अथ: वांगे पुराण

७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत ‘थालीचे बैंगन ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही. वांगे ही एकच भाजी आहे जिच्या डोक्यावर छत्र अर्थात मुकुट असते म्हणून वांग्यांना वांग्यांना भाजीचा राजा ही म्हणतात.

वांगे विकत घेताना: वांगे काळसर, जांभळे, हिरवे आणि विदर्भात पांढऱ्या रंगाचे ही मिळतात. वांगे मोटे-ताजे गोल-मटोल, लहान-लहान किंवा लांब आणि पातळ स्वरूपात मिळतात. वांग्यात बिया जास्त असेल तर वांगे स्वादिष्ट लागणार नाही. शिवाय ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच त्या मुळे मी ढाब्यात वांग्याची भाजी खायचो टाळतोच. वांगे विकत घेणे ही एक कला असते. आमची सौ. या बाबतीत तरबेज आहे. तिने सर्वांनाच भाज्या कश्या निवडाव्या ह्याचे उत्तम प्रशिक्षण अर्थात मलाच दिले आहे. प्रथम वांगे ताजे दिसत आहे कि नाही पाहावे. वांग्यांना चमक देण्यासाठी तेल तर नाही लावले हे ही पाहावे लागते. मग छिद्र तर नाहीना हे बघावे. जास्ती वजन म्हणजे जास्त बिया. त्या साठी दोन वांग्यांना वेगवेळ्या हातात घ्यावे. हलके वांगे निवडावे. बाजारात जर वांग्यांना २० रु आणि २५ रु. भाव असेल पण एका किलोत चार एवजी सहा वांगे मिळत असेल तर २५ रु. मोजणे फायद्याचाच सौदा ठरेल. सर्व प्रकारचे वांगे याच पद्धतीने निवडावे. तशी ही पद्धत बिया असलेल्या सर्व भाज्या विकत घेताना सोयीची ठरते. ढोबळी मिरची तशीच महाग असते. ह्या पद्धतीने निवडल्यास जास्त मिरच्या हाती येतील. अर्थात दुकानदार तुमच्या कडे वाकड्या नजरेने पाहिल हे ठरलेलेच.

सौ. वांग्याची भाजी चिरत असतात, आमची स्वारी जर घरी असेल अर्थात या ना त्या (?) कारणाने स्वैपाकघरात डोकवणारच. एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून त्यात चाट-मसाला नाजूक हाताने भरविल्यास हा! हा! हा! काय स्वादिष्ट लागतात, सांगणे न वेगळे.

आमची आई ही वांग्याच्या रायता मस्त बनवायची. शेगडीवर वांग्याला तेल लाऊन मस्त भाजायची. गोड दही (दिल्लीत दही गोडच मिळते) किंवा गोड न मिळाल्यास थोडी साखर टाकून, फेटून घायचे. मग आई भाजलेले वांगे सोलून चार भाग करायची. मध्ये असलेल्या बिया मोठ्या सफाईने चमच्याने अलगद काढायची. असे बिया नसलेले वांग कुस्करून आधीच फेटून ठेवलेल्या दह्यात घालायची. त्यात कांदे- टामोटो बारीक चिरून भरपूर कोथम्बीर सहित टाकायची. मग मोहरी, हिंग व हिर्व्यामिर्चीची फोडणी त्यात घालायची. मस्त आणि स्वादिष्ट असा रायता आम्ही मिटक्या मारून खायचो.

वांग्या वरून आठवले, लहान असतात आम्ही सुट्टीत नागपूरला जात असो, तेंव्हा आजी एक गोष्ट नेहमीच सांगायची, आता पूर्ण आठवत नाही तरीही एका राजाला चार बोबड्या राजकन्या होत्या. एकदा त्याने प्रधानाला घरी जेवायला बोलविले. राजकन्यांना सक्त ताकीद दिली. कुणीही तोंड उघडायचे नाही. जेवताना प्रधानाच्या लक्षात आले, सर राजकन्या चिडीचूप आहे. त्याला वाटले या मागे काहीतरी काळबेर नक्की असावं. बायकांना त्यांची स्तुती आवडते. प्रधानाने वांग्याच्या भाजीची स्तुती करत म्हंटले आमच्या हिला तर वांग्याची भाजी करताच येत नाही अहाहा एवढी स्वादिष्ट भाजी कशी केली. एका राजकन्येला राहवले नाही तिने म्हंटले ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’ राजकन्यांचे बिंग फुटले. (पूर्ण गोष्ट लक्षात नाही आहे. कुणाला माहित असेल तर पूर्ण गोष्ट पुन्हा वाचायला मजाच येईल. [कदाचित! ही लोककथा विदर्भातील असावी]). पण एक मात्र खरं, वांग्याच्या भाजीला काही ही लागत नाही. भरपूर तेल, हिंग, गुळ, हिरवी मिरची आणि गोडामसाला किंवा गरम मसाला टाकले तरी स्वादिष्ट भाजी तैयार होते. बाकी भरलेले वांगे बहुतेक सर्वांनाच आवडतात.

कुठल्या ही पदार्थाची शोभा वांग्या मुळे वाढतेच. तसं सर्वांनाच अनुभव असेल नेहमी बनविताना वांग्याच्या भाजीत बटाटे बायका टाकतातच. अर्थात बटाटे पोर खातात आणि वांगे मोठ्यांच्या नशिबी येतात. विदर्भात वांगे भात हा प्रकार ही प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात,संभार मध्ये केवळ वान्गेच आढळण्याची शक्यता जास्त. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच.

काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. यात जास्त करून मुंबई- पुण्यातले नखरेल पोर असतात. अशीच एक मुंबईकर चिमुकली उन्हाळ्यात घरी आली होती. वांगे पाहतात म्हणाली, मावशी मला वांगे आवडत नाही. आमची सौ. काही कमी नाही. सकाळी पाहटे नाश्त्यात वांग्याचे धिरडे बनविले. वांग्याचे साल काढून वांग किसून बेसन व कणकीच्या पिठात (२:१) मिसळले त्यात बारीक कापलेले, - कांदे- टामाटो, हिरवी मिरची व नेहमी प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकली. पतंजलीच्या टमाटो सॅास बरोबर तिने मिटक्या मारत धिरडे खाल्ले. (वांग्याला भाजून ही धीरड्याच्या पिठात मिसळता येत) अर्थातच पुढे वांग्याची भाजी खायला ही ती शिकली.

शेवटी आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.

field_vote: 
3.833335
Your rating: None Average: 3.8 (6 votes)

प्रतिक्रिया

छान!
वांगे नी त्याचे सगळे प्रकार माझे आवडीचे आहेत.
A. काळा(गोडा) मसाला /गरम मसाला + B.दाण्याचं कुट/तिळाचं कुट/खोबरं यांच्या कोणत्याही काँबिनेशनने भरलेली 'भरली वांगी'
किंवा
भरताचे वांगे चुलीवर/गॅसवर खरपूस भाजून केलेले भरीत\
किंवा
काटेरी वांग्यांचे काप करून केलेली भजी
किंवा
काटेरी वांग्यांचे काप करून पिठ पेरून केलेली फर्मास भाजी
किंवा
चकचकीत जांभळ्या वांग्याचा मालवणी रस्सा
किंवा
चीज-वांगी असलेली एक परकीय डिश खाल्ली होती, ती - नाव विसरलो!

अह्हाहहाह्ह्हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चीज-वांगी असलेली एक परकीय डिश खाल्ली होती, ती - नाव विसरलो!

हे एगप्लांट पार्मेजान (उच्चार?) असावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

नव्हे. एग्प्लांट पार्मेझान बरोबर रेड सॉस येतो, मला मुळातच रेड सॉस कमी आवडतो नी या प्रकारात पहिल्या ८-१० घासांनंतर ती चव 'अती होते'.

मी खाल्लेल्या पदार्थात वांगे असलेले कळत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(पूर्ण गोष्ट लक्षात नाही आहे. कुणाला माहित असेल तर पूर्ण गोष्ट पुन्हा वाचायला मजाच येईल. [कदाचित! ही लोककथा विदर्भातील असावी]).

ती गोष्ट अशी असावी:
एका राजकन्येला राहवले नाही तिने म्हंटले ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’
दुसरी म्हणाली, "ती भाई मी केई!!"
तिसरीने उत्तर दिले, "तुया बोयु नको असे सांगितये ना?"
चवथी चिडून म्हणाली: "ती बोययी ती बोययी, तू का बोययी?"
अशा प्रकारे चारी राजकन्यांच्या बोबडेपणाचे बिंग फुटले.

(चूक भूल असण्याची शक्यता आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वांगे पुराण आवडले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...या वाक्प्रचाराचा उगम आत्ता कळला. (इतकी उभीआडवी भरली असतील, असे वाटले नव्हते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे वांगे पुराण. फक्त मुंबईपुण्याच्या पोरांना उगाच जाता जाता लाथ मारलेली पाहून थोडा फणकारा आला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फक्त मुंबईपुण्याच्या पोरांना उगाच जाता जाता लाथ मारलेली पाहून थोडा फणकारा आला.

लाथ मारणे हे 'स्थितप्रज्ञ'लक्षण आहे, विसरलात वाटते? (आठवा: 'तुझे आहे तुजपाशी'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळ आणि केळीची साल खाऊन लाथ मारणे हे लक्षण आहे.

टिप - दोन अवांतर श्रेण्या मिळाल्यावर ० शून्य अवांतर श्रेणी असे दिसते. मी फक्त प्रयोग म्हणून अवांतर श्रेणी दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळ आणि केळीची साल खाऊन लाथ मारणे हे लक्षण आहे.

'आम्हां समान ते चित्ती' न्यायाने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आम्हां समान ते चित्ती' न्यायाने?

बरोबर काकाजी Smile , पण असे दिसते की कुणा स्थितप्रज्ञाला माझा प्रतिसाद भडकाऊ वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त मुंबईपुण्याच्या पोरांना उगाच जाता जाता लाथ मारलेली पाहून थोडा फणकारा आला.

जे धड मुंबैचेही नाहीत अन पुण्याचे तर नाहीच नाहीत, त्यांना फणकारा आल्याचे पाहून अंमळ मजा वाटली.

(बिगरमहानगरी जनसागरातील एक बिंदू) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटू, कितींदा सांगायचे तुला? मुंबईपुण्याचे लोक ही जनरल शहरी जनतेसाठी असलेली एक तुच्छतापूर्ण संज्ञा आहे. प्रत्यक्ष भौगोलिक सीमा तिथे फारशा महत्त्वाच्या असत नाहीत. असो. मुंबईपुण्यामिरजेची पोरं.. असं असतं तर फणाकारलास्तास्किनाई?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जर मिरजेचा प्रत्यक्ष उल्लेख असता तर होय, फणकारलो असतो. पण जण्रल शहरी जन्ता ही याच शहरांत नस्ते. टायर-२ शिटीज लैक कोल्लापूर, सांगली, औरंगाबाद, सोलापूर, इ. चा उल्लेख केल्याशिवाय शहरी जन्ता पूर्ण होत नै. झालंच तर नाशिकही त्यातच. त्यामुळे ती संज्ञा तुम्हांला वाटते तितकी डिफ्यूज नाहीये. अन विदर्भातली जन्ता बिगरविदर्भीयांना 'तुम्ही पुण्यामुंबैचे लोक' असेच म्हणते (जसे सर्व सौदिंडियन हे मद्राशी असतात.) हेही तितकेसे खरे नसल्याने तो उल्लेखही बादच Wink

इन समरी, तो उल्लेख अरुणजोशींच्या भाषेत बोलायचे तर ८०% वेळेस तरी अचूकच असतो.

त्यामुळे फणकार्‍याचे कारण समजले नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरं चल. मला कंटाळा आला यावर वाद घालायचा. आला मला विनाकारण फणकारा. बास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आला मला विनाकारण फणकारा.

ओक्के, पण मग

बास?

ही पृच्छा कशासाठी? नै म्ह. "ना रहेगा बाँस, ना बजेगी बासुरी" याच्याशी रिलेषण असेल तर बास/बाँसची पृच्छा करण्याचे कारण कळाले नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिक्रिये बद्धल सर्वाना धन्यवाद. बाकी मोठ्या शहरातील पोर नखरेल असंतात मय-बाप त्यांचे नखरे पुरवू शकतात म्हणून मुंबईचा उल्लेख केला. अन्यथा न घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुराण आवडलं.

वांग्याचे काप हा प्रकार वेळखाऊ आणि घरात धूर करणारा असला तरी सोपा. म्हणजे मी बनवलेले काप खाऊन पूर्वीचे घरमित्र मला सुगरण वगैरे समजायला लागले होते. त्यांची इतर कोणा भारतीयाशी, एवढी चांगली मैत्री नाही म्हणूनही असेल. पण आपण कशाला हे त्यांना सांगा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेत म्हण्जे यू एस ऑफ ए मध्ये (जर बारबेक्यूची सोय नसेल तर) ग्यॅसवर वांगे भाजून त्याचे भरीत करायला परमिशन असते का? की तिथले फायर अलार्म कोकलायला लागतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी केलेले आहे. अजिबात अलार्म वाजला नाही.

फार कशाला, नवीन (म्हणजे दोनतीन वर्षाचा, अमेरिकावतरण शक) असताना, एकदा उत्साहात ग्यासखालच्या ओव्हनमध्ये भरताकरिता वांगे भाजायला ठेवून विसरून गेलो होतो. (शिवाय, नक्की आठवत नाही, पण वांग्याला दोनतीन छेद द्यायलासुद्धा बहुधा विसरलो होतो; चूभूद्याघ्या. अमेरिकेतच नव्हे, एकंदरीत स्वयंपाकालाही नवीन होतो; खोटे कशाला बोला?) कालांतराने अर्थातच ओव्हनमध्ये वांग्याचा स्फोट होऊन चिखल झाला. मात्र, मुद्द्याची गोष्ट, स्मोक डिटेक्टर कोकलला नाही.

------------------------------------------------------------------------------

मात्र, घरात ग्यासवर वांगे भाजता येण्याकरिता स्मोक डिटेक्टर जरी आड आला नाही, तरी घरात त्याकरिता मुळात ग्यासची शेगडी असणे परमावश्यक आहे - 'कासवछाप'चे (बोले तो, इलेक्ट्रिक कॉइल) ते काम नोहे, आणि - अपार्टमेंटांमध्ये असली लक्झरी सापडणे तसेही दुरापास्तच, पण - फ्ल्याटटॉप शेगडीचे तर नोहेच नोहे - असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

आमच्याकडे जॉर्जियात अपार्टमेंटांमध्ये सहसा ग्यासच्याच शेगड्यांकडे कल पाहिलेला आहे. (घरवाल्यांतसुद्धा बहुधा ग्यासकडेच कल असावा, असे वाटते; पैसेवाले आणि/किंवा स्वतःस उगाच हायफाय समजणारे असतील, तर क्वचित फ्ल्याटटॉप.) क्यालिफोर्नियात मात्र (बहुधा 'मॉडर्नपणा'च्या नावाखाली; चूभूद्याघ्या) 'कासवछाप'चा सुळसुळाट होता, असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Indian store मधे फुलके करण्यासठी जी जाळी मिळ्ते तीच्या वर मी वांगी भाजण्याचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. मात्र स्मोक डिटेक्टर चा चांगलाच आड येतो. कासव छाप चा त्रास आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्यासखालच्या ओवनमध्ये वांगे ठेवताना त्याला अ‍ॅल्युमिनियम फॉइलने झाकल्यास स्फोट (झालाच तरी) मर्यादित राहतो!

वांग्यास छेद देऊन त्यात लसूण भरावेत. अशा पद्धतीने शिजवलेल्या वांग्याचे भरीत करताना सालीसकट वापरावीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्यासखालच्या ओवनमध्ये वांगे ठेवताना त्याला अ‍ॅल्युमिनियम फॉइलने झाकल्यास स्फोट (झालाच तरी) मर्यादित राहतो!

...आमच्याकरिता दुर्दैवाने ही कदाचित आता पश्चात्बुद्धी ठरते.

(त्या 'बालपणी'च्या एका प्रसंगानंतर घरात पुन्हा स्फोट झालेले नाहीत. मला वाटते वांग्यास छेद दिल्यास बहुधा आत प्रेशर बिल्डप होत नसावे. पण कंट्रोल्ड एक्स्प्लोजनची कल्पना वाईट नाही. बटाटे भाजण्यासाठी (बेक्ड पटेटो) हीच पद्धत (कदाचित वेगळ्या कारणांकरिता) वापरतात, नाही?)

अशा पद्धतीने शिजवलेल्या वांग्याचे भरीत करताना सालीसकट वापरावीत!

'अशा पद्धतीने' बोले तो, 'फॉइल लावून' काय? कारण, फॉइल न लावता भाजल्यास साल कडक पडते. फॉइल लावल्यास ती तशी पडत नाही काय?

(पुढील वेळी प्रयोग करून पाहावयास हवा.)

-----------------------------------------------------------------------------

अमेरिकावतरण शक. (अर्थात, नया था मय!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अशा पद्धतीने' बोले तो, 'फॉइल लावून' काय? कारण, फॉइल न लावता भाजल्यास साल कडक पडते. फॉइल लावल्यास ती तशी पडत नाही काय?

होय. नुसते फॉइलच नव्हे तर, फॉइल लावण्यापूर्वी वांग्यावरून तेलाचा हात फिरवायचा. अशाने साल करपत नाही आणि साल भरीतात वापरता येते.

असे करण्याचे फायदे दोन.
१) एडिबल मास वाढते.
२) सालीत काही पोषक द्रव्ये (असलीच तर) मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्यासखालच्या ओवनमध्ये

इथे ओवन म्हणजे नक्की काय? भट्टी की गॅसची शेगडी? काहीही असले तरी 'गॅसखालचा ओवन' म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही असले तरी 'गॅसखालचा ओवन' म्हणजे काय?

अम्रिकेत वर चूल आणि खाली भट्टी असे एकत्रीत उपकरण मिळते. जेणेकरून जागा वाचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वांगी हे स्त्रीलिंगी आहे ना?ती वांगी मग त्यांना भाज्याची राणी मानली पाहिजे.

खास वांग्यावरती एवढा मोठा लेख लिहलात यासाठी कौतुक करावे तेवढे थोडेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

वांगी हे स्त्रीलिंगी आहे ना?

बहुधा नाही. "ते" वांगे, असा शब्दप्रयोग ऐकला/केला आहे.

"ती" वांगी हे "ते" वांगे याचे अनेकवचन असावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजारात जर वांग्यांना २० रु आणि २५ रु. भाव असेल पण एका किलोत चार एवजी सहा वांगे मिळत असेल तर २५ रु. मोजणे फायद्याचाच सौदा ठरेल.

फंडा नाही कळला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिया कमी असल्यास वांगी हलकी असतील आणि १किलोत जास्त येतील.

पण मला वाटत देठांच वजन यात गृहीत धरलेल नाही. ४ देठांऐवजी ६ देठांचे पैसे देतोय :-D.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिया कमी असल्यास वांगी हलकी असतील आणि १किलोत जास्त येतील.

हम्म्म... आता कळले.

म्हणजे, वांगी जास्त झाल्याने फरक पडू नये (भरली वांगी किंवा बघारे बैंगन यांसारखे 'इंडिव्हिज्युअलिष्टिक' प्रकार करायचे असल्याखेरीज) - कारण शेवटी त्या सगळ्या वांग्यांचा एकच लगदा होणार आहे, नि त्या लगद्याचे वजन तितकेच भरणार आहे.

मात्र, बिया कमी झाल्याने त्या लगद्यातील 'एडिबल मास' वाढेल, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

(धन्यवाद.)

पण मला वाटत देठांच वजन यात गृहीत धरलेल नाही. ४ देठांऐवजी ६ देठांचे पैसे देतोय (दात काढत).

पॉइंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

८०च्या दशकात (बहुतेक बालचित्रवाणीवर) एक मस्त अॅनिमेशन पाहिलेल. 'कंजुस बनिया देखो कल्लुमल शाह' असं टायटल गाणं होत. शाह वांग्याच्या शेतातून जात असतो. मस्त वांगी घरी घेऊन जावेसे वाटते. पण परवानगी घ्यायला अजुबाजुला कोणी दिसत नाही. मग तो बुजगावण्याला विचारुन वांगी तोडुन घेतो. रोज हेच. मग एक दिवस मारका बैल त्याच्या मागे लागतो. शाह पळतपळत नारळाच्या झाडावर चढुन बसतो. बैल निघुन गेल्यावर खाली उतरताना फाटते. मग १००० ब्राह्मणांना जेऊ घालेन, ५००-१००-१० करत करत खाली पोहचेपर्यँत १ब्राह्मण होतो. मग तो गरीब ब्राह्मण सौ शहांना उल्लु बनवून भरपुर दक्षीणा लाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तो गरीब ब्राह्मण सौ शहांना उल्लु बनवून भरपुर दक्षीणा लाटतो.

कुठला ब्राह्मण?

१००० काय नि ५०० काय नि १ काय, सगळे बोलाचेच ब्राह्मण होते ना? मग हा खराखुरा हाडामांसाचा गरीब ब्राह्मण (मध्येच) कुठून उपटला?

(फॉर द्याट म्याटर, सौ. शहा तरी [गोष्टीत अचानक] कुठून उपटल्या?)

----------------------------------------------------------------------------------------

(व्याकरणाविषयी अवांतर चौकशी:

बैल निघुन गेल्यावर खाली उतरताना फाटते.

येथे 'फाटणे' या क्रियापदाचे 'धोतर' हे कर्म अध्याहृत असावे काय?)

----------------------------------------------------------------------------------------

(अतिअवांतर शंका - पुन्हा व्याकरणाशी संबंधित:

येथे 'फाटणे' या क्रियापदाचे 'धोतर' - किंवा जे काही असेल ते - हे नक्की कर्म, की कर्ता? नेमके काय? येथे 'फाटणे' हे क्रियापद सकर्मक मानायचे, की अकर्मक? आणि समजा 'धोतर' - किंवा जे काही असेल ते - हे जर 'फाटण्या'चे कर्म असेलच, तर - व्याकरणाच्या दृष्टीने - कर्ता नेमका कोण?)

----------------------------------------------------------------------------------------

(अतिअतिअवांतर: 'बम फटना' या हिंदी(?) वाक्प्रचाराने आम्हांस - का कोण जाणे, पण - नेहमीच हसू अनावर होत आलेले आहे.)

----------------------------------------------------------------------------------------

खरे तर धेडगुजरी - किंवा, पोलिटिकली करेक्ट टर्म्समध्ये बोलायचे, तर मिश्रभाषीय. फक्त, पहिली (आंग्लभाषीय) टर्म ही तद्भव की तत्सम, एवढाच वादाचा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सौ शाह आणि गरीब ब्राह्मण आधीपासुनच असतात. सुरुवातीला बनिया सोन्याची नाणी मोजुन जमीनीखालच्या तिजोरीत ठेवतो. मग घराबाहेर जाताना बायको राशनसाठी पैसे मागते तर देत नाही. वाटेत गरीब ब्राह्मण कुटुंबाच घर लागत. तो काहीतरी पुजा वगैरे करायच सुचवतो तर बनिया त्याला उडवून लावतो. नंतर वांग्याच शेत येत... बैल एपिसोडनंतर तो खरंच १ ब्राह्मणाला जेवायला बोलवतो. तसा प्रामाणीक असतो. वांगीपण बुजगावण्याला विचारुनच घेतो Wink
'फाटते' हिँदी अर्थानेच वापरलं.
वांगी फक्त कृष्णाकाठीच येतात का? झाड नारळाच असत की खजुरच आठवत नाहीय. पण उंच असत त्याशिवाय फाटणार कशी Biggrin
अरे हे कार्टुन पाहिलय का अजुनकोणी? मी युट्युबवर शोधायचा प्रयत्न केला, पण मिळाले नाही. क्वालीटी खूप चांगली होती त्या अॅनिमेशनची (सुरज एक चंदा एक तारेँ अनेक पेक्षा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृष्णाकाठच्या वांग्याच्या मळ्यात कोकण किनारीचे नारळाचे झाड कुठून आले, अशी एक अवांतर (भौगोलीक) शंका मनात आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँनिमेशन फिल्म ती पण वांगी,बुजगावणी आणि ब्राम्हणांबद्दल असेल तर त्त्यात कितपत नवी बाजू शोधावी हा गहन प्रश्न आहे.

अँनिमेशन फिल्म मध्ये जे काही फाटायच असेल ते दाखवल गेल असेल.

अवांतर- अशा फिल्म साठी वेगळा सेन्सार बोर्ड असत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अँनिमेशन फिल्म ती पण वांगी,बुजगावणी आणि ब्राम्हणांबद्दल असेल तर त्त्यात कितपत नवी बाजू शोधावी हा गहन प्रश्न आहे.

नवी (/ 'न'वी) बाजू कुठली? काही अवांतर शंका आल्या, त्या विचारून घेतल्या, इतकेच.

अँनिमेशन फिल्म मध्ये जे काही फाटायच असेल ते दाखवल गेल असेल.

रीळ?

अवांतर- अशा फिल्म साठी वेगळा सेन्सार बोर्ड असत का?

सेन्सॉर बोर्डाचे तेथे काय काम? सेन्सॉर बोर्ड फिल्मा कापते, फाडत नाही काही. (किमानपक्षी, ऐकलेले तरी नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Ok sorry. उगाच टर उडवायची म्हणून निरर्थक प्रतिसाद दिली होता. बाकि चालूदे.

अस्मि यांनी स्टोरी सांगताना खूप गडबड करून लिहल आहे त्यामुळे कोण नारळाच्या झाडावरून काय फाटत कस उतरल ,मध्येच ब्राम्हण कुठून आला ,सौ शहाना कस फसवल. कशाचा कशाशी मेळ लागत नाही.

ऐशीच्यी दशकात भारतात अँनिमेशनही आजच्यासारख फ्लूएंट नसाव त्यामुळे गोंधळ झाला असावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!