दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

चित्रगुप्त उवाच:
दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.
भव्य इमारत, पार्किंगची उत्तम सोय, झाडांनी वेढलेला परिसर, आत गेल्यावर एकदम चकाचक संगमरवरी फरशी, वेलबुट्टीचे खांब-झरोके, भिंतीवर लावलेल्या कलाकृती, शाहू महाराज, अहिल्याबाई इत्यादिकांचे पुतळे, शांत, स्वच्छ, वातानुकूलित विस्तीर्ण दालन, गुबगुबीत सोफे, मुख्य म्हणजे अजिबात गर्दी नाही, हे सर्व बघून सर्वजण अगदी सुखावलो.
आधी प्रशस्त मोकळ्या भोजन-कक्षात मराठी पदार्थांचा आस्वाद घेत गप्पा सुरु झाल्या.

एकमेकांचा परिचय - म्हणजे अगदी लहानपणापासूनच्या आठवणी सांगण्यात प्रत्येक जण रमून गेला, आणि सहसा कुणाला सांगितल्या न जाणार्या अश्या आठवणीही मोकळेपणाने सांगू लागला. चित्रकला, साहित्य, इ. पासून राजकारण वगैरे पर्यंतचे नाना विषय, आणि अर्थातच मिपावरील लेखनाची गम्मत, अश्या गप्पा चांगल्या चार-पाच तास रंगल्या. शेवटी तिथेच भोजन आटोपून, आता दर महिन्यात असा कट्टा करायचा, असे ठरवून आम्ही निरोप घेतला.
सुरुवातीच्या जागा शोधण्याच्या भानगडीत त्रिवेणी परिसरात असलेली आठ-दहा कलादालने बघण्याचे मात्र राहूनच गेले,
चला, पुढल्या वेळी.

अरूण जोशी उवाच:

तसा दिल्लीच्या कट्ट्यावरचा हा लेख केवळ ऐसीअक्षरे व मिसळपाव या दोनच संस्थळांवर प्रकाशित होत आहे, पण तरीही मी इथे 'मराठी संकेत स्थळे' असा शब्द वापरेन. विविध मसंस्थांवरील वेगवेगळ्या भागातील कट्टे पाहून अगदी जळायला झाले होते. पुण्या मुंबईत तर अनेक कट्टे झाले आहेतच, विदेशातही झाले आहेत हे पाहून माझ्या मनात आमच्या दिल्लीत एक कट्टा का नको असा इर्ष्यात्मक विचार १-२ महिन्यांपूर्वी येऊन गेला होता. चित्रगुप्त यांनी स्थळ, दिवस, वेळ ठरवून एकहाती सारे कोऑर्डीनेशन केले आणि अखेर त्रिसदस्यीय कट्टा काल संपन्न झाला. विवेकजी, चित्रगुप्त नि मी.

तर विवेकजींनी चित्रगुप्तना पाहताच 'अरे, तुम्ही चित्रगुप्त ना, मग आपण ही गॅलरीतली चित्रेच जरा पाहून घेऊ' असे भेटल्यावर पहिल्या मिनिटातच सुचवले. 'नक्कीच' म्हणत आम्ही एका दालनात घुसलो. 'कलादालनात चित्रे पाहणे' कशाशी खायचे असते हा प्रकार मला ठाऊक नव्हता, म्हणून मी त्यांना माझ्या स्टाईलने विचारले कि कोणत्याही एका चित्रात नक्की काय पाहायचे ते सांगाल तर ते मी सगळ्या चित्रांचा आस्वाद घेऊ शकेन. त्यांच्या उत्तराला सुरुवात होईतो विवेकजींची चित्रे पाहून झाली होती नि आम्ही कॅफेटेरियाच्या प्रांगणात गेलो. तिथे १-२ फोटो काढेपर्यंत जाणवले आज दिल्लीत अधिकृतरित्या ह्यूमिडिटी चालू झाली आहे. मग आम्ही कष्टाने पार्क केलेल्या गाड्या काढून तानसेन रोड ते कोपरनिकस रोडवरील महाराष्ट्र भवन असा प्रवास केला. तिथे रखवालदाराने आम्हाला आता इथे कोणतेही कँटीन नाही, तुम्ही कस्तुरबा गांधी मार्गावरील नव्याने बनलेल्या महाराष्ट्र सदनात जा असे सांगीतले. त्याच्यावर विश्वास न ठेवण्यात आमचा बराच वेळ गेला. शेवटी ४ चा कट्टा ४.४५ ला सुरु झाला. पण जागेचा शोध 'वर्थ इट' होता. विदेशातले माहित नाही, पण भारतात मसंस्थकरांचा इतक्या चांगल्या जागी कट्टा झाला नसावा हा विचार सुखावून गेला.

या कट्ट्यात आम्ही तिघेच असल्याने आईस्ब्रेकिंग व्हायला नि मनमोकळेपणाने सगळ्या चर्चा चालू व्हायला किंचितही वेळ लागला नाही. 'चित्रकलेने आम चित्रकाराचे घर चालू शकते का?' या टिपिकल इंजिनिअरिंगची मानसिकता दर्शविणार्‍या माझ्या प्रश्नाला चित्रगुप्तजींनी मार्मिक उत्तर दिले. त्यात 'त्या काळी मी इंजिनिअरिंग २ वर्षांत सोडून देऊन चित्रकलेचाच कोर्स चालू ठेवला' हा षटकारही होता. या दोन प्रभृती, म्हणजे चित्रगुप्त नि विवेकजी, सुरुवातीला बोलत असताना, मी दिल्लीत इथे होतो, तिथे होतो असे एकमेकांना सांगत असताना, 'त्या देशपांड्यांना ओळखता का?', 'पोतदारही तिथे होते ना तेव्हा? ' असे प्रश्न विचारू लागले, आणिबरेचसे लोकआमच्या ओळखीचे निघू लागले.

दोहोंना संस्कृतचे नि महाभारताचे ज्ञान आणि गोडी असल्याचे जाणवले. चित्रगुप्तांच्या महाभारत कथांवरील लेखांवर, ज्यांत ते भूतकाळच बेमालूमपणे बदलतात, विवेकजींच्या क्षणिकांवर, ज्यांत ते महाभारत सद्य राजकारणांत उतरवतात नि माझ्या ऐसीवरील 'लढवय्या प्रतिगामीत्वाबद्दल' रोचक चर्चा झाली. पुढे काय लिहायचे आहे यावरही चर्चा झाली. विवेकजींना मराठीत कादंबरी लिहायची आहे, चित्रगुप्तना बरेच काल्पनिक ऐतिहासिक, पौराणिक, घटनाक्रम त्यांना सुचतात तसे लिहायचे आहेत नि मला बिझनेस आणि अर्थशास्त्र इ बद्दल लिहायचे आहे असे सामोरे आले. (तरी) विवेकजींचे भारताच्या सार्‍या प्रमुख प्रकल्पांचे ज्ञान मला मोहवून गेले.
दिल्लीत (किंबहुना अगदी अमेरिकेच्या मानानेही) मराठी लोक कमी असावेत. त्यात ही ते स्थानिक संस्कृतीशी मिसळून गेले आहेत. आणि त्यामुळे ते सम-मूल लोकांशी बोलायला थोडे जास्त आसुसलेलेअसावेत. याचा परिपाक म्हणून कि काय आम्ही खूप वेळ कौटुंबिक चर्चा केली. आम्ही माळवा, मराठवाडा नि विदर्भ अशा वेगळ्या मूळ जागचे, या सर्व गप्पात ४-५ तास कसे गेले ते कळले नाही. मे मधे पुढचा कट्टा निश्चित ठरवून आम्ही रात्री ९ च्या आसपास समारोप घेतला. पुढच्या वेळेस सगळ्याच मसंस्थवर पोहोचण्याचा प्रयत्न असेल. ​
काही फोटो:
१ व २: महाराष्ट्र सदनात (डावीकडूनः) चित्रगुप्त, विवेक पटाईत आणि अरूण जोशी.

३. त्रिवेणी परिसरातः विवेक पटाईत आणि अरूण जोशी.

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

वाह भारी झाला की कट्टा!
महाराष्ट्र सदन मस्त दिसतय.
गप्पा हिँदीमधे की मराठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा मराठीतच झाला. पटाईतजी घरी मराठीतच बोलतात. ते शिकले म्हणाले तेव्हा त्यांना संस्थळावर मराठी टायपायला, इ शिकले असे म्हणायचे असावे. पण तिघांत त्यांची भाषा सर्वाधिक हिंदीप्रचुर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अच्छा असंय होय Biggrin मला वाटलं त्यांना अजीबात मराठी येत नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रे नि लेखाच्या संपादनासाठी चित्रगुप्त यांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

महाराष्ट्र सदन ४ स्टार असावे. शिवाय तिथे कोणीच येत नाही, गोंगाट मूळीच नाही म्हणून माझ्याकडून अजून एक स्टार. तिथे 'मराठवाडा थाळी' (obviously along with विदर्भ, कोकण, खानदेश थाळी) असा आयटम मेनूत बघून तर भरून आले होते!!!* अर्थात सदन नवे असल्याने यातले काहीच मिळत नव्हते हा भाग अलहिदा.

नेटभाषेचा शोध लागेतो स्मायल्या टाकून लिहायची पद्धत नव्हती. मला अजूनही नाही. भाव समजून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे वा! छान कट्टा झालेला दिसतोय. Smile वृत्तान्तही छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा, पण हा दिल्लीतला पहिला कट्टा नव्हे. माझ्या माहितीप्रमाणे मसं सदस्यांचा दिल्लीतला आद्य कट्टा काही वर्षांपूर्वी पुरानी दिल्लीमध्ये होऊन गेला. त्याला दोनच सदस्य हजर होते- मी (म्हणजे 'राधिका'. 'मी' नव्हे) आणि नंदन. साल २००९ किंवा २०१० असावं. तेव्हा मी दिल्लीकर होते. लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी आमची ही ऐतिहासिक भेट ठरली होती. मी आधी पोहोचले आणि काही वेळाने नंदन खास पर्यटकी झोकात (गळ्यात कॅमेरा वगैरे लटकवून) पोहोचला. मग आम्ही चालत प्राठेवाली गली शोधू लागलो. तिथे पोचल्यावर काही वेगवेगळे प्राठे खाल्ले. नंदनने टिपिकल एनारायी थाटात खांबांवरून लोंबकळणार्‍या तारांचे फोटो काढले आणि मग आम्ही आपापल्या मार्गी लागलो. गप्पा काय झाल्या ते आठवत नाही, पण सोब॑त नंदन होता म्हणजे प्रामुख्याने मला उद्देशून मारलेले टोमणे हाच विषय असणार.
-----------

बाकी तुमचा वृत्तांत वाचून दिल्लीच्या आणि विशेषतः त्रिवेणी कला संगम, साहित्य अकादेमी या परिसरातल्या आठवणी जाग्या झाल्या. बाकी दिल्लीत एप्रिल अखेरीस दुपारी चार वाजता तुम्ही भेटायचे ठरवलेत म्हणजे तुम्ही सर्व सरावलेले दिल्लीकर असणार.

- आपण आत्ता दिल्लीत नसून मुंबईत आहोत या विचाराने सुटकेचा नि:श्वास सोडणारी
राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

चला, आपल्यानंतर तुटलेली परंपरा आम्ही चालू ठेवत आहोत म्हणा.

पण आमचा कट्टा दुसरा ठरण्यासाठी तुम्ही नि नंदन "कट्टयासाठी" असे, किमान एकमेकांना, जाहीर करून, बोलून आलेले असणे गरजेचे. नाहीतर दोन ऐसीकरांची भेट बांडूंग मधेही होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बांडुंगच्या उल्लेखामुळे एकदाचं लोकेषण पाहून घेतलं. लै दिवसांपासून पहावं असं डोक्यात होतं पण समहौ झालं नै. धण्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा! मजा आली असे दिसते या कट्ट्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करा लेको कट्टे!!! मजाये बॉ. Smile नेक्ष्ट दिल्लीवारीत महाराष्ट्र सदन नक्की कव्हर करणार. जबरीच जागा दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान वृत्तांत आणि फोटो.

चित्रगुप्त आणि अजो हे खूप तरूण असतील असे वाटले होते तितके तरूण "दिसत" नाहीत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खूप म्हणजे किती अपेक्षित होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संतुर साबण वापरत नसणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजोंच्या वयाविषयी मनात केलेला विचार फोटो पाहून बरोबरच असल्याचे जाणवले.
अहो लढवय्या प्रतिगामी म्हणजे तुलनेने जुन्या जमान्याचा माणूसच की ! Smile

अवांतर : ब्याटमन भाऊ तुलनेने चांगले तरुण असावेत (३०-३५ च्या दरम्यान) पण विचारांनी ते मागल्या पिढीचेच प्रतिनिधी वाटतात.
टीप : जुन्या जमान्याचे म्ह्णजे वाईट किंवा वाईस-वर्सा असे माझे म्हणणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0



  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्याटमन भाऊ तुलनेने चांगले तरुण असावेत (३०-३५ च्या दरम्यान) पण विचारांनी ते मागल्या पिढीचेच प्रतिनिधी वाटतात.

