ठाकमठोक

हा एक शुद्ध वैयक्तिक उद्वेग आहे.
तो इथे मांडण्याचं खरं म्हणजे काहीच कारण नाहीये, पण मन मोकळं केलं की पुढचे विचार भेलकांडत नाहीत.

उद्वेगामागील कारणे खालीलप्रमाणे आहेतः

टी बाळू -
आद्य टी. ज्यांच्यामागे विशेषणांची रांग लागते ते हे. एखाद्याच्या फुफ्फुसांची चाचणी करायची असल्यास त्याला ह्यांचे नाव वाचण्यास सांगावे-
हिन्दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे. मुलाखतीत वगैरे दर वेळी असं नाव घ्यायची वेळ आली, तर हे असलं काहीतरी होऊ शकतं
पण आपली ह्यांच्या विरुद्ध काही कम्प्लेण्ट नाहीये आता. जाळपोळ, दंगेधोपे आणि प्रक्षोभक भाषणं करून आता जाउन रायले ते.
सध्या डोक्याचा भुस्कोट झालाय तो त्यांच्या ह्या पिलावळीमुळे.

टी राजू -
अंदाज अपना अपना आठवून म्हणायचा झाला तर रोबर्टच्या भाषेत “सर वो दो नंबर का है ना , छोटा…. वो थोडा चालाक है ” , ते हेच ते.
किती बोलतात हो हे ? म्हणजे काहीच्या काहीच ! आणि चेहऱ्यावर कायम काहीतरी तिडीक आणणारे भाव. कायम.
“साहेब, फोन आलाय” – चेहेरा तसाच.
“निवडणूक जवळ आलीये साहेब, काय संदेश आहे? “ – - चेहेरा तसाच.
“तुम्ही व्यंगचित्रकार कसे झालात? “ – - चेहेरा तसाच.
“अहो, चपात्या वाढू का? ” - ह्यांचा चेहरा तसाच.

बरं, एवढ्यावर थांबला नाही गडी. वर पुन्हा भाषण आणि त्यातले खास फटाके. कुठेही काहीही झालं की ह्यांचे खास थोरल्या शैलीतले डाय्ल्वाग सुरु.
लई काव करून राहिले हे.म्हणजे बघा, जेवताना एक हजार प्रकारची भजीच वाढली रोज, तर कशी खाणार हो?
जिभेचे चोचले एक-दोनदा ठीक आहेत, काहीतरी शरीराला द्या की.
चालायचंच ! बद्ध्कोष्ठाची भावना होते म्हणून, सध्या आम्ही ह्यांचे कार्यक्रम केवळ वर्तमान पत्रातून चाळतो. तेदेखील त्यांचे फोटो नसले, तर.

टी उडू -
चंपक हा शब्द पयल्यांदा जेव्हा ऐकला , तेवा डोळ्यापुढे एक मूर्ती आली होती. हीच ती. पण आम्ही म्हणालो नाय नाय, थोडा benefit ऑफ doubt देऊ ह्यांना. आम्ही दिला. जेहेत्ते काळाचे ठायी ह्यांनी आपल्या अगाध कर्तृत्वाने ही उपाधी सिद्धदेखील केली.
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्यांनी फुकटची भाषणबाजी केली नाही फारशी. हे एक चांगलं.
उंच उडून हे किल्ल्यांचे फोटो काढत होते ते काय वाईट होतं? तिथेच राहिले असते तरी छान होतं .
पण आता तरी निदान ह्यांचे पाय जमिनीला लागलेत असं वाटावं तर तेही नाही.
सामना हे जबरदस्त दैनिक जर तुम्ही वाचत असाल तर कळेल की ते महाराष्ट्रात दर आठवड्याला विराट सभा घेतायेत. आम्ही ह्यांच्या सगळ्या चुका पोटात घालायला तयार आहोत जर त्यांनी सामनाच्या सकस विनोदाचं रहस्य उलगडून सांगितलं तर! (विशेषतः त्यातील राशिभविष्य)
पण तो मानदेखील संजय राउत ह्यांच्याकडे गेला. मग थोर्ल्यांचा नामजप करून मतांची भीक मागणे, हे काम उरलं फक्त.… ते देखील बाकी नेत्यांवर सोपवलंय म्हणता ?

“रे मेल्या मग हो रां**चो करता तरी काय ता कोणीतरी सांगा माका.”
~ एक कोंकणी अनुयायी

टी अडू -
आम्ही काय बोलणार? शब्दच खुंटले आहेत.

जाता जाता आठवलं -
प्रश्न : “एकदा टी राजू , टी उडू आणि टी अडू हे एका उंच इमारतीवरून उडी मारतात. तर कोण वाचेल ?”
उत्तर : मराठी माणूस.

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

अस्वल एकदम कल्लाच करायला लागलाय कि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

सुशेगाद, बरो मरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेलकट वडे आणि चिकनसूप बद्दल काहीतरी आलं असतं तर आणखी मजा आली असती. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तेलकट वडे' ठीक आहे, पण 'चिकनसूप'?

कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भ - , .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

From Horse's Mouth... http://saamana.com/2014/April/05/AGRALEKH.HTM

बाळ ठाकरे यांना तेलकट वडे खावे लागल्याने पुतण्याने चिकनसूपची व्यवस्था केली होती असे कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आ अस्वल लैच कावलय कि ....बरो मरे खा म फणसाचे गरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

ठास तिच्या मारी. ठासणीची बंदूकच घेउन आलंय वाटतं हे अस्वल आज. लयंच भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला! भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खल्लास उड्वेग आहे हो ! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL लय भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0