कचरा

कचरा आम्हाला आवडतो
आमच्या घरात कचरा
गल्लीत कचरा
रस्त्यावर कचरा
नाक्यावर कचरा
अड्यावर कचरा
स्टेशन वर कचरा

जिथे पहा तिथे
कचराच कचरा.


विदेशी कचरा
जास्तस आवडतो
कचऱ्याची दलाली
आम्ही आनंदी घेतो.
पडणारी विमाने असो
कि जंग लागलेली जहाजे
किंवा बुडणाऱ्या डुब्या
देशाची सुरक्षा सुद्धा
करतो विदेशी कचरा .


सडलेल्या द्राक्षांचा
सुवास दरवळला
झिंगून डुक्कर
कचऱ्यात पहुडला
परमानंदी टाळी
तयासी लागली.
कचऱ्याचा जयघोष
आकाशी दुमदुमला. <

/div>

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

ठळक केलेल्या वाक्यावरून काही अंदाज बांधला तर इतके हताश होऊ नका असे सुचवतो.
अर्थात कविता कळली नसण्याची शक्यता आहेच!

त्यातही जहाजे, नी पाणबुड्यांच्या बाबतीत हे वाचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!