आजोबा तुम्ही पुअर आहात का?

(माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना, त्याचाच शब्दात).

माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात, तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे.

रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत? जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ. तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही? आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे. आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही. खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा,तुमच्या कडे कार नाही का? मी म्हणालो, स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’. खैर, हलवाईच्या दुकाना जवळ पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे). मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते.

अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच पुटपुटली, जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का?

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लहान पोर ते, काहीही समजत नसतंय.
रिच आणि पुअरची कल्पना कुठून तरी ऐकली असेल. हे नक्की पोराचं मत म्हणावं की त्याच्या आजूबाजूला दिवसाचा बारा पंधरा तास वेळ घालवणाऱ्या माणसाचं?

बर्‍याचदा लहान मुलं जे बोलतात त्यावरून त्यांचे आई-बाप एकमेकांशी काय बोलत असावेत याचा अंदाज येतो.
इतक्या कमी वयात आई-वडिलांचाच सर्वात जास्त प्रभाव असतो.

Hope is NOT a plan!

लहान मुलं बोलतात अस कधितरि ... ते त्यांचं मत नसतं. पण ते लागतं मनाला ... त्याला इलाज नाही. भौतिक सुखाची मुलांना इतकी सवय झाली आहे की त्या शीवाय त्यांचे पान हलत नाही. भारतात तरीही आपण प्रयत्न पुर्वक काही सवयी लाउ शकतो, पण परदेशात ते अजुन च कठीण होऊन जाते.

चालायचंच. मी नॉन वेज खात नाही, म्हणजे शिवतच नाही असं नाही, प्रेफरन्स देत नाही, 'म्हणून' आमचे साडे सहा वर्षांचे सुपुत्र आम्हाला चक्क 'मागास' समजतात. असतात काही काही लोकांचे काही काही निकष.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

आईवडिलांना मागास आणि बोरिंग समजणे हा पोरांचा अनादिकाळापासूनचा खेळ असावा. नॉनव्हेज न खाणे या विशिष्ट निकषाला तितकेसे महत्त्व नाही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आईवडिलांना मागास आणि बोरिंग समजणे हा पोरांचा अनादिकाळापासूनचा खेळ असावा.

म्हणणे खरे आहे, पण 'आमच्या काळी' ही फेज़ इतक्या लहानपणीच सहसा येत नसे. शिंगे फुटू लागेपर्यंत ही अवस्था सहसा वाट पाहत असे.

अर्थात, यामागील रहस्य 'आजकालच्या पोरां'पेक्षा आम्ही अधिक 'गुणी'बिणी होतो वगैरे काहीही नसून, 'आमची टाप नव्हती' या साध्यासोप्या बाबीत आहे. आणि याचे श्रेय आमच्या उपजत गुणांना (रादर, 'गुणां'च्या अभावास) नसून, आमच्या पालकपिढीकडून (आणि, जिवंत असल्यास, त्यांच्याही पालकपिढीकडून) चहुबाजूंनी सतत होणार्‍या पावलोपावली उपदेशांच्या आणि 'संस्कार'नामक ब्रेनवॉशिंगच्या भडिमारास जाते.

मराठी मध्यमवर्गीय पालकांच्या या दोन पिढ्यांचा पकाऊपणामध्ये हात तमाम त्रिभुवनात कोणी धरू शकेल, किंवा कसे, याबद्दल आम्ही व्यक्तिशः साशंक आहोत. शिवाय, तुलनेने यांपैकी एखादा नमुना अश्मविट्टिकान्यायाने जरा कमी पकाऊ निघाल्यास त्याचेही श्रेय उगाळूनउगाळून वसूल करून घेण्यास सहसा चुकत नसे, ही दुधात-साखर-किंवा-दुधावरील-मलई-तुम्ही-जे-काही-म्हणत-असाल-ते-वजा बाब असेच. असो. 'रम्य ते बालपण' असे म्हणावयाचे संस्कार आम्हांवर आमच्या मराठीच्या तमाम मास्तरमास्तरीणपिढीने केलेले आहेतच; त्यांस स्मरून आमचे हे चिमुकले भाषण आता आवरते घेतो. जय हिंद, गॉड ब्लेस अमेरिका.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

आज चक्क मूळ विषयाच्या मर्माशी १००% रिलेव्हंट प्रतिसाद??

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

...खरे आहे. आता प्रायश्चित्त घेणें आलें!

जोक्स अपार्ट, पण अधूनमधून, ज्या विषयांत मला चुकूनमाकून थोडीफार गती अथवा गम्य आहे (असे किमानपक्षी मला तरी वाटते), अशा विषयांत, विषयास (माझ्या कल्पनेप्रमाणे) अनुसरून कधीमधी प्रतिपादतो झाले.

कन्सिडर इट अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंट. अशी गलती इतःपर होणार नाही, याची (जमल्यास) खबरदारी घेईन.

(आफ्टर ऑल, आय ह्याव अ रेप्युटेशन टु मेण्टेन!)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

म्हणणे खरे आहे, पण 'आमच्या काळी' ही फेज़ इतक्या लहानपणीच सहसा येत नसे. शिंगे फुटू लागेपर्यंत ही अवस्था सहसा वाट पाहत असे.

खरंय, पण इर्रिव्हिअरन्सची सुरुवात त्याआधीही होते. शिंगांचे अंकुर बहुधा तेव्हाच दिसू लागत असावेत. म्ह. शाळेतल्या बाईंनी/सरांनी सांगितलेले तेवढेच खरे, इ.इ. ही सुरुवात आहे. त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता ती पायरी येते.

मराठी मध्यमवर्गीय पालकांच्या या दोन पिढ्यांचा पकाऊपणामध्ये हात तमाम त्रिभुवनात कोणी धरू शकेल, किंवा कसे, याबद्दल आम्ही व्यक्तिशः साशंक आहोत. शिवाय, तुलनेने यांपैकी एखादा नमुना अश्मविट्टिकान्यायाने जरा कमी पकाऊ निघाल्यास त्याचेही श्रेय उगाळूनउगाळून वसूल करून घेण्यास सहसा चुकत नसे, ही दुधात-साखर-किंवा-दुधावरील-मलई-तुम्ही-जे-काही-म्हणत-असाल-ते-वजा बाब असेच. असो. 'रम्य ते बालपण' असे म्हणावयाचे संस्कार आम्हांवर आमच्या मराठीच्या तमाम मास्तरमास्तरीणपिढीने केलेले आहेतच; त्यांस स्मरून आमचे हे चिमुकले भाषण आता आवरते घेतो. जय हिंद, गॉड ब्लेस अमेरिका.

पूर्ण सहमत. तदुपरि अश्मविट्टिकान्यायावरून संस्कृत साहित्यात १६ की ३२ प्रकारचे न्याय दिलेत त्यांबद्दल ललित मासिकात कधीकाळी एक लेख आला होता ते स्मरले. पाहतो घरी गेल्यावर धुंडाळून.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हा हा हा. मला माझा सहा वर्षांचा मुलगाही त्याला आमच्याकडे कार नव्हती असं सांगितल्यावर 'देन व्हॉट डिड यु डू? डिड यु वॉक एव्हरीव्हेअर?' असं आवाजात प्रचंड अविश्वास आणून म्हणालेला आहे. फोन नाही, इंटरनेट नाही, टीव्ही नाही असं माझं लहानपण ऐकून त्याला मी त्याची नेहमीप्रमाणे खेचतो आहे वाटतं आणि तो विचारतो 'राजेश, आर यू डुइंग गंमत?'

श्रेक मधल्या एका दृष्यात, डाँकिला फेअरीचा स्पर्श होतो आणि तो उडायला लागतो आणि अतिशय स्टाईलिशली "thats right Pooh, I can fly" सांगतो तेव्हा 'हि फ्लाईज?!', 'हि फ्लाईज??!' चे चित्कार होत असताना टेबलामागचा कर्तव्यदक्ष सेनाधिकारी मात्र अविश्वासाने उच्चारतो - 'हि टॉक्स?'!! त्याचप्रमाणे 'रोचक' श्रेण्यांचे पटके उडत असताना माझ्या डोक्यात आलेला प्रश्न - "तुम्हाला तुमचा मुलगा 'राजेश' म्हणतो? अगदी सोळा वर्षांचा असल्यामुळे मित्रवत असला तरीहि??" Smile

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"तुम्हाला तुमचा मुलगा 'राजेश' म्हणतो? अगदी सोळा वर्षांचा असल्यामुळे मित्रवत असला तरीहि??"

सोळा नाही हो, सहाच. तेवढंच मला लहान असल्यासारखं वाटतं. Smile त्याच्याशी वागताना आत्तापर्यंत तरी मी 'त्याच्यापेक्षा १ वर्षाने लहान' बनून वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अनेक वेळा तोच मला ओरडतो. आम्ही ड्राइव्ह करत असताना मी त्याच्याकडे हट्ट करतो 'मला समोरच्या गाडीला ढॅण करायचं आहे' मग तो मला रागावून सांगतो 'यू आर नॉट अलाउड टु ढॅण एनी कार!' त्यालाही थोडा अधिकार गाजवल्याचं समाधान मिळतं.

एक बारका मुद्दा मांडतो. तुमच्याबद्दल "मला माझ्या बाबाशी मोकळेपणी वागता येतं." हा विश्वास त्याच्या मनात असावा हा विचार बरोबर आहे. वय, संस्कार, 'असं चारचौघात / आपल्यात करत नाहित' वगैरे गोष्टी कधी कधी आपण आणि आपल्या मुलांमधे निष्कारण आड येतात. पण त्याचबरोबर "गरज पडली तर हा माझा - नेहेमी मित्र बनून बरोबरीत वागणारा - बाबा, बाप बनून माझ्यामागे खंबीरपणे उभा राहील" हेही त्याला जाणवेल ना हे बघा.

माझ्या मुलींबरोबर दोन खेळ खेळायचो ते आठवले - ग्रोसरीला जाताना ती बाबा व्हायची आणि मी तिचा मुलगा - पैसे द्यायची वेळ येईस्तोवर अर्थात! धम्माल येते. Lol मुलं काय बाSSSरीक निरिक्षण करतात. एकच उदाहरण - वाचता तर यायचं नाही पटापट. पण प्रत्येक बॉक्स दहा - बारा सेकंद डोळ्यापुढे धरून मग घ्यायची. का म्हणून विचारलं तर कीव करणार्‍या चेहेर्‍याने उत्तर आलं - "नूट्रीशन बघत्येSSय". दुसरा खेळ म्हणजे दहा मिनिटं ती आई व्हायची, बायको बाबा व्हायची आणि मी त्यांची मुलगी - It was simply amazing to see what exactly 'you' are in their mind. अगदी जरूर करून पहा. याचा बोनस फायदा म्हणजे मुलीची diplomatic immunity वापरून बायकोला, अतिशय निरागसपणे :-), कुजकट/खवट प्रश्न विचारता येतात!!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आमचेही चिरंजीव आम्हांस (त्यांच्या) लहानपणी अतिशय खणखणीत आवाजात, चारचौघांत नावाने हाक मारत असत. (गेले ते दिवस!)

पुढे कधीतरी, इण्डियातून जाऊनयेऊन असणार्‍या कोणी अतिशय वैट्ट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!!! दुष्ष्ष्ष्ष्ष्ट!!!!!!!पणे त्यांच्यावर "अरे, बाबा आहेत ना ते तुझे? त्यांना अशी नावाने हाक नाही मारायची! त्यांना 'बाबा' म्हणायचे. म्हण: 'बाऽऽऽऽबा'!" असे 'संस्कारां'चे प्रयोग करण्याचे प्रयत्न केल्याने म्हणा, किंवा शाळेत जाऊ लागल्यापासून इतर पोरांचे पाहून म्हणा, दुर्दैवाने आमचे चिरंजीव आम्हांस 'ड्याडी' अथवा 'ड्याऽऽऽऽड!!!' असे संबोधू लागले.

कालाय तस्मै नमः!

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

मी माझ्या वडीलाना 'अहो दादा' म्हणतो. आणि अगदी मारबीर नाहि खाल्ला, त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं अशी परिस्थिती नसली तरी एकंदरीतच "मुलांशी खेळीमेळीत रहावं" हा प्रकारही नव्हता. आता माझ्या मुली मला 'अरे बाबा' म्हणतात, मोकळेपणाने बोलतात, मी झोपलेलो असताना माझ्या बोटाना नेलपॉलीश लावून ठेवतात, कधीतरी झोपल्यावर माझी मिशी कापायचा प्लॅन आहे त्यांचा हे फार बरं वाटतं. आणि "हवं तर मिशी कापा, पण ड्याडी नका म्हणू" सांगितल्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणी आल्यावर सुद्धा मी 'बाबा'च असतो! पण त्यानी मला नावाने हाक मारलेली मात्र नाही चालणार!! का ते सांगणं कठीण आहे. विचार करावा लागेल. पण नाही चालणार हे नक्की. "एक वेळ ड्याडी म्हणा, पण नावाने नका हाक मारू" Lol

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

Smile चालायचंच.

===
Amazing Amy (◣_◢)

Kids say the damnedest things... त्याला नको तितके महत्त्व देऊन, सुतावरून स्वर्ग गाठून काहीबाही निष्कर्ष काढणारा, तो येक मूर्ख.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

माझ्या आज्जीकडे चूल होती, त्यावरुन मी आणि माझ्या इतर भावंडांनी ती कशी गरीब आहे हा समज करून घेतला होता ते आठवले. आज्जीनं मात्र त्यावर ते तीचं सिग्नेचर गोड हसून 'काय करू बाबा, तूच आता मला स्टोव्ह आणून दे' असे म्हंटले होते.

'आजोबा, तुम्ही पुअर आहात का?' या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर बहुधा 'होऽऽऽऽ' हेच असावे.

(सवांतर: आपल्या उपरोल्लेखित समजामागे आपल्या आईवडिलांची शिकवण अथवा आपल्या दिवसातील बहुतांश वेळ आपल्या आजूबाजूस असणार्‍या मोठ्या माणसांच्या संभाषणांतून आपण उडतउडत ऐकलेले काही कारणीभूत होते, अशा निष्कर्षाप्रत उडी मारण्याची घाई निदान मी तरी करणार नाही. रादर, आय वुड गिव क्रेडिट टु युअर ओन इण्डिपेण्डण्ट, क्रिएटिव थिंकिंग, व्हेअर इट इज़ परहॅप्स ड्यू.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

रादर, आय वुड गिव क्रेडिट टु युअर ओन इण्डिपेण्डण्ट, क्रिएटिव थिंकिंग, व्हेअर इट इज़ परहॅप्स ड्यू -

अग्रिड.

पोट्ट्याईले डोक्यावर बसवायच्या इरूद्द हाये मी.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पोट्टयाइले आंत्रांतच वसू देणेचे इरुद्द तुम्ही आहात असे तुमच्या एका प्रतिसादात जाणवले होते.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

पोट्टयाइले आंत्रांतच वसू देणेचे इरुद्द तुम्ही...

म्हणजे? पोरांना आतड्यांत कसे बसवतात?

अहो, योनिमुखे शुक्ररससंक्रमण करोनी, बीजांडाशी शुक्राणूचा मिलाप करवोनी, गर्भाशयात गर्भ स्थापना करोनी, नंतर त्यांस जन्म देओनी, परावलंबी अर्भक, मूल स्वावलंबी होइतो पाळोनी जगण्याच्या जगन्मान्य प्रकाराला आडकिता परोपजीवी-परापकारी समजतात.

मागे लहान मुलांवर धागे होते. त्यात त्यांचा तसा स्पष्ट प्रतिसाद होती.
http://www.aisiakshare.com/node/1519#comment-20545

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

.

