नॉस्टॅल्जिआ

आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
कोरा करकरीत, घडी न मोडलेला,
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्‍या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर
-नी त्याच्याच मागील खिडकीवरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्‍यावर येणारी चहाची वाफ हुंगत,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु खिडकीत आलीस
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?

=======

आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
एकदाच घडी मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्‍या कुकरच्या शिटीकडे दुर्लक्ष करत,
मुलीच्या शाळेच्या तयारीवर
-नी मागून येणार्‍या बांगड्यांच्या किणकिणाटावर-
एक डोळा ठेवून,
तु पिठाने भरलेल्या हातून दिलेला,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तुझ्या हातचा चहा प्यायल्यावर
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?

========

आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीपर्यंत पोचून,
तिथे पडलेला, कुठला का असेना
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडायला जमवत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्‍या आवाजांकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर
-नी त्याहून अधिक काही दिसलं तर इतर कशावरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्‍यावर येणार्‍या चहाच्या वाफेचा अंदाज घेत,
स्वतःच केलेल्या चहाचा,
चटका न बसता, न सांडता,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु आठवणीत आलीस नी
वेगळे नॉस्टॅल्जिक व्हायचे राहुनच गेले!

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

वा! वेगळीच आहे कविता! आवडली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान... आवडली कविता/ मुक्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पोष्टम्यारिज सेटल्ड लाईफचे चेरिशिङ्ग उत्तम जमले आहे, यद्यपि खुद्दांनी अजून अण्भव घेतला नसलेने पूर्णत्वेकरोन अप्रीशिएटवू शकलो नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहे, आवडली.

एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडायला जमवत,

हे तर अगदी खासच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

कविता छानच आहे. पण सकाळच्या पहिल्या चहाच्या वेळी कुकरची शिटी ही टाईम मिसमॅनेजमेंटची एक शक्यता वाटते. सकाळी कुकरमध्ये शिजवलेले काही आवश्यक असल्यास कुकरची शिटी रात्रीच करवून घेणे सोयीचे असते.

शिवाय पिठाने माखलेला हात म्हणजे कणीकही सकाळीच मळता काय?

आणि या सर्व किचनमधल्या रणधुमाळीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तुम्हाला गॅलरीत ताजा वाफाळता चहा हातात मिळतो. आणि तुम्ही बिस्कीट घेऊन तयारही असता.

हा नॉस्टाल्जिया की स्वप्नरंजन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जगातल्या सर्वात गहन प्रश्नांना अनेकदा सोपी, सहज समजण्यासारखी उत्तरे असतात. पण हाय! योजकस्तत्र दुर्लभः|" असे थोरांनी (म्हणजे कोणी?) म्हणून ठेवलेलेच आहे.

सकाळच्या पहिल्या चहाच्या वेळी कुकरची शिटी ही टाईम मिसमॅनेजमेंटची एक शक्यता वाटते. सकाळी कुकरमध्ये शिजवलेले काही आवश्यक असल्यास कुकरची शिटी रात्रीच करवून घेणे सोयीचे असते.

शिवाय पिठाने माखलेला हात म्हणजे कणीकही सकाळीच मळता काय?

वर उद्धृत केलेल्या उक्तीस अनुसरून, "ते सकाळचा पहिला चहा (सकाळी) अकरा वाजण्याच्या सुमारास घेत असतील" या शक्यतेकडे आपले दुर्लक्ष व्हावे, याचे आश्चर्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते ५ वाजता उठतात. ६ तास चहासाठी ताटकळतील वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते ५ वाजता उठतात.

