डियर कोलटकर

प्रिय कोलटकर,
आज तुम्हाला हे पत्र लिहतो आहे तेव्हा वाट्तं तुम्हाला भेटायला हवं होतं. खूपदा तुमची कविता वाचतानाही असं वाट्त रहात पण काय करणार लौकिकाच्या अवकाशात आपल्याला एकमेकांना भेटायला एखादा संदर्भबिंदू लागतो ना जो निर्देशनाच्या अक्षावर स्थिरावू शकेल पण नाही गवसला तो.असो. पण तुमच्या कवितांमधून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रतिमेशी मी बोलत असतो अनेकदा. तसंही वास्तवातही परस्परांच्या निर्मित प्रतिमांसोबतच आपण व्यवहार करत असतो ना? त्या प्रतिमांसोबतच आपण संवाद साधत असतो ना ? आपण एकमेकांसमोर स्वतःला प्रोजेक्ट करत असतो वेगवेगळ्या रुपात अगदी बोलताना काही संदर्भ देताना. तेव्हा आपण त्या प्रतिमेच्या प्रस्तराखाली असणा-या माणसाशी संवाद साधतच नाही आणि तरीही तो संवाद आपण खरा मानतो आणि आता आपला संवाद मात्र काल्पनिक, नाही का ? संदर्भचौकट आणि गृहीतकं बदलली की याच्या अगदी उलट होऊ शकतं किंवा आणखी काही वेगळं होऊ शकतं. चौथ्या मितीत स्थित्यंतर होऊ शकतं किंवा गवसू शकते अकरावी दिशा. शक्यतांच्या लिपीतलं अक्षरं किती अनंत आहेत ! आणि म्हणूनच स्वतःचं आभाळ शोधून चाचपडून खात्री करुन घ्यायला वाव आहे.यात एक नितांत देखणी अतर्क्यता आहे मला वाटते आणि म्हणूनच जगणं सुंदर आहे !
असो. तर आपला हा संवाद काल्पनिक/खरा या वादात मी अडकत नाही. काहीही नामाभिधान असो. कोणतीही संज्ञा असो. तसंही हा संज्ञा वितळण्याचा काळ. अंतर्विरोधाच्या सार्वत्रिकतेचा आणि त्या अंतर्विरोधाच्या ठळक मूर्त होण्याच्या या बहुरंगी काळात चकवेच चकवे! त्यात न फसता तुमच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते तरीही मार्ग काढत काढत आलो तुमच्यापर्यंत. तुमच्या वेळेवर तुमचे स्वामित्व हे खरेच पण तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळ द्याल या आशेने आलो तुमच्यापर्यंत.
शाळा-कॉलेजात फारसे कधी भेटला नाहीत तुम्ही. असेच अवांतर भटकताना भिजकी वही सापडली तुमची आणि डबडबलेल्या डोळ्यात आसमंत ब्लर्र झाला सर. फारसे कळाले नाही. दंतकथांचे दैवतकथांचे संदर्भ कळाले नाहीत पण तरीही हरवत गेलो. ‘शेवटचा अश्रू’ ही भिजक्या वहीतली कविता मी थांबलो पहिल्यांदा वाचले तेव्हा वाटले उगाच फाफटपसारा आहे हा. पुन्हा वाचले नि लक्षात आले की हे तर आधुनिक पसायदान आहे. ढ्साळांच्या ‘माण्सानं’ या कवितेची आठवण झाली. ‘मी’च्या वेलांटीचा फास सुटल्याशिवाय हे पसायदान म्हणता येत नाही पण तुम्ही ते म्हणू शकलात कारण तुम्ही त्यापल्याड पोहोचला होता. मला पुन्हा आठवण झाली तुमची.
आणि आज अचानक….
असे घडले की मला पुन्हा तुमची आठवण आली. वाटले तुम्हाला भेटण्यापूर्वी /तुमची ओळख करुन देताना परवाना घ्यावा लागणार. क्षणभर परकेपणा वाटला मला. मग वाटले अकारण भावनिक झालोय मी. अकारण की सकारण/ तार्किक की आतार्किक, ठाऊक नाही पण मला आठवलं तुम्ही म्हटला होतात-
ही वही कोरडी ठेवू नकोस
ती वही भिजण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली होतीत. अक्षरं विरघळावीत.तिचा लगदा व्हावा.
नदीकाठचं गवत खाणा-या म्हशीच्या दुधात तिचा अंश सापडावा,अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली होतीत; पण वही भिजूच नये अशी व्यवस्था केली असावं असं वाटावं अशी सारी अवस्था.(ज्यांनी असं केलं तेही तुमच्यावर नितांत प्रेम करतात सर) तुमच्या भिजक्या वहीची मालकी सांगू पाहताहेत काहीजण आणि तुम्ही तर विरघळून जाण्याच्या गोष्टी करत होता सर. समष्टीसमवेत तल्लीन होऊन जाण्याच्या. तादात्म्य होण्याच्या. आणि आज तुमच्यावरचा आमचा स्वामित्वहक्कच आम्ही गमावून बसलोत की काय, असे वाटले. जास्तच सेंटी झालो ना कोलटकर ? स्वभावच आहे. सेंटी झालो ना की कवितेशिवाय पर्याय उरत नाही डोळे पुसण्यासाठी. मी लिहिले –
“पॅंडोराच्या पेटीचंही
त्यांनी पेटंट घ्यावं
सांगावं अश्रूंवरही स्वामित्व…
मातीनं हुसकावून लावावं झाडांना
उखडून टाकावं समूळ
पुरवू नयेत प्राणतत्वं…
आई बापांनी मागावी
पोरांची कॉपीराइट
बेवारस कोर्टानं द्यावा
यथेच्छ निकाल ;
पण
पोरांनी लावूच नये
या नैमित्तिक प्रकाशकाचं नाव !”
मी ऐकले की तुम्ही बरेच काही लिहिले आहे पण ते प्रकाशात येत नाही कारण आम्हा मराठी वाचकांची परिपक्वता नाही , हे खरे का ?मला वाटतं राहिलं कोलटकर, लौकिकानं किती गृहीतकांच एक मोठं जाळं निर्माण केलंय. एक कालसुसंगत धागा असल्याचे भासवत किती बनचुकेपणानं विणलंय. कवितेतल्या गप्पा कवितेतल्याच असतात त्यापलिकडे काहीच नसते का हो ? असं सार्त्रसारखं बीइंग फॉर इट्सेल्फ असतं का हे ? मला कळत नाही. मला दोषारोपही करायचे नाहीत. मला आकळून घ्यायचंय हे सारं . असण्या नसण्याची सीमारेषेच्या अस्तित्वाची विचारपूस करायची होती इतकचं. व्यवहार तर मलाही कळतो. नव्वदनंतर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला अपरिहार्यपणे समजूनच घ्यावा लागतो; पण खरं सांगू कोलटकर समष्टीसोबत कम्पॅटिबल होता येत नाही. त्याचंच दुःख अनिवार…. ‘वामांगी’मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणं अठ्ठावीस युगाचं एकटेपण येतं कोलटकर. म्हणूनच तुमची आठवण आली.
डियर कोलटकर,
मिस यू
लव्ह यू !
शक्य झालंच तर भेटू कधीतरी एखाद्या अज्ञात अवकाश प्रतलावर….!
तुमचाच,
श्रीरंजन

(सदर लेख महाराष्ट्र टाइम्स संवाद या पुरवणीत दि. २२ डिसें २०१३ रोजी प्रकाशित झाला असून http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/27730702.cms या संकेतस्थळावर पाहता येईल. )

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

रोचक पत्र!
दिवाळी अंकाव्यतिरीक्त इथेही लिहिते झालात हे आवडले. स्वागत आहे!
मटात लेखनप्रसिद्धीबद्दल अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोण कोलटकर?

धन्यवाद !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोलटकर नावाचे एवढे एकच कवी माहीत आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा. आणखीन एक कोलटकरप्रेमी भेटल्यामुळे बरं वाटलं.

जास्तच सेंटी झालो ना कोलटकर ?

या प्रश्नाला कोलटकर 'होय' असं उत्तर देतील असं वाटतं. मला जे कोलटकर कळले आहेत त्यावरून समष्टीशी कॉम्पॅटिबल होता येत नाहीत म्हणून त्यांचे अश्रू नव्हते. अश्रू असतीलच तर आपण कॉम्पॅटिबल होण्याचा प्रयत्न करावा अशा लायकीची नाहीये साली ही समष्टी अशा दृष्टिकोनातून त्यांनी अनेक ठिकाणी समष्टीचं चित्रण केलेलं दिसतं.