===
Amazing Amy (◣_◢)

एका दृष्टीने पाहिले तर ते बरोबरच आहे की. दरवेळी समाज, भावभावना, इ. चा विचार करावाच असे मला वाटत नाही. सगळं गुडीगुडी असतं असं तर नाहीच नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी कुठल्या गोष्टी मेडिकली चूक आहेत ते सांगा. त्याचे इंटरप्रिटेशन कसे करायचे तो वेगळा भाग झाला, पण मेडिकल सत्य तरी ते आहेच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सत्यतेला मी नाकारूच शकत नाही. तो प्रश्न नाही. पण सत्याचे वर्णन करण्याची पद्धत असते.
२०१४ निवडणूकीला , ज्यांची राज्यकर्ता ठरवण्याची क्षमता, बुद्धी कोणत्या सेन्सीबल आधारावर ठरवली गेली नाही अशा रँडमली ओरियेंटेड ८० कोटी लोकांनी, त्यात काहींनी अनुपस्थितीत राहून, किती लोकांमागे एक उमेदवार याची बेहिशेबी समीकरणे असून, मागच्या सरकारला नक्की विटलो का नाही नि विटलो तर केव्हा हे माहित नसताना, आणि असले तरी त्याच्याशी संबंध नसलेल्या वेळेला, प्रत्येक मतदाराने एकमेकापासून लपून, ज्या प्रक्रियेने सर्वाधिक लोकांना हवे असे म्हणताच येत नाही असे , म्हणजे सत्ताधारी अलायन्सला पडलेल्या मतांपैकी ३५% ते ४०% मते असतात म्हणून, नि उरलेल्या ६५% ते ६०% लोकांना यांचा नक्की किती द्वेष होता हे माहित नसताना, लोकांची सत्ता म्हणून, म्हणजे जिथे प्रत्यक्ष लोकांनी सरकार चालवले पाहिजे, ज्यांत कितीतरी गोष्टींचा उहापोह आला, तिथे केवळ ५ वर्षांत एक वेळेस एका माणसाचे नाव घेऊन बोळवण करून, म्हणजे ५ वर्षांत एक दिवस उठून एक मिनिटात सारे निर्णय घेण्याचा मूर्खपणा , इ इ म्हणणे बरोबर आहे का? तर हो. सत्यच आहे ते. पण लोकशाहीचा आदर करावा हा संकेत आहे.

लोकशाही , इ फार कृत्रिम प्रकार आहे. लेकरांना ....

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

ते उगा राजकारणाचं उदाहरण, अन त्याचा संबंध काय, काही समजलं नाही.

शुगर कोटिंग करून गोळ्या द्याव्या लागाव्यात इतक्या नेणत्या वयाचे तुम्ही असाल असे वाटले नव्हते Wink
अहो, जे खरे आहे ते आहेच! What is wrong in calling a spade a spade?

मुले जन्मानंतर परोपजीवी नसलीत तरी परावलंबीच असतात, अन त्या परावलंबी अवस्थेत त्यांचा सांभाळ केला जावा म्हणून 'वात्सल्य' नामक केमिकल लोचा मेंदूत उत्पन्न होतोच होतो. भले मोठा होऊन म्हातारपणी तो तुमचे जे करेल ते करणारच हे दिसत असते, ठाऊक असते. पोटचा गोळा आहे म्हणून काय वाट्टेल ते विचित्र निर्णय लोक घेतात. (अशी वागणूक प्राण्यांतही दिसते.)

ते जौ द्या,
१. गर्भातले मूल परोपजीवी नसते,
किंवा, २. लहान मुले परावलंबी नसतात,
यातील एकाही वाक्यास सिद्ध करून दाखवा?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मुले, म्हातारे आणि असाध्य-रोगी परावलंबी असतात पण त्यांचा येनकेनप्रकारे दुसर्‍यास फायदा होत असल्यास त्यांना पोसावे अन्यथा न पोसण्याचा पर्याय आहेच.

आँ? मोदी एट ऑलचा इथे संबंध नै हो. ते वाक्य अपोलिटिकल होऊन पाहणे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आजोबा घरी आले की आम्ही आईच्या तक्रारी त्यांना सांगायचो; आणि ते तिला कधीही, काहीही ओरडायचे नाहीत. तेव्हा ते भयंकर, दुष्ट, खलनायक वगैरे वाटायचे. आईच्या समोर नकार देतात म्हणजे काय! तेवढा एक प्रकार वगळता ते एकदम कूल होते. एका दिवसात वाट्टेल तेवढे आंबे खाणं, त्यांच्या हातचं खाण्यासाठी हट्ट करणं, धावत रस्ता ओलांडणं इ गोष्टी फार काही वाईट नाहीत हे मी त्यांच्याकडूनच शिकले.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. आडकित्ता यांनी मुलांना डोक्यावर बसवू नये असे म्हटले.
२. मी आठवण करून दिली कि ते म्हणाले होते कि मुले पॅरासाईट असतात, आईच्या शरीरात असताना नि दोन्ही पालकांच्या जीवनातही लहान असे पर्यंत.
३. मी माझ्या प्रतिसादात ते शास्त्रीय सत्य स्पष्ट मान्य केलं आहे. मी पुढे जाऊन असेही म्हणेन की पॅरासाईट तर यजमानास जीवे मारत नाहीत. काही मुले जन्मावेळी आयांना मारतातच. म्हणून त्यांना प्रिडेटर वा भक्षक असेही म्हणण्यात यावे. त्यांना डोक्यावर बसवू नये हे ठीकच, पण ते भक्षकच आहेत तर मारूनच टाकावे असा देखिल युक्तिवाद करता येईल. आपण करा. मी तांत्रिक सहमती दाखवेन.

मग-
४. पॅरासाईट म्हणजे परोपजीवीची एक व्याख्या आहे. वास्तवात ती अपूरी आहे. त्याला प्रोजेनी अपवाद असायला हवी. कारण इथे नात्याचं स्वरुप वेगळं आहे.
५. भाषा वापरायची मर्यादा असते. लोकशाही म्हणजे लोकांचे सरकार ही संकल्पना किती प्रकारे तद्दन मूर्खपणाची आहे ते मी वर लिहिले आहे. त्यात काहीही असत्य नाही. पण ८० कोटी लोक जे आनंदाने करतात त्याला घालून पाडून बोलणार? अर्थातच लोक असे करत नाही. लोकेच्छेला सन्मान देतात. तुम्ही मला हे सिद्ध करा वा ते सिद्ध करा असे दोन चॅलेंज दिले आहेत. भारतातल्या लोकशाहीत कोणत्याही प्रकारचा शहाणपणा आहे हे सिद्ध करा असा मी तुम्हाला चॅलेंज देतो. समजा तो आहे वा नाही, पैकी काहीही सिद्ध झाले तरी त्याला गाढवांचा गोंधळ, मूर्खांचा बाजार, इ इ मनातून म्हणणार नाही.

What is wrong in calling a spade a spade? मुले जन्मानंतर परोपजीवी नसलीत तरी परावलंबीच असतात, अन त्या परावलंबी अवस्थेत त्यांचा सांभाळ केला जावा म्हणून 'वात्सल्य' नामक केमिकल लोचा मेंदूत उत्पन्न होतोच होतो. भले मोठा होऊन म्हातारपणी तो तुमचे जे करेल ते करणारच हे दिसत असते, ठाऊक असते. पोटचा गोळा आहे म्हणून काय वाट्टेल ते विचित्र निर्णय लोक घेतात. (अशी वागणूक प्राण्यांतही दिसते.)

This is statement on correctitude of the nature. हे करण्यासाठी आणि असे करण्यासाठी कर्ता, तांत्रिकदृष्ट्या, निसर्गापलिकडचा असायला हवा. आता आपण असे आहात कि नाही त्याची मला कल्पना नाही.

पण सामान्य लोकांत निसर्ग सम्यक आहे नि नाही अशा दोन विचारसरणी आढळतात. आपल्या व्यक्तिगत नाही या विचारधारेचा मला आधार आहे. आपण सगळ्या मानवी भावनांना रासायनिक लोचे म्हणू शकतात. याचाही अतिरेक करून निसर्गात काहीच चांगलं नाही असंही म्हणू शकता. त्यातल्या प्रत्येक गोष्टीची हेटाळणी करू शकता. जगातली प्रत्येकच गोष्ट लोचा आहे असे म्हणू शकता. तरीही आपण फारच सौम्य आहात. 'शास्त्रीय' विचार करून विश्व फार वेगळे असायला हवे होते, विश्वच नसायला हवे होते नि चक्क चक्क विश्व नाहीच असे मानणारे बरेच 'शास्त्रज्ञ' जगात आहेत. मानवाच्याच कल्याणासाठी निसर्गाचा अतिशय निरपेक्ष बुद्धीने अभ्यास करताना अशी निरीक्षणे केली असतील तर मला त्यांचा नितांत आदर आहे. परंतु अशा अभ्यासाला डे टू डे जीवनात अप्लाय करताना खूप काळजी घेतली पाहिजे असे मत आहे.

इस्पिकला इस्पिक म्हणायला काही हरकत नाही. पण काही सामाजिक संकेत आहेत. 'मुल परजीवी असते' अशी भावना अशास्त्रीय वर्तुळांत प्रसिद्ध होऊ लागली तर काय होईल? एरवी जी स्त्री मातृत्वाने हुरळून जाते, तिच्या दृष्टीकोनात अति प्रचाराने फरक पडू शकतो. मी स्वतः निसर्गात कोणता लोचा नाही असे मानतो. मानवी संस्कृतींच्या विकासाच्या दरम्यान किती एक कृत्रिम प्रथा, विचार, विचारसरणी तयार झाल्या आहेत. त्या पैकी बर्‍याच जणींचा मानवाच्या सौख्यात वृद्धी करण्यात महत्त्वाचा हिस्सा आहे, परंतु इतर बर्‍याच विचारसरणींना , विचार म्हणून, गंमत म्हणून ठिक घ्यावे. पण अंमलात आणताना आस्ते आस्ते फुंकून फुंकून घ्यावे.

मुले पॅरासाइट आहेत हे स्पेडला स्पेड म्हणून बोलायची पद्धत फोफावली तर काकूची ओळख करून देताना, "या क्षक्षबाई, यांचा नि माझ्या वडिलांच्या भावाचा दीर्घकालीन लैंगिक संबंध आहे" असे सांगायची पद्धत चालू होईल. असत्य काय त्यात?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

अहो, मूळ लेख काय आणि तुम्ही म्हणताय काय?

माताय, ह्या प्रतिसादांच्या प्रभावामुळे आजोबाच व्हायचे नाही असे ठरवत होतो, पण ते काही माझ्या हातात नाही हे लक्षात आले आणि मन म्हणाले "यु पुअर सोक्या!"

- (पुअर) सोकाजी

----------------------------------------------------------------------------------------
मन म्हणजे आयडी नव्हे, माझे मन, पर्सनल, स्वत:चे

इस्पिकला इस्पिक म्हणायला काही हरकत नाही. पण काही सामाजिक संकेत आहेत. 'मुल परजीवी असते' अशी भावना अशास्त्रीय वर्तुळांत प्रसिद्ध होऊ लागली तर काय होईल? एरवी जी स्त्री मातृत्वाने हुरळून जाते, तिच्या दृष्टीकोनात अति प्रचाराने फरक पडू शकतो. मी स्वतः निसर्गात कोणता लोचा नाही असे मानतो. मानवी संस्कृतींच्या विकासाच्या दरम्यान किती एक कृत्रिम प्रथा, विचार, विचारसरणी तयार झाल्या आहेत. त्या पैकी बर्‍याच जणींचा मानवाच्या सौख्यात वृद्धी करण्यात महत्त्वाचा हिस्सा आहे, परंतु इतर बर्‍याच विचारसरणींना , विचार म्हणून, गंमत म्हणून ठिक घ्यावे. पण अंमलात आणताना आस्ते आस्ते फुंकून फुंकून घ्यावे.

मुले पॅरासाइट आहेत हे स्पेडला स्पेड म्हणून बोलायची पद्धत फोफावली तर काकूची ओळख करून देताना, "या क्षक्षबाई, यांचा नि माझ्या वडिलांच्या भावाचा दीर्घकालीन लैंगिक संबंध आहे" असे सांगायची पद्धत चालू होईल. असत्य काय त्यात?

म्हणूनच तर इथे आनलैन फोरममध्ये तसे म्हटल्या गेले आहे. रियल आणि व्हर्च्युअल जगांत काहीएक फरक आहेच की. प्रत्यक्ष काही गोष्टी काही कारणाने बोलावयास संकोच वाटतो त्या आनलैन फोरममध्ये बिनदिक्कत बोलता याव्यात असं मला वाटतं. तेवढाच निचरा झालेला बरा. आता आडकित्तासाहेबांचा बोळा तुंबून राहिलाय इ. मला वाटत नै, पण "हे बरोबर तर आहेच, पण जण्रल लोकांत पसरले तर काय होईल" ही भीती अनाठायी आहे.

अंमळ तुमच्याच मेथडने इकडे पाहू.

टोटल इंटरनेटचा साईझ किती? यूजरबेस किती?
त्यात भारतीयांचा वाटा- यूझर म्हणून आणि कंटेंट प्रोड्यूसर म्हणून किती?
भारतीयांनी निर्माण केलेला कंटेंट जो आहे, त्यात इंग्लिशेतर भाषांचा वाटा किती?
इंग्लिशेतर भाषांच्या नेटवाङ्मयात मराठीचा वाटा किती(नंबर ऑफ यूजर्स आणि % ऑफ टोटल डेटा) ?
समस्त मराठी नेटसंभारात काय काय आहे? सकाळसारख्या वर्तमानपत्राच्या साईट्स, खंडीभर ब्लॉग्स, मराठी विकी अन संस्थळे.
यात संस्थळांचा वाटा किती?
संस्थळे कुठली कुठली आहेत? त्यांत जास्ती पापिलवार कोण? ऐसी त्या रँकिंगमध्ये कुठे बसते?

अ‍ॅलेक्सा.कॉम नामक वेबसाईट ही कुठल्याही वेबसायटीबद्दल मेट्रिक्स पुरवते. त्यावर ऐसीचे नाव दिले असता काय दिसते?

http://www.alexa.com/siteinfo/www.aisiakshare.com

दर दिवशी लोक ऐसीवर ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज ३ पाने पाहतात आणि ३ मिनिटे येतात. बरेच डेडिकेटेड ऐसीकर आहेत हे खरे असले अरी हा आकडा ऐसीची औटरीच लै कमी आहे हेच दर्शवतो. तस्मात ऐसी काय किंवा मिपा काय, इथे कोणी काही बोलले तरी परिणाम व्हायची शक्यता जवळपास शून्यच.

तस्मात बाकी प्रोप्रायटी इ.इ. ठीके, पण इथे दरवेळेस ते बंध पाळावेत असं वाटत नै.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मान्य आहे.

पण "तुला काय वाटतं, आईबाबांना आपण हवे होतो? त्यांना जबरदस्त कंड उठला होता म्हणून आपण झालो." हे वाक्य मी प्रचंडदा जालाबाहेर ऐकलं आहे.
अर्थातच काहीही बोलायची पद्धत चालू झाली आहे. हे म्हणे त्यांना गवसलेलं शास्त्रीय सत्य वाटतं.

इथे मी लिहिणार नव्हतो, "म्हणूनच तर इथे आनलैन फोरममध्ये तसे म्हटल्या गेले आहे. रियल आणि व्हर्च्युअल जगांत काहीएक फरक आहेच की." असे म्हणालास म्हणून लिहिले.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हर्कत नाही. हे नियम फझी असतात म्हणा तसे. त्यांचे वैयर्थ्य सांगण्यासाठी एकदम टोकास जाऊन बोलणे हे खरेतर योग्य नाही. पण असो. Smile अंशतः सहमती आहेच.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तुम्ही दिलेल्या उदाहरणात किंचित दुरुस्ती करुन रॅगिंग दरम्यान बिचार्‍या ज्युनियरकडून तो फटे कंडोम की पैदाइश असल्याचे कबूल करवून घेण्यात येइ, हे आठवले.
आपल्यापैकी कोण खरोखर "हवे" होते म्हणून भूतलावर आले ; आणि किती जण इतर कारणांनी आले हे शोधणे सोपे नसावे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा,
कसं आहे, पॉर्न आवडणं समजलं जाऊ शकतं. पण त्याचे किती प्रकार उदयास आले आहेत हे पहा. पूर्वी टॅबू असलेल्या गोष्टी हळूहळू 'विज्ञान' म्हणून बोलायला चालू करायच्या. समाजाबद्दल, कुटुंबांबद्दल, विशेषतः 'पुरुषांनी स्त्रीयांबद्दल आपल्या सर्कलमधे' काय काय बोललं पाहिजे याला मर्यादा हव्यात. या मर्यादा हळूहळू अतिरेकी सैल होत चालल्या आहेत. मातेला देवी म्हणण्याचा प्रकार मूर्खपणा असू शकतो, पण त्यात बरीच इष्टता आहे. त्याला धरून चालण्यात काही नुकसान नाही, फक्त हायपोक्रसी नसावी.
या निमित्ताने सिगमंड फ्रॉइडची पुस्तकांची कथा आवडली. 'माता-मूल' नावाचे टेरिबल पॉर्न आहे (असाच त्यांचा समज होता) म्हणून चिकार गाढवांनी ते विकत घेतले. ते वाचायला जाताना त्यांचा कंप्लीट पोपट झाला. आजही जालाचा विकास, म्हणजे प्रसार नि नवनविन तंत्रज्ञानांचा अविष्कार हा जालवासीयांच्या 'काही इच्छांचा' परिपाक आहे म्हनतात.

अर्थातच आडकित्तांना हे मुळीच अभिप्रेत नव्हते याची मला खात्री आहे, पण 'प्रजजनाचे शास्त्र' हा वैज्यानिकांचा विषय नि मुलांना कसे संगोपावे हा साध्या पालकांचा विषय एकमेकांत आणू नयेत, असे मला एका ओळीत मांडून जायचे होते.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

ROFL
तुमच्याशी किंवा आडकित्त्याशी असहमत होण्याची हिंमत नसेल अनेक आय डीं पैकीच मीही एक आहे.
पण प्रतिसादातलं शेवटचं वाक्य खत्तरनाक हय!

या क्षक्षबाई, यांचा नि माझ्या वडिलांच्या भावाचा दीर्घकालीन .......
ROFL

आवरा......

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

...त्या लंब्याचौड्या प्रतिसादातील नेमक्या याच प्रतिपादनास Non sequitur म्हणून च्यालेंज करू इच्छितो.

'क्षक्षक्षबाईंचे माझ्या वडिलांच्या भावाशी लग्न झालेले आहे, याचा अर्थ त्यांच्यात दीर्घकालीन लैंगिक संबंध आहेत', या तर्कामागील आधार समजू शकेल काय?

(व्यत्यासाबद्दलदेखील हेच म्हणता येईल, परंतु तूर्तास तो मुद्दा नाही.)

'विवाहपद्धती ही मुळात लैंगिक संबंधांना फ्याशिलिटेट करण्यासाठी नसून त्यांना रेग्युलेट करण्यासाठी निर्माण झालेली आहे', हे जुनेच प्रतिपादन या निमित्ताने पुनःप्रतिपादू इच्छितो. आणि, 'शादी के लड्डू आणि वेडिंग केक ही दोन अन्ने स्त्रियांमधील दीर्घकालीन कामवासनेकरिता (मराठीत: सेक्स ड्राइव्ह) बाधक असतात' या (ऐकीव) वैद्यकीय मताकडे लक्ष वेधू इच्छितो.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

'विवाहपद्धती ही मुळात लैंगिक संबंधांना फ्याशिलिटेट करण्यासाठी नसून त्यांना रेग्युलेट करण्यासाठी निर्माण झालेली आहे' >> हम्म. पैसा, वारसा या संकल्पना आल्या. मुल कोणत्या स्त्रीच आहे हे जसे सांगता येते तसे कोणत्या पुरुषाचे आहे हे सांगता येत नाही म्हणुनच ना? की इतर काही संदर्भ?

'शादी के लड्डू आणि वेडिंग केक ही दोन अन्ने स्त्रियांमधील दीर्घकालीन कामवासनेकरिता (मराठीत: सेक्स ड्राइव्ह) बाधक असतात' या (ऐकीव) वैद्यकीय मताकडे लक्ष वेधू इच्छितो. >> ROFL खरंच की क्काय?

===
Amazing Amy (◣_◢)

...त्या लंब्याचौड्या प्रतिसादातील नेमक्या याच प्रतिपादनास Non sequitur म्हणून च्यालेंज करू इच्छितो.

'क्षक्षक्षबाईंचे माझ्या वडिलांच्या भावाशी लग्न झालेले आहे, याचा अर्थ त्यांच्यात दीर्घकालीन लैंगिक संबंध आहेत', या तर्कामागील आधार समजू शकेल काय?

अहो, तो प्रसंग उदाहरण आहे. उदाहरणात मी 'दीर्घकालीन' वा अजून अजून कोणतेही रुप आणू शकतो. मी कुठे व्याख्या केली का काका-काकूंची? तो माणूस रेल्वेत काय व्याख्या सांगतो का? माहिती सांगतो !!! उगाच आपली भलतीच बाजू!!! (ह घ्या)

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मूळ प्रतिसाद नुसता लिंक न देता इथे डकवतो परतः

वेगळे मत. (Score: 3 रोचक)

मुलीपेक्षा मुलगा जास्त तापदायक ठरू शकतो. : कदाचित संख्याशास्त्रीय दृष्टिने सत्य असावे.

बाकी, गर्भातले मूल हे या जगातले सर्वात जास्त सक्सेसफुल बांडगुळ आहे असा एक वाक्प्रचार वैद्यक शिकताना ऐकला होता. मग तो मुलगा/मुलगी हे इम्मटेरियल आहे. अगदी या बाळाला हाडे बनवायला कॅल्शियम हवा, तर आईच्या हाडांतून तो मोबिलाईज होऊन बाळाला दिला जातो. तिला डाएटमधून मिळो, न मिळो. हे ब्रेस्टफीडींग दरम्यानही सुरूच रहाते. मग तिचे शरीर ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त झाले तरी हरकत नसते.

इतके करूनही, अन इतक्या प्रसव वेदना सहन करूनही ते बाळ त्या आईला प्रिय ठरते, हा चिमित्कार पाहून अनेकदा मला बुचकळ्यात पडायला झालेलं आहे.

असो. पुरुष अन स्त्री अर्भकाबद्दल रिसेंटली काही वाचले नाहीये, पण मोठे होऊन मुलगे आईबापांना जास्त त्रासदायक ठरतात, अन त्यासाठी त्या सुना (स्त्री मुलग्या) जबाबदार असतात, असे काहिसे सोशल इन्टरप्रिटेशन भारताच्या संदर्भात कुठेसे वाचल्याचे आठवते आहे..
स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देता येत नाही.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काही भाग मुद्दाम बोल्ड केलेला आहे.

आता हे असं असताना, या धाग्यात, वरती अरुण जोशी यांनी जे काय टंकन केले आहे, त्यातून 'मला अमुक एक शब्दप्रयोग आवडला नाही, असल्या शब्दप्रयोगांनी संस्कृती बुडेल, सबब, यापुढे असे बोलणे अलाऊड नाही' हे ध्वनित होते आहे.

समोरचा काय बोलतो आहे, कोणत्या काँटेक्स्टमधे बोलतो आहे हे ध्यानी न घेता, त्यातूनही अर्धवट प्रकाराने इंटरप्रिट करून हात हात प्रतिसाद टंकल्याने काय साध्य होते?

*अधिक थोड्या वेळाने, वेळ मिळाल्यानंतर.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'वात्सल्य' नामक केमिकल लोचा मेंदूत उत्पन्न होतोच
होतो... पोटचा गोळा आहे म्हणून काय वाट्टेल ते विचित्र निर्णय लोक घेतात. (अशी वागणूक प्राण्यांतही दिसते.) >> आमच्या डोस्क्यात कायतर येगळाच लोचा झालाय वाट्टं. अशी वाक्य वाचल्यावर, ऐकल्यावर आमाला अकबर, बिरबल, माकडीण अन् तिचं पिल्लूच आठवतं Wink

===
Amazing Amy (◣_◢)

तो वात्सल्य नावाचा लोचा नाकातोंडात पाणी जाऊ लागेपर्यंत काम करत रहातो. माणूस असल्यावर संस्कार म्हणून माकडिणीऐवजी स्त्री असती तर कदाचित बुडून मेली असती.
शिवाय त्या रूपककथा आहेत.
प्रत्यक्षातली माकडीण पिलाला हातात घेऊन पोहत राहिली असती अन पाणी पुरेसे वर आल्यावर हौदाबाहेर पडून बिरबल्/बादशहाला वाकुल्या दाखवित पळून गेली असती.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला वाटलं तुम्ही उत्क्रांतीवर विश्वास ठेवता, म्हणजे ते किन-सिलेक्शन वगैरे प्रकार थोतांड की काय?

ROFL

विज्ञान , उत्क्रांती ह्या "विश्वास" ठेवायच्या गोष्टी आहेत???

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो अर्थातच.

विश्वास ठेवल्याने त्यांचे ऑब्जेक्टिव्हलि सत्य/असत्य असणे सिद्ध होत नाही, पण लैफष्टैल म्हणून अंततोगत्वा त्या व्यक्तिगतरीत्या विश्वासाच्याच गोष्टी आहेत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

इंजिनिअरिंग हे एकच सत्य आहे. विज्ञान (उत्क्रांती, बिग बँग, मास्लो) धरून धांदात असत्य आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

इंजिनिअरिंग आणि विज्ञान यात नक्की फरक काय ते सांगा- तुमची व्याख्या सांगा दोहोंची.

मग इंजिनिअरिंगही कसे असत्य आहे ते सांगतो Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

पाने