अमानवीय ?

आज एक पुस्तक वाचताना एक कथा वाचनात आली. त्या कथेचं नाव आहे 'FOET'. कथा बरीच मोठी आहे. फक्त सार पाहुया . आहे काल्पनिकच, पण विचार करायला लावणारी. ती घडते कुठे तरी परदेशात, अति उच्चवर्गीय अत्यंत श्रीमंतांच्या समाजात.
fashion च्या बाबतीत अत्यंत चोखंदळ असणारी एक बाई, सदैव मोठ्या मोठ्या malls मधून branded वस्तू विकत घेण्यामध्ये वेळ घालवत असते. तिचा नवरा अत्यंत श्रीमंत, या सदरात मोडणारा. त्याला पैसे कमावण्याचा कामातून अजिबात सवड नसते.
एक दिवस असंच खरेदी करण्यासाठी mall मधे फिरत असताना, या बाईला तिची एक मैत्रीण भेटते. दोघी एकमेकीना पाहून अत्यंत आनंदित होतात व दोघी मिळून जवळच्याच एका महागडया कॉफी शॉप मधे जातात. तिथे बसल्यावर या बाईचं मैत्रिणीच्या पर्सकडे लक्ष जातं. ती एक अत्यंत वेगळ्या प्रकारची पर्स आहे, हे तिला खूप प्रकर्षाने जाणवतं. सुरुवातीला ती आपल्या मैत्रिणीला त्याबद्दल विचारायला जरा नाखूष असते. पण ती पर्स तिच्या मनात इतकी भरते कि तिचं वारंवार त्या पर्सकडे लक्ष जाऊ लागतं.
इतक्यात तिची मैत्रिणच तिला विचारते, " तुला माझी पर्स खूप आवडली ना"?
हि म्हणते, "हो, अशी पर्स मी कुठल्याच दुकानात पाहिलेली नाही, एवढी मऊ, इतकी चमकदार, इतके सुंदर टाके! कुठून आणलीस तू "?
त्यावर तिची मैत्रीण म्हणते, "मी सांगेन, पण तुला जे सांगेन ते गुपित ठेवावं लागेल". ठेवशील ?
हि म्हणते, "हो, ठेवीन." पण मला सांगच कि तू हि कुठून आणलीस.
ती मैत्रीण तिला अगदी हळू आवाजात तिचं गुपित सांगते, ती म्हणते, हि हल्लीची अगदी latest fashion आहे. हि पर्स abort केलेल्या अर्भकांच्या कातडी पासून बनवलेली आहे, म्हणून त्याला foet म्हणतात. अर्थातच foetal ह्या शब्दापासून घेतलेला शब्द.
तिचे बोलणे ऐकून त्या बाईच्या अंगावर काटा येतो. पण तरी माहिती म्हणून ती मैत्रीणीचं बोलणं ऐकून घेते. मैत्रीण तिला या वस्तू मिळण्याचं ठिकाणही सांगते. हि बाई मैत्रिणीला त्यात अजिबात रस नसल्याचं सांगते.
पण पुढे कुतूहलापोटी ती ह्या वस्तू मिळणाऱ्या दुकानात जाते. तिथला माणूस तिला सगळ्या वस्तू दाखवू लागतो. काही पर्स अगदी काळ्या असतात, काही पांढऱ्या. त्यांना दाखवून तो म्हणतो, या काळ्या कातडी पासून बनवल्या आहेत, ह्या पांढऱ्या आणि या ब्राऊन रंगाच्या ज्या आहेत त्या आशिया खंडातल्या भारत देशातून आलेल्या आहेत. या कातड्याची आयात केली जाते. त्या देशात आपल्या पोटात मुली असल्याचं लक्षात आलं कि गर्भपात केला जातो.
मग तो आणखी एक पर्स दाखवतो व म्हणतो, हि फार महाग पर्स आहे कारण ती मुलाच्या कातड्यापासून बनवली आहे, तिकडे अगदी एखादीच बाई मुलगा असताना गर्भपात करवून घेते. ती बाई ते सगळं ऐकून हादरून जाते, व तिथून पळत सुटते.
घरी येऊन नवऱ्यालाही त्याबद्दल सांगते. तो हि हादरतोच. पुढे थोड्या दिवसांनी मात्र इतर काही अत्यंत नामी महिलांकडे ती पर्स पाहून fashion बरोबर राहण्याकरता हि बाईही ती पर्स वापरू लागते. अशी काहीशी ती कथा!!!
कथा वाचून थोडावेळ मन विषण्ण झालं. कसला विचित्र विषय… छे!!!

मग थोडावेळाने, यातून लक्षात घेण्यासारख्या दोन गोष्टी जाणवल्या.
पहिली, भारतात होणारी स्त्री भ्रूण हत्या इतक्या प्रमाणावर पोचली आहे, कि परदेशात मंडळीना तो कथा लिहिण्याकरता असलेला विषय वाटू लागला. खरंच यावर गंभीरपणे विचार करायला हवा. नाहीतर, मुलांना लग्न करता मुली मिळत नसल्याचं ऐकू येतंच आहे. पुढे आणखी कितीतरी गंभीर समस्या नक्कीच पाहाव्या लागतील.

