मोहन अब्दूल फर्नांडीस

दुपारी फटफटीवरून घरी परतत होतो. उन्ह असल्यामुळे लवकर घरी पोहोचण्याची घाई होती. एम-२ च्या कोपर्‍यावर एका माणसाने ‘लिफ्ट प्लिज' म्हणून हात दिला. मी गाडी थांबवली. ‘प्लिज ड्रॉप मी अ‍ॅट नेक्स्ट कार्नर', तो इंग्रजीत बोलला. त्याचे उच्चार स्पष्ट आणि सुटे होते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. औरंगाबादसारख्या छोटा जीव असलेल्या शहरात रस्त्यावर इंग्रजी बोलणारा गृहस्थ भेटणे ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे.

त्याचा पेहराव मळका पण इंग्रजी होता. पांढर्‍या शर्टचा रंग खाकवट झाला होता. एवढ्या उन्हातही त्याने टाय बांधलेला होता. कोट मात्र काढून हातावर लटकावला होता. डोळ्यांवर जुन्या वळणाचा जाड फ्रेमचा चष्मा होता. चष्म्याच्या दांड्या कानाकडे थोड्या बारीक होत गेल्या होत्या. मिशा बर्‍याचशा फेंदारलेल्या होत्या. केसांत काळे आणि पांढरे अशी बेरड होती. केसांत तेल लावलेले होते. चेहरा घामेजलेला आणि रापलेला होता.

मी काही न बोलता त्याला फटफटीवर बसवून घेतले. किलोमीटरभर अंतर कापल्यानंतर त्याला उतरावयाचे असलेल्या कोपर्‍यावर त्याने ‘प्लिज स्टॉप' म्हणून गाडी थांबवायला लावली. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे एकमेकांशी काहीच बोललो नव्हतो. तो हातावरचा कोट सांभाळत उतरला. स्पष्ट आणि सुट्या शब्दांत ‘थँक यू' म्हणाला. जाण्यासाठी वळण्यापूर्वी ‘यूवर गुड नेम प्लिज' असे म्हणत त्याने मला नाव विचारले. मी नाव सांगितले. नंतर ‘व्हॉट डू यू डू' म्हणत उद्योगही विचारला. ‘मी पत्रकार आहे', असे मी म्हणालो. ‘ओऽऽ आयसी' असे म्हणत त्याने भुवया उंचावल्या. मग माझ्या पेपरचे नाव विचारून घेतले. सारे संभाषण तो इंग्रजीतूनच करीत होता.

आता याने एवढी चौकशी केली आहे, तर आपणही काही तरी बोलून निरोप घ्यावा म्हणून त्याला नाव विचारले. तो म्हणाला, ‘मोहन अब्दूल फर्नांडिस.'

त्याचे नाव ऐकून मी त्याच्याकडे चमकून पाहिले. तो मात्र निर्विकार होता. पूर्वीच्याच स्पष्ट आणि सुट्या शब्दांत तो म्हणाला, ‘पीपल ऑलवेज फिल पझल्ड. येस, इट इज रिअली अ स्ट्रेंज नेम. मोहन हे माझे नाव आहे. अब्दूल हे माझ्या वडिलांचे नाव आहे... आणि फर्नांडिस हे आमचे आडनाव आहे.'
‘असे कसे', मी कुतुहलाने विचारले.
तो सांगू लागला, ‘एक्झाक्टली माझी आई हिंदू होती. तिने मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला. पण दोघांनी एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही. माझा जन्म झाल्यानंतर आईने माझे नाव मोहन ठेवले. मी ८ वर्षांचा असताना आम्ही सारेच ख्रिस्ती झालो. पण आम्ही आमची नावे बदलली नाही. फक्त आडनाव बदलले. म्हणून माझे नाव मोहन अब्दूल फर्नांडीस असे झाले.'

तो मराठीही स्पष्ट आणि सुट्या शब्दांत बोलत होता. त्याची शब्दांवर पकड होती. मात्र, चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते. इतका निर्विकार मनुष्य मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच्याशी बोललेच पाहिजे, असे मला वाटले. माझी गाडी अजून चालूच होती. मी गाडी बाजूच्या झाडाखाली घेऊन बंद केली आणि स्टँडवर लावली. मग आम्ही बोलू लागलो.

‘तुम्ही काय करता?', मी विचारले.
‘सध्या बेकार आहे. ते कोपर्‍यावरचे दुकान दिसतेय ना, तिथे मुलाखतीसाठी चाललो आहे.' त्याने बोट वळवून दुकान दाखविले. ते फर्निचरचे दुकान होते. त्याचा मालक माझ्या ओळखीचा होता. त्याच्याकडून आम्ही बरीच खरेदी केलेली होती.
‘फर्निचरच्या दुकानात तुम्ही काय काम करणार?'
‘नो मॅन. एव्हरी वर्क हॅज इटस ओन स्टँडर्ड. माझ्या गरजा फार कमी आहेत. मी एकटाच राहतो. स्वत:च स्वयंपाक करतो. लष्कराने मला ही शिस्त दिली आहे.'
‘लष्कराने म्हणजे?'
‘मिलिटरी. मी मिलिटरीत होतो.'
कुठल्याही कोनातून पाहिले तरी तो लष्करी सेवेतला माणूस वाटत नव्हता. हा नक्की खोटं बोलत असावा, असे मला वाटले.

तो सांगत होता, ‘मी लष्करात धर्मगुरू होतो. दौंडच्या कॅम्पात मी अनेक वर्षे काम केले.'
‘लष्करात धर्मगुरू कसे काय?'
‘लष्करातील जवानांना आपापल्या धर्मानुसार प्रार्थना आणि इतर कर्मे करता यावीत यासाठी व्यवस्था असते. मी ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून तेथे होतो. आय वाज देअर फॉर ख्रिश्चन रेग्यूलर्स.'
ही माहिती मला नवीन होती. लष्करात अशी काही सोय आहे, याची मला माहिती नव्हती. आता माझ्यातील पत्रकार डोकावू लागला होता. मी त्याला विचारले.
‘हॅव यू एव्हर वर्क्ड फॉर मिशनरीज?'
‘एस. आय अ‍ॅम वर्किग फॉर मोअर दॅन २० इअर्स नाऊ.'
‘व्हाय आर यू डुइंग धिस. व्हॉट मेड यू टू प्रॉसेलिटाईज नेटिव्हज?'
‘सॉरी..?'
‘व्हॉट मेड यू टू ट्राय फॉर कन्हर्जन्स?'
‘नो. वुई डोन्ट मेक कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन ईज व्हेरी अग्ली वर्ड. प्रॉपर वर्ड इज प्रोपागेशन. प्रोपागेशन म्हणजे प्रसार.'
‘धर्मांतर हा खरोखरच कुरूप शब्द आहे. पण धर्मांतर करण्याची कृती त्यापेक्षाही कुरूप आहे.'
‘तुमचे म्हणणे खरे आहे.'
‘मग तुम्ही धर्मांतरे का करता?'
‘मी सांगितले ना, आम्ही धर्मांतरे करीत नाही. आम्ही लोकांना फक्त सत्य सांगतो. सत्यासारखी पवित्र गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही'
‘पण, सत्य काय आहे.'
‘सत्य हेच आहे की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याचे तारण होणार आहे.'

मोहन अब्दूल फर्नांडीस पुढे बोलत होता. त्याचा चेहरा अजूनही निर्विकारच होता. शब्द मात्र ठाम आणि निश्चित होते. मी आता थक्क झालो होतो.

(मोहन अब्दूल फर्नांडीस याच्यासोबत झालेल्या पुढील चर्चेचा वृत्तांत दुसर्‍या लेखात देईन.)
आणखी लेख माझ्या ब्लॉगवर वाचता येतील

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

सेंचुरी पक्की Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

थ्यंक्स. दुरुस्त केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘सत्य हेच की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याने तारण होणार आहे.'

आपले ब्रेन-वॉश झाले आता दुसर्‍यांचे करायचे असला उपद्व्याप न काय.
कोणाच्या व कशाच्या आहारी न जाणं हेच श्रेष्ठ. अति तेथे माती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले ब्रेन-वॉश झाले आता दुसर्‍यांचे करायचे असला उपद्व्याप न काय.
कोणाच्या व कशाच्या आहारी न जाणं हेच श्रेष्ठ. अति तेथे माती.

वुई डोन्ट मेक ब्रेन-वॉश. ब्रेन-वॉश ईज व्हेरी अग्ली वर्ड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘सत्य हेच आहे की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याचे तारण होणार आहे.'