कोणी सांगितले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हुंडा हा अन्याय स्त्रीवरील नसून पुरुषप्रधान संस्कृतीत संपत्तीची मालकी असलेल्या पुरुषावर आहे" अशी रोचक चर्चा चालली असताना, विषयाबद्दल काहीच न बोलता हुंडा शब्दाचा बंगालीत काय अर्थ होतो, इ इ असले प्रतिसाद देणारे तुम्ही!!! तुम्हाला कसे ठाऊक कोणी कोणी काय काय सांगीतले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यांनी फक्त विचारले आहे, त्यांचे कुतुहल न शमवता १८७५ च्या लढाईचा दाखला देणारे तुम्ही कोण? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हुंडा हा अन्याय स्त्रीवरील नसून पुरुषप्रधान संस्कृतीत संपत्तीची मालकी असलेल्या पुरुषावर आहे"

या चर्चेची लिंक द्या ना. उत्सुकता चाळावली गेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सकाळी ११ वाजता कोवळी उन्हे डोळ्यावर घेण्याची इच्छा बाळगणारा दुर्दम्य आशावादीच हवा! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किंवा ध्रुवीय प्रदेशाजवळ राहणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सकाळी अकरा वाजता उठल्यानंतर, जी डोळ्यांवर पडतील ती उन्हे कोवळी मानून घ्यावीत, असे आमचे जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगते. (तुमच्याबद्दल कल्पना नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

If the shoe doesn't fit, must we change the foot?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तशी कविता कळवून घ्यायची आमची अक्कल लिमिटेड आहे, पण मला हा प्रकार ट्रॅजेडी कवितेचा वाटला. ती दुरावल्याने त्या प्रकारे चहा पिण्याचा नि तिची आठवण करण्याचा प्रकार इतका अंगवळणी पडला आहे कि आता त्याला स्मृतिरंजन कसे म्हणू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खरे आहे...

मुलीच्या शाळेच्या तयारीवर

या वाक्याकडे अंमळ दुर्लक्ष झाले होते. मुलगी शाळेत जाते आहे म्हणजे लग्नाला किमान ५ किंवा त्याहून अधिक वर्षे झाली आहेत. मुलगी शाळेची तयारी करत असताना आणि किचनमध्ये सकाळच्या हातघाईची परिस्थिती असताना बिस्कीटाची जय्यत तयारी करुन गॅलरीत उभे राहणाऱ्यास वाफाळता चहा हातात तयार मिळणे हे कल्पनाविलासाचे उदाहरण आहे.

स्मृतिरंजनाऐवजी कल्पनाविलास असा शब्द योग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलगी शाळेत जाते आहे म्हणजे लग्नाला किमान ५ किंवा त्याहून अधिक वर्षे झाली आहेत.

या प्रतिपादनामागे एक भले मोठे गृहीतक दडलेले आहे, हे मान्य करण्यास जर आपली हरकत नसेल, तर ते गृहीतक मान्य करण्यास मला प्रत्यवाय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते गृहीतक मान्यच आहे. (संबंधितांनी हलकेच घ्यावे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. बदल नेमके टिपणारी.

अवांतर -

आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक कविता लिहायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
संगणकापर्यंत पोचून,
तिथे मुबलक असणार्‍या, कुठल्या का असेना,
खळबळत्या संकेतस्थळावर जाऊन,
वाफाळत्या चर्चांसोबत, एकीकडे एकेका श्रेणीचा तुकडा जमवत,
कोवळ्या चंद्रकिरणांना स्क्रीनवर न पडू देत,
बाहेरून येणार्‍या पॉपअप्सकडे दुर्लक्ष करत,
शेजारच्या किटकिटणार्‍या संस्थळांवर
-नि त्याहून अधिक काही दिसलं फेसबुकावरही-
एक डोळा ठेवून,
कवितेवर येणार्‍या खवचट/रोचक/मार्मिक प्रतिक्रियांचा अंदाज घेत,
स्वतःलाच सुचलेल्या शब्दांना,
शुद्धलेखनाचा फटका न मारता, न सांडता
पहिला ढीग रचून पाहू.
पण छे! पुन्हा तो स्युडोसेक्युलरविरोधी क्रुसेडर धाग्यावर आला
नि कवितेला नॉस्टॅल्जळायचे राहूनच गेले.

१. श्रेयअव्हेर - रावसाहेबांनी वेळोवेळी दिलेल्या कानपिचक्या
२. पाठभेद - ब्रुसेडर
३. असा एखादे नवीन क्रियापद पाडल्याशिवाय वर्जेशोत्तर मराठी कविता सिद्ध होत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला एक कायमस्वरूपी सलाम धाडून देतो. दरवेळी कसं काय मार्मिक लिहायला जमतं! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निव्वळ थोर _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर्जेशोत्तर = ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

वर्जेश सोळंकी. त्यांच्या कविता मीही अजून वाचल्या नाहीत. (तसा योग आला नाहीय)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मला वाटते, त्यांची पृच्छा ही 'वर्जेश' या शब्दार्धाबद्दल नसून 'उत्तरा'र्धाबद्दल असावी. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्हींबद्दल होती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता.... अं........... ए हां, 'काव्यमय स्फुट' आवडलं Smile

मात्र "कोराकरीत", "एकदाच घडी मोडलेला" आणि "कुठला का असेना" या पेपराच्या स्थित्यंतराचा मेळ जमवतोय अजून !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

> पोष्टम्यारिज सेटल्ड लाईफचे चेरिशिङ्ग उत्तम जमले आहे (इति बॅटमॅन)
+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारुण्यमय कविता. तरुणवयातली तिला खिडकीतून पाहण्याची हुरहूर, मध्यमवयात तिच्या सहवासाचा गोडवा आणि वृद्धपणी ती गेल्यावर राहिलेल्या तिच्या आठवणी. एकाच कृतीत हळूहळू घडलेले बदल आणि अपेक्षाही छान टिपलेल्या आहेत. तरुणपणचा नवाकोरा पेपर, मध्यमवयात थोडासा वापरलेला होतो आणि वृद्धपणी तो उघडण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात हेही निरीक्षण समर्पक.

समोर स्वप्न असतं किंवा स्वप्नपूर्ती अनुभवत असतो तेव्हा मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही. याउलट ते हातून निसटून गेलं की मग नॉस्टेल्जियापलिकडे हाती काहीच राहत नाही हे सहजपणे सांगितलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह. असं आहे होय. आता पेपरांचा मेळ जमला. नुसता पेपरांचाच नाही तर चहाचा, "...त्याहून अधिक काही दिसलं तर..." याचा सुद्धा.....धन्यवाद.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

लेखन आवडले. धन्यवाद.
एकुणात तुमची 'छत्री' दुरुस्त न होण्यातच आमचा फायदा आहे असे दिसते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. (ऋ निवडणूकांशिवायही काही विचार करतो आहे याचाही आनंद झाला आणि नंदनला प्रतिसादात का होईना लिहीतं केल्याचाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी आवडली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.poets.org/viewmedia.php/prmMID/15384
तू मला कसा आवडतोस (कशी आवडतेस)? तर्‍हा मोजू दे मला
How do I love thee? Let me count the ways.

(तर्‍हांची नावे मनातल्या मनात असतील. प्रतिसादांची संख्या म्हणजे मोजणी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अर्थात, पॉइंट वेल टेकन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा पेचात पाडणारा सवाल.विचारू नका हो..
खरं सांगितलं, तर ऋषिकेश नाराज होणार आणि खोटं सांगितलं, तर पाप माथी लागणार..
(ऋषिकेश हलके चेणे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. संवेदनशील आणि हळवी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानेय...कविता आवडली... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

मी म्हणतो विषय कट भाव अश्याच कविता व्हायला पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

खुपच छान!! कविता आवडली आणि कवितेचा नविन फॉरमॅट ही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आणि नंदन ची कविता, दोन्ही आवडल्या.
मी आणि माझा एक मित्र, जेंव्हा सपत्नीक भेटतो, तेंव्हा मधेच माझा मित्र आणि मी नॉस्टॅल्जिक होतो. सहाजिकच त्या दोघी बोअर होतात.अशा वेळेस, माझ्या मित्राची पत्नी, आता हे दोघं फ्लॅशबॅक मधे गेले आहेत, असे म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्यातील मोहक अन शेवटी चटका लावणारे टप्पे Sad
पाणी आलं डोळ्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down