दुसरी जाणवलेली गोष्ट, नवीन काहीतरी करणे, fashion साठी जगणे, branded वस्तूंचा हव्यास असणे या गोष्टी मी अनेकांच्या बाबतीत पहिल्या आहेत. कथा जरी थोडी अतिरंजित असली, तरी स्टेटस सिम्बॉल म्हणून अनेक गरज नसलेल्या वस्तू घेणारी मंडळी आहेतच की. तो करतो म्हणून मी केलंच पाहिजे. त्याने एखादी वस्तू विकत घेतल्येय म्हणजे ती माझ्याकडे हवीच, असे अंध अनुकरण करणारे कितीतरी आहेत.

आपण आपल्या खऱ्या गरजा जर ओळखल्या नाहीत तर fashion चा हव्यास जीवनाला भलतीकडेच सहज भरकटवू शकेल असे मनात आल्यावाचून राहिले नाही.

आधारित!!!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (5 votes)

आपण आपल्या खऱ्या गरजा जर ओळखल्या नाहीत तर fashion चा हव्यास जीवनाला भलतीकडेच सहज भरकटवू शकेल असे मनात आल्यावाचून राहिले नाही.

गर्भपातातून पर्स तयार होत आहेत की पर्ससाठी गर्भपात होत आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत मार्मिक प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत आर्थिक प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतर्क्यच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

ऐसीवर स्वागत! कथा रोचक आहे.
नक्की काय चर्चा अपेक्षीत आहे हे मात्र कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठले पुस्तक ते माहिती नाही, पण एकंदरीत सटायर असावे असे जाणवते आहे.

उच्चवर्गीय अत्यंत श्रीमंतांच्या समाजात अशा गोष्टी नॉर्मल असाव्यात असे आपले माझे एक वैयक्तिक मत! अमाप पैसा, न जाणारा वेळ असला की असे जीवनाला भलतीकडेच भरकटणे सहज होत असावे, अर्थात हेही माझे अजून एक वैयक्तिक मत!

- (अमाप पैसा, न जाणारा वेळ नसलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवा सिनेमाला समिक्षक सटायरच म्हणत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाश्चिमात्य राष्ट्रांमधे स्वेट शॉप्समधील वस्तू वा स्वतःच्या मालकीचे स्वेट शॉप्स अविकसित राष्ट्रांत असण्याचा आणि त्यामुळे उच्चभ्रु असण्याचा उल्लेख लोकप्रिय माध्यमातून अनेकदा बघितला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिली, भारतात होणारी स्त्री भ्रूण हत्या इतक्या प्रमाणावर पोचली आहे, कि परदेशात मंडळीना तो कथा लिहिण्याकरता असलेला विषय वाटू लागला. खरंच यावर गंभीरपणे विचार करायला हवा. नाहीतर, मुलांना लग्न करता मुली मिळत नसल्याचं ऐकू येतंच आहे. पुढे आणखी कितीतरी गंभीर समस्या नक्कीच पाहाव्या लागतील.

अधोरेखित भागाबद्दल -

१) मुलांना लग्न करता मुली मिळत नाहीत. हा सप्लाय प्रॉब्लेम आहे असे सकृतदर्शनी दिसते. कदाचित मी संकुचित असेन त्यामुळे तसे होत असेल. पण यात मोरल प्रॉब्लेम आहे का ? असल्यास कोणता ?

२) पुढे आणखी नेमक्या कोणत्या गंभीर समस्या नक्कीच पाहाव्या लागतील ? एक दोन उदाहरणे द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सप्लाय प्रॉब्लेम आहे असे सकृतदर्शनी दिसते

गब्बरभौ, तुम्ही श्वास घेणे-सोडणे ह्या मुलभूत क्रियासुद्धा अर्थशास्त्रिय निकष लावून करता का हो? Wink
(अजुनही काही प्रश्न ह्याच धर्तीवर आहेत पण फारच पर्सनल असल्याने इथे जाहिररित्या विचारणे अप्रस्तुत ठरावे, म्हणून मोह टाळतो आहे) Biggrin

- (मोकळा श्वास घेणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. एकदम शॉल्लेड प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुझे उठा ले रे बाबा...

गब्बर मोड ऑनः

अगदी मूलभूत इच्छा. पण माणसाची ही इच्छा नक्की कशातून आलेली आहे ते बघायला पाहिजे. हा डिमांड आणि त्यातून तयार होणार्‍या स्केअर्सिटीचा प्रॉब्लेम आहे. मला उलट प्रश्न असा विचारावासा वाटतो: भगवानने तुम्हांला कशाला उठून न्यायला पाहिजे? त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह काय त्यात? परत परत असे झाले तर संतपणाचे ग्लॅमर जाणार नाही का? तसे झाले तर अर्थव्यवस्थेला किती मोठा सेटबॅक येईल याची काही कल्पना? अगोदरच श्रीमंतांवर इतके टॅक्स घेतात हे सर्कारी बाबू त्या भुक्कड गरीबांसाठी, अजून टॅक्स लावले तर झालंच!

