बनाना लीफ ग्रीन चिकन

राम राम मंडळी.
दिवाळीच्या सुट्टी नंरत आमची ही पहिली पाककृती.
महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही.
आता परत येरे माझ्या मागल्या.

आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं.
फार काही कटकटीचं नाही.

४-५ मोठे चमचे हिरवं वाटण. (यात भरपूर कोथिंबीर + ४-५ हिरव्या मिरच्या + ४-५ पाकळ्या लसुण + १" आलं + एका लिंबाचा रस.)
१/२ चमचा हळद.
२ चमचे मसाला.
२ चमचे ऑलिव्हचं तेल.
मीठ चवी नुसार.
एका लिंबाचा रस.

१/२ ते ३/४ किलो चिकन.

चिकन स्वच्छ धुवून चाळणीत ठेऊन निथळवून घ्यावं. त्यात हळद, मसाला, मीठ आणि वाटण टाकुन चांगले एकत्र करुन घ्यावं.

केळ्याच्या पानात वरील मसाला लावलेले चिकन गुंडाळुन, बेकिंगच्या भांड्यात ठेवावं.
वरुन अ‍ॅल्युमिनीयमची फॉईल लावून हवाबंद करावं.
ओव्हन २५० ते २७५° C वर ठेउन ४० ते ४५ मीनिटे शिजवावे,

४० ते ४५ मीनिटां नंरत अ‍ॅल्युमिनीयम फॉईल आणि केळीची पानं काढून अजुन ८-१० मिनिटे ग्रील मोड वर शिजवावं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मसाले चिकन आणि तेल एकत्र करून नुसतं ओव्हनमध्ये भाजायचं म्हणजे खूपच सोपी पाककृती आहे. केळीच्या पानाचा फ्लेवर त्यात उतरतो का?

चमचा व मोठा चमचा अशी जी मापं दिली आहेत ती टीस्पून आणि टेबलस्पून आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


केळीच्या पानाचा फ्लेवर त्यात उतरतो का?


हो तर गुर्जी.
एकदम पुरेपुर स्वाद उतरतो.

चमचा व मोठा चमचा अशी जी मापं दिली आहेत ती टीस्पून आणि टेबलस्पून आहेत का?


होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

चला.. गणपा इज ब्याक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!