भारताचे भावी विरोधी पक्षनेते कोण असावेत ? राहुल गांधी की नवा पर्याय प्रियांका गांधी ? की लालूप्रसाद अथवा मुलायमसिंग ??

२०१४ लोकसभेच्या निवडणूकांच घोडा मैदानातील घोडे पळत पळत बरेच पुढे आले आहेत, निकालाचा भोज्ज्या काही दूर नाही. लोक म्हणताहेत पण समजा, आगामी सरकार भाजप बनवू शकल नाही तर विरोधी पक्षनेता पदी सुषमाजी आल्या तरी मोदी अनभिषीक्त विरोधी पक्षनेते बनून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या प्रश्नात नावीन्य असणार नाही. पण समजा (मोदी ?) भाजपाने सरकार बनवल तर प्रभावी विरोधी पक्ष नेत्याच काम कोण बजावेल ? नाही म्हणायला सोनीयाजी आहेत पण इतर कोणकोणती नावे डोळ्या पुढे येतात ?

प्रियांका गांधींनी अगदी अशातच राहुल भैय्या व्हीजनरी वगैरे असल्याच सांगून झाल पण राहुलजींची नैसर्गीक शैली विरोधी पक्ष नेत्यास लागणार्‍या आक्रमकतेची वाटत नाही पण ही झाली माझी मतं तुमच मत काय ?

तुम्हाला या कौलात एका पेक्षा अधिक पर्याय निवडता येणार आहेत आणि आणखी काही नाव सुचवल्यास ती जोडून देईन. आपण आधी चर्चा करून नंतरपण मते नोंद्वू शकता

Choices
Your Vote

Login to vote in this poll.

पारिवारिक माहिती?

@अस्वल: <विविध पक्षांत असलेल्या पारिवारिक खासदारांची माहिती इथे दिलेली आहे.>

कोठे आहे?

प्रतिसादातच चित्र दिसते आहे

प्रतिसादातच चित्र दिसते आहे की....

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

पाहिले

आहे आणि पाहिलं. आधी लक्षातच आलं नव्हतं!

ऐसी अक्षरेवर सध्या तरी कपिल

ऐसी अक्षरेवर सध्या तरी कपिल सिब्बल 13% सिताराम येचुरी 12% अरविंद केजरीवाल १२% या तिघांची विरोधी पक्ष नेता म्हणून आघाडी दिसते. यातील कपिल सिब्बलांचे नावाची आघाडी माझ्या करता जरा आश्चर्याची आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

इथे कौलं वापरत नाहीत!

कौल हा प्रकार इथे फारसा लोकप्रिय नाही, असं दिसतंय.
आपल्या कौलावरही १८ मतं आहेत - त्यातील किती मतं गंभीर आहेत, हा वेगळा मुद्दा!
मुळातच १८ मतं कुठलाही निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाहीत. (स्माईल)

मुळातच १८ मतं कुठलाही

मुळातच १८ मतं कुठलाही निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाहीत.


केवळ १८ मतांवरचीही आकडेवारी दिली कारण तो अरविंद कोल्हटकरांच्या "पण ह्या निमित्ताने एका गोष्टीबाबत येणारा राग व्यक्त करण्याची संधि घेतो. यादीतील पहिली तीन नावे गांधी परिवारातील आहेत." या आक्षेपाला प्रत्यक्ष न बोलता दिलेला प्रतिसाद होता. मतदान करताना यादीत पहिली तीन नाव गांधी परिवाराची लिहून सुद्धा पहिल्या १८ मतदारांनी तरी गांधी कुटूंबीयांचा प्रत्यक्ष मतप्रदर्शनात क्रमांक दहाच्या खालीच लावला आहे. आंतरजालावरचा मतदार किमान पातळीचा सुशिक्षीत आणि सुज्ञ आहे हे यातून सूचवण्या इतपत १८ मतदारांचा कौलही पुरेसा ठरावा.

बाकी विरोधी पक्ष नेता कोण असावा हा कौल निरंतर नाही तरी पाचेक वर्षे आरामात चालवता येईल. इथे घाई कुणाला आहे. विषयाच्या शीर्षकात काहीच लोकप्रीयता नसती तर ६०० हिट्स मीळण्या एवढही लोकांनी धागा उघडला नसता त्यामुळे विषया बद्दल प्रश्न नसावा. एकतर मतदान प्रदर्शना करता ऐसीवर खाते असावे लागते ते नसेल किंवा लोक साईन इन करून मतप्रदर्शना एवढा विषय महत्वाचा वाटत नसेल. लोकांनी साईनईन करून वेगवेगळ्या विषयावर मतप्रदर्शन करावे एवढे लोकप्रीय विषय कौलातून मांडत राहण्याचा माझा प्रयास असेल कारण लोक या नाही तर दुसर्‍या विषयावर मत प्रदर्शन करतील. इतर वृत्त माध्यमांनी घेतलेल्या कौलां पेक्षा येथील कौलांना अधिक तटस्थता निष्पक्षता प्राप्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन वाचकांनी कौलात मतप्रदर्शनात सहभागी व्हावयास हवे असे मला वाटते. सोबतच येथील कौलांवर हा असा छान चर्चा करण्याचाही मार्ग उपलब्ध आहेच.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ह्याचा राग येतो...

माफ करा पण ह्या आणि असल्या पोल्सबद्दल पोलबद्दल मी संपूर्ण अनुत्साही आहे त्यामुळे काहीच मत देणार नाही.

पण ह्या निमित्ताने एका गोष्टीबाबत येणारा राग व्यक्त करण्याची संधि घेतो. यादीतील पहिली तीन नावे गांधी परिवारातील आहेत. ह्या लोकांनी असे कोणते झेंडे लावले आहेत आणि कर्तृत्व दाखवले आहे की विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्यापैकी एकाचा आपण विचारसुद्धा करावा? ह्या घराणेबाजी आणि हुजरेगिरीमधून आपण केव्हा बाहेर पडणार?

अलीकडेच वाचले की गोपीनाथ मुंडेंच्या जागी त्यांची पंकजा का कोणी मुलगी आहे तिचा विचार चालू आहे आणि ती केंद्रात मन्त्रीहि होईल. ज्या तरुण मुलीचे नावहि ह्यापूर्वी माहीत नव्हते तिला आपण मंत्री करायला निघालो आहोत काय? देशातील बाकी सर्व मेले काय?

टक्केवारी

विविध पक्षांत असलेल्या पारिवारिक खासदारांची माहिती इथे दिलेली आहे.

अलीकडेच वाचले की गोपीनाथ

अलीकडेच वाचले की गोपीनाथ मुंडेंच्या जागी त्यांची पंकजा का कोणी मुलगी आहे तिचा विचार चालू आहे आणि ती केंद्रात मन्त्रीहि होईल. ज्या तरुण मुलीचे नावहि ह्यापूर्वी माहीत नव्हते तिला आपण मंत्री करायला निघालो आहोत काय? देशातील बाकी सर्व मेले काय?

.
.

सॉलिड !!!

राहुल गांधींबाबत सुद्धा हा प्रश्न विचारला जावा.

एका बाजूला "आम्ही संसदीय लोकशाही मानतो त्यामुळे पंतप्रधानांची निवडणूक ही खासदार करतात" असा टेंभा मिरवायचा. आणि दुसर्‍या बाजूला सगळ्या पॉवर्स १० जनपथ च्या हातात ठेवून प्रधान मंत्री कार्यालयाची अथॉरिटी कमी करायचा यत्न करायचा. जोडीला "नॅशनल अ‍ॅडव्हायझरी काउंन्सिल" नेमून मंत्रिमंडलाचे सुद्धा कार्यक्षेत्र मर्यादित करायचे. या नॅशनल अ‍ॅडव्हायझरी काउंन्सिल चे सदस्य हे निर्वाचीत नसतात.

आज भाजपा ऐवजी काँग्रेस निवडून आली असती (२८२) तर काँग्रेस ने राहुलला च प्रधानमंत्री पद दिले असते की नसते ???

राहुल च्या कारकीर्दीत अशी कोणती बाब (गुण, भूमिका वा ट्रॅक रेकॉर्ड) आहे की त्यास इतके अधिकार दिले जावेत ? (उलट राहुल हे सुमार आहेत असे म्हणायला सुद्धा जागा आहे.).

महाभारतात शांतनूच्या कुलगुरुंनी शांतनूला राज्यसभेत एक महत्वाचा प्रश्न विचारला होता. जेव्हा देवव्रताने भीष्म प्रतिज्ञा करून शांतनूच्या नवीन पत्नीची (सत्यवतीची) मुलेच राज्य करतील अशी ग्वाही दिली होती व ते करण्यासाठी स्वतःचे युवराजपद रिक्त केले होते. प्रश्न हा होता - की - महाराज शांतनू ने अपने उस पुत्र मे ऐसे कौनसे गुण देख लिये के जिसका अभी जन्म भी नही हुआ ? कर्मापेक्षा जन्मास जास्त महत्व देण्याचे ते पहिले किंवा दुसरे पाऊल होते.

याचा अर्थ भाजपा दोषमुक्त नाही. नितीन गडकरींना भाजपा चे पक्षाध्यक्ष नियुक्त केले गेले ते सुद्धा हे दाखवून देण्यासाठी की (unlike Congress) आमच्या पक्षात सामान्य कार्यकर्ता सुद्धा पक्षाध्यक्ष बनू शकतो. पण कदाचित गडकरींपेक्षा जास्त चांगले ट्रॅक रेकॉर्ड असलेले इतर "सामान्य कार्यकर्ते" दुर्लक्षिले गेले का - हा प्रश्न विचारला गेला नाही. व माझ्या मते अनेकांच्या मनात हा प्रश्न अनुत्तरित राहिला असेल की या निर्णयामागे गडकरींचे नागपुरातील स्थान व संघाशी असलेली जवळीक ह्या बाबी जास्त महत्वाच्या ठरल्या की नाही ? ... (गब्बर तुला हे सगळे कसे माहीती ? हा प्रश्न एकदम जायज आहे.)

त्रुटी सुधारण्या साठी संपादकांना मार्गदर्शनाची विनंती

मी गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जून खर्गे हे दोन पर्याय जोडले पण दिसत नाहीत आणि एरर दाखवते. त्रुटी सुधारण्या साठी अ‍ॅडमीन्सना/संपादकांना मार्गदर्शनाची विनंती आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मोदी असावेत.

मोदी असावेत.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

सिताराम येचुरी बेस्ट!

सिताराम येचुरी बेस्ट!

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

अभ्यासपूर्ण मुद्देसूद आणि संयतपणे बाजू मांडणारा वक्ता

सिताराम येचुरी, सोमनाथ चटर्जी ज्यांचे विचार डावे नाहीत त्यांना सुद्धा भावतील अशी व्यक्तीमत्वे वाटतात. सिताराम येचुरी थोडक्या शब्दातपण, अभ्यासपूर्ण मुद्देसूद आणि संयतपणे बाजू मांडणारे वक्ते वाटतात.

अवांतर: ज्योती बसूंना पंतप्रधानपद देण्याचा तीसर्‍या आघाडीने देऊ केले होते तेव्हा कम्यूनीस्टांनी स्वतःला नाकारलेली संधी, त्यांना मते देणार्‍यांना संधी नाकारल्या सारखे होते असे वाटले होते. मते देणारे डावे असोत मध्य्मार्गी अथवा उजवे लोकशाहीत त्यांच्या प्रतिनिधींना केव्हा ना केव्हा सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणे आणि त्यांनी लवचीकता दाखवून तडजोडकरून घेणे चांगले असे वाटते. अर्थात गेलेली वेळ पुन्हा सहज येत नाही हे खरे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

नरेन्द्र मोदी यांचे बर्‍याच

नरेन्द्र मोदी यांचे बर्‍याच पक्षांच्या सहाय्याने बनलेले कडबोळे सरकार आणि जर गोष्टी जास्तच भांडवलशाही मार्गाने जायला लागल्या तर त्यांना सळो की पळो करायची इच्छा आणि शक्ती दोन्ही असलेला "आप" हा प्रमुख विरोधी पक्ष असावा - हे माझे सध्यातरी त्यातल्या त्यात "आयडियल" वाटणारे कॉम्बिनेशन आहे.

कॉन्ग्रेस विसर्जित करावी आणि ६५ वर्षांपुर्वी राहिलेले काम पुर्ण करावे असे माझे मत आहे! (डोळा मारत)

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आँ?

कॉन्ग्रेस विसर्जित करावी आणि ६५ वर्षांपुर्वी राहिलेले काम पुर्ण करावे असे माझे मत आहे!

आँ?
दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेली "ती" काँग्रेस आजकाल सत्तेत आहे असे तुमचे म्हणणे आहे काय? (चूभूदेघे)
अहो, ती काँग्रेस किती वेळा विसर्जित करून झालिये याचा हिशोब आहे का तुमच्यापाशी?

त री ही, जी काय उरली आहे, ती भाजपापेक्षा दहा हज्जारपट बरी आहे असे म्हणतो.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भाजपापेक्षा दहा हज्जारपट बरी आहे ?

असली शाब्दिक हिंसा करणार्यांवर काही जहाल कारवाई करता येईल का ? महाजालात त्यांनी लागिन केल्या बरोबर एखाद ठोसा मारला जाईल अशी काही व्यवस्था आहे का ? ( नसल्यास गुगल वाल्यांना कळवायला हवे. ते काहीतरी शोधुन काढतीलच !)....

त री ही, जी काय उरली आहे, ती

त री ही, जी काय उरली आहे, ती भाजपापेक्षा दहा हज्जारपट बरी आहे असे म्हणतो.

राष्ट्र सेवा दलाचे का आपण? इतके जहाल संघी अँटीमॅटर त्यांच्याच फॅक्टरीत मिळते.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

.

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>कॉन्ग्रेस विसर्जित करावी

>>कॉन्ग्रेस विसर्जित करावी आणि ६५ वर्षांपुर्वी राहिलेले काम पुर्ण करावे असे माझे मत आहे!

नॉन-पुराणमतवादी* पार्टीचा समर्थ पर्याय उभा करून काँग्रेस विसर्जित करावी.

*इथे मी पुराणमतवादी म्हटले आहे.... (सेक्युलर/कम्युनल हा पाइंट आणलेला नाही).

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

काँग्रेस विसर्जित

काँग्रेस विसर्जित करावी

Congress should be unregistered for Election Commission. AAP should be dissolved in Yamuna.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

+१

+१
असा समर्थ पर्याय आल्यास काँग्रेस खरोखर आपोआप विसर्जित होइल.
मुद्दाम असे करणे शक्य नाही.
मागील पाच पन्नास वर्षापासून जे लोक आम्दार, खास्दार आहेत; ते म्हणतील आम्ही करायचं काय ?
ते स्वतःहून घरी बसणार नाहित.
सातत्याने हरु लागले; तर आपोआप घरी बसावे लागेल.
एक स्वतंत्र व्यवस्था काँग्रेस ह्या रुपाने अस्तित्वात आहे.
ती फट् म्हणून संपणार नाही.
त्यासाठी राजकिय अवकाशातले काँग्रेसचे अस्तित्व संपवणारा असा एखादा पर्याय पाहिजे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाहेरून ... ?

हा बाहेरून काय प्रकार आहे?
असो,

बाहेरून राज ठाकरे

बाहेरून उद्धव ठाकरे

आपण लोकसभेबद्द्लच बोलताय ना? हे दोन फुटाणे आतून/बाहेरून/वरून/खालून कुठूनही जरा अन्झेपेबल पर्याय आहेत असं वाट्तंय...

दोन प्रकार आहेत संसदेच्या

दोन प्रकार आहेत संसदेच्या बाहेरून रिमोट कंट्रोलने आपल्या पक्षाच्या सदस्यांचे नियंत्रण चालवणारी मंडळी. दुसरे संसदेत नसले तरी टिव्ही इत्यादी माध्यमांचा सपोर्ट मिळवून झळकणारी मंडळी जसे कि अरविंद केजरीवाल संसदेत नव्हते तरी आंदोलन, गौप्यस्फोट प्रेस कॉन्फरन्स करून बातम्यात राहायचेच. किंवा आता प्रियांकाजी केवळ बातम्यांच्या मैदानात उतरल्या आहेत. म्हणजे त्या संसदेत नसल्या तरी बातम्या देणार्‍यांचे कान तिकडे टवकारलेले राहतील.

तसेच उद्धवजी आणि राज ठाकरे बंधू द्वय राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष नेता म्हणून अजून ओळख ठेऊन नाहीत पण कोण सांगावे समय समय की बात आहे. हां कोणीच त्यांची निवड संभाव्य विरोधी पक्ष नेता म्हणून करू इच्छित नसेल तर ते पर्याय आपण उडवूयात.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

एका जुन्या कौलाराम फुटण्यांची

एका जुन्या कौलाराम फुटण्यांची आठवण आली.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी