तो आणि ती

सोमवारी, आमच्या फुटपाथवर दोघे जन्मली
एका खोपटात मुलगा आणि दुसर्‍यात मुलगी
नाळ कापुन दोघांचीही 'आई' वेगळी झाली
'टॅ...हॅं...टॅ...हॅं' दोघेही रडायला लागली

मंगळवारी, दोघीही बागडायला लागली
तुरू तुरू दोघेही चालायला लागली
एकमेकांकडे बघून हसायला लागली
लक्तरातच दोघेही फिरायला लागली

बुधवारी, दोघांच्याही पोटात आग पडली
फेकलेले अन्नकण टिपायला लागली
लोकांसमोर हाथही पसरायला लागली
लोकांचे शिव्याशाप खायला लागली

गुरूवारी, दोघेही तरुण झाली
एकमेकांकडे चोरून बघायला लागली
नजरेने इशारे करायला लागली
मनतळी त्यांच्या प्रीत जन्मली

शुक्रवारी, दोघे एका खोपटात शिरली
एकमेकांमध्ये आनंदाने सामावून गेली
कारण लग्नाची इथे प्रथाच नव्हती आली
चवन्नीसाठी इथली वस्ती लाचार झाली

शनिवारी, ती 'त्यां'च्या नजरेत पडली
आमच्या फुटपाथवर कार एक थांबली
पोटासाठी जेव्हा ती कार मध्ये शिरली
'ब्र' बोलायचीही त्याला हिंमत ना उरली

रविवारी, सगळीकडेच सुट्टी होती
स्वर्गाची दारं मात्र उघडी होती
आणि सफाई कामगार मात्र
'दोन बेवारशी प्रेतं' उचलत होती

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

घटना दाहक आहे.
लेखन कविता म्हणून ठीक

ऐसीवर स्वागत. पुढील लेखनास शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!