असो, लिखाण करत रहा. कोलटकरांच्या कवितांचे अर्थ तुम्हाला भावले तसे समजावून सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोलटकर उत्तरंच देणार नाहीत असं वाटतं.
मला जे कोलटकर कळले आहेत त्यावरून समष्टी डेंजर वार्‍यासारखी सर्वभक्षी आणि सर्वसाक्षी आहे , तिची दिसतील तितकी रुपं दिसतील तशी कोन बदलत पाहावी असं त्यांना वाटतं असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुण कोलटकरांच्या चाहत्यांना माहिती असल्यास आवडेल म्हणून लिहितो की ते मूळचे 'कोल्हटकर'च. काही कारणाने त्यांनी आपल्या नावातील 'ह' काढून टाकून केवळ 'कोलटकर' असे लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील, भावंडे इत्यादि सर्व अजूनहि 'कोल्हटकर'च आहेत. अधिक माहितीसाठी येथे पहा. तेथे Arun VI-6 ह्या नावाने त्यांचा उल्लेख मिळेल. सोबतच्या Family Tree मध्येहि त्यांचे नाव योग्य जागी दिसेल.

त्यांच्या निधनानंतरचा दिलीप चित्रे ह्यांचा एक लेख येथे पहा. (ह्या जागेशिवाय हा लेख आता आंजावर कोठेच उपलब्ध नाही. दिलीप चित्रे ह्यांचा ब्लॉग, जेथून हा लेख घेतला होता, तो आता बंद आहे.)

(ह्या संदर्भात दिसणारे kolhatkar.org हे संस्थळ मीच बहुतांशी स्वप्रयत्नातून आणि संपूर्णपणे स्वखर्चाने ५-६ वर्षांपूर्वी निर्माण केले. जी माहिती तेव्हा गोळा झाली आहे ती तेथे आहे पण नवी माहिती दोनतीन वर्षांमध्ये आलेली नाही. संस्थळ चालवायचा मासिक खर्च मी करत असल्याने मी खर्च करीत आहे तेथेपर्यंत ते चालू राहील पण नंतर त्याचे काय होईल माहीत नाही.

सुरुवातीस मला बरेच साहाय्य अन्य कोल्हटकर बंधूंकडून मिळाले पण कालान्तराने सुरुवातीस उपलब्ध माहितीचा साठा संपल्यावर नवीन येणे जवळजवळ बंद पडले. त्याची तीन कारणे - १)माझ्याकडे तान्त्रिक ज्ञानाचा जवळजवळ अभाव. २)अंतरामुळे जाणकार आणि ह्या कामात स्वारस्य असलेल्या कोणा तरुणाची मदत मिळणे दुरापास्त. ३)मला देण्याजोगी माहिती ज्यांच्यापाशी असण्याचा संभव आहे आणि ज्यांना ह्या कामात स्वारस्य आहे अशा व्यक्ति जुन्या पिढीतील असल्याने त्यांना इंटरनेटशी जुळवून घेणे अवघड. ४) पुढील तरुण पिढीतील ह्या कामाच्या उत्साहाचा अभाव.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समष्टी म्हणजे काय?

हा शब्द इथे टाइप करून मोल्सवर्थ मधे शोधला (ज्याची लिंक इथे मेनपेजवर आहे)तर रिझल्ट नाहीत असे का लिहून येते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोल्सवर्थ मधे शोधला (ज्याची लिंक इथे मेनपेजवर आहे)तर रिझल्ट नाहीत असे का लिहून येते?
..............१. कारण 'समष्टी' असा शब्द त्या कोशात नाही म्हणून; २. कारण समष्टि असा शब्द शोधला नाहीत म्हणून.
हा घ्या मोल्सवर्थमधील तपशील -

समष्टि [ samaṣṭi ] f S Comprehended or comprised state; the state of being gathered up into and of consubsisting with. समष्टि is contrad. from व्यष्टि; e.g. in the Deity, viewed as the one eternal substance of which the universe is only the ramification or diversified representation, is समष्टि Inclusion of all things; whilst in Man (and in any other animal or in any inanimate thing), viewed as consisting of the substance of the one Substance and Soul of the universe, and as co-serving together with all the other animals and things (all these diversified existencies being but diversified exhibitions of the Deity) to compose and constitute this Substance, is व्यष्टि Inherence severally and pervasively. Man at this same time, or any other animal or any thing, viewed as expressing the comprehension of the members, parts, or particulars composing him or it, is an example of समष्टि. Briefly--in every totality or whole viewed as the sum of its parts is an example of समष्टि; and in every part viewed as co-serving to constitute a whole is an example of व्यष्टि. See further under व्यष्टि. Ex. from विवेकसिंधु--ईश्वरोपाधि समष्टि जीवोपाधि व्यष्टि.

----
समष्टि (संस्कृत) = collective existence, totality असा अर्थ घासकडवींना इथे अभिप्रेत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0