कार्यकर्ता

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमचा हक्क आहे ह्या घोषणांनी कोटमगावचा परिसर दणाणून गेला होता. प्रकाश कांबळे ह्या तरुणाच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता . प्रकाश कांबळे हा दलित तरुण शिक्षणासाठी मुंबईला राहून आला होता.

वडाळ्याच्या आंबेडकर कोलेजात असताना त्याचा दलित चळवळीशी संबंध आला. त्या चळवळीचे आक्रमक रूप, आंबेडकर साहेबां प्रती असलेला आदर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध्चा असंतोष पाहून छोट्याश्या गावातून आलेला हा दलित तरुण भारावून गेला. गावात असताना आपण जयभीमवाले आहोत आपली पायरी सोडून वागता कामा नये ह्या परंपरेत वाढलेला हा तरुण दलित चळवळीचे शहरातील आक्रमक रूप पाहून भारावून गेला. त्यांच्या मिटिंग, भाषणे, चर्चासत्र ह्यात गुंतून तो कधी चळवळीत ओढला गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही.

शिक्षण संपले प्रकाश हा बीएला प्रथम वर्गात आला पण इतरान प्रमाणे नोकरी न करता बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घ्यायचे त्याने ठरवले. बाबासाहेबांनी सांगितलेले 'सत्ताधारी बना' हे वाक्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्य्याचे प्रकाशने ठरवले तो आपल्या गावी परतला. गावाबाहेर जी बौद्धवाडी होती त्यात त्याचे घर होते. स्वातंत्र्य मिळून साठच्यावर वर्षे होवून गेली तरी आपण मात्र गावाबाहेर. तो स्वताशीच हसला.

'बाबासाहेबांनी देशाला स्वातंत्र्य, बंधुता, समता ह्यांनी प्रेरित असलेली घटना दिली मात्र गावखेड्याकडे ह्यातील काहीही पोहचले नाही. जे गाव सोडून शहरात गेले त्यांचा विकास झाला ते वर्ष दोन वर्षातून गावी येतात आपला रुबाब दाखवून जातात त्यांना समाजाशी काहीही घेणे देणे नसते. मी भला, माझी नोकरी भली नि माझी पोर भली सहा डिसेम्बरला एकदा चैत्यभूमीवर वंदन करून आले कि बाबासाहेबांचे ऋण फेडले ह्याच भ्रमात हे लोक असतात बाबासाहेबांनी सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला घटनेच्या माध्यमातून सर्वाना समानतेच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पण आज मात्र त्यांच्याच समाजातला शिकलेला नि स्थिरावलेला मोठा वर्ग हा पांढरपेशा उच्चवर्णीय झालेला आहे.आज बाबासाहेबांच्या चळवळीचे फायदे बौद्ध समाज सोडून इतरही दलित समाज मोठ्या प्रमाणावर घेतोय पण दलित चळवळीत सामील व्हायला त्यांना लाज वाटते. बाबासाहेबांचा अनुयायी म्हणजे जयभीमवाला हे जे समीकरण रूढ झालेय ते त्यांना नकोय.

आपण राजकारणात पडायचे असे प्रकाशने ठरवले त्याने गावातल्या तरुणांची एक संघटना बांधली घरोघरी जावून लोकांना आपापसात एकी ठेवण्याचे आवाहन केले ह्यावेळची आंबेडकर जयंती दणक्यात करायचे त्याने ठरवले घरोघरून वर्गणी गोळा केली गेली. आपले मुंबईतले कॉन ट्याक्ट वापरून प्रकाशने एका मोठ्या दलित नेत्याला गावात आणण्याचे ठरवले नेता गावी यायला तयार झाला एवढा मोठा नेता आपल्या गावी येतोय नि प्रकाश त्याला आपल्या जिल्ह्यात घेवून येतोय हे पाहून गावात तालुक्यात प्रकाशचे नाव झाले.

प्रकाश हा जरी कोठल्याच पक्षात नव्हता तरी त्याने जे मंडळ स्थापन केले त्याचा तो अध्यक्ष होता पंचशील मित्र मंडळ ह्या मंडळातर्फे आंबेडकर जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. मुंबईहून आलेल्या नेत्याचे भाषण झाले त्याने प्रकाशचे कौतुक केले व त्याला आपल्या पक्षात येण्याचे जाहीर आवाहनही केले. प्रकाश त्याच्या पक्षाशी जोडला गेला. निवडणुकींचा हंगाम आला जो तो आपापला स्वार्थ साधण्यासाठी पक्षबदल करू लागला तिकीट नाकारताच पक्ष सोडून दुसर्या पक्षात जाणार्यांचे पिक आले. ह्या सर्व धामधुमीत प्रकाशच्या पक्षनेतृत्वाने सत्ताधारी पक्षांबरोबर युती केली पाच जागा त्यांच्या वाट्याला आल्या. प्रकाश ह्यांच्या मतदारसंघात त्याला उमेदवारी मिळाली.

प्रकाशने जोरदार प्रचार केला आपल्या प्रचारात तो आंबेडकर, बुद्ध ह्यांच्या वचनांची पेरणी करे त्याचे वकृत्व उत्कृष्ठ असल्याने त्याच्या सभांना गर्दीही चांगली होत असे. सत्ताधारी पक्षाचा त्यांच्या पक्षाला पाठींबा होता तरी हि सीट प्रकाशच्या पक्षाला सुटल्याने सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते नाराज होते. निवडणुकांचा निकाल लागला. प्रकाशचा पक्ष पाचही सीट हरला. खुद्द त्यांच्या नेत्याचाही पराभव झाला. मात्र सत्ताधारी पक्ष हा पुन्हा निवडून आला नि त्यांचे सरकार बनले. प्रकाशच्या नेत्याला विधानपरिषदेवर घेण्यात आले.

प्रकाश मात्र झाल्या प्रकाराने अस्वस्थ होता. तो आपला पक्ष नि आपण का हरलो ह्याचा विचार करू लागला.त्याच्या लक्षात आले सत्ताधारी पक्षाची नि आपली युती झाली जेथे सत्ताधारीपक्षाचे उमेदवार होते तेथे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचारही केला नि आपल्या पक्षाची विचारधारा मानणाऱ्या जनतेने त्यांना मताचे दानहि केले मात्र जेथे आपले उमेदवार उभे केले गेले होते तेथे आपल्याला ना त्यांच्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली ना जनतेची. वरून निवडणुका झाल्यावर आपल्या पक्षाला चुचकारण्यासाठी विधानपरिषदेची सीट देण्यात आली. नि वर्षानुवर्षे हाच प्रकार चालू होता .निवडणुकीत पडल्यामुळे प्रकाशला त्याच्या तोंडावर तर कोणी काही बोलत नव्हते मात्र त्याच्या पाठीमागून त्याची टिंगल केली जात असे.

हे जर राजकारण असेच चालले तर आपण कधीच सत्तेत येवू शकत नाही हे प्रकाश समजला. विरोधात राहून ह्या व्यवस्थेशी लढण्यात काही अर्थ नाही, व्यवस्थेत शिरूनच लढा द्यायला हवा असे त्याच्या मनाने घेतले. आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर सत्तेत जाने सत्तेत राहून लढा देणे हाच एक उपाय असल्याचे त्याला वाटले. आपण कितीही समजत असलो तरी बहुसंख्य लोक हे जातीवर आधारित मतदान करतात हे प्रकाशने हेरले. आपण कितीही हुशार असलो तरी मत देताना लोक आपली जात बघतातच. त्यामुळे प्रकाशने सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले. त्याने आपल्या पक्षाचा राजीनामा दिला नि तो सत्ताधारी पक्षात विना अट सामील झाला.

निवडणुका होवून गेल्या होत्या. आता प्रकाश हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बनला होता त्यामुळे तो आपसूकच आंदोलने, चळवळी ह्या पासून दूर होत गेला व सरकार विरुद्ध आंदोलन करणर्या पक्षांचे कसे चुकतेय, सरकार जनहितासाठी किती काम करतेय ह्याविषयी सरकारची बाजू हिरहिरीने मांडू लागला. स्वतावरचा दलित कार्यकर्त्याचा शिक्का मिटवण्यात त्याने प्रयत्नपूर्वक यश संपादन केले आता तो सत्ताधारी पक्षातला आघाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जावू लागला. निवडणुका जाहीर झाल्या सत्ताधारी पक्षातर्फे निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्याने सारे उपाय वापरले नि त्याला एकदाचे तिकीट मिळाले. निवडणुका पार पडल्या निकाल लागला प्रकाश कांबळे बहुमताने निवडून आला.

त्याची मिरवणूक निघाली कार्यकर्ते त्याच्या नावाचा जयघोष करत होते. मिरवणूक आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे थांबली. प्रकाशने बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. सारा गाव घोषणांनी दुमदुमून गेला प्रकाश मात्र बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत सत्तेमार्फत समाजावरील अन्याय दूर करण्याची मनोमन प्रतिज्ञा करत होता.

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पूर्ण वाचू शकलो नाही. अस भरपूर मटेरीअल वाचाल आहे. नवीन ते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मी भला, माझी नोकरी भली नि माझी पोर भली

या पॉलिसीमध्ये मला तरी गैर वाटत नाही काही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

क्रमशः आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मोठा दलित नेता म्हंजे तुम्हाला रामदास आठवले म्हणायचय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी