माझी जात-धर्म-प्रांतादि अस्मिता

ऐसी वर खाते उघडून ठेवले होते केवळ. मागच्या आठवड्यापासून जरा कार्यरत(active) झाले आणि मग वाटलं व्यक्तिगत माहितीही लिहून (टायपून)टाकू .

शेवटी थबकले … जात-धर्म-प्रांतादि अस्मिता पाशी येवून

अस्मिता चं इंग्रजी भाषांतर आहे self -awareness . स्वत:च्या असण्याची जाणीव . ती तर प्रत्येकाला निश्चितच असते आणि असावीही .

हल्ली बहुधा सर्वच सुशिक्षित लोक जात व्यवस्था वाईट आहे. धर्म जात इत्यादींचा समूळ नाश झाला पाहिजे अशाप्रकारचे मत मांडताना दिसतात. त्या सर्वांच्या मताचा आदर ठेवून मला माझा थोडा वेगळा दृष्टीकोन सांगावासा वाटतो.

मला मी ज्या जातीत / धर्मात जन्माला आले त्यबद्दल प्रेम आहे. माझ्या सवयी, आचार विचार, आवडी निवडी आहार ह्या आणि इतर व्यक्तिगत पैलूंवर माझ्या जातीचा आणि/किंवा धर्माचा प्रभाव आहे. माझ्या अस्तित्वावरमाझ्या जातीचा आणि/किंवा धर्माचा प्रभाव आहे. ज्याप्रमाणे माझे माझ्या आई वर प्रेम आहे ह्याचा अर्थ मी इतरांच्या आयांचा तिरस्कार करते असा होत नाही त्याचप्रमाणे माझ्या मनात इतर जातींबद्दल वाईट भावना नाही.

माझ्या जातीत टिळक-सावरकरांसारखे युगपुरुष होवून गेले म्हणून मला अभिमान/गर्व नाही तसेच माझ्या जातीतील काही लोकांनी पूर्वी काही विशिष्ठ जातींवर अन्याय केला म्हणून मला माझी जात सांगण्याची लाजही वाटत नाही. प्रत्येक जण आपल्या चांगल्या वाईट कर्मांची फळा भोगून मगच मारतो ह्या मताची असल्याने कोणी कधी काळी केलेल्या अन्यायाचा सूड त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्रास देवून/शिव्या देवून घेणे हे मला अतिशय पोरकट आणि खूळचटपणाचे वाटते.

मला माझ्या जातीतल्या, धर्मातल्या, प्रांतातल्या, देशातल्या माणसाबद्दल जितकी आत्मीयता वाटते तितकीच आत्मीयता मला दुसऱ्या जातीतल्या, धर्मातल्या प्रांतातल्या ,देशातल्या माणसाबद्दल वाटते . माणसातील कलागुणांची, विचारांची कदर करत असल्याने सर्वच जाती-धर्मातील कलाकार, लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत ह्यांचा मी समान आदर करते

सर्वच जाती धर्मांत चांगली आणि वाईट माणसं भेटली असल्यामुळे मला सर्वांना एकाच प्रकारचं लेबल लावून जनरलाइझ केलेलं अजिबात आवडत नाही.

ह्या पुढे मला असं सांगायचं आहे कि मी विशिष्ठ जातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या मात्र विरोधात आहे. लहानपणापासून वेळोवेळी आरक्षण व्यवस्थेची कडू फळे चाखल्यामुळे कोणत्याही पदावर, नोकरीसाठी, प्रवेशासाठी गुणवत्ता हा एकमेव निकष असावा ह्या मताची मी आहे. अथवा परिस्थिती नुसार आर्थिक दृष्ट्या कमी असणार्यांना आरक्षण दिले जावे हे न्याय्य आहे.
त्याचप्रमाणे काही जातींना इतर जातींपेक्षा वरचढ समजणे, जाती- धर्माबाहेर लग्नाला विरोध करणे, ठराविक जातीतील लोकांना संधी नाकारणे, त्यांच्यावर अन्याय करणे ह्या गोष्टींचा देखील मी तीव्र निषेध करते.

आपण ज्या घरात , जाती -धर्मांत जन्मतो आणि वाढतो ते आपल्या हातात नसते. परंतु त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर कळत नकळत परिणाम होत असतो. जोवर तो स्वत:ला वा इतरांना त्रासदायक होत नाही तोवर त्याला टाळण्याची/ विरोध करण्याची गरज मला तरी वाटत नाही.

जात , धर्म, भाषा , प्रांत इत्यादींच्या वैविध्यामुळे आयुष्यात रंगत आहे. त्यामुळे त्यांची जाणीव तर असली पाहिजेच पण अभिमान नको. जातीचा नाश नको जातीयवादाचा नाश करावा.

प्रत्येकाने जर जर विवेकबुद्धी जागृत ठेवून विचार केला व सर्व प्राणिमात्रांच्या individuality चा आदर केला तर आपण सर्वच जाती - धर्म- प्रांत-देश ह्यांच्यातील चांगल्या रीती, परंपरा जपवून ठेवू शकतो , शेअर करू शकतो , परस्पर सामंजस्याने जगू शकतो आणि कोणास ठाऊक अजून थोड्या दिवसांनी अभियंते , गणितज्ञ , शास्त्रज्ञ , वेब-डेव्हलपर,ले़खक अशा नवीन नवीनच जाती उदयाला येतील, नाहीतरी सध्याच्या जाती पण प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरूनच पडल्या होत्या ना ?

आता हे सगळं व्यक्तिगत माहितीत लिहणं शक्य नाही बहुतेक !! तिथे facebook प्रमाणे केवळ "Its Complicated " लिहावं का असा एक विचार येतोय डोक्यात !! Blum 3

- सिद्धि

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

प्रोफाईलमध्ये तो कॉलम का आहे ते मलाही नाही कळलं. केवळ 'मला असल्या फाल्तू अस्मिता नाहीत' असं लोकांना सांगता यावं याची सोय वाटते ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> प्रोफाईलमध्ये तो कॉलम का आहे ते मलाही नाही कळलं. <<

फेसबुकवर ज्या कारणासाठी धार्मिक आणि राजकीय विचारसरणी देता येते तेच कारण ह्यामागे आहे. आपली ओळख इतरांना सांगण्याचा तो एक मार्ग आहे. ज्याप्रमाणे धागाकर्तीनं आपल्या बाबतीत ते किती गुंतागुंतीचं आहे ते सांगितलं आहे तद्वत इतर लोकदेखील सांगू शकतात. ज्याला जी हवी ती माहिती तिथे देता येत असल्यामुळे (किंवा काहीच न देता येत असल्यामुळेही) आक्षेप नीटसा समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेच म्हणतो. अस्मिता (अगदी जात, धर्म, प्रांत, टॅटू नि केस कापायची शैली) यांची माहिती कोणास द्यावयची असेल तर तसे प्रावधान आहे हे जमेचीच बाजू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जातिवार आरक्षण असावं असं मला वाटतं. आता ते कुठल्या जातींना, किती टक्के, किती काळाकरता, फक्त शिक्षणात/ सरकारी नोकर्‍यात असावं का खासगी क्षेत्रात पण असावं, सैन्यातपण असावं हे वादग्रस्त मुद्दे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि गुणवत्तेने कमी असणाऱ्या एका माणसाला केवळ तो विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून आरक्षण देणे हा दुसऱ्या ( आरक्षण नसलेल्या ) जातीत्तील आर्थिक दृष्ट्या तुलनेने कमी व गुणवत्तेने जास्ती पात्र मनुष्यावर अन्याय नाही का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

संपूर्ण अन्याय नाही. ती 'गुणवत्ता' आली कशी याचा विचार केल्यास त्यामध्ये एखादा मनुष्य ज्या वातावरणात वाढला त्याचा खूप प्रभाव असतो. परिक्षा, शाळा अभ्यास याबाबत गांभिर्य एखाद्याच्या पालकांमध्ये होतं याचा त्या 'गुणवत्तेत' मोठा वाटा असतो. आता ज्यांच्या घराण्याच पिढ्यांपिढ्या कोणीच शाळेत नाही गेलं त्यां मुलांना घरच्या वातवरणातून येणार्‍या गुणवत्तेचा फायदा नाही मिळणार. आरक्षण का असावं याचं मला वाटणारं हे एक कारण.

आता आरक्षणावरून राजकारण होतं हे दिस्तच. मंडल आयोग किंवा आत्ताची मराठा आरक्षणाची मागणी या केवळ राजकीय फायद्यासाठी आहेत हे मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भलामोठा मंडल अहवाल एकेकाळी वाचला होता. त्यात 'मागासलेपणा' म्हणजे नक्की काय याचे सुंदर विवेचन होते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा अनेक अंगांनी मागासलेपणाचे पृथक्करण केले होते. वर श्री ढेरे यांनी मांडलेला मुद्दा त्यात विस्ताराने चर्चिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला प्रयत्न लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अजून जरा सगळे विचार एका भाषेत व्यक्त करणं अवघड जात आहे. बोलीभाषेत नकळत किती वेळा इंग्रजीचा हात पकडला जातो हे लिहिताना चांगलेच जाणवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

जमलंय! द्या टाकुन याची लिँक प्रोफाइलमधे :-).
आरक्षणाबद्दल अनुपशी सहमत.
लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखामागच्या प्रामाणिक भावनेशी सहमत! त्याचबरोबर आराक्षणाबाबतच्या अनुपच्या वैयक्तिक मताशीही माझी वैयक्तिक सहमती.

- (कसल्याही वांझोट्या अस्मिता नसलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जात,धर्म यासारख्या जन्माने मिळालेल्या गोष्टींबद्द्ल आभिमान तो काय बाळगायचा? काही (५ एक) वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना दोन शाळकरी मुलींचा संवाद ऐकला होता.
"अगं त्या बाई किती शिव्या देतात ना? माझी आई म्हणाली आपण ब्राम्हण आहोत आपण नाही द्यायच्या अश्या शिव्या . " . साध्या गोष्टींमध्येही जातीय अस्मिता असं रूप घेऊन येत असेल तर ती वाईटच. वर वर पहाता हे विधान भलेही निरूपद्रवी दिसूदेत पण त्या मुलीला तिच्या आईकडून 'आपण तेवढे जन्मजात सभ्य' चा चष्मा मिळाला. आता त्याच चष्म्यातून ती पुढचं जग बघत जाणार . अवांतर :- जीएंच्या ( कैरी असावी) कथेत मास्तरांच्या अशुध्द भाषेची टवाळी करणारया मुलाला मास्तर ज्या प्रकारे समजावून सांगतात ते फार सुंदर आहे.

आरक्षणाबद्द्ल अनुप यांच्याशी सहमत. या गोष्टींचा बाऊ न करता जगता येऊ शकतं. जातींवर आधारित आरक्षण देताना असताना त्यात आईवडिलांची शैक्षणिक पात्रता (खास करून आईची) तसंच उत्पन्नगट याचा विचार व्हावा अश्या मताची मी आहे. ज्या व्यक्तीच्या आधीच्या पिढीने ( आई-वडिल) नोकरीत आरक्षण घेतलं असेल त्यांनी स्वत:हून आरक्षणाचा फायदा घेण्याचं टाळावं. तरंच त्या मागचा खरा हेतू सफल होईल. या साठी त्या त्या जातीच्या सामाजिक मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. पण मराठे-ब्राम्हण वगैरेंनाही आरक्षण मागून ही गंगा उलटी वहावण्याचा प्रकार चाललाय.

अजून एका गोष्टीचा विचार जरूर व्हावा . परंपरेने जी क्षेत्रं (पूजा सांगणं वैगेरे) ठरावीक वर्गा साठी आरक्षित आहेत त्यांचं काय? या बद्द्ल अजून एक किस्सा सांगण्यासारखा आहे. माझी आई संस्कृतच्या शिकवण्या घेते. तिच्याकडे एक ब्राम्हण मुलगा शिकायला यायचा. वडिल ( जे माझ्या आईचेच माजी विद्यार्थी) ,भाऊ हुषार असताना हा मात्र अभ्यासात अतिशय ढ . कसबसा दहावी पास झाला. हा दुसरं काहीही करू शकणार नाही म्हणून वडिलांनी त्याला सायनच्या कुठल्याश्या पाठशाळेत पाठवला. आता पूजा सांगणं या एकमेव व्यवसायात तो पूर्ण बिझी असतो. त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला जाणवतो. हया जागी दलित मुलगा असता तर अंगमेहनतीच्या, कमी उत्पन्नाच्या कामाशिवाय त्याच्याकडे कुठला पर्याय असता? त्यातून तो आपल्याला दहावीसुध्दा कसंबसं पास होता आलं याचा न्यूनगंड कायम वागवत राहिला असता.

तेव्हा जातीय अस्मिता वैगेरे बाळगताना त्याचे अनेक ताणेबाणे असतात हे लक्षात घ्यावं.

कोणास ठाऊक अजून थोड्या दिवसांनी अभियंते , गणितज्ञ , शास्त्रज्ञ , वेब-डेव्हलपर,ले़खक अशा नवीन नवीनच जाती उदयाला येतील, नाहीतरी सध्याच्या जाती पण प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरूनच पडल्या होत्या ना ?
या जाती सुक्ष्मरित्या अस्तित्वात आहेतच. म्हणून त्यातही श्रेष्ठ- कनिष्ठ असं वर्गीकरण टाळावं. पण तसं होताना दिसत नाही. मी मुलीच्या शाळेत जाते तेव्हा काही डाक्तर्,परदेशस्थ अभियंत्यांच्या बायका (काहीच. सर्व नाहीत.) यांचा शिक्षकांबद्द्ल किंवा ईतर साध्या कुटुंबातल्या मुलांबद्दलचा असा तुच्छ्तेचा द्रृष्टीकोन थेट दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा बरोबरच आहे. वर्णव्यवस्था नकोच. लहानपणी एका ब्राह्मण मैत्रिणीला सोसायटीच्या साध्याशा निंबंध स्पर्धेत, बक्षीस मिळाले होते तेव्हा एका मैत्रिणीची आई (हे लोक जाती/व्यवसायाने) कासार होते, म्हणालेले की "हो तिला मिळणारच, ब्राह्मण आहे ना." म्हणजे अशी वृत्तीही असते.
अजून एक उदाहरणच द्यायचे तर ओ बी सी जातीतील एका मुलाने आरक्षणावर डेंटीस्ट्रीचे शिक्षण पूर्ण करुन नंतर प्रॅक्टीस करताना मात्र आडनाव बदललं.
खरं तर अशी आडनाव बदलायची वेळच येऊ नये. पण हां थत्ते म्हणतात तसे आरक्षण मात्र जरुर जरुर मिळावे. Smile
____
आशा करते, माझा मुद्दा पुरेसा क्लियर झालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जात,धर्म यासारख्या जन्माने मिळालेल्या गोष्टींबद्द्ल आभिमान तो काय बाळगायचा? काही (५ एक) वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना दोन शाळकरी मुलींचा संवाद ऐकला होता.
"अगं त्या बाई किती शिव्या देतात ना? माझी आई म्हणाली आपण ब्राम्हण आहोत आपण नाही द्यायच्या अश्या शिव्या . " . साध्या गोष्टींमध्येही जातीय अस्मिता असं रूप घेऊन येत असेल तर ती वाईटच. वर वर पहाता हे विधान भलेही निरूपद्रवी दिसूदेत पण त्या मुलीला तिच्या आईकडून 'आपण तेवढे जन्मजात सभ्य' चा चष्मा मिळाला.

१. जातीय, धार्मिक अस्मितांचा अभिमान बाळगायला काही हरकत नाही. त्या चांगल्या आहेत कि वाईट हे पहावे. त्या (चांगल्या अस्मिता) जातीमुळे आहेत ही धारणा असेल तर काही बिघडत नाही. आता जातीच्या सगळ्याच अस्मिता पाळायच्या असे संस्कार आहेत, नि जास्तीत जास्त चांगल्या आहेत हे कधीही 'कोणतीही जातीय अस्मिता पाळायची नाही' यापेक्षा चांगले आहे. ही रँडमली निवडली गेलेली, जातीचे मार्गदर्शन नसणारी अस्मिता, नक्की किती प्रगल्भतेने निवडली आहे ते कळत नाही म्हणून. मुसलमान असेल तर खोटे बोलायचे नसते ही जातीय अस्मिता आहे, ती सोडली कि आता बोलण्यात किती स्वार्थ, परमार्थ, इथिक्स, मोराल्स, सोय, शान, पातळी, इ इ आणायचे हे ठरवणे कठीण जाते. शिवाय अस्मिता रोखठोक असते - मुसळासारखे इमान - अगोदर मी जाईन - मग इमान (अर्थात याचेही तोटे असतातच म्हणा). पण अस्मितेचा अभाव माणसाच्या असण्याचा वजूद काढून घेतात. जातीय, धार्मिक अस्मिता सर्वोच्च आहेत असे म्हणणे विचित्र आहे हे मान्य पण त्यांचा प्रभाव खरोखरच परिणामकारक असतो. त्यामानाने अजून दुसर्‍या प्रकारची अस्मिता -जसे एखादा वर्क इथिक - जसे - मी ग्राहकाला संतोष देण्याचा संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेन - सर्वोच्च मानता येणार नाही - कारण तिथला अजून एक दुसरा इथिक - हा कि -कॉर्पोरेट साखळीतले आपण सारे शेवटी पैसे कमवण्यासाठी एकत्र आहोत- उद्या पगार मिळणे बंद झाले तर ग्राहक गेला गाढवाच्या गावात - हाच पर्मोच्च असतो.
२. यात "जन्माने मिळालेल्या" या शब्दजोडीबद्दल थोडीशी तुच्छता दिसते. मग मनुष्यत्व कसे मिळते? नागरिकत्व? लिंग? शरीरयष्टी? आरोग्य (काही अंशी जेनेटिक असते)? प्रांत? याचा एखाद्याला का अभिमान नसावा? कशाची अस्मिता बाळगायची यात 'कमावलेल्या' गोष्टीला उगाच प्राधान्य देऊ नये.
३. 'आपण तेवढे जन्मजात सभ्य' मधे तेवढे शब्द जास्त झाला आहे. म्हणजे अंध जातीय अस्मिता असणारा माणूस जसा जसा मोठा होतो, समाजात मिसळतो, तर त्याला, अगदी अल्पशीही बुद्धी असेल आणि मिठाला प्रामाणिकपणा असेल तर दिसते कि "सर्वच चांगुलपणा आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी स्पर्धा आहे."
४. आज जितके कास्ट क्लासेस जवळ आहेत तितके वर्ण जवळ नव्हते. म्हणजे सुतार कूंभारांना आपले कोणी मानायचे नाहीत या अर्थाने. आज जातीय अस्मिता नक्की काय, ती केव्हा नी कुठे नी कशाला प्रकट करायची असते हे समाज विसरला आहे पण तिच्या प्रमाणात हजारो पट वाढ झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरील सर्व मुद्द्यांशी प्रचंड सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

अनुप ढेरे याम्च्याशी सहमत.

आरक्षण शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांना मिळावे अशी अपेक्षा असणारच.

शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले कोण हे शोधण्याचा एक मार्ग हा देशातील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करणे, त्या कुटुंबाच्या मागील पिढ्या किती शिक्षित होत्या, सध्या किती शिक्षित आहेत वगैरे माहिती घेऊन कोणती कुटुंबे (जाती निरपेक्ष) शैक्षणिक मागासलेली आहेत यांची एक यादी करणे हा आहे.

हा मार्ग बर्‍यापैकी खर्चिक आहे. आणि भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करता त्यातून जी यादी बनेल ती आणि सरसकट जात्याधारित यादी केली तर जी यादी निघेल त्यात फार फरक असणार नाही. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस बोथ लिस्ट्स आर सेम.

म्हणून जातीवर आधारलेले आरक्षण दिले जाते. [त्यात उच्चवर्गीयांमधले गरीब एक्स्क्लूड होतात.... पण ते शैक्षणिकदृष्ट्या मागास नसतातच].

आपण महिलांची रांग वेगळी ठेवतो तसेच समजावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीवर स्वागत.

थोड्या दिवसांनी अभियंते , गणितज्ञ , शास्त्रज्ञ , वेब-डेव्हलपर,ले़खक अशा नवीन नवीनच जाती उदयाला येतील,

इथे थोड्या दिवसांनी हे शब्द जास्त नाही का झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला sometime in the future म्हणायचे होते. कारण सध्यातरी तशी परिस्थिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

माफ करा पण तुम्हि कळत-नकळत तुमचि जात सांगुन टाकलि आहे. जातिभेदाचे वास्तवहि असेच कळत-नकळत आपल्या समाजात आहे. उघडपणे तर सगळेच 'सगळे भारतिय माझे बांधव आहेत' नाहितर 'विश्वचि माझे घर आहे'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कधि जात सांगितलि असा प्रश्न आहे का? अहो टिळक-सावरकर त्यांच्या जातिचे असल्याच उल्लेख आहे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

अहो ते वाक्य रुपकात्मक नाहीच असे म्हणता येत नाही.
चला मी म्हणतो, "आंबेडकर, शाहू महाराज, रामदास स्वामी" यांच्या सारखी (दिग्गज) माणसं माझ्या जातीत झाली. याने माझी जात कळते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाहि कळत कारण ते वेगवेगळ्या जातितले लोक आहेत. टिळक-सावरकर ब्राह्मण आहेत. त्यांनि लेखनात रुपक-फिपक काहि वापरल्याचे जाणवले नाहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

हो. सांगितली आहे. वर लिहिल्याप्रमाणे मला माझी जात कबूल करण्यात कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही . स्वत:ची जात कबूल करणे वेगळे आणि इतर जातींचा दुस्वास करणे वेगळे. दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्ही जे जातीभेदाचे वास्तव वगैरे म्हणताय ते दुसऱ्या प्रकारात मोडते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

अजो, का उगाच वादासाठी वाद घालताहात? कुणाही ब्राम्हण व्यक्तीवर थोडीही टीका केली की ती स्वतःवर असल्यासारखी . आणि ही टीका त्या व्यक्तीवर नाही तर विचारांवर आहे हे ही समजून न घेता.

यात "जन्माने मिळालेल्या" या शब्दजोडीबद्दल थोडीशी तुच्छता दिसते.
तुम्हाला दिसत असेल तर दिसो बापडी. पण हे चुकीचं आहेच. अगदी माणूस (जन्मजात सर्वश्रेष्ठ) म्हणूनही स्वतःसाठीच निसर्ग राबवण्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. जन्माने मिळालेल्या कुठल्याच गोष्टीबद्द्ल अनाठायी अभिमान असायचं काही कारण नाही. आणि

जातीय, धार्मिक अस्मितांचा अभिमान बाळगायला काही हरकत नाही. त्या चांगल्या आहेत कि वाईट हे पहावे. मुसलमान असेल तर खोटे बोलायचे नसते ही जातीय अस्मिता आहे, ती सोडली कि आता बोलण्यात किती स्वार्थ, परमार्थ, इथिक्स, मोराल्स, सोय, शान, पातळी, इ इ आणायचे हे ठरवणे कठीण जाते.
कसे? कुठल्या कसोटीवर पहावे? कारण तुमचं म्हणणं ग्राह्य धरायचं असेल तर शरियतनुसार्ची फट्क्यांची शिक्षा किंवा बुरखापद्धती याचंही समर्थने करता येईल. आणि पुढे जाऊन सतीचंही.


३. 'आपण तेवढे जन्मजात सभ्य' मधे तेवढे शब्द जास्त झाला आहे. म्हणजे अंध जातीय अस्मिता असणारा माणूस जसा जसा मोठा होतो, समाजात मिसळतो, तर त्याला, अगदी अल्पशीही बुद्धी असेल आणि मिठाला प्रामाणिकपणा असेल तर दिसते कि "सर्वच चांगुलपणा आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी स्पर्धा आहे."

हे कळले नाही. जाऊदे. कदाचित माझ्या लिखाणात एक मुद्दा आला नाही तो म्हणजे त्या मुली शाळेतल्या बाईंबद्द्ल बोलत होत्या. त्यामुळे या एका वाक्यात मुलीच्या आईने त्या बाईंची किंमत शून्य करून टाकली. त्यापेक्षा "शिव्या देणं वाईट पण त्या बाई ज्या वातावरणात वाढल्यात त्यात त्यांना ही सवय झाली असेल." अश्या प्रकारे समजावता आलं असतं. सामाजिकरित्या वरच्या वर्गाला हे असं सुलभीकरण सोपं असतं. पण ज्यांची मागची पिढी शिव्या देत घेत, हलाखीत वाढली त्यांना चांगले संस्कार पुढच्या पिढीपर्य्ंत ( तेही मागल्या पिढीबद्द्ल अनादर न दाखवता ) कसे पोचवता येत असतील याचा कधीतरी विचार केलाय?
जीएंच्या ज्या कथेचा संदर्भ मी दिलाय ते ही असंच आहे. मला वाक्यं नीट आठवत नाहीत पण मास्तर मुलाला सांगतात की मी खेड्यात वाढलो.माझी आई शिकलेली नव्हती. तिची भाषा मी बोलतो. ती तू नको घेऊस . पण मी काही चांगल्याही गोष्टी करतो जसं की मी वाचतो, माझं अक्षर छान आहे. ते जमलं तर शिक माझ्याकडून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजो, का उगाच वादासाठी वाद घालताहात?

जातीय अस्मितेला अर्थ आहे नि नाही या दोन भूमिकांतली 'कोण्या एका अर्थाने आहे' ही माझी प्रामाणिक बाजू आहे.

कुणाही ब्राम्हण व्यक्तीवर थोडीही टीका केली की ती स्वतःवर असल्यासारखी .

कोण ब्राह्मण? मी तुम्हाला दिलेल्या उत्तरात काय संबंध आहे असा अर्थ पाहण्याचा?* आपण नि मी केवळ उदाहरणे दिली आहेत. (आणि माझ्या मते मी तर मुस्लिम उदाहरण दिले आहे. )

जन्माने मिळालेल्या कुठल्याच गोष्टीबद्द्ल अनाठायी अभिमान असायचं काही कारण नाही.

इतकं व्यापक विधान करू नये. (जन्माने) सुंदर असलेल्या मुलीला सुंदरतेचा अभिमान असेल तर काय वाईट? आपण डॉक्टर घरात जन्मलो म्हणून रुग्णसेवेला आयुष्य वाहिले असे लोक सांगतात. आमट्यांचा मुलगा त्यांच्या बाबांकडे पाहूनच तसा झाला असावा. आपण ज्या घरात, वातावरणात, इ इ त (या काही लोक जातीचे नाव देऊ शकतात) जन्मलो त्याचा अभिमान असणं वाईट नसावं. अनाठायी तर कोणताच अभिमान नसावा हे मान्यच आहे.

तुमचं म्हणणं ग्राह्य धरायचं असेल तर शरियतनुसार्ची फट्क्यांची शिक्षा किंवा बुरखापद्धती याचंही समर्थने करता येईल. आणि पुढे जाऊन सतीचंही.

हा धोका आहे हे मान्य आहे. जातीय अस्मितेला सीमा असावी.

"सर्वच चांगुलपणा आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी स्पर्धा आहे." हे कळले नाही.

म्हणजे शिव्या नसलेली भाषा ब्राह्मणच एकटे बोलत नाहीत आणि ब्राह्मणही सिव्या घालतात हे त्या मूलींना मोठे झाल्यावर कळायला हरकत नाही असे म्हटले आहे. अस्मितेला स्पर्धा असते.

*तसं औपचारिक ठिकाणी, जसे हे संस्थळ, चर्चा करताना 'मी' या शब्दाचा वापर करायला लागू नये, म्हणजे कर्तरी प्रयोग टाळण्याची पाळी सुद्धा येऊ नये. पण व्यक्तिगत आरोपच निस्तरण्यात बरीच उर्जा जाते. सगळं लेखन मीप्रधान होतं. तुम्हाला मनोमन वाटत असेल कि मला फार (नि अंध) ब्रह्मप्रेम आहे तर (शक्यतो) एकमेकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. ते नाही याची सिद्धता किमान माझ्या टंकनक्षमतेपलिकडे आहे, but not that I am closed to work on any easy option.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतकं व्यापक विधान करू नये. (जन्माने) सुंदर असलेल्या मुलीला सुंदरतेचा अभिमान असेल तर काय वाईट? आपण डॉक्टर घरात जन्मलो म्हणून रुग्णसेवेला आयुष्य वाहिले असे लोक सांगतात. आमट्यांचा मुलगा त्यांच्या बाबांकडे पाहूनच तसा झाला असावा. आपण ज्या घरात, वातावरणात, इ इ त (या काही लोक जातीचे नाव देऊ शकतात) जन्मलो त्याचा अभिमान असणं वाईट नसावं. अनाठायी तर कोणताच अभिमान नसावा हे मान्यच आहे.

अजों शी बव्हंशी सहमत.

आता प्रश्न.

१) एखाद्या व्यक्तीने आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगावा का ? ती व्यक्ती भारतात जन्मली यात त्या व्यक्तीची काय विशेषता आहे ?
२) आपल्याला लहानपणी शाळेत प्रतिज्ञा म्हणायला सांगायचे - त्यात खालील वाक्ये होती -

I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it.

एखाद्या व्यक्तीस कल्चरल हेरिटेज चा अभिमान का असावा ? आपले जे काही कल्चरल हेरिटेज आहे यात त्या व्यक्तीची काय विशेषता आहे ?

३) व्यक्तीस अभिमान असावा का ? कोणत्या गोष्टींचा असावा ? कोणत्या गोष्टींचा नसावा ? का असावा व नसावा ? (किमान काही लोक तरी असे म्हणतात की - व्यक्तीस फक्त स्वतःच्या सत्कृत्यांचा व यशांचा अभिमान असावा.)

३) अनाठायी - हा कळीचा शब्द आहे (की नाही ?) असल्यास याचे मायने काय असावेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) एखाद्या व्यक्तीने आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगावा का ? ती व्यक्ती भारतात जन्मली यात त्या व्यक्तीची काय विशेषता आहे ?
---व्यक्ति भारतीय आहे म्हणून, या धारणेने, 'सभ्य आणि सम्यक' वागत असेल तर, भारतीय असण्याचा अभिमान समाजात राहू द्यायला हरकत नाही, असे. व्यक्तिगत, समूहाच्या पातळीवर कशाचाही अभिमान बाळगला, समर्थिला जाऊ शकतो, बाळगावा का हा प्रश्न ज्याला पडला आहे, त्याच्यासाठी काय महत्त्वाचे आहे यावरुन तो हो कि नाही असे उत्तर देईल. इथे मला प्रश्न आहे. माझी विचारसरणी सिव्हिलायझेशन विरोधी म्हणता येईल, म्हणजे कायदा, न्याय, मालकी, पैसा म्हणजे श्रमसाठा, असंबंध गोष्टींचे मूल्यमापन, व्यापार, नैतिकता, संघटनीयता, इन्हेरिटन्स, इ इ जवळजवळ अभौतिक, अनैसर्गिक संकल्पनांनी विचित्र रुप धारण केले आहे. म्हणून एका पातळीला मला देश,धर्म इ सार्‍या कल्पना प्रचंड अंध वाटतात. या सर्व संकल्पनांच्या अभावातही मानव खूप सुंदर जीवन जगू शकला असता असे मला वाटते. तंत्रज्ञानाने मानवी सौख्य वाढावे याचा मात्र मी नेहमी पुरस्कार करतो. अर्थात हा विषय गहन आहे नि माझ्या संकल्पना अपरिपक्व आहेत.

२) आपल्याला लहानपणी शाळेत प्रतिज्ञा म्हणायला सांगायचे - त्यात खालील वाक्ये होती -
I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it.
एखाद्या व्यक्तीस कल्चरल हेरिटेज चा अभिमान का असावा ? आपले जे काही कल्चरल हेरिटेज आहे यात त्या व्यक्तीची काय विशेषता आहे ?

---- हा प्रश्न 'हे विश्व अस्तित्वात यात माझे काय योगदान' इतका मागे खेचला जाऊ शकतो. जे काही आपण 'आपण केले' म्हणतो त्यातही ते आपण किती केलेले असते? म्हणजे मी क्ष ला जन्म दिला म्हणताना माझी डिझाईन, त्या मे़कॅनिझमची डीझाइन मी केलेली नसते. अगदी मी रॉकेट उडवले म्हणताना देखिल इंधनात रासायनिक उर्जा मी ओतलेली नसते. किंवा ते इंधन शून्यातून बनवलेले नसते. फॉरेक्स मार्केट मधे पैसे कमावले म्हणतो तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था नि व्यापार नि गुंतवणूका इ इ मधे काय काय चालले आहे यात आपले काय योगदान असते? 'मी ट्रेंड जाणून घेतला नि पैसे कमावले' इतकेच जरी म्हणायचे असले तरी मार्केट असणे, त्याचे नीट नियम असणे, ते नियम सार्‍या लोकांनी नीट पाळणे यात 'स्वतःचा' किती खर्च झालेला असतो? कोणत्या वेळच्या कोणत्या करदात्याने, इ दिलेल्या पैशांचे सुख आपण आयते भोगतो. आणि असे नसले तरी आपली बुद्धिमत्ता, शरीर आपण स्वतः डिझाइन केलेले असते? त्या आय पी ची रॉयल्टी दिल्याशिवाय स्वतःला क्रेडिट देता येणार नाही. म्हणजे कशाचा अभिमान बाळगावा नि कशाचा नाही (तांत्रिकदृष्ट्या अधिकार आहे का या अर्थाने )हा मुद्दा कुठेही नेता येतो. याचे उत्तर दिले तरी वैद्यकीय दृष्ट्या अभिमान, अस्मिता, श्रद्धा असणे हे व्यक्तिच्या हाती मुळी आहेच का, किती आहे हा प्रश्न उभा राहतो. माझे व्यक्तिगत मत आहे कि माणसाला 'टेक्निकली खरीखुरी' फ्री विल आहे. या भावना वैगेरे सत्य नि आवश्यक आहेत. शिवाय आपण रानटी पूर्वजांचे वंशज नाहीत (जरा गणिते करून पाहिले तर असे दिसेल कि चढत्या क्रमाने काळात मागे मागे जाताना रानटीपणा त्याच प्रमाणात वाढत असता तर जीवसृष्टी असली नसती, आपण असलो नसतो.), निसर्ग सम्यक आहे, इ इ मला वाटते. म्हणून आपण जिथून आलो आहोत त्याच्या अभिमान बाळगणे नैसर्गिक शिवाय योग्य असावे.

३) व्यक्तीस अभिमान असावा का ? कोणत्या गोष्टींचा असावा ? कोणत्या गोष्टींचा नसावा ? का असावा व नसावा ? (किमान काही लोक तरी असे म्हणतात की - व्यक्तीस फक्त स्वतःच्या सत्कृत्यांचा व यशांचा अभिमान असावा.)
लेखाच्या संदर्भात जातीचा अभिमान असायला हरकत नाही. जातीची लाज वाटणे हा प्रकार तर नकोच. असणे आणि नसणे एका बँडमधे असावे. उगाच अतिरेक नको. जात न पाळणे घटनेला अभिप्रेत आहे असा गैरसमज नसावा. घटना बहुतेक माझी जात, इतर अस्मिता कशा असाव्यात याबद्दल बरीच शांत असावी. पण ते वाक्य इतरांच्या अस्मितेबद्दल येत तेव्हा लागू असावे. इतरांच्या जातीशी तांत्रिक तुलना करावी, भावनिक करू नये. पण असे होत नाही म्हणून जात जावी असे म्हणणारा मोठा विचारप्रवाह उदयास आला आहे. त्यांना अभिप्रेत अर्थांनी ते ही योग्यच आहेत. थोडक्यात व्यक्तित नीट संतुलन राखायचे सामर्थ्य असेल तर कोणताही अभिमान बाळगावा.

ज्या व्यक्तींस फक्त स्वतःच्या सत्कृत्यांचा व यशांचा अभिमान असावा असे वाटते त्यांनी थोडे अवांतर म्हणून अध्यात्म वाचावे. फोटॉन नि बरीच सब अ‍ॅटॉमिक पार्टीकल्स -वेव आणि कण दोन्ही असतात असे विज्ञान आपण वाचतो. आता वेव आणि कणांचे स्वरुप प्रचंड वेगळे आहे. इतके कि स्वरुप बदलले कि नियम असिद्ध होतात. पण आपण विज्ञान श्रेद्धेने वाचतो. विज्ञान यापुढे म्हणते कि ते एकाच वेळी दोन्ही असतात. म्हणजे time t1 to t2 wave आणि t2 to t3 particle असे नाही, तर t1 to t3 या काळात दोन्ही! आता हे आपण वाचू शकत असू तर सगुण निर्गुण आणि द्वैत अद्वैत वाचायलाही हरकत नाही. फॉर अ चेंज. जनरली अध्यात्मात स्व फार टोन डाऊन केलेला असतो म्हणून. 'केवळ स्वतःचेच योगदान किती आहे' हे नीटसे कळू लागले कि फक्त त्याचाच अभिमान बाळगायची पॉलिसी नीट राबवता येईल. पुन्हा मी क्ष ला जन्म दिला म्हणताना मी गर्भाशय डीझाइन केला, किंवा जन्म देणे ही संकल्पना जगात नसती तर ती मला सुचली असती आणि गर्भाशय, इ मी डिझाईन करू शकले असते नि केला असता, असे म्हणायला नको. योग्य ते श्रेय घ्यायला हरकत नाही.

३) अनाठायी - हा कळीचा शब्द आहे (की नाही ?) असल्यास याचे मायने काय असावेत ?
अस्मिता स्वांत सुखाय असतात, असायला हव्यात. पण 'अलिकडे' अस्मिता भिडवल्याशिवाय तिचे अस्तित्व जाणवत नाही. स्वातंत्र्याचा उदो उदो हे त्याचे कारण आहे. जैविक फ्री विल आहे असे मानले तर इतरांना हर्ट न करता प्रत्येकाला प्रत्येक अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येक वेळी देता येणे असंभव आहे. (फ्री विल नाही म्हणाल तर गब्बर - अरुण हा मशिन्स मधला प्रि-प्रोग्रम्ड संवाद आहे. आणि सगळे असेच आहे.) त्याचे कायदे बनवणे, व्याख्या करणे, राबवणे याला काही अर्थ नाही. पारंपारिक अस्मितांचा अभिमान यासाठीच कि हे मायने शोधायचे महत्कार्य करावे लागत नाही. माणसाकडे आजतरी मानसशास्त्राचे इतके ज्ञान नाही कि मानवी वर्तनाचे सगळे फ्रेमवर्क फ्रेशली लिहावे. मायने काय असावेत हा प्रश्न माझ्या मनात तरी उद्भवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला हे कळत नाही आरक्षणामुळे गुणवत्ता वाढ कशी होईल?

केवळ आरक्षण आहे त्यामुळे performance कसाही असो , प्रवेशाची निश्चिंती, नोकरीची निश्चिन्ती आणि वर सवर्ण सहकाऱ्यांचा राग/ कीव करणारे अनेक जन अनेक ठिकाणी पहिले आहेत.
सध्या आरक्षण घेणाऱ्यांच्या ४-५व्या पिढ्या आरक्षणाचा फायदा घेत असतील, तरीही त्यांना शैक्षणिक दृष्ट्या मागासच समजायचे का? आणि किती दिवस?
शैक्षणिक/ सामाजिक दृष्ट्या मागास न राहणे हि थोडी त्या समाजाची देखील जबाबदारी नाही का?

इतर जातीतील लोकांनी त्यांची जात सांगितली वा जातीचा उद्धार करण्याचे वक्तव्य व कृत्य केले तर चालते किंबहुना नावाजले जाते पण ब्राह्मणांनी स्वत:च्या जातीचा उल्लेख जरी केला तरी तो जातेभेद कसा होतो?

जे अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत , ज्यांच्या घराची पार्श्भूमी शिक्षणासाठी अनुकूल नाही , त्यांना शिक्षणाच्या पुरेश्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या साठी , त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळे शिक्षक नेमून त्यांची गुणवत्ता सुधारणे हे उपाय आरक्षणापेक्षा उपयुक्त वाटतात मला !!

आरक्षणामुळे अपुरे व्यावसायिक ज्ञान , शैक्षणिक पात्रता असणार्यांना नोकरी (विशेषत: अशी नोकरी जिच्यावर इतरांचे भवितव्य अवलंबून असते ; जसे डॉक्टर, शिक्षक ) देण्यापेक्षा मुळातूनच त्यांची गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न जास्ती बरे नाहीत का?

कारण सध्या अशी परिस्थिती आहे कि विशिष्ठ जातीतील मुलांना माहिती असते त्यांना आरक्षण आहे. त्यांच्या साठी मार्कांचा cut - off कमी असतो म्हणून ती मुले जास्ती कष्ट घेत च नाहीत . हा आरक्षणाचा उलट परिणाम नाही का?

तुम्ही स्वत: (कोणत्याही जातीचे असाल) तुमच्या व जवळच्या नातलगाच्या अत्यंत क्रिटीकल अशा उपचारांसाठी गुणवत्तेने डीग्री मिळवलेल्या डॉक्टर कडे जाल का आरक्षणामुळे डॉक्टर झालेल्या ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

तुम्ही एक चांगल्या अर्थशास्त्री होऊ शकाल हो. मनःपूर्वक सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....गुणवत्तेने डीग्री मिळवलेल्या डॉक्टर कडे...

आरक्षणाने फक्त अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. डिग्री मिळण्यासाठी सर्वांना एकच परिक्षा, समान निकषाने उत्तीर्ण व्हावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, काही आरक्षित जागांसाठी तीव्र स्पर्धा असते आणि प्रवेशासाठीच्या लघुतम गुणांची मर्यादा स्पर्धेमुळे दिवसेंदिवस वाढते आहे. काठावर गुण मिळून सहज प्रवेश मिळेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुम्ही स्वत: (कोणत्याही जातीचे असाल) तुमच्या व जवळच्या नातलगाच्या अत्यंत क्रिटीकल अशा उपचारांसाठी गुणवत्तेने डीग्री मिळवलेल्या डॉक्टर कडे जाल का आरक्षणामुळे डॉक्टर झालेल्या ?

तुम्ही स्वत: (कोणत्याही जातीचे असाल) तुमच्या व जवळच्या नातलगाच्या अत्यंत क्रिटीकल अशा उपचारांसाठी गुणवत्तेने डीग्री मिळवलेल्या डॉक्टर कडे जाल का डोनेशन देऊन डॉक्टर झालेल्या ?

वरील प्रश्नातील हायलायटेड गोष्ट जाणून घेण्याची काही ट्रिक तुमच्याकडे आहे का?

बाकी 'गुणवत्तेतून प्रवेश घेतलेल्या' डॉक्टरची एमबीबीएस परीक्षेतील गुणवत्ता तुम्ही पाहता का? सहसा डॉक्टर आपले सर्टिफिकेट दवाखान्यात लावतात आणि त्यावर कोणत्या क्लासमध्ये पास झाला हे नोंदलेले असते. ते कोणी पाहते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण ब्राह्मणांनी स्वत:च्या जातीचा उल्लेख जरी केला तरी तो जातेभेद कसा होतो?

असं किंचितही नाही. काही न्यूज चॅनेलमधे, पेपरांत, कॉस्मो लोकांच्या शहरी / आंतरराष्ट्रीय ग्रुप* मधे सोडले तर ब्राह्मण असल्याचा उल्लेख अभिमानाने केला जातो. अभिमानाने नसला तरी 'आम्ही त्या प्रकारचे वर्ज्य नाहीत' असे सुचित करण्यासाठी अवश्य केला जातो. असा उल्लेख जातीभेद नसतो, असला तरी निरुपद्रवी असतो असे माझे मत आहे.

* असे ग्रुप लोकसंख्येत नगण्यच म्हणावेत. पण त्यांच्यात 'जात म्हणजे जातीची सगळी निगेटीवीटी' असे प्रामाणिकपने म्हणायचे वागायचे असते. तिथे जातीचा उल्लेख करणे जातीभेद ठरत असावा, अनुचितही असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आरक्षणामुळे गुणवत्ता वाढ होईल असा कोणाचाच दावा नाही. तुम्ही जसे नोकरिची निश्चिन्ती असल्याने सवर्ण सहकाऱ्यांचा राग करणारे पाहिले आहेत तसेच आरक्षण घेऊन आलोय म्हणून स्वत:ला सिद्ध करणं ही जबाबदारी आहे असं मानणारे आणि त्या मानण्याला, त्यासाठी चाललेल्या धडपडीला शहाजोगपणा समजणारे लोक मीही पाहिलेत. आरक्षण एकाच, फार फार तर दुसरया पिढीपर्यंतच मर्यादित असावे हे मात्र खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आरक्षण एकाच, फार फार तर दुसरया पिढीपर्यंतच मर्यादित असावे हे मात्र खरं

याचा अर्थ मला नीटसा कळलेला नाही. सध्या कॉलेजांची संख्या इतकी आहे की कोणीही उच्च/कनिष्ठ वर्गीय शिक्षणापासून वंचित रहात नाही. मग लोक ज्याबद्दल त्रागा करतात तो बहुधा "सबसिडाइज्ड शिक्षण देणार्‍या कॉलेजातील प्रवेशापासून वंचित" याविषयी असावा.

तसे जर असेल तर सबसिडाइज्ड शिक्षण देणार्‍या कॉलेजातील प्रवेश हाही दोन पिढ्यांनंतर बंद करावा लागेल. उदा. माझ्या वडिलांनी सबसिडाइज्ड कॉलेजातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मी देखील सबसिडाइज्ड कॉलेजातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. तेव्हा माझ्या मुलीला काही झाले तरी सबसिडाइज्ड कॉलेजात प्रवेश मिळता कामा नये. (शिवाय माझे काका, दोन्हीकडचे आजोबा, मामा या सर्वांनीच सबसिडाइज्ड कॉलेजांतून शिक्षणे घेतली. सबसिडाइज्ड कॉलेजांचा आमच्या कुटुंबाने पुरेपूर उपभोग घेतला आहे. माझी मुलगी सध्या अनुदानित शाळेत मोफत शिक्षण घेते हे आणखीनच...).

वर कुणीतरी आरक्षणाचा लाभ ४-५ पिढ्यांपासून घेत असल्याविषयी लिहिले आहे. त्यातले गणित कळले नाही. एक पिढी सुमारे २५ वर्षे अंतराची धरली तर १९५० पासून आज २०१४ पर्यंत चौसष्ट वर्षे झाली. त्यात ४ पिढ्या बसतात असे वाटत नाही . पाच पिढ्या तर दूरच राहिल्या. आणि ४-५ पिढ्यांपासून लाभ घेणार्‍यांची मुले आणखीच दूर राहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्यामते आरक्षणाचा मुद्दा ह्या जात-धर्म-प्रांतादि अस्मितेच्या धाग्यावर अस्थानी आहे. त्यासाठी दुसरा धागा चालू व्हायला हवा.

'खरोखर जर या नवीन राज्यघटनेप्रमाणे गोष्टी सुरळीत चालल्या नाहीत तर त्याला कारण आमच्या राज्यघटनेतील दोष नसून, मनुष्य समाजातील अधमपणा हाच असेल.'
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- (आरक्षणाबाबत वैयक्तिक मते असलेला) सोकाजी

------------------------------------------------------------------------
संदर्भः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाक्य म्हणजे फुलटोसवर छकडी बसल्यावर "अरे रे - पट्ट्यात आला म्हणून रे, नाहीतर क्लीन बोल्ड होता" असं म्हणण्यासारखं आहे.

People respond to incentives.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आरक्षण समता साधण्याचा एक उपाय आहे त्यामुळे -

ह्या पुढे मला असं सांगायचं आहे कि मी विशिष्ठ जातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या मात्र विरोधात आहे.

ह्याबद्दल तुमचे विचार तपशीलांत कळण्याची अपेक्षा आहे, म्हणजे आरक्षणाच्या मूळ उद्देशापासुन तुम्ही का हरकत घेत आहात ह्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जात आरक्षण हा विषय स्वतंत्र पणे अनेक वेळा चर्चिला गेला आहे. आजचा सुधारक या मासिकाचा त्यावर विशेषांक आहे http://mr.upakram.org/node/1208

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

१. त्रागा मुळीच नाही, वैचारिक विरोध व त्याचे समर्थन म्हणू शकता.

२. मी वर जेव्हा गुणवत्ता हा एकच निकष असे म्हटले आहे त्यात माझा डोनेशन वगैरे देवून प्रवेश व नोकरीला असलेला विरोध हा अध्याहृत आहे. ह्या विषयाशी तो संबधीत नसल्याने विशेष उल्लेख गरजेचा नाही वाटला.

३. "सबसिडाइज्ड शिक्षण देणार्‍या कॉलेजातील प्रवेशापासून वंचित" हा एकच मुद्दा नाही, सध्याच्या स्पर्धात्मात युगात केवळ एका जातीत जन्माला आल्यामुळे, आर्थिक , सामाजिक दृष्ट्या सक्षम व्यक्तीला मिळणाऱ्या प्रधान्याबद्दल पण आहे.

४. समता - पूर्वी मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल आक्षेप नव्हताच; मी सध्याच्या आरक्षणाबद्दल म्हटले आहे. क्ष व्यक्ती आणि त्यांचे वडील उच्चशिक्षित, शिक्षणाबद्दल जागरूक , आर्थिक दृष्ट्या सबळ इत्यादी इत्यादी आहेत त्यांच्यात वैचारिक, शैक्षणिक असे कोणतेही मागासले पण नाही तरीही त्यांच्या पाल्याला मिळणारे आरक्षण (प्रवेश वा नोकरी) हि समतेची पायमल्ली नाही का?

५. कित्येक गरजू, होतकरू सवर्ण विद्यार्थी डोनेशन साठी व पैसे नाहीत व आरक्षणही नाही म्हणून उच्च ( त्यांच्या आवडीच्या ) शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. जरी सध्या कॉलेजांची संख्या वाढली असली तरी सर्वांना प्रायव्हेट कॉलेज ची फी परवडेलच असे नाही.
आणि तात्विक दृष्ट्या प्रवेश परीक्षेत जास्ती मार्क मिळवूनसुद्धा त्यांनी ती का भरावी?

६. डॉ. आंबेडकरांना अपेक्षित आरक्षण हे एका ठराविक कालावधीसाठीच होते. त्याच्या पुढे ते गरज नसतांना ताणले जाणे मला योग्य वाटत नाही.

७. अजूनही समाजातील ज्या घटकांना आरक्षणाची खरचच गरज आहे त्यांना किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना ह्या सुविधा पुरवल्या तर खरा हेतू ( समता व सर्वांना समान विकासाच्या संधी) साध्य होईल असे माझे मत आहे .

हे माझे वैयक्तिक मत आहे. वर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांना मी माझ्या परीने व माझ्या विचाराप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मी सर्व बाबतीत सवर्णांच्या सारख्या असणाऱ्यांना सध्या केवळ जातीच्या बेसिस वर मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात आहे.
अर्थात मी भारतापासून, भारताच्या राजकारणापासून मैलोन्मैल दूर असल्याने माझ्या ह्या मतामुळे सद्यस्थिती मध्ये काडीचाही बदल होणार नाही ह्याची मला जाणीव आहे

कोणतही पूर्वग्रहाचा चष्मा न लावता वाचल्यास मला परत परत स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही आणि मला त्यामध्ये स्वारस्य नाही.
मला जे म्हणायचे होते ते मी लेखात आणि नंतरच्या प्रतिक्रियात व्यक्त केले आहे. त्यामुळे हा माझा ह्या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद आहे. क्षमस्व

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

४. समता - पूर्वी मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल आक्षेप नव्हताच; मी सध्याच्या आरक्षणाबद्दल म्हटले आहे. क्ष व्यक्ती आणि त्यांचे वडील उच्चशिक्षित, शिक्षणाबद्दल जागरूक , आर्थिक दृष्ट्या सबळ इत्यादी इ

तुम्हाला क्रिमी लेयर म्हणायचे आहे काय? , खोटं बोलून क्रिमी लेयरने आरक्षणाचा फायदा घेणं हे सवर्णांनी सत्तेत असण्याचा फायदा घेण्यासारखंच कोलॅटरल डॅमेज आहे.

कोणतही पूर्वग्रहाचा चष्मा न लावता वाचल्यास मला परत परत स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही आणि मला त्यामध्ये स्वारस्य नाही.
मला जे म्हणायचे होते ते मी लेखात आणि नंतरच्या प्रतिक्रियात व्यक्त केले आहे. त्यामुळे हा माझा ह्या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद आहे.

तुमची इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

६. डॉ. आंबेडकरांना अपेक्षित आरक्षण हे एका ठराविक कालावधीसाठीच होते. त्याच्या पुढे ते गरज नसतांना ताणले जाणे मला योग्य वाटत नाही.

आरक्षण विरोधी मंडळींकडून सदर मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो.

वास्तविक आंबेडकरांना राजकीय आरक्षण (राखीव जागा इ.) दहा वर्षांनतर राहू नयेत असे वाटत होते. त्यांचे मत शैक्षणिक वा नोकर्‍यांतील आरक्षणाबाबत नव्हते. परंतु ते तसे असल्याचे वारंवार भासवले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0