जुनी ओळख

बारच्या एका कोनाड्याकडे
अर्धवट दिव्याच्या झोताबाहेर
खांदे पाडून, अवघडून
गळ्यापर्यंत खेचून कोटाचा झिपर
दोन्ही हातात धरलेली बियर
चाखतचाखत, नसलेल्या चष्म्यातून
गढूळ नजरेने इकडेतिकडे
मधूनच बघत, पण बहुतेक करून
ग्लास धरणारी बोटे निरखत
चापलेचेपले केस नीट करून उगाच
कोणीतरी आपल्याशी बोलेल
अन् आपली ओळख काढेल
अशा आशेने
एकटाच
तो मला बसलेला दिसला.
पण मी माझ्या मित्रांबरोबर होतो.
आणि नाहीतरी मी मुद्दामून गेलो असतो
म्हणा, आणि काहीतरी बोललो असतो,
तर तो गुदमरला असता,
घुमाच राहिला असता.
ही माहिती होती मला त्याची.
जुनी ओळख आहे त्याची-माझी.

field_vote: 
3.714285
Your rating: None Average: 3.7 (7 votes)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बारच्या' पासून सुरू होऊन पहिल्या पूर्णविरामाबरोबर संपणारा 'tunnel effect' विशेषकरून आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सहीच.कांदा खाऊन ४ स्टार दिले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

faarach maarmeek neereekshan!!! AAvadalee. daya aalee Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेल्वे trackच्या एका कोपर्यात
पहाटेच्या फिकट प्रकाशात
एक हात खांद्याच्या मागे घेऊन
गुडघ्यापर्यंत चड्डी खेचून
अवघडून कुत्र्यांना घाबरत
एका हात फुटक्या लाल टमरेलवर
तो नसलेल्या चष्म्यातून
गढूळ नजरेने towerकडे पाहत
पण बहुतेककरून कुत्री
जवळ येणार नाहीत
यावर लक्ष केंद्रित
कोणीतरी आपल्याशी बोलेल
अन् आपली ओळख काढेल
अशा आशेने
एकटाच
तो मला बसलेला दिसला.
पण मी माझ्या मित्रांबरोबर बसलो होतो.
आणि नाहीतरी मी मुद्दामून गेलो असतो
म्हणा, आणि टमरेल शेअर केल असत,
तर तो चिडला असता,
घुमाच राहिला असता.
मुंबईत नवीन होता तो
ही माहिती होती मला त्याची.
नवी ओळख आहे त्याची-माझी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

कविता आवडली. शेवटच्या ओळीत ती एकदम चमकून जाते.

काही शब्दप्रयोगांमुळे इंग्रजीत आधी सुचली असावी असे वाटून गेले.
'कोनाड्याकडे'ऐवजी 'कोपर्‍यात' हवे का ?
'बहुतेक करून'ऐवजी 'शक्यतो' हवे का ?
'चाखतचाखत'ऐवजी 'ओठ ओले करत' कसे वाटते ? (अर्थात, त्यामुळे झिपर-बियर हे यमक जुळत नाही.)
'नाहीतरी'ऐवजी 'तसेही' हवे का ?
.
'आणि नाहीतरी मी मुद्दामून गेलो असतो
म्हणा, आणि काहीतरी बोललो असतो,
' अश्या विरामरचनेऐवजी
'आणि नाहीतरी,
मी मुद्दामहून गेलो असतो म्हणा;
आणि काहीतरी बोललो असतो,
' हे कसे वाटते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनजीशेट जेव्हा लिहितात तेव्हा बरे लिहितात, पण मुळात लिहितातच फार कमी ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता मूळ (अंतर्गत, अस्फुट) इंग्रजीत असू शकेल, ही चाचणी म्हणून इंग्रजी अनुवाद करून पाहिला. पण तो सहज नाही, जरा कठिणच गेला. शब्दप्रयोग, "इडियम" नव्याने शोधावे लागले. ते खटपट करून मूळ रचनेशी समांतर करावे लागले.

--------------------------------------------------
An old acquaintance
--------------------------------------------------
Half-hidden in a corner of the bar
Half-obscured by the cone of light
Shrunken of shoulder, discomfited
Zippered right to the throat
Sipping a beer gripped tight
With both hands, while bleary eyes
- Though anchored to his fingers - glanced
As he patted his slick of hair
In the fading hope that someone
Would walk up and talk to him
Would make his acquaintance
So alone
I saw him sitting.
I was with my friends, however.
Anyhow, had I deliberately approached,
And broached some topic or the other,
He would certainly have choked,
And been dumbstruck.
I know this well of him:
He is an old acquaintance of mine.
--------------------------------------------------

या चाचणीमुळे मूळ रचना माझ्या वैयक्तिक मराठी बोलीतच थेट रचली आहे, अंतर्गत इंग्रजीमधून अनुवादित नाही याबाबत खात्री वाटते. (अर्थात चाचणीपूर्वीसुद्धा मूर्त आठवण तीच होती. चाचणी अमूर्त अंतर्गत रचनेबाबत होती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चाचणीमुळे मूळ रचना माझ्या वैयक्तिक मराठी बोलीतच थेट रचली आहे, अंतर्गत इंग्रजीमधून अनुवादित नाही याबाबत खात्री वाटते.
..............अतिशय धन्यवाद. केलेली चाचणी (अंतर्गत चाचपणी Lol आवडली.
कवितेचे इंग्रजी रूप मराठीपेक्षाही अधिक आवडले. हे वाचल्यावर, 'इंग्रजी आधी सुचले असावे का ?' असे जे मी म्हणालो, त्याहीपेक्षा 'इंग्रजीत ही अधिक चांगली व्यक्त झाली असती' असेच मला म्हणायचे होते की काय असे वाटत आहे. Smile
फक्त मराठीतला शेवटच्या ओळीचा प्रत्त्यय इंग्रजीत वाचताना आला नाही. पण तो कदाचित मराठी रूप आधी वाचल्याने वाढलेल्या अपेक्षांमुळेही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१, इंग्रजी रुप अधिक आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शैली आवडलीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुंदर. मूळ कविता आणि रुपांतर दोन्ही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जनरली कविता आवडली. शब्द घाईने वापरल्यासारखे पण उत्स्फूर्त वाटले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

कविता आणि तिचे इंग्रजी रुपांतर (काकणभर अधिक) आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय, तुमची विचार करण्याची भाषा इंग्रजी असावी असे या दोन रचना वाचून वाटले.

दोन्ही आवडल्या. अर्थातच, इंग्रजी जरा जास्त सहज वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही कविता छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे

बारच्या एका कोनाड्याकडे
अर्धवट दिव्याच्या झोताबाहेर
खांदे पाडून, अवघडून
गळ्यापर्यंत खेचून कोटाचा झिपर
दोन्ही हातात धरलेली बियर
चाखतचाखत, नसलेल्या चष्म्यातून
गढूळ नजरेने इकडेतिकडे
मधूनच बघत, पण बहुतेक करून
ग्लास धरणारी बोटे निरखत
चापलेचेपले केस नीट करून उगाच
कोणीतरी आपल्याशी बोलेल
अन् आपली ओळख काढेल
अशा आशेने
एकटाच
तो मला बसलेला दिसला.
पण मी माझ्या मित्रांबरोबर होतो.
आणि नाहीतरी मी मुद्दामून गेलो असतो
म्हणा, आणि काहीतरी बोललो असतो,
तर तो गुदमरला असता,
घुमाच राहिला असता.
ही माहिती होती मला त्याची.
जुनी ओळख आहे त्याची-माझी.

नि

बारच्या एका कोनाड्याकडे, दिव्याच्या अर्धवट झोताबाहेर, खांदे पाडून, अवघडून, गळ्यापर्यंत कोटाचा झिपर खेचून, दोन्ही हातात धरलेली बियर चाखत चाखत, नसलेल्या चष्म्यातून गढूळ नजरेने इकडेतिकडे मधूनच बघत, पण बहुतेक करून ग्लास धरणारी बोटे निरखत, चापलेचेपले केस नीट करून, उगाच
कोणीतरी आपल्याशी बोलेल अन् आपली ओळख काढेल अशा आशेने एकटाच बसलेला तो मला दिसला. पण मी माझ्या मित्रांबरोबर होतो. आणि नाहीतरी मी मुद्दामून गेलो असतो म्हणा. काहीतरी बोललो असतो तर तो गुदमरला असता, घुमाच राहिला असता. मला त्याची ही माहिती होती. त्याची-माझी जुनी ओळख आहे .

मधे काय फरक आहे?

प्रश्न फारच अज्ञ आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ध्वनीत परिणामाचा फरक आहे, आणि दृश्य माध्यमाच्या परिणामाचाही फरक आहे.
(हे नियम नाहीत, पण एक ढोबळ संकेत)

ध्वनीत उच्चारलेला उतारा :
ओळीच्या शेवटी थोडासा अधिक विराम येतो - स्वल्पविराम दिला असल्यास गद्यखंडात जितपत वेळ स्वल्पविरामाला मिळेल, त्यापेक्षा किंचित जास्त काळ विराम. जर गद्यखंडात त्या ठिकाणी स्वल्पविराम अपेक्षित नसेल, तर स्वल्पविरामापेक्षा थोडा कमी विराम, पण शून्यापेक्षा अधिक. ज्या रचनांमध्ये "ओव्हरफ्लो" शैली दिसते, त्या कवितांमध्ये पुष्कळदा विराम-मुळीच-चालत-नाही अशा ठिकाणी ओळ तोडलेली दिसते. अशा शैलीत अगदी स्वल्प विराम देण्याऐवजी ओळीच्या शेवटच्या शब्दावर, किंवा नव्या ओळीच्या पहिल्या शब्दावर थोडे अधिक वजन उच्चारले जाते. उदाहरणार्थ वरील पद्यखंडात :
> दोन्ही हातात धरलेली बियर||चाखतचाखत*...
ओळ तोडलेल्या ठिकाणी वजन वाढवून विराम न देण्यामुळे न थांबणार्‍या गतीचा भास उत्पन्न होऊ शकतो.
यमके किंवा अर्धवट यमके जर असली, तर त्या अक्षरावर गद्यखंडापेक्षा किंचित जास्त वजन येते. त्यामुळे एका विवक्षित लयीची अस्फुट रीत्या नोंद होते. वरील पद्यखंडात पुष्कळ यमके ओळीच्या शेवटी आहेत, पण काही यमके ओळीच्या मध्येच किंवा अंतर्गत आहेत. त्यामुळे एक उप-लय मध्येच भासते - एका तालाच्या आवर्तनामध्ये मध्येच वेगळेच तिहाई-व्गैरे-आवर्तन वाजवून तबलजी जे वैचित्र्य साधतात, त्याच्याशी या तंत्राचे साधर्म्य आहे.
--------
दृश्य परिणाम, मूक-वाचलेला** उतारा :
ओळी पाडल्यामुळे परिच्छेदाचा आकार बदलतो, आणि त्यामुळे काही परिणाम साधतो. उदाहरणार्थ, वरील पद्यखंडात "एकटाच" हा शब्द वेगळा स्वतःच्या ओळीत लिहिल्याचा परिणाम कविता न-उच्चारताही जाणवतो. "एकटा" हे पद्यखंडातले जरा भडक उदाहरण आहे, म्हणून जरा अति-स्पष्ट आहे, पण असे अनेक अस्फुट परिणाम साधणार्‍या ओळी आणि विरामचिन्हे आहेत.
आनखी एक अति-स्पट तंत्र म्हणजे "एकटाच" या छोट्या ओळीने कवितेचे पाडलेले दोन विभाग. व्याकरणाच्या दृष्टीने त्यापुढील "तो मला बसलेला दिसला" हा वाक्यखंड पहिल्या लांबलचक वाक्यातला आहे. परंतु कथेचा रोख कागदाला "एकटाच" च्या ठिकाणी दुमडून पाडलेल्या घडीनंतर बदललेला आहे. आदला भाग "तो"चे वर्णन आहे. तर नंतरचा भाग "मी"च्या अंतर्मुख आहे.

--------
*चाखतचाखत, उच्चार : चाखतचाखत
चाखत चाखत, उच्चार : चाखऽत चाखऽत

**मूक-वाचन : माझ्या मते बहुतेक पद्य उतारे मूकवाचनात सुद्धा थोडेसे पुटपुटून किंवा मनातल्या मनात ध्वनी-उच्चार कल्पून वाचले, तर अधिक परिणामकारक असतात. सुलेखन (कॅलिग्रफी) तंत्रामध्ये मात्र उतार्‍यांमधील लयकारी जवळजवल पूर्णतः दृश्य असते. सुलेखनाचा आदर्श मानून छापील-टंकाच्या रचना सुद्धा कोणी रचेल. त्या रचना मूक-वाचलेल्या परिणामकारक असतात. पुनश्च, वरील सर्व तंत्र ढोबळ निर्देश आहे. ताठर कायदे वगैरे नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध्वनि, दृश्य परिणाम तर होतच असावा शिवाय केवळ कविता आहे म्हणून अधिकचे अर्थवहन होत असावे. Reading more than what is written.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धनंजय यांनी अगदी नेमके समजावून सांगितले आहेच. या दुव्यावरची काही उदाहरणे आणि अन्य दुवेही उपयुक्त ठरावेत - http://en.wikipedia.org/wiki/Enjambment

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विंग्रजी संज्ञेसाठी पेश्शल धण्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शक्य आहे. ऑस्कर वाइल्डने "पोएम्स इन प्रोझ" म्हणून काही रचना लिहिला आहेत :
दुवा , व्याख्या वगैरे असलेला विकी दुवा
त्या रचना गद्य खंडात लिहिल्या असल्या, तरी मिताक्षर, लययुक्त, आर्त वगैरे असल्यामुळे कवितांसारख्या भासतात. संचाला "गद्यातील कविता" नाव देऊन "शब्दार्थापेक्षा अधिक वाचा" असा असा संकेत वाइल्ड देत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जापनीज हायकू काव्यप्रकारात शब्द कसे तोडले कि कुठल्या प्रकारे दृश्य चेंज होत हे खूप चांगल्या प्रकारे समजते.

paper boat--
how far will it carry
my child's smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!