आसमाऽऽन में... लाऽऽखों तारें...टॅडॅड्यॉव...
सिनेमातल्या मुख्य पात्रांवर बरंच बोललं जातं. पण एखाददुसर्या दृश्यातून नाहीतर एखाद्या वाक्यातून लक्षात राहून गेलेल्या पात्रांची आठवण ना समीक्षक काढत, ना सिनेअभ्यासक.
'सरफरोश'मधला 'आसमाऽऽन में... टॅडॅड्यॉव.. लाऽऽखों तारें...टॅडॅड्यॉव..' या एका ओळीसह लक्षात राहिलेला 'फटका' असो; नाहीतर 'दीवार'मधे 'मैं क्यूं दूंगा? मैं नही दूंगा अपने पैसे...' या ओळीमुळे लक्षात राहिलेला हमाल. हा हमाल म्हणजे सत्यदेव दुबे आहेत, हे मला हल्लीच काही वर्षांपूर्वी कळलं! अशी कितीतरी लहानसहान पात्रं. 'रंगीला'मधला हिरॉईनच्या कपाळावर 'सिर्फ चार बाल...' हवे असणारा डायरेक्टर काय किंवा 'वोह देख मिली.. तू यहाँ दिख रही है...' असं ओरडणारा मिलीचा भाऊ बाबूलाल काय. या व्यक्तिरेखा इतक्या अचूक लक्षात राहण्याचं कारण पटकथेतलं त्यांचं पक्कं स्थान असेल, कलाकाराची ताकद असेल ('एक थी हसीना'मधली रसिकाची भूमिका आठवतेय?) किंवा संवादलेखकाचं कसब ('अरे ओ सांबा!'). पण या मंडळींना त्यांच्या वाटचं श्रेय मिळत नाही, इतकं खरं.
हा धागा त्यांना समर्पित. निर्मात्याच्या कुंचल्याच्या चार-दोन फटकार्यांसह लख्ख उभ्या राहिलेल्या चित्रपट, नाटक वा साहित्यातल्या व्यक्तिरेखांबद्दल गप्पा करण्यासाठी.
ओँकारामधला दिपक दोब्रियाल...
ओँकारामधला दिपक दोब्रियाल... तनू वेड्स मनू मधेपण चांगलं काम केलय त्याने, पण ओँकारत बेस्ट.
आणि काय माहित का, पण जेव्हा डॉलीचे वडील ओँकारा-डॉलीच्या मधे कार थांबवून 'जो अपने बापकी न हो सकी वो किसी और की क्या होगी' असा डायलॉग मारतात, तो सीन sends chills down my spine (हे मराठीत कसं लिहणार? :-/)
मस्त आयडिया आहे धाग्याची.अशी
मस्त आयडिया आहे धाग्याची.
अशी पात्रे प्रत्येक वेळी आवडलेलीच असतात असं नव्हे, पण काहीना काही कारणाने लक्षात मात्र नक्की राहतात. उदा.
कंटाळवाणं किंवा कृत्रिम पात्रः
- खबरीलाल के समाचार. दूरदर्शन समाचारच्या टोनमधे फोनवर पोलिसांना टिप्स देणारा खबरी(बहुधा तिरंगा किंवा तत्सम मसालापट. खबरीलाल नटाचे नाव विसरलो, पण तोच पूर्वीच्या ये जो है जिंदगी दूरदर्शन मालिकेत होता.)
आवडलेले:
- कभी हां कभी ना मधला सुनील ऊर्फ शाहरुख खान याला सदैव टोचून बोलणारा अॅनाचा भाऊ (हाच जाने भी दो यारों मधे होता)
- तेरी हल्की फुल्की पप्पी भी पप्पा के बराबर होती है म्हणणारा दीपक तिजोरीचा चमचा.
आणखी आठवतील तसे सांगत जाईन.
याच धाग्यात किंवा अशाच धर्तीवर अत्रंगी डायलॉग्जही सांगायला हरकत नाही..
उदा.
-मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया.. (चायना गेट की काय?)
-यांचा सत्कार करा (सरकारनामा)
-तू तो इमानदारी की तोप है ना टुन्ना.. तू महात्मा गांधी है टुन्ना.. तू सरोजिनी नायडू है टुन्ना.. (जो जीता..)
-उठा ले रे बाबा.. (हेराफेरी)
-ठाई किलो का हाथ..दुनिया से ही उठ जाता है..
-तारीख पे तारीख..
- य य य य य्य्य य्य्य य्य (कवट्या महांकाळ की तत्सम.. चुभूदेघे..)
-मला राजा व्हायचंय.. हो मलाच व्हायचंय राजा ..(राहुल सोलापूरकर बहुधा.. बाकी तपशील काहीच आठवत नाही पण सिनेमाभर काव आणला होता या वाक्याने)
शक्ती कपूर हा तर निरर्थक वाक्यांचा सम्राटच.. आऊ.. लोलिता.. किंवा टुन्ना टुन्ना... किंवा काट देते है इसका पत्ता.. पहुंचा देते है इसे कलकत्ता.
अयायाया..
आणखी एका सिनेमाचं काहीच
:)
आणखी एका सिनेमाचं काहीच नावगाव आठवत नाही, पण प्रशांत दामलेच्या सुरुवातीच्या काळातला असावा. तो कोणत्यातरी संस्थानाचा तोतया की खरा राजपुत्र बनून तिथे जातो आणि लफडी होतात अशी थीम असावी. सोबत बहुधा विजय चव्हाण असावा.
त्यात एका सिरियस फायटिंगमधे खरोखरच व्हिलनने प्रशांत दामलेला धरुन त्याचा हात पिळल्यावर तो अचानक व्हिलनला स्पष्ट शब्दात "ए हात सोड.. (खांद्याच्या सांध्याकडे बोट दाखवून) इथे दुखतंय" असं ज्या बजावणीच्या अन टैंप्लीज टोनमधे सांगतो ते ऐकून फिस्स करुन हसणं अनिवार होतं.
कोणाला आठवतंय का??
प्रच्छन्न
तसा आनंदमधला 'मुरारीलाल'(जॉनी वॉकर) मोजक्याच क्षणांपुरता असला तरी लक्षात रहातो त्याचं कारण म्हणजे जॉनीच्या कलंदर अदाकारीबरोबर सिनेमात असलेली कमी पात्रसंख्या हेही असावं. शोलेमधली जगदीप/सांबा/विजु खोटे हे लोकं किंवा शराबीमधला नथ्थुलाल लक्षात रहातात कारण ते एका ऐतिहासीक क्षणांचे भागीदार असतात, त्यांचा प्रत्येक सीन मुख्य कलाकाराने अजरामर केल्याने त्यांनापण त्याचा फायदा मिळून गेला. अलिकडे नवाजउद्दिनच्या अशा छोट्या भुमिका(कहानी लक्षात रहाण्यासारख्या होत्या त्यामधे मात्र त्याच्या अभिनयाला श्रेय द्यावे लागेल, त्याचबरोबर पटकथालेखकाने पात्राला तेवढे फुटेज देणेही गरजेचे आहे. कादरखान त्याच्या संवादांमुळे आणि संवादफेकीमुळे छोट्या भुमिकेतही लक्षात रहात असे, वीरझारा नामक तद्दन बथ्थड चित्रपटातही दिव्या दत्ता तिच्या भाषेच्या ठसक्यामुळे लक्षात रहाते, सध्यातरी एवढीच मंडळी लक्षात आहेत, आठवल्यास भर घालेन.
पण अमिताभ, नसिर किंवा इतर काही कलाकार जेंव्हा अशा छोट्याश्या भुमिकेत लक्षात रहातात त्याचे त्यांच्या अभिनय कौशल्य/इमेज च्या पलिकडे असलेल्या एका गोष्टीला मी देईन ते म्हणजे त्यांच्यामधे असलेले एक प्रच्छन्न पात्र पडद्यावर येते आणि मग तो सीन कितीही बकवास असला तरी ह्यां कलाकारांची उपस्थिती मात्र लक्षात रहाते.हे थोडेसे अध्यात्मिक वाटेल म्हणजे त्यांच्यामधे इतरांना आवडण्यासारखे उपजतच काहि आहे ते काहि म्हणजेच 'प्रच्छन पात्र', अशा कलाकार लोकप्रिय होण्यामागे हे एक कारण आहे असे माझे मत आहे.
Snehal Dabi, प्रा. तिवारी
या कलाकाराचे दोन लक्षात राहिलेले संवाद.
१. हेराफेरी - बस स्टॉपवरचा 'मॅनेजर' असरानीसोबतचा सीन आणि 'मस्त रापचिक माल' किंवा "ए माट्या ... चाय से ज्यादा साला किटली गरम है" हा ड्वायलाक्
(दुवा)
२. सत्या - चंदर क्रिश्नकान्त खोटे सत्याला त्याची रहायची सोय केलेली चाळीतली जागा दाखवतो तो प्रसंग - ती जागा कशी चांगली आहे, भिखू म्हात्रेचा आपल्या दोघांवर कसा वरदहस्त इ. त्याची एकट्याचीच टकळी चालू असते - "इतना मsस्त फ्लॅट दिया तेरेको - ये टीव्ही है, ये फ्रीज है और ...एक भगवान भी है देख!" (हा संवाद, सत्याचा जगातल्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही हे अधोरेखित करण्याकरता असला तरी टीव्ही, फ्रीज यासारख्या उपयुक्त गोष्टींसोबतच देवालाही गणणारी संवादफेकही खासच).
(दुवा)
३. 'सेहर' मधले प्राध्यापक तिवारी:
पुढील भाग सन्जोप राव यांच्या 'सेहर आणि कुछ मीठा हो जाये' या लेखातून साभारः
उत्तर भारतात बोलल्या जाणाऱ्या हिंदीची नजाकतच काही और आहे. शुद्ध हिंदीचा हा लेहजा संवादलेखकाने फार सुरेख पकडला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सेलफोनविशेषज्ञ प्राध्यापक तिवारी यांना पोलीस वापरतात त्या हत्यारांविषयी एक भयगंड असतो. अशा एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीपमधून जाताना डॅशबोर्डवर ठेवलेल्या रिव्हॉल्वरने तिवारी अस्वस्थ होतो. ती अस्वस्थता लक्षात येऊन तो अधिकारी त्याला विचारतो 'आपको अब भी इन चीजोंसे परहेज है?' 'हां..मतलब...' तिवारी चाचरतो. तो पोलीस अधिकारी रिव्हॉल्वर काढून घेताघेता विचारतो 'लता मंगेशकरसे तो परहेज नही है ना?' तिवारी खळखळून हसतो ' नही, उनसे कोई परहेज नही है'. पोलीस अधिकारी कॅसेट सुरु करतो 'अजीब दासताँ है ये...' जीप निघून जाते.
हेराफेरी आणि सत्या...
हेराफेरी आणि सत्या... दोन्हीला अनुमोदन (अगदीच 'माबोछाप' झालाय हा शब्द. :()!
'सेहर' राहून गेला आहे माझा. आता पाहिला पाहिजे.
तसा नवीन 'आँखे' (अमिताभ आणि अक्षयकुमार आणि परेश रावल) मधला 'डेलनाझ ने कहा हाँ, तो हाँ..' वाला बँकेतला कारकूनही भारी होता.
किंवा 'भूत'मधली सीमा विश्वासनं केलेली मोलकरीण. नाना पाटेकरचा 'कुरेशी - लियाकत कुरेशी'. या दोन्ही पात्रांना मुद्दामहून रहस्यमय केलेलं होतं हे मान्य. पण तरी सीमा विश्वासची गबाळी, भिरभिरती नजर लक्षात राहते. तसाच नाना पाटेकरचा जड आवाजही (नाना पाटेकरचा आवाज ऐकताना मला पुलंनी एका भाषांतरात (काय वाट्टेल ते होईल - जॉर्ज आणि हेलन पापाश्चिविली) वापरलेली एक उपमा आठवते: चांदीच्या सुरईतून मध ओतताना जसा आवाज येईल, तसा आवाज.) विसरू म्हणता विसरता येत नाही.
स्नेहल दबी/दाबी
मागे अरविंद कोल्हटकरांना 'रापचिक'चा अर्थ समजावून द्यायला या व्यक्तीने बरीच मदत केली होती. :) (संदर्भः चिंजंचा 'रापचिक..' धागा)
'सत्या'मधला चंदू खोटे चांगलाच लक्षात राहतो. तो एक जोक सांगतो, तोदेखील प्रसंग पाहण्यासारखा आहे.
स्नेहल दबी/दाबी हा एक उत्तम नट आहे. त्याचा 'लव् के लिये कुछ भी करेगा' या चित्रपटातला 'आज कपूर' पाहिला आहेत का ? 'अस्लमभाय' (जॉनी लिवर) हा एक 'भाय' असतो ज्याला चित्रपटात काम करण्याची, हिरो बनायची भारी हौस असते आणि स्वतःच्या अभिनयाबद्दल अनेक गैरसमजही असतात. स्नेहल हा 'आज कपूर' नांवाने अश्या लोकांना घोळात घेऊन गंडा लावणारा ठग असतो. या दोघांची पहिली भेट पाहा. किंवा हा आणि हा प्रसंग. या चित्रपटातले जॉनी आणि स्नेहलचे सगळेच प्रसंग या दोघांनी मिळून निव्वळ उच्च केले आहेत.
'आयेगा, आसू आयेगा. देख, आया?'
'आयेगा, आसू आयेगा. देख, आया?' वाला सीन काय? अशक्य होता तो!
रामूची वाट लागण्यापूर्वी त्याच्या आणि त्याच्या प्रभावळीतल्या लोकांनी हिंदी सिनेमातल्या स्टिरिओटाइप्सची काय अफलातून टिंगल केलीय! कुठलाही सिनेमा घ्या त्यांचा - जाता जाता एक तरी लाथ हाणलीच पाहिजे मेनस्ट्रीम सिनेमातल्या स्टिरिओटाइप्सना.
पात्रांची लिस्ट - चुपके
पात्रांची लिस्ट -
चुपके चुपके - परिमल त्रिपाठी / श्री प्यारेमोह्न इलाहाबादी
चुपके चुपके - जेम्स डिकॉस्टा (आज बाग मे खिलेंगा एक गुलाब ....)
गोलमाल - रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा
नरम गरम - भवानीशंकर बाजपाई
चुपके चुपके - राघवेंद्र शर्मा
बाबु मोशाय
लाला (किसी से ना कहना मधला सईद जाफरी)
लल्लन मियां (चष्मेबद्दूर मधला सईद जाफरी)
अंगूर - बहादुर
चष्मेबद्दूर
चष्मेबद्दूर म्हणजे तोच ना तो "कहां से आये बदरा" किंवा "काली घोडी द्वार खडी रे...." ...
फरुक शेख व दिप्ती नवलचा ?
त्यात पहिल्यांदाच फरुख व दिप्ती नवल हॉटेलमध्ये जातात तेव्हा त्यांना सर्व्ह करणारा वेटर चांगला चाबरा दाखवलाय
दोन्-चारच डायलॉग आहेत त्याला; पण च्यायला ते डायलॉगही झोकात मारतो तो.
स्लमडॉग मिलेनियर मधील एक
स्लमडॉग मिलेनियर मधील एक आंधळा भिकारी मुलगा जो जमालला सब-वे मध्ये भेटतो... आंघळ्या सुरदास चं भजन गात असतो...
तारे जमी पर मधील आमिरला चहा देणारा एक लहान मुलगा (चाइल्ड लेबर) , कॅमेरा फिरतो मग तो मुलगा चहा/बिस्किट खात असतो आमीर त्याच्या कडे हेल्पलेस नजरेने बघत असतो...
- बल्कि आप पुरुषही नही हो..
- बल्कि आप पुरुषही नही हो.. (अंदाज अपना अपना)
- अरे फिरौती के पैसे लाया है या मैय्यत का चंदा (अंदाज अपना अपना)
- मैं तेजा हूं.. मार्क इधर है.. (अंदाज अपना अपना)
- ये तो कमीना है ही लेकिन आप भी.. कमाल करते हो.. (बोल बच्चन)
- अब आप का एक इंजिन बंद है और एक इंजिन चालू है..चालू मतलब ओरिजिनल नही है..चालू क्वालिटी का है.. अभी चल रहा है..लेकिन (धमाल)
- "प्यापर गळपाटला
- "प्यापर गळपाटला ना.."(टाईमपास)
- नया है वह क्या नया है वह ? (टाईमपास)
- "पोचवा.. तुम्ही डबेच पोचवा".. अजिंक्य देव असीमला उद्देशून (लपंडाव)
- "सोड्याचं कालवण..", "मी पिण्याविषयी नाही बोलत आहे, जेवायला काय केलं होतं.." (लपंडाव)
- "लिंगाशी फार खेळतात हे लोक" (एक डाव धोबीपछाड, सुबोध भावे मास्तर)
- "श्रावणमाशी हर्ष मानशी.. आनंदाने वेडेपिशे होSSSने" (एक डाव धोबीपछाड)
- "मेरी एक टांग नकली है,मैं हॉकी का बहुत अच्छा प्लेअर था...एक दिन उदयभाई के लिये मेरे मूंह से.. .. .. लेकिन दिल के बहुत अच्छे है, फौरन अस्पताल ले गये, इलाज कराया, नयी टांग लगवायी" (वेलकम)
-आधी मधल्या व्हिरीतला गाळ
-आधी मधल्या व्हिरीतला गाळ काढा.
-संपतराव मुतले.
-भटजी पांच!! (सर्वही वळू)
-जलजला जाग उठा है. अब सब को पता चलेगा की गँगवॉर स्टार्ट होने वाला है. अब लाशें इस तरह गिरेंगी जैसे नन्हे मुन्ने....टप टप. (गुंडा)
-खोटे सिक्के ने क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है! (गुंडा)
-मेरा नाम है शंकर,....दुष्मनों के लिए ज्वाला.
तेरे को बना दूंगा मौत के मूँ का निवाला, तेरे सीने में गाडूंगा मौत का भाला. (गुंडा)
-आब्बा! खुंदल खुंदल के मारे इस्माईलभाई को? (अंग्रेज)
-अरे तू मैकॅनिक है पजामा है? तेरेको कित्ती बार बोला वो लालवाली मर्सीडिस बेंझ नक्को रे बावा, वो सफेदवाली भिजादे..मेरेकु कामां है..भौत कामां है रे भाय.
-दस पैसे के नुमाइश के फोन से बात करी तो क्या आवाज सुनने आती?
-वो मेरेकु मालूम तेरेकु मालूम, पोट्टीको मालुम क्या? (अंग्रेज)
बाकीही लै कै कै आहेच, तूर्तास इतकेच. गुंडा अन अंग्रेजबद्दल तर निबंधच ल्याहावा लागेल.
हा हा हा अगदी अगदी मी तर
हा हा हा =)) अगदी अगदी =))
मी तर "तो तू मर गयी?????" या ड्वायलॉकलाच फुटलो होतो.
त्यापुढचा ड्वायलॉकही ग्रेट आहे.
"लंबू आटा. काला धंधा करनेवालों की मा-बहनके जिंदगीका कोई भरोसा नै होता. तूने मेरी बेहेन को मारके अपने भाईका घाटा पुरा किया. ठीक किया! लेकिन तुमने उसका रेप करके बहुत बुरा किया. बहुत बुरा कियाऽऽ!!"
"अरे तो कौनसा बुरा किया?" आणि त्यानंतरची रोटी-बोटी-पोट्टी संगती तर औट ऑफ धिस वर्ल्ड आहे _/\_
अंमळ चुकले. ॐ भगभुगे
अंमळ चुकले.
ॐ भगभुगे भग्नि..भग्नि भगभुगे...भगभुगे भग्नि भागोदरी..भागोदरी भग्नि भगभुगे..भगभुगे भग्नि भागोदरी...भग्नि भागोदरी..भागोदरी भग्नि...भग्नि भागोदरी भग्मासे...भाग्मासे भागोदरी भग्नि..भग्नि भागोदरी भग्मासे...भागोदरी भग्मासे..भग्मासे भागोदरी...भागोदरी भग्मासे योन्यौ...इ.इ.इ.
संदर्भ इथे मिळेल. त्याचा व्हिडोही नेटवर होता, पाहिले पाहिजे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये या पद्धतीदेखील आहेत.
नसीरुद्दीन
नसीरुद्दीन शाह जाने तू या जाने ना ह्या चित्रपटाचा यू एस पी आहे.
आख्ख्या पिच्चरमध्ये तो फक्त तीनेक सीन्स मध्येच बोलत असेल. तेही एकाच ठिकाणी, एकाच वेशात.
पण जितका वेळ तो समोर असतो, मस्त टैम्पास होतो साला.
विशेषतः शेवटच्या भागात इम्रान खान तीन नियम पूर्ण करतो, तो भाग हैट आहे.
हृषीकेश मुखर्जींच्या सिनेमात
हृषीकेश मुखर्जींच्या सिनेमात कायम असणार्या त्या नटाचं नाव माहीते का कुणाला -
'खूबसूरत'मधे जो डॉक्टर्स क्वार्टर्समधे राहत असतो आणि कायम पान खात असतो, किंवा 'गोलमाल'च्या अखेरीस सगळ्यांचा फोटो काढतो तो? भारी माणूस आहे तो. तो त्यांच्या सिनेमांखेरीज कुठे कधी दिसला नाही पण.
तसाच हृषीकेश मुखर्जींच्याच सिनेमात का-य-म रामूचाचांचं काम करणारे ते म्हातारे गृहस्थ.
तसाच 'ओम शांती ओम'मधे शाहरुखच्या सेक्रेटरीचं काम करणारा, नाहीतर 'खोसला का घोसला'मध्ये नवीन निश्चलच्या सेक्रेटरीचं काम करणारा तो गुटगुटीत माणूस? भारी आहे तो!
अर्र हो की. विसरलोच होतो.
अर्र हो की. विसरलोच होतो. बादवे त्यावरून हे आठवलं.
बनवाबनवी
चित्रपट - बनवाबनवी (या चित्रपटातील अनेक संवाद लिहिता येतील .. त्यातील काही निवडक ... )
डायलॉग १ - विजु खोटे स्त्री वेशातल्या लक्ष्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करत असतो तेव्हाचा लक्ष्याचा डायलॉग - "अरे सारखं सारखं त्याच झाडावर काय ?"
डायलॉग २ - अशोक सराफ टू सुधीर जोशी - "तुम्हाला माळी म्हणाला ? तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला ?"
डायलॉग ३ - अशोक सराफ टू सुधीर जोशी - "दोन कप चहा लागतो .. रोज दोन कप चहा लागतो
डायलॉग ४ - अशोक सराफ टू सुधीर जोशी - "तुमचे सत्तर रुपयेसुध्धा वारले .." (या सत्तर रुपयाची महती सध्या व्हाट्स अॅप वर देखील आली होती .. चित्र पहा -
डायलॉग ५ - अशोक सराफ टू सुशांत रे - "आपण चौघ या खोलीत राहतो हे जर त्या टुकुलू ला कळ्ळं ना शुंतूनू .."
'शोले'त अनेक छोट्या-छोट्या
'शोले'त अनेक छोट्या-छोट्या कलाकारांना यादगार संवाद मिळाले होते किंवा शोले खूप गाजल्याने ते प्रसिद्ध झाले असे म्हणता येईल.
-इतना सन्नाटा क्यूं है भाई?
-हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं|
-हमार नाम सूरमा भोपाली एसेई नै हे|
-सुनो, ठाकूर ने हिजडों की फौज बनाई है|
-सरदार, मैने आपका नमक खाया है|
-खोटा सिक्का तो दोनो तरफ से खोटा होता है|
हे सर्वपरिचित तर आहेतच; पण जेल मध्ये जय-वीरू जेलरचा जासूस कोण या विचारात असताना तो बायल्या माणूस येतो आणि म्हणतो
"मै बताऊँ? वो हरिराम नाई है ना? बडा मुँहचढा है मुआ जेलर का.......हाँ!"
टी. पी. जैन
गुलज़ारच्या अनेक चित्रपटांत या 'टी. पी. जैन' नामक व्यक्तीने काम केले.
उदा.
१. गनेशीलाल, "मगर मैं कहता हूँ के ग्यारा बजने में अभी सिर्फ तीन मिनट बाकी हैं |" (चित्रपट : अंगूर)
२. 'नमकीन' या चित्रपटात संजीवकुमारला घर दाखविताना लालाच्या भूमिकेत वाक्य अचानक मध्येच सोडून पुढे संवाद चालू ठेवायची ढब त्यांनी खासच पकडली होती.
किंवा 'क़िताब' चित्रपटात 'मास्टरजी की आगई चिठ्ठी' हे प्रसिद्ध गाणे ज्या मास्टरजींवर आहे त्या मास्टरजींचे काम.
किंवा
अतिजुनी डाबर लाल दंतमंजन जाहिरात अनेकांना आठवेल.
मास्टरजी, "बच्चों, यह हैं हमारे दातों की बनावट |...... राजू तुम्हारे दात तो मोतियों जैसे चमक रहे हैं |"
मस्त धागा. मला पहिल्याप्रथम
मस्त धागा. मला पहिल्याप्रथम डोळ्यासमोर आला तो चष्मेबद्दूरमधला लल्लनमियॉं. सईद ज़ाफरीने छोट्याशा भूमिकेचं सोनं केलेलं आहे. नंतर आठवला तो 'नाम अब्दुल है मेरा, सबकी खबर रखता हूं' म्हणणारा शानमधला मजहर खान. अमिताभने शंभरची नोट दिल्यावरही काही माहिती न सांगता म्हणतो, 'सोच रेला था की वो बेचारी अकेली नोट किसके साथ बाते करेगी?'
इतना सन्नाटा
"इतना सन्नाटा क्यूं है भाई " हा डायलॉग अमर करुन गेलेले ए के ंगल.
"आनंद" मधील दारासिंग पासून ते ललिता पवार, जॉनी वॉकर.
अर्थात ह्यांची लांबी धाग्यात दिलेल्या पात्रांपेक्षा जरा मोठी आहे, पण ही आहेत एकूणात लांबीने लहान पात्रेच.
a wednesday मध्ये थोडेच डायलॉग असलेला प्ण थंड नजर आणि मोजक्याच संवादातून माजोरडेपणा पुरेपूर दाखवणारा
जाडा कैदी/दहशतवादी.
नमक हराम :- रझा मुराद
नाना - जॉन अब्राहम पेक्षा "टॅक्सि नम्बर नौ दो ग्यारह " मध्ये माझ्या लक्षात राहिला तो जॉन अब्राहमच्या धमक्यांना
भिक न घालणारा आणि त्याला अक्षरश: वैताग आणणारा अफलातून बँक मॅनेजर.
फक्त एखाद्-दोन सीन्सच असेल; पण तो भारिये.
मुन्नाभाई m b b s मध्येही तो होता.कॉपी करायला मदत करणारा डॉ रुस्तुम !
त्या कलाकाराचं नाव ठाउक नाही, पण बेनं लै भारीये.