निरोप ..!!

निरोप घेता घेता
निरोप घेणे ईतके सोपे नसते
निरोप घेताना
काळजात एक कळ उठते
निरोप घेताना
जसे आभाळ भरून येते
तसे मन भरून जाते
कधीपण कोसळू शकतो
आता हा पाउस
तसे मन होऊन जाते
निरोप घेता घेता
निरोप घेणे सोपे नसते ....!

कोठून कोठे आलो..?
किती लांबचा प्रवास झाला
घंर सोडताना
मन किती भरून आले होते
पण खरेच सांगतो
परदेशातील नोकरीमुळे
मन तेव्हा फुलले होते
छान होता विमान प्रवास
सगळे आभाळ अंगण होते
पण
घर सोडताना मन कसे दाटून येते
नि सगळे कसे
जे कधी आपले वाटत नव्हते
तेही आपले वाटू लागते
निरोप घेताना
निरोप घेणे ईतके सोपे नसते ...

आईचे भरलेले डोळे
बाबांची चलबिचल
नि उगाचच येरझार्या घालणे
मन सुन्न करून टाकते
आजूबाजूची घरे ,माणसे
झाडे ,पक्षी
सगळे सोडून जातांना
त्यांच्या विषयी
किती आपलेपण वाटते
आपले मन ओढून काढताना
मन मात्र मोडून जाते
नि डोळा हलकेच पाणी येते
निरोप घेताना
निरोप घेणे खूप अवघड असते ....!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संदीप खरेंची हे भलते अवघड असते ही कविता आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0