तुम्ही महाराष्ट्रातील किती शहरात अथवा गावात राहीला आहात? तुमची अ‍टॅचमेंट कुठे आहे ?

मी ऐसी अक्षरेवर नवीन आहे. प्रथमच कौल घेतो आहे काही चुकल्यास क्षमा करा.

(माहितगार नावाची मराठी संकेतस्थळांवर किमान दोन स्वतंत्रव्यक्तींची खाती आहेत. त्यातले एक जुने माहितगार खाते ऐसी अक्षरेवर आहे त्याचा माझा संबंध नाही. मी येथे माहितगारमराठी नावाने प्रथमच खाते उघडले आहे. हे गैरसमज टाळण्याच्या दृष्टीने सुरवातीसच नमुद करतो. तसेच माझे ऐसी अक्षरेवरील लेखन मी मराठी विकिपीडियाशीवाय इतर मराठी संस्थळांवर रिपीट करण्याची शक्यता कमी असेल.)

आपल्यापैकी बर्‍याचजणांचे शीक्षण आणि नौकरीची गावे वेगवेगळी असतात. येथील सर्वेत तर मते द्या पण मुख्य प्रयत्न तुम्ही तुमचे स्वतःचे लेखन जास्त करून नेटीव प्लेस , शीक्षणाचे ठिकाण, नौकरी अथवा व्यवसायाचे ठिकाण या बाबत आंतरजालावर आता पर्यंत काही लेखन केले आहे काय ? असेल तर कशा स्वरूपाचे ? म्हणजे प्रवास वर्णन, माहितीपर, ज्ञानकोशीय इत्यादी कोणत्या भाषेत आणि कोणत्या संस्थळांवर केले आहे ? तुम्ही तुमची शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिक्षक, शालेय अथवा महाविद्यालयीन मित्र मैत्रिणींबद्दल आंतरजालावर लेखन केले आहे का ? असेल तर ललित की माहिती पर ?

मराठी संस्थळांवरील लेखकात, भौगोलीक आणि शैक्षणिक बाबतीत कोणत्या गोष्टी बाबत कशा प्रकारच्या लेखना कडे ओढा आहे प्रत्यक्षात कोणती अटॅचमेंट अधीक प्रभावी आहे इत्यादी बद्दल सर्वांचा कल जाणून घेणे हा आहे. त्यामुळे मतदाना सोबतच चर्चेचे स्वागत आहे

प्रतिक्रिया

माझे शालेय शिक्षण एका गावात आणि अभियांत्रिकी शिक्षण दुसर्‍या गावात झाले.
जिथे शालेय शिक्षण झाले तिथेच नोकरी करतो (नोकरीशी संबंधित शिक्षण मात्र दुसर्‍या गावात झाले". तर "माझे शीक्षणाचे आणि नौकरी व्यवसायाचे ठिकाण वेगवेगळे आहे" आणि "माझे शीक्षणाचे आणि नौकरी व्यवसायाचे ठिकाण एक आहे" यापैकी कोणता पर्याय निवडावा?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेच विचारतो.
माझे शालेय शिक्षण (महाराष्ट्रात) तीन गावात. अभियांत्रिकी शिक्षण अजून चवथ्या गावात. त्या नंतरचे शिक्षण अजून वेगळ्या गावात. इन्टर्नशिप आणि णोकरी अजून वेगळ्या गावात असा लै झम्पक प्रकार मी केलेला आहे

मला वाटते सध्या महाराष्ट्रातील तीन वा अधिक गावांत माझे वास्तव्य झाले आहे. हा पर्याय निवडण्यास हरकत नाही. किंवा
माझे शिक्षणाचे आणि नोकरी/व्यवसायाचे ठिकाण वेगवेगळे आहे. हा निवडलातरी चालेल. मी बायनरी कौल ऐवजी अधीक पर्याय निवडू देणारा कौल उपयोगात आणावयास होता म्हणजे संदिग्धता कमी झाली असती.

माझी स्वतःची मानसिक अटॅचमेंट माझ्या गावाकडे आहे असे असूनही प्रत्यक्षात माझे तिकडे फारसे जाणेही होत नाही आणि त्या गावा बद्दल मी प्रत्यक्षात फारसे आंतरजालावर लेखनही केले नाही पण नौकरीच्या निमीत्ताने जेथे राहतो त्या बद्दल लेखन केले. असे का होत असावे ? धाग्याचा उद्देश सर्व साधारण चर्चा घडवण्या सोबत लेखन प्रेरणा अप्रत्यक्षपणे अभ्यासण्याचा आहे. लेखन प्रेरणेचा शोध घेतोय वगैरे म्हटल्या वर लोक येण्याच्या ऐवजी घाबरून पळूनच जाणार नाहीतना Smile म्हणून धाग्याच्या सुरवातीस प्रत्यक्ष उल्लेख टाळला आहे त्यामुळे नॉर्मल चर्चा चालू ठेवूयात .

प्रतिसादा साठी धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सुचवणी :
तेच पर्याय, थोडे शब्दबदल करून :
महाराष्ट्रातील केवळ एका गावात/शहरात माझे वास्तव्य झाले आहे.
महाराष्ट्रातील दोन गावांत माझे वास्तव्य झाले आहे.
महाराष्ट्रातील तीन वा अधिक गावांत माझे वास्तव्य झाले आहे.
माझे शिक्षणाचे आणि नोकरी/व्यवसायाचे ठिकाण एक आहे.
माझे शिक्षणाचे आणि नोकरी/व्यवसायाचे ठिकाण वेगवेगळे आहे.

(मराठीत लिंगनिरपेक्ष वाक्यरचना नेहमीच करता येत नाही, परंतु पुष्कळदा वरीलप्रमाणे जमतेसुद्धा. नाहीतर "...राहिले/राहिलो..." अशी थोडीशी बोजड वाक्यरचना करावी लागते. परंतु दुर्लक्ष करण्यापेक्षा बोजड रचनासुद्धा बरी.)

अवांतर :
*नोकरी व्यवसायाच्या ठिकाणापेक्षा शी-क्षण घरच्या घरीच आलेले बरे, असे मला वाटते. त्यातही नोकरी-व्यवसाय वेगवेगळ्या गावी फिरतीचे असले, आणि पायखान्याची सोय नसली, तर अनावर शी-क्षण म्हणजे मोठीच पंचाईत होते.*

अवांतराबद्दल _/\_

- (घरच्या घरीच उरकणारा) सोकाजीथ्यँक्स धनंजय.

मूळ धाग्याबद्दल - मतनोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील दोन गावांत माझे वास्तव्य झाले आहे. (त्यांच्यापैकी कोणत्याही गावाबद्दल खास प्रेम वा द्वेष नाही. दोन्ही ठिकाणांबद्दल, मराठीतच जालावर अनुभववर्णात्मक आणि काल्पनिक लिखाणात अन्यत्र लिहीलेलं आहे. क्वचित काही फेसबुकावर, इंग्लिशमध्ये लिहीलेलं असेल.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संस्थळावर आपलं स्वागत आहे.
१. मी बर्‍याच गावांत, शहराम्च्या ग्रामसदृश्य भागांत,(महाराष्ट्रात) शहरांत (महाराष्ट्रात नि इतर राज्यांत) राहिलो आहे.
२. माझी अ‍ॅटॅचमेंट गावांकडे आहे. त्यास कारणीभूत तिथली १०० प्रकारची आकर्षणे आहेत. क्वचित शहरी लोकांचा सभ्यपणा, शिष्टपणा, कोरडेपणा, इ इ इ पण आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धनंजय आणि नितीन या दोघांच्याही सुचवणी नुसार वाक्यरचनेत अल्प बदल करून एक अधीक पर्याय जोडला आहे. पुढे कधी कौल घेण्याच्या वेळी मला या कौलाचा अनुभव उपयूक्त ठरेल. अर्थात या वेळी कौलांच्या पर्याया च्या सोबतच चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

धनंजय, नितीन, अरुणजोशी यांना चर्चा सहभागा साठी धन्यवाद आणि कौल नोंदवण्यात सहभागी सर्वांनाही धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

नव्याने मत कसे देणार आता?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ढोबळ सर्वेक्षणच आहे. आधीच कौल दिला असेल तर असू द्यात. शेवटी काऊंट घेताना तेवढ अ‍ॅडजस्टमेंट सहीत मोजून घेऊयात.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

भावा कोल्हापुरच!!!!!!!!!!

नाहीतर पणजी

बाकी सगळ बकवास. पूर्णविराम

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

पूर्णविराम नंतर पुन्हा खंडाळा ? Smile

ते खंडाळ्याच असू द्यात कोल्हापूर बद्दल सांगाना

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मी महाराष्ट्रात दोनच शहरांत राहिलो आहे. मिरज आणि पुणे. मिरजेबद्दल माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिला होता कधीकाळी तेवढं वगळता काही लिखाण नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझे शालेय शिक्षण तीन तालुका वजा गावात/लहान शहरात झाले...पण आजोळ मुंबईत असल्याने नेहमीच मोठ्या शहराशी संपर्क/संबंध होता. कॉलेज पासून पुढे तीन मेट्रो/मोठ्या शहरांमध्ये वास्तव्य झाले. आता शहरातील आणि निम-शहरी भागात रहाण्याचे कालावधी जवळजवळ समान आहेत. तुलना केल्यास निमशहरी भाग आवडतो. पण तिथे रम्य बालपण गेल्यामुळे पोटापाण्यासाठी काही करायची वेळ आली नव्हती. ते शोधावे लागल्यास निमशहरी भाग कितपत आवडतील ही शंका आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव खूप आवडले होते....ते सोडताना फार वाईट वाटलं होतं. त्या मानाने नाशिक अजिबात आवडले नाही कधीच...अगदी सुटका झाल्यासारखे वाटले ते सोडताना.
मी लिखाण केलेले नाही कोणत्याच शहराबद्द्ल.

पुणे-पुणे-पुणे

नंतर १० वर्षे (शिक्षण्+लग्न) मुंबई
_____

मुंबईत आले तेव्हा वाटायचं वीजेची अज्जिबात काटकसर करत नाहीत हे लोक. किती उधळ्माधळ. अन रोजचीच दिवाळी असल्यासारखी रोषणाई!!! आपलं पुणं कसं अंधारं पण काटकसरी Smile

मग हळूहळू मुंबईदेखील आवडू लागली. अगदी पुण्याइतकीच. दोन्ही शहरांना स्वतःचा चार्म आहे, ओळख ,व्यक्तीमत्व आहे.
______________
पुण्यातील जीवन केअर-फ्री होते तर मुंबईची प्रत्येक आठवण माझ्या तेव्हा लहान असलेल्या मुलीबरोबर घालवलेली अन रम्य आहे. मग ते जुहूवर पाळण्यात बसणे असो की सिद्धीविनायकाच्या प्रांगणात अथर्वशीर्ष ऐकताना असो, सायनला मोठ्ठ्या पडद्यावर सिनेमा पाहीलेला असो की घाटकोपरच्या खाऊगल्लीत रोज रोज मारलेली चक्कर अन घोडागाडीतून क्वचित फिरणे असो.
देवळे तर चिक्कार पाहीली - घाटकोपरचे दत्तमंदीर, गुजराथी मंदीरे, आमच्या विद्याविहारमधली देवळे, महालक्ष्मी, सिद्धीविनायक.
हाजीअलीचे सीताफळक्रीम तेव्हा बेस्टच वाटायचे अजून मिळते की नाही कोणास ठाऊक.
मुंबईच्या रेल्वेचा प्रवास खूप केला.
खरं सांगायचं तर मुंबई खूप खूप आवडली.
घाटकोपरचे सार्वजनिक ग्रंथालय अतिशय समृद्ध आहे - मी जास्त करुन अध्यात्मिक पुस्तकेच वाचली. चितशक्तीविलास व तत्सम!!!
.
.
अरे!!! मासळीबाजार कशी विसरले मी? या बाजारातून मारलेल्या रपेटी अन घासाघीस. किती मजा येत असे.
.
.
चर्च गेट/व्हीटी च्या ऊंच्/जुन्या जुन्या इमारती. नवर्‍याबरोबर इरॉसला सिनेमा पहाणे Smile सगळ्या आठवणी पूरासारख्या येताहेत!!!
____________
रोज पोळीभाजी प्लास्टिकच्या दूधाच्या थैलीत(पिशवीत)नेऊन पहील्या भिकार्‍याला देणे, संध्याकाळी देवाची स्तोत्रे म्हणणे, सोसायटीमागे असलेल्या मंदीरात,सोमवारी शंकराला दूध वहाणे - भाबडा अन रिलॅक्स्ड काळ मागे पडला.
परत येणे नाही.

आता कोणी म्हणेल - स्मरणरंजनात फक्त चांगल्याच गोष्ती आठवतात. असेलही.

चर्च गेट/व्हीटी च्या ऊंच्/जुन्या जुन्या इमारती.

अहो असे म्हणू नका... धरून मारतील कोणीतरी!

'छत्रपती शिवाजी टर्मिनस' असे म्हणतात त्याला हल्ली. ('छशिट' म्हणा. चालते.)

नवर्‍याबरोबर इरॉसला सिनेमा पहाणे

'इरॉस'मध्ये पाहिलेल्या चित्रपटास 'इरॉटिक' असे संबोधता यावे काय?

सगळ्या आठवणी पूरासारख्या येताहेत!!!

घ्या! आणि नुकतेच थत्तेचाचा म्हणत होते, मुंबईत पूर येत नाही म्हणून!

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

हाहाहा Smile

>>नुकतेच थत्तेचाचा म्हणत होते, मुंबईत पूर येत नाही म्हणून!

मुंबई दोन मध्ये.......

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्वाइंट आहे!

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

मला वरच्या प्रतिक्रियेला विनोदी श्रेणी देता येत नाही.
काय करावे लागेल?

कोणे एके काळी अगदी लहान असताना पुणे, पण ते काहीच न आठवण्या इतके. मग पुसेगाव नावाच्या एका खेडेगावात राहीलीय. माध्यमिक शिक्षण आणि अभियन्त्रिकि कोल्हापुरातच. आता नोकरीनिमित्त मुंबई मध्ये राहते.

पुणे- खुप नातेवाइक राहत असल्याकारणाने जाउन माहितीय.वातावरण आवडते, मुंबई पेक्षा स्लो वाटते...

पुसेगाव- सातार्॑या जवळचे एक छोटुसे खेडे आहे, पण खुप छान आहे. तेव्हा तिथे खुप आवडायचे, पण आता तशा वातावरणात राहु शकेन का याची शंका आहे.अर्थात माझ्यासारखे ते गाव पण बदलले असेलच.

कोल्हापुर- आत्तापर्यन्तचं सगळ्यात आवडते गाव. सगळ्याच बाबतीत मोकळं ढाकळं. खाण्यापिण्याची रेलचेल, पुण्याइतके कोरडं नाई, मुंबईइतकं दमट पण नाई, सगळ्यांना लगेच आपलंसं करणारं..

मुंबई आत्ता जरा कुठेतरी बरं वाटायला लागलयं.पण त्याची मला वाटणारी कारणं म्हन्जे- मला लोकल ने फिरावे लागत नाही, हातात थोडा पैसा, बर्यापैकी मिळणारा रिकामा वेळ आणि कुणाचिही जबाबदारी नसणे यामुळे असेल कदाचित.

manaamanasi.wordpress.com