अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

खरं म्हणाल तर शेरखान जंगलाचा राजा होता. त्याच्या डरकाळीने जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप व्हायचा. भले मोठे रेडे ही त्याला घाबरायचे. शेरखान जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तलावाजवळ दबा धरून बसायचा, संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या हरीण, डुक्कर आणि कधी कधी तर एखाद्या रेड्याची ही शिकार करायचा. असं सुख-समाधानाने आयुष्य जगत होता. अचानक त्याचा सुखाला ग्रहण लागले. महाबली नावाचा एक रेडा जंगलात आला. आधी रेड्यांच्या कळपावर त्याने कब्जा केला नंतर त्याने स्वत:ला जंगलाचा राजा घोषित केले. सर्व शाकाहारी रेड्यांना तो म्हणाला आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे. शेरखान पासून मी सर्वांचे रक्षण करेन. कुणावर शेरखान ने हल्ला केला तर मला आवाज द्या, मी धावत मदतीला येईल. फक्त शेरखान वर लक्ष ठेवा. मी त्याला जंगलातून हाकलून लावेल किंवा आपल्या शिंगांच्या प्रहाराने त्याला यमसदनी पाठवेल. महाबलीने रेड्यांसह जंगलातल्या मध्यवर्ती तलावावर आपला कब्जा केला. शेरखान ने पळून, टेकडी खालच्या गुहेत आसरा घ्यावा लागला होता. महाबली रेड्याने कित्येकदा रेड्यांसोबत त्याच्या वर हमला केला, नेहमीच टेकडीवर चढून शेरखान आपले प्राण वाचवत असे. तसं म्हणाल तर अधिकांश जंगलावर महाबली रेड्याचा कब्जा झालेला होता. आता शेरखान नुसता नावाचा राजा होता.

एक दिवस सकाळी, तवाकी नावाचा तरस आपल्या बायको व पोरांसह जंगलात आला. एका रेड्याने त्याला बघितले. तो तवाकीला म्हणाला, तरसा या जंगलाचा राजा महाबली रेडा आहे, त्याने तुला बघितले तर तुझे काही खरं नाही. शेरखान सुद्धा त्याला भिउन लपून बसला आहे. मांसाहारी जनावरांना या जंगलात येण्याची सख्त मनाई आहे. त्याचे बोलणे ऐकून तवाकी जोर-जोरात हसूं लागला. तुमच्या सारखे आम रेड्यांना दोघांनी ही मूर्ख बनविले आहे. रेडा म्हणाला: कसं, तवाकी: मूर्ख रेड्या, महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. तवाकी पुढे म्हणाला आम्ही तरस रेड्यानां खात नाही, माझ्या परिवार पासून रेड्यांना काहीच भीती नाही. छोटे हरीण,ससे ही गवत खातात, त्यांना मारून आम्ही आपली गुजराण करतो, त्यात तुम्हा रेड्यांचे ही भलंच आहे तुम्हाला जास्त गावात खायला मिळेल. शिवाय तू इथे पहारा देतो आहे आणि महाबली माद्यांबरोबर मजा मारतो आहे. तवाकीचा बाण वर्मी लागला. रेडा म्हणाला खरं, महाबली आल्या पासून मादींकडे ढुंकून ही पाहणे अशक्य. तवाकी म्हणाला मित्र चिंता नको करू, मी राजा झाल्यावर सर्व रेड्यांना, मादीचे सुख मिळेल. उद्या मी दोघांचा वध करून राजा बनणार आहे. फक्त तुम्ही तमाशा पाहत राहा, मधे पडू नका. ही आनंदाची बातमी सर्व रेड्यांना जाऊन सांग.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे, तवाकी आपल्या परिवार सह महाबली समोर उभा ठाकला व त्याला म्हणाला, महाबली आज पासून मी जंगलाचा राजा झालो आहे, तू जंगल सोडून पळून जा अन्यथा मला तुझा वध करावा लागेल. महाबली, हसून म्हणाला, मूर्ख एका पायेच्या लाथेने तुला तुडवेल, ‘जान प्यारी असेल’, तर आला तिथे परत जा. तवाकी: तुझे दिवस भरले, हिम्मत असेल तर लढ. महाबली म्हणाला: रेड्यांनो, याला हाकलून लावा. पण सर्व रेडे शांत उभे राहिले, कुणीच प्रतिसाद दिला नाही. महाबली म्हणाला तुम्ही शांत का? पळवून लावा त्याला. त्या वर एक रेडा म्हणाला: महाबली, तवाकी पासून आम्हाला काहीच भीती नाही, उलट तो राजा झाला तर आमच भलंच होईल. तुझ्या जाचा पासून तरी मुक्ती मिळेल. महाबली उतरला: असं होय. आधी याला संपवतो, नंतर तुम्हाला बघतो.

उंदीर-मांजराचा खेळ सुरु झाला. महाबली तवाकी वर हल्ला करायचा, तर त्याचे पोरं मागून महाबली वर हल्ला करायचे. दिवसभर त्यांच्या मागे पळत-पळत महाबली दमून गेला. उगाचच याचा नादी लागलो, असे त्याला वाटू लागले. एकट्याने तवाकीच्या परिवाराशी निपटणे शक्य नाही. बाकी रेड्यांची मदत नक्कीच लागेल. नकळत महाबली टेकडी जवळ पोहचला होता. इथे जवळच शेरखान असायला पाहिजे. संध्याकाळ ही होत आली आहे. समोर पाण्यचे डबके दिसले. महाबलीला तहान ही लागली होती, पाणी पिऊन आपण परत फिरले पाहिजे. तवाकीचे काय करायचे, उद्या बघू. महाबलीला तहान लागली आहे, हे तवाकीने ओळखले उडी मारून तो सरळ महाबली समोर येऊन उभा राहिला व म्हणाला, महाबली कालच शेरखानला मारून मी त्याच्या गुहे वर व या तलावावर अधिकार केला आहे. पाणी पिण्या आधी, माझ्याशी युद्ध करावे लागेल. आता मात्र महाबली भयंकर वैतागला म्हणाला सकाळ पासून ऐकतो आहे, युद्ध कर युद्ध कर, पळपुटा लेकाचा. हिम्मत असेल तर तसाच समोर उभा राहा. या वर तवाकी उतरला, काल शेरखान ही असेच म्हणत होता, शेवट काय झाले, जगातून गेला बिचारा. आज तुझी पाळी आहे, तुझे मरण मला समोर दिसत आहे, ये हल्ला कर आपल्या तीष्ण नखांनी तुला फाडले नाही तर माझे नाव तवाकी नाही. याहून अधिक ऐकणे महाबलीला शक्य नव्हते, आपली खुर आणि शिंग आपटत, तो तवाकी वर चालून गेला. तवाकी आपल्या जागेवरून तिळमात्र ही हलला नाही. महाबली आपल्या शिंगात उचलून तवाकीला फेकणारच, पण आपल्या पाठीवर कुणीतरी झेप घेतली आहे, असे त्याला वाटले, पण क्षणातच त्याची मान शेरखानच्या जबड्यात होती. तवाकी बरोबर वादावादी होत असताना शेरखान हळू हळू सरकत महाबलीच्या मागे पोचला होता आणि त्याने महाबलीच्या मानेवर सटीक हमला केला. त्याच क्षणी तवाकीने ही आपल्या परिवारासह महाबली वर हल्ला चढविला. त्याचा बायको ने महाबलीची शेपटी पकडली, पोरांनी त्याचे पाय पकडले. तवाकीने दोन्ही पंज्यानी त्याचे शिंग पकडले. बेचारा महाबली काहीही करू शकला नाही.

कित्येक महिन्यानंतर, शेरखान ने रेड्यावर यथेच्छ ताव मारला. तवाकीच्या परिवाराला ही त्यात हिस्सा मिळाला. आनंदाने तवाकीने ही शेरखान महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली. शेरखान ने पूर्वी प्रमाणेच डरकाळी फोडली. जंगलातल्या सर्व जनावरांच्या हृदयात थरकाप झाला. रेड्यांना आपण मूर्ख बनलो हे जाणविले. पण आता काही उपयोग नव्हता. शेरखानने आपल्या बुद्धीने हे युद्ध जिंकले होते.

सूतजी म्हणाले हे राजन, कलयुगात जो कुणी या कथेचे मनपूर्वक श्रवण करेल, विपरीत परिस्थितीत ही शेरखानप्रमाणे आपल्या गादीचे रक्षण करण्यास समर्थ ठरेल.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विवेक पटाईत यांची मातृभाषा मराठी नसावी असे वाटले.

गुहेत शरण घ्यावी लागली होती?>>> आमच्या मराठीत - 'आसरा घ्यावा लागला होता' असे म्हणतात.
रेड्याचा ही शिकार?>>> आमच्या मराठीत रेड्या'ची' शिकार असे म्हणतात.
मी सर्वांचे रक्षण करेल.>>>> आमच्या मराठीत मी रक्षण करेन असे म्हणतात. (आणि पुढे अनेक प्रथमपुरुषी उल्लेख चुकीचे आहेत.)
आवाज द्या>>> आमच्या मराठीत कदाचित खपून जाईल पण 'हाक मारा' जास्त योग्य.

पुढेपुढे चुका काढायचाच कंटाळा आला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीन पिढ्यांपासून दिल्लीत राहणे असल्यामुळे मराठीत शिक्षण नाही. हिंदीचा प्रभाव हा राहणारच. आणि मागून छत्तीसगढ-विदर्भ सीमा भागेतला असल्यामुळे तिथली मराठी पुण्या-मुंबईच्या मराठीपेक्षा पुष्कळ अलग आहे. त्या मुळे तुम्ही काढलेल्या तिन्ही चुका कितपत योग्य आहे, याचा विचार केला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही लोड घेऊ नका. तुमची भाषा मस्त आहे. (दिल्लीचा लहेजा वगैरे चावलेलं च्यूईंगम वापरत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तीन पिढ्यांपासून दिल्लीत राहणे असल्यामुळे मराठीत शिक्षण नसणे अशाहि परिस्थितीत तुमचे मराठी चांगलेच टिकून आहे आणि जवळजवळ प्रमाणभाषेसारखेच आहे आणि तुम्ही मराठीत लिहूहि शकता हे प्रशंसनीय आहे.

अशाच परिस्थितीत अन्यत्र एखाद्या पिढीतच मराठीची नाळ तुटते आणि मुले मराठीत लिहू/वाचू/बोलू शकत नाहीत हे वास्तव आहे. फार दूर कशाला, सदाशिव/डे.जि./पार्ले/शि.पा. अशा मराठीच्या बालेकिल्ल्यांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या बहुसंख्य मराठी कुटुंबातील मुले मराठी लिहू/वाचू शकत नाहीत. ती मुले मराठीत कामचलाऊ संवाद करू शकतात पण थोडेहि जड मराठी त्यांच्या डोक्यावरून जाते. (एकदा मी सर्दीपडशामधून नुकताच बरा झालो होतो आणि माझ्या भाचीला मी म्हटले, "मी नुकताच रुग्णशय्येवरून उठलो आहे." तिला काहीहि अर्थबोध झाला नाही आणि विनोदचिकीर्षु असा मी तोंडावर पडलो!)

बाकी तुमच्या गोष्टीचे प्रयोजन कळले नाही. इसापनीति/पंचतंत्री वाटली. पंचतंत्रातील पहिल्या 'मित्रभेद'तंत्रामधील संजीवक हा वृषभ आणि पिंगलक हा सिंह ह्यांची गोष्ट पुष्कळशी अशीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बह्वंशी सहमत आहे.

मुळात दिल्लीस राहून मराठी टिकविण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे हे नमूद केलेच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला कथा वाचताना नानांनी दिलेले शब्द खटकले नव्हते. तुम्ही लिहित रहा.

(अर्थात विसुनाना म्हणत असतील, की "ऋष्या, तु जे लिहितोस त्यापेक्षा ही कथा बरीच शुद्ध आहे, त्यामुळे तुला त्यात काही खटकणार नाहीच ;)" - आरोप मान्य आहेच! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी शिक्षण नसताना मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. तरीही मराठी पुस्तकांचे वाचन करून हिंदीचा प्रभाव अजूनही कमी करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन चांगलय.
विसुनानांना जाणवलेली गोष्ट अगदि पूर्वी मलाही जाणवली.
पण पार्श्वभूमी समजल्यावर खरच खूप कौतुकही वाटले.
बॅटमन, आदूबाळ, कोल्हटकर ह्या सर्वांशी सहमत. लिहीत रहा.

खरं तर अशा मराठी बोलण्यातही मजा असते.
इंदौरी लोकांशी मराठी बोलायला जशी मजा येते तसेच नाक्यावरच्या गुज्जु किंवा मारवडी दुकानदाराशीही.
हे सगळे बोलतात ती मराठी अशुद्ध आहे असे म्हणण्यापेक्षा ते बर्‍यापैकी बरी मराठी बोलतात; व अस्सल मानवी उच्चारणाचा स्पर्श लाभल्याने फार तर ती "वेगळी" मराठी ठरेल असे वाटते. अशुद्ध वगैरे नाही.
माझा क्यूबिकलमेट अमराठी आहे. पण मराठीत बोलत असतो. तो मूळचा मराठी नाहई; ए जाणवते; पण त्याच्याही मराठीत एक खास लज्जत आहे. एखाद्या फर्मास व्यक्तिचित्राचा विषय होउ शकतो तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दाखविलेल्या चुका ठीक केल्या आहेत. काल थोडासा राग आला होता. कारण मराठी लिहायला मेहनत ही करावी लागले. आज थंड डोक्यानी विचार केला. चूक माझीस आहे. योग्य काळजी घेईल. बाकी काही म्हणा आजच तवाकी आणि महाबली मध्ये युद्धाची सुरवात झालेली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली.

आपण भारतीय जे इंग्लिश बोलतो ते अमेरिकन किंवा ब्रिटिश इंग्लिशपेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळं असतं. भारतीय भाषांचे त्यांच्यावर काही संस्कार झालेले असतात. त्याला 'चुकीचं इंग्लिश' म्हणता येत नाही. म्हणजे आपण 'नाही का?' 'हो ना?' चं भाषांतर करून अनेक वाक्यं 'नो?' ने संपवतो. यात नक्की चुकीचं काही नसतं. ती इंग्लिशची किंचित वेगळी बोली असते.

अहिराणी बोली वेगळी असते, तशी या बोलीलाही 'देहलवी' का म्हणू नये? प्रमाण भाषेचा आग्रह विचारप्रधान लेखनासाठी ठीक आहे, पण ललितकृतीसाठी लेखकाने लिहिलेल्या बोलीशी वाचकाने एका मर्यादेपर्यंत जुळवून घेतलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी लेखन करताय हे खुपच कौतुकास्पद आहे. पुणे , मुंबई सोडले तर उरलेल्या महाराष्ट्रातले मराठी खुप वेगळी आहे. ललीत लेखन हे प्रमाण भाषेत च व्हायला हवे असा काही नियम नाही. त्यामुळे लिहीत रहा. भाषेची काळजी करु नका . तुमची शैली उत्तम आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली.
विवेककाकांचा मराठीचा लहेजा मला आवडतो. महाराष्ट्राबाहेर राहून मराठी, तीन पिढ्यांत, टिकणे खरेच कौतुकाचे आहे. माझ्या (न्यूक्लिअर) घरात मराठी बोलणारा मी शेवटचा माणूस असेन, त्यामानाने हे स्तुत्यच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान! लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0