लिबरल्स हा प्रॉब्लेम आयडिऑलॉजीचा आहे असे मानतील तर समाजवादी हा प्रॉब्लेम क्यापिटालिझमचा आहे असे मानतील.

गब्बर मोड ऑफ.

(गब्बर मोडचा फॅन) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर मोड ऑन झाला म्हणून सरसावून बसलो, पण तो फील नाही आला!

हा मोड, ओरिगीनल गब्बरभौ सारखा लिंकाळलेला नव्हाता की त्यात पुस्तकांची नावे तोंडावर फेकली गेली नाहीत, सबब मझा नाही आला Wink

- (ओरिगीनल गब्बरभौचा पंखा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म, नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा धागा काश्मिर ला की मुझफ्फराबाद ला न्यायचा तुमचा डाव आमच्या लक्षात आलेला आहे, सोत्रि व बॅटमन.

(पळा .... दोघे ही वीरू व जय गब्बर च्या मागे लागणार .... व मला चुन चुन के मारणार....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बऽऽर!!!! तेरे लिये तो मेरे प्रतिसाद ही काफी हैं Wink

-ठाकुर बॅटूदेव सिंग, गॉथमगढ़.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर अगर तुम एक मारोगे (पक्षी:प्रतिसाद) तो हम चार मारेंगे!

- (ठाकुर बॅटूदेव सिंगने गॉथमगढ़ला यायचे आवतान दिलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिशक्याँव् ढिशक्याँव् ढिशक्याँव्!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला खरंतर तुझा प्रतिसाद नीट कळला नाहीय. पण जो थोडाफार कळलाय त्यावरुन धनंजयने दिलेला एक प्रतिसाद तुझ्या प्रश्नांचे उत्तर देउ शकेल असे वाटतेय. शोधतेय.

----
शोधला पण सापडला नाही :-(. स्त्रीभृणहत्यामुळे जेँडर रेशो बिघडला, त्यामुळे बलात्कार/पळवून नेणे वगैरे गुन्हे वाढले. यासर्वाचा पुढच्या काही पिढ्यांना त्रास होइल. पण त्यानंतर स्त्रीयांना जास्त संरक्षण, सोयीसुवीधा मिळतील असा काहीसा अर्थ होता त्या प्रतिसादाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोटिव्हेशन, रिझनिंग, प्रेरणा कोणतीही असो .... कोणत्याही व्यक्तीवर (इथे स्त्री) बलप्रयोग होता कामा नये - हे तत्व. त्यामुळे जेंडर रेशो बिघडण्याची परिणती - बलात्कारात होते (किंवा होऊ शकते) हे मला अस्वीकारणीय आहे. स्त्रीला पळवून नेणे हा देखील बलप्रयोग आहे. जेंडर रेशो बिघडो अथवा ना बिघडो - सर्व व्यक्तींचे (इथे स्त्रियांचे) बलप्रयोगापासून रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे व असायला हवे.

आता जेंडर रेशो बिघडणे - ह्यात मोरल समस्या काय आहे ते सांग. व नेमके कुणाचे मोरल आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्त्रीभृण हत्येला विरोध करायची गरज नाही' असे म्हणायचे आहे का? तसे असेल तर ते म्हणणे मला मान्य आहे. बहुतेक सारख्या उत्तराकडे यायचे आपले रस्ते, कारणे वेगवेगळी असतील. चुभुद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्त्रीभृण हत्येला विरोध करायची गरज नाही' - ह्या मुद्द्यावर मला अनेक रिझर्व्हेशन्स आहेत.

मी जर महाराष्ट्रात आमदार असतो तर कदाचित विरोध केला नसता. त्या सर्व विधेयकांच्या बाजूने मतदान केले असते. पण एक autonomous, purposeful entity म्हणून प्रचंड हेजिटेशन्स आहेत.

(द्विधा मनस्थितीतील) गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एक autonomous, purposeful entity म्हणून प्रचंड हेजिटेशन्स आहेत. > हम्म मला वाटलच होत की तू individualistic अप्रोच घेणार आणि मी pessimistic Smile . मला हेजिटेशन्स नाहीत. मुलगा हवा म्हणुन ४-५ मुलींची लाइन लावणार. त्यातल्या एखाददुसरीच नाव 'नकुशी' ठेवणार. त्यासगळ्यांना पदोपदी 'मुलगी' असल्याची जाणीव करुन देणार. त्यापेक्षा नकोच त्या मुली. मरुदेत त्यांना गर्भात असतानाच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती कडवट होते आहेस! समजू शकते पण मला ही प्रतिक्रिया. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उद्वेग समजू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओके जास्तच कडवटपणा आलाय का प्रतिसादात :-). पण तरी इनजनरल माझा कोणत्याही कारणासाठीच्या भृणहत्येला विरोध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रूणहत्येला विरोध नाही. ज्या व्यक्तीला आपल्या शरीराच्या आत मूल वाढवायचं आहे, त्या व्यक्तीनंच ते ठेवायचं की पाडायचं ते ठरवायचं. त्याबद्दल संदेह नाही. पण - असो.

अवांतरः तुझी प्रतिक्रिया वाचून मला 'गोफ'मधली आनंदाची ड्रग्सबद्दलची प्रतिक्रिया आठवली. 'इतकं करण्याहून सरळ परवानगी देऊन टाकावी. ज्यानं त्यानं आपापल्या देहाचं काय करायचं ते ठरवावं. निदान बाकीच्या लोकांची दु:ख तरी टळतील...' अशा आशयाची कडवट प्रतिक्रिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मरुदेत त्यांना गर्भात असतानाच...

गर्भपात आणि भ्रूणहत्या या दोन भिन्न बाबी आहेतसे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांना लग्न करता मुली मिळत नाहीत. हा सप्लाय प्रॉब्लेम आहे असे सकृतदर्शनी दिसते. कदाचित मी संकुचित असेन त्यामुळे तसे होत असेल. पण यात मोरल प्रॉब्लेम आहे का ? असल्यास कोणता ?

या पार्श्वभूमीवर पाहिले असता गर्भपातास विरोध लक्षात येत नाही.

(तुमचा आहे, असे म्हणत नाही. परंतु एरवी सगळ्या गोष्टींचा 'अर्थशास्त्रीय दृष्टिकोना'तून विचार करणार्‍या कंपूत सहसा असतो, असे निरीक्षण आहे, म्हणून म्हटले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु एरवी सगळ्या गोष्टींचा 'अर्थशास्त्रीय दृष्टिकोना'तून विचार करणार्‍या कंपूत सहसा असतो, असे निरीक्षण आहे, म्हणून म्हटले

म्हणूनच मी त्यास - संकुचित असे संबोधून त्यास डिसमिस केले. व नंतर मोरल समस्या काय आहे - हे विचारले. नैतिकतेच्या कोणत्या तत्वाचे उल्लंघन होतेय हे मला समजून घ्यायचे आहे. व त्यासाठी मी माझ्या अर्थशास्त्रीय दृष्टीकोनास बाजूला ठेवायला सुद्धा तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडं गुगलल्यावर हे सापडलं, 'त्वचादानातून' अनेक उत्पादने निर्माण करण्यात येत आहेत आणि ती वापरणं बहुदा उच्चभ्रु समजले जाते. त्याचबरोबर 'आइच्या दुधाचे आईसक्रीम' असेही एक उत्पादन सापडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे माझ्या देवा! :O
डोक्याने विचार करता ठीकच वाटतय. पण तरीही थोडंस मळमळायला लागलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तरीही थोडंस मळमळायला लागलं...

लॅक्टोज़ इन्टॉलरन्स असेल कदाचित.

(आइस्क्रीमऐवजी दही चालेल काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा ते नै कै. प्रतिसादातील दुवा वाचुन सायलेंस ऑफ द लँब्ज वगैरे आठवल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्युमन लेदर .... श्शी खरंच अमानवीय आहे हे!!!

(मग प्राण्यांपासून बनवलेल्या लेदर बाबतीत आपण एवढे निष्ठूर का असाही प्रश्न येतोच - निरुत्तर Sad )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राण्यांचं मांस खाणं प्रचलित आहे.
मानवी मांस खाणे आघाडिचे सारे देश व प्रमुख संस्कृती ह्यानुसार बेकायदेशीर व अनैतिक दोन्ही आहे.
cannibalism, मानवमांस भक्षण हा गुन्हा आहे.

शाकाहार्यांनाही धार्मिक वगैरे असले तर ह्यातून आपले हात काढून घेता येत नाहित.
शाकाहारी धार्मिक व्यक्ती सोवळे वापरते.
सोवळे कसे बनते ?
रेशीम किडा कोषात असतानाच तो कोषासकट उकळतय पाण्यात टाकला जातो.
तरी ते रेशीम परमपवित्र वगैरे असते.
सजीव- निर्जीव, झाडे- वनस्पती हा असा अत्यंत घिसापीटाच विषय होइल.
तेच ते मुद्देही येतील.
असो, विचित्र गोंधळ आहे खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तसेच मृगाजिन किंवा व्याघ्रजिनावर ध्यान चांगले लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मृगाजिनामागे कारण ऐकले आहे की मात्रागमनी नसलेला तो एकच प्राणी आहे म्हणून. खरेखोटे देव जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

" मात्रागमनी " म्हंजे काय रे भाउ

लई जड मराटी वापरत्या भो तुमी लोकं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यामते ते एका फार कॉमन शिवीच सौंस्कृतीकरण आहे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ शिवीचा उगम फारसी आहे, अत एव ती त्याज्य आहे. (शिवी आहे, म्हणून नव्हे.)

'भाषाशुद्धी, भाषाशुद्धी' म्हणतात, ती हीच.

----------------------------------------------------------------------------------------------

(पुढील मजकूर स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा.)

*
(ऐकीव गोष्ट.)

या भाषाशुद्धी प्रकाराचाच आणखी एक आविष्कार म्हणजे, 'साहेब' हा म्हणे फारसी शब्द आहे. म्हणून तो वापरायचा नाही. 'राव' म्हणायचे. अगदी स्वतःच्या मातु:श्रींना (आदराने) संबोधण्याकरितासुद्धा (शिवाजीमहाराजांप्रमाणे) 'आईसाहेब' वापरायचे नाही, 'आईराव' म्हणायचे.

त्यावर झालेली (काहीशी असभ्य) टीका: "मायला, यांना यांच्या आईच्या मागे 'साहेब' लागलेला चालत नाही; 'राव' लागलेला चालतोय."
*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारसी?? अस्सल मराठीदेखील आहे की त्याच अर्थाची.
टिंबटिंबटिंबचंद्ररावसाहेबजी चा वेगळाच अर्थ दाखवून देण्यासाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्सल मराठीदेखील आहे की त्याच अर्थाची.

आहे खरी. परंतु ती वापरल्यास ते असभ्य समजले जाते. उलटपक्षी, संस्कृत आवृत्ती वापरल्यास ते 'शिष्टसंमत' म्हणून खपून जाऊ शकते. (अनेकांना समजत नाही म्हणून असावे कदाचित.)

जसे, 'शष्प' लिहिलेले खपून जाते, परंतु त्याच अर्थाचा मराठमोळा शब्द अशिष्ट ठरतो, तसेच.

(इंग्रजीतसुद्धा, अश्लील ठरू शकेल असा मजकूर छापताना तेवढाच मजकूर ल्याटिनमध्ये छापण्याची पद्धत एके काळी होती, असे वाटते. बहुधा चुकून घरात लहान मुलाच्या हाती पुस्तक पडले तर आफत नको, म्हणून असावे की काय, नकळे. या पद्धतीस काय म्हणतात, कल्पना नाही, परंतु हा प्रकार पाहण्यात आलेला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी-लॅटिन अशी डायकॉटॉमी असल्यास आश्चर्य वाटावयास नको, यद्यपि तिचा उल्लेख प्रथमच ऐकला.

तदुपरि फारसीतील आईवाचक शब्द ऐकताक्षणीच शिवीच्या मुळाचा उलगडा झाला हेवेसांनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येथील (या विभागातील) शेवटच्या परिच्छेदातून उद्धृत:

By 1900, creative Latin composition, for purely artistic purposes, had become rare. Authors such as Arthur Rimbaud and Max Beerbohm wrote Latin verse, but these texts were either school exercises or occasional pieces. The last survivals of New Latin to convey non-technical information appear in the use of Latin to cloak passages and expressions deemed too indecent (in the 19th century) to be read by children, the lower classes, or (most) women. Such passages appear in translations of foreign texts and in works on folklore, anthropology, and psychology, e.g. Krafft-Ebing's Psychopathia Sexualis (1886).

(लक्षात घ्या, एकएक शब्द नव्हे, आख्खा परिच्छेदच्या परिच्छेद मध्येच ल्याटिनमधून छापण्याची बात चाललेली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबराटच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवीचे जाऊ द्या पण मादरेवतन हा मातृभूमी या अर्थाचा शब्द रूढ आणि प्रतिष्ठित आहे. इतकेच नव्हे तर गुजरातीतही मादरवतन असा शब्द आहे. एका देशभक्तीपर जुन्या गुजराती गाण्यात हा शब्द नक्की ऐकलेला आहे. 'तैयार थइ जजो', देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार रहा असे ते गाणे होते. सदाय लहराय गगन भारती ध्वजो असा शेवट होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक! आम्हांला उर्दूवाले लोक क्वचित कधी 'मादरी ज़बान' म्हणत त्यावरून तो खर्राखुर्रा शब्द आहे हे कळ्ळे, नैतर शिवी सोडून तो कधी ऐकण्यातच आला नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अ‍ॅक्चुअली, मातृ किंवा मातर् आणि मादर यात फारसा फरक नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. इंडोयुरोपियन वारशाचाच परिणाम, दुसरे काय? शिवाय संस्कृतला सर्वांत जवळ असलेली भाषा म्ह. फारसीच आहे.

बोले तो, वरिजिनली. पुढे मरुस्थलनिवासी म्लेच्छांचे आक्रमण पचवताना बरीच भेसळ झाली असली तरी बर्रेच शब्द वरिजिनल कनेक्षनची आठवण करून देतील असे आहेत. बेशिक आकडे काय, किंवा मादर-पिदर-बारादर काय, किंवा अन्य व्होक्याब काय, ते पाहिले की लग्गेच कळून येते. अन अवेस्ता व ऋग्वेद यांतील भाषिक साम्य तर वेसांनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संस्कृतला सर्वांत जवळ असलेली भाषा१ म्ह. फारसीच आहे.

+.

या पार्श्वभूमीवर, सावरकरांची फारसी-अ‍ॅलर्जी समजत नाही.

(ती किंवा तत्सम-तद्भव भाषा बोलणार्‍या गटांविषयी अप्रीती, पटली नाही तरी, एक वेळ समजू शकतो. पण भाषेतील शब्दांचे स्वभाषेतून उच्चाटन करावे वाटण्याइतकी भाषेची तिडीक कशाबद्दल? तेदेखील, बदली शब्द ज्या भाषेतून बनवायचे (स्वभाषेतून नव्हे!), त्या भाषेशी अत्यंत जवळचे नाते सांगणार्‍या भाषेबद्दल? केवळ ती भाषा बोलणारे बहुसंख्य लोक आज मुसलमान आहेत म्हणून?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेदेखील, बदली शब्द ज्या भाषेतून बनवायचे (स्वभाषेतून नव्हे!), त्या भाषेशी अत्यंत जवळचे नाते सांगणार्‍या भाषेबद्दल? केवळ ती भाषा बोलणारे बहुसंख्य लोक आज मुसलमान आहेत म्हणून?

एक तर अरबी आक्रमणानंतर फारसीत अरबी शब्द बरेच घुसले, लिपीही स्वतःची टाकून अरबांची उचलल्या गेली.अन मूळचे कनेक्षन म्हणून अवेस्ता पाहू गेले तरी काय दिसते? इंद्रादि देवतांना ते वैट्ट वैट्ट दुष्ष्ट म्हंटात. त्यामुळे तिकडच्यांशी जे ऋग्वेदकाळापासून फाटले आहे ते आहेच. ते एक असोच.

शिवाय, सर्वांत महत्त्वाचे म्ह. इ.स.१००० नंतर जी 'मुसलमान' आक्रमणे झाली, त्यांतली बहुसंख्य जन्ता ही अरबाळलेली, फारसी बोलणारी अन एथनिसिटीने तुर्क होती. त्यामुळे फारसी=मुसलमानांची(तुरुष्कांची) भाषा असे कनेक्षन भारतीय मनात ठसणे अपरिहार्यच होते. त्याच कारणासाठी स्वतः छत्रपतींनी फारसी-संस्कृत डिक्शनरी अर्थात राज्यव्यवहारकोशाची निर्मिती करण्यास पंडित ढुंढिराज व्यासांना फर्मावले होते.

मुघल साम्राज्य नष्ट झाल्यावर, मराठी राज्य असताना व अल्पिष्टनसाहेबाने शनवारवाड्यावर युनियन जॅक फडकाविल्यानंतर ब्रिटिश राज्य आल्यावरही, फारसीचे ग्ल्यामर गेले नव्हते. खंडीभर हिंदू जरी फारसी/उर्दू जाणत असले तरी कल्चरली तिचे मूळ तुरुष्कांपाशी जाते हे सर्वच जाणून होते.

इतकी सगळी बोंबाबोंब अगोदरच झाली असताना, एकट्या सावरकरांना दोष तरी का द्यावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक तर अरबी आक्रमणानंतर फारसीत अरबी शब्द बरेच घुसले,

त्याने फारसी लोक 'अरब' झाले का? नाही. ते फारसी ते फारसीच राहिले.

मग आपल्याच भाषेत फारशी शब्द घुसडले गेल्याने असे काय मोठे उत्पात होतात?

शर्टप्याण्ट घातल्याने किंवा शेंड्यांची प्रथा नामशेष झाल्याने हिंदुत्व मोडीत निघाले नाही.

लिपीही स्वतःची टाकून अरबांची उचलल्या गेली.

मराठीत तुरळक फारसी शब्द घुसून रुळल्यावर मराठीची लिपी फारसी/अरबी झाली का? नाही.

फॉर द्याट म्याटर, मराठीत इंग्रजी शब्द घुसून रुळल्यावर मराठीची लिपी रोमन झाली का? नाही.

इंद्रादि देवतांना ते वैट्ट वैट्ट दुष्ष्ट म्हंटात.

यात काय विशेष? आमच्यातले कर्मठ वैष्णवसुद्धा शंकराला वै. वै. दु. म्हणतात. फार कशाला, चुकूनसुद्धा नाव घेणे पाप समजतात शंकराचे. हे तर भारतीय परंपरेला साजेसेच झाले!

त्यामुळे तिकडच्यांशी जे ऋग्वेदकाळापासून फाटले आहे ते आहेच. ते एक असोच.

पुराणातील वांगी. तुझ्या आजोबांनी माझ्या आजोबांचे पाणी उष्टावून गढूळ केले होते, म्हणून आज तुझा मी दुस्वास करणार. पण असोच.

शिवाय, सर्वांत महत्त्वाचे म्ह. इ.स.१००० नंतर जी 'मुसलमान' आक्रमणे झाली, त्यांतली बहुसंख्य जन्ता ही अरबाळलेली, फारसी बोलणारी अन एथनिसिटीने तुर्क होती. त्यामुळे फारसी=मुसलमानांची(तुरुष्कांची) भाषा असे कनेक्षन भारतीय मनात ठसणे अपरिहार्यच होते.

हे कनेक्षन एक वेळ समजू शकतो. परंतु तरीही, मराठीत बोलताना जेव्हा आपण कारकून, कचेरी, दप्तर, तपशील वगैरे म्हणतो, तेव्हा त्या शब्दाशब्दागणिक आपल्या बापजाद्यांच्या मुलखात लुटालूट करणारे नि त्यांच्या आयाबहिणींची अब्रू लुटणारे दाढीधारी म्लेंच्छ (किंवा त्यांना जे काही म्हणत असतील ते) शिपाई आपल्या डोळ्यांसमोर नाचतात, की पगार घेताना विहिरीत पाव टाकून बाटवणारे पोर्तुगीज आपल्याभवती पिंगा घालतात? तसे होत असल्यास, तो दोष आपला, की त्या (काल्पनिक) म्लेंच्छापोर्तुगीजांचा?

त्याच कारणासाठी स्वतः छत्रपतींनी फारसी-संस्कृत डिक्शनरी अर्थात राज्यव्यवहारकोशाची निर्मिती करण्यास पंडित ढुंढिराज व्यासांना फर्मावले होते.

For all his greatness, no one ever accused the Chhatrapati of being an intellectual. सावरकरांबद्दल हेच म्हणता येईलसे वाटत नाही; त्यांच्याकडून याहून बरी अपेक्षा करता येणार नाही काय?

किंवा, कोण जाणे, महाराजांची काही राजकीय म्हणा, अन्य म्हणा, कंपल्शन्स असतीलही; आपल्याला ठाऊक नाही. टू बी फेअर, सावरकरांबद्दलही हेच म्हणता यावे.

मुघल साम्राज्य नष्ट झाल्यावर, मराठी राज्य असताना व अल्पिष्टनसाहेबाने शनवारवाड्यावर युनियन जॅक फडकाविल्यानंतर ब्रिटिश राज्य आल्यावरही, फारसीचे ग्ल्यामर गेले नव्हते. खंडीभर हिंदू जरी फारसी/उर्दू जाणत असले तरी कल्चरली तिचे मूळ तुरुष्कांपाशी जाते हे सर्वच जाणून होते.

हिंदुस्थानातील इंग्रजी साम्राज्य नष्ट होऊन संबंधित ठिकाणीं तिरंगा वा चाँदतारा फडकू लागल्याला आज साठाहून अधिक वर्षे उलटून गेली. फार कशाला, पैकी कोठे चाँदतार्‍याचेदेखील उच्चाटन होऊन तेथे हिरव्या पार्श्वभूमीवरील सूर्याचे निशाण फडकू लागल्यालादेखील चाळिसाहून अधिक वर्षे लोटली. इंग्रजीचे ग्ल्यामर उपखंडावर अद्याप टिकूनच आहे. (आजमितीस त्या ग्ल्यामरास इंग्रज, इंग्रजी सत्ता वा गतकालीन इंग्रजी सत्तेची आठवण यांपैकी काहीही कारणीभूत नाही, असल्यास तिसरेच कोणी वा काही कारणीभूत असावे, ही बाब अलाहिदा.)

या ग्ल्यामरामुळे आजमितीस भारताचे नेमके काय नुकसान होत आहे, किंवा भारताचा नेमक्या कोणत्या प्रकारे तेजोभंग होत आहे? आणि, खंडीभर भारतीय आज इंग्रजी जाणत असले, तरी कल्चरली तिचे मूळ हिंदुस्थानावर राज्य करणार्‍या (नि हिंदुस्थानास लुटणार्‍या, झालेच तर हिंदुस्थानवासीयांवर जुलूम करणार्‍या) इंग्रजांपाशी आहे, ही बाब आजमितीस किती भारतीयांना पदोपदी जाणवते? आणि समजा जाणवली, तरी त्याने भारतीय मानसावर असा नेमका काय फरक पडतो?

=====================================================================================================================================
आत्तासुद्धा मी हे मराठी वाक्य लिहिताना त्यातील 'फॉर द्याट म्याटर' हा (मराठी) भाग देवनागरीतच लिहिला, तो केवळ मला या संकेतस्थळावर लिपी बदलताना घ्याव्या लागणार्‍या अधिकच्या कष्टाचा कंटाळा म्हणून नव्हे.

या वाक्यावर थोडे अधिक पॉलिशकाम चालू शकेल. Wink

पहा, गरज पडल्यास, इंग्रजीतून लिहिताना मीसुद्धा लिपी बदलण्याचे कष्ट घेऊ शकतो की नाही? Wink

हे वाक्य केवळ पुढेमागे चुकून कधी महाराष्ट्रात कडमडलोच, तर कोठल्यातरी र्‍याण्डम रेम्याडोक्या सैनिकाब्रिगेड्याकडून रस्त्यात मार खावा लागू नये, म्हणून. अन्यथा, हे वाक्य खरे तर मुद्दाम लिहिण्याची काही आवश्यकता नसावी; ते अध्याहृत असावे. तसेही, वर लिहिलेल्या कोणत्याही वाक्यात किमानपक्षी महाराजांबद्दल तरी कुत्सित वा अपमानास्पद असे काहीही नाही, हे भाषेची चांगली जाण असणारांस सहज लक्षात यावे; समझने वाले को इशारा काफ़ी.

या शब्दाच्या या ठिकाणी वापराचा बचाव गरज पडल्यास (आणि मूड असल्यास) स्वतंत्रपणे करेन. तूर्तास टंकाळा आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याने फारसी लोक 'अरब' झाले का? नाही. ते फारसी ते फारसीच राहिले.
मग आपल्याच भाषेत फारशी शब्द घुसडले गेल्याने असे काय मोठे उत्पात होतात?
शर्टप्याण्ट घातल्याने किंवा शेंड्यांची प्रथा नामशेष झाल्याने हिंदुत्व मोडीत निघाले नाही.

पण पूर्ण धर्म बदलला, सांस्कृतिक संदर्भ आमूलाग्र बदलले. यामुळे उत्पात इ. होतात की नाही हा वेगळा मुद्दा-पर्सनली स्पीकिंग मला ते इतके बरोबर वाटत नै पण असो, तो मुद्दा नै. सांगायचे इतकेच, की फारसी भाषेत नंतर अनेक अरबी शब्द घुसले, सबब संस्कृतशी कनेक्षन पुसट झाले. अन कनेक्षन असले तरी तेवढ्यावरून पारशी-भारतीय भाई भाई म्हटलेच असते असेही नाही.

पुराणातील वांगी. तुझ्या आजोबांनी माझ्या आजोबांचे पाणी उष्टावून गढूळ केले होते, म्हणून आज तुझा मी दुस्वास करणार. पण असोच.

हे आपलं असंच मजेत म्हटलं होतं ओ, परमार्थेण न गृह्यतां वचः|

For all his greatness, no one ever accused the Chhatrapati of being an intellectual.३ सावरकरांबद्दल हेच म्हणता येईलसे वाटत नाही; त्यांच्याकडून याहून बरी अपेक्षा करता येणार नाही काय?
किंवा, कोण जाणे, महाराजांची काही राजकीय म्हणा, अन्य म्हणा, कंपल्शन्स असतीलही; आपल्याला ठाऊक नाही.४ टू बी फेअर, सावरकरांबद्दलही हेच म्हणता यावे.

हेच म्हणतो. कंपल्शन्स असतील, आणि त्यांना अँटी-फारसी होण्यासाठी तसे ब्याकग्रौंड उपलब्ध होते हेच आणि इतकेच सांगावयाचा हेतू होता. आपली एक 'शुद्ध हिंदू' प्रकारची ओळख तयार करायची असेल तर 'म्लेच्छभाषा' त्यागली पाहिजे असे काहीसे ते लॉजिक. तेवढ्यापुरतं ते ठीक आहे. बाकी तेजोभंग इ. होतो असे मला वाटत नाही, इनफ्याक्ट जमल्यास पुढेमागे कधीतरी फारसी थोडीशी तरी का होईना, शिकावयाची इच्छादेखील आहे. तस्मात पुढील मेगाबाईट्ससाठी हा किलोबायटी प्रतिसादही गोड मानून घ्यावा Wink

ख्यॅली मॅम्नून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फातिमा जीना (कायदेआज़मांची बहीण) यांना पाकिस्तानात मादर-इ-मिल्लत (राष्ट्रमाता) म्हणून संबोधले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राष्ट्रमाता तर..

म्हायतीकरितां धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते कायदेआज़मांच्या लिंकेवरचे गोड गाणे ऐकलेत की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. यावच्छक्य अवश्य ऐकेन, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही. यावच्छक्य अवश्य ऐकेन, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जी काही मूल्ये असतील ती माणसामाणसांतच पाळायची असतात. बाकी प्राणी तर लेसर बीइंग्स असतात. त्यामुळे त्यात कननड्रम इ.नाही.

असे असले तरी एका हरिणीला मारून तिच्या कातड्याचा ड्रम वाजवला असता एक हरीण त्याचा ध्वनी ऐकायला कायम यायचे ती कथा किंवा तिचा उल्लेख ऐसीवर वाचला होता, तोही वाचवत नाही.

तस्मात ही भूतदया नक्की कुठे उसळी मारेल, याचा नेम नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं