field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फटू कस्ला हाय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फटू रायगडाच्या स्तंभांचा हाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

रायगड किल्ला भारीच. मागची हजार वर्षे तरी तो तिथे आहे. यादव कालापासून किंवा त्याच्या थोडासा आधीपासून मोर्‍यांचे तिथे वर्चस्व होते. मोरे व शिर्के हे आपसातल्या संगनमताने व भौगोलिक परिस्थितीने आख्खा महाराष्ट्र जरी दिल्ली सल्तनत(खिल्जी-तुघलक) ह्यांच्या ताब्यात गेला, नंतर बहमनी सुलतानांच्या ताब्यात गेला, तरी स्वतःपुरते स्वातंत्र्य बराच काळ टिकवून होते, इतका दुर्गम तो किल्ला आहे. शे-दोनशे वर्षे तिथला शासक बाहेरच्या, घाटमाथ्यावरच्या धूमाकूळापासून अलिप्त राहू शकला, त्याचे कारण किल्ल्याचे स्थान, रचना.
१६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी तो घेतला.(मोर्‍यांमध्येच गृहकलह सुरु झाला बहुदा.) तिथे योग्य ती बाजू घेउन त्यांनी तो जिंकला. नंतर मला वाटते, शिवाजींच्या नंतर सलग सत्तावीस वर्षे आख्ख्या दख्खनमध्ये जी प्रचंड धामधूम होती, त्यात हा किल्ला एकदा मुघलांनी जिंकूनही घेतला.
पुन्हा १७०७ च्या नंतर मराठ्यांचा अंमल वाढू लागल्यावर तो स्वराज्यात परत आलेला होता.
तिसर्‍या इंग्रज्-मराठा युद्धात इंग्रजांनी लढून तो मिळवला. मला पडणारी शंका हीच की हा किल्ला जिंकण्यास अवघड असला तरीही दोन्-पाच वेळेस असा वेगवेगळ्या कालखंडात जिंकला गेला आहे. तुलनेने सिद्दींचा जंजीरा हा चारेकशे वर्षे अजिंक्य राहिला. दौलताबाद युद्धात जिंकून घेतला असे सातशे वर्षात दोनदाच झाले. १२९१ ला खिलजीने घेतला तेव्हा एकदा, व नंतर भाउसाहेब पेशवे(सदाशिवराव राव) ह्यांनी दख्खन मध्ये मोठा पराकरम गाजवत जे मोठे मोठे किल्ले कमावले, त्यात दौलताबद(देवगिरी) हाही होता.
शिवप्रेमींसाठी रायगडाला भावनिक व अस्मितेचे महत्व असणे स्वाभाविक आहे.पण त्याचा पुन्हा पुन्हा "दुर्गम" किंवा "अजिंक्य" असा उल्लेख का करतात हे समजत नाही. दुसर्‍अय बाजीरावाबद्द्ल सविस्तर प्रतिसाद देतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी फार फार पूर्वी "मंत्रावेगळा" का कुठलीतरी pro-Bajirao कादंबरी वाचली होती. तसाच "झुंज" ही pro-Yashwantrao Holkar ग्रंथही वाचला होता.त्यातले ललित लेखन, उदात्तीकरण व रंजक भाग सोडला तरी काही गोष्टी पटल्या. नंतर थोडेफार इतर अस्सल इतिहासकारांनी केलेले स्फुट लेखनही वाचण्यात आले. त्यानुसार काही गोष्टी लिहित आहे.
यशवंतराव होळकर पराक्रमी होता ह्यात शंकाच नाही. एकट्याच्या जीवावार भिल्ल,पेंढार्‍यांचे सैन्य उभे करून पेशवे-शिंदे व इतर मांडालिक संस्थानंना एकहाती टक्कर त्याने दिली.(१७९७ ला फौजफाटा जय्यत तयार केला,१८०३ च्या आसपास पर्यंत होळकरांचे वतन परत मिळवले.पेशव्यांशी युद्धे केली.१८०३ ते १८११ दरम्यान फक्त ब्रिटिशांशी युद्धे केली, सर्व जिंकली.)
पुढे ब्रिटिशांशीही यशस्वी लढाया केल्या. ह्या जवळ्जवळ सर्व जिंकल्या.त्यांच्या कामाचा आवाका,झपाटा हा जबरदस्तच होता.त्या तोडीचा झपाटा मला फक्त पोर्तुगीज्,आदिलशहा,मुघल व फुटीर संस्थानिक्,घरभेदी नातलग ह्यांना पुरून उरणार्‍या संभाजी राजांचा वाटतो. थोडक्यात, होळकर म्हणजे एक कर्तबगार व्यक्ती.

आता बाजीरावः-
ह्याचा पेशवा बनण्यापूर्वीचा बहुतांश काळ हा कैदेत वा नजरकैदेत गेला.म्हणजे, बाहेरच्या जगाची विशेषतः दरब्वारी रितीरिवाजांची फारशी जाण नाही. माणसांची पारख करण्याचे, परिस्थितेला कौशल्याने हाताळायचे त्याचे कौशल्य वाढिला लागायला काही वावच मिळाला नाही. कारण?
कारण हेच की दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचे चिरंजीव. राघोबा हा बारभाईंचा वैरी.राघोबाला पेशवेपदापासून दूर ठेवण्यासाठीच बाराभाईंनी नारायणरावाच्या जन्मजात बाळाला सवाई माधवराव "पेशवे" घोषित करुन राज्यकारभार सुरु केला. काही काळाने वृद्धापकाळाने राघोबा गेला.अजून काही वर्शाने खुद्द सवाई माधरावानेच वीसेक वर्षाच्या वयात आत्महत्त्या केली. आता? आता पेशव्याम्ना वारसच कोण???
समोर एकच नाव होते.कैदेत असलेला राघोबाचा मुलगा दुसरा बाजीराव.नाइलाज म्हणूनच त्याला पेशवा केले.१७९६ च्या आसपास.वरवर बघता मराठा सत्त आता बलिष्ठ आहे की काय, कळसाला पोचली आहे की काय असे वाटेल; पण आतून ती आधीच पोखरली गेली होती. तिचे विश्वासाचे खांब कधीच खिळखिळे झाले होते. धोरणातील एकसलगता कधीच नष्ट झाली होती. भारतभरात कुठेही छोत्यामोठ्या कुरबुरी झाल्या की मराठे त्यात उतरत,....
दोन्ही बाजूने उतरत!!
कधी एका बाजूने शिंदे व दुसरीकडून होळकर असा वाद राजपूतांच्या गादीवर कुणी बसायचे ह्यावरून झालेला दिसतो.
तर कधी एका बाजूला नागपूरकर भोसले एका स्पर्धकाला मदत करत असताना बरोब्बर दुसर्‍या बाजूला पेशवे मदत करत. हे म्हणजे एका हाताने दुसर्‍याची बोटे तोडण्याचे धंदे होते. आपण सारे छत्रपतींचे चाकर आहोत, ही भावना स्पष्ट कुठे उमटेना. मराठी फौजा १७६१ला ज्या पानिपतासाठी सगळे सरदार घेउन उभ्या ठाकल्या, तो प्रसंग शेवटचाच. त्यतील सगळीच आघाडीची घराणी स्वतंत्रपणे, एकेकेटी मनमानी राहू लागली.
थोडक्यात, पेशव्यांचे नियंत्रण आधीच कमी होत चालले होते. त्याला जबाबदार कोण,पेशवे,छत्रपती,इतर सरदार, की सामूहिक अपयश हा मुद्दा नंतरचा. पण असे घडत होते हे सत्य आहे.
ह्या पोखरून गेलेल्या सोनेरी राजदंडाचा वारसा बाजीरावाला मिळाला.आपल्याला वाटतो तितका तो कुचकामी नव्हता.
वैभवाच्या शिखरावरची मराठी सत्ता त्याने एकट्याने खड्ड्यात नेली हे पटत नाही. अनंत भोके पडलेल्या जहाजाचा त्याला ऐनवेळी कॅप्टन करण्यात आले इतकेच. त्याने निदान भविष्यात इंग्रजांशी लढण्याचा प्रयत्न तरी केला. शिंद्यांनी व नागपूरकर भोसल्यांनी , खुद्द साताअरच्या पवित्र गादीवर बसलेल्या छत्रपतींनी जी शस्त्रे टाकली त्याबद्द्ल कुणी काहिच कसे बोलत नाही ही एक गंमतच आहे.

होळकर्-बाजीराव
विठोजी होळकराने पुण्यापाशी विद्रोहाचा प्रयत्न केल्याचे मी ऐकले आहे. विद्रोही माणसाला पकडून बंदी बनवणे ह्यात अस्वाभाविक काहीही नाही. हत्तीला बांधून मारणे हे त्याकाळीही क्रूर मानले जाइ.हे करून त्याने होळकरांशी शत्रूत्वात अजूनच तेलच ओतले हे सत्य आहे.साध्या कैदेत ठेवूनही काम भागले असते.पण मुळात दंगा विठोजी होळकरांकडून सुरु झाला अशी माझी माहिती आहे.हे त्याला फक्त उत्तर होते. विठोजी गेल्याचे ऐकून यशव्ंतराव भडकला व थेट पुण्यावर चालून आला वगैरे नंतरचे.
मुळात त्याला ब्रिटिशांशी भांडाय्चे होते, तर शौर्याशिवाय ब्रिटिशांकडे असणारे एक फार मोथे शस्त्र त्याच्याकदे असणे जरूरिचे होते-- धूर्तता,धोरण्--कावेबाजपणा. वैयक्तिक शौर्य असले, तरी पुरेसा कावेबाजपणा विशेषतः गुप्तहेर,हेरगिरी व इतर सत्ताधार्‍यांशी गुप्तपणे संधान बांधून त्यांना विश्वासात घेणे त्याने यशस्वीपणे केलेले दिसत नाही.
असो. हे आहे विस्कळित चित्र.दुसरा बाजीराव आपल्याला वाटतो तसा नाही.पहिल्या बाजीरावा इतका शूर नसेल्,शिवाजींसारखे असामान्य गुणांचे मिश्रण त्याच्याकडे नसेल, पण त्याने काहीके धोका पत्करत इंग्रजांशी उशीरा का असेना संघर्ष केला. ह्या प्रयत्नात त्याचे उरले सुरले संस्थानही नष्ट झाले.
असो. हे बरेच विस्कळित आहे. पेशवेकालाबद्दल मुलातच माझ्या मनात बर्‍याच शंका आहेत, काही त्रुटी राहिलेल्या असू शकतात.
यशवंतरावाबद्द्ल, त्याच्या पराक्रमाबद्द्ल संजय सोनवणी ह्याम्नी जालावर काही लिखाण केले आहे, ते मिळू शकेल, त्यांचे छापील पुस्तकही असल्याचे ऐकले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रायगडाबद्दल एवढी माहिती नव्हती. (रायगडावर दोनदा गेले आहे, पण तिथे अशा प्रकारची काहीही माहिती मिळत नाही. ही माहिती तिथे, तेव्हाच मिळाली असती तर ....)

मनोबाचे प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत. जसा शाळेत शिकवला जाणारा भारताचा इतिहास गांधींपर्यंत येऊन थांबतो तसा महाराष्ट्राचा, मराठेशाहीचा इतिहास शिवाजीसाठी जर १०० पानं घेत असेल तर दुसर्‍या बाजीरावाच्या पराभवापर्यंत आणखी १० पानांत गुंडाळला जातो. वेताळबा, होळकर, शिंदे, भोसले यांचे आपसांतले संबंध इत्यादी आणखीही लेख येऊ द्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.