जालीय अस्तित्वावरून वयाचा केलेला अंदाज अंमळ डॉळे पाणावून गेला Wink तदुपरि 'नव्य' नामक ष्टिरिओटैपात आम्ही बसत नै, तस्मात काही(च) अंशी मागल्या पिढीचे प्रतिनिधी म्हटल्यास लै चूक होणार नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो ! हिथं लोकं काय बी न बगता नाड्यांवरुन अंदाज बांधतात तर आमी कायतरी बघीटलंया न्ह्वं ?
बाकी आमचा अंदाज कुठपतूर गंडलाया ते तरी सांगा. व्यनी केला तरी चालतयं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्याटमन भाऊ तुलनेने चांगले तरुण असावेत (३०-३५ च्या दरम्यान) पण विचारांनी ते मागल्या पिढीचेच प्रतिनिधी वाटतात.

अरे काय हे ब्याटम्याना.... Lol
लोग तुमको क्या समझ रहे हय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ही ही ही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो तिशीही पूर्ण नै केली हो अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो धर्मराज भाऊ, त्या वयाचा मी आहे. (एखाद्दुसरे फारतर जोडता येईल).

बॅट्या तर एकदम कोवळा आहे. त्याचा पूर्ण चंद्र झाल्यावर मला खात्री आहे तो आपण एकाच अक्षावर लढलो होतो इतकीशी ओळख पण देणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याचा पूर्ण चंद्र झाल्यावर मला खात्री आहे तो आपण एकाच अक्षावर लढलो होतो इतकीशी ओळख पण देणार नाही.

बळंच ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या विषयावर १०० रु ची शर्यत लावायला तयार आहे.
( तू आताच पैसे देऊन ठेव कारण मी जिंकलो याचाच अर्थ तू शर्यतीचे पैसे देणार नाहीस. मग to protect my interests अगोदरच पेमेंट होऊ दे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हॅ हॅ हॅ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिड थर्टीज आय वुड से.
अन ऑनेस्टली,
प्रतिक्रिया/लिखाण इ. वाचून अजो यांचे बद्दल जी एक प्रतिमा मनात तयार झाली होती, तितकेसे खडूस/घुर्रट इ. ते दिसत नाहीत.
चेहर्‍यावरून लाईकेबल दिसत आहेत खूपच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रतिक्रिया/लिखाण इ. वाचून अजो यांचे बद्दल जी एक प्रतिमा मनात तयार झाली होती, तितकेसे खडूस/घुर्रट इ. ते दिसत नाहीत.

धन्यवाद.

बाकी माझे टोटल विचार कुणाला ऐकायला सवड मिळाली तर तो/ती अरुण पुरोगामी आहे कि प्रतिगामी आहे हा विचार बाजूला ठेऊन 'काळ कोणत्या दिशेने चालला आहे' या तांत्रिक विषयात जास्त रुचि घेईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुण जोशींची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती तिला तडा गेला.
हे वृत्तांताचे आणि फोटो टाकणारे धागे त्यामुळेच मला आवडत नाहीत.
जोपर्यंत अरुण जोशी फक्त एक आयडी आहे तोवर मजा आणि मोकळेपणा आहे.
त्या आयडीचा माणूस केला की संपलं. मग बसा सौजन्याचे मळे पिकवत.
रियल आणि व्हर्चुअलमध्ये काहीतरी फरक ठेवा राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिमा काय होती नि तडा जाऊन काय नवीन प्रतिमा झाली हे कळेल का?

मज्जा कमी होणार नाही, आश्वस्त रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगाची राजधानी (वॉशिंग्टन डीसी), भारताची आर्थिक राजधानी (मुंबई), महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी (पुणे) यांच्या पाठोपाठ देशाच्या राजधानीचा नंबर लागलेला दिसतोए! छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चित्रगुप्त आणि विवेक पटाईत यांनी फिटनेस फंडे सुरू करायला पाहिजेत. या दोघांना दिल्ली तर दूर नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विवेकजींना फिटनेसची गरज? ती ही केवळ फोटोवरून ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.