ऋष्या, मनोबा, मेघना वगैरे दिसले... आणि डोक्यावर क्षणात तरळणाऱ्या मार्मिक श्रेणी वगैरे वाचून तर खात्रीच पटली.

सुरूवात तर छान झाली. गोष्ट पुढे कशी सरकते आहे ते बघण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच.
जाता जाता,
राजेशरौ संतापणे वगैरे ठीके पण संतापून मोठमोठ्याने बोंबलणे? खडाखड खडाखड कळफलक कुटत बसले हे जास्त फिट्ट बसेल.
पुढील भाग येऊद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा जमलाय.

बाकी डोक्यावर श्रेण्या घोंघावणे वगैरे वाचून ही सगळी पात्र व्हिडीओगेम्स मधील कार्टून्स आहेत असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. कॉल ऑफ ड्युटी मध्ये जसं मित्र-शत्रू डोक्यावर दाखवतात तसं "हा सेन्स, हा नॉनसेन्स" असं ह्या श्रेण्या दाखवताएत असा भास झाला. असं सगळं कार्टूनमय चित्र रंगत असताना मध्येच एकदम ऋषिकेशचे अंतःचक्षू आल्याने गेम क्रॅश झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

डोक्यावर श्रेण्या, भिरकावलेल्या लिंका, कौल... निळ्या म्हणतोय तशी अ‍ॅनिमेशन असलेली गोष्ट दिसायला लागली लगेच डोळ्यांसमोर.

क्रमशः लिहिलंयत. पुढे लिहा आता लवकर. नाहीतर मी खरंच "राजकारण आणि संसदपटुत्व हे विषय सोडून ऋषिकेश इतर कुठल्या विषयांवर बरं लिहू शकतो का?" असा कौल टाकीन. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दोन वेळेस चिमटा घेतला स्वत:ला .
प्रथम मी कुठे आहे यासाठी आणी दुसर्यांदा लेखक नक्की ऋषिकेशजी आहेत का यासाठी .
लेख आवडला हेवेसांनल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0