हेच्च्/गेल्यानेच्च हे शब्द ब्रेन वॉश नाही तर कशाचे निदर्शक आहेत.
काय पुरावा आहे येशुला शरण गेल्याने फक्त तारण होते अन अन्य धर्मियांचे होत नाही?
** मूळात तारण अशी गोष्ट असते का तेही अजून कुणी परत येऊन सांगीतलेले नाही. तो भाग तर अलहिदाच.
______________
असो, मला तुमच्या श्रद्धेशी खेळायचे नाही. पण तुम्ही जर फोरमवर येऊन प्रोपोगेशन का काय ते करायला लागलात तर उलट्सुलट सर्वच विचार समोर येणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही जर फोरमवर येऊन प्रोपोगेशन का काय ते करायला लागलात तर उलट्सुलट सर्वच विचार समोर येणार.

या लेखात आणखी कोणाला "प्रोपोगेशन का काय ते" दिसते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही लेखात नाहीये आ॓णि मला तसे वाचून वाटलेही नव्हते पण तुमच्या प्रतिसादात - वुई डोन्ट मेक ब्रेन-वॉश. ब्रेन-वॉश ईज व्हेरी अग्ली वर्ड!
असे वाक्य लिहून तुम्ही बॉम्ब टाकलात.

वुई म्हणजे काय? तुम्हीही आलात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेक ब्रेन-वॉश. ब्रेन-वॉश ईज व्हेरी अग्ली वर्ड!
असे वाक्य लिहून तुम्ही बॉम्ब टाकलात.

वुई म्हणजे काय? तुम्हीही आलात ना?

शब्दांचा खेळ आहे हो. पत्रकार माणुस आहे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कूल!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान पाककृती. वीकांताला करून पाहीन.
.
.
.
.
.
.
.

.

(साभार : भडकमकर मास्तर) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आदूबाळाचा प्रतिसाद वाचल्यावर का कोण जाणे, पुढचा प्रतिसाद हाच असणार असं वाटलं होतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यक्तिचित्रण आवडले, क्रमशः म्हणून अर्धवट वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणपती अल्लाउद्दीन गोन्साल्विस किंवा तुलसीदास खान इ. नावांची आठवण झाली!
फुड्ल्या भागाची वाट बघ्तोय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>‘सत्य हेच आहे की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याचे तारण होणार आहे.'<<
इथे येशु ऐवजी आपापल्या धर्माचे देव घातले तरी चालते. शेवटी येशु राम कृष्ण अल्ला ..... वगैरेंची स्थाने आपल्याच मेंदुत ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आमची डायरेक्ट देवाशीच ओळख आहे. त्यामुळे त्याच्या कुठल्याही प्रेषिताला शरण जाणे 'आम्हाला' जरुरी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची डायरेक्ट देवाशीच ओळख आहे.

म्हणजे तुम्ही देवाला (देवाच्या अस्तित्वाला) मानता?

एकदा काय ते नक्की ठरवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची डायरेक्ट देवाशीच ओळख आहे.

डायरेक्ट देवाशीच ओळख असलेल्यांनाच प्रेषित म्हणतात. देवाने काही सन्देश प्रेषित केला असल्यास जगाच्या कल्याणासाठी जाहीर करावा, महाराज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव म्हणत होता, की ही तमाम दुनिया वायझेड आहे म्हणून.

पण देवाने हे संदेश म्हणून सांगितले नै कै, देव मला हे खाजगीत सांगत होता. ते अधिकृतरीत्या तुम्हाला सांगण्याची परवानगी मला नाही. तरी या संस्थळावर अनामिकपणे लिहिण्याची सोय करून देण्याचे संस्थळव्यवस्थापन मनावर घेईल काय?

ते नै का, 'आमच्या अमेरिके'त एखाद्या घटनेसंबंधी अधिकृत वक्तव्य करण्याची किंवा वृत्तपत्रांशी बोलण्याची परवानगी नसणारे स्रोत त्याबद्द्ल वृत्तपत्रांना माहिती देताना नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलतात? तद्वत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आमच्या अमेरिके'त

ही आमची (खट्याळ)अमेरिका. आमचा हिच्यावर फार जीव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चर्चाविषय मधे का टाकलय? असो. ललित व्यक्तीचित्रण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे.

हा चर्चाविषय नसून चर्चविषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी खरे आहे, हा 'चर्च'चा विषय आहे. पण 'चर्च' हा आपल्याकडे नेहमीच 'चर्चे'चा विषय राहिला आहे. म्हणून लेख 'चर्चा' या सदरात टाकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्रिश्चन धर्मप्रसारक इंग्रजी बोलणारे, शिकलेले इ असतात म्हणून आश्चर्य वाटते. पण सगळ्या धर्मप्रचारकांची 'बुद्धिमत्ता' अशीच असते. जोपर्यंत कोणी घटना कायदे तोडत नाही, किंवा नैतिकतेचे नियम तोडत नाही तोपर्यंत वाईट वाटायला नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गोष्ट आवडली. ह्या जगात काहिही शक्य आहे म्ह्णा पण नाव, वडीलांचे नाव, आडनाव वेगवेगळ्या धर्माशी संबंधीत आहेत॑ असे पहिल्यांदाच वाचले. एनीवे, गोष्टच ती !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव, वडीलांचे नाव, आडनाव वेगवेगळ्या धर्माशी संबंधीत आहेत॑ असे पहिल्यांदाच वाचले.

हो आणि नाही.

बोले तो, 'मोहन फर्नांडिस' या काँबिनेशनमध्ये फारसे आश्चर्यकारक काहीही नाही. ऐकीव माहितीनुसार, गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात कित्येक पोर्तुगीजविरोधक गोमंतकीय किरिस्तांवांनी 'राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन' वगैरे आपापल्या मुलांची नावे 'एतद्देशीय' पद्धतीची ठेवावयास सुरुवात केली होती म्हणे. त्यामुळे 'मोहन फर्नांडिस'चे आश्चर्य वाटत नाही.

परंतु 'अब्दुल', ताज्जुब की बात है.

तसेही, गोवन किरिस्तांवांत मधले नाव हे वडिलांचे नाव असण्याची प्रथा आहे काय? माझ्या कल्पनेप्रमाणे ही पद्धत फक्त मराठीभाषक आणि गुजरातीभाषक हिंदूंमध्ये आहे. (झालेच तर कदाचित मराठी मूळ असलेल्या प्रॉटेस्टंटांमध्येही असू शकेल, कल्पना नाही. गोमंतकीय हिंदूंमध्ये असावीच, परंतु क्याथलिकांबाबत साशंक आहे. माहीतगारांनी योग्य तो खुलासा करावा.)

(शिवाय, 'अब्दुल' या शब्दास ष्ट्याण्डअलोन अस्तित्व नसावे. म्हणजे, अब्दुर्रहमान, अब्दुल्लाह, अब्दुलगफार वगैरे ठीक आहे. 'अब्द' किंवा 'अब्दुल'पुढे येणारे ते सर्व शब्द ही अल्लाहची नावे/attributes आहेत, सबब 'अल्लाहचा सेवक' या अर्थाने ही नावे ठीकच आहेत. पण नुसतेच अब्दुल? किंवा, त्यापेक्षासुद्धा, अब्दुलफर्नांडिस? 'फर्नांडिसाचा सेवक'??? याविरुद्ध फतवा का काढला जाऊ नये? कारणे दाखवा!)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यांना 'गोवानीज' म्हणून संबोधले, तर जाम भडकतात म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोवन चे गोवानीज़ केल्यास भडकायचे कारण काय? निजण्याशी काही संबंध लावून रागावण्याइतपत मराठी येते काय त्यांना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा, पण खरे आहे. गोवेकरांना "गोवानीझ" असे म्हटलेले आवडत नाही.

शिवाय या अपवादात्मक प्रत्ययाबद्दल कुतूहल वाटते. एखाद्या व्यक्तीला हा प्रत्यय वापरणे कसे सुचत असेल? भारतातील अन्य कुठले प्रादेशिक नाव "-ईझ" प्रत्ययांत आहे - पटकन आठवणारे म्हणजे "आसामीझ".
मात्र तमिलियन, महाराष्ट्रियन, आंध्रा-आईट (?), पुणे-आईट (?), बँगलोरियन, देल्ही-आईट... इत्यादि अन्-प्रत्ययांत आणि -आईट-प्रत्ययांत शब्द जास्त आढळतात.
नाहीत इंग्रजीतही देशी प्रत्यय : बेंगॉली, राजस्थानी, नागा, मणिपुरी... वगैरे.

"-ईझ" प्रत्यय हा परदेशांकरिता वापरलेला अधिक दिसतो - (बिचारे असम राज्य, भारतातील लोकांकरिता परदेशीच). त्यामुळे मला वाटते, की रूढ उपयोग नसेल* तर आपणहून भारतातील गावा-प्रांतांना "-ईझ" प्रत्यय वापरायचे टाळावे. "आम्ही यांना परदेशी समजतो" अशी गर्भित भावना नसली तरी ऐकणार्‍याला भासू शकते.
*रूढ उपयोग म्हणून अपवाद - आसामीझ

उदाहरणार्थ : "कॅनरीझ" हे जुने नाव वापरल्यास बर्‍याचशा कन्नड/कन्नडिग लोकांना आवडणार नाही, अशी माझी अटकळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, मेक्स सेन्स. आसामीज़ चा अपवाद सोडला तर बाकी प्रत्यय वेगळे आहेत हे मान्य. तस्मात सुप्त परकेपणाशी सहमत आहे.

अन कॅनरीज़ इ.इ.म्हटलेले कन्नडिगांना ऑड वाटेल पण राग येईल किंवा कसे याबद्दल साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वरान्त शब्दाला 'ईझ' प्रत्यय लागला तर तो सहसा 'नीझ' प्रत्यय होऊन लागतो, असा काही नियम आहेसे वाटते. उदा., 'जावा'पासून 'जावानीझ', 'बाली'पासून 'बालीनीझ' वगैरे. (मात्र, 'बर्मा'पासून 'बर्मीझ'च, 'बर्मानीझ' नव्हे. आणि 'काँगो'पासून 'काँगोलीझ'. का कोण जाणे.)

त्यामुळे, नियमांप्रमाणेच जायचे, तर 'गोवानीझ'मध्ये (किमानपक्षी व्याकरणदृष्ट्या तरी) काहीही चूक नसावे. मला वाटते, 'गोवानीझ'ला हिरिरीने, तावातावाने वगैरे जे आक्षेप येताना पाहिलेले आहेत (गोवन फोरम्सवर, मुख्यतः क्याथलिकगोवनांकडून), ते अज्ञानमूलक असावेत. (यातल्या अनेकांना पोर्तुगीझ राजवटीचा ह्यांगोव्हर आणि १९६१च्या भारतीय चोरांच्या 'आक्रमणा'चा राग गेलेला नसतो, पैकी बरेचजण पोर्तुगालात स्थायिकसुद्धा असतात (आणि बहुतकरून जुनी खोंडे असतात), असेही पाहिलेले आहे, परंतु ते कदाचित माझ्या गोवन फोरम्सच्या मर्यादित निरीक्षणाच्या परिणामी असू शकेल. खुद्द गोव्यातल्या आजच्या तरुण पिढीची या बाबतीतील मते काय असावीत, कल्पना नाही.)

(कैच्याकै खुळचट आक्षेपसुद्धा ऐकलेले आहेत. म्हणे 'गोवा'ला प्रथम 'अन' आणि मग 'ईझ' असे दुहेरी प्रत्यय लावून हा शब्द बनवलाय, जे व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे, एक तर 'गोवन' व्हायला पाहिजे नाहीतर 'गोवीझ' व्हायला पाहिजे, वगैरे वगैरे.)

"-ईझ" प्रत्यय हा परदेशांकरिता वापरलेला अधिक दिसतो - (बिचारे असम राज्य, भारतातील लोकांकरिता परदेशीच). त्यामुळे मला वाटते, की रूढ उपयोग नसेल* तर आपणहून भारतातील गावा-प्रांतांना "-ईझ" प्रत्यय वापरायचे टाळावे. "आम्ही यांना परदेशी समजतो" अशी गर्भित भावना नसली तरी ऐकणार्‍याला भासू शकते.

असा काही नियम असण्याबद्दल साशंक आहे. म्हणजे, नेपालमध्ये अजूनही इंग्रजी वापरात 'नेपालीझ' हा शब्द प्रचलित आहे. तो वापरताना नेपाली लोकांना आपल्याच देशात एलियनेट वगैरे झाल्याचे वाटल्याचे ऐकिवात नाही. किंवा, श्रीलंकेतील मनुष्यास आज 'सिलोनीझ' म्हणून संबोधल्यास कदाचित आवडणार नाहीही, परंतु त्याचा आक्षेप 'सिलोन'ला असेल, 'ईझ'ला नव्हे, अशी अटकळ आहे.

चिनी किंवा जपानी मनुष्यास इंग्रजीतून 'चायनीझ' किंवा 'जॅपनीझ' म्हणून संबोधल्याने त्याचा तेजोभंग होत असल्याचे ऐकिवात नाही. (फार कशाला, पोर्तुगीझांना 'पोर्तुगीझ' म्हटल्याने त्यांचा थयथयाट होत नाही.)

बाकी, 'भारतीय वि. परदेशी' ही डायकॉटॉमी काही पटत नाही. बोले तो, भारतातल्या बर्‍याचशा प्रदेशांना 'ईझ'प्रत्यय लागत नाही, ही बाब बहुधा ब्रिटिशकालापासून लागू असावी. ब्रिटिशांनी खास हिंदी लोकांच्या अस्मितेस धक्का पोहोचू नये, म्हणून असा काही नियम रचून ती नावे काळजीपूर्वक रचली असावीत, याबद्दल साशंक आहे. हा निव्वळ योगायोग असावा.

(ब्रिटिशकाळातसुद्धा 'ईझ'प्रत्ययान्त असे कितीसे प्रदेश असावेत? चटकन आठवणारी उदाहरणे: असमीझ, मलबारीझ, क्यानरीझ, अंदमानीझ, निकोबारीझ. शिवाय, ब्रिटिश आधिपत्याबाहेरील इंडियन प्रदेशांत गोवानीझ. पैकी मलबारीझ कालबाह्य झाले कारण क्यारलाइट/मलयाली या व्यापक ऐडेंटिटीने त्याची जागा घेतली. क्यानरीझचे तसेच. गोवानीझचा विचार तूर्तास आपण करत असल्यामुळे ते सोडून देऊ. असमीझ, अंदमानीझ, निकोबारीझ वगैरे अजून कायम आणि भक्कम आहे. अर्थात, 'अंदमांनी आणि निकोबारी जनतेला आपण भारतीय परक्या नजरेने बघतो' असा दावा करता येईलही, परंतु त्यात मला किमानपक्षी 'ईझ प्रत्यय लावण्याचे कारण' या दृष्टिकोनातून तरी अर्थ दिसत नाही. बाकी, गुजरात्यांना ब्रिटिश राजवटीतसुद्धा कोणी 'गुजरातीझ' वगैरे म्हटल्याचे ऐकिवात नाही, परंतु, पुन्हा, त्यामागे काही खास विचारसरणी असावी याबद्दल साशंक आहे.)

आणि हो, 'गोवानीझ' असा वापर किमान ब्रिटिश जमान्यात वाढलेल्या जनतेत तरी 'रूढ' होता. (खुद्द पु.लं.नी असा वापर एके ठिकाणी केल्याचे आठवते. उदाहरणादाखल 'सदू आणि दादू' पहा.)

उदाहरणार्थ : "कॅनरीझ" हे जुने नाव वापरल्यास बर्‍याचशा कन्नड/कन्नडिग लोकांना आवडणार नाही, अशी माझी अटकळ आहे.

बहुधा आवडू नये. परंतु त्या बाबतीतील आक्षेप थोडा अधिक व्यापक असू शकतो. काहीसा 'बर्मा' विरुद्ध 'म्यानमार'च्या धर्तीवरचा. बोले तो, माझ्या कल्पनेप्रमाणे 'क्यानरा' हे नामाभिधान कर्नाटकाच्या फार फार तर दोन जिल्ह्यांना लागू पडते (जे दोन्हीं जिल्हे, बादवे, कन्नडभाषकबहुल नसावेत). त्या दोन जिल्ह्यांच्या नावाने समस्त कर्नाटकवासीयांना ओळखणे हे अपमानास्पद वाटणे शक्य आहे. हे साधारणतः तमाम दाक्षिणात्यांना 'मद्रासी' या सामान्यनामाने ओळखण्याच्या पठडीत यावे.

'गोवानीझ'ला हा आक्षेप लागू पडू नये.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अर्थात, सरतेशेवटी, एखाद्या गटाला आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे असे वाटते, हे ठरविण्याचा पूर्ण हक्क आहे, हे लक्षात घेता, गोवेकरांना 'गोवन' म्हणावे, शक्यतो 'गोवानीझ' म्हणू नये, हे ठीकच. आणि, याकरिता काही कारणमीमांसा देण्याचीही गरज प्रस्तुत गटाला असू नये, हेही ठीकच. 'आम्हाला वाटते, म्हणून आम्हाला गोवानीझ ऐवजी गोवन म्हणा' हे अर्थात ग्राह्य आहे.

गडबड होते, ती यामागे (काहीही गरज नसताना) कारणमीमांसा दिली/शोधली जाऊ लागते तेव्हा. मग त्या तथाकथित कारणमीमांसेत काहीही जलग्राहकता नाही, ही केवळ 'म्यानुफ्याक्चर्ड डिसेंट' आहे, हे लक्षात येऊ लागते.

म्हणजे, मुंबईकरांना जर वाटले, की आपल्या शहराचे नाव इंग्रजीतसुद्धा 'मुंबई' असेच लिहिलेबोलले जावे, 'बाँबे' असे नव्हे, आणि त्यामुळे त्यांनी तशी प्रथा सुरू केली, तर तो अर्थातच त्यांचा प्रश्न अधिक हक्क आहे. परंतु एखादे जुने खोंड जर तरीही 'बाँबे' म्हणालेच, तर (१) त्यामुळे त्यांच्या भावना दुखावण्याचे किंवा अस्मितेला ठेच लागण्याचे काहीही कारण नसते (विशेषतः, इतकी वर्षे स्वतः होऊन जुनी प्रथा पाळताना कोणाचीही अस्मिता पायदळी भरडली गेलेली नसताना), आणि (२) त्याकरिता त्या जुन्या खोंडास जमावाने रस्त्यात बदडून काढण्याचेही काहीही कारण नसते.

थोडक्यात, गोवेकरांना 'गोवन' म्हणावे, हे ठीकच. (तसेही, हल्ली तोच प्रघात रूढ झाल्यात जमा आहे. नजीकच्या वर्तमानकाळात 'गोवानीझ'चा वापर पाहिलेला नाही.) परंतु क्वचित्प्रसंगी कोणी 'गोवानीझ' म्हटलेच, तर त्यातून पुच्छपददलन होण्याचे काही प्रयोजन सकृद्दर्शनी दृग्गोचर होत नाही, एवढेच.

इत्यलम्|
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इंग्रजीत 'फोरा'. अमेरिकनमध्ये 'फोरम्स'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ प्रतिसाद लिहिताना नेपाल/नेपालीझ उदाहरण मनात आले होते, परंतु नेपाल भारताचा भाग नाही, या तांत्रिक कारणामुळे त्याचा उल्लेख केला नाही.
नेपाली लोकांना "नेपालीझ" शब्दाचा त्रास होत नाही हे खरे. तीच बाब जावानीझ, पोर्तुगीझ वगैरे नावांची.

अर्थात, सरतेशेवटी, एखाद्या गटाला आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे असे वाटते, हे ठरविण्याचा पूर्ण हक्क आहे, हे लक्षात घेता, गोवेकरांना 'गोवन' म्हणावे, शक्यतो 'गोवानीझ' म्हणू नये, हे ठीकच. आणि, याकरिता काही कारणमीमांसा देण्याचीही गरज प्रस्तुत गटाला असू नये, हेही ठीकच. 'आम्हाला वाटते, म्हणून आम्हाला गोवानीझ ऐवजी गोवन म्हणा' हे अर्थात ग्राह्य आहे.

कदाचित हे वाक्य "लोकांना रूढ नावापेक्षा वेगळे नाव वापरले तर आवडत नाही" हे मागील प्रतिसादात स्पष्ट लिहायचे राहून गेले होते. ही बाब स्वयंस्पष्ट असल्याचे भासले होते. स्वयंस्पष्ट मुद्दा म्हणून सांगितला नाही. (गरज होती असे दिसते. हा मुद्दा मला प्राथमिक महत्त्वाचा वाटत नसल्याची तुमची धारणा झाली, ती टाळता आली असती. गंमत म्हणून "-ईझ" प्रत्ययाचे भारतात क्वचित सापडणे हा गमतीदार मुद्दा पुढे चालवला होता. हा मुद्दा मला "लोकांना नावडते त्या नावाने त्यांना हाक मारू नये"पेक्षा मला प्राथमिक वाटत असावा अशी तुमची धारणा झाली. क्षमस्व.

---
इंग्रजीमध्ये "ईझ"प्रत्यय कुठल्या देशांना लागतो, ही बाब जरा अनियमित आहे. "-ईझ" प्रत्ययाचे इंग्रजीइंगित (मराठमोळे शी यमक जुळवत) रूप म्हणजे इंग्रजीतला "-इश" प्रत्यय, होय खुद्द "इंग्लिश" शब्द तसा आहे. डॅनिश, स्वीडिश, फिन्निश (फिनिश), वगैरे आहेत. परंतु गेल्या काही शतकांत नवीन प्रदेशांना हा प्रत्यय लावलेला दिसत नाही. भाषांकरिता हा प्रत्यय जणू आरक्षित झाला आहे - मिडल-अर्थ् मधील एल्व्हिश व ग्नोमिश भाषा. म्हणून इंग्रजीतला प्रादेशिक डिफॉल्ट प्रत्यय "अन्/इयन्", पण भाषांकरिता कधीकधी "इश"-प्रत्यय कधीकधी "अन्/इयन्"प्रत्यय. किंवा "काहिसा"साठी हा "इश"प्रत्यय विशेषणांसह वापरलेला दिसतो - He came at nine-ish for a late-ish visit.

तरी -ईझ प्रत्यय वापरण्याकरिता एक ढोबळ नियम (परंतु बरेच अपवाद असलेला नियम) आंतरजलावर वाचला - तो म्हणजे ज्या बिगरयुरोपियम देशांची ओळख युरोपाला इतालियनमार्फत झाली, त्यांना "ईझ" प्रत्यय लागतो. इंग्रजीचा पिंड "अन्" प्रत्यय लावण्याचा आहे. बिगर-इंग्रजी परदेशी भाषकांकडून जे शब्द इंग्रजीने उसने घेतले, तिथे "ईझ" दिसते.

ब्रिटिशांनी खास हिंदी लोकांच्या अस्मितेस धक्का पोहोचू नये, म्हणून असा काही नियम रचून ती नावे काळजीपूर्वक रचली असावीत, याबद्दल साशंक आहे. हा निव्वळ योगायोग असावा.

अस्मितेचे रक्षणही नाही आणि निव्वळ योगायोगही नाही. "ईझ" इंग्रजीचा डीफॉल्ट प्रत्यय नाही, तर "अन्" हा डीफॉल्ट प्रत्यय आहे. "कॅनरीझ"चा उगम पोर्तुगिजात आहे, इंग्रजीमूलक नाही.

"श्रीलंकीझ" असे म्हणण्याचा अट्टाहास करण्याचे दोन फायदे दिसतात : एक तर त्या लोकांना अपेक्षित नावाने हाक मारल्यामुळे संवाद सहज होईल. शिवाय "या व्यक्तीचे इंग्रजी जरा कच्चे असावे" अशी आपल्याबाबत धारणा होणार नाही.
---
स्पॅनिश मध्ये मात्र srilanqués (-ईझ चे स्पॅनिश रूप) म्हणणे बरे, srilancano म्हटल्यास "याला स्पॅनिश नीट येत नाही" असे धारणा करून घ्यायची नसेल तर... श्रीलंकेतील लोकांना स्पॅनिश भाषेतील आपल्या नावाबाबत विशेष आगत्य नसेल तितके स्पॅनिशभाषकांना असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेही, गोवन१ किरिस्तांवांत मधले नाव हे वडिलांचे नाव असण्याची प्रथा आहे काय? माझ्या कल्पनेप्रमाणे ही पद्धत फक्त मराठीभाषक आणि गुजरातीभाषक हिंदूंमध्ये आहे

यात उत्तर कर्नाटकीयांचीदेखिल भर घालता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसरलोच होतो.

भरीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तर भारतातही काही ठिकाणी मधले नाव म्हणून वडिलांचे नाव लावतात असे अलिकडेच समजले.
नेमक्या कोणत्या भूभागत किंवा समाजात असे लावतात ते ठाउक नाही, पण नर्मदेच्या व गंगा-यमुना ह्या दरम्यान कुठेतरी लावतात हे खात्रीशीर सांगतो. हापिसातला मित्राचा मित्र तसे नाव लावतो; व "पूर्ण उत्तर भारतात वडिलांचे नाव मधले नाव म्ह्णून कुणीच वापरत नाही" हा गैरसमज असल्याचे सांगतो. (तो मूळचा इंदोर्-भोपालस्थित मराठी आहे असे म्हणावे तर तसेही नाही; शंका नसावी.)

उदा :-
रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा.
लक्ष्मणप्रसाद दशरथप्रसाद शर्मा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कृष्णप्रसाद वासुदेवप्रसाद यादव

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरसिंग वल्दे हरिसिंग...

(म्हणायला काय जाते?)

(अतिअतिअतिअवांतर: 'वडील' हा 'वालिद'चा अपभ्रंश असावा काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेकप्रसाद अमिताभप्रसाद बच्चन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही काल्पनिक गोष्ट नव्हे. ही एक सत्य